माझी आवडती राष्ट्र्गीते

मला या राष्ट्रगीतांच्या चाली आणि संगीत संयोजन आवडले. मला त्यांच्यातील राष्ट्रीयत्वा्च्या भावनेचे मूल्यमापन करता येणं शक्य नाही.

1. श्रीलंका
http://youtu.be/JslPiA9mPls

2. पोलंड
http://youtu.be/KQTq07gihqg

3. फ्रेन्च
http://youtu.be/LizrcM7rIk0
http://youtu.be/69nNX_fw_po

4 नाझी जर्मनी
http://youtu.be/OFLe24jh3Yk

मला झुबेन मेहताने कण्डक्ट केलेल्या न्युयॉर्क फिलॉरमॉनिक ऑर्केस्ट्राने वाजवलेले भारतीय राष्ट्रगीत पण आवडले होते. पण ते एकदाच ऐकले होते. ते कुठे सापडत नसल्याने त्यांचा वरील यादीत समावेश नाही.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

अशी श्रेणी देण्याची सोय हवी होती. देशभक्ती वगैरेविषयी फार आदर नाही, पण हा व्हीडियो बघून डोळ्यात पाणी आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासकडवी,

तुम्हाला भारतात प्रवेश करायला बंदी घालायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी.. मुंबईतल्या सिनेमाघरांत अजूनही सिनेमाआधी राष्ट्रगीत असतं आणि प्रत्येकवेळी हा व्हिडिओ पाहून अंगावर रोमांच येतात. आता सहज शोधलं तर कुठे काही माहिती मिळाली नाही पण याचा दिग्दर्शक अभिनय देव आहे म्हणे. बिग सिनेमासाठी तयार केलेल्या या राष्ट्रगीताला कान्स महोत्सवात तीन पारितोषिकांचा मान मिळाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

१००% सहमत.

(घासकडव्यांशी सुद्धा१००% सहमत व्हावे लागणे हेच माझ्या लेखी ह्या व्हिड्योचे सामर्थ्य आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नितांतसुंदर - घासकडवींशी सहमत.
देशभक्ती वगैरेही गेली खड्ड्यात. त्यामुळं डोळे पाणावले नाहीत, पण भावनोत्कट झालोच. पुन्हा याही मुद्यावर घासकडवींशी सहमत.
या व्हीडीओला धरून 'देशभक्तीला भाषा नसते' हे म्हटलं आहे तेच दाखवतं की, तसं म्हणतानाही भाषा नाकारण्याची तथाकथित प्रतिष्ठा आपल्याच मनात किती घर करून असते. या अभिव्यक्तीत एक भाषा नाही? ज्यांना बोलता येते एखादी भाषा, अशा मुलांकडूनही हे त्या संकेत-भाषेतून (साईन लँग्वेज) करून घेतलं असतं तर नितांतसुंदर दिसलं नसतं? दिसलं असतं. ही मुलं वेगळी आहेत यावरच आपण पुन्हा भाषेचा मुद्दा करून अधोरेखनच करतोय.
दिग्दर्शक अमित शर्मा आहे, असं ब्लॉगवर लिहिलेलं दिसतंय. कान्समध्ये पदकं मिळवली आहेत हेही दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या अभिव्यक्तीत एक भाषा नाही? ज्यांना बोलता येते एखादी भाषा, अशा मुलांकडूनही हे त्या संकेत-भाषेतून (साईन लँग्वेज) करून घेतलं असतं तर नितांतसुंदर दिसलं नसतं?

+१
डहाक्यांच्या भाषेत (चित्रबोध-२मधील शेवटचा प्रश्न) तर ही दृश्यवाक्यच !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण हे चित्रण सवंगपणाकडेच झुकते आहे, आपल्याला देशभक्ती वगैरे भावनेचा ढोस दुसर्‍या एका (गरीब बिच्चार्‍या, अश्राप) भावनेत पातळ करून प्यावा लागत आहे असेही वाटले.
अवांतरः
चित्रफितीला संगीत नसते आणि शेवटी दिसणारा भारताचा झेंडा नसता तर ती कितपत प्रभावी वाटली असती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानच प्रतिसाद. अगदी पटले. आपल्याकडे अशा 'भावना अगदी पिळून काढणार्‍या' सवंगपणाची लोकांना फारच आवड आहे असे दिसते. व्हि.डि.ओ. पाहून मारे डोळे पुसतील, पण अपंगांसाठी मूलभुत सुविधा वगैरे दिसतील का कुठे? पाश्चात्य देशांसारखे व्हीलचेअर रँप वगैरे किती ठिकाणी दिस्तिल? भोंगळ मेलोड्रामा करण्यात भारतीयंचा हात धरनारे थोडेच. सर्वत्र हेच. बॉर्डर वगैरे चित्रपट पाहून मारे बाहू सर्सावतील, ए मेरे वतन के लोगो ऐकून नक्राश्रू ढालतील, पण सैनिकांच्या विधवांचे, अपंग सैनिकांचे पुढे काय होते कोणाला माहित. 'शो-ऑफ' करण्यात मात्र सर्व एकाहून एक वरचढ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी! मात्र शेवटी झेंडा नसता तरी संगीत छान असल्यामुळे छान वाटलं असतंच. मात्र अगदी गहिवरलो वगैरे नाही आत्ताही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

पण हे चित्रण सवंगपणाकडेच झुकते आहे, आपल्याला देशभक्ती वगैरे भावनेचा ढोस दुसर्‍या एका (गरीब बिच्चार्‍या, अश्राप) भावनेत पातळ करून प्यावा लागत आहे असेही वाटले.

अगदी!

एकंदरीत पब्लिकच्या मनातला देशभक्तीचा (वगैरे) महापूर अधिक अपंगांविषयी (कोरड्या?) सहानुभूतीचा धबधबा यांना पुरेपूर एक्स्प्लॉइट करण्याचा, त्यांचे भांडवल करून त्यांचा पुरेपूर फायदा उठवण्याचा अत्यंत क्रास, ग्रोस, सवंग, किळसवाणा प्रकार वाटला.

या प्रकारास कान्स महोत्सवात पारितोषिक मिळाले असेलही, पण (हे कळल्यावर) ते कशाच्या / कोणाच्या जिवावर, हे लक्षात घेता, तिटकार्‍याव्यतिरिक्त कोणतीही भावना मनात निर्माण होऊ शकली नाही. क्षमस्व. त्या मुलांविरुद्ध काही नाही, परंतु 'समाजप्रबोधना'च्या गोंडस नावाखाली त्यांना अतिशय घृणास्पद रीत्या वापरले गेले आहे, असे प्रामाणिकपणे वाटते.

राग मानू नये (किंवा पाहिजे तर खुशाल मानावा, आय केअर टू हूट्स!), पण आपल्याकडे अपंग मुलांना रस्त्याच्या कडेला भीक मागायला बसवले जाते (आणि तेथेही ते पैसे भलतेच कोणीतरी लाटत असते), त्यापेक्षा फार वेगळा प्रकार वाटला नाही.

समाजप्रबोधनच करायचे असते, तर अपंगांच्या अडचणींवर एखादी माहितीपर डॉक्युमेंट्री काढता आली असती, त्यातून त्यांच्याकरिता सुविधा निर्माण करणार्‍या एखाद्या संस्थेसाठी मदतीचे आवाहन करता आले असते, पडेल ते कष्ट घेऊन का होईना, पण शक्य तितक्या प्रकारे चारचौघांसारखे जीवन जगू पाहणार्‍या अपंगांचे चित्रण करून, तीही चारचौघांसारखी माणसे आहेत, त्यांनाही डिग्निटी आहे, फक्त त्यांच्या व्यंगामुळे त्यांना रोज सुरळित जीवन व्यतीत करण्यासाठी ज्या अडचणी येतात, त्यांच्या निवारणासाठी काही मूलभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, आणि त्यात समाजाच्या सहभागाची गरज आहे, असा काहीतरी संदेश देता आला असता. पण या अशा चित्रणामुळे समाजाच्या निर्व्यंग घटकांत अपंगांविषयी जी एका प्रकारची विकृत 'दया'भावना असते (जिच्यापायी सहसा रस्त्यावरच्या आंधळ्या अथवा पांगळ्या भिकार्‍याच्या कटोरीत चवन्नी-अठन्नी फेकली जाते), तिला खतपाणी घालण्याव्यतिरिक्त (आणि या प्रकाराच्या कर्त्यास कान्स महोत्सवाचे पारितोषिक मिळवून देण्याव्यतिरिक्त) नेमके काय साध्य झाले, ते कळत नाही.

किंवा कदाचित समाजमनातल्या नेमक्या याच विकृतीस अधोरेखित करण्याचा उद्देश होता की काय, नकळे, परंतु तसा तो असल्यास तो अत्यंत संशयास्पद ('डूबियस' अशा अर्थी) आहे, असे म्हणावेसे वाटते. आणि त्या परिस्थितीत या प्रकाराच्या कर्त्याने ते कान्स पारितोषिक नाकारले असते, तर कदाचित ते अधिक उचित ठरले असते काय (आणि अधिक शोभून दिसले असते काय), असाही विचार मनास चाटून जातो. पण अर्थात, मिळालेल्या पारितोषिकाचे काय करायचे हा त्या पारितोषिकविजेत्याचा वैयक्तिक प्रश्न आणि अंतिम निर्णय आहे, तेव्हा त्याबद्दल कोणतीही अपेक्षा करण्याचा अधिकार निदान मला तरी नाही, हे ओघानेच आले.

इत्यलम्|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या व्हीडीओला धरून 'देशभक्तीला भाषा नसते' हे म्हटलं आहे तेच दाखवतं की, तसं म्हणतानाही भाषा नाकारण्याची तथाकथित प्रतिष्ठा आपल्याच मनात किती घर करून असते. या अभिव्यक्तीत एक भाषा नाही? ज्यांना बोलता येते एखादी भाषा, अशा मुलांकडूनही हे त्या संकेत-भाषेतून (साईन लँग्वेज) करून घेतलं असतं तर नितांतसुंदर दिसलं नसतं? दिसलं असतं. ही मुलं वेगळी आहेत यावरच आपण पुन्हा भाषेचा मुद्दा करून अधोरेखनच करतोय.

जे मी मुकेपणी बोलतो, शब्दांत ते रंगेल का? ही ओळ आठवली.
बाकी लेख, व्हिडिओ आणि प्रतिसाद - सारेच आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्दांविनाचे हे सुंदर राष्ट्रगीत पाहून नि:शब्द झाले,गहिवरुन आले.
स्वाती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला सर्वात आवडलेले 'सायलेंट गाणे' आहे हे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए.आर.रेहमान दिग्दर्शित 'जन गण मन' ऐकले/पाहिले नसेल तर यूट्यूबवर अवश्य पाहा. उत्तम आणि वेगळ्या प्रकारच्या निर्मितितन्त्राबरोबरच कित्येक प्रख्यात भारतीय गायक/वादक पाहायला मिळतात हा बोनस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत राष्ट्रध्वजाच्या 'डिझाईन'चे कपडे देखिल घातलेले चालतात म्हणे. इथे भारतात ध्वज, राष्ट्रगीत इ. साठी कडक आचारसंहिता आहे.
वेगळ्या पद्धतीने ते गायलाही मनाई त्यात आहे.
रहेमान, हे सायलेंट इ. प्रकर्णे कितपत योग्य म्हणावयाची?
अवांतरः पूर्ण राष्ट्रगीत प्रमाण पद्धतीने गायला ४७ सेकंद लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पूर्ण राष्ट्रगीत प्रमाण पद्धतीने गायला ४७ सेकंद लागतात.

५२ सेकंद ना? आमच्या शाळेतल्या गतीने ते खरे कसेबसे ३०-३५ सेकंद होत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतेक ५२ च...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

शेवटचे जय हिंद! म्हटलेले धरून होते. जय जय जय जय हे. ला ४७ पूर्ण होतात.:) हे मला त्या प्रोटोकॉलच्या पुस्तकात वाचलेले आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

...'जय हिंद' एवढे म्हणायला ५ सेकंद???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत राष्ट्रध्वजाच्या 'डिझाईन'चे कपडे देखिल घातलेले चालतात म्हणे

अशी किंचित हलकी-फुलकी थट्टादेखिल चालते म्हणे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारताचं राष्ट्रगीत लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि ते अतिशय सुंदर प्रकारे कंपोझ केलं गेलंय या कारणांमुळे भारताचं राष्ट्रगीत आवडतंच. खूप वर्षांपूर्वी 'जनगणमन' बॅगपाइपवर वाजताना ऐकलं होतं आणि तेव्हा जे काही दाटून आलं होतं मनात ते मी शब्दात नाही माडू शकत.

***

पण मला या व्यतिरिक्त आवडणारं राष्ट्रगीत आहे ते पाकिस्तानचे. ... 'पाक सरझमीन शादबाद..' ... बर्‍याच वर्षांपूर्वी रात्री शॉर्टवेव्हवर रेडिओ पाकिस्तान अगदी छान लागायचं आणि मी ते नियमित ऐकायचो. त्यावेळी रात्रीसाडेअकरा बाराच्या सुमारास शांत वातावरणात ते ऐकताना छान वाटायचं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद. याच संधीची वाट पाहत होतो. म्हटले, आवडत्या राष्ट्रगीतांचा विषय निघालाच आहे, तर कोणीतरी हे डकवेलच, तेव्हा आपणच सर्वप्रथम डकवण्याची घाई का करावी? Smile

तर, या निमित्ताने, वरील राष्ट्रगीताच्याच कवीकडून आणखीही एक "राष्ट्र"गीत. खूपच सुंदर आणि मनाला भिडणारे आहे. आमचे खूपच लाडके! Wink

आवृत्ती १ (मी मुळात ऐकल्याबरहुकुम. सुरुवातीच्या ताशांसहित.)

आवृत्ती २ (किंचित धीम्या गतीतील आवृत्ती. दुर्दैवाने या आवृत्तीत सुरुवातीचे ताशे अर्धवट कटलेले आहेत. त्याव्यतिरिक्त, शेवटून दुसर्‍या कडव्याच्या शब्दांत किंचित पाठभेद *.)

शब्दांकन (सर्वप्रथम उर्दूत, त्यानंतर इंग्रजीतून गोषवारा, आणि सर्वात शेवटी उर्दू शब्दांचे रोमन लिप्यंतर. वस्तुतः, हा वर उल्लेखिलेला पाठभेद आहे.)

(या "राष्ट्र"गीताचे दुवे येथे चिकटवण्यामागील औचित्याबद्दल कदाचित आक्षेप येऊ शकतील, म्हणून ते चिकटवण्याअगोदर खूप विचार केला. सरतेशेवटी म्हटले, की एवीतेवी नाझी जर्मनीचे राष्ट्रगीत वर चिकटवलेलेच आहे, ते जर खपू शकते, तर हेही बहुधा चालून जावे. शेवटी ज्याच्यात्याच्या आवडीचे स्वातंत्र्य आहे, नाही का? म्हणून मग शेवटी मनाचा हिय्या करून चिकटवलेच. असो. Lol

(बर्‍याच वर्षांपूर्वी, सुमारे १९८०च्या दशकाच्या मध्याकडे, घरापासून खूप, खूप दूर, कॉलेजात असताना, रात्रीअपरात्री पुण्याची आठवण येत असे. मग अतिशय डेस्परेटली - याकरिता मराठीत 'अगतिकपणे' असा शब्द आहे याची मला कल्पना आहे, पण ते असो - बाकी काही नाही तरी गेला बाजार आकाशवाणी पुणे केंद्र पकडण्याची धडपड सुरू होत असे. अनेकदा अतिशय फिकट का होईना, पण लागायचे. मात्र अनेकदा त्याऐवजी मीडियमवेववर जवळजवळ त्याच फ्रीक्वेन्सीवर असलेले आज़ाद कश्मीर रेडियो मुज़फ़्फ़राबाद केंद्र अगदी लख्ख वाजायचे, आणि मजबूरी के नाम मी ते अतिशय नियमितपणे आणि उत्साहाने ऐकायचो. रात्री साडेअकराच्या सुमारास प्रसारण रात्रीपुरते बंद होण्याअगोदर वाजणारे हे "राष्ट्र"गीत त्यावेळी ऐकायला मिळायचे. रात्रीच्या शांत वातावरणात ते ऐकताना गंमत वाटायची. Smile

वरील दुव्यांत दिलेली पहिली आवृत्ती ही मी रेडियोवरून ऐकलेल्या मूळ "अधिकृत" आवृत्तीबरहुकूम आहे.

या "राष्ट्र"गीताचे वैशिष्ट्य असे, की भारताचे राष्ट्रगीत हे सरकारमान्य पद्धतीने वाजवल्यास ५२ सेकंद चालते, पाकिस्तानचे राष्ट्रगीतसुद्धा ८० सेकंदांत संपते, तर हे "राष्ट्र"गीत तब्बल ३ मिनिटे १८ सेकंद वाजते. या "राष्ट्र"गीतात "राष्ट्र"भक्ती किती ओतप्रोत भरली असावी, याची यावरून कल्पना यावी. Wink

या "राष्ट्र"गीताच्या अंतिम कडव्यातील शब्द - 'कर के लालच क्यूं ओ शैतान, क्यूं बेचें हम दीन-ओ-ईमान, पाकिस्तान के साथ खड़े हैं, इज़्ज़त हुर्मत हुक़्म-ए-क़ुरान, जान भी क़ुर्बान माल भी क़ुर्बान, माल से प्यारा जान से प्यारा, वतन हमारा...' इ.इ. - पाहता, यात भारताला हळूच एक कोपरखळी मारून घेण्याचा मोका साधून घेतलेला आहे की काय, नकळे. असो.

बाकी, याच अंतिम कडव्यात, पहिल्या पंक्तीत एकदा आणि दुसर्‍याही पंक्तीत एकदा, असा 'क्यूं' चां दोनदा वापर करून, मराठीतच व्यक्त करायचा झाला, तर '(लालचीपोटी, अरे सैताना, आम्ही तुला) का रे बाबा, का विकू?' असा जो अभिनिवेश साधलेला आहे, त्याला तोड नाही. Smile

आणि पहिल्या कडव्यात मांडलेला 'आमचा ध्वज चंद्रतार्‍यांचा, म्हणजे जणू हे आभाळच आमचा ध्वज आहे' हा जो सिंबॉलिझम आहे, तो निव्वळ मोहक आहे. तर तोही एक असो बापडा.)


* वर दिलेल्या दुव्यातील शब्दांकनातील शेवटून दुसर्‍या कडव्यातील शब्द - 'कोहिस्तानों की आबादी, पहन चुकी ताज़-ए-आज़ादी, इज़्ज़त के परवाने जागे, आज़ादी की शमा जला दी, जाग उठी है सारी वादी, ज़ामीं है अल्लाह तुम्हारा, वतन हमारा...' इ.इ. - हा वस्तुतः नंतर बनवला गेलेला पाठभेद असून, त्याचा अर्थ लावताना थोडा गोंधळ होतो. कारण, 'सारी वादी' (तृतीयपुरुषी) जर जाग उठली असेल, तर मग अल्लाह हा 'तुम्हारा' (द्वितीयपुरुषी) ज़ामीं कसा काय होऊ शकतो? तर याचे उत्तर असे, की मूळ आवृत्तीत (वरील पहिल्या दुव्यात दिल्याप्रमाणे) अधोरेखित शब्द हे 'तुम भी उठो, अहल-ए-वादी' असे आहेत. यात (भारताच्या नियंत्रणाखाली असलेल्या) कश्मीर खोर्‍यातील जनतेला उठण्याचे ('तुम भी उठो' - द्वितीयपुरुषी) आवाहन आहे. तर नंतर बनवलेल्या पाठभेदात 'कश्मीरच्या खोर्‍यातील जनता आता उठलेली आहे' असे दाखवणारे काहीतरी घुसडण्याच्या उत्साहातील घिसाडघाईत अर्धवटपणा झालेला आहे. असो व्हायचाच.

तसे पहायला गेले, तर तात्कालिक राजकीय मूडप्रमाणे बदलत गेलेले पाठभेद ही बाब या "राष्ट्र"गीताकरिता सामान्य आहे. अनेकदा असे घडलेले आहे.

असे सांगितले जाते, की इतकी वर्षे हे "राष्ट्र"गीत रेडियोवरून दररोज आणि त्याव्यतिरिक्त "अधिकृत" प्रसंगोप्रसंगी वारंवार वाजत आलेले असले, तरी जम्मू आणि कश्मीरचा भारताच्या नियंत्रणाखालील भूभाग हा इतक्या वर्षांनंतरसुद्धा अजूनही भारताच्याच नियंत्रणाखाली आहे, आणि पाकिस्तान कितीही मारे "आम्ही यंव करू नि त्यंव करू" म्हणाले, तरी इतक्या सहजासहजी तर सोडाच, पण तसाही तो आपणांस मिळणे हे शक्य नाही, हे तेथील आम जनतेला आता कळून चुकलेले आहे, आणि त्यामुळे तेथील जनतेत खाजगीमध्ये अनेकदा या "राष्ट्र"गीताचा उल्लेख हा अत्यंत कुत्सितपणे - आणि अत्यंत प्रॅक्टिकल अप्रोचासहित - 'वतन हमारा आधा कश्मीर' असा होतो. याची दुसरी बाजू म्हणजे, तेथील 'पॉवर्स-द्याट-बीं'च्या नुकतेच असे लक्षात आले, की 'आज़ाद कश्मीर' या नावाने आता आख्खे जम्मू आणि कश्मीर राज्य तर सोडाच, पण पाकव्याप्त काश्मीरच्यासुद्धा काही मर्यादित भागालाच अनेक जणांकडून संबोधले नि ओळखले जाते; पक्षी, 'आमची भूमी म्हणजे आज़ाद कश्मीर' असे जाहीररीत्या म्हणणे आणि कडव्याकडव्याअखेरीस उगाळत राहणे म्हणजे (भले ही या "राष्ट्र"गीताच्या पहिल्याच कडव्यात 'जम्मू और कश्मीर हमारा' असे - एकदाच, आणि एकदाचे - म्हटलेले असले, तरीही) जम्मू आणि कश्मीर राज्याच्या उर्वरित भागा(वरील दाव्या)वर आपण होऊन (किशन)गंगोदक (किंवा, त्यांच्या भाषेतील 'नीलम'चे उदक) सोडण्यासारखे** होईल. या कारणास्तव या "राष्ट्र"गीताच्या धृपदाचे बोल अलीकडेच "अधिकृत"रीत्या बदलून 'वतन हमारा सारा कश्मीर' असे करण्यात आल्याबद्दल वाचनात आलेले आहे. (त्याच तर्काने जायचे झाले, तर मग तरीही, ते बोल अशा प्रकारे बदलण्यानेसुद्धा, जम्मू आणि लद्दाख भागावरील दावा सोडून दिल्यासारखेच होते, हे संबंधित 'पॉवर्स-द्याट-बीं'च्या कोणी लक्षात आणून दिलेले दिसत नाही. नसो बापडे. आपणांस (प्रथमपुरुषी अनेकवचनी) काय त्याचे!

** (अतिअवांतर:) या 'दावा सोडणे' प्रकरणावरून आठवले. आमच्या या उपरोल्लेखित कॉलेजकाळातीलच गोष्ट आहे. एकदा याच पाकव्याप्त कश्मिरात एक 'मोठा अपघात' झाला. काय कोठेतरी दरीत बस कोसळली, पंचवीसएक माणसे मेली, वगैरे. याची बातमी 'रेडियो पाकिस्तान'वर तसेच 'आकाशवाणी'वरसुद्धा आली. 'रेडियो पाकिस्तान'च्या बातमीप्रमाणे ही घटना 'आज़ाद कश्मीर'मध्ये घडली. (तो जनरल झियांचा काळ होता, आणि त्या वेळी पाकिस्तानची अधिकृत भूमिका 'कश्मीर हा एक वादग्रस्त प्रदेश असून, पाकिस्तानचा कश्मिरींना केवळ नैतिक पाठिंबा आहे' अशी होती. पाकव्याप्त कश्मीरचा उल्लेख अधिकृतरीत्या कधीही 'पाकिस्तान' अथवा 'पाकिस्तानचा भाग' असा केला जात नसे; तशी खबरदारी घेतली जात असे. पाकव्याप्त कश्मीरचा उल्लेख हा 'आज़ाद कश्मीर' असा, तर जम्मू आणि कश्मीरच्या भारताच्या नियंत्रणाखालील भागाचा उल्लेख हा 'Occupied Jammu and Kashmir' असा केला जात असे. 'आज़ाद कश्मीर' हा एक स्वतंत्र प्रदेश आहे, अशी अधिकृत बतावणी असे.) याउलट, 'आकाशवाणी'वरील बातमीपत्रात ही घटना 'पाकिस्तानमध्ये घडली' असे बेधडकपणे सांगण्यात आले. झाले. तडक थेट 'आकाशवाणी'च्या 'डायरेक्टर न्यूज़ सर्विसेस'ला पत्र लिहिले, की 'रेडियो पाकिस्तान'नेसुद्धा सदर घटना 'आज़ाद कश्मीर'मध्ये घडल्याचे सांगितले आहे, 'पाकिस्तान'मध्ये घडल्याचा दावा केलेला नाही; तर तुमच्या बातमीपत्राप्रमाणे ही घटना 'पाकिस्तान'मध्ये घडली असे तुम्ही म्हणता; म्हणजे अलीकडे भारताने पाकव्याप्त कश्मीरवरील दावा अधिकृतरीत्या सोडून दिलेला आहे, किंवा कसे? पत्र पाठवले, आणि 'हे पत्र नक्की थेट कचर्‍याच्या पेटीत जाईल' या निर्धास्तीने (आणि 'कसा पंगा घेतला!' या असुरी आनंदाने) पुढे त्याबद्दल विसरूनही गेलो.

आश्चर्य म्हणजे, या पत्रास आकाशवाणीच्या डायरेक्टर न्यूज़ सर्विसेसच्या सचिवाकडून पोच अधिक उत्तर आले. 'आमच्या नजरचुकीमुळे ही बातमी चुकीच्या पद्धतीने प्रसारित झाली. परंतु ही चूक आमच्या त्वरित लक्षात येऊन पुढील बातमीपत्रांत ती सुधारली गेली. तरी आकाशवाणीच्या बातमीपत्रांत विशेष स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.' आता बोला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संगीत म्हणून कश्मीरचं राष्ट्रगीत आवडलं पण 'आजाद कश्मीर' म्हणताना जी कसरत केलेली आहे तिथे ते निसटल्यासारखं वाटलं. (आधा कश्मीर म्हणताना ओढाताण कमी होईल.) त्यामानाने धीम्या गतीत ऐकायला कसरत एवढी जाणवली नाही. शिवाय काश्मीरी गीत हिंदी (किंवा उर्दू) भाषेत का असावं असाही प्रश्न पडला.

'न'वी बाजू यांनी खालच्या प्रतिसादात ज्या राष्ट्रगीताचा उल्लेख केला आहे ते राष्ट्रगीत, त्या देशात दीर्घकालासाठी रहाणार असाल तर, संपूर्ण रटल्याशिवाय जाता येऊ नये असा नियम करण्याची आवश्यकता आहे. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण केवढेतरी विनोद संदर्भाशिवाय हुकतात.

अवांतरः गाण्याचं, गीताचं, कवितेचं धृपद असतं का ध्रुवपद?
अतिअवांतरः "'न'वी बाजू यांनी बालपणातही तपशीलात झालेल्या गफलतीला माफ केले नाही", अशी गोष्ट पुढच्या काळात मुलं सांगू शकतील. 'न'व्या जयंती किंवा 'न'व्या पुण्यतिथीच्या भाषणांसाठी असे मुद्दे काढून दिल्याबद्दल पुढची पिढी 'न'वी बाजू यांची सदैव ऋणी असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संगीत म्हणून कश्मीरचं राष्ट्रगीत आवडलं

करेक्शन. 'आज़ाद कश्मीर'चे म्हणा! (किंवा 'तथाकथित आज़ाद कश्मीर'चे म्हणा हवे तर.) संदर्भ बदलतो.

शिवाय काश्मीरी गीत हिंदी (किंवा उर्दू) भाषेत का असावं असाही प्रश्न पडला.

भारताचे जम्मू आणि कश्मीर राज्य, तसेच तथाकथित 'आज़ाद कश्मीर' दोहोंचीही राजभाषा/अधिकृत भाषा उर्दू आहे. (कश्मीरी, डोगरी अथवा अन्य कोणती नव्हे.)

(स्वातंत्र्यपूर्व कश्मीर संस्थानाची राज्यकारभाराची अधिकृत भाषासुद्धा बहुधा उर्दूच असावी, असे वाटते. खातरजमा करून घ्यावी लागेल.)

गंमत म्हणजे, स्वतंत्र भारतात कश्मीरी भाषेला स्केड्यूल्ड भाषेचा दर्जा आहे. (आणि म्हणूनच भारतीय चलनी नोटांवर चलनाची किंमत लिहिण्याच्या भाषांमध्ये ती आढळते.) खुद्द जम्मू आणि कश्मीर राज्यात मात्र तिला राजभाषेचा दर्जा नाही.

(बादवे जम्मू आणि कश्मीर हा/हे बहुभाषिक प्रदेश/राज्य आहे.)

गाण्याचं, गीताचं, कवितेचं धृपद असतं का ध्रुवपद?

माझ्या कल्पनेप्रमाणे दोन्ही पाठभेद योग्य आहेत. (कधीकाळी मोल्सवर्थात तपासल्याचे अंधुकसे आठवते. पुन्हा एकदा तपासून खातरजमा करून घ्यावी लागेल.)

"'न'वी बाजू यांनी बालपणातही तपशीलात झालेल्या गफलतीला माफ केले नाही"

"बालपणात"???

प्रस्तुत घटनेच्या वेळी माझे वय सुमारे वीसच्या आसपास असावे. (अधिक/उणे एखाददुसरे वर्ष. म्हणजे दुसरे बालपण निश्चितच नव्हे. आणि पहिले बालपण नसण्याबद्दल खात्री नसली, तरी तसा दाट संशय आहे.)

'न'व्या जयंती किंवा 'न'व्या पुण्यतिथीच्या भाषणांसाठी असे मुद्दे काढून दिल्याबद्दल पुढची पिढी 'न'वी बाजू यांची सदैव ऋणी असेल.

आमच्या भावी पुण्यतिथीची पूर्वतयारी आमच्या हयातीतच सुरू झाल्याचे पाहून गहिवरलो.

I look forward to posterity looking back at me with gratitude.

आभारी आहे.

बाकी,

न'वी बाजू यांनी खालच्या प्रतिसादात ज्या राष्ट्रगीताचा उल्लेख केला आहे ते राष्ट्रगीत, त्या देशात दीर्घकालासाठी रहाणार असाल तर, संपूर्ण रटल्याशिवाय जाता येऊ नये असा नियम करण्याची आवश्यकता आहे. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण केवढेतरी विनोद संदर्भाशिवाय हुकतात.

दृष्टिक्षेपात येणार्‍या भविष्यकाळात तरी माझा त्या देशात दीर्घकालीन अथवा अल्पकालीन वास्तव्यासाठी जाण्याचा विचार नाही, किंवा तशी शक्यताही दिसत नाही, परंतु ते एक असो. एकंदरीत आपल्या म्हणण्याचा रोख समजला नाही. कृपया स्पष्ट करू शकाल काय?

आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"बालपणात"???
प्रस्तुत घटनेच्या वेळी माझे वय सुमारे वीसच्या आसपास असावे.

तपशीलातल्या गफलती शोधून काढण्याच्या तुमच्या या सवयीचा आम्हांस अभिमान वाटतो. Tongue

एकंदरीत आपल्या म्हणण्याचा रोख समजला नाही. कृपया स्पष्ट करू शकाल काय?

स्वानुभवाचे बोल, दुसरं काय!
प्रस्तुत राष्ट्रगीत माहित नसल्यामुळे इब्लिस ब्रिटीश सहकर्मचार्‍यांनी केलेले अनेक विनोद स्पष्टीकरणाशिवाय माझ्या डोक्यावरून जायचे. आणि विनोदाचं स्पष्टीकरण द्यायला लागण्याचं दु:ख वेगळं का लिहीण्याची आवश्यकता आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारताचं राष्ट्रगीत लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि ते अतिशय सुंदर प्रकारे कंपोझ केलं गेलंय या कारणांमुळे भारताचं राष्ट्रगीत आवडतंच. खूप वर्षांपूर्वी 'जनगणमन' बॅगपाइपवर वाजताना ऐकलं होतं आणि तेव्हा जे काही दाटून आलं होतं मनात ते मी शब्दात नाही माडू शकत.

माझ्या राष्ट्राचे राष्ट्रगीत (त्याचे बोल, चाल वगैरे), मी माझ्या राष्ट्रात लहानाचा मोठा न झाल्याने, दुर्दैवाने मला फारसे परिचित नाही. त्यामुळे 'बाय डिफॉल्ट आपले' म्हणून त्याबद्दल मला (बा. डि.) आपुलकी जरी वाटत असली, (फारसे परिचित नसल्याने) ते 'मला आवडते' असे मी नाही म्हणू शकत. (आणि त्याचमुळे, कदाचित तूनळीवर त्याच्या असंख्य आवृत्ती सापडूही शकत असल्या, तरी त्यांपैकी एकही आवृत्ती येथे मी नाही मांडू शकत. क्षमस्व.)

पण मला या व्यतिरिक्त आवडणारं राष्ट्रगीत आहे ते पाकिस्तानचे. ...

पण त्या ऐवजी मला आवडणारे दुसरे एक राष्ट्रगीत येथे मी नक्कीच डकवू शकतो. "माझ्या राष्ट्रा"चे राष्ट्रगीत नसले, तरी कोणे एके काळी माझ्या राष्ट्राच्या भूमीत (कदाचित काही पाठभेदासहित) वाजणारे आणि म्हणून कधी येथे सुपरिचित असलेले (आणि, फॉर द्याट म्याटर, कधी काळी तुमच्याही राष्ट्राच्या भूमीत - पुन्हा, किंचित पाठभेदासहित - वाजणारे आणि म्हणून तेव्हा तेथेही अतिपरिचित असलेले) एक राष्ट्रगीत!

येथे ऐका!

(अवांतर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रीलंकन आणि पोलिश राष्ट्रगीत आवडलं ... श्रीलंकन राष्ट्रगीताचं संगीत अर्थातच भारतीय संगीताशी साधर्म्य सांगणारं असल्यामुळे असेल. पोलिश राष्ट्रगीताबद्दल असं काही असण्याची शक्यता नाही. पण सवयीने बहुदा दोब्रोवस्की आणि पोल्स्की या शब्दांचं यमक आवडलं. एकेकाळच्या पोलिश घरमित्राला छळायला आम्ही बाकीचे जोरात 'पोल्स्की पोल्स्की' असं ओरडत त्याच्या भोवती मार्च करायचो. या संदर्भामुळेही March march Dabrowski अशा ओळी असणारं राष्ट्रगीत आवडलं असण्याची शक्यता आहे. शिवाय या मित्रामुळे पोलंडचे तुकडे होणं वगैरे इतिहासही विकीपिडीयाशिवाय थोडा माहित आहे. तेव्हा त्याचा अर्थ कदाचित थोडा अधिक भावला असेल.

पाकीस्तानच्या राष्ट्रगीतातले काही तुकडे 'याद किया दिल ने कहां हो तुम' आणि 'ओम जय जगदीश हरे'ची (ष्यांडर चाल) आठवण करून देतात. काय भयंकर मिश्रण आहे! राष्ट्रगीत आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारताच्या राष्ट्रगीताला युनेस्कोने पहिल्या क्रमांकाचं राष्ट्रगीत निवडल्याची अफवा इंटरनेटवर (इमेल्, फेसबुक) अजूनही फिरत असते. त्यासंदर्भात अधिक माहिती देणारे दुवे:
दुवा १, दुवा २

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्वप्रथम अन्य देशांची राष्ट्रगीते मोठ्या आवडीने ऐकणार्‍या तर्कतीर्थांच्या आवडीला प्रणाम.

अन्य कोणी भारत व त्यातल्या त्यात पाकीस्तान वगळता इतर देशाचे ऐकल्याचे वर प्रतिसादात दिसले नाही त्यामुळे ह्या अनोख्या छंदाबद्दल खरच आदर वाटला.

ही आवड कशी निर्माण झाली, चाल व संगीत ह्या पलीकडे राष्ट्रगीत आवडण्यामागचे नक्की अजुन काही निकष काय यावर सविस्तर विवेचन आल्यास धागा माहीतीपूर्ण होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहजराव,

निसर्गाने मला अमर्याद कुतूहल दिले आहे. देशोदेशींचे मू्ळ संगीत ऐकायचे ही आवड त्याचाच एक भाग आहे. १९७७ मी नववीत असताना साली आम्ही कोथरुड्ला रहायला आलो आणि त्याच वेळेला शाळेत रेडिओ बनवला होता. त्या रेडिओवर गच्चीत वेगवेगळ्या चित्रविचित्र अ‍ॅन्टेना लावून "नवीन" काही ऐकायला सापडतय का याचे प्रयोग चालायचे. मी तयार केलेल्या रेडिओवर प्रयोगकरून कंटाळा आल्यावर हळुच मोहोरा माझ्या वडिलांच्या सोनी ट्रान्झिस्टरकडे वळला (त्यासाठी मारही खाल्ला). कोथरूड तेव्हा शहराच्या बाहेर असल्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टर्बन्स नसायचा. त्यात माझ्या "संशोधित" अ‍ॅन्टेना जोडल्यावर रेडिओचे रिसेप्शन आणखी सुधारयचे. असंख्य अनोळखी रेडिओ प्रसारणे त्यावेळी पकडता यायची. त्यात रेडिओ मॉस्को आणि रेडिओ श्रीलंकाचा एक दिवस शोध लागला. रेडिओ श्रीलंका सापडले तेव्हा श्रीलंकेचे हे राष्ट्रगीत ऐकायला मिळाले. ते खूप आवडले पण. नंतर असे लक्षात आले की एका विशिष्ट वेळेला ते वाजवले जाते, ते मी जेव्हा जमेल तेव्हा रेडिओ गच्चीत नेउन त्यावेळेला स्टेशन पकडुन ऐकत असे.

पुढे कालांतराने आमच्या घराभोवती सिमेंटची जंगले उभी राहीली आणि रेडिओ रिसेप्शनवर पण परिणाम झाला आणि हे राष्ट्रगीत ऐकायला मिळणे बंद झाले. आणि मी त्यामुळे तळमळायला लागलो. मी असा अनेक रचना ऐकून त्या परत मिळविण्यासाठी अनेक वर्षे तळमळलो आहे. मल्लिकार्जून मन्सूरांचा कामोद नट, भीमसेनजींचा दूर्गा, बिथोव्हेनची नववी सिम्फनी आणि श्रीलंकेचे राष्ट्रगीत, काकार्ल ऑर्फची "कार्मिना बुराना", ही काही वानगी दाखल उदाहरणे. आणि या सगळ्या "माझ्या" आवडी आहेत. इतर कुणामुळे मला या रचना आवडायला लागल्या नाहीत...

सुदैवाने माझ्यात आंधळे देशप्रेम नाही. सगळ्या सुंदर गोष्टी फकत भारतातच निर्माण होतात असा अनाठायी दूरभिमान पण नाही. यामुळेच इतर संस्कृतीमधल्या चांगल्या गोष्टीना दाद द्यायची मानसिकता तयार झाली असावी.

मला मेलडी आणि हार्मनी हे दोन्ही गुणधर्म असलेली राष्ट्रगीते आवडतात. श्रीलंकेच्या राष्ट्रगीतात मेलडी सुंदर आहे आणि भारतीय राष्ट्रगीतापेक्षा ती चांगली आणि उत्कट आहे. गमतीचा भाग म्हणजे तमिळ संस्कृतीशी भौगोलिक जवळिक असूनही कर्नाटक संगीताचा प्रभाव याच्या चालीवर नाही.

राष्ट्रगीत हे त्या त्या देशाच्या लोकसमूहाच्या राष्ट्रीयत्वाच्या भावना जागे करणारे असते. कधी त्या भावना शब्दामुळे जाग्या होतात (उदा वंदे मातरम) तर कधी शब्द आणि स्वरांच्या मिलाफाने. भाषा कळत नसल्याने या राष्ट्रगीतांची बलस्थाने शोधणे अवघड आहे पण संगीताच्या पातळीवर त्यातल्या उत्कटतेचा आनंद घेऊ शकतो हे काय थोडे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा!! हा माझाही आवडीचा विषय. माझ्या आवडीची काही राष्ट्रगीते:

इस्राएल. अगदी भव्य दिव्य वगैरे वाटते.

इराणचे जुने राष्ट्रगीत-इस्लामी क्रांतीच्या अगोदरचे. इस्लामिक रिपब्लिकचे गीत लै भंगार आहे. काही अंशी समजते आणि ऐकायलादेखील मस्त वाटते.

इजिप्त- अगदी खेळीमेळीचे वाटते.

वर उल्लेखिलेली राष्ट्रगीते आता लगेच ऐकतो. बाकी पाकड्यांचे गीत इतके खास नै वाटले मला तरी- बायस अस्णारेच नक्की Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं