‪सुटलेल्या पोटाची कहाणी‬ (भाग १)

-------------
भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५
-------------
ही सगळी कहाणी सुरु झाली दिवाळी पासून . मला कल्पनाच नव्हती की मी या कहाणीचा हिरो आहे म्हणून. म्हणून आधी सगळे अनुभव टिपून ठेवले नव्हते. त्यामुळे आता जसे तुकड्या तुकड्याने आठवतायत तसे लिहितो. जर दोन तुकड्या मधलं अंतर जास्त वाटलं तर खुशाल समजा की चाळीशीच्या उंबरठ्यावर असल्याने मध्ये मध्ये येणाऱ्या विरक्तीच्या झटक्याने, मी या सर्व उपद्व्यापातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असीन.
---------------
हा तर मी काय म्हणत होतो. २०१५ ची दिवाळी आली. ऑफिस मधल्या मुलींनी ऑफिस सजवायचा घाट घातला. त्यांचा उत्साह पाहून मी देखील हो म्हटलं. पोरींनी छान सजवलं ऑफिस. मी पण खूष झालो. त्यांच्या कामगिरीचे फोटो बिटो काढले आणि मग सरांबरोबर फोटो काढूया अशी कल्पना एकीच्या सुपीक डोक्यातून निघाली. (डोके नेहमी सुपीकच का असते कुणास ठावूक? एकही नापीक, दुष्काळी, गेला बाजार कोरडवाहू वगैरे का नसावे ? असो इथे कंस थांबवतो, उगाच तुम्हाला माझ्या डोक्याला कुठली विशेषणे द्यायची त्याची यादी मीच करून द्यायला नको) दिवाळीच्या आनंदाच्या भरात मी देखील या कल्पनेला हो म्हणून, फोटो काढायला मागे उभ्या असलेल्या या मुलींसमोर बसलो. आणि घात झाला. “जे न देखे रवी ते देखे कवी”, च्या चालीवर मला नवीन साक्षात्कार झाला. "जे न दाखवी आरसा ते ठळकपणे दाखवी कँमेरा फोनचा".

इतके दिवस माझ्या नाकाखाली, माझ्या नकळत, सुगरण बायकोने (ती इथे आंतरजालावर आहे. चांगली active आहे. त्यामुळे ती सुगरण आहे इतकंच सत्य मी उघड करू शकतो) बनवलेल्या आणि अंमळ जास्तच आवडीने खालेल्ल्या सर्व अन्नामुळे, मी कमावलेल्या आणि एकही गोष्ट वाया न घालवण्याच्या मध्यमवर्गीय मानसिकतेने वाचवून ठेवलेल्या कँलरीज, चरबीच्या रूपाने माझ्या मूळच्या सपाट पोटावर घेराव देऊन बसल्या होत्या. पोरी फोटो बघून खूष झाल्या. त्यांच्या खुशीचे कारण त्यांचे छान आलेले फोटो की सरांपेक्षा आपण कित्ती बारीक आहोत याचा स्क्रीनवर दिसणारा पुरावा होता, हे मला अजून कळले नाही. आणि मग सुपीक डोक्याच्या मुलीच्या डोक्यातून अजून एक पीक निघाले की ऑफिस च्या whatsapp ग्रुप ला हा फोटो डी पी म्हणून ठेवायचा. मी कसनुसा हसत होकार दिला. झुक्या बाबाने whatsapp घेतल्यावर डी पी क्रॉप करायची सोय काढली नाही म्हणून त्याचे आभार मानत केवळ हसरा चेहरा दिसेल इतपत फोटो ठेवून बाकीचा अनावश्यक सत्याचा भाग कापून, ऑफिस मध्ये दिवाळी साजरी केली.

घरी यंदा बायकोने फराळाचे वेगवेगळे १२ पदार्थ केलेले असल्याने आणि मी आज्ञाधारक नवरा असल्याने गपचूप सर्व पदार्थ खावेच लागले. त्यात पुन्हा आमच्या सोसायटीतले शेजारी अजूनही फराळ देण्याघेण्याच्या गतकालीन सवयी मोडायला तयार नसल्याने, पदार्थांची संख्या वाढली नसली तरी खाण्याचे प्रमाण वाढले. मी डी पी त लपवलेल्या पोटाचा विचार करीत दिवाळीचा फराळ हाणत होतो.

-------------
भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५
-------------

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile अजून मोठे भाग लिहा की.. हा छाने

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पूर्वप्रकाशित आहे काय? वाचल्यासारखी वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन तीन ठिकाणी आहे. निर्गुणी भजने आठवड्याला एकंच टाकता येत आहेत. त्यामुळे मागील काही लेखन इथे टाकतो आहे. ऐसी वर पूर्वप्रसिद्ध लेखन चालणार नसेल तर थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टाका टाका. मस्त आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आनंदा ह्याचीच वाट पहात होते आता परत पाणीपुरीवर चर्चा रंगेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

पाणीपुरी का बरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला पाणीपुरी आवडते … आणि मी जसा ती कुठेही हादडतो तसाच मी तिला कुठल्याही लेखात घुसडतो हे अवंतीला माहित आहे.… निर्गुणी भजनात अजून मला पाणीपुरीचा उल्लेख करता आला नाही…. पण यात येईल हे तिला माहीत असल्याने अवंती तसे बोलते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाणीपुरी आणि निर्गुणी भजने यातले एक निवडायचा पर्याय तुम्हाला दिला तर तुम्ही काय निवडाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बहुतेक…. दोन्ही कोथिंबीर, पालेमेथी, किंवा गवार वगैरे नसल्याने दोन्ही निवडता येत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाण्ण!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाण्ण्ण्ण तेजायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो मिथुन आहेत ते कोणाला शब्दात हार जाणारच नाहीत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरुत्तर करणारे उत्तर. मेंदुअत फीड करु ठेवण्यात आले आहे. कधी वेळ पडली कुठे तर वापरण्यात येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चक्क अनुरावांना निरुत्तर करणारे उत्तर!!!! ऐसीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी वगैरे लिहिला पाहिजे हा प्रसंग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी लगेच कबुल करते रे बॅट्या. चांगल्याला चांगले म्हणते. पण फाल्तु गोष्टींना खोटे खोटे चांगले म्हणत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा तुझ्याकडुन शिकण्यासारखा गुण आहे. हे मला कधीही जमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेंव्हा कधी वापराल, तेंव्हा फक्त मनात माझी आठवण काढा… किंवा ते कठीण असल्यास, "दुवा मे याद रखना". आणि हो निर्प्रश्न करणारे उत्तर असं म्हणायचं होतं का तुम्हाला ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवरा! कोणीतरी यांना आवरा. ROFL कोणती कॉफी पिता तुम्ही भाऊ? मला फार गरज है.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी चहा पितो.… तो पण दिवसातून दोनदा… तो पण कटिंग …. तो पण ऑफिसच्या पैशाने

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई ग्ग!! Smile इतकं डिटेल्ड उत्तर आता मोरे तुमचा पुलं झालाय. तुम्ही काहीही उत्तर द्या फिस्सकन हसूच येतं ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कोणीतरी विचारले होते - TRUST, RESPECT, LOVE यातील काय निवडशील? मी भोळेपणने प्रचंड विचारांती एकच निवडलं. मग मी त्या व्यक्तीला विचारलं तू सांग आता. ती व्यक्ती म्हणाली तीन्ही. बस्स कधीच एक उत्तर सांगीतले नाही.
तेव्हा काल्पनिक प्रश्नातही, काही लोक फसवतात, काही कोकरासारखे फसतात. ROFL
तेव्हा मोरे जी दणकुन सांगा - मल निर्गुण भजन ऐकत पापु खायला आवडेल . हाहाहा अपले पत्ते कधीच उघडे करायचे नाहीत. किंबहुना तडजोडच मुळी करायची नाही. तडजोडीने फायदा दुसर्‍याचा होतो पण त्याच व्यक्तीच्या लेखी त्याच तडजोडीची किंमत शून्य असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण जो व्यवसाय करतो त्यातले किती तरी शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यात येतात आणि त्यातील उदाहरणे देऊन आपण, आपल्याला सुचलेले विचार इतरांसमोर ठेवत असतो
आपण जो व्यवसाय करतो त्यातील किती तरी शब्द आपल्या नेहमीच्या बोलण्यात येतात उदा. हेच बघाना पाणीपुरीवाला असेल तर तो कस बोलणार तीखा, मीठा ,दु क्या ? मिक्स ? आपण कस सांगणार वो आलु जरा ज्यादा डालना भैय्या किंवा मुझे बस पानी होना असली मजा पानीमे ही है. आलु ही खाना था तो समोसा खा लेता. तर कबीर विणकर होते म्हणुन त्यांनी धंद्यातली भाषा घेतली. अजुन आपले ते मराठी सेंट नाही का फेमस आहेत ते कांदा मुळा भजी अवघी विठाई माझी. त्यांना कांदाभजी आवडत असे नाही पण मुळात ते संत नर्सरीचा बिझीनेस करत त्या मुळे त्यांची भाषा तशी होती.

आणि असही घुसडता येइल बघा
त्या दिवशी सकाळपासन उपाशी होतो. वणवण फिरत होतो. खिसा शंभरवेळा चाचपुन पाहीला दहाच रुपये फक्त. सांभाळण तर भाग होतच. बागेतल्या नळाला ५ तासात पन्नास वेळा तोंड लावुन बघितल एक थेंब बाहेर येइल तर शप्पथ. मग पुन्हा काहीबाही विचार डोक्यात येऊ लागले. भुक मेंदुवर हावी झाली होती. मग ठरवल एकदाच असेही निसंग च आहोत एकदा पुर्ण च होऊन जाउ. हिम्मत केली खिशातले जगातले शेवटचे दहा रुपये बाहेर काढले एकदा डोळे भरुन पाहुन घेतल त्याच्याकडे गांधीजी प्रेमाने दयाळुपणाने हसले जणु म्हणत होते जा बेटा जी ले अपनी जिंदगी काजोल सारखा धावत सुटलो. युपीचा रामलखन निघण्याच्याच बेतात होता हनुमानासारखा समोर उभा ठाकलो म्हणालो भय्या ये लो दस रुपये दे दो पानीपुरी सुक्की दो देना पडेगा पहले सुक्की दे दो. अगोदर सुक्की खाल्ली गुण येऊ लागला होता. मग गोड गोड गोड आणि शेवटी म्हटलो जला यार जला दे अब आखरी दे एक या मै रहुंगा या ये जलन रहेगी.
गांधीपेक्षाही जास्त करुण हसुन निर्विकार मनाने रामलखन ने शेवटची एकच तिखट पाण्यात बुडवुन पुरी दिली. त्याकडे क्षणभर बघितले आणि तोंड जणु विश्वरुप दाखवल्यासारख उघडुन तोंडात टाकली.
संसाराशी शेवटचा संबंध तुटला
तृप्तीशी शेवटचा संबंध सुटला
निसंग झालो तेव्हाच दुरवरुन एका भजनाचे बोल आदळले
ते होते उड जायेगा हंस अकेला
निर्घुण परीस्थीतीने निर्गुणी भजना च पार्श्वसंगीत निवडल्याने मी
निर्लज्जासारखा हसत सुटलो.
अस काहीतरी सेंटीटाइप जमु शकल असत
घुसडता येईल हो मोरे तुम्हाला तुमच पाणीपुरी प्रेम अस्सल नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय हे!!! कहर केलात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख मारवाजी, उत्कृष्ट विडंबन. निर्गुणी भजनांवरील माझ्या शेवटच्या लेखातील पहिल्या परिच्छेदाचा इतका सुंदर वापर … दाद द्यावीच लागेल … Take a bow sir / madam .

पण त्याच लेखात मी ज्या पहिल्या कडव्याबद्दल बोललो आहे त्याबद्दल कबीरजींची आणि सर्व कबीर भक्तांची माफी मागून मी असे सांगू इच्छीतो की,

पहिले आए, आए आए, पहिले आए, नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो जी |
सब घट पूरण पूर रह्या है, अलख पुरुष निर्बानी हो जी ll 1 ll

हे कडवे पाणीपुरी खाणारा माझ्यासारखा साधक खवैया आणि त्याचा नेहमीचा भैय्या यांच्यातील अद्वैताचे संक्षिप्त वर्णन आहे.

पहिले आए, आए आए, पहिले आए, म्हणजे पहिले खवैयाला पाणीपुरी खाण्याची इच्छा होते आणि तो त्या अनावर अनामिक ओढीने ठेल्याकडे खेचला जातो आणि भैयासमोर जाऊन उभा रहातो.

नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो जी | यात बिंदु म्हणजे पाणीपुरीची पुरी. नाद म्हणजे त्या स्टीलच्या माठात जेंव्हा भैया आपली पळी फिरवतो तेंव्हा होणारा आवाज. जमाया पानी पानी हो जी मध्ये पानी शब्द दोनदा आला आहे. म्हणजे इथे रचनाकार तिखट आणि गोड अश्या दोन्ही प्रकारच्या पाण्याबद्दल बोलत आहे ते जाणकार साधक लगेच ओळखतील.

सब घट पूरण पूर रह्या है, यात प्रत्येक पाणीपुरीच्या टाळूचा भाग हलक्या हाताने अलगद फोडून त्यात साधकाच्या तयारीला उमजून गरम किंवा थंड रगडा किंवा बुंदीचे पुरण टाकून त्याला खजुराच्या गोड पाण्याचा हलका हात लावून मग उरलेली मोकळी पोकळी, पुदिना, कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची आणि एव्हरेस्ट चा पाणीपुरी मसाला वापरून तयार केलेले तिखट पाणी पुरेपूर भरून ती साधकाच्या ताटलीत ठेवून पुढील पुरी तयार करण्याच्या मागे लागलेला पाणीपुरीवाला, रचनाकाराने रंगवला आहे असे मला वाटते.

तो त्या दुकानातून बाहेर कधी आपल्याला दृष्टीस पडत नाही म्हणजे इतरत्र तो कायम अदृश किंवा अलख असतो. तिथे कधी भैय्यी नसते, म्हणजे तो कायम पुरुष असतो. आणि नेहमीच्या साधक खवैयाला नुसतं बघून ह्या भैयाला कळतं की रगडा गरम, सिर्फ तीखा पानी, कांदा अलग से देना. त्यासाठी त्या साधक खवैयात आणि त्याच्या भैयात मुखावाटे वाणी वापरत संवादाची देवाण घेवाण करावी लागत नाही. कधी थांबायचे? पुढची प्लेट वाढवायची का? कधी पाणी द्यायचे? मसाला पुरी बटाट्याची की गरम रगड्याची? अश्या सारख्या प्रश्नांसाठी वाणी वापरली जात नाही. म्हणून तो निर्बानी पुरुष, असे त्याचे वर्णन केले असावे असे मला वाटते.

आता पहा पुन्हा एकदा पहिले कडवे वाचून… पहा मला लागलेला अर्थ सुसंगत वाटतोय का?

पहिले आए, आए आए, पहिले आए, नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो जी |
सब घट पूरण पूर रह्या है, अलख पुरुष निर्बानी हो जी ll 1 ll

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोघांनाही _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL पाणीपुरीच्या पुरीसारखी फुटले ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझाच प्रतिसाद पुन्हा बघुन ओशाळले-लो
नंतर तुमच्या प्रतिसादातल हे वाक्य वाचुन तर
… Take a bow sir / madam .
चक्क लाजले-लो
अय्या-यो
माझ्या त अस तुम्हाला नावापासुन ते इतर अस नेमक काय आढळल की तुम्हाला मी
मॅडम वाटले-लो ?
थोडासा-शी कन्फ्युजलेली-लो
मारवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आढळण्यासाठी आवश्यक ते निरीक्षण कमी पडले आहे. त्यामुळे मी तुमचे निरीक्षण करू इच्छितो. तोपर्यंत "डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका" किंवा तत्सम गाण्यांचा सराव केलात तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरीक्षण पूर्ण झालं …. तुम्ही माझे लाडके East India Company वाले मारवाजी आहात …. थोडा वेंधळा असल्याने गोंधळ झाला होता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या ब्लॉगवरती वाचले आहे.
____
परत वाचायला परत मजा आली. खूप छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी वाचलेले होते. मजा आली परत वाचताना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण खुसखुशीत आहे.

"अमेरिकन ब्युटी" या सिनेमातला एक प्रसंग आहे. प्रौढावस्थेतल्या केव्हिन स्पेसीने जॉबवर लाथ मारली आहे. (लाथ मारता मारता आपल्या बॉसला ब्लॅकमेल करून त्याची जिरवली आहे!) त्याचं एका अल्पवयीन मुलीवर - स्वतःच्या मुलीच्या मैत्रिणीवर - प्रेम जडलं आहे. आपल्या शेजारी राहणार्‍या गे जोडप्याला तो व्यायाम करताना बघतो नि "कुठला व्यायाम योग्य" असं विचारायला लागतो. तर ते विचारू लागतात की बुवा तुला वजन कमी करायचंय का फिटनेस वाढवायचाय का मसल डेव्हलप करायचेत - म्हणजे तसा व्यायाम सुचवायला. त्यावरचं केव्हिन स्पेसीचं उत्तर लयभारी आहे. "I don't care. I just want to look good naked!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मुलगी नसल्याचं दु:ख झालंय असं म्हटलं तर अभद्र तर दिसणार नाही ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलगी नसल्याचं दु:ख झालंय असं म्हटलं तर अभद्र तर दिसणार नाही ना?

किस्सा सिनेमातल्या प्रसंगाबद्दल, व्यक्तीरेखेच्या दृष्टिकोनाबद्दलचा आहे. कुणावरही सुचवलेली वैयक्तिक टिप्पणी नव्हे याची नोंद घ्यावी.

कळावे आपला,
निर्माता,
"वस्त्रहरण"
भद्रकाली प्रोडक्शन्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

बरे झाले नोंद घ्यायला सांगितलीत…. स्वतःचे डोळे नसल्याने इतरांकडून वाचून घेताना फार गडबड होते.

कळावे आपली व्यक्तिरेखा
धृतराष्ट्र
पक्षी: शामराव डोळस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धृतराष्ट्राला "दु:शला" नावाची मुलगी होती याची कृपया नोंद घेणेंत यावी.

कळावे,
कृष्णद्वैपायन तात्या सरपंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तरीच माका वाटला होता … ह्यांचा कुठेतरी लफडा हाय … सगळ्या काजू, कैरी आणि फणसाचा हिशेब कधी माका दिल्याच नाय वो यांनी … आत्ता माका कळला , कुठे गेल्यानीत माझो काजूगर आणि फणस

कळावे हा गाव वाल्यानू
सौ. शामराव डोळस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलगी नसल्याचं दु:ख झालंय असं म्हटलं तर अभद्र तर दिसणार नाही ना?

हाहाहा.
मी २३ एक वर्षाची असते वेळी एका मैत्रिणीचे सासरे फार फार प्रेमळ असल्याचे ध्यानी आले होते. प्रेमळपणाचा धसका बसल्याने, मी तिच्याकडे फिरकतच नसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कामातुराणां न भयं न लज्जा हे त्यांनी जास्तच मनावर घेतलेलं वाटतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही हो कामातुर वगैरे नव्हते. माइल्ड मध्यमवयीन फ्लर्टींग Wink आता त्यांची पोझिशन कळतेय ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संन्यास हे एक प्रकारचं मिशन समजायचं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

येस्स्स सब"मिशन" टू वृद्धावथेतील नाइलाज. हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेळेआधी घेतला की मिशन इम्पोसिबल समजावं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज ते इथे असते तर त्यांचा जीव सुखावला असता. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी पोट सुटलं आणि मग तुमच्यासकट बाकीचे सुटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धरणं ही मानवी क्रिया आहे पण सुटणं ही नैसर्गिक स्थिती आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढे साधे शब्द वाचून मनाचा बांध सुटला फुटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बांध नैसर्गिक असू द्या किंवा मानव निर्मित …सुटायच्या वेळी सुटतात आणि फुटायच्या वेळी फुटतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी बोगसपणा न सुचल्यामुळे लेखनमर्यादा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मोरे एक तुम्ही मिथुन सूर्य वाले आणि तिमा मिथुनेचा बुध वाले. दोघे क-ह-र आहात. देवा या संस्थळावर अधिकाधिक मिथुन येवोत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रौढ वयातल्या व्यक्तीचं आपल्या वाढलेल्या वजनाचं भान यावरून मी वर अमेरिकन ब्यूटीचा उल्लेख केलेला आहेच. दुसरा असा एक संदर्भही "अमेरिकन ब्यूटी"च्या "ब्लॅक कॉमेडी" या प्रकाराशी मिळता जुळता आहे.

उपमन्यू चतर्जी या भारतीय लेखकाची "वेट लॉस" ही कादंबरी. कादंबरीचा सिनॉप्सीस येणेप्रमाणें. :

Weight Loss is about the strange life (from age 11 to age 37) of a sexual deviant named Bhola, whose attitude to most of the people around him depends on their lust worthiness. Bhola’s tastes are not, to put it mildly, conventional. Sex is a form of depravity for him and he has fetishes about everyone from teachers to roadside sadhus to servants; he progresses from fantasizing about the portly family cook Gopinath to falling “madly in love” with a vegetable vendor and her husband. This last obsession spans the entire length of the book and most of Bhola’s life – he even ends up teaching at a college in an obscure hill-station hundreds of miles from his home because he wants to be near the couple. At various other stages in his life he gets expelled from school for defecating in a teacher’s office, participates in an inexpertly carried out circumcision (one of the book’s many manifestations of the “weight loss” motif).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अरे बापरे … मला हे black comedy च प्रकरण जमेल असं वाटत नाही, कारण माझं वजन काही अजून घटत नाही… जमल्यास थोडी heavy comedy करून बघीन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं heavy handed लेखन पाहता त्याचा प्रयत्न करा थोडा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.