अडनिडी मुलं-२

मागच्या भागात काही मुलांच्या हट्टीपणाबद्दल लिहिले, काहींच्या मानसिक प्रोब्लेम बद्द्ल लिहिले... आता पोंगडअवस्थेतेतिल परिस्थिती मधुन उद्भ्वनार्या प्रश्नांविषयी...

टिचर वर्गात आली... शिकवायला सुरवात... रोज पंजाबी घालणारी टिचर आज छान, पारदर्शक साडी नेसली होती. मुलं थोडी बावरुन ... आपआपल्या वह्यात डोकं खुपसुन... थोड्या वेळाने टिचर वर्गात फेर्या मारु लागली.. आता मुलांना टिचरला अगदी जवळुन पाहणे शक्य झाले... टिचर ने वहीत डोकावले.. आणि पुढे पाठ वळताच... "कैसी दिख रही रे, मस्त ऐटम, तेरे को कैसी लगती" , एकजण चार पाच लोकांना आवाज जाईल इतपत जोराने ... टिचर ने मागे वळताच.. एक मस्त स्माईल... टिचर ने एक टपली मारली फक्त... दुसरे काय करणार होती?

एकजण स्वप्नातली राजकुमारी रोज रफ बुकवर काढायचा... त्याला सुटेबल वाक्य लिहायचा... पुर्ण वही अशा स्केचेस नी भरली होती... मुलींना तो काय काढतो ह्या बद्दल उत्सुकता होती.. मग तो क्लासमध्ये नसताना त्यांनी त्याची ब्याग उचकटुन पाहिली... तर तो छान छान स्केचेस काढुन त्या मुलीला कोठे पाहीले, कशी दिसते, कोणत्या ड्रेस मध्ये छान दिसते, कोणत्या ड्रेस मध्ये आपल्याला आवडेल... असे बरेच लिहिले होते...

एक मुलीबद्दल लेक सांगत होती... ती मुलगी खुप हुशार आहे पण ती दर आठवड्याला एक बोयफ्रेंन्ड बदलते.. शिवाय तिच्या बोयफ्रेंन्डस ला नंबर आहेत... नंबर १,२,३,४,५,६,७,८,९,१०.... अजुन एक समजलेली गोष्ट म्हणजे तीला आई नाही... घरी कोणीच समजावायला नसल्याने ती असे करत असेल का?

अजुन एक मुलगी खुप हुशार, ९९ मार्क्स मिळाले की आख्खे खानदान १ मार्क कोठे गेला म्हणुन विचारणार.. आणि त्या एक मार्कचा तिला हिशोब द्यावा लागणार म्हणुन ती मुलगी सतत धास्तावलेली.. तिची आई डॉक्टर किंवा अशीच काही मेडिकल रिलेटेड जॉब करणारी .. तिच्या हॉस्पिटलच्या शिफ्ट्स .. भरीतभर तिला एक शाळेला सिनिअर केजी असणारी बहीण . त्या छोट्या मुलीलाही तिला सांभाळावे लागायचे . घरात आई वडिलांची सतत भांडणे .. त्या प्रेशर ने ती वैतागलेली .प्रेमासाठी आसुसलेली . मुलीजवळ तासंतास रडणारी ."वेगळं का राहत नाही?", असे एकदा माझ्या मुलीने विचारलेच. तर ती सरळ म्हणाली ,"गुडियाला कोण सांभाळायचं ?" असे ते म्हणतात ,पण शाळेतून घरी आले की अभ्यासाबरोबर तिला सांभाळायचे काम माझेच ... अशा वातावरणातच तिला एक सोसायटीला मुलगा आवडू लागला , त्याच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागली.त्याच्या साठी चिट्ठ्या काय ,कविता काय असे बरेच उद्योग करायची. पण ते सर्व स्वतःजवळच ठेवायची . आई बापाला तिच्याकडे बघायला सवड कोठे होती ? घरी एकत्र आले कि भांडणे . तिला जास्त काय विचारायची तर पंचाईत . सतत चेहऱ्यावर बारा वाजलेले. म्हणून पोरी पण टाळायच्या . एक दिवशी तिने स्वतःच त्या मुलाला प्रपोज केले . तो मुलगा ठामपणे नाही म्हणाला .अजून आपण खूप लहान आहोत आणि मला माझ्या करिअर वर कॉन्सन्ट्रेट करायचे आहे असे म्हणाला .मग तर हिने खूप दिवस सदम्यातच काढले . तिच्या कवितांना पूर आला ... नशीब हे सर्व दहावीच्या सुरवातीलाच पार पडले आणि पोरगी क्लास शाळेत रमली .. दहावीला १० सिजीपीए . मनातून मी देवाचे आभारच मानले ...

अजून एक सांगायचे म्हणजे माझी लेक आई बरोबर सगळे शेअर करते तर लेक तिला सांगायची, "आईला सर्व सांग , मन मोकळं कर, म्हणजे जास्ती टेन्शन येत नाही". तर ह्या पोरीचा विचार..आपणही आपल्याला वाटणाऱ्या प्रेमाबद्दल आईला सांगावे . पोरगीने ठरवले आईला आदी आपल्या अजून एक मैत्रिणीच्या प्रेम कहाणीबद्दल सांगावे ... लेकीने तशी बोलायला आईबरोबर सुरवात केली तर आईने जमदग्नी अवतार धारण केला . त्या मैत्रिणीच्या घरी सांगण्याची धमकी दिली . तिच्याबरोबरची मैत्री पूर्ण तोडण्यास भाग पाडले. का ? तर अशा वागनाऱ्या मुली वाईट असतात . स्वतःच्या लेकीला असे काय वाटतंय असे कळले असते तर? तर काय केले असते आईने ? नशीब आई डॉक्टर आहे ...अशिक्षित नाही

अजून एक मुलगी ,खूप हुशार . आई वडील घटस्फोटित . पण वडील बहुदा सर्व खर्च करत असावेत . आजी मामा कडेच राहते . मामाचाही घटस्फोट झालाय . पण बाकी सर्व घर वैगेरे अगदी टॉप च्या सोसायटीत. आई तशी चांगली शिकलेली आहे . मैत्रिणी वैगेरे अगदी मापकच . स्वतः अभ्यास ,खेळ ,योगा असा ब्लॅलन्स तिने पाळलाय . पण मुलगी मला ह्याच्यावर क्रश , त्याच्यावर क्रश असे बिनधास्त सांगते . लेकीने काही काळजीत विचारले... तर म्हणते ,"काळजी करू नकोस , हा फक्त क्रश आहे . तसेही मी लव्ह म्यॅरेज च करेन ... आणि तेही वयाच्या पंचविशी नंतर" ... ही एक दिलासा देणारी गोष्ट होतीच. मला वाटले लागली जिगीषा ची गाडी रुळावर तर कसले काय ... आईला कॅन्सर झालाय असे सांगून लेकीजवळ रडली . परत परत ती ठीक झालीय ,ठीक होतीय असे लेक सांगायची. पण परवा तिच्या आईला पाहिले ,उभा न राहता यायची ताकद .. केस पूर्ण गेलेले . न जाणो तिच्या आईचं काय झालं तर काय करायचे तिने? वडील पुसटसे पण आठवत नाहीत ... आता आईचे हे असे .. घरून खोटा आधार मिळाल्याने आई ठीक होणार ह्या भ्रमात पोरगी... तिलाही आई वडिलांच्या वेगळ्या होण्याची झळ लागलीय पण ती ते असे एकावेळी दोन तीन बॉयफ्रेंड ठेवून मी वरचढ असेल, माझे खपवून घेईल त्याच मुलाशी लग्न वैगेरे करीन अशी स्वप्ने बघते ... स्टील शी गोट १० सिजीपीए ... असेच यश तिला आयुष्यभर मिळो आणि तिच्या आईची तरी निदान तिला साथ मिळो ...

तिसरी मुलगी , आई वडील रोज भांडण . वडील आईला सतत मारायचे .सतत संशय घ्यायचे . आईचं जगणं नको केलेलं वडिलांनी . पोरगी मग दिवसभर टी व्ही मध्ये तोंड खुपसून . अभ्यास नावालाही नाही . आईला नोकरी करणे भाग होते . आई बाप नोकरी करणार . बाप घरी आला कि आईला मारणार . पोरगी दिवसभर टी व्ही सिरीयल मध्ये मग्न . बसून बसून पोरगी गोल गब्बू झाली . सर्वच आत्मविश्वास गमावलेला . हुशार नसल्याने शाळेतही कोणी मैत्री करायचे नाही . सतत काहीतरी होतंय ,पोटात दुखतंय म्हणून घरी राहणार . घरी बसून खात राहणार ... नंतर नंतर बाप तिलाही मारायला लागला . मग मात्र पोरगी बिथरली . तिला सतत टोकायला लागला . मला हिला मुलगी म्हणायची लाज वाटते असे एकदा बाप म्हणाला. मग मात्र पोरगी इरेला पेटली . ह्या घरातून निघून जाऊ नाहीतर मी घरातून पळून जाईन अशी पोरगी धमकी घालायला लागली . आईनेही मग विचार करून वेगळं व्हायचं ठरवलं ....

बाकी सर्व पुढच्या भागात ...

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

बहुसंख्य केसेस मध्ये मुले आडनिडी नसून, आई-बाप आडनिडे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी खरयं.
बाकी १० सिजीपीए हाच सुधारणेचा निकष आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या तरी दुसरा निकष दिसत नाही... म्हणुन मग हाच ... एवढे प्रोब्लेम असताना १० सिजिपिए... अभ्यास करत आहेत मुले....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरय... आई बाप अडनिडे नाहीत... आयुष्य कसतरी ओढायचे....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का, 'कसेतरी ओढायचे आयुष्य?' ही माणसे सधन, सुसंस्कृत दिसताएत. मग आपल्या वागणूकीची पोरांना लागणारी झळ दिसत नाही? अश्या काही न काही समस्या तर असतातच प्रत्येकाला. त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे हे समजण्याइतपत शिक्षण आहे, काहीन काही प्रमाणात पैश्याचं पाठबळ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी. मी निष्कारण जास्तच कडवट तिखट प्रतिक्रिया दिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्ली दहावीला स्वच्छ टक्के न मिळता सीजीपीए मिळतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सिबिएसई बोर्ड ला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यात नाक खुपसायचा मला काही हक्क नाही. पण मुलांसाठी सीबीएसई बोर्डाच्या शाळांच्या फिया आणि खर्च परवडतात अशा पालकांचं 'कसेतरी ओढायचे आयुष्य' असेल असं पटत नाही. मोलमजुरी करणारे, ताशी वेतन मिळवणारे लोक 'कसेतरी आयुष्य ओढतात'; अशा लोकांना सीबीएसई बोर्ड परवडत असेलसं वाटत नाही. सीबीएसई पालकांसमोर 'फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स' असतात; उदाहरणार्थ, आज स्कूल बस उशीरा आल्यामुळे पालकांपैकी एकाला निघायला उशीर झाला, त्यामुळे ऑफिसात काही उत्पात झाला आणि त्याचा बराच ताण आला, चिडचिड झाली, इत्यादी. त्याबद्दल सहानुभूती नाही असंही नाही.

पण ह्या पालकांचं वर्तन आणि सीबीएसई बोर्ड पाहता, ह्या लोकांना मानसोपचारांची गरज आहे, ते परवडणंही शक्य आहे आणि तरीही आडमुठेपणा करून आपल्याच पोरांचं आयुष्य बरबाद करत आहेत असं दिसतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुख आणि मानसिक आरोग्य पैशाने विकत घेता येत नाही... आणि स्टेट बोर्ड मध्ये शिकणार्या मुलांना हे सर्व फेस नाही करावे लागत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुख आणि मानसिक आरोग्य बऱ्याच प्रमाणात पैशाने विकत घेता येतं*. फक्त ते मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी. एस.एस.सी. बोर्डात शिकणाऱ्यांना कष्ट होतात का नाही, हा प्रश्नच नाही. ज्यांना सीबीएसई बोर्ड परवडतं, त्यांना समुपदेशकांकडे जाणंही आर्थिक बाबतीत परवडू शकतं. तरीही समुपदेशकांकडे हे लोक जात नाहीत असं लेखनातून दिसतंय. ह्याला पैसा, वेळ आणि कष्ट कुठे खर्च करायचे ह्याबद्दल अज्ञान म्हणावं का स्वतः आणि मुलांच्या भविष्याबद्दल बेमुर्वतखोरपणा हे समजत नाही.

*आज माझ्याकडे पैसे आहेत म्हणून भर उन्हाळ्यात घरात एसी लावून मी सुखात राहू शकत्ये. पैसे आहेत म्हणून पडेल ते कष्ट न करता सुखात इंटरनेटवर गफ्फा हाणू शकत्ये. पैशांची चिंता नसल्यामुळे रिकाम्या वेळात स्वतःचं आयुष्य आणखी कसं सुधारता येईल ह्याचा विचार करू शकते. हे सुख पैशांमधूनच आलेलं आहे. ज्यांच्या खिशात चार पैसे असतात अशा लोकांना मानसोपचाराची गरज पडली तर समुपदेशकांकडे जाताना अडचण वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुख आणि मानसिक आरोग्य बऱ्याच प्रमाणात पैशाने विकत घेता येतं

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पैशाने सर्वच काही विकत घेता येत नाही" वगैरे वाक्ये पुरेसे पैसे मिळवल्यावर तोंडी लावायला म्हणून बरी असतात.

व्यक्तिपरत्वे अमाउंट बदलेल, पण तरीही....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

घरात आईवडीलांचे पटत नसले की असली मुलं मग वाया जातात,चाईल्ड सयकोलॉजीत आई वडीलांच्या रिलेशनशीपचा वाढत्या मुलांवरती प्रभाव हा स्वतंत्र विषय आहे.
प्रत्येक पालकाने मुलं वाढत्या वयाची असताना तरी घरातले वातावरण तणावमुक्त ठेवले पाहीजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

पारदर्शक साडी नेसणारी टिचर पण अडनिडी आहे.

अजुन एक मुलगी खुप हुशार, ९९ मार्क्स मिळाले की आख्खे खानदान १ मार्क कोठे गेला म्हणुन विचारणार.. आणि त्या एक मार्कचा तिला हिशोब द्यावा लागणार म्हणुन ती मुलगी सतत धास्तावलेली..

हे हल्ली खरंच होते का? २-३ दशकापूर्वी होत होते. आता पालक घाबरुन असतात मुलाना, नाराजी सुद्धा शुगरकोटेड दाखवायची असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात काहीही फरक पडला नाही... अजुन असेच पालक आहेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0