माझे आकाशवाणी ऐकणे

आजकाल कायम अशी तक्रार ऐकू येते की माध्यमांच्या रेट्यामध्ये कोण बरे आकाशवाणी(अहो, असे काय करता, आपला रेडियो की!) ऐकते. त्याचे अजून एक नाव आहे-नभोवाणी. तर ह्या सोशल नेटवर्क, WhatsApp, हजारो दूरचित्रवाणी channelsच्या जमान्यात आकाशवाणीकडे लोक कसे वळतील बरे. आपल्यापैकी बरेचसे लोक प्रवास करताना, गेल्या काही वर्षात आलेली, FM channels ऐकत असतील नसतील, तेवढेच त्यांचे आकाशवाणी ऐकणे होते. मी गेली कित्येक वर्षे आकाशवाणी ऐकतो आहे. त्याबद्दल थोडेसे लिहावे म्हणून आज बसलो आहे. मला नक्की माहिती आहे आपल्यापैकी बरेच जण अजूनही ऐकत असतील, किंवा पूर्वी कधीतरी ऐकत होतात. अधून मधून आपण WhatsApp वर आकाशवाणीची धून असलेला मेसेज फिरत असतो, लोकांच्या मनात अजून ती आहे, नाही तर लोक असे स्मरणरंजनात रमले नसते.

नुकतीच पुणे आकाशवाणीला(All India Radio-AIR) ७५ वर्षे झाली. मला आठवते त्याप्रमाणे आमच्याकडे रेडियो आला तो १९८६च्या आसपास. त्या आधी मी आमच्या चाळीत शेजाऱ्यांकडे अधूनमधून बातम्या, विविधभारती वरील मधुमालती हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम जाता येता ऐकत असे. मी प्रामुख्याने पुणे आकाशवाणी ऐकतो आहे. सकाळच्या सत्रात चिंतन, आपले आरोग्य, बातम्या सारखे कार्यक्रम, तसेच विविध भारती वरील सकाळी शास्त्रीय संगीत विषयाला वाहलेला हा आणि जुन्या हिंदी गाण्यांचा भुले बिसरे गीत हा कित्येक वर्षे सुरु असलेला कार्यक्रम ऐकत असे आणि आजही अधून मधून का होईना ऐकत असतो. कुठल्याही विषयाचे बंधन नाही, अतिशय आशयपूर्ण, माहितीपूर्ण असे विविध कार्यक्रम प्रत्येक आकाशवाणीवर वर्षी येत असतात. मराठी साहित्याशी निगडीत असलेले पुस्तक वाचनाचे कार्यक्रम, ज्यात कोसला, वंशवृक्ष सारख्या कादंबऱ्यांची तसेच प्रकाश संत यांच्या पुस्तकांवर आधारित शारदा संगीत आणि त्यातील लंपन ह्या मुलाची ओळख झाली. बऱ्याच वेळेला आकाशवाणीच्या खजिन्यातून निवडक कार्यक्रम पुन:प्रसारित करतात, त्यातही गेल्या पिढीतील कलाकार, व्यक्ती यांची ओळख होत राहते. दुपारचे कार्यक्रम अर्थातच जास्त ऐकले जात नाहीत, पण संध्याकाळचे, विशेषत: रात्रीचे कार्यक्रम जसे नभोनाट्य, आलाप सारखे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, हे देखील दर्जेदार असतात. विविधभारतीवरील रात्रीचा छायागीत हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम देखील कित्येक वर्ष चालू आहे. विविधभारती वरील महक सारखे हिंदी गाण्यांचे रसग्रहण करणारे मंगेश वाघमारे यांसारख्या निवेदाकांचे कार्यक्रम एक वेगळीचं अनुभूती देऊन जातात. भारताची, तसेच महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारे कार्यक्रम जसे संकृत भाषेवरील गीर्वाण भारती, संगीत नाटकांच्या इतिहासावरील कार्यक्रम, असे वैविध्य असते. सामाजिक बांधिलकी जपणारे, आणि त्या निमित्त वेगवेगळया व्यक्ती, संस्था यांचा परिचय करून देणारे कार्यक्रम देखील अतिशय उद्भोधक असतात. अश्याच एका कार्यक्रमात मला Schizophrenia Awareness Association या संस्थेची ओळख झाली आणि माझे त्यांच्याशी अनुबंध जुळले. ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी सादर केलेला १९६०च्या दशकात सादर केलेला गीतरामायण हा कार्यक्रम तर दंतकथा होवून बसला आहे. आजकाल प्रायोजित कार्यक्रमांचा देखील आकाशवाणीवर भडीमार असतो, त्यातही काही चांगले प्रायोजित कार्यक्रम आहेत, जसे, सध्या चालू असलेला डीएसके गप्पा. अश्या ह्या पुणे आकाशवाणीचा ब्लॉग देखील आहे.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेत वास्तव्य असताना, अमेरिकेतील रेडियो संस्कृती अनुभवायला मिळाली. अमेरिकेतील लोक त्यांच्या दिवसातील बराचसा काळ वाहन चालवण्यात घालवत असल्यामुळे, रेडियो मुख्यत: तेथे ऐकला जातो. प्रत्येक शहरात असलेली वेगवेगळी स्टेशन्स, ही रेडियो संस्कृती किती जोमात आहे हे दर्शवते. घरातही छोटासा रेडियो असतो, त्यात अलार्मची सोय असते. प्रत्येक घरात, हॉटेल्स मध्ये तो असतोच असतो. इंग्रजी गाण्यांचे इतके विविध प्रकार आहेत(उदा. rock, jazz, pop, country. परवा पुण्यात jazz संगीतावर एक कार्यक्रम होता, त्याबद्दल येथे लिहिले आहे) ज्यामुळे, तेथील रेडियो स्टेशन्सदेखील अश्या संगीत प्रकारांना वाहून गेलेली असतात. तेही मी त्यावेळेस खूप अनुभवले, आणि जेव्हा जेव्हा जातो तेव्हा ते नक्की अनुभवतो. तेथील रेडियोचा इतिहास देखील मोठा आणि मजेशीर आहे, त्याबद्दल कधीतरी, पण, एक गमतीची गोष्ट सांगतो-तेथील रेडियो स्टेशन्सची नावे K या अक्षराने सुरु होतात, उदा. KBAY, KQED etc. कॉलेजमध्ये असताना पुण्यात मला कधी कधी BBC radio सुद्धा ऐकू येई.

मी जेव्हा कर्नाटकात जातो, तेव्हा तेथील आकाशवाणी केंद्रे जरूर ऐकतो-जसे धारवाड, बंगळूरू. काही वर्षांपूर्वी योगायोगाने मला बंगळूरू मध्ये आकाशवाणीवर, कन्नड भाषेतील क्रिकेट समालोचन ऐकल्याला मिळाले. पुणे आकाशवाणीवर मराठीमधून मी ते ऐकले होते. आजकाल ते ऐकायला, त्याची मजा चाखायला, नाही मिळत. हिंदी मध्ये असते, पण त्याची इतकी मजा नाही येत. काही वर्षांपासून सुरु झालेल्या दूरचित्रवाणीच्या डीटूएच(direct to home, DTH) सोयीमुळे, आकाशवाणीचे काही प्रमुख केंद्रे दूरचित्रवाणीवर ऐकण्याची सोय झाली आहे. नुकतेच प्रसारभारतीने एक mobile app उपलब्ध करून दिले आहे, त्याच्यावर देखील काही केंद्रे ऐकायला मिळतात. प्रसारभारतीच्या वेबसाईटवर जुन्या कार्यक्रमांचा खजिना देखील आहे. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेला मन की बात थेट जनसंवादाचा कार्यक्रम देखील आकाशवाणीवरच आहे, त्याचे कारणच मुळी आहे की आकाशवाणी भारतात कानाकोपऱ्यात, सर्वदूर पोहचली आहे.

आपल्याकडे खासगी FM channel सुरु होवून देखील आता एक तप उलटले. प्रसारभारतीने देखील बरीचशी आकाशवाणी केंद्रे केली आहेत. पण अजून कित्येक राहिली आहेत-उदा. पुणे आकाशवाणीचे केंद्र. ते केल्यास श्रोत्यांच्या संख्येत आणखी वाढ होईल. प्रत्येक मोठ्या शहरात आता खासगी तसेच आकाशवाणीची मिळून ३-४ FM channel आहेत. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. जाता जाता, आणखी एक, काही दिवसांपूर्वी मी देखील असाच ऑफिसला जाताना एका private FM channel वर कार्यक्रम ऐकताना घडलेला किश्यावर, आणि तेथे असलेल्या radio jockey नावाच्या जमातीवर(!), एक ब्लॉग लिहिला होता. तो जरूर वाचा आणि मला ह्या ब्लॉग बद्दल आपला अभिप्राय कळवा.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फारच सुंदर आठवणी

विविध भारती चा दर्जा ए++++++++++++
असे दुसरे केंद्र अवघ्या भूतलावर नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

रेडियो सिलोन उपाख्य श्रीलंका ब्रॉडकाष्टिंग कॉर्पोरशन कोठल्या भावाने, मालक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आकाशवाणी ( मिडिअम वेव केंद्रं )आणि एफएम असा फरक न करता रेडिओ म्हणायला हवे.आता 102.8Mhz वर विविध भारती लागते.शिवाय टिव्हि चानेलचेही ऐकण्याचे चानेल्स सुरू होऊन दहा वर्षंतरी झाली.टिव्हीचा प्रसार नव्हता तेव्हा नभोनाट्य नावाचा प्रकार ऐढवला जायचा त्यात रविंद्र पिंगे ,शंना,कुडतरकर,जयवंत दळवी. वगैरे आघाडीवर होते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही वर्षांपूर्वी अमेरिकेत वास्तव्य असताना, अमेरिकेतील रेडियो संस्कृती अनुभवायला मिळाली. ...एक गमतीची गोष्ट सांगतो-तेथील रेडियो स्टेशन्सची नावे K या अक्षराने सुरु होतात, उदा. KBAY, KQED etc.

आपण बहुधा सं.सं.च्या पश्चिम भागात (क्यालिफोर्निया?) वास्तव्यास असावात, नि देशाच्या उर्वरित भागाशी आपला चुकूनसुद्धा संबंध आला नसावा, असे वाटते.

पश्चिमेकडील काही थोड्या राज्यांत रेडियो/टीव्ही स्थानकांची संकेताक्षरे 'के'ने सुरू होतात खरीच, परंतु अमेरिकन मुख्यभूमीवरील उर्वरित बहुतांश राज्यांत ती 'डब्ल्यू'ने सुरू होतात, असे निरीक्षण आहे. (यामागील कारणमीमांसा तूर्तास मला ठाऊक नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवाज की दुनिया के दोस्तों...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला टीव्ही आणि रेडिओ स्टेशन्सची कॉल लेटर्स "के" या अक्षराने सुरू होतात आणि नदीच्या पूर्वेकडच्या राज्यात "डब्ल्यू" ने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीबद्दल धन्यवाद.

यामागील कारणमीमांसेबद्दल काही कल्पना आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीमध्ये टाईप करायचा कंटाळा म्हणून कॉपी पेस्ट... याला काही अपवाद आहेत. उदा. WGN - Chicago, WSV - Atlanta, WWJ - Detroit.

In 1912, several countries attended a conference centered on the subject of “International Radiotelegraphs.” One of the biggest things to come out of this gathering was the assignment of certain letters to certain countries, to identify their radio and television signals – America was given W, K, N, and A (fun fact: Canada got ‘C’ and Mexico got ‘X’).

While N and A were chosen for American military radio stations, W and K were designated specifically for commercial use. Stations were allowed to choose the letters that followed the K or the W, and the combination was allowed to be three or four letters in length.

In 1928, the Federal Radio Commission decided on a few rules that remain in effect to this day:

all radio/TV call names were required to be four letters in length
stations east of the Mississippi River were required to start their call names with ‘W’
stations west of the Mississippi River were required to start their call names with ‘K’

Existing stations and their call names were allowed to evade the new rules but most eventually decided to fall in line, during the intervening years.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहज गुगल करता हे सापडले:

http://earlyradiohistory.us/kwtrivia.htm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

आकाशवाणी { आणि आताचे दूरदर्शन ,एकूण माहिती आणि नभोवाणी केंद्र } बद्दल सर्वात वाइट गोष्ट म्हणजे विस्कळीतपणा कधीही कार्यक्रम आगावू जाहिर करत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0