चूड...

चूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा
बघता बघता वेढून टाकतील मला असं वाटलं..
माझाच घास घेवू बघण्याइतक्या उन्मत्त..
चोहीबाजूंनी..
अक्राळविक्राळ ज्वाळा...
त्याचा असह्य विरह एकदमच अंगावर आल्यासारख्या..
त्याच्यापर्यंत कधीच पोहचू न शकणारी माझी तळमळ
बाहेर आल्यासारख्या..
त्याच्या आत्ममग्न अनभिज्ञतेला माझ्या प्रेमाची दखल घ्यायला लावण्याच्या अट्टहासासारख्या..
आता व्यर्थ आहे या ज्वाळांच्या तडाख्यातून स्वतःला वाचवणं..
पण ही आग पुरती भस्मही करुन टाकत नाहीये मला..
बचावतेच आहे मी..
असह्य वेदनेत तळमळण्यासाठी..
रोज कणाकणाने मरण्यासाठी...
अजून आहेच बाकी माझं जळणं...
डेनेरस,
दरवेळी आगीतून वाचत राहणं बरं नाही बयो..
सारखी सारखी आपल्या स्वप्नांची अशी राख होत असताना आपणच फक्त मागं उरणं जीवघेणं असतं..
त्यापेक्षा जळून जावं आपल्या स्वप्नांबरोबर आपण..
स्वप्नांची वाट पहाणार्या पापण्या अश्रूंनी जेवढ्या जळतात तेवढ्या आगीने नाही...
मला विचार..
कालच रात्री त्याची सगळी स्वप्नं गोळा करुन
पेटवून आलेय मी मनाच्या स्मशानात...
चूड पेटवली आणि धडाडून उठल्या ज्वाळा...
--------------------

merakuchhsaman.blogspot.in

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

डेनेरसचे नाव टाकले नसते तर अजून चांगली झाली असती असे वाटले. पॉईंट ऑफ व्हयू बदलण्यासाठी वेगळी काहीतरी क्लुप्ती वापरायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लुप्ती नव्हतीच वापरायची. Actually असं सगळं वाटत असताना नजरेसमोर तेच आलं अचानक. आणि मग तिला टाळता पण येईना..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

प्रेम करतो तोच विरह देतो ना? मग प्रेम तेवढं हवं , विरह नको? ए नॉय चॉलबे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिसपे हम मर मिटे उसको पता भी नहीं,
क्या गिला हम करें वो बेवफा भी नहीं.. Wink

तो प्रेमही करत नाही आणि विरहही देत नाही. सगळे या निर्दय मनाचे खेळ... Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

Sad मी समजु शकते. पण त्या दु:खावर फक्त तुझा हक्क आहे. Life might give sorrow & still make love with life. Cherish the moods that pass through your mind. They are sacred & are only for you to savour.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile true that..

आता दुःखावर माझा हक्क आहे की माझ्यावर दुःखाचा, thats altogether a different research topic..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

ही कविता खूप आवडली - मला "तेरे खुशबु मे बसे खत मै जलाता कैसे" गाणे आठवले.

तेरे खुशबू में बसे खत मैं जलाता कैसे
प्यार में डूबे हुए खत मैं जलाता कैसे
तेरे हाथों के लिखे खत मैं जलाता कैसे
जिनको दुनिया की निगाहों से छुपाए रखा
जिनको इक उम्र कलेजे से लगाए रखा

_______

त्याचा असह्य विरह एकदमच अंगावर आल्यासारख्या..
त्याच्यापर्यंत कधीच पोहचू न शकणारी माझी तळमळ
बाहेर आल्यासारख्या..
त्याच्या आत्ममग्न अनभिज्ञतेला माझ्या प्रेमाची दखल घ्यायला लावण्याच्या अट्टहासासारख्या..
आता व्यर्थ आहे या ज्वाळांच्या तडाख्यातून स्वतःला वाचवणं..
पण ही आग पुरती भस्मही करुन टाकत नाहीये मला..
बचावतेच आहे मी..
असह्य वेदनेत तळमळण्यासाठी..

प्यार के घाट जो उतरते है
डूबते हैं न वो उभरते हैं
या ओळीही आठवल्या Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in

ग्रेट कविता! मानतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

merakuchhsaman.blogspot.in