The Englishman who went up a hill but came down a mountain

The Englishman who went up a hill but came down a mountain या नावाचा चित्रपट आहे हे म्यां आंग्लभाषा, संस्कृतीप्रेमी व्यक्तीला अगदी गेल्या आठवड्यापर्यंत माहित असू नये हे पापच. पण या चित्रपटाबद्दल समजल्याबद्दल लगेचच तो पाहून पापक्षालन केलं. ह्यू ग्रांटचं नाव पाहून डोळ्यांनाही ट्रीट मिळणार याची खात्री होतीच. पण सुरूवातीलाच त्याचा अवतार पाहून निराशा झाली. तरीही चित्रपटाचं नावच पुरेसं मजेदार असल्यामुळे चित्रपट पहायचाच होता. पैसा आणि वेळ एकदम वसूल!

चित्रपटाची थोडक्यात गोष्ट अशी (ती सांगून टाकतेच कारण चित्रपटाच्या नावातच काय होणार हे सांगितलेलं आहे). पहिल्या महायुद्धाचा काळ. वेल्समधल्या फ्यनान गारू (उच्चारांबद्दल एकदाच काय ती होलसेल माफी मागून घेते. मराठी माणसाला एकवेळ इंग्लिशमधला आर्टीकल्सचा योग्य वापर करणं जमेल पण वेल्श नावांचे उच्चार समजणं आणि करणं सर्वथैव अशक्य.) नावाच्या छोट्या, शांत, झोपाळलेल्या गावात दोन इंग्लिश कार्टोग्राफर (मराठी?) येतात. रॉयल नकाशे बनवण्यासाठी जमिनींचा विशेषतः टेकड्या, पर्वतांचा सर्व्हे करणं हे त्या दोघांचं काम. म्हातारा, जाडगेला गेराड हा या कामातला अनुभवी मनुष्य आणि त्याच्या हाताखाली काम करायला आन्सन हा तरूण (ह्यू ग्रांट). गावातली लोकांची नावंही मर्यादित, अगदी आपल्याकडे (निदान एकेकाळी) असायची तशीच. सगळेच विल्यम्स किंवा मॉर्गन म्हणून एकजण विल्यम्स द पेट्रोलियम, मॉर्गन द गोट वगैरे. कथनातून आणि संवादातून समजत जातं ते खेड्यातलं आतलं राजकारण. ज्या बेड अ‍ॅण्ड ब्रेकफास्टमधे हे दोघं सरकारी कार्टोग्राफर उतरले आहेत, तिथेच पबही आहे. पबमालक मॉर्गन दारू विकतो, चर्चात जात नाही, काहीशी न-नैतिक भूमिका घेणारा आहे. अर्थातच गावातला रेव्हरंड आणि मॉर्गनचं वाकडं आहे. इतर बरेचसे लोकं बिनचेहेर्‍याचे आणि काहींचे चेहेरे आहेत.

कार्टोग्राफरांनी वेल्समधला पहिला डोंगर म्हणून आपल्याच फ्यनान गारूमधल्या डोंगराची नोंद करावी अशी गावकर्‍यांची इच्छा आहे. प्राथमिक सर्व्हे करून दोघे इंग्लिशमन पबमधे परत येतात तर मॉर्गनने पबमधे लोकांकडून बेट्सचे पैसे स्वीकारायला सुरूवात केलेली आहे. १६०० फूट, २५०० फूट वगैरे आकडे बोर्डावर दिसत असतात. फार विचारल्यावर प्राथमिक अंदाज म्हणून गेराड ९३० फूट जाहीर करतो. आधीच इंग्लिश आणि त्यातून डोंगराची उंची एवढी कमी सांगतात म्हणून दोघेही गावात लगेचच अप्रिय होतात. नीट मोजमाप घेऊन गणित केल्यावर उंची भरते ९८४ फूट. रेव्हरंड गावात मीटींग बोलावतो. हजार फूटापेक्षा उंची कमी भरली म्हणजे डोंगराची टेकडी झाली, ही गावावर ओढवलेली आपत्तीच असते. युद्धामुळे आधीच सर्वांची मनस्थिती उच्च नसते. पण मग एक कल्पना पुढे येते ती म्हणजे गावकर्‍यांनी फ्यनान गारूच्या माथ्यावर भराव घालायचा आणि उंची वाढवायची.

त्यासाठी पुन्हा मोजमाप करणे भाग आहे. मग एकीकडे सगळं गाव भराव घालायला आणि मोजके लोकं या दोघांचा गावातला मुक्काम वाढवायला असे कामाला लागतात. अर्थातच ते त्यात सफल होतात, पुन्हा एकदा चित्रपटाच्या नावावरून हे समजतंच. पण त्यांची आपसातली भांडणं, त्या दोघांना गावातच ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यासाठी बोललेल्या आणि लिहीलेल्या शब्दांचा सोयीस्कर अर्थ लावणं हा सगळा बिनडोकपणा आजही होतोच आणि त्यातले विनोदही तेवढेच मजेशीर. वेल्श आणि इंग्लिश लोकं आपल्यासाठी ब्रिटीश, पण आपसांत त्यांचीही उच्चनीचत्त्वाच्या कल्पना आहेत. सॅक्सन, रोमन, जर्मन, फ्रेंच लोकांच्या अनेक शतकं झालेल्या आक्रमणांमुळे मुख्य ब्रिटीश बेटावरचे मूळ निवासी पश्चिमेकडच्या डोंगराळ भागात सरकले. त्यांचे वंशज आताच्या वेल्स भागात आहेत. आपण शुद्ध असण्याची वेल्शांची भावना आणि इंग्रज मिश्र वंशाचे, रक्ताचे असल्यामुळे त्यांना हलकं लेखणं हे किंवा अशा प्रकारचं वर्तन प्रत्यक्षात लोकं करतात तेव्हा ते असभ्य आणि बेशिस्त वाटतं पण चित्रपटात त्यावरही चिक्कार विनोद केले आहेत. गावातल्या तरूण मंडळींना तरूण आन्सन इंग्लिश असूनहही आपल्यातलाच वाटतो. तरूण लोकांना या उच्चनीचतेच्या कल्पनांशी काहीही घेणंदेणं नाही. आणि हे सगळं विनोदासाठी विनोद केल्यासारखं दाखवत समोर येत रहातं.

ह्यू ग्रांट वगळता इतर कोणी अभिनेत्यांचे चेहेरेही माझ्या ओळखीचे नाहीत. इतःपर आय कँडी असणारा ह्यू ग्रांटही चप्प बसवलेल्या केसांमुळे बावळट दिसतो आणि नेहेमीचा बावळटपणा अंगावर ओढून केलेले त्याचे स्मार्ट विनोदही या चित्रपटात नाहीत. पण सगळ्यांचं काम चोख आहे. छोटंसं वेल्श खेडं, तिथली जुनी घरं, ब्रिटीश हवा यांच्यातून नेत्रसुखद वातावरण निर्मिती होते. म्हणायला बर्‍याच विनोदांना ब्रिटीश पार्श्वभूमी आहे, पण ती माहित नसूनही चित्रपट भरपूर करमणूक करतो. दीड तास निखळ बावळटपणा बघून हसायचं असल्यास The Englishman who went up a hill but came down a mountain ची शिफारस आहे.

या निमित्ताने एकूणच अशा प्रकारच्या विनोदी चित्रपट, कादंबर्‍यांबद्दलही माहिती/चर्चा आवडेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूप वर्षांपूर्वी पाहिला होता हा चित्रपट आणि अतिशय आवडला होता. आता पुन्हा एकदा पहायला हवा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी देखील पूर्वी पाहीला होता. खूप आवडला असल्याचे स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला परिचय.

>>>या निमित्ताने एकूणच अशा प्रकारच्या विनोदी ब्रिटिश चित्रपट, कादंबर्‍यांबद्दलही माहिती/चर्चा आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यू ग्रांट असलेला 'नॉटिंग हिल' ब्रिटीश समजायचा का नाही माहित नाही. पण त्यातही त्याचा हाऊसमेट स्पायकी आणि इतर मित्र भयंकर आहेत. ज्यूलिया रॉबर्ट्सने प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट अभिनेत्रीचं काम केलेलं आहे (जी ती आहेच). मला हा चित्रपट पक्का ब्रिटीश वाटतो. अतिशय वाय्*ड माणसं, त्यांचे विनोद, विशेषतः हा स्पायकी (हा वेल्श दाखवलाय) फारच मजेदार आहे. ह्यू ग्रांटचा नेहेमीचा बावळटपणाआड असणारा स्मार्ट विनोदही आहेच. सरतेशेवटी अमेरिकन अभिनेत्रीचं पात्र गोष्टीसाठी महत्त्वाचं असलं तरी तिला फार वाव नसून इतर ब्रिटीश लोकांनीच फार दंगा केलेला आहे हा आजच्या ब्रिटीशांचा आजच्या अमेरिकेकडे बघण्याचा दृष्टीकोन असावा; अमेरिकेत फार तंत्रज्ञानाचा वापर असलेले, "सुंदर", लोकप्रिय चित्रपट बनत असतील, पण ब्रिटीश विनोदाची जागा वेगळीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'फोर वेडिङ्ग्स अ‍ॅण्ड अ फ्युनरल' मधले ह्यु चे बेस्ट मॅन म्हणून केलेले हे भाषण पहा : http://www.youtube.com/watch?v=S6GPicVYCvs.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिचयावरून तरी टाईमपास चित्रपट वाटतो आहे. एकदा डाऊनलोडवून पहायला हवा.

बाकी इंग्लिश आणि वेल्श यांच्यातील सुप्त हेवेदावे, हौ ग्रीन वॉज माय वॅली ह्या कादंबरीत वाचायला मिळतील. ह्या कादंबरीवरून बनवेल्या चित्रपटात ते फारसे नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ माय गॉड ! धिस इज वेल्शी सरप्राईझ रीअली, अदिती. चक्क १५-२० वर्षापूर्वीचा हा चित्रपट तू पाहातेस आणि तुला तो चक्क आवडतोही, इतका की त्यावर धागाही लिहितेस. माय माय, माझ्या त्यावेळेच्या मित्रांना ("टंकनविद्या' प्रसन्न नसल्याने जे जालिय सदस्य नाहीत, पण काहीवेळा माझ्या शिफारशीमुळे 'वाचनमात्र' म्हणून इथे येत असतात) त्याना हे बिलकुल पटणार नाही की रेजिनाल्ड आन्सनवर कुणीतरी (त्यातही चांगले) लिहिले आहे. ह्यू ग्रांटच्या अनेक पसंत चित्रपटांपैकी हा एक आमच्यासाठी [जरी त्यावेळी तो डोक्यावरून गेला....आजही जातोच पाहिला की]. अर्थात 'नॉटिंग हिल' प्रथम क्रमांकावर आहेच.

या चित्रपटाकडे एरव्ही त्याच्या लांबलचक नावामुळे लक्ष गेले नसते पण नेमके त्याच्या प्रदर्शनाच्या आगेमागे ह्यू ग्रांट आणि 'पापाराझी' पत्रकार यांच्यात याच चित्रपटावरून झालेल्या बाचाबाचीमुळे [जी बाब पुढे कोर्टापर्यंत गेली....डीफेमेशन अ‍ॅक्टखाली] हा चित्रपट स्मरणात राहिला आणि नंतर तो थिएटरमध्ये पाहाण्यासही उत्सुकतेने गेल्याचे स्मरते. कथानक तू सांगितले आहेसच....{Cartographer = नकाशाकार}. त्यातही 'वेल्श' आणि "इंग्लिशमन" यांच्यातील वरचढपणाचा वाद तिथे छानच रंगविला आहे.

ग्रेट ब्रिटनचा एक भाग म्हणून 'वेल्श' ला मान्यता असेल, पण कोणताही वेल्श स्वतःला 'इंग्लिशमन' म्हणवून घेत नाही. कार्डिफ युनिव्हर्सिटीमधील पाच कृषितज्ज्ञांची एक टीम कोल्हापूर परिसरातील उसशेतीची पाहणी आणि येथील साखर उद्योगाची पाहणी करण्यासाठी आली होती. एका शिबिराप्रसंगी शिवाजी विद्यापीठातील एका प्राध्यापकाने उपस्थितांना अभावितपणे "आज आपल्याकडे इंग्लंडमधील साखर उद्योगातील अभ्यासू टीम आली आहे...." अशी मराठीतून ओळख करून दिली. दुभाष्याने त्याचे भाषांतर टीम लीडरला कानात सांगितले. ओळख झाल्यावर त्या लीडरने अत्यंत नम्रपणे ' कृपया आम्हास इंग्लिशमन म्हणून संबोधू नये. आम्ही ग्रेट ब्रिटनमधील आहोत हे खरे, पण आमची ओळख वेल्श अशीच आहे. असो..." असे म्हणून जणू काही झालेच नाही असे समजून आपले विषयासंदर्भातील व्याख्यान सुरू केले. या भौगोलिक गोष्टी आपल्याला माहीत नसतात, आणि नेमकी हीच अडचण The Englishman who went....." पाहताना भारतीय प्रेक्षकाला जाणवते, कारण त्याला वेल्श वंश आणि इंग्लिश वंश तेढ मूळातून माहीत नसते.

छान वाटले लेख वाचताना.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा चित्रपट डोक्यावरून जाण्याचं आणखी एक कारण असू शकतं वेल्श उच्चार. थोडे मजेशीर वाटतात. उच्चारांची सवय असेल तर समजताना त्रास होणार नाही. तरी नशीब चेशर वगैरे भागातलं इंग्लिश वापरलेलं नाही.

तीन वर्ष इंग्लंडमधल्या छोट्या खेड्यात रहातानाही असे अनुभव आलेच. एक मित्र स्कॉटीश. माझ्या बोलण्यात नेहेमी ब्रिटीश असा शब्द असे, पण एक दोन इतर मित्र इंग्लिश म्हणत. मग हा स्कॉट चिडत असे. एकदा त्याने माझी साक्षच काढायचं ठरवलं असावं. मला म्हणे, "तुम्हाला इंग्रजांनी राज्य केलं असं शिकवतात का ब्रिटीशांनी?" मला तरी ब्रिटीश असं शिकल्याचंच आठवलं, पण इंग्लंडची राणी असे शब्दप्रयोग. हे उत्तर ऐकून थोडा शांत झाला. ऑफ्टन, हेच ( h ) असे एक-दोन उच्चार वगळता बाकी स्कॉट म्हणावं असं त्याच्या उच्चारांमधेही काही नाही.

दुसरीकडे मी भारतीय आहे म्हटल्यावर काही लोकांनी थोडी मैत्री/ओळख वाढल्यावर अधिक चौकशी केली. माझी मातृभाषा हिंदी नाही हे समजल्यावर मग बंगाली का असा प्रश्न यायचा. सायबाच्या देशात बंगाली आणि बांगलादेशी लोकांची संख्या बरीच जास्त आहे. अनेकांना मराठी माहित नसते याचीही मला सवय झाली. आणि अचानक दुसर्‍या बॉसने त्याला मराठी भाषेचं नाव माहित असल्याचं सांगितलं. त्याच्या मुलाचा वर्गातला बेस्ट फ्रेंड म्हणे मराठी भाषिकांचाच मुलगा आहे.

पुढे नेदरलंड्समधला हॉलंड हा एक प्रांत आहे; डच हे त्यांच्या भाषेचं नाव आपल्यासाठी असलं तरी डच भाषेत डच भाषेला नेदरलंड्स असंच म्हणतात, हे ही समजलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गमतीदार वाटतंय प्रकरण.. यथावकाश डाऊनलोडवून बघण्यात येईल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कथानक नकळत वळू चित्रपटाची आठवण करून देते.

चित्रपट पहायला आवडेल. धन्यवाद.

मी पाहिलेले काही विनोदी/तरल ब्रिटिश चित्रपट -
१. दी फुल मॉन्टी
२. लॉक, स्टॉक अ‍ॅन्ड २ स्मोकिंग बॅरल्स
३. ब्रिजेट जोन्स डायरी
४. डेथ अ‍ॅट अ फ्युनरल
५. हॉट फझ्झ
६. लव्ह अ‍ॅक्चुली

ह्याबरोबरच, "ग्राऊंडहॉग डे" हा हलकाफुलका अमेरिकन चित्रपटपण पहा असे सुचवितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय, 'वळू' आणि यात असणारं साधर्म्य आधी लक्षात नाही आलं.

यादीतले काही चित्रपट पाहिलेले (आणि आवडलेले) आहेत. 'लव्ह अ‍ॅक्चुअली' एकेकाळी आवडला होता, पण आता आवडेल का नाही याबद्दल शंका आहे. 'ग्राऊण्डहॉग डे' विनोदी असला तरीही हलकाफुलका म्हणणं जीवावर येतंय; तो ही आवडतोच.

त्यावरून आणखी एक गोष्ट आठवली म्हणजे जो ब्रिटीश विनोद परदेशांत फार प्रसिद्ध होतो तो ब्रिटीशांना फार आवडतोच असं नाही. 'लव्ह अ‍ॅक्चुअली' आणि 'मि. बीन' ही दोन उदाहरणं चटकन आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>त्यावरून आणखी एक गोष्ट आठवली म्हणजे जो ब्रिटीश विनोद परदेशांत फार प्रसिद्ध होतो तो ब्रिटीशांना फार आवडतोच असं नाही. 'लव्ह अ‍ॅक्चुअली' आणि 'मि. बीन' ही दोन उदाहरणं चटकन आठवली.<<
सहमत, लव्ह अ‍ॅक्चुअलीवर तिकडे चित्रपट तद्दन गल्लाभरु(आहे हे मान्य) असल्याची टिका वाचल्याची स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान माहिती दिली आहेस अदिती! नक्कीच पाहणार हा चित्रपट. कल्पना धमाल वाटते.

इंग्रज आणि वेल्श लोकांमधल्या फरकाची थोडीफार माहिती होती. आणखी माहिती आधीच काढून हा बघावा असे वाटते. नाहीतर पूर्ण कळणार नाही. नॉटिंग हिलही बघायला राहिला आहे.
इंग्रजी (म्हणजे ग्रेट ब्रिटनमधले कोठलेतरी असावे Smile ) वातावरणातील पिक्चर्स आवडणार्‍यांसाठी हे मला आवडलेले:
Gosford Park
Pride and Prejudice
The importance of being Earnest
Four weddings and a funeral

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Englishman who went up a hill but came down a mountain या नावाचा चित्रपट आहे हे म्यां आंग्लभाषा, संस्कृतीप्रेमी व्यक्तीला अगदी गेल्या आठवड्यापर्यंत माहित असू नये हे पापच.

तंतोतंतच. बघितलाच पाहिजे, झकास कल्पना आहे!

मराठी माणसाला एकवेळ इंग्लिशमधला आर्टीकल्सचा योग्य वापर करणं जमेल पण वेल्श नावांचे उच्चार समजणं आणि करणं सर्वथैव अशक्य.

हा हा! ते मागं तुला म्हटलं होतं नाही का मी - The word 'Cymric' certainly has something to do with the English word 'cryptic'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0