रंगरंगीला गोवा..

या महिन्याच्या सुरवातीस उन्हाळयाचा शेवट आणि पावसाळ्याची सुरूवात असा मुहूर्त साधून चार दिवस जीवाचा गोवा करून आलो. आमचं राहण्याचं ठिकाण दूर आत आणि मुख्य पर्यटन स्थळांपासून दूर असल्याने चांगलंच शांत आणि प्रशस्त होतं. त्यामुळे जातायेता अगदी खरंखुर्रं गोंय भरपूर पाहायला मिळालं. मुंबई-औरंगाबाद-तासगांवातले खड्ड्यातले रस्ते पाह्यल्यानंतर गोव्यातले रस्ते अगदी हिरॉईनच्या गालांसारखे* मऊ मुलायम वाटत होते. आणि त्यातच चार दिवसांतल्या प्रवासात एकही टोलनाका दिसला नाही त्यामुळे अगदी चुकल्यासारखं झालं.

तिथे प्रवास करताना माड-पोफळीच्या बागा आणि समुद्रकिनार्‍यांपेक्षाही जर काही नजरेत भरली असतील, ती होती तिथली घरे. वेगवेगळ्या वास्तुकलांचे नमुने तर खरेच, पण त्यांना दिलेले रंग या सगळ्यांवर सॉल्लीड मात करत होते.नेहमीच्या त्याच त्याच रंगांच्या इमारती बघून मेलेल्या नजरेला ही रंगाबेरंगी घरे पाहून जणू नवसंजीवनीच मिळाली. माझं हे अशा घरांच्या फोटो काढण्याचे वेड पाहून पैसा ताईला 'हे वेगळेपण इतके दिवस मला कसं जाणवलं नाही' असं वाटू लागलं!

विशेष सूचना: धावत्या कारमधून आणि दही खाल्लं तर पाच मिनिटांत त्याचं हमखास ताक होईल अशा अतिवळणावळणांच्या रस्त्यावरून जाताना हे फोटो काढले असल्याने फोटोंच्या कोलितीबद्दल अवाक्षर काढू नये, अपमान करण्यात येईल.
तर मंडळी सादर आहेत, रंगरंगील्या गोव्याचे फोटो:

सुरवात करतेय एकदम गुलाबी गुलाबी रंगाच्या घराने. अगदीच नाही म्हटलं तर पनवेलमध्ये शिरताना या रंगाची एक इमारत दिसते.

हा रंग आजवर एखाद्या फिक्या रंगाला पूरक म्हणूनच पाह्यलेला आठवतोय.

आणि हा पण. इथे जरासा वेगळा दिसतोय हा, पण हादेखिल रक्तवर्णीच आहे.

या रंगाच्या सगळ्या छटा इथे पाह्यला मिळाल्या.

हा रंगसुद्धा फिका वाटत असला तरी प्रत्यक्षात तो जांभळाच्या आतला (पक्षी:पर्पल) रंग आहे.

निळ्या रंगासोबतच इथल्या लोकांना पिवळ्या रंगाच्या सगळ्या छटा आवडतात असं वाटतं.

हे जरा नेत्रसुखद तरी आहे.

हे मंदिरासारखे दिसत असले तरी, फोंड्याजवळच्या गावातले घरच आहे.

ही फोंड्यातल्या कोर्टाची इमारत आणि तटबंदी:

हे असेच आणखी एक घर..

आणि हा सर्वांवर कळस आहे:(पैसाताईच्या घराच्या अगदी जवळ आहे हे. तिथेच एक घराला गडद turquoise blue रंग देणे चालूय, अजून पूर्ण व्हायचंय ते)

फोटो बरेच काढले. त्यातले काही खूपच धावत होते. आणि सगळेच काढणंही झालं नाही. एक फोटो घेता घेता शेजारचं घर वाकुल्या दाखवून पळायचं तर कधी नक्की कोणत्या बाजूच्या घराचा फोटो घेऊ असं होऊन कधी एक तर कधी दोन्ही फोटो हातचे गेले. एक तर घर 'शी'च्या रंगासारखं होतं, एक दत्ताचं देऊळ अगदी अविश्वसनीय बेबी पिंक रंगात होतं. खरंतर हे इथे दिलेले रंग काहीच नव्हेत असं वाटायला लावणारे अतरंगी रंगही टिपता नाही आलेयत. आणि असं बरंच काही...
अधिक फोटो इथे.

फोटो घेता घेता कॅमेर्‍याची बॅटरी संपली, पण तरीही अशी वेगवेगळी घरे खुणावत होती. राहिलेले फोटो देण्याचं पैसातैने कबूल केलेय.. तेव्हा अजून खजिन्याच्या प्रतिक्षेत आहे.

*श्रेयअव्हेरः बहुतेक भाईकाका. चू भू दे घे.
स्थळः साष्टी तालुक्यातल्या वर्का बीचपासून मडगांव-शांतादुर्गा-मंगेशी-फोंडा या गावातले रस्त्यांच्या आजूबाजूस.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

लेख आणि फोटू आवडले. पोर्तुगीज सत्तेच्या काळात पांढरा रंग हा मेरीच्या पावित्र्याशी निगडीत असल्याने चर्चेस वगळता इतर इमारतींना पांढर्‍या रंगात रंगवण्यास मनाई होती, असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं. (शुभ्र काही जीवघेणे Lol
[दुवा]

त्याचा परिणाम (आणि कदाचित लाल मातीपासून बचाव) म्हणून घरं इतक्या निरनिराळ्या रंगांत असू शकतील. [एकंदरीत रंग उधळण्याची प्रवृत्ती हे तिसरे कारण? :)]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पांढरा रंग हा मेरीच्या पावित्र्याशी निगडीत असल्याने चर्चेस वगळता इतर इमारतींना पांढर्‍या रंगात रंगवण्यास मनाई होती

असाच काहीसा प्रकार स्पॅनिश लोकांमधे किंवा हिस्पॅनिकांमधे साफ नाही असं आहे का? एक 'रँच म्युझियम' पाहिलं त्यात स्पॅनिशांच्या काळातलं टिपिकल रँच हेडक्वार्टर म्हणून पांढरंधोप घर होतं. स्पगेटी वेस्टर्न चित्रपटांतही अशीच घरं दिसतात?

घरं रंगीबेरंगी आहेत खरी! महाराष्ट्रात, विशेषतः शहरी भागात, एवढे रंग अजिबातच दिसत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पोर्तुगीज सत्तेच्या काळात पांढरा रंग हा मेरीच्या पावित्र्याशी निगडीत असल्याने चर्चेस वगळता इतर इमारतींना पांढर्‍या रंगात रंगवण्यास मनाई होती

पांढरा रंग हे मेरीच्या पावित्र्याचे (खरे तर अनाघ्रातपणाचे) प्रतीक आहे, म्हणून (पापातून जन्मलेल्या) मियर मॉर्टल्सच्या इमारतींना रंगवताना पांढरा रंग वापरायचा नाही (आणि म्हणून दुसरा कोठलातरी रंग वापरायचा), हे समजू शकतो.

पण मग त्याच अनुषंगाने पाहायचे झाले, तर मग येथे इष्टापत्ती आल्यासारखी जरा जास्तच भडक रंगांची जी पखरण नव्हे, उधळण दिसते, ते नेमके कशाचे प्रतीक मानावे बरे? (नॉट द्याट आय माइंड इट; डोंट गेट मी राँग... परंतु एक आपले निरीक्षण नोंदवले, इतकेच.)

उगाच आपले मेरीच्या जिवावर... (किंवा, '...बहाना चाहिए', हेच खरे.)

अवांतर: डेझर्ट स्याण्ड, क्रीम (खास करून तो 'मेरा वाला क्रीम!!!!', डोळ्यांची पिटपिटपिटपिट, इ.) वगैरे रंगछटांच्या नावांकरिता पोर्तुगीज अथवा कोंकणी भाषांत प्रतिशब्द नसावेत काय?

बाकी, गोव्यातील (काही?) हिंदू मंदिरेसुद्धा भडक रंगांत दिसतात, त्याचा अर्थ काय लावावा? पुन्हा, त्यामागेही असाच काही सिंबॉलिझम कामी येत असावा काय?

(नाही म्हणजे, राजवट पोर्तुगीजांची होती, पांढरा रंग लावायला मनाई होती, वगैरे सगळे समजू शकतो. पण या लोकांना सोबर रंग ऐकूनसुद्धा माहीतच नव्हते काय? उगाच आपली 'गर्व से कहो, हम पापी है, इतके की आमचे देवसुद्धा पापी हैं' म्हणून स्वतःच स्वतःची जोरदार जाहिरात करायची ती? किरिस्तांवांचे एक वेळ समजू शकतो. त्यांचे म्हणणेच मुळात असे आहे, की आम्ही पापी आहोत, आणि येशू आम्हाला तारायलाच जगात आला, म्हणून. त्यामुळे त्यांना आपल्या पापीपणाची फुल्टू जाहिरात करावीशी वाटली, तर ते समजण्यासारखे आहे. पण यांचे काय? आणि तेही देवळांत? किरिस्तांवसुद्धा स्वतःच्या देवाला पापी म्हणत नाहीत - त्यांची चर्चे तेवढी पांढरी - मग यांनाच आपली देवळे इतक्या भडक रंगात रंगवण्याची गरज का पडावी? पुन्हा, पोर्तुगीजांची राजवट होती, जुलमी होती, पांढर्‍या रंगात रंगवण्यास मनाई होती, वगैरे सगळे समजू शकतो. पण समजा "मेरा वाला क्रीम!!!!" फासला असता देवळांवर, तर काय लिस्बोंआहून खासा सालाझार आला असता पकडायला? आणि येऊ घातला असताच, तर कोणत्या आधारावर? "मेरा वाला क्रीम!!!!" म्हणजे काही पांढरा नव्हे! उगाच आपली पोर्तुगीजांच्या नावावर बिले फाडायची, झाले! असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉव! बोलेतो फुल्टु झट्याक! चित्रबोध-२ मधे लिहिलंय तसं आपल्याला भडक वाटले तरी त्यांना वर्षानुवर्ष बघुन आपल्या इमारती फिकट वाटत असतील नाही? Smile

बाकी, गोवा काय (अह्म अह्म.. Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एक से एक रंग आहेत. तो शेवटचा हिरवा तर एकदम झांटाम्याटिक आहे! फोर्ड फिगोचा आहे बहुतेक तसला कलर... लै भारी दिसतोय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

शेवटचा हिरवा रंग डोळे बंद करुनही दिसतो आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा. घरांनी आणि बिल्डिंगींनी गोव्यातल्या मुक्त अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुरेपुर लुफ्त उठवलेला दिसतोय.

झकास.

आमची आजी लिंबाचं झणझणीत लोणचं करायची. त्याचा खार जिभेला लावला की तोंडाला चव यायची. मामाच्या शब्दांत 'जिभेला लावलं तर मेलेलासुद्धा खाडकन् उठून जागा होईल'. सपक रंग बघून काहीसे सुस्त झालेले डोळे या रंगांनी असेच जागे होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0