अडीच हजार गायी चोरणारा अल्वरेज केली

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

आठवणीतला हाॅलीवुड-सहा

चोरी ती चोरीच...

पण त्या चोरीचं तत्कालीन अमेरिकी राष्ट्रध्क्षांनी देखील कौतुक केलं होतं. म्हैस किंवा गाय चोरून नेण्याची एखादी घटना आपल्याला जवळपास कधीतरी बघायला मिळते, पण अडीच हजार गायी एकत्र पळवून नेणं...अशक्यच...नाही कां...! अशाच चोरीच्या एका सत्य घटनेचं रोमहर्षक चित्रण होतं हॉलीवुडच्या ‘अल्वरेज केली’ या चित्रपटांत, दिग्दर्शक होता एडवर्ड डिमट्रिक्स.

चित्रपटाच्या सुरवातीला पडद्यावर ही अक्षरे येतात...

In every war...In every age...The forgotten weapon is...Food. For to kill, soldiers must live...to live, they must eat...And a herd of cattle is as vital as a herd on cannon...

अठराव्या शतकाच्या मेक्सिको शहराचा एक प्रमुख पशु व्यवसायी म्हणजेच ‘अल्वरेज केली.’ घटना 1864 सालची. एकदा ताे सदर्न अमेरिकी स्टेट मधे गायी पोचवायला जातो अन् अडकतो एका ऐतिहासिक चोरीत. केली (विल्यम होल्डन) अमेरिकी सैन्यांकरितां गायी घेऊन पोचतो. ‘डिलीव्हरी’ झाल्यानंतर पैसे मिळतांत. पण त्याच रात्री क्रांतिकारी केलीचं अपहरण करतात. त्यांचा सरदार आहे कर्नल टॉम (रिचर्ड विडमार्क). अमेरिकी सैन्याला गायी पुरविल्याबद्दल मिळालेला एेवज कर्नल टॉम, केली पासून हिसकावून घेतो व त्याला म्हणतो-

‘क्रांतिकारकां करितां तू ‘त्या’ गायी आम्हांला आणून दे...’

केली उत्तरतो-‘तुला वेड बीड लागलंय की काय...! इतक्या गायी पळवून आणणं...ते देखील अमेरिकी सैन्या पासून...शक्य तरी आहे कां...!’

टॉम अलिप्तपणे म्हणतो-‘ते मला माहीत नाही...गायी पळवून आणायच्याच...गायींचं तू बघ...अमेरिकी सैन्याला मी बघून घेईन...’

केली अर्थातच पहिले नकार देतो...पण आपली करंगळी तुटल्यावर मात्र तो हे काम करायला तयार होतो...

आता त्याचं पहिलं काम म्हणजे कर्नल टाॅमच्या माणसांना प्रशिक्षित करणं. केली त्यांना शिकवतो की घोड्यावर बसून गायींच्या ताफ्यावर नियंत्रण कसं ठेवायचं ते...!

तो सांगतो-

‘Now the main thing to remember is...cattle are like women. Sometimes you have to be firm with them. Sometimes you have to be gentle. And sometimes you have to give them a slap on the rump.’
त्यांना तो गुरुमंत्रच देतो-

‘जनावरांशी देखील प्रेमानं वागावं लागतं...’

‘म्युजिक इज दि बेस्ट थिंग टू एनीमल...’

हॅट वापरुन, निरनिराळे हातवारे करुन, शिटी वाजवून, तुतारी वाजवून, प्रसंगी हवेत गोळया झाडून...गायींना आपल्या इच्छे प्रमाणे कसं वळवतां येतं याची प्रात्यक्षिके करुन केली त्या माणसांना देखील ‘तयार’ करतो. हे सर्व मिळून पुढच्या कामाला लागतात. गायी पळवून नेतांना ते अर्थातच अवघड मार्ग पत्करतात. वाटेवरचं प्रमुख ठिकाण म्हणजेच नदीवरचा पुल. नेमकं याच पुलावर या ताफ्याला अडवण्यासाठी अमेरिकी सैन्य जय्यत तयारी करुन ठाण मांडून बसतं...ही बातमी मिळताक्षणी कर्नल टाॅमचा स्वत:वरचा ताबा सुटतो. तो आपल्या लोकांना अमेरिकी सैन्यावर थेट चालून जाण्याचा इशारा करतो. हे बघतांच अस्वस्थ झालेला केली म्हणतो-

‘ही तर एक प्रकारची आत्महत्या आहे. मी त्या करितां तयार नाही. इतक्या गायी सोबत असतांना समोरच्या सैन्यावर हल्ला करणं शक्य तरी आहे कां...‌? उलट यात आपण आपल्या सोबत असलेल्या गायींच्या पायदळी तुडवल्या जाण्याची शक्यताच जास्त आहे...!

टाॅम केलीवर भडकतो-‘भाषण देऊ नको...तुझ्यापाशी काही पर्याय आहे कां...!’

त्यावर होकार देत केली टॉमशी करार करवून घेतो-‘या क्षणापासून पुरतं डिवीजन माझ्या कमांड मधे राहील. तसंच त्या पार सुखरूप पोचता क्षणी तू मला स्वतंत्र केलं पाहिजे...’

क्षणाचाहि विलंब न करतां टाॅम लगेच होकार देतो...

केली विचारतो-‘आपली माणसं किती...?’

आकडा सांगण्यात येतो...

‘ठीक...गायींची सात तुकड्यांमधे विभागणी करा...दर तुकडी मागे दहा माणसं...अन् गायींच्या या ताफ्याच्या मधे घोडागाडीवर गोळा-बारुद. आता या गायींना थेट पुलाकडे हाकलून द्या...’

‘चला लागा कामाला...’

बस्स...या गायींचा ताफा अशा विभागलेल्या तुकड्यांमधून थेट पुलावर चालून जातो...पुलाची रुंदी किती तर दहा ते बारा फूट...याच पुलावर मेजर स्टडमेनच्या नेतृत्वांत अमेरिकी सैन्य तोफगोळा घेऊन या ताफ्याची वाट बघत तयार असतं...ताफा जवळ येतांच अमेरिकी सैन्य चक्रावून जातं...!

गोळया चालवणार तरी कुणावर...? समोर सगळीकडे नुसत्या गायीच गायी...!

आणि अमेरिकी सेनापती मेजर स्टडमेनच्या डोळयांदेखत गायीं हा ताफा सुखरूप पुलाच्या पलीकडे पोहचतो...आणि एका ऐतिहासिक चोरीची डील पूर्ण होते...

या चोरी बद्दल कळल्यावर तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणाले होते-

‘दि स्लिकेस्ट पीस ऑफ हर्डल कैरिंग आय एम हर्ड ऑफ...!’

तो प्रसंग...

या चित्रपटांतील एक प्रसंग आठवणीत कायम घर करुन आहे. केलीचं अपहरण केल्यावर टॉम त्याला ‘त्या’ गायी पळवून आणायला सांगतो...केलीच्या नकारावर त्याला कोठडीत डांबून ठेवतात. कोठडीत असलेल्या केलीला भेटायला कर्नल टाॅम येतो. टाॅम विचारतो-

‘एक रात्र या कोठडीत राहिल्यावर देखील तुझा तोच विचार आहे काय...?’

यावर केली म्हणतो-

‘अर्थातच...आई लाइक काक्रोचेज इन माय सूप...!’

यावर टॉम शांतपणे खिशांतून ‘ते’ डालर्स काढतो (ते केलीचेच असतांत) व त्यातील एक नोट लायटर ने जाळून टाकतो...तरी केली तयार होत नाही...हे बघून भडकलेला टाॅम रिव्हाॅल्वर काढताे...तेव्हां केली म्हणतो-

‘मला मारुन तुझी प्राब्लेम सॉल्व होणार नाही...!’

टॉम गोळी झाडतो...!

केली आश्चर्यचकित होऊन काहीशा अविश्वासाने टाॅम कडे बघतो (ती नजर आठवणीत कायम घर करुन आहे)...कारण ती गोळी शरीरावर इतरत्र कुठेच इजा न पोहचवता केलीच्या हाताची करंगळी तोडून जाते.

टाॅम खुनशी स्वरांत म्हणतो-

‘You used to have ten fingers. Now you have nine. Tomorrow, you’ll have eight. You stay stubborn, the day after that than you’ll have seven. The day after that...it’s up to you. You decide whether you want to end up with a pair of stumps...or lend us your talent. You decide.’

‘आज पहिला दिवस आहे...आिण हे पहिले बोट...उद्या दुसरया बोटाची पाळी येईल...परवा...पुढचा विचार तू करुन घे...तुला हे काम करायचंय की...!’

अर्थातच केली काम करायला तयार होतो...

पण या प्रसंगातील दोघांच्या थेट भिडलेल्या नजरा विसरणं शक्य नाही. खरं म्हणजे विल्यम होल्डन आणि रिचर्ड विडमार्क यांचा अभिनय या चित्रपटाची जमेची बाजू होता. एक खानदानी पण दिलदार व्यापारी विल्यम होल्डन नी सुरेख रंगवला होता. तर क्रांतिवीरांचं नेतृत्व करणारा, आपल्या लोकांची परिस्थिति बघून द्रवित होणारा, प्रसंगी रौद्र रुप धारण करणारया कर्नल टॉमच्या भूमिकेत रिचर्ड विडमार्क तसूभर देखील कमी नव्हता...दोघांच्या अिभनयाची जुगलबंदी अप्रतिम अशीच होती...
--------------

ही लिंक बघां-

https://www.google.co.in/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=U...

----------------

गोल्डन ब्वॉय: विलियम होल्डन

विलियम होल्डन (जन्म 17 एप्रिल 1917, मृत्यु-12 नोव्हेंबर 1981) 1950 ते 1970 च्या कालखंडातील हॉलीवुडचा गाजलेला अमेरिकी अभिनेता होता.

1953 सालच्या स्टालेज17 (Stalag17) करितां त्याला एकेडमी अवार्ड तर 1973 सालच्या टेलीविजन फिल्म ‘दि ब्ल्यू नाइट’ साठी प्राइमटाइम एमी एवार्ड मिळाला होता.

सनसेट बाउल वार्ड (Sunset Boulvard), सबरीना (Sabrina), दि ब्रिज ऑन दि रिवर क्वाई, दि वाइल्ड बंच (The Wild Bunch), पिकनिक आणि नेटवर्क त्याचे प्रमुख चित्रपट होते.

विलियम चं नाव सहा वेळा ‘टॉप टेन स्टार आॅफ दि इयर’ (1954-58, 1961) मधे आलं हाेतं. तसंच अमेरिकन फिल्म इंस्टीट्यूटच्या 25 ग्रेटेस्ट मेल स्टार्स ऑफ क्लासिक हॉलीवुड सिनेमा च्या यादीत विलियम शेवटचा गडी होता....(पंचविसावा).

इंडस्ट्रियल केमिस्ट चा मुलगा

होल्डन चे वडील विलियम फ्रेंकलिन बीडल सीनियर (1891-1967) इंडस्ट्रियल केमिस्ट होते तर आई मेरी ब्लेंची (1891-1990) स्कूल टीचर होती. त्याच्या आजी (वडिलांची आई) रेबेका वेस्टफील्डचा जन्म 1817 साली इंग्लैंड मधे झाला होता. तिघा भावांमधील होल्डन हा सर्वात मोठा होता. त्याच्या दोघा भावांपैकी एक राबर्ट डब्ल्यू बॉबी बीडल यूएस नेवी मधे फायटर पायलट होता आणि दुसरया विश्व युद्धात 5 जानेवारी 1944 साली खर्ची पडला होता.
विलियम तीन वर्षाचा असतांना त्याचे वडील साउथ पेसेडिना मधे राहायला आले. साउथ पेसेडिना हाईस्कूल नंतर विलियम नी पेसेडिना जूनियर कॉलेज मधे प्रवेश केला. इथे तो रेडियो प्ले देखील करु लागला...याच दरम्यान 1937 साली पैरामाउंट पिक्चर्स नी त्याला साइन केलं. त्याचा पहिला चित्रपट होता-‘प्रिजन फार्म.’

नावा बद्दल चा किस्सा

विलियम चं नाव होल्डन कसं झालं याचा किस्सा जार्ज रॉस यानी बिलबोर्ड मैगजीन मधे सांगितलाय. त्या प्रमाणे विलियम याने जेव्हां ‘गोल्डन बॉय’ नावाचा चित्रपट साइन केला, तेव्हां आपलं नाव लिहिलं-बिल बीडल. या चित्रपटाचा असिस्टेंट डायरेक्टर होता हेराल्ड विन्सटन. काही दिवसांपूर्वीच त्याचा ग्लोरिया होल्डन या नटी सोबत घटस्फोट झाला होता. या हेराल्ड ने चित्रपटाच्या नायकाचं पुन्हां बारसं केलं आणि बिलचं नाव ठेवलं-विलियम होल्डन...(त्याच्या पूर्वाश्रमीच्या बायकोच्या नावावर). आणि बिल बीडल, विलियम होल्डन नावाने वावरू लागला...

ओ माय गोल्डन ब्वाॅय...

तर, होल्डन चा पहिला चित्रपट होता-1939 सालचा ‘गोल्डन ब्वाय.’ त्याची नायिका होती बारबरा स्टेनविक. यात होल्डन वायलिन वादक असलेल्या बॉक्सरच्या भूमिकेत होता. या चित्रपटांत होल्डन जरी नवखा गडी होता तरी बारबरा नावारूपाला आलेली नटी होती. तिला होल्डन आवडला होता...म्हणून तिने त्याची मदत केली. फावल्या वेळात ती त्याला मार्गदर्शन देऊन प्रोत्साहित करायची. या चित्रपटामुळेच दोघं चांगले मित्र बनले...पुढे 1982 साली बारबरा ला एकेडमी ने आॅनररी ऑस्कर देऊन तिचा गौरव केला. त्याच्या काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका दुर्घटने मधे दुर्दैवानं विलियम होल्डन चा मृत्यु झाला होता. अवार्ड घेतल्यानंतर बोलतांना शेवटी बारबरा ने त्याची आठवण केली. ती म्हणाली-‘होल्डन माझा आवडता नट होता. मी त्याला मिस करते...त्याला नेहमी वाटायचं की मला एक तरी ऑस्कर मिळाला पाहिजे, आज तो मिळाला...

‘My Golden Boy, You got your wish...’

दुसरया विश्वयुद्धात होल्डन यूनाइटेड स्टेट्स आर्मीच्या हवाई दलात सेकंड लेफ्टीनेंट म्हणून वावरला होता. 1950 साली बिली वाइल्डर यानी होल्डनला सनसेट बाउल वार्ड (Sunset Boulvard) मधे भूमिका दिली. यात त्याची नटी होती ग्लाेरिया स्वान्सन. या चित्रपटातील स्क्रीन राइटरच्या भूमिकेसाठी त्याला एकेडमीचं पहिलं नामिनेशन मिळालं. खरं म्हणजे या भूमिकेसाठी पहिले मांटिगोमरी क्लिफ्ट च नाव सुचवल्या गेलं होतं. स्वान्सन ही नटी नंतर एकदा म्हणाली होती-

‘होल्डन पडद्यावर आणि बाहेर ही परफेक्ट होता. मी तर त्याचा प्रेमातच पडले होते.

वाइल्डरचं म्हणणं होतं-

‘होल्डन विश्वासु मित्र होता.’

या नंतर तो यशाची शिखरे गाठत राहिला...
1953 सालच्या स्टेलाग करितां त्याला त्याचं पहिलं ऑस्कर मिळालं. या शिवाय 1954 चा एक्सीक्यूटिव सूइट, ग्रेस केली सोबत 1954 सालचाच दि कंट्री गर्ल, 1955 चा पिकनिक, 1957 चा दि ब्रिज ऑन दि रिवर क्वाय, 1958 चा दि की अाणि 1959 सालचा दि हार्स सोल्जर्स (यात जाॅन वेन होता) त्याचे इतर चित्रपट हाेते.

हेपबर्नचा ‘गार्जियन एंजल’

1954 सालच्या बिली वाइल्डर निर्देशित सबरीना या चित्रपटांत होल्डन सोबत होते हंफ्री बोगार्ट आणि आड्री हेपबर्न. हा त्याचा वाइल्डर सोबत तिसरा चित्रपट होता. चित्रपट निर्मितीच्या दरम्यान होल्डन आणि आड्री जवळ आले होते. पण वाइल्डर ला यातलं काही माहीत नव्हतं. नंतर तो म्हणाला होता-‘सेटवरच्या लोकांनी मला नंतर सांगितलं की बिल आणि आड्री मधे काहीतरी शिजतंय आणि हे सगळ्यांना माहीत आहे. सगळयांना असेल, मला माहीत नव्हतं.’ यात खरी गोम अशी होती की बोगार्टनी अापली बायको लॉरेन बकॉल ला या चित्रपटांत नायिकेची भूमिका मिळायला हवी या साठी प्रयत्न केलेे होते. ते साध्य झालं नाही. म्हणून सेट वर चित्रीकरणाच्या वेळेस हेपबर्न सोबत त्याच्या व्यवहार रुक्ष असे. साहजिकच होल्डन हेपबर्नच्या नजीक गेला. बायोग्राफर मायकेलेंजेलो कापुआ याने त्याला हेपबर्नचा ‘गार्जियन एंजल’ म्हटलं होतं. या चित्रपटाची आठवण काढतांना होल्डन म्हणाला होता-
‘Before I even met her, I had a crush on her, and after I met her, just a day later, I felt as if we were old friends, and I was rather fiercely protective of her, though not in a possessive way’

चित्रपट संपल्यानंतर यांचा रोमांस पण संपुष्टात आला. होल्डन आता मद्याच्या आहारी गेलेला होता. त्याने म्हटलं होतं-

‘I really was in love with Audrey, but she wouldn’t marry me.’

आणि खरंच, काही महिन्या नंतर हेपबर्न मेल फेरर या नटाच्या प्रेमात पडली आिण दोघांनी लग्न देखील केलं.
7 फेब्रुवारी 1954 साली होल्डन लाइफ मैगजीनच्या कवर पेजवर झळकला. 1957 च्या ‘दि ब्रिज ऑन दि रिवर क्वाय’ नंतर त्याने बरेचसे चित्रपट केले. 1960 नंतर तो मद्याच्या आहारी गेल्याने त्याच्या कारकीर्दीला ग्रहण लागलं.
-----

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

सुंदरच. हे सगळे सिनेमे पहायचे आहेत. सम डे .....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही ऐसीचे "श्रीकृष्ण हवालदार"* व्हा.

* हंस मासिकात ते इंग्रजी चित्रपटाची कथा लिहायचे ती वाचून बाबा चित्रपट पाहाण्यास जायचे.सगळी कथा सांगून बिंग फोडणे तेव्हा फाउल धरत नव्हते कारण रंगित शिनेमा पाहाणे आणि तो सगळा समजणे हाच उद्देश असायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि तो सगळा समजणे हाच उद्देश असायचा.

ROFL ROFL
आजतागायत मी इंग्रजी सिनेमात जोक्स ना हसत नाही. नेमकं काहीना काहीतरी ऐकू येत नाहीच शिंचं किंवा भलतच ऐकू येतं, अन जोक वाया जातो Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही वर्षांपुर्वी एक 'क्रॅमर वरसस क्रॅमर' असा एक सिनेमा मला कुणी सुचवला होता.क्रॅमर पतिपत्नीने घटस्फोटासाठी कोर्टाची पायरी चढल्यानंतरचे सर्व वकीली डावपेच दाखवले होते त्यात.अशा सिनेमाचे सर्व संवाद लिहून दिले तरी मी गेलो नसतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटलं की संघ दक्ष बातम्यांकडे लक्ष इथली बातमी आहे की काय !! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग