अकुंच्या - पकुंच्या ....

आमची छकुली (आमची नात) आता पाच महिन्यांची होत आली आहे. तिच्या हिरड्या सळसळू लागल्या आहे, जे समोर दिसेल त्या वर तोंड मारायचे, तोंडात घालून चोखून बघायचे. मग स्वत:च्या पायाचा अंगठा का असेना. काल गम्मत म्हणून कारले तिच्या तोंडात दिले. थुर्रSS करत विचित्र तोंड बनविले आणि भोंगा पसरला. बहुतेक रडताना विचार करत असेल, आजोबा, काही दिवस थांबा, मला मोठी होऊ द्या, बघून घेईल तुम्हाला, काय समजता स्वत:ला.

च् च् च् करत तिला दोन्ही हातानी वर उचलले, तिच्या नाकाला आपले नाक रगडले. हा तिचा आवडता खेळ. आज मात्र तिने पटकन माझे नाक आपल्या तोंडात टाकले, सळसळत्या हिरड्यानींं जोरात चावा घेण्याचा प्रयत्न केले. छी! छी!छी! नाकुचा चावा घेते, गंदी बच्ची, तुझी आई सुद्धा अशीच करायची. बहुधा आमच्या लेकीने ऐकले, हसत हसत तिने विचारले, बाबा, खरोखरच! मी नाकु खायची?

लेकी कडे बघितले, क्षणात काळात मागे पोहचलो. दीड-एक वर्षाची असेल माझी मनी,... अकुंच्या- पकुंच्या पिकले पान कोण खातो? आSई. अकुंच्या - पकुंच्या सडके पान कोण खातो? बाबा. हट्ट, बाबा तर पान खातच नाही. तुला माहित आहे, मनी, गंदे बच्चे पान खातात, बाबा तर अच्छे बच्चे आहेत. तिच्या चेहर्यावर प्रश्न चिन्ह. मग मी हळूच म्हणायचो, माहित आहे मनी, सडके पान न तुझी नानी खाते. आईला सांगू नको, नाही तर तुझी आई माझी पिट्टी-पिट्टी करेल. तिला काही समजो न समजो, पिट्टी -पिट्टी शब्द मात्र चांगला समजायचा. ती जोरात हसायची.

मला अस शून्यात हरवलेले पाहून लेकीने दोन्ही हातानी माझे डोके आपल्या कुशीत घेतले. डोक्यावरून हात फिरविला. त्या स्पर्शात आईची माया जाणवली. लेकी किती लवकर मोठ्या होतात... आई बनतात... वाटले क्षणात लहान बाळ होऊन आईच्या कुशीत दडून जावे... पण या शरीराचे काय, लहानाचा मोठा झालो, आता केस हि पांढरे झालेले आहेत... पण अजूनही स्वत:ला छोटेसे बाळ समजणाऱ्या आतल्या जीवाला हे सत्य कोण सांगणार? काही क्षण असेच गेले.

आपल्या कडे कुणाचे लक्ष नाही पाहून, अं Sअूं SS अूं करून छकुलीने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. अ लेSS ले छकुली. सॉरी. चला आपण पुन्हा आजोबांचे नाकु खाऊ. तिला दोन्ही हातानी उचलले, नाकाला नाक घासले.... नाकु खाणार छकुली! चिमुकल्या छकुलीच्या चेहर्यावर हास्य पसरले, अगदी तिच्या आई सारखे....

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

माझ्या पिल्लाकरता मी पहील्या मदर्स डे ला "निळं तोंडातून साबणाचे फुगे काढणारं माकड" आणले होते. उन्हात ते सप्तरंगी फुगे तिला आवडायचे.
.
आम्ही सिद्धी विनायक, जुहू चौपाटीला बसने जायचो फक्त ती-मी. नवरा जहाजावर होता. पण ते दिवस फार अमूल्य होते.
.
एक पाय नाचिव रे गोविंदा, घागरीच्या(?) छंदा" , "अडगुलं - मडगुलं - सोन्याचं कडगुलं, रुप्याचा वाळा-तान्ह्या बाळा तीट लावा" - हे सोपस्कार झाले.
.
प्राण्यांचे लाकडी ठोकळे होते. सहाव्या की सातव्या महीन्यात तिला पांडा ओळखू तर यायचाच पण पांडा कुठे म्हटलं की ती तिकडे अडखळत का होइना, हात नेउन दाखवायची.
.
पिल्लू मोठं झालय आता आई लागत नाही. तिचे जे बालपण मी नोकरीनिमित्त मिस केले ते फार दु:ख देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घागरीच्या शब्दापुढे प्रश्नचिह्न टाकल्यामुळे तो शब्द बरोबर आहे का याची शंका आहे हे कळले. 'घागरीच्या' हा शब्द बरोबर आहे. घागरिया, घागर्‍या, घागरी म्हणजे घुंगुरवाळे. घुंगुर गुंफलेले वाळे. जुन्या मराठीत आणि सध्याच्या ग्रामीण मराठीत हा शब्द आजही वापरला जातो. 'आधीच नाचरी आणि त्यात पायात (बांधली) घागरी' ही म्हण प्रसिद्ध आहे. घागरीच्या छंदा म्हणजे घुंगुरांच्या तालावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहीतीबद्दल धन्यवाद राही. हे माहीत नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिरेजडित मुकुट, शोभतो बरा | रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया || - नेहमीची गणपति आरती. संस्कृत 'घर्घर' 'a girdle of small bells or tinkling ornaments worn by women.'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेकीच्या आठवणी छान लिहिल्या आहेत...

माझी सहा वर्षांची मुलगी डाउन सिंड्रोम चाइल्ड आहे...

बाकी सगळं जमतं, समजतं, बोलत नाही अजून...

शाळेत जाते...मस्ती करते...

घरी तीन मोबाइल...सगळे व्यवस्थित आपरेट करते...कुणी शिकवलं नाही...

वयाच्या 43व्या वर्षी झाली...माझी कायम रात्रपाळी...पोरगी झाल्या पासून रात्री तीन ला झोपलाे तरी सकाळी साडे सहाला तिच्यासोबत झोप उघडतेच...सहा वर्षे झालीत...

तिला मोठं होतं बघतांना, तिच्या सोबत खेळण्याचा आनंद वर्णनातीत आहे...

हा अनुभव बाप झाल्यानंतरच येतो म्हणा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

छान लिहिलय पटाईतकाका!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

असेच म्हणतो. एक नंबर मस्त लिहिलेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त लिहिलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रतिसादाबाबत सर्वांना धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानच लिहिलंय! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लिखाण आवडलं. ; मनाला भावलं.
"बापाला दूध पाजणाऱ्या मुली"ची ... "सायमन आणि पिरो" ह्यांची कथा आठवली
test
.
कथेबद्दल --
फार फार पूर्वीची गोष्ट आहे. रोमन काळातली. म्हणजे दिड दोन हजार वर्षं तरी नक्कीच जुनी. तिथं कुठल्याशा गैरसमजातून एका ज्येष्ठ नागरिकाला सजा फर्मावण्यात येते. सजा असते उपाशी ठेवून त्याला मारण्याची. (सक्तीचं आमरण उपोषण त्याच्यावर लादण्यात येतं, त्याला कैद करुन.)
त्याची मुलगी आयुष्याचे शेवटचेच काही दिवस शिल्लक राहिलेल्या वडलांना भेटायची परवानगी मागते. तिला ती मिळतेही.
ती रोज भेटायला जाउ लागते. भेटण्यापूर्वी रोमन राजाचे लोक तिची व्यवस्थित तपासणी करत. तिनं पित्यासाठी खायला काहीही आणलेलं नाही, ह्याची खात्री झाली की आत सोडत. पण मग हळुहळू जेलरला/तुरुंगाधिकाऱ्याला जाणवतं की कैदी उपाशी राहुन आतापावेतो मरायला हवा होता, किंवा निदान मरणासन्न व्हायला हवा होता. तेव्हा बारकाइनं तो त्या मुलीवर लक्ष ठेवू लागतो. तेव्हा समजतं ते हे की पित्याची ती अवस्था न बघवल्यानं मुलगी पित्यास गुपचुप स्तनपान करवते आहे.
वडलांबद्दलचं ते प्रेम , ती धडपड , ती करुणा बघुन मग तत्कालिन न्यायव्यवस्थेची संवेदनशीलता जागते. लोकांचं मन द्रवतं. त्या मुलीचा गौरव होतो. कैद्याला माफी मिळते. आणि दूध पाजण्याचं हे कृत्य हे थोर , महत्कृत्य किर्ती पावतं.
.
पटाइत काकांचा लेख आवडाला. त्यातुन हे चित्र , ही कथा आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरे झाले त्याला मुलगी होती ते. मुलगा असता, तर काय केले असतेनीत? अं?

आणि काय हो, बायकांना काय असे बारा महिने तिन्ही त्रिकाळ वाट्टेल तेव्हा ऑन डिमांड दूध येते काय? की रोमन काळात प्रत्येक बाईचा पाळणा सतत हलत असायचा?

(की योगायोगाने नेमका त्याच वेळेला याच बाईचा पाळणा हलत होता? इफ सो, हौ ऑपोर्च्यून!)

बाकी, स्त्रीभ्रूणहत्या, झालेच तर 'मुलगाच पाहिजे' वृत्ती वगैरेंच्या विरोधात प्रबोधनार्थ बरी ष्टोरी आहे, कितीही फारफेच्ड असली तरी. ऑल्दो, 'बायकांचा पाळणा सदैव हाललाच पाहिजे' असाही संदेश त्यातून त्याचबरोबर एकसमयावच्छेदेकरून जाऊ शकतोच म्हणा, त्यामुळे, ऑफ रादर डूबियस व्हॅल्यू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

छान लिहिलंय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0