पार्टी...........!!!

पार्टी

सुन्न शांत काचपेले
रंगभर फेसाळतात
आणि एकूणच फेस फेस

सोबत ताटल्या पोटुशा
तो खुपसतो काटा लुसलुशीत कबाबात

ती सुहास्य , तात्पुरती टवटवीत
बर्फाचे थंड चौकोन
तिखटमिठाचं कुरकुरीत आतबाहेर येत जात

मध्ये काहीतरी आठवून तो म्हणतो
तू पण आली असतीस
ती मंद हसत रिकाम्या ताटल्या उचलते

फेस टिपेला ..उसळणारा

पोर आत जागा मिळेल तिथे
आडवी पऱ्यांच्या राज्यात
बाहेर पेल्यातल्या पऱ्याच पऱ्या

पुढे पेले शांत ..उष्टे माष्टे..तरी गढूळलेले
ती आत भरल्या पसाऱ्यात रिकामी

आणि बाहेरच्या भूकांची साद

सारे आटोपताना ती स्वतःशीच म्हणते
अंधारून तर आलंय....तरीही
बस आता एकच काम
सोशिक कर्तव्यदक्षपणे
आणि पार्टीची सचैल सांगता.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

वा! मस्त!
आवडली! विषेशतः रूपकांनी दिलेली वळणे खासच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Lol धन्यवाद..........!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'पर्‍या' हा शब्द बर्‍याचदा आल्याने कविता जाम आवडली बॉ आपल्याला.

बाकी ह्या कवितेला किती शेअर आणि किती लायीक्स मिळाले ह्याची माहिती दिली नसल्याची रुखरुख कविता वाचून झाल्यावरती जाणवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0