मेट्रो प्रवासात मनुस्मृति वर चर्चा - ब्राम्हण आणि शुद्र

आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल.

जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या आपल्या संविधानात हि आपल्याला संशोधन करावेच लागतात. तसेच मनुस्मृति हि परिपूर्ण नाही.

मनुस्मृति हा फार जुना ग्रन्थ आहे. बहुतेक श्रुति-स्मृतिच्या काळात मनुस्मृतिची रचना सुरु झाली असेल आणि गेल्या ३००-४०० वर्षांआधी पर्यंत होत राहिली असेल. अनेक सुलेखक आणि स्वत:ला न्याय आणि धर्मशास्त्रात पारंगत समजणार्यांनी यात आपले योगदान दिले असेल. काळाप्रमाणे अनेक नवीन विचारांना (चांगले आणि वाईट) मनुस्मृतित स्थान मिळाले असेल. तरीही इतर प्राचीन धर्मग्रन्थ आणि न्याय शास्त्रातील ग्रंथांकडे पाहिले तर मनुस्मृति ही उजवीच ठरेल.

हा लेख लिहिण्याचे कारण असे, कालच कार्यालयातून घरी येताना मेट्रोत ३-४ तरुण विद्यार्थी भेटले. त्यांनी मला बसायला जागा हि दिली (दिल्लीत याला एडजष्ट करणे असे हि म्हणतात). मनुस्मृतिचा विषय निघाला ब्राह्मणांनी शूद्रांना छळण्यासाठी मनुस्मृतिची निर्मिती केली आहे, अशी या विद्यार्थांची धारणा. मी त्यांना विचारले तुम्ही मनुस्मृति वाचली आहे का? अपेक्षेप्रमाणे नाही हे उत्तर आले. पण त्यांना परमेश्वराने ब्राह्मण आणी शुद्र यांची निर्मिती कशी केली या बाबत थोडी माहिती होती. माहितीचा आधार ब्राह्मण द्वेष हाच होता. एका जवळ टेबलेट होती. मी त्याला मनुस्मृतिनुसार शुद्र आणि ब्राह्मण कोण याची माहिती काढायला सांगितली. मी हि माहिती सांगू शकत होतो. पण म्हणतात ना “हात कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या”. मनुस्मृतितील अणि इतर ग्रंथातील काही मन्त्र अर्थांसकट त्याना सापडले. पुढील १५-१६ मिनिटे आमची यावर चर्चा झाली. आपल्या परीने त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम।
क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च।
(10/65)

महर्षि मनुच्या अनुसार कर्मानुसार व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शुद्र म्हणून ओळखला जातो. विद्या आणि योग्यततानुसार एका वर्णातला व्यक्ती दुसर्या वर्णात जातो. कर्मानुसार सत्यकाम जाबाली आणि विश्वामित्र ब्राह्मणत्वला प्राप्त झाले आणि इक्ष्वाकु वंशातला एक राजा कल्माषपाद वर्ण व्यवस्था बाहेर राक्षस म्हणून ओळखला गेला. पण हि वर्णव्यवस्था आली कुठून. यावर शोध घेताना त्या विद्यार्थांना हा मन्त्र सापडला.

ब्राह्मणोंSस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः.
ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत.

(यजुर्वेद: ३१/११)

या मंत्रात परमात्म्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, उरातून वैश्य आणि पायातून शुद्र यांची निर्मिती झाली आहे.

ब्राह्मण मुखातून उत्पन्न झाला याचा अर्थ काय. जुन्याकाळात गुरुकुलात आचार्याच्या मुखातून निघालेली वाणी अर्थात प्रवचन ऐकून विध्यार्थी शिकायचे.

अथाधिविद्यम. आचार्यःपूर्वरूपम. अंतेवास्युत्तर रूपम्.
विद्या संधि:. प्रवचन संधानम. इत्यधिविद्यम्.

(तैत्तिरीय उपनिषद ३/४)

त्या काळी विद्वान आणि वेदशास्त्र संपन्न व्यक्तीला समाजात ब्राह्मणाचा दर्जा मिळायचा. आज हि आपण विद्वान माणसाचा समोर पंडित हि विरुदावली लावतोच.

क्षत्रियाचा जन्म बाहूतून. ज्या व्यक्तीचे बाहू मजबूत असेल, तोच सुरक्षा देऊ शकतो. हे त्रिकाल सत्य आहे. आज हि मजबूत, स्वस्थ्य लोक सेन्यात किंवा इतर सुरक्षा दलात जातात.

वैश्यचा जन्म जंघेतून झाला. ज्या माणसाच्या उरू अर्थात जंघा मजबूत असेल तो अविरत मेहनत करू शकतो. असा व्यक्ती थोडे बहुत पारंपारिक ज्ञान असेल तर शेतीबाडी, पशुपालन, व्यापार, उद्योग धंधा उत्तम रीतीने करू शकतो. अश्या व्यक्तींना वैश्य म्हणून संबोधित केले आहे.

शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला. ज्ञानहीन आणि शक्तिहीन व्यक्ती ही दुसर्यांची सेवा करून पोट भरू शकतो. सरकार दरबारातील चपरासी, दरबान किंवा जुन्या काळात राज दरबारातील सेवक, साफ सफाई, झाडू-पोंछा, इतर घरगुती अणि छोटे मोटे कामे करणार्यांना शुद्र म्हणून संबोधित केले आहे.

आपण मंदिरात परमेश्वराच्या पायांवर डोके ठेवतो. कारण परमेश्वर आपली सेवा करून आपले दुःख दूर करतो. त्याचाच चरणांपासून उत्पन्न झालेले, आपली सेवा करणारे (शुद्र) मग ते कुठल्या ही जातीचे का असेना. श्रेष्ठच आहेत. मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते.

हे सर्व मनुस्मृतित लिहिले आहे, या वर त्यांचा विश्वास बसायला वेळ लागला. पण गुगल गुरु खोटे बोलत नाही यावर त्यांचा विश्वास होता. शिवाय हे मंत्र त्यांनीच शोधलेले होते. प. जनकपुरीच्या मेट्रो स्टेशन वर ते सर्व उतरले. उतरताना त्यातला एकाने म्हंटले, अंकल अभी तक हमें टीवी से ही अपने धर्म के बारे में आधी -अधूरी थोड़ी बहुत जानकारी थी. कभी भी हमने अपने धर्मग्रंथो को नहीं पढ़ा. पर अब एकबार मनुस्मृति पढ़कर जरुर देखूंगा. मी हि हसून त्यांना धन्यवाद दिला. निश्चितच आजपासून आपल्या पुरातन पुस्तकांबाबत त्यांची धारणा थोडी तरी बदलली असेलच.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (6 votes)

प्रतिक्रिया

अंकल अभी तक हमें टीवी से ही अपने धर्म के बारे में आधी -अधूरी थोड़ी बहुत जानकारी थी. कभी भी हमने अपने धर्मग्रंथो को नहीं पढ़ा. पर अब एकबार मनुस्मृति पढ़कर जरुर देखूंगा

हे सर्वात महत्त्वाचे.
असे टिव्ही किंवा ट्रेनमध्ये भेटलेल्या अंकलच्य माहितीपेक्षा अशी इच्छा तुम्ही उत्पन्न केलीत हे उत्तम केलेत.
बहोत खूब!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ललित आहे म्हणून सोडून देतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नपेक्षा कुरुंदकरांचे पुस्तक रेकमेंड केले असते. पण झापडे ओढून बसलेल्यांना त्याचे काय होय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोकांना ( हिंदु लोकांना हं फक्त ) जर १४०० वर्षापूर्वीच्या एका चोपडीतल्या विचारांबद्दल काही बेसिक प्रश्न विचारले की लगेच, "तुम्हाला कळत कसे नाही, १४०० वर्षापूर्वीचे वातावरण कसे होते, तिथली संस्कृती कशी होती त्या प्रमाणे ती चोपडी बनली आहे" असे उत्तर मिळते.
मग ही जी काय मनुस्मृती आहे तिला हा बेनिफिट ऑफ डाउट देऊन सोडुन का दिले जात नाही.

तरी बरे १४०० वर्षापूर्वीची रानटी चोपडी जशीच्या तशी शब्दश: अमलात आणली पाहिजे अशी मागणी असते त्या सर्वांची. वर ती लोकांकडुन पाठ वगैरे पण करुन घेतली जाते.

ही मनुस्मृती का काय ते आमच्या सारख्या ९९.९९ टक्के हिंदुंनी बघ्तली पण नाही. तरी पण तिची चर्चा मात्र मुद्दाम घडवुन आणली जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही मनुस्मृती का काय ते आमच्या सारख्या ९९.९९ टक्के हिंदुंनी बघ्तली पण नाही. तरी पण तिची चर्चा मात्र मुद्दाम घडवुन आणली जाते.

या मनुस्मृतीतलाच काही भाग सिव्हिल लॉ च्या रूपाने आज भारतीय कायद्याचा भाग आहे, तेव्हा ती पूर्णपणे त्याज्य नाही. काही त्याज्य भाग जरूर आहे.

बाकी १४०० वर्षांपूर्वीच्या रानटी चोपडीबद्दल सहमत. इथे ऑलरेडी मनुस्मृती जाळून झाली, त्या चोपडीबद्दल काही बोलायचा अवकाश, तसे बोलणार्‍यालाच जाळून टाकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या चोपडीबद्दल काही बोलायचा अवकाश, तसे बोलणार्‍यालाच जाळून टाकतील.

कोण हो? कोण जाळतील?

*

कोणता भाग कोणत्या कायद्याचा भाग आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

कोण हो? कोण जाळतील?

तेच ते शांतताप्रिय धर्मानुयायी.

कोणता भाग कोणत्या कायद्याचा भाग आहे?

वारसाहक्कादि संदर्भातला काही भाग आज सिव्हिल लॉ मध्ये गेला असे वकील मंडळींकडून ऐकून-वाचून आहे. नक्की डीटेल्स पहावे लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

हिंदू वारसा कायद्याची बीजं मनुस्मृतीतच आहेत. अर्थात मनुस्मृती त्याची ओरिजिनेटर आहे असे नाही. मनुस्मृती हे तेव्हाच्या रूढ कायद्यांचे संकलन आहे.

मुख्यत्वे हा कायदा विज्ञानेश्वराच्या ग्रंथावर आधारित आहे. जो ब्रिटिशकाळात रूढ होता. तो बराचसा हिंदू विवाह कायद्यात आणला गेला. पुढे त्यात सुधारणा होत राहिल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मनुस्मृती ही एक चांगली पंचिंग बॆग आहे.मनुवादी मनुवादी असे म्हणून पंच करताना चांगला व्यायाम होतो. हे खेळणे काढून घेतले तर नवीन पर्याय काय?
तळागाळात काम करणारे एक राजकीय नेते पानसरेंना आदरांजली देण्याच्या कार्यक्रमात असे म्हणाले होते की रस्त्यावर जाणार्‍या येणार्‍या सर्वसान्मान्य माणसांना विचारा बर तुला मनुस्मृती माहित आहे का? आणि आज तू जे व्यवहारात वागतो ते मनुस्मृतीत सांगितले आहे म्हणून वागतोस का? हे नेते कॉंग्रेसचे होते. त्या अगोदर बी जी कोळसे पाटील बोलले होते व त्यात मनुवादी मनुवादी असे म्हणून इतरांना झोडपत होते. त्याला हा टोला होता.
खर तर एक प्राचीन साहित्य म्हणुन फार फार तर त्याकडे पहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तिकडे, त्या जगप्रसिद्ध जे.एन.यु. मधे तर 'मनुस्मृती ईराणी' असा वाकप्रचार तयार करुन वापरला जातोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाईतकाकांचा मेट्रोप्रवास नक्की किती वेळ असतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सी पी ते उत्तम नगर १७ स्थानक आणि वेळ ३५-४० मिनिटे. कधी कधी तरुण मंडळी भेटतात, चर्चा करणारी. आजच्या तरुणांचे वाचन जवळपास शून्यच आहे. अभ्यासाशिवाय दुसरे काही वाचत नाही. थोडी वाचायची सवय लागायला पाहिजे. बाकी एकदा द्रोणाचार्य यांनी दुर्योधनाला चांगला माणूस शोधायला सांगितले आणि युधिष्ठिरला वाईट माणूस. दोघेही रिकाम्या हाताने परतले. कुठला हि ग्रंथ जर हजारों वर्ष जिवंत आहे, तर निश्चित त्यात काही चांगले असेलच. आपण तेच बघायचे आहे. त्यांचा आदर हि त्या साठीच करायचा. बाकी जगात सर्वगुणसंपन्न कोण आहे. आपल्या संविधानात हि आपल्याला काळानुसार वेळोवेळी संशोधन करावेच लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आक्षेपार्ह भाग सोयीस्करपणे विसरून उर्वरित भागाचे गुणगान गाण्यात काहीच हाशिल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

एकदा द्रोणाचार्य यांनी दुर्योधनाला चांगला माणूस शोधायला सांगितले आणि युधिष्ठिरला वाईट माणूस. दोघेही रिकाम्या हाताने परतले. कुठला हि ग्रंथ जर हजारों वर्ष जिवंत आहे, तर निश्चित त्यात काही चांगले असेलच. आपण तेच बघायचे आहे. त्यांचा आदर हि त्या साठीच करायचा. बाकी जगात सर्वगुणसंपन्न कोण आहे. आपल्या संविधानात हि आपल्याला काळानुसार वेळोवेळी संशोधन करावेच लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो भाऊ,
मनुस्मृती हा विषय अत्यंत Controversial असल्याने तो उकरून काढणे म्हणजे शेणात दगड मारल्यासारखे आहे,
तुम्हाला, मला किंवा इतरांना चर्चा घडवणे,अभ्यास करणे यासाठी म्हणून एकवेळ ठीक आहे,पण मनुस्मृती असं नाव जरी नुस्तं उच्चारलं तर शिव्या देणारे लाखो आहेत,आणि तो ग्रंथ दहन करून एक मोठी चळवळ सुरू केली होती बाबासाहेबांनी त्याचं काय?
मग असे असताना त्याचे उदात्तीकरण कशासाठी?

संविधानात हि आपल्याला काळानुसार वेळोवेळी संशोधन करावेच लागते.

अहो एक पुराण ग्रंथ कुठे अन संविधान कुठे?
कै च्या कै तुलना!!! इथेच चुकते तुमच्यासारख्या सनातनी लोकांचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

श्लोकातला चांगलेपणा शोधण्यासाठी त्यातलं रूपक कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय खरा..
पण मुखातून ब्राह्मण निर्माण झाला म्हणजे मुखाचा विद्येशी संबंध आहे.. किंवा बाहुतून क्षत्रिय म्हणजे ताकदीशी संबंध वगैरे पर्यंत थोडंतरी लॉजिकल वाटतं

पण पुढे मात्र "उरू /जंघा मजबूत > अविरत मेहनत करू शकणे" आणि " शूद्र > पाय > ज्ञानहीन शक्तिहीन > उरलेसुरले काम / सेवा" हे रूपक साफच गंडलय Smile

आणि या सर्वावरून जात कर्मावरून ठरत असे वगैरे निष्कर्ष काढणे
आणि तरीपण आजच्या घडीला जन्मावरून ठरवलेल्या जातींना चिकटून बसून जातीसंस्था योग्य होत्या/आहेत असे सांगण्याचा प्रयत्न करणे हे केविलवाणे आहे !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' हे कशात आहे? मनुस्मृतीतच का?

आणि ते 'ढोर, गंवार, शूद्र और नारी, ये सब ताडन के अधिकारी'? ते पण तिथलंच ना?

आणि ब्राह्मणानं परस्त्रीशी संभोग केला तर त्याचं फक्त मुंडन करा, पण शूद्राचं मात्र लिंगच छाटा; त्यात त्यानं जर ब्राह्मण स्त्रीशी संभोग केला असला तर त्याला मारूनच टाका, वगैरे?

आणि ते -
अनुमंता विशसिता निहन्ता क्रयविक्रयी संस्कर्त्ता चोपहर्त्ता च खादकश्चेति घातका:

म्हणजे काही तरी मांसाहारी लोक आणि मांसाला हाताळणारे घातक असतात वगैरे ना?

बाकी लाइफ इन अ मेट्रो चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्याच पुस्तकात हेही लिहिलेलं आहे की स्त्रिया पुरुषांना वश करण्यासाठी इतक्या वखवखलेल्या असतात आणि पुरुषही इतके सहजपणे त्यांना बळी पडतात की पुरुषाने आपल्या आई, बहीण किंवा मुलीबरोबरही एकांतात राहू नये. अर्थातच प्रत्येक पुस्तक त्या त्या काळचं प्रतिनिधित्व करतं, म्हणून आजचे मानदंड लावू नयेत. कदाचित असतील त्या काळचे सगळेच पुरुष आणि आयाबहिणी तसलेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(खुद्द मनुस्मृतीत मूळ चार वर्णांना, आणि एका-पिढीपर्यंत-टिकणार्‍या संकरित वर्ण-नावांना "जाति" असे म्हटले आहे. म्हणून येथे मी "जात" म्हटलेले आहे - "वर्ण" आणि "जात" या दोहोंमधील फरक मला माहीत आहे.)
कोण्या जातीच्या बापापासून आणि कोण्या जातीच्या आईपासून जन्मलेल्या पुत्र वा पुत्रीची कोणती जात असते, आणि त्या जाती पुढच्या संततीनंतर वरच्या की खालच्या दिशेने जातात, त्याबाबत अतिशय बारकाईचे नियम मनुस्मृतीतील १०व्या अध्यायात दिलेले आहेत.

येथपासून सुरू :
सर्ववर्णेषु तुल्यासु पत्नीष्वक्षतयोनिषु ।
आनुलोम्येन संभूता जात्या ज्ञेयास्त एव ते ।। १०.५ ।।

सर्व वर्णांमध्ये तुल्य अक्षतयोनि पत्नीपासून अनुलोम संबंधाने जन्मलेलले जातीने तेच ते जाणावेत.
आणि पुढे बारकाईने अमुक जातीचा बाप x तमुक जातीची आई त्यांच्या संततीच्या जाती सांगितलेल्या आहेत.

धागाकर्ते म्हणतात --
> मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच
> शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते.
...
> उतरताना त्यातला एकाने म्हंटले, अंकल अभी तक हमें टीवी से
> ही अपने धर्म के बारे में आधी -अधूरी थोड़ी बहुत जानकारी थी.
> कभी भी हमने अपने धर्मग्रंथो को नहीं पढ़ा.
पण म्हणतात ना “फेकाफेकी से स्वीकृत क्या, मेट्रो यात्री को संस्कृत क्या”.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या धर्मग्रंथात (श्रुती आणि स्मृतीवर आधारित असल्यामुळे ) भयंकर भेसळ झाली आहे. राजा भोज जेंव्हा तरुण होता त्या वेळी महाभारतात २५००० श्लोक होते, काही काळानंतर त्यांनी ३०,००० श्लोक असलेले महाभारत वाचले. व्यास, नारद इत्यादी ऋषी मुनींच्या नावावर लेखन करणार्या लोकांना शिक्षा देण्याची व्यवस्था हि केली. नंतरच्या काळात प्रत्येक कवी आपल्या रचनेत स्वत:चे नाव टाकू लागला.

परंतु आधीच्या रचित ग्रंथांमुळे प्रत्येक सुलेखक आपले विचार त्यात टाकू लागला. या ग्रंथातील भेसळ काढून वास्तविक मूळ स्वरूप लोकांसमोर आणणे गरजेचे आहे. मनुस्मृतीतून काय घ्यायचे आणि काय टाकायचे हे आपल्याला ठरवायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रंथसंपदा सर्वकाळ वाढतच आहे. त्यात भेसळ म्हणून काय काढणार?
आणि मूळ नकोसे, की सुलेखकांच्या सुधारणा ठेवण्यालायक, अशा गोष्टींचे काय करावे?

"काय पटते आणि काय नाही" हा विचार करणे योग्य आहे. परंतु मग ही जाण आधुनिक समाजाच्या जाणिवेतून येते, ग्रंथप्रामाण्य ("खऱ्या" ऋषींचे ते ठेवू, असे) काही राहात नाही.
---

भोजराजाच्या महाभारत आख्यायिकेचा मनुस्मृतीतील दहाव्या अध्यायाशी काय संबंध लावत आहात. दहावा अध्याय प्रक्षिप्त आहे, असे म्हणायचे, तर सरळ तसे म्हणावे, आधारासकट.

---

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरूवातीला 'अहो तो ग्रंथ चांगलाच आहे, वाचून पाहिलात की समजेल' असा पवित्रा घ्यायचा. नंतर वाईट गोष्टी आहेत हे सांगितलं की 'त्या मूळ मनुने नाही लिहिलेल्या, त्या प्रक्षिप्त आहेत.' असं म्हणायचं. मनुने योग्य ते लिहिलं की नाही हा वादच नाही, मनुस्मृती म्हणून जे मान्य केलं जातं त्यात अयोग्य, संतापजनक गोष्टी आहेत की नाहीत हा मुद्दा आहे.

'त्याज्य आहे ते टाकून द्या.' हे म्हणणं सोपं आहे. मात्र ते त्याज्य नियम स्वीकारले जाऊनच जी समाजव्यवस्था तीत करोडो लोक भरडले गेले. हीच तक्रार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही प्रश्न मनात अाले होते, पण…
पटाईत सर, वर दिलेले योग्य संदर्भासहितचे दाखले व विचारलेले प्रश्न वाचून अापले मनुस्मृति बाबतचे मत बदलले का?
जर अजूनही अापण त्या पुस्तकास पवित्र मानत असाल, त्याचे ‘मिस् इंटरप्रिटेशन’ झाले म्हणत असाल, तर का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहितीप्रमाणे मनु हे राजर्षी (राजा = क्षत्रिय ऋषी) होते म्हणजे ते जन्माने किंवा कर्माने ब्राह्मण नव्हते. मनुस्मृतीत शौच (कायिक, वाचिक, आत्मिक, इत्यादी ) या संकल्पनेवर बरीच चर्चा आहे. परंतु सर्व प्रकारच्या शौचात अर्थशौच हे महत्वाचे आहे असं आग्रही मत ते प्रतिपादन करतात (हे विधान दिल्ली विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक श्री भरत गुप्त यांचे आहे. मी त्यांना याचा संदर्भ विचारला. पण त्यांचे काही उत्तर अजून आले नाही). मी सध्या प्रवासात असल्याने मनुस्मृतीत अर्थशौच चा उल्लेख नेमका कोठे येतो हे सांगता येत नाही. कदाचित इतर कोणी विद्वान तो बघून सांगतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

’अर्थशौच’ आणि अन्य प्रकारची शौचे ह्याविषयी चर्चा मनुस्मृतीच्या ५व्या अध्यायात दिसते. पुढील श्लोक पहा:

ज्ञानं तपोऽग्निराहारो मृन्मयोवार्युपाञ्जनम्।
वायु: कर्मार्ककालौ च शुद्धे: कर्तॄनि देहिनाम्॥१०५॥
ज्ञान, तपस्, अग्नि, आहार, मृत्तिका, मन, वायु, लिंपन, वायु, कर्म, सूर्य आणि काल ह्यामुळे मनुष्याला शुद्धि मिळते.
सर्वेषामेव शौचानामर्थशौचं परं स्मृतम्।
योऽ‍र्थे शुचिर्हि स शुचिर्नमृद्वारिशुचि: शुचि:॥१०६॥
ह्या सर्व शुद्धींच्या मधे अर्थशुद्धि सर्वोत्तम आहे. अर्थशुद्धि ज्याला साधते तो खरा शुद्ध, केवळ मृत्तिका आणि पाण्याने शुद्ध झालेला नाही.
क्षान्त्या शुध्यन्ति विद्वांसो दानेनाकर्मकारिण:।
प्रच्छन्नपापा जप्येन तपसा वेदवित्तमा:॥१०७॥
विद्वान् क्षमाशीलतेमुळे शुद्ध होतात, (यज्ञादि) कर्मे न करणारा दानाने, ज्याने आपली पापे लपविली आहेत तो जपाने आणि वेद जाणणारे तपाने शुद्ध होतात.

ह्यानंतर सोने, चांदी, अन्य धातु आणि अन्य वस्तु जल, मृत्तिका आणि राख ह्यांच्या उपयोगाने किंवा काही गोष्टींच्या विषयात अन्य गोष्टींनी कसे शुद्ध होतात हे सांगितले आहे. त्या विस्तारात येथे जात नाही.

ह्या सर्वांमधून वर दिलेला अर्थ कसा निघतो हे जाणण्याची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरविन्द्जी: मनुस्मृतीमधून अर्थशौच या कल्पनेवरील श्लोक (५:१०६) काढून दिल्याबद्दल धन्यवाद. आजच्या संदर्भात अर्थशौच म्हणजे लाच न देणे किंवा घेणे किंवा इतर आर्थिक गैर व्यवहार न करणे असं म्हणता येईल. तेव्हा मनुस्मृतीबद्दल इतर कितीही गदारोळ असला तरी या श्लोकावर कोणाचाही आक्षेप नसावा. सर्वानीच असं वर्तन ठेवलं तर एकंदर समाज स्थिती व्यवस्थित राहील म्हणून मनुनी अर्थाशौचाला सर्वोत्तम मानले असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सडकी मनोवृत्ती नुकतीच कलकत्त्यातील पूल कोसळण्याच्या घटनेनंतर दिसून आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरक्षणामुळे इंजिनियरिंगची सनद मिळालेल्या लोकांनी चुकीचे आराखडे केल्यामुळे उड्डाण पूल पडला, अशा प्रकारचे संदेश जालसमाजात फिरत आहेत. तो संदर्भ असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याची कल्पना नव्हती.

(अर्थात, अशा प्रकारचे संदेश समाजात फिरणे यातही दुर्दैवाने नवीन असे काहीच नाही म्हणा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच बोल्तो. IVRCL ही खासगी कंपनी आहे. तिथे कुठुन आलं आरक्षण?
मोतीलाल ओसवाल यांनी हा मेसेज प्रसारित करण्यात हातभार लावला होता. नंतर माफी मागितली. जैन समाजासाठी कुठेतरी आरक्षण मागण्यात हे पुढे होते म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गुजरात मध्ये असा पूल पडला असता तर किती असहिष्णुता निर्माण झाली असती, कल्पना करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूल पडून लोक मेले ते गेलं कुठल्याकुठे, लगेच गुजरात वगैरे आणता तुम्ही इथे म्हणजे तुम्हांला लाज वाटली पाहिजे. ती वाटणार नाही हेही माहितीच आहे म्हणा पण असो.

(पर्सनल अ‍ॅटॅक माय **)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जेंव्हा तर्क नसतात तेंव्हा असेच शब्द निघतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुतर्क असल्यावर कसे शब्द निघतात हे सांगितल्याबद्दल अनेक आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं