दारावर भाजी महाग का?- स्पष्टीकरण भाजीवाल्याचे

हा लेख ठेल्यावर भाजी विकणार्या भाजीवाल्याच्या स्पष्टीकरणावर आधारित आहे.

तसे म्हणाल तर आठवड्यातून २-३ दिवस घराच्या १-२ किमी परिसरात कुठला ना कुठला साप्ताहिक बाजार हा लागतोच. पण नेहमीच अश्या बाजारांंत जाणे जमत नाही. आठवड्यातून एक-दोनदा तरी आमची सौ. दारावर भाजी विकत घेते. भाजीवाला जवळपास राहणारा आहे. हा भाजीवाला दररोज ठेल्यावर भाजी सजवून संध्याकाळी ५ ते रात्री ९-१० पर्यंत भाजी विकण्यासाठी उत्तम नगरच्या गल्ली बोळ्यात फिरतो. साधारणत: हा हिवाळ्याच्या दिवसांत २०० किलो आणि उन्हाळ्यात १५० किलो भाजी विकतो. पावसाळ्यात याहून कमी. गेल्या आठवड्यात ४ दिवसांच्या सुट्ट्या होत्या, घरीच होतो. सौ. भाजी घेत होती. मी भाजीवाल्याला सहज विचारले मंडीचे भाव आणि तुमच्या भावात एवढा जास्त फरक का असतो? आश्चर्य वाटेल, पण भाजीवाल्याने मंडईतून भाजी आणण्यापासून ते दारावर ग्राहकाला विके पर्यंत भाव का आणि कसा वाढतो याचे सविस्तार वर्णन केले आणि फोटू हि काढू दिला.
भाजीवाला

सकाळी दहा वाजता हा भाजीवाला केशोपूर स्थित सब्जीमंडी येथे भाजी विकत घ्यायला जातो. मंडईतले भाव पाहून, किती आणी कोणती भाजी विकत घ्यायचे ठरवितो. अधिकांश भाज्यांचा मंडईत कमीतकमी ५ किलोचा भाव असतो. ५-१० किलोच्या हिशोबाने अधिकांश भाज्या विकत घ्याव्या लागतात. त्या दिवशी त्याने अंदाजन १५० किलो भाजी विकत घेतली होती. २०० रुपये ऑटो भाडे हि दिले.

दारावर भाजी विकत घेणारे ग्राहक भाजीसाठी जास्ती भाव देतात. त्यांना चांगली भाजी अपेक्षित असते. ठेल्यावर भाजी ताजी आणि सुंदर दिसत असेल तरच ती विकली जाते. त्या साठी भाजी घरी आणल्यावर भाजीवाला उदा: फूलगोभीवर(फ्लावर) लागलेले जास्ती डंठल तोडावे लागतात. बंद्गोभी (कॅबज), वरचची खराब पाने काढावे लागते. काही भाज्या स्वच्छ करण्यासाठी उदा: लागलेली माती काढण्यासाठी त्या पाण्यातून काढ्याव्या लागतात. बहुतेक वेळा बटाटे, कांदे आणि टमाटर आणि इतर भाज्या दर्जाच्या हिशोबाने वेगळ्या करून विकाव्या लागतात. शिवाय ग्राहक स्वत: भाजी निवडतात त्यामुळे हि काही भाजी वेगळी होतेच. शेवटी उरलेली भाजी रात्री ९.३० नंतर मिळेल त्या भावात विकावी लागते. ग्राहकांना मिरची आणि कोथिंबीर हि मुफ्त मध्ये द्यावी लागते. या शिवाय पाव, अर्धा किलोच्या हिशोबाने भाजी विकत घेणाऱ्या ग्राहकांना २५-५० ग्राम भाजी जास्त द्यावी लागते. बहुतेक घरी भाजी विकत घेणारे ग्राहक बांधलेले असतात. जर ग्राहकाला वजनाच्या बाबतीत यत्किंचित शंका आली तो तुटण्याची शक्यता असतेच.

भाजी स्वच्छ करणे आणि ग्राहकाला २५-५० ग्रम जास्त देण्यामुळे जवळपास १०% भाजी ग्राहकांपर्यंत पोचता-पोचता कमी होते. किती हि झाले तरी, आठवड्यातून एखाद्याच दिवशी १००% भाजी विकल्या जाते. उरलेली १०% ते २०% टक्के भाजी कमी भावात अर्थात घेतलेल्या भावात आणि कधी कधी तर त्याहून कमी किमतीत विकावी लागते. कधी कधी तर, उरलेली भाजी शेजारपाजारच्या लोकांना मुफ्त मध्ये हि वाटावी लागते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात दुसर्या दिवशी पर्यंत भाजी खराब होण्याची शक्यता असते.

आता आपण हिशोब करू. समजा भाजीवाल्याने मंडईतून १० रुपये किलोच्या हिशोबाने १५० किलो भाजी विकत घेतली, झाले १५०० रुपये. शिवाय १०० रुपयांची कोथिंबीर आणि मिरची मुफ्त मध्ये देण्यासाठी. २०० रुपये ऑटोचे. किमान ५००-७०० रुपये भाजीवाल्याची कमाई, १०० रुपये दान-दक्षिणा (मुंबईत दान दक्षिणा जास्त असू शकते ), ५० रुपये किरकोळ खर्च. असे झाले २५०० रुपये. आपण गृहीत करू १५ % उरलेली भाजी (२२.५ किलो) रेट टू रेट विकली. अर्थात २५००-२२५ = २२७५ रुपये.

आता उरलेली ११२.५ किलो भाजी किमान २० रुपये किलोच्या (सरासरी भाव) हिशोबाने भाजीवाल्याने विकली तरच त्याला २२५० रुपये मिळतील. अर्थात कमीत कमी दुप्पट भावात भाजी विकावीच लागेल तरच भाजीवाल्याला ५०० रुपये स्वत:साठी वाचविता येईल.

पण इथे हि एक घोळ आहे. प्रत्येक दिवशी दुसरे भाजीवाले कुठल्या भावाने भाजी विकत आहे, हे हि ध्यानात ठेवावे लागतात. (मंडईत भाजीवाले वेगवेगळ्या भावाने भाजी विकत घेतात). बहुतेक वेळा कांदे, बटाटा, फुलगोभी किंवा अन्य मौसमी भाज्या दुप्पट भावाने विकता येत नाही. या शिवाय नेहमीच्या ग्राहकांना थोडी सवलत हि द्यावीच लागते. त्या मुळे अन्य भाज्यांवर किलोवर १५-२० रुपये जास्ती आकारावे लागतात.

भाजीवाल्याचे स्पष्टीकरण ऐकल्या वर लक्ष्यात आले, मंडईतल्या भावात आणि घर पोच भाजी विकणार्या फेरीवाल्याच्या भावात फरक का असतो. मला तर त्याचे म्हणणे पटले, तुम्हाला?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

लेखात संस्कृत पेरणी केली असती तर चार चाॅन्द लागले असते.
बायदवे ही गोष्ट फार उशिरा कळली असे नाही का वाटत तुम्हाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीही घरातील स्त्रियांना जे ढोबळमानाने नेमके माहीत असते त्याचा विदा गोळा करायची लेखकाची हाउस नक्कीच उजवी आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मला तर या गल्लोगल्ली ओरडणाऱ्या भाजीवाल्यांची दया येते.

रोजचा फायदा किती होतो त्या भाजीवाल्याचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile सेम हियर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. माझा जुना लेख

२. अय्या, हे आधी माहिती नव्हतं? मग 'बहुत हुई महंगाई की मार...... ' वगैरे असंच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रँडम गोष्टी मोदींवर वळवायचं स्किल वाखाणण्याजोगं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा हा हा.

भाववाढ होत्ये, ती कंट्रोल होत नैये आणि मग जनरली मोदी समर्थक असलेली व्यक्ती किंमत जास्त असण्याचं जस्टिफिकेशन करणारा लेख लिहिते तर........

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भाववाढीची बोंब ही मंडई ते दार या भाववाढीबद्दल नव्हती. दारावरच्या भाववाढीबद्दल होती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कंसाला सर्वत्र कृष्ण दिसत होता तसेच सर्वांना मोदी दिसतो. कुणीही गादीवर आले तरी दारावर भाजी विक्रेत्याचे दर थोक मंडईतल्या भावापेक्षा दुप्पट राहतीलच. तो दारावर तुम्हाला सेवा देतो आहे आणि तुमचाही बाजारात जाण्याचा खर्च आणि वेळ हि वाचते.

बाकी या आठवड्यात हि थोक महागाईची दर (-) मध्ये होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी या आठवड्यात हि थोक महागाईची दर (-) मध्ये होती.>>>

तेच तर म्हणणं आहे. थोक दर निगेटिव्ह असताना किरकोळ दर वाढत आहेत.

कंसाला सर्वत्र कृष्ण दिसत होता तसेच सर्वांना मोदी दिसतो.>>

कृष्ण बनून आलो आहे असा दावा केलावता म्हणून .....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१२ < ५ असं म्हणायचं आहे का थत्तेचाचा तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लेखात संस्कृत पेरणी केली असती तर चार चाॅन्द लागले असते.
बायदवे ही गोष्ट फार उशिरा कळली असे नाही का वाटत तुम्हाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता भाजीवाल्याची मुलाखत घेतलीच आहेत तर पुढच्या वेळेस भाजीजागी भाजीवाल्याबद्दल प्रश्न विचारून बघाल का? तो कोण, कुठला, किती शिकला, दिल्लीत राहतो कोणत्या वस्तीत, दारोदार भाजी विकायचा धंदा त्याने होऊन निवडला का घरचे इतर कोणी ह्या व्यवसायात होते म्हणून पुढे चालू ठेवलं, मुलं आहेत का, मुलांनी मोठं होऊन काय करावं असं वाटतं, या माणसाची राजकीय मतं, पाकिस्तानबद्दल काय वाटतं, दहशतवादाची भीती वाटते का, स्वतःच्या भविष्याची, म्हातारपणाची तरतूद करतो का, इत्यादी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

साक्षर असता तर भाजी कशाला विकत असता. सर्व प्रश्नांना त्याने तर्क शुद्ध उत्तरे दिली. बाकी त्याचे कपडे, भाजीचा ठेला आणि व्यवहारिक बोलण्यावरून तो शिक्षित आहे. (साक्षर लोक शिक्षित असतात हा एक भ्रम आहे, बहुधा अधिक साक्षर लोक दीड शहाणे असतात) दिल्लीत उत्तम नगर मध्ये एका खोलीच्या घरात राहतो, जशी मुंबईची चाळ असते तसी. बिहारचा राहणारा आहे. सुरवातीला रिक्षा हि चालविला होता. भाजीत नफा पाहून तो या धंद्यात आला. जनधन योजनेत खाते उघडले आहे. विमा हि घेतला आहे. मी त्याला अटल पेन्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. दिल्लीत राहणार्या सर्वांना दशहदवादाची भीती सर्वांना असते. बाकी निजी प्रश्न मी विचारले नाही, आणि ते विचारणे उपयुक्त हि नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिल्लीत राहणार्या सर्वांना दशहदवादाची भीती सर्वांना असते.

कुठल्या दहशतवादाची? हिंदू की धर्म नसलेला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ROFL आई ग्ग!! प्रतिसाद ऑफ द डिकेड!! कमीत कमी शब्दात ..... ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तुमच्या पाककृतींसारखं काहीतरी वेगळं आणि/किंवा रोचक वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती ताई,
दूरदर्शन वर मंडईतले भाव येत होते, तेवढ्यात हा दारावर आला, मी हि सहज बाहेर आलो. भावाचे अंतर बघता त्याला जाब विचारला. गमंत म्हणजे भाव कसा आणि का वाढतो याचा पूर्ण पाढा त्याने माझ्या समोर वाचला. मला हि वाटले, आपण विशेषज्ञ लोकांचे लेख वाचतो, शिक्षित (?) लोकांचे लेख वाचतो. एका भाजीवाल्याचे विचार हि आपण मांडावे. एवढेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिक्षित (?) लोकांचे लेख वाचतो. एका भाजीवाल्याचे विचार हि आपण मांडावे. एवढेच.

म्हणूनच मलाही भाजीवाल्याचं व्यक्तिगत आयुष्य, त्याला जाणवणाऱ्या अडचणी, त्याचा भविष्याबद्दलचा विचार याबद्दल कुतूहल वाटतं. तुम्ही अनायासे सुरुवात केलेली आहेत, तर आणखी काही वाचायला मिळेल अशी हाव मला सुटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख कधीचाच वाचला होता. पण प्रतिसाद द्ययचा राहुन गेला.
मला मी माझ्या भाजीवालीशी मारलेल्या गप्पा आठवल्या.
मस्त अनुभव असतो नाही? अगदी वेगळाच.
तुम्ही एक वेगळाच प्रवास (वाढणार्या भाजीदरान्चा) उलगडुन दाखविलात. Smile
लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का