दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२० एप्रिल
जन्मदिवस : चित्रकार ओदिलाँ रेदाँ (१८४०), चित्रकार जोन मिरो (१८९३), संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य सोनोपंत दांडेकर (१८९६), उडिया लेखक गोपीनाथ मोहंती (१९१४), 'याहू'चा सहनिर्माता डेव्हीड फिलो (१९६६)
मृत्युदिवस : 'ड्रॅक्युला'चा लेखक ब्रॅम स्टोकर (१९१२), बासरीवादक पं. पन्नालाल घोष (१९६०), 'दुर्दैवी रंगू' ह्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक व भारतीय साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक भारताचार्य चिंतामणराव विनायक वैद्य (१९६८), कवी शकील बदायुनी (१९७०), 'रुचिरा'कार कमलाबाई ओगले (१९९९)
---
४/२० - आंतरराष्ट्रीय गांजा संस्कृती दिवस.
१२३३ : 'इन्क्विझिशन'ची सुरुवात.
१६५७ : न्यूयॉर्कमधल्या ज्यू लोकांना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले.
१७७० : कॅप्टन कुकच्या जहाजांना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला.
१८६२ : लुई पास्चर आणि क्लोद बर्नार यांनी अचानक जीवोत्पत्तीचा सिद्धांत खोडणारा प्रयोग पूर्ण केला.
१८६५ : समुद्र वा तलावातल्या पाण्याची पारदर्शकता मोजू शकणाऱ्या सेची चकतीचा पहिला प्रयोग पियेत्रो सेचीने दाखवला.
१९०२ : मेरी आणि पिएर क्यूरी यांनी रेडियम क्लोराईड पिचब्लेंडमधून वेगळे केले.
१९३९ : मध्य प्रांतातील मराठी विभागाचे एकीकरण करून विदर्भ नावाचा नवीन प्रांत बनविण्याची शिफारस करणारा ठराव प्रांतिक कायदेमंडळात संमत झाला.
१९७२ : इंजिनातल्या बिघाडावर मात करून अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.
१९९२ : जी.एम.आर.टी.ची पहिली अँटेना पुणे जिल्ह्यातल्या खोडदमध्ये उभारली गेली. ही आशियातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बिण आहे.
१९९९ : कोलंबाईन रक्तपात - अमेरिकेतल्या कोलंबाईन शाळेत दोघांनी केलेल्या बेछूट गोळीबारात त्यांच्यासह १५ मृत. शस्त्र बाळगण्याचे अमेरिकन स्वातंत्र्य त्या निमित्ताने चर्चेत.
२००१ : चीनमध्ये मानसिक आजारांच्या यादीतून समलैंगिकतेला वगळले.
२००२ : वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा फलंदाज सचिन तेंडुलकर याने २९वे शतक काढून ऑस्ट्रेलियन फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
२०१२ : ५००० किमीपर्यंत माऱ्याची क्षमता असणाऱ्या 'अग्नि-५' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
२०१३ : फुकुशिमा दाईची अणूऊर्जा प्रकल्पातला शेवटचा रिअॅक्टर बंद.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- सुनील
- सर्वसुखी
- गलिव्हर
प्रतिक्रिया
तर यात वरच्या डाव्या बाजुला
सबास! मला याची फार गरज आहे.
वाचतो आहे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
काही प्रश्न
या लिखाणाच्या निमित्ताने थोडं मागे पडलेलं गाडं पुढे आणलं - लिनक्स वापरून बघणे. ईन्स्टॉल केलं (म्हणजे वापरून बघायला USB स्टीकवर), थोडं वापरलं.....आता प्रश्न फायरफॉक्स अगदी हळू चालतंय. cnn.com काय, गुगल काय, उबंटू.कॉम काय, लोड व्हायला तीन तीन मिनीटं लागतायत. उबंटूचा ब्राउझर ट्राय केला तरी तोच प्रकार.
हे थोडे मुद्दे - जर यामुळे प्रॉब्लेम होत असेल तर;
१. मी Ubuntu 14.04 LTS उतरवून घेतलं. आणि Space used to....(Ubuntu only) मधे ५०० Mb निवडलं. माझी अपेक्षा आहे की हे 'रॅम ड्राईव्ह' प्रमाणे काम करेल. आणि डॉक्युमेंट्स, डाउनलोड केलेले प्रोग्रॅम्स वगैरे वाचवता येतील.
२. सुरवातीचा स्क्रीन जो येतो, जिथे नुसतंच वापरून बघायचंय की कायमचं बसवायचंय ऑप्शन्स येतात, ते डबल येतात. पहिल्या सेटमधे पहिलं अक्षर बोल्ड असतं. दुसर्या सेटमधे नाही. सुरवातीला बोल्ड अक्षर असलेला ऑप्शन निवडला पण मग कोरा स्क्रिन येत राहिला. मग बोल्ड असर नसलेला ऑप्शन निवडला (नुसतंच वापरून बघायचंय हा) मग मात्र सुरू झालं नीट. हे का व्हावं? यामुळे फायरफॉक्स हळू चालेल शक्यता फार कमी वाटते.
३. आधी वायफाय नाही सुरू झालं. राउटरच दिसत नव्हता. Classic linux method वापरून तो प्रॉब्लेम सुटला - परत विंडोज सुरू करून नेटवर जाउन शोधाशोध करणे, ड्रायव्हर चालत नाहीये पत्ता लावणे, तो अपडेट करणे नी वाय-फाय सुरू करणे! नेटवर्क सेटींग्स मधे काहीही वॉर्निंग वगैरे नाही आणि ड्रायव्हरने काही एरर बिरर नाही दिलीन. त्यात काही गोंधळ झाला असेल का? पण नेटवर्क प्रॉपर्टीज मधे तर ५८ Mb/s स्पीड दाखवतोय. या स्पीडने तीन मिनिटं नक्कीच लागू नयेत साधं पेज लोड व्हायला.
अजून बाकी खोदाखोद सुरू नाही केल्येय. उदा. विंडोची बंद/कमी/फुल स्क्रिन बटणं उजवीकडे आणता येतील का? . पण त्याआधी बेसिक ब्राउझिंग, ई-मेल, लायबर (की लिब्रे?) ऑफिस वापरणे हे जमायला हवंय. अर्थात नेहेमीप्रमाणे तमाम जनता सुखाने वापरत्येय पण आमच्याच खोक्यात भानगडी असल्यामुळे (तरी बर्या घरचा, डेलचा बघून घेतलाय हो!) चालणार नसेल तर काहीही आश्चर्य नाही वाटायचं म्हणा.
काही ईलाज?
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
तुमच्या संगणकाचे पुर्ण
तुमच्या संगणकाचे पुर्ण कंफिगरेशन काय आहे?
तुम्ही वर्णन केले त्यावरुन तुम्ही वुबी वापरत आहात असे मला वाटते आहे, ते खरे आहे काय?
की तुम्ही वर्चुअलबॉक्स मधे हे करत आहात?
मी Ubuntu 14.04 LTS उतरवून घेतलं. आणि Space used to....(Ubuntu only) मधे ५०० Mb निवडलं.
>> हे मला काहीच कळले नाही. ५०० कशासाठी दिले? कोणत्या सेटींग मधे? कोणत्या स्क्रिनवर? का?
मी लिबरऑफिस म्हणतो.
वरील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर त्याप्रमाणे पुढे बोलता येईल.
- पेंटियम ड्युअल कोअर, ४ Gb
- पेंटियम ड्युअल कोअर, ४ Gb रॅम. USB स्टीक पण ४ Gb ची. त्यावरचं उबंटू ईन्स्टोलेशन २ Gb च्या आत आहे म्हणजे USB स्टीक काठोकाठ भरल्येय त्यामुळे टेंपररी फाईल्सना जागा नाहिये असंही नाहिये.
- वूबी नाही. तू दिलेलं यूनेटबूटईनच वापरलं
- व्हर्चुअल बॉक्स नाही. या लॅपटॉपवरच ट्राय केलं. (आणि या लॅपटॉपवरंच यूनेटबूटईन वापरून उबंटूची USB स्टीक तयार केली.)
- यूनेटबूटईन च्या ईंटरफेसमधे खालून दुसरी ओळ आहे - "Space used to preserve files across reboots (Ubuntu only):" त्यात ५०० Mb निवडले कारण माझी अपेक्षा आहे की यामुळे USB स्टीकवर एखादा फोल्डर तयार केला जाईल आणि त्यात मी लिबरऑफीस मधे काम करत असलेली डॉक्यूमेंट्स, प्रोग्रॅम डाउनलो़ड केलेला वगैरे ठेउ शकेन. म्हणजे लिनक्सवर केलेलं काम, जरी USB स्टिकवरून वापरत असलो तरी, सेव करता येईल. तसा वापर अपेक्षित नाहिये का?
तू यावर अजून वेळ घालवण्याआधी दोन गोष्टि करून बघतो;
- कुबंटू वापरून बघतो.
- Space used ... नाही वापरत. मी USB स्टिकवर फोल्डर करून डॉक्यूमेंट्स, प्रोग्रॅम्स सेव करू शकतो. त्याने काही फरक पडतो का बघुया.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
कुबंटू वापरून बघतो.>>नको.
कुबंटू वापरून बघतो.
>>
त्याआधी युबुंटु १४.०४ चे एसएचए किंवा एमडी५ क्रॉसचेक करा. कारण तुम्ही १४.०४ ची इमेज आधीचह उतरवुन घेतलेली आहे. तेव्हा तिच आधी बघा.
तसेच तो पेन ड्राइव्ह "पुर्ण" फॅट ३२ ने फोरमॅट करुन (क्विक फॉरमॅट नक) परत युबुंटू टाका व त्यात आधी चेक फॉर डिस्क डिफेक्ट्स करा.
- Space used ... नाही वापरत. मी USB स्टिकवर फोल्डर करून डॉक्यूमेंट्स, प्रोग्रॅम्स सेव करू शकतो. त्याने काही फरक पडतो का बघुया.
>> +१
पण, युएसबी वर तयार केलेला तो फोल्डर टिकणार नाही.
एमडी५ चेकसम जुळली बरोबर
एमडी५ चेकसम जुळली बरोबर. USB ड्राईव्ह फॅट ३२ने 'पूर्ण' फॉरमॅट केला होता आधीच.
'Space used... ' न वापरता परत बघतो.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
आता तर अजिबातच चालत नाहीये :-(
आता तर अजिबातच चालत नाहीये . Some error about graphics settings and I get option that I can continue in 'basic graphics configuration'. पण त्यानंतर ब्लँक स्क्रीन दिसत रहातो. चेक डीस्कला काहीही एरर नाही आली.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
तुमचे ग्राफिक्स कार्डाचा
तुमचे ग्राफिक्स कार्डाचा ड्राइव्हर चुकीचा निवडला जातोय किंवा ग्राफिक्स कार्ड सपोर्टेड नाहीये असे वाटते.
इथे बुट होताना काही कमांड्स वापरुन ट्रबलशुट करावे लागेल, त्यामुळे ते सद्ध्या राहु द्या.
तुमच्या ग्राफिक्स कार्डात ३डी अॅक्सलरेशनचा सपोर्ट नसेल कदाचीत तेव्हा,
झुबुंटु / लुबुंटु चे अलीकडचे १५.१० ही आवृत्ती वापरुन बघा.
आता तर अजिबातच चालत
कशाला इतका त्रास करुन घेताय जीवाला? ऑप्शन्स शोधा ना.