श्रेणीकौल भाग-१ : तुम्ही इथे असलेल्या श्रेणी सुविधेचा वापर करता का? किती?

इथे श्रेणीसुविधेवरून काहीशी नाराजी अनेकदा दिसते. या सुविधेमागचा उद्देश कोणताही/कसाही असला तरी त्याचा वापर कसा होतो हे जाणण्यासाठी हा कौल सुरू करत आहे.
या भागात केवळ एकच पर्याय निवडावा ही विनंती (काही तांत्रिक कारणाने तसा कौल सुरू करणे मला जमलेले नाही)

या श्रेणी कौल मालिकेत कृपया खरी व शक्य त्या सगळ्यांनी मते द्या जेणेकरून आवश्यक वाटल्यास या सुविधेत योग्य ते बदल करता येतील.

प्रतिक्रिया

मला श्रेणी देण्याची सुविधाच नाही.

असती तरी निगेटिव्ह श्रेणी कशालाच दिली नसती म्हणजे कोणाचेच प्रतिसाद झाकले जाऊ नयेत अशी इच्छा.

मला पण दिली नाहिये
मी निशेध करतो
मत देणार नाही जा

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

मी सगळ्यात जास्तं श्रेण्या या ॠण प्रतिसादांना सर्वसाधारण श्रेणी देण्यात घालवतो. कंदीमंदी मार्मिक देतो. कधीतरी गम्मत म्हणून सिरियस प्रतिसादाला खवचट दिलेली आहे.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सर्वसाधारण, मार्मिक व खवचट या तीनही ही धन श्रेणी आहेत
तेव्हा तुम्ही योग्य ते मत देऊ शकाल

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनेकदा एखाद्या प्रतिसादाला उगीच निरर्थक खोडसाळ दिलेलं दिसतं. मला ते मार्मिक वाटतच असं नाही. त्यामुळे सर्वसाधारण देतो. जस्ट टू न्युट्रलाइज द नेगेटिविटी.

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आभार! अश्याच कारणासाठी सर्वसाधारण ठेवली आहे.
मी देखील त्याचा असाच वापर करतो

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी यात कुठेच बसत नाही. अजून दोन पर्याय हवे होते असे वाटते.

१. फारसे श्रेणीदान करत नाही, पण जास्त करुन धन श्रेणीदान आणी कमीतकमी ऋण श्रेणीदान करतो.
१. फारसे श्रेणीदान करत नाही, पण जास्त करुन ऋण श्रेणीदान आणी कमीतकमी धन श्रेणीदान करतो.

श्रेणीव्यवस्था मी फारच क्वचित वापरली आहे. मी ऐसीवर आल्यावर सगळेच प्रतिसाद वाचतो अगदी रोल डाऊन करून वाचतो त्यामुळे श्रेणी व्यवस्थेमुळे प्रतिसादांचं वाचन माझ्यापुरतं तरी प्रभावित होत नाही. मला माझ्या प्रतिसादांना धन-ऋण श्रेण्या मिळाल्या तर त्याचंही अप्रुप किंवा वाईट वाटत नाही. ऐसीवर सगळेच लोक खूप सुजाण आहेत असा माझा आजपावेतो अनुभव आहे ते फक्त एकमेकांना धन- ऋण श्रेण्यांचे दगड मारण्यात धन्यता मानणार नाहीत असे वाटते.

चांगल्या, माहितीपूर्ण आणि नर्मविनोदी प्रतिसादांना सुयोग्य अशा श्रेण्या देतो. श्रेणी हा प्रकार प्रतिसादांना एक प्रकारे उपप्रतिसाद देण्यास उपयोगी पडतो. खास आवडलेल्या काही प्रतिसादांना श्रेणी+उपप्रतिसाद देतो.

त्या शिवाय, पुढे मागे प्रतिसाद शोधताना श्रेणीव्यवस्थेचा उपयोग होतो. एखाद्याने एखाद्याविषयावर एखादा चांगला प्रतिसाद दिल्याचे आठवते पण धागा आठवत नाही. अशा वेळी त्याच्या खात्यात जाऊन श्रेणीच्या आधारे असे प्रतिसाद शोधता येतात. स्वतःचे जुने प्रतिसादही पुन्हा शोधायला हा मार्ग वापरता येतो.

ऋण श्रेण्या सहसा द्यायला जात नाही. अगदीच टाकाऊ प्रतिसाद असेल तरच याचा वापर करतो, पण तेही क्वचितच. धाग्याचा प्रकार पाहून ऋण श्रेण्या असलेले प्रतिसाद वाचायचे का नाही हे ठरवतो. एखाद्या धाग्यावर लांबच्यालांब झाकलेल्या प्रतिसादांची चेन आहे हे दिसले की इथे फक्त वैयक्तिक शेरेबाजी असणार हे अनुभवाने माहित झालेले आहे. माहितीपूर्ण धाग्यावर एखादाच ऋण श्रेणी असलेला प्रतिसाद असेल तर तो अधूनमधून उघडून पाहतो. विनाकारण ऋण श्रेणी दिली असेल असे वाटले तर धन श्रेणी देऊन प्रतिसाद पुन्हा उघडा करण्याचा प्रयत्न करतो.

-Nile

त्या शिवाय, पुढे मागे प्रतिसाद शोधताना श्रेणीव्यवस्थेचा उपयोग होतो. एखाद्याने एखाद्याविषयावर एखादा चांगला प्रतिसाद दिल्याचे आठवते पण धागा आठवत नाही. अशा वेळी त्याच्या खात्यात जाऊन श्रेणीच्या आधारे असे प्रतिसाद शोधता येतात. स्वतःचे जुने प्रतिसादही पुन्हा शोधायला हा मार्ग वापरता येतो.

+१
श्रेण्यांचा हा मला सगळ्यांत महत्त्वाचा फायदा वाटतो. भरपूर धन श्रेण्या मिळालेले जवळपास सगळेच प्रतिसाद वाचनीय असतात. इथे मुख्य बोर्डावर काही हालचाल होत नसली (शनिवार-रविवारी बऱ्याचदा होते असे), की मी 'न'वी बाजू, बॅटमॅन, अमुक, चिंतातुर जंतू, अरविंद कोल्हटकर, श्रामो, रोचना (ह्या हल्ली फक्त भाज्याच लावतात इथे Sad ), नितिन थत्ते, गवि अशा अनेकांचे प्रतिसाद श्रेणीनुसार सॉर्ट करून वाचत बसतो. आता उदा. मिपावर लोकांचे चांगले प्रतिसाद शोधायचे असल्यास बरेच कष्ट घ्यावे लागतात.

मी खूप कमी वेळा श्रेणी देतो (असा माझा समज आहे).

असा माझा समज आहे

बरं झालं सागितलत ते नाहीतर कोणाला कळलंच नसतं.

ऐसिच्या सर्वर लॉग्ज वरून हे स्टॅट्स लगेच कळून येतील.

प्रकाटाआ

मत दिलंय.
१) वरती मतांची बेरीज आणि कंसातील मतांची बेरीज यांत फरक दिसतो आहे २७/२९.

२) score:? च्या ठिकाणी बहुसंख्य श्रेणी दिसतात इतर नाही. आणि इथे "गुणपट"/"गुणांक"(=score) लिहिता येईल.

३) 'सर्वसाधारण'वर टिकले की श्रेणीनामावली उघडते. स्मार्टफोनमधून पटकन इथे बोट न जाता "श्रेणी द्या" वर बोट लागले की सर्वसाधारण हीच श्रेणी दिली गेली आहे माझ्याकडून बरेचदा आणि ती बदलता येत नाही.त्यामुळे "सर्वसाधारण"च्या ठिकाणी पहिला शब्द "श्रेणीपट"हा ठेवा.

सर्वसाधारण ही श्रेनी चुकून दिली जाण्याची शक्यता असते.

होय, दोन्ही प्रकारच्या श्रेण्या (धन/ऋण) मुबलक प्रमाणात देतो/देते

खूपदा इतकं हसू येतं उदा- नाईल वर पोर्क्/बीफच्या धाग्यावरती म्हणाले "जातो आता, वरण-भात खायची वेळ झाली"
मी फुटले आणि अशी अनंत प्रतिसादांवर फुटते. किंवा लेखनशैलीवरही. शैली म्हणजे - गब्बर यांनी एक सकारात्मक बातमी ची लिंक दिलेली व खाली उपरोधीक अशा अर्थाचं लिहीलेलं की यावर अंमलबजावणी करु नका म्हणजे तुम्ही मोकळे , आम्ही मोकळे. ROFL
तर सांगायचा मुद्दा एकेक मस्त प्रतिसाद असतात पण मग स्मायल्यांच्या माळा लावण्याऐवजी आम्ही "चीअर-लीडर्स" फक्त धन श्रेणी देऊन खुदु खुदु हसत बसतो.

ऋण श्रेणी अजून दिली नाही.
काही प्रतिसाद/ प्रतिक्रिया वाचून ऋण श्रेणी द्यावी असे वाटले. पण अजून प्रयोग केला नाही.

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||