भ्ऊलोक-गजूभ्ऊ

||गजूभ्ऊ||

अमरावतीच्या गजबजलेल्या इतवारा भाजी बाजारातून आमची मारुती वेगात धावत होती. गाडीचा पाठलाग आमचे वर्गशिक्षक भेंडे सर घोड्यावरून करत होते. अचानक समुद्र येतो तरी गाडी समुद्रावारूनही चालत राहते. मागावरच्या भेंडेसरांच्या घोड्यालाही पंख फुटतात( युनिकॉर्न रे बावा, युनिकॉर्न!). आज पुन्हा उशिरा वर्गात आल्यामुळे मार खाव लागणार याची खात्री आम्हाला ऎकमेकांच्या तोंडाकडे पाहून होते.....तोच...
भाज्जेssss लो आलू, बैंगन, कांदा, पत्ताकोबी ल्यो..
भाज्जेssss.....सकाळचा अलाराम वाजला, गजूभ्ऊ धडकला, मला जाग येते...
गजुभ्ऊ म्हणजे गणेश कॉलनीच्या बहुगुणी पाककला प्रेमी सुगरण बायकांना लाभलेले शारदेचे ठोक वरदान. सर्व मौसमी वा गैरमोसमी भाज्यांचे दर्शन व प्रसाद मिळण्याचे ऎकमेव श्रद्धास्थान.
हि वेळ असेल १९९६-९९ ची जेव्हा माझी १०वि-१२वि ची वर्षे सुरु होती. गजुभ्ऊ भाजीवाला रोज सकाळी आम्हाला जागं करायचा. त्याच्या हजेरीशिवाय तर कॉलनीची सकाळच पूर्णत्वाला जाऊ शकत नव्हती.
सकाळी गजुभ्ऊ जेव्हा हातगाडी घेऊन निघत होता तेव्हा लग्नासाठी तयार नवरदेवाचा मोठा भाऊच जाणवत होता. वाळवंटातल्या सूर्याचा तेज. स्नान पहाटेच आटपलेले . कपाळावर लाल टिक्का, अंगावर सदरा, कधी पांढरा बंगाली मनीला आणि पांढराच पैजामा. खांद्यावर पांढरा दुप्पट्टा, गळ्यात बालाजीचा तावीज आणि मनगटावर चांगापुरच्या हनुमानाचा लाल धागा. आखूड पण अंगाने भरदार. पायात मोचीगल्लीतून बनवून घेतलेल्या खास, स्वस्त पण टिकाऊ वहाणा. भ्ऊ ची हालत तशी ऎक नंबर पण आवाजाने गेला होता. त्याला पहिल्यांदा ऐकणाऱ्या कोणालाही हेच वाटेल की तीन-चार बालवाडीच्या मुली सामुदायीक प्रार्थना म्हणत आहेत . देवावर भयंकर श्रद्धा. दर शनिवारचा चांगपूर हनुमानाचा बेत ठरलेला परंतु सर्व देवांना मानत होता, कोणालाही रीकामा ठेवत नव्हता.
तशी या भागात भाजीवाल्यांची कमी नव्हती पण गजुभ्ऊ लोकप्रिय होता तो त्याच्या दिलदार आणि प्रामाणिक स्वभावामुळे. 'जिधर कि उधर' हि वृत्ती बाळगणारा पण कुठेही दाहक गरिबी दिसली की तिथे आपल्या मायेची फुंकर जरूर घालत असे. कधीकधी भिकाऱ्याला हातभर गांजर-टमाटे घे मामा/ घे मावशे अशी ओली हाक मारत सरळ देऊन देत असे. कधी गायीला पत्ताकोबी लावत असे; कधी स्वतःच गांजर-मुळा उचलून बडवत असे.
गजुभ्ऊ पोरांमध्ये लोकप्रिय होता तो त्याच्या आणखी ऎका गुणावरून. 'फेकाफेकीचे कौशल्य' त्याने कमालीचे जोपासले होते. त्याचा ऎकमेव दुर्गुण म्हणजे रात्री दारू पिउन 'सौम्य धान्द्ल्या' करणे.
आता सौम्य धान्द्ल्या म्हणजे काय? तर कोणतेच भांडण होऊ न देता ऎकॆकचा केलेला शाब्दिक उद्धार. गजुभ्ऊ आज बैठकीत येणार ही कॉलनीच्या पोट्टयानसाठी ऎक मोलाची परवणीच असायची. बैठकीत बसणार हे कळल्यावर पोरांच्या चेह-याचे भाव म्हणजे ऎखद्या हिट पिक्चरची तिकीट सकाळपासून टॉकिजवर लाईनीत लागूनही आता मिळणार नाही याची खात्री झाल्यावर अचानक हाती लागते, तसा फाल्गुनी उल्हास.
गजुभ्ऊ च्या बैठकीत हकीकतीच हकीकती...
"अबे क्या बोलू अब तेको? उस दिन मुंबई कि ट्रेनमॆ बैठाथान मै, वो कॉल आयथा ना मुंबई अंडरवर्ल्ड से मेको. रात का ऎखाद बजा होंगा, सब सो रेथे. मेरी भी आख लगीच थी की अचानक अवाज आया, मैने देखा तो दो-चार पोट्टे मुह ढके भाग रेथे. मैने गुप्ती निकालीना ! उनके पिछे लगा पर मंग ते पोट्टे येका टोयलेट मध्ये धसले. मंग राजा तुले तर माहित आय आपल काम, मी पन तिथं उभा झालो."
आम्ही या गोष्टीला कंटाळत आहे हे गजुभ्ऊला माहीत पडताच
"अबे ऐकून रायला काय? का कानात बहिरमची यात्रा भरली तुया?
"अरे ब्वॉयरे, गजुभ्ऊ, मंग काय झालं?"..कोणीतरी आपली हजेरी नोंदवली.
"मंग? मंग जसं त्यैन बाथरूमचं दार उघडलं."
"गजुभ्ऊ, गजुभ्ऊ ऎक मिनिट..धसले तर ते टोयलेट मध्ये होते अन निंगाले बाथरूम मधून, असं कसं झालं बावा?"
"अबे भाssss डवीच्या ऐकना पैले झलांड्या !! ".
"हं...मंग जसं त्यायीन बाथरूमच दार उघडलं,......"गजुभ्ऊ आप?!!!!!!", म्या म्हटल हव पन म्या तुम्हालेको नई पयचाना.
ते कई बोलले नई पन त्याईन ऎक फोन लावला, मोबाईल फोन मइत असनच तुम्हाले.
हेल्लो लष्कर-ए-तोयबा..भाई ट्रेनमॆ तो गजुभ्ऊ है, अब क्या करना?
तिकुनहि आवाज येत होता.
ठीक, ठीक रखता फिर म्हून याइनं फोन ठेवला.
अरे गजुभौ हमने ट्रेनमॆ बॉम्ब लगाये है. पता नही था कि आपभी इसी ट्रेन से सफर कर रहे ...कोई बात नाही, हम निकाल लेते.
मंग त्यायीनं बॉम्ब कहाडले...अबे दाखवलेनं मले.
मंग त्यायीच्यातल्या ऎकानं कॅमेरा कहाडला अन सगळेच मरमर करेनाssss सांगून काय राइलो बावा , सगळेच मरमर करे, काऊन? तबा मायासोबत फोटो कहाडायचा होता म्हून.
माये ऑटोग्राफ पन घेतले मंग"
ब्वॉयरे गजुभ्ऊ ! सई मराठीत केली का इंग्रजीत?
भोकाले इंग्रजीत!! मराठी नई सोडत आपन.
आतंकवादी होते सायचे पण त्यायीले समजलनं का गजुभ्ऊ ट्रेनमधे आय म्हून.. उतरले मंग ते घटकाभरानं बुलढान्याले .
पन आता हे कुठ-कुठ सांगाव? "
मनात आलं "मंग गजुभ्ऊ आता हे कितीवेळा ऐकाव?"
कॉलनीतले पोट्टे गजुभाऊला गजुभ्ऊ म्हणत.'भ्ऊ' म्हणजे गणेश कॉलनीने मराठी भाषेला प्रदान केलेल्या बहुतेक शब्दांपैकी ऎक आणि वैदर्भी डोक्याला 'उ' म्हणण्याची तशीच इतके घाई असते की ती 'उ', 'भ' च्या डोक्यात गचकन शिरते, म्हणून 'भाऊ' पेक्षा 'भ्ऊ' हीच रूपिका अंघोळ घातल्यासारखी वाटते.
आमची तेव्हा १०वि ची परीक्षा होती. मी, माझे मित्र बंटी आणि इंगोले जागरण करून अभ्यास करायचो. त्या जागरणात अभ्यास हा हेतू कधी होता असे आतापर्यंत मला पटले नाही (पटवून घेण्याचा प्रयत्न इतक्यातच सोडला). मात्र रात्रीबेरात्री शाला अंगावर पांघरून घराची दारं फांदून पूर्ण कॉलनी फिरायचो तेव्हा कधीकधी यांची बैठकाही दिसायची. कॉलनीतले मोठे पोट्टे आम्हाला 'चिलटं' म्हणून आदराने संबोधायचे.
आमची सहामाही परीक्षा आणि शारदोत्सव ऎकाच वेळी येत होते. शारदेमध्ये विविधं सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. असेच ऎकदा 'सूर्याची पिल्ले' नाटंक आलं होतं. कॉलनीतले पोट्टे ते पाहण्यासाठी स्टेजजवळ गुंता होऊन बसले होते. काही बालमंडळी झाडावर चढून नाटक बघत होती. त्यात पटवर्धनांचा निनाद सर्वात वरच्या फांदीवर बसला होता. घोळक्यात गजुभ्ऊ पण होते आणि अत्यंत प्रामाणिकपणे दात कोरत होते. अधून मधून शेक्सपियरच्या तोऱ्यात नाटकही पाहत होते....तोच
"वात्रटा, वर काय करतो बावळट?! आधी खाली उतर", ऎका व्यक्तीने निनादला हाक मारली
उत्तर याचे मात्र गजुभ्ऊनी दिले.
" ओ भ्ऊ त्याले कई म्हनू नका, आमचा मानूस आय तो. नाटक पा सरकं"
"तुमचा माणूस? अरे माझा मुलगा आहे तो"
"अरे! तुम्ही त्याचे बाबा आहे का?" गजुभ्ऊ धक्क्यात.
"मग आताच काय म्हंटलं मी?"
"अरे ब्वा उतर रे, तुये बाबा आले" म्हणून गजुभ्ऊ ने वर पाहिलं
"मी खाली उतरलो आहे गजुभ्ऊ."
असे विनाकारण दुसऱ्यांच्या संभाषणात तोंड मारायचा प्रकारही गजुभ्ऊ अधून मधून करत असे.
त्याच रात्री उशिरा सर्व कार्यक्रमाची आटपाआटप झाल्यावर बैठक सुरु झाली. आम्हीही आमच्या अभ्यासू जागरणाच्या मंतरलेल्या शाला पांघरून पुन्हा मैदानात आलो.
गजुभ्ऊ च्या बैठकीत ४ गेयर असायचे. दारू सुरु केल्यावर पहिल्या गेयर मध्ये शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न, दुसऱ्या गेयर मध्ये शुद्ध हिंदी बोलण्याचा प्रयत्न, तिसऱ्या गेयर मध्ये या दोन्ही भाषांवर अतिप्रसंग आणि चौथ्या गेयर वर एक्सिडेंट व्हायची भीती असायची. आता, एक्सिडेंट म्हणजे हाणामारी. त्या दिवशी मात्र चौथा गेयर पडलाच.
कोणीतरी गजुभ्ऊ ला म्हटले " भ्ऊ उद्या पालक स्वस्त होत आहे, उरल्या सुरल्या गड्ड्या आजच काढा"
"कई बोलता का बे, चाललो मी गड्ड्या कहाडायले" म्हणून गजुभ्ऊ निघाला. चालता चालता समोरच्या केमिकॅल फेकट्रीतून निघालेल्या ट्रकला मागून विनाकारणच हात देऊन थांबवायचा गाजुभ्ऊने प्रयत्न केला..."ऒय.... रुक्क !!"
ट्रकवाला ट्रकला थांबवून गजुभ्ऊ कडे रागाने पाहत होता
"ज्जा !!" म्हणून गजुभ्ऊ स्वतःच जाऊ लागला.
गजुभ्ऊची अद्याप मार खायची वेळ आली नव्हती पण तो बम्बाट पियुन होता.
रात्री ११ च्या सुमारास शेकोट्या पेटल्या, पोट्टयांच्या धान्द्ल्या सुरु झाल्या. आम्हीही फिरकान्डीला निघालो तोच...
भाज्जेssss म्हणून ऎकच हाक आली ..पाहतो तर काय? गजुभ्ऊचा पाठलाग शिजवे काका करत होते( शिजवे काका म्हणजे कॉलनीचा वाघ) आम्ही तिथून गायप झालो.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोट्टे " गजुभ्ऊ गेल्या काय गड्ड्या ?"
"आले तुम्ही मार खायले मा हातचा, कायले खोटं बोललेबे पालक स्वस्त झालं म्हून? पडली चढली सगळी दारू उतरवली राजेहो शिजवे काकानं, अन तुम्ही कुठे होते?"
"अरेभ्ऊ अभ्यास होतानं"
"हम्म, तं झालं असं, काका अन मी कडूच्या घरचे आवळे पाडत होतो रात्री १ वाजेपर्यंत. शिजवे काकाची अन आपली घटघट आहे, तुलेतं मइत आय " गाजुभ्ऊची फेकाफेकी सुरु झाली.
"बरं गजुभ्ऊ येतो मी " मी सटकलो
...आठवणी, आठवणी, आठवणी.

गजुभ्ऊ आज वांटेड आहे. मागल्या १०-१५ वर्षात दिसला नाही. मीही बंगलोर मध्ये आहे. पुढच्या अमरावतीच्या खेपित सापडला की कळवेन. 'गजुभ्ऊ' आवडल्यास वा नावडल्यास (नावडल्यांच्या घरात रोज कारल्याची बिनशिजली भाजी होवो) कळवा .
'भ्ऊलोक' मध्ये पुढे भेटू एका तुर्रम, राजनेताखूळ गुद्दुभ्ऊ यांना

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडली गोष्टं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भssऊ तू लितो बे चांगलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भौ आवडलं! अजुन लिहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तय. आवड्ले.
येउद्यात अजुन भऊ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेखन. खूप दिवसांनी ऐसीवर असं व्यक्तीचित्रण आलं. तेही गजूभ्ऊ नावाच्या पेताड, लंब्याचवड्या बाता मारणाऱ्या आडदांड माणसाचं. अजून लिहीत राहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0