चेहेरे (भाग २)

मुखवटे - भाग १

खरडफळ्या‌वरची गौरी/महालक्ष्मी चर्चा वाचून काही महिन्यांपूर्वी काढलेले हे फोटो आठवले.

लहानपणी गौरी, गौरी जेवणं, त्यांच्या निमित्ताने झालेली हळदीकुंकू (विधवांना हळदीकुंकू लावायचं नसतं हे ज्ञान) हे सगळं आठवलं. त्या वयात जे नीट समजलं नव्हतं, हे सगळे देव असे एयरब्रश केलेले का असतात, या देवांच्या चेहेऱ्यावर एवढा बालिश निरागसपणा का असतो, हेही प्रश्न आठवले. त्या निमित्ताने हे दोन धागे.

१.
चेहेरे

२.
चेहेरे

३.
चेहेरे

४.
चेहेरे

५.
चेहेरे

६.
चेहेरे

७.
चेहेरे

८.
चेहेरे

९.
चेहेरे

१०.
चेहेरे

११.
चेहेरा

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सुपर्ब व्यक्तीचित्रे. ते आई-मुलीचे फार आवडले. खूपच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही धागे स्टेटमेन्ट आहेत. खूप आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच भारी. झोपलेल्या बाई, फलाटावरच्या बाई आणि आंघोळ करणार्‍या बाई - फारच आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आँ! आंघोळ करणार्‍या? धुणीभांडी करणार्‍या म्हणायचंय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

अं... हो. धुणीभांडी करून झाल्यावर तोंड धुणार्‍या. बास?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हो!
तुम्ही "फारच आवडल्या" असं नोंदवलंय, म्हणून वाटलं निरिक्षण नीट केलेलं असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

फार बॉ तुमच्या अपेक्षा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

व्वा!
बोळकी म्हातारी सुपर्ब!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आई-मुलीचे, बोळकी म्हातारी, धुणीभांडी करून झाल्यावर तोंड धुणार्‍या, झोपलेल्या बाई, फलाटावरच्या बाई .. फर्स्ट क्लास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक शंका -फोटो काढण्याआधी ह्या सगळ्यांची परवानगी घेतली होती का ? विशेषत: झोपलेल्या काकू, किंवा धुणी धुताना ब्रेक घेवून तोंड धुणार्या काकू किंवा त्या कळशी उचललेल्या काकू ?

कारण
१. मला स्वत:ला कोणी (अनोळखी व्यक्तीने* किंवा ओळखीच्या व्यक्तीनेसुद्धा) माझ्या परवानगीशिवाय माझे रोजच्या रुटीन मधले फोटो काढलेले आवडणार नाही आणि आंतरजालावर टाकलेले तर त्याहून आवडणार नाही.
२. वर विशेष उल्लेख केलेल्या बायकांना जर त्यांचे हे फोटो दाखवले असतील तर त्यांना ते आवडण्याची / इतरांनी पाहावे असे वाटण्याची शक्यता जरा कमी वाटते ( नॉट बीइंग जजमेंटल , पण तरी मला असं वाटतं ).

*- अदितीची आणि त्या सगळ्यांचा फारसा परिचय नसावा हे गृहीतक .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

१ आणि ३ वगळता बाकी स्त्रियांना त्यांचे फोटो काढत्ये हे माहीत होतं, त्यांनी आक्षेप घेतला नाही. चौथ्या फोटोतल्या बाईंना बहुदा संशय होता मी फोटो काढत्ये असा. प्लॅटफॉर्मवर बराच वेळ आमचा नॉन-व्हर्बल सं-वाद झाला. त्यांचा फोटोंबद्दलचा अॅटीट्यूड दिसणारा फोटो मला सगळ्यात जास्त आवडला. नवव्या फोटोतल्या कळशीवाल्या स्त्रियांचे फोटो काढले त्यातले बरेच फोटो गोग्गोड आल्येत म्हणून नाकारावे लागले. या स्त्रिया सार्वजनिक विहीरीवर पाणी भरत होत्या. मी तिथल्या समोरच्याच घराच्या पडवीत बसले होते. त्यांना विचारलं, "तुमचे फोटो काढलेले चालतील का?" त्या बऱ्याच लाजल्या, त्यामुळे ते फोटो मला फार आवडले नाहीत. इथे लावलेल्या फोटोत चेहेरे फारसे दिसतच नाहीयेत, म्हणून ते गोग्गोड हसू लपतंय, म्हणून तो फोटो उचलला. तोंड धुणाऱ्या स्त्रीचा फोटो काढला तेव्हा तिचं लक्ष नव्हतं, पण ती परात्पर ओळखीची आहे. तिचे फोटो काढून झाल्यावर तिला हाक मारून तिला सांगितलं.

या सगळ्या स्त्रियांना फोटो काढणं समजतं याबद्दल मला शंका नाही. पण बहुतेकींना आंतरजाल म्हणजे काय, तिथे फोटो प्रकाशित करणं म्हणजे काय हे माहीत असेल का नाही याबद्दल मला शंका आहे. कर्तबगार स्त्रियांच्या या निरागसपणातूनही एक प्रकारचा गोडवा त्यांच्या चेहेऱ्यावर आहे. शेवटच्या फोटोत तो नाही. ती मुलगी माझ्या जवळच्या ओळखीची आहे; तिला इंटरनेट, व्हॉट्सअॅप ही प्रकरणं माहीत आहेत. तिचा चेहेरा मुळात गोड असला तरीही तिच्या चेहेऱ्यावर गोडव्यापेक्षा आत्मविश्वास अधिक आहे. ती माझी गौर.

सार्वजनिक ठिकाणी आपले फोटो काढले जातात ही गोष्ट मला फारशी आक्षेपार्ह वाटत नाही. लोकांच्या परवानगीशिवाय फोटो काढण्याबद्दल काय कायदे आहेत याबद्दल मला माहीत नाही. पैसे मिळवण्यासाठी या फोटोंचा वापर होत नाही तोपर्यंत माझे फोटो (माझ्या नकळत) कोणी काढण्याबद्दल मला आक्षेप नसेल. (मला सांगून फोटो काढले तर त्याला कोणीही पैसे देणार नाही.) माझ्या नकळत माझे फोटो काढून कोणी पैसे मिळवलेच तरी मी काय करू शकणार, या हतबलतेमधूनही कदाचित प्लॅटफॉर्मवरच्या बाईसारखा "कुत्ता जाने चमडा जाने" अॅटीट्यूड तयार झाला असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तरीही तिच्या चेहेऱ्यावर गोडव्यापेक्षा आत्मविश्वास अधिक आहे

डिट्टो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो काढण्याआधी परवानगी घ्यावी याच्याशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+/-

काही फोटो काढणाराला कल्पना देऊन काढता येत नाहीत उदा. वरील क्र. ३ चा फोटो
मात्र अशावेळी फोटो काढल्यानंतर त्याव्यक्तीला त्याची कल्पना द्यावी असे माझेही मत आहे

===

हे फोटो मॉडेलला कल्पना न देता सार्वजनिकरित्या प्रकाशित करावेत का? माझ्या मते सहसा नाही. (याच कारणास्तव मी स्पर्धेत एक फोटो टाकला होता तो मागे घेतला)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्याच कारणासाठी मोबाइल मधल्या कॅमेर्‍याला शटर चा आवाज कंपलसरी आहे असे मी ऐकले होते.

हा शटरचा आवाज बंद करण्याची सोय कुठल्याही मोबाइल मधे नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा शटरचा आवाज बंद करण्याची सोय कुठल्याही मोबाइल मधे नसते.

नाही. अस्लं काही नसत. माझ्या फोनमध्ये शटर आवाज येत नाही. आधीच्या फोनमध्येही बंद करता येत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

माझ्याही. आवाज चालूबंद करायची सोय होती आणि आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझी माहीती अर्धवट होती असे दिसते. आत्ता ही जालावर हे बघितले.

For those living in the USA, disabling the camera shutter sound is technically illegal. Wait, I just mean illegal. The law clearly states that cell phones containing digital cameras must make a sound when taking a picture

अँड्रोईड च्या लेटेस्ट वर्जन मधे सोय आहे असे पण लिहीले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकिपीडीयानुसार भारतात -
Regulations apply to land-based photography for certain locations. A permit is required for aerial photography in India, which normally takes over a month to acquire.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सातवा आणि शेवटचा फोटो आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मुखवटे ' आणि खरे 'चेहरे' ही कल्पना फार छान आहे.

सर्वच छायाचित्रे सुरेख ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

अनुमती घेण्याचा तिढा बाजूला ठेवून मस्त फोटो चेहरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक फोटो आपली एक वेगळी कहाणी उलगडुन दाखवतोय असं वाटलं.
खुपचं आवडलं हे प्रकरणं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0