ब्रम्हचर्य आणि मी

ब्रम्हचर्याबद्दल लहानपणी खूपदा ऐकण्यात आले. थोडे मोठे झाल्यावर वाचनातूनही माहिती मिळाल्यावर त्याविषयी उत्सुकता निर्माण झालीच होती. अगदी अगोदर तुला कळणार नाही अथवा ऋषी मुनी ब्रम्हचर्य पाळून तपस्या करतात आणि त्यांना देव पावतो,वर देतो असे सांगितले जायचे.म्हणजे हे आपल्यासाठी नाही. आपल्याला जेवणाव्यतिरिक्त चारदा चरायला लागते तर तपस्याही दूरच होती. मऊमऊ चादर ओढून झोपही काढतो तर वनात कसंकाय जाणार?आजुबाजुच्या नातेवाईक ओळखींतही अमुक एक ब्रम्हचर्य पाळतो याचे उदाहरण नव्हतेच.
आठवी नववीनंतर ब्रम्हचर्य म्हणजे मुलींकडे न पाहणे हे एक चर्चेतून कळले. जी मुलं व्यायाम करायची ती सांगायची आताच काय ती 'ब्वॅाडी' तयार होते नंतर शक्य नाही. मारुती ब्रम्हचारी. किती शक्तिमान! माझी किरकोळ प्रकृती होती. ब्रम्हचार्य पाळले की शक्ती येते? भिष्माचे वेगळे. लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतली होती - ब्रम्हचर्य पाळेन इत्यादी. ते शक्तीसाठी नव्हते आणि लग्नवगैरे अभद्र कल्पना तेव्हा मुलांत नव्हतीच. मारुतीसारखे व्रत करायचं म्हणजे नक्की काय करायचं रे? लंगोट बांधायचा, शक्तिवर्धक आहार घ्यायचा. अगदी वज्रदेही व्हायचे असेल तर शेंदूर खायचा. आमच्या शाळेजवळच एक इटुकले मारुतीचे देऊळ होते तिथे मुले हटकून जायची कारण प्रसाद. दुसरे एक मोठे देऊळ असले तरी प्रसाद फारसा नसायचा. छोट्या देवळातला बुवा पुजारी आरती झाल्यावर थोडा शेंदूर खाताना पाहिले होते त्याबद्दल विचारल्यावर छेछे तो भयानक प्रकार आहे तसलं काही अघोरी आपण करायचं नसतं असा इशारा मिळाला. शेंदूर हे रेड ओक्साइड ओफ लेड. शिशाचा विषारी क्षार. थोडा थोडा खायची सवय केली की वज्रदेही म्हणजे उन वारा पावसाचा परिणाम होत नाही शरीरावर.कोडगे बनते. उडिद,तेल आणि गुळ खाणे हा सोपा उपाय कळला. त्याचा रतिब सकाळी चालू केला पण मारूती काही प्रसन्न होण्याची चिन्हं दिसेनात. ब्रम्हचर्य लंगोटात काही बांधता येत नव्हते.

मध्यंतरी कुठेतरी दोन काठ्यांवर चालणाय्रांचा नाच पाहिलेला. शिवाय एकदा विल्स ( अथवा कॅप्टन असेल) सिगरेट ब्रांडची जाहिरात म्हणून एक पंचवीस फुट आणि दुसरा पंधरा फुट अशी दोन माणसे रस्त्याने गेलेली. त्यांना नेव्हीचे पांढरे पोशाक, टोपी होती.लांबलचक पांढरी विजार. ते दोन उंच बांबू होते त्यावर ते चालत होते. सिगरेट काही आकर्षण नव्हतं पण दोन काठ्यांवर चालूया असं सुरू झालं मनात. शोधाशोध करून सहाफुटी काठ्या मिळवल्या अन पहिल्या फटक्यातच चाललो. पण -- मी पायाच्या बोटांनीच काठी घट्ट धरायचो. त्या लोकांच्या काठ्यांना आडव्या पट्ट्या असतात त्यावर ते फक्त पाय ठेवतात, बोटांवर जोर येत नाही. उंच चालण्यात मजा यायची आणि माझ्या पायाच्या अंगठा आणि बाजुच्या बोटांत तीन इंच रुंदी झाली. बारा फुट उंचीवरही सहज चालायचो. एकदा एकाने मला पाहून सांगितले की अशी बोटांनी काठी पकडून तुम्हाला नपुसकत्त्व येऊ शकेल. तसं करू नका. आँ? साधू लोक म्हणे खडावा ( लाकडी चपला, रामदास घालतात तशा ) दोन तीन कारणांसाठी
वापरतात. काटा रुतत नाही, चामडे नको म्हणून आणि इंद्रियदमन - लैंगिक इच्छा मारणे. बोटांनी खडावांचा मधला खुटा घट्ट धरावा लागतो. तर तो छंद लगेच बंद झाला. इतक्या टोकाचं ब्रम्हचर्यही नको होतं.

पुढे ब्रम्हचर्य आणि शक्ती याचा काही एकमेकाशी संबंध आहेच असा काही भ्रम दूरच झाला कारण ते लोकही ठरावीक वयाप्रमाणे म्हातारे होताना दिसतातच. वाचनातूनच उत्सुकता कायम लिहिली. काया वाचा मनाने असे तीन प्रकार किंवा पायय्रा असतात. ज्याला या तीनही लहानपणीच साध्य होतात तोच खरा ब्रम्हचारी. काहीजण यास वैराग्य म्हणतात. मानसिक ब्रम्हचर्य सर्वांनाच शक्य नसते त्यावर काही बाह्य शारीरिक उपचारात लंगोट घालणे, खडावा घालणे हेही आहे.प्रोस्टेट ग्लँडज दाबणे हा हेतू.शिवाय हर्निया जो कुस्तिगिर,कबड्डी,मल्लखांब खेळाडूंना होण्याची शक्यता असते तो टाळता येतो.मोहेंजो दरोंत एका खापरावर सापडलेली योगमुद्रा पाहिली तर तो योगी पायाच्या टाचा जांघेत दाबून बसलाय.तिथे दाब पडून थोडे हार्मोनचे नियंत्रण होत असेल.वळूचा बैल करतानाही प्रो० ग्लँडज/नळ्याच
ठेचतात. लंगोट वापराने अवरोध होऊन 'ती' शक्ती वाढते असा गैरसमज पसरला असावा.सप्त धातू रक्त मास मज्जा पेशी शुक्र वगैरेत शुक्र शेवटी आहे तो वाढू दिला नाही तर रक्त मास मज्जा वाढेल पण त्याचा अर्थ लैंगिक शक्तिही 'हवी त्या वेळी' वाढेल का ते सांगता येत नाही. विपश्यना, ध्यानधारणा, मेडिटेशन इत्यादी वाचिक मानसिक उपाय असावेत.
ब्रम्हचर्याचे निरनिराळे अर्थ निरनिराळ्या संस्कृतींमध्ये लावले गेले असतील. त्याला महत्त्व देऊन ते जोपासायला उपायही असतील. चिनी लोकांनी त्याच्या अॅक्युप्रेशरचा उपाय काढला असेल. बय्राच धर्मांत त्यांचे धर्मरक्षक म्हणू लग्न न केलेले ब्रम्हचारीच असतात. खरंच यात काही दडलंय का? भिन्नलिंगींविषयीची जी नैसर्गिक भावना अथवा आकर्षण असते ते नसणे अथवा कृत्रिमरित्या दाबले म्हणजे ब्रम्हचर्य ? हे अजूनही कोडेच वाटतंय मला.
( लेखन चालना श्रेय : राजेश घासकडवी , आदूबाळ आणि A. N. BAPAT )

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त लेख, अचरटकाका! या निमित्ताने तुम्ही खफ सोडून लिहिते झालात हे एक नंबर आहे!

ब्रह्मचर्य किंवा इंद्रियदमन या नैसर्गिक प्रेरणांच्या विरुद्ध जाणार्‍या गोष्टीला एवढं पॉझिटिव्ह ग्लॅमर कसं काय प्राप्त झालं हे मला कोडंच वाटतं नेहेमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेख आवडला. पौगंडावस्थेत असले लै कायकाय कानावर पडत असे. तेव्हा ते खरेही वाटायचे.

बाकी, १ वीर्याचा थेंब = १ लिटर रक्त हा उल्लेख नसल्याने फाउल धरण्यात येत आहे.

आबा: नेमक्या याच विषयावर स्क्रोल.इन मध्ये अलीकडे एक मस्त लेख आला होता, तो अवश्य वाचावाशी शिफारस आहे.

http://scroll.in/article/813618/how-celibacy-non-violence-and-purity-wor...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आ तिज्यायला. भारीच सब्जेक्ट निवडलात की अच्चुकाका,
लैच भारी. मला ते खडावाचा किट्टा आज समजला. असा उपयोग असतय व्हय. अंगठ्याच्या चपलांनी पण उलुसे का होइना दमन होत असणारच. पुणेरी जोडा हा प्रकार पण वर्ज्यच म्हणा. टाचा उचलण्याने काही वेगळे दमन्/उत्तेजन वगैरे असते का?
एकूणच बरेच प्रश्न उभारलेत. टाकेन हळूहळू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदी धार्मिक सिरियलीतले (डीडीच्या रामायण, महाभारत, ओम नमः शिवाय, श्रीगणेश, सोनीवरची जय वीर हनुमान, डीडीचीच जय हनुमान्,झी टीव्हीवरची विष्णू पुराण (दशावतारावरची सिरियल) वगैरे सिरियलमधले ) काही पात्रं 'ब्रम्हचर्य' ह्याचा उच्चार 'भ्रम्मचर्य' किंवा 'भ्रमचर्य' करायचे. त्याची आठवण लेख वाचून झाली. बादवे, ब्रम्हचर्याच्या पालनाने असामान्य शक्तीचा विकास होतो ; असं वीज वगैरेंच्या संशोधनातून जग पालटून ठेवणार्‍या टेस्ला ह्या सार्वकालिक ग्रेट्ट लोकांपैकी एकाला वाटायचं.
बादवे, त्या सिरियलीच्या निमित्तानं आठवलं. त्यातले रावण खूपदा "मंदोदरी" ऐवजी "मंदोद्री" म्हणे. पुढे पुढे त्याचं "मंदोद्री" ऐवजी "लंबोद्री", "लंबोदरी" होइ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही पात्रं 'ब्रम्हचर्य' ह्याचा उच्चार 'भ्रम्मचर्य' किंवा 'भ्रमचर्य' करायचे.

संस्कृतातला मूळ शब्द ब्रह्मचर्य आहे, ब्रम्हचर्य नाही. ह्+म हा क्रम हिंदीत पाळतात. (मराठीत तो बरोब्बर उलटा असतो.) त्यामुळे हिंदीतला उच्चार ऐकताना तसा वाटू शकणे साहजिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही ब्रह्मचर्याला दमन याच भुमिकेतुन बघितलेल आहे असे वाटते.
कामवासनेच्या रुपांतरणाचे ही एक उर्जा आहे व तिचे रुपांतरण केवळ करणे हा राजमार्ग आहे.
एक ध्यान विधी आहे. ती करुन बघावी
दिवसातुन जमेल तितक्यावेळा गुद्द्व्वार आकुंचित करावे ( कसे ते विचारु नका प्लीज ) करुन पहा जमते आणि जमलय ते ही लक्षात येत सहज.
आणि मग जोराने श्वास बाहेर फेकुन पोट आत खेचावे.
असे दिवसातुन सुरुवातीला कमी वेळा जमेल तितके मग थोडे थोडे वाढवत न्यावे. काही दिवसांनी प्रमाण वाढल्यावर.
कामउर्जेचा जो अधोगतीकडे जाणारा प्रवाह आहे म्हणजे खालच्या मुलाधार चक्राकडे तो उलट दिशेने उर्ध्व दिशेने जाण्यास सुरुवात होते. म्हणजे सहस्त्रार चक्राकडे.
कामउर्जेचा प्रवाह या श्वासाच्या साहाय्याने उर्ध्वगामी करणे व अखेरीस सहस्त्रार पर्यंत पोहोचवणे हाच खरा नैसर्गिक ब्रह्मचर्याचा राजमार्ग
बाकी दमनाचे मार्ग काहीच उपयोगाचे नाहीत. जितके दमन करु पाहाल तितके दु:खी व विकृत होत जाल त्याने कामवासना तर जाणार नाहीच उलटपक्षी बलवान होउन जाईल.
तर वरीलच बाबतीत एक संतवचन आहे. की जो रेत को उलटा करे वो तरे. (रेत म्हणजे विर्य या शब्दाला उलटा करणे म्हणजे अधोमुखी कामप्रवाह उर्ध्वमुखी करणे )
अगदी सहस्त्रार पर्यंत नसेल न्यायची तरी हरकत नाही. एरवी जरी तुम्हाला मॉडरेटली कामवासना वा तिचा आवेग नियंत्रणात ठेवायचा असल्यास ( म्हणजे कुठे अनैतिक कृत्य हाताने घडुन जाण्याची शक्यता बळावल्यास जरी तुम्ही वरील श्वासाचा प्रयोग रीपीट केला तरी वेगाने तुमची कामवासना नियंत्रणात येते. मर्यादीत संयमासाठी देखील हा एक उत्तम प्रयोग आहे अगदी सुप्रीम आयडीयलच गाठावे असेही नाही)
आणि हा मी तुम्हाला एक वैज्ञानिक प्रयोग सांगतोय यावर तुम्ही अजिबात विश्वास ठेवण्याची गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष करुन पाहा अनुभव घ्या तुम्हाला पटले तरच पुढे कंटीन्यु करा. पुर्ण चिकीत्सा करा प्रयोगाच्या नोंदी घ्या वाटल्यास. कामवासनेवर नियंत्रणाचा इतका नैसर्गिक प्रयोग दुसरा नाही.
याचा दुसरा एक प्रकार तंत्रविद्येत आहे ज्यात एका वेगळ्या मार्गाने वरील हेतु साध्य केला जातो.
मात्र तो इथे सार्वजनिक संस्थळावर सांगण्यासारखा नाही.
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>दिवसातुन जमेल तितक्यावेळा गुद्द्व्वार आकुंचित करावे <<
ही तर प्रोस्टेट मसाजाची पूर्वतयारी वाटते. अशाने कसा पाळायचा ब्रह्मचर्य?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

ह्म्म्म ऊर्ध्वरेता हा शब्द कोणत्यातरी बहुतेक शंकरांच्या सहस्रनाम स्तोत्रात वाचलेला आहे.
मारुतीच्या घामाचा थेंब गिळून एक राक्षसिण गर्भवती कशी राहीली हे न सुटलेले कोडे आहे.
आणि नवनाथसार मध्ये तर हनुमानाच्या भुभु:काराने स्त्रियांचे गर्भ पडत वगैरे वर्णन वाचलेले. ते कसे काय होत असावे तेही कळले नाही.
___
अचरटजी छान खुसखुशीत शैलीमध्ये लेख लिहीला आहे. अजुन लिहीत जा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सर्वांना.
काल परवा आदूबाळाच्या खरडीत लंगोटाबद्दल उल्लेख आला होता त्यावर एक छोटीशी खरड मी लिहिल्यावर अण्णा बापट म्हणाले सांगून टाका.मी विचार केला केला "ब्रम्हचर्य म्हणजे काय?" यावर आपली मते मांडणे ,कुठे कोणी काय लिहिले,माझे मत इत्यादी चर्चा वाढवण्यापेक्षा प्रत्यक्ष या विषयाशी संबंध कसा आला,तेव्हा त्याचा अर्थ काय घेऊन चाललो एवढेच लिहावे.तसे केले.गोनि दांडेकरांच्या कुणा एकाची भ्रमणगाथा मधला किस्सा,विनोबा भावे यांचेकडे आलेला ब्रम्हचारी होऊ उत्सुक हे माहिती असेलच.ही एक असाध्य गोष्ट आहे आणि झालीच तर त्याची आय रडते असा प्रकार आहे. ब्रह्म बरोबर का ब्रम्ह याविषयी खात्री करून घेतली होती.ब्रम्हम जानाति इति ब्राम्हण:/ ब्रम्हदेव/ब्रम्हपुत्र नदी
इत्यादी आहे.इंग्रजीतल्या brahmin = bra~min उच्चारावरून ब्राह्मण लिहू लागले असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रह्म बरोबर का ब्रम्ह याविषयी खात्री करून घेतली होती.ब्रम्हम जानाति इति ब्राम्हण:/ ब्रम्हदेव/ब्रम्हपुत्र नदी
इत्यादी आहे.इंग्रजीतल्या brahmin = bra~min उच्चारावरून ब्राह्मण लिहू लागले असावेत.

चूक. इंग्रजीतील स्पेलिंग संस्कृतावरून आलेले आहे. ह ला म जोडलेले आहे. ह अगोदर, म नंतर. इनफॅक्ट प्रह्लाद, आह्लाद, चिह्न, आह्वान, जिह्वा इ. शब्दही तसेच आहेत. सगळीकडे मूळ संस्कृतात ह अगोदर असते. मराठी लकबीमुळे ते नंतर येते. मराठी लकबीत ठसठशीत स्पष्ट उच्चार केला जातो. त्यात क्रमाची अदलाबदल केली तरी चालते.

बायदवे 'र्‍हस्व' हा शब्दही तसाच. इथेही ह अगोदर, र नंतर. ओरिजिनल स्पेलिंग ह्रस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अब्राहम (इब्राहिम) चा काही संबंध आहे का रे ब्याट्या, या सगळ्याशी ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅट्या पापम, अब्रह्मण्यम = अब्राहिम का रे Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ लेखातील सर्वच बाबतीत सहमत आहेच. त्यात आमच्याही वेळी , पौगंडावस्थेत असतांना, ( इयत्ता सहावी/सातवी त असेन मी तेव्हा ) ' ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हाच म्रूत्यु " असे कोणा स्वामी शिवानंद लिखित पुस्तक वाचण्यात आले होते. त्यातही अशाच, लहानपणी ' भयंकर ' वाटाव्यात अशा काही गोष्टींचा भरणा होता. त्यानुसार प्रयोग सुद्धा करुन पाहिले गेलेत. उदाहरणार्थ शाळेत असतांना, आपल्या लघवीच्या धारेने, जमीनीवर खड्डा पडलाच पाहिजे, अन्यथा 'ब्रह्मचर्य' धोक्यात ! ! आपण कवायत करीत असतांना, दोन्ही पाय व अंगठे जुळवून उभे राहिले असता, आपले गुढगे जर एकमेकांना स्पर्श करीत असतील तर 'ब्रहम्चर्य' धोक्यात ! ! ( आणि अशांना सैन्यात घेत नाही असेही ऐकले होते ). आता सर्वच काही आठवत नाही, पण त्यातील एक वाक्य मी व्यक्तिशः फारच मनावर घेतले होते आणि त्याचा पुढील सर्व आयुष्यात माझा फायदाच झाला.
" चहा, कॉफी,मद्य,सिगारेट्,बीडी, तंबाखू इ.इ. सर्व उत्तेजक द्रव्ये आहेत, ती तात्पुरती परिणाम करतात , त्यामुळे आपणास 'व्यसन' लागू शकते. आणि 'व्यसन' शब्दाचा अर्थ ' संकट ' असा आहे, मग आपण संकट मागे का लावून घ्यायचे ? " ते वाक्य वाचल्यानंतर, जो चहाच घेत होतो, तोही बंद केला, आणि बाकीच्या गोष्टींकडे वळण्याची पुढे कधीच प्रव्रुत्ती झाली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रोस्टेट ग्लँडचा आणि लैंगिक शक्तीचा तसा काही संबंध नाही.
वृषणामध्ये जो अवयव असतो तो म्हणजे टेस्टीज.
टेस्टेस्टेरॉन नावाचे हॉर्मोन त्यातून सिक्रिट होते.
पुरुषीपणाची बाह्य लक्षणे आणि स्पर्मचे मॅच्युरेशन या करिता टेस्टेस्टेरॉन जरूरीचे असते.
सेक्स ड्राईव करिताही.

प्रोस्टेट ची सिक्रीशन स्पर्मसचं संरक्षण आणि पोषण करतात आणि सिमेनला एक व्हॉल्यूम देतात ज्यामुळे स्पर्म आरामात व्हजायनापर्यंत पोहोचतील.

मूळात सेक्स ड्राईव मात्र मेंदूतल्या लिंबिक सिस्टीम नावाच्या भागात सुरू होतो.

त्यानंतर अटोनोमिक नर्वस सिस्टीमच्या द्वारे इरेक्शनची क्रिया घडते.

प्रोस्टेट ग्रंथी बाहेर दिसत नाही. बैल ठेचतात तेव्हा वृषण ठेचतात. टेस्टीज ठेचल्या जाऊन स्पर्मस तयार होत नाहीत आणि स्पर्म कॅरी करणार्‍या नळ्या म्हंजे वास डिफरंस ठेचून बंद करतात.
पुरुषांचे कुटुंबनियोजन ऑपरेशन करताना फक्त या नळ्याच बंद करतात.
यामुळे प्रोस्टेटचे सिक्रीशन बाहेर येते पण टेस्टिजमधून येणारे स्पर्म बाहेर येत नाहीत.

उर्ध्वरेता म्हणजे वरच्या दिशेने इजॅक्युलेट करणारे.
इरेक्टेड पेनिसची दिशा कशी असते याचा एक स्टडी आहे.
त्यात अगदी शून्य डिग्री म्हणजे पोटाला घासून आणि एकशे एंशी डिग्री म्हणजे पायात केवळ पाच टक्के प्रत्येकी लोकांचेच इरेक्शन होते.
बाकीचे नव्वद टक्के लोक याच्या अधेमध्ये. ३० डिग्री ते ९५ डिग्रीत ७० टक्के पुरुष असतात.
त्यामूळे शंकराच्या 'उर्ध्वरेत' प्रकाराला एवढा युनिकनेस मिळाला असावा असे वाटते.
Wink

स्पर्मच्या योग्य वाढीसाठी शरीरापेक्षा थोडे कमी तापमान हवे असते.
म्हणून 'देवाने ' ओवरीजसारखे टेस्टीज उदर पोकळीत न ठेवता आपण जन्माला येण्यापूर्वी तयार झालेल्या टेस्टीज सरकत सरकत वृषणात येऊन पोहोचायची व्यवस्था केलेली असते.
त्यामुळे लंगोट घालण्याने उलट मोकळी हवा मिळून स्पर्मचे पोषण छान होईल.
लंगोट करकचून आवळल्यावर मात्र उष्णता वाढून स्पर्म / टेस्टिस्टेरॉन्/सेक्स ड्राईव कमी होते का ते पहायला हवे.

ब्रह्मचर्य हेच जीवन , वीर्यनाश हाच मृत्यु या मूर्ख प्रचारामुळे पौंगंडावस्थेतील बरेच पेशंट झोपेत धातू गेल्याने 'वीकनेस' येतो अशी तक्रार करतात.
बर्‍याचदा मोठेही.
हा प्रकार भारतीय उपखंडातच जास्त दिसतो.( म्हणजे स्वप्नदोषामुळे वीकनेस येतो हा कन्सेप्ट)
वैद्यकशास्त्रात सायकिअ‍ॅट्रीत या प्रकाराला 'धात सिंड्रोम' असे म्हणतात.

मुंबईत असताना भैया लोकांना हा सिंड्रोम जास्त पाहिला.
आम्ही मजेत म्हणायचो. भैया लोकांचे टिपीकल आजार-
लहान मुले- गुरगुरात है (छातीतून गुरगुर आवाज येतो)
बायका- पिरात है (इथे - तिथे दुखत रहातं. यांचे केसही दुखतात.)
पुरुष- धात है ( झोपेत्/लघवीत पांढरे जाते, शीघ्रपतन होते आणि विकनेस येतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीच माहीत नव्हते Sad

मूळात सेक्स ड्राईव मात्र मेंदूतल्या लिंबिक सिस्टीम नावाच्या भागात सुरू होतो.

ओहो!! असं आहे.
.
केशर अ‍ॅफ्रोडिझिअ‍ॅक असते असे म्हणतात ( जे मला पटते ;)) त्याचा लिंबिक सिस्टीमवरती परिणाम होत असावा बहुतेक. माफक व्यायामाचाही होत असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लंगोट करकचून आवळल्यावर मात्र उष्णता वाढून स्पर्म / टेस्टिस्टेरॉन्/सेक्स ड्राईव कमी होते का ते पहायला हवे.

बॉक्सर्स वि. ब्रिफ्स असा गुगल सर्च केल्यास यावरही पुष्कळ संशोधन झाल्याचे आढळेल. बाकी, अर्वाचीन भारततील वीर्यनाश टाळण्याकरता (आणि ब्रह्मचर्य पाळण्याकरता) केलेल्या खटाटोपी मिळाल्यास जरूर वाचा. लै करमणूक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बॉक्सर्स वि. ब्रिफ्स असा गुगल सर्च केल्यास यावरही पुष्कळ संशोधन झाल्याचे आढळेल. बाकी, अर्वाचीन भारततील वीर्यनाश टाळण्याकरता (आणि ब्रह्मचर्य पाळण्याकरता) केलेल्या खटाटोपी मिळाल्यास जरूर वाचा. लै करमणूक आहे.

Smile असो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पूर्ण सत्य नसावे. बरयाच हठयोगाच्या सरावानंतर योगीजन म्हणे "orgasm without ejaculation" जमवतात.
have your cake and eat it too. अश्या प्रकाराला उर्ध्वरेत म्हणता असे सांगणारी Q नामक DIRECTOR ची "Love in India" ही Documentary पहिल्याची आठवते. "Love in India" मध्ये "विवरत विलास" नामक बंगाली ग्रंथाचा उल्लेख आहे. त्यानुसार राधेने कृष्णाला ही trick शिकविली म्हणे. आणि त्याच्या भविष्याची तजवीज केली.

एरवी "वरच्या दिशेने" किंवा "खालच्या दिशेने" हे position वरून ठरणार - नाही का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केरळ-तिरुवनंपुरमच्या पद्मनाभस्वामि मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील यौगिक मुद्रा पाहताना हा काय प्रकार आहे असा विचार येतो.एक योगी स्वत:चे लिंग दोन्ही हातांनी धरून आहे.तेसुद्धा त्याच्या खांद्यापर्यंत वर आलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक योगी स्वत:चे लिंग दोन्ही हातांनी धरून आहे.तेसुद्धा त्याच्या खांद्यापर्यंत वर आलेले आहे.

लक्की बास्टर्ड!!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिडा काका - लकी कसला ? दुर्दैवी जीव आहे तो. तुम्ही विचार करुन बघा असे काही झाले तर कीती अवघड होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही विचार करुन बघा असे काही झाले तर कीती अवघड होइल.

असं काही झालं तर पुरुषाला अजून कोणाची गरजच भासणार नाही. मग ते टॉन्टिंग, ते रुसवेफुगवे, त्या मनधरण्या, सगळं सगळं बाद!!!
सगळेच पुरूष मग योगी/एक्स्टिंक्ट होतील!!!! Smile

भोगी म्हणूनि उपहासा, मी योगी मर्माचा!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपलेच दात आपलेच ओठ सारखी नवी म्हण येईल मग!

आपलेच ** , आपलेच ओठ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठ्ठो ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(तिथे दात असतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित

आपलेच दात, आपलाच *ट!

अशी म्हण अधिक रास्त ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे देवा. काय कल्पनाशक्ती आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आफ्रिकेत योगाचा प्रसार केला तरी हे साध्य होईलसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मंदिर सकाळी ११ ते ४ बंद असते.फारिनरना प्रवेश नसावा.फोटोग्राफिला अर्थातच बंदी आहे.बरीचशी शिल्पे (relief type ) खांबंवर समोरच आहेत,जमिनीपासून दोन ते पाच फुटांवर आणि दोनतीन फुट उंचीची आहेत.साठएक खांब असतील.खजुराहो पद्धतिची श्रृंगारिक नाहीत.दीड फुट उंचीचा दगडी कटटा खांबाभोवती असून काही भाविक प्रदक्षिणा घालताना शिल्पांनाच खेटून गप्पा मारत बसलेले त्यामुळे जरा निरखता आले नाही.शंकराच्या देवळांत लिंगपुजाच असल्याने आणि शैवभक्त अशा काही योगसाधना करता दाख णे समजू शकतो पण विष्णूच्या देवळात कसे?
कुणाच्या अभ्यासात बसत असेल त्याने अवश्य पाहावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक योगी स्वत:चे लिंग दोन्ही हातांनी धरून आहे.तेसुद्धा त्याच्या खांद्यापर्यंत वर आलेले आहे
संबंधित बाई आणि अव्हेलेबल स्पेस किती भव्य असेल याची कल्पनाच करवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सर्व फक्त ब्रम्हचर्याची शक्ती दाखवण्यासाठी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साती ,बॅटमॅन बरेच अज्ञान दूर झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रह्मचर्य वगैरे गोष्टी कमालीच्या अनैसर्गिक , कृत्रिम व बिन गरजेच्या वाटतात . शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने . कशाला पाळायचे ब्रह्मचर्य ? सेक्स हि एक अत्यंत नैसर्गिक, मस्त आणि उत्तम गोष्ट आहे . ती इच्छा का दाबून ठेवायची ? आकलनशक्तीच्या पलीकडची गोष्ट आहे ही . सर्वच धर्मांमध्ये ब्रह्मचर्य या गोष्टीला उगाचच एका उंच उदात्त पातळीवर नेऊन ठेवलेले दिसते . (मग ते तथाकथित योगी वगैरे असोत किंवा ख्रिश्चनिटी मधील धर्मगुरू आणि नन्स असोत) .

या उगाचच उंच दर्जामुळे समाजात ब्रम्हचाऱ्याबद्दल अवाजवी सुप्त आदर वगैरे प्रचलित असावा . प्रपंच , सेक्स वगैरे गोष्टीना ' रिपु ' वगैरे असल्या लेबल खालती त्याला एक नीच दर्जा दिला गेलाय . भंकस आहे हे ब्रह्मचर्य वगैरे . सेक्स या गोष्टीचा मनमुराद आनंद घ्यावा आणि तृप्त व्हावे .
भर सदाशिव पेठेत वाढूनही कधी 'उच्चं अश्या ब्रह्मचर्या करिता लंगोट घालणे 'या अपप्रचारापासून कसा काय पण मी अन एक्सपोज्ड राहिलो . लंगोट आणि व्यायाम , मटेरियल सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने उत्तम वस्त्र एवढाच अप प्रचार मला मिळाला . या बाबत साती यांनी मेडिकल फॅक्टस शास्त्रीय दृष्ट्या उत्तम पध्धतीने लिहिल्यामुळे त्याला माझी वीट जोडत नाही. पण एक गम्मत सांगतो . आमच्या क्रिकेट च्या टीम मध्ये असाच एक लंगोटाभिमानी होता . लय पिडायचा . एका मॅच च्यावेळी त्याला , तुझा लंगोट इतका भारी आहे ना , तर मग आज abdominal गार्ड न घालता बॅटींग कर असा भरपूर आग्रह सगळ्यांनी केला ( समोरच्या टीम मध्ये रणजी खेळणारा पेस बोलर होता ) त्या दिवसापासून लंगोटाचे महत्व या भंकस पासून सगळ्यांची सुटका झाली

अवान्तर : " गोनि दांडेकरांच्या कुणा एकाची भ्रमणगाथा मधला किस्सा," हा माहित आहे . "विनोबा भावे यांचेकडे आलेला ब्रम्हचारी होऊ उत्सुक " हे काय आहे ? लिहाल का जरा डिट्टेल मधे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात खवचट काय आहे हे कुणी समजावून सांगेल का ? अत्यंत सिरिअसली लिहिलंय मी . का माझी कमेंट आली कि ऑटो मध्ये खवचट श्रेणी येते ? ( हे खवचट आहे )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेक्स या गोष्टीचा मनमुराद
आनंद घ्यावा आणि तृप्त व्हावे .>>>>>>>>>>>>सेक्स या गोष्टीचा मनमुराद आनंद घ्यावा इतपत ठीक आहे ,पण त्याने माणुस तृप्त होतो असे नाही.आज ही साठीला आलेले म्हातारे तरुण मुलींच्या छाती ,नितंबांकडे वखवखलेल्या नजरेने बघताना दिसले की ही तृप्तीची संकल्पना कीती भ्रामक आहे हे लक्षात येते.ज्यांनी तीस चाळीस वर्ष सेक्सचा आनंद घेतला आहे त्यांची नजरही वखवखलेली असेल तर काय ते समजुन जावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

अन्न या गोष्टीचा मनमुराद
आनंद घ्यावा आणि तृप्त व्हावे .>>>>>>>>>>>>अन्न या गोष्टीचा मनमुराद आनंद घ्यावा इतपत ठीक आहे ,पण त्याने माणुस तृप्त होतो असे नाही.आज ही साठीला आलेले म्हातारे दुकानात ठेवलेल्या केक-पेस्ट्रीजकडे वखवखलेल्या नजरेने बघताना दिसले की ही तृप्तीची संकल्पना कीती भ्रामक आहे हे लक्षात येते.ज्यांनी तीस चाळीस वर्ष अन्नाचा आनंद घेतला आहे त्यांची नजरही वखवखलेली असेल तर काय ते समजुन जावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुर्जी - १११११११११

साठाव्या वर्षी खावेसे वाटणेच गुन्हा आहे असे ग्रेट थिंकींग दिसतय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साठाव्या वर्षी खावेसे वाटणे हा वेगळा प्रकार आहे ,ते सर्व्हायवल instinct आहे.सेक्स हा काही survival instinct नाही.तरीही सेक्सच्या बाबतीत तृप्तीची संकल्पना कीति भ्रामक आहे या साठी साठ वर्षाच्या म्हातार्यांचं उदाहरण दिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

घासुगुर्जी ठ्ठो प्रतिसाद दिलास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

मला तर 'माहितीपूर्ण ' दिसतंय.दिलेल्या सर्व श्रेणी कशा पाहायच्या?समजा चारजणांनी रोचक दिली आणि शेवटी पाचव्या कुणीतरी अवांतर श्रेणी दिली तर कोणती दिसेल?सर्व पाहता येतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो आधी खवचट होती श्रेणी , मग कोणीतरी थर्ड अंपायर नि निर्णय फिरवला बहुतेक मी रिव्यू मागितल्यावर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विनोबांकडे आलेला एक तरुण म्हणतो मला तुमच्यासारखे ब्रम्हचर्य घ्यायचे आहे काय करू? "आता जी पहिली मुलगी सांगून येईल तिच्याशी लग्न कर.विचारताय म्हणजे तुम्हाला झेपणारं नाहीये." थोडक्यात मानसिक तयारी नसेल तर बाह्य उपचारांनी/मारून मुटकून अशक्य वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीर हा शब्द वीर्य या शब्दाशी संबंधित आहे का ?
अमुक धमुक माणूस उफाळलेल्या वीर्याचा आहे, वीर्यवान आहे असे वाक्प्रचार पूर्वी पासून ऐकले आहेत.
शरीरातले वीर्याचे प्रमाण आणि निस्तेजपणा/सतेजपणा यांचा संबंध असावा असे वाटते.
खूप जास्त हस्त मैथुन करणार्‍या एका ओळखीच्या अशक्त माणसाला डॉक्टरनेच आता हे थांबव असा सल्ला दिल्याचे माहित आहे. एक्सेसिव्ह सेमेन लॉस असे काहीतरी सांगितले होते.
त्यामुळे १ लिटर थेंब = १ लिटर रक्त इत्यादी अतिशयोक्त मिथमागे काही एक तर्कशुद्ध सत्य दडले असावे असे वाटते.
शिवाय योगासनांच्या एका शास्त्रोक्त पुस्तकात पद्मासन योगमुद्रेने 'स्वप्नदोष' सारखे भयंकर आजार बरे होतात' असा उल्लेख वाचल्याचे आठवते.
आणि वर्तमान पत्रांत पुरवण्यांमधे वगैरे खुशाल हस्त मैथुन योग्यच आहे वगैरे लेख वाचले की अचंबा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीर्य = वीरपणा = वीरता असा अर्थ आहे. बाय एक्स्टेन्शन तोच अर्थ प्रजोत्पादक पुरुषजन्य द्रव पदार्थालाही लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खूप जास्त हस्त मैथुन करणार्‍या एका ओळखीच्या अशक्त माणसाला डॉक्टरनेच आता हे थांबव असा सल्ला दिल्याचे माहित आहे. एक्सेसिव्ह सेमेन लॉस असे काहीतरी सांगितले होते.

कठीण आहे, डॉक्टर म्हणजे एमबीबीएस का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही डॉक्टर आहात का ? तसे असेल तर तुमची कमेंट नक्कीच वजनदार आहे.
अन्यथा डॉक्टर नाही, पुरुषही नाही. मग हस्तमैथुन या विषयावर कमेंट कशी करता येऊ शकते याचाही अचंबा वाटतो.
बाय द वे, एम्बीबीएसच.

आणि हो. इथे स्पष्टच वीर्य या श्ब्दाचा उल्लेख आहे. त्यामुळे सदर उल्लेख 'पौरुषीय हस्तमैथुन' याबद्दलच आहे हे कळले असेलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

When I began in 1960, individuality wasn't an accepted thing to look for; it was about species-specific behaviour. But animal behaviour is not hard science. There's room for intuition.
Jane Goodall

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्यथा डॉक्टर नाही, पुरुषही नाही. मग हस्तमैथुन या विषयावर कमेंट कशी करता येऊ शकते याचाही अचंबा वाटतो.

गेट लाईफ. ओपन फोरमवर येऊन तुम्ही अमक्यांनी कमेंट देऊ नये आणि तमक्यांनी कमेंट देऊ नये अशी अपेक्षा ठेवता याचा मलाही अचंबा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमक्यांनी कमेंट देऊ नये आणि तमक्यांनी कमेंट देऊ नये अशी अपेक्षा ठेवता
अचंबा वाटणे याचा अर्थ अपेक्षा ठेवणे असा आहे हे कळल्यावर अचंबा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉक्टर नाही, पुरुषही नाही. मग हस्तमैथुन या विषयावर कमेंट कशी करता येऊ शकते याचाही अचंबा वाटतो.

अरेरे! गुड लक!

अचरटकाका, खरडफळ्याशी एकनिष्ठता सोडलीत हे उत्तम. ही सगळी चर्चा वाचून साईनफेल्डचा हा भाग आठवला -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'काँटेस्ट'वाला एपिसोड जास्त सुसंदर्भ आहे असे वाटते. अशीच आपली माहितीची देवाणघेवाण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

त्या एपिसोडचा दुवा आणि जुन्या, मिसळपाववरच्या प्रतिसादावरून शैक्षणिक चौकशी असा आधी विचार केला, पण मग म्हटलं असो. त्या एपिसोडचा यूट्यूबदुवा दिला तर कल्पनाशक्तीवर मर्यादा आणल्यासारखं होईल. Wink

'साईनफेल्ड' पाठ न केलेल्या लोकांना, ह्या आणि वरच्या प्रतिसादांतल्या फक्त संदर्भासाठी हा दुवा. हे वाचून कृपया कल्पनाशक्तीवर मर्यादा आणू नयेत ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या प्रतिसादावरुन Jennifer & naughty xxxx नावाची एक व्हीसीआर वर पाहिलेली फिल्म आठवली. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला (पुन्हा एकदा) मास्टर्स आणि जॉन्सनच्या पाठ्यपुस्तकाचं मराठीत भाषांतर व्हावं असं आवर्जून वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओके. कधी करताय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण कधी होणार हे माहीत नाही; पण सुरुवात करून काही काळ लोटला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि वर्तमान पत्रांत पुरवण्यांमधे वगैरे खुशाल हस्त मैथुन योग्यच आहे वगैरे लेख वाचले की अचंबा वाटतो.

शारीरीकदृष्ट्या हस्तमैथुनात काहीही गैर नाहीच. मात्र
मानसिक पातळीवर चारीत्र्यहीनतेला ते पोषक होते. म्हणजे हस्तमैथुनामुळे समाजाची चारीत्र्यसंपन्नते कडुन चारीत्र्य लुज होण्याकडे फर्म वाटचाल सुरु होते.
म्हणजे हस्त्मैथुन करतांना "इमॅजीनेशन" हा महत्वाचा घटक असतो.
त्यात सहसा "ऑब्जेक्ट ऑफ इमॅजीनेशन" अर्थातच बहुतांश वेळा स्वधर्मस्त्री नसतेच. ( हा एक वेगळा विषय आहे की असे का असते ? उदा. रतिवैविध्य का हवे पण ते असते इतके सध्या पुरेसे आहे ) परस्त्रीच असते.
पुरुष जर अविवाहीत असला तरी त्याचे "ऑब्जेक्ट ऑफ इमॅजिनेशन" एकच कुमारी असेल जिला त्याने ह्र्द्य अर्पिले आहे तर एकवेळ ठीकच आहे
(त्यातही विवाहपुर्व पापकर्माचा मानसिक पातळीवर का होइना एक गंभीर प्रश्न आहेच ) पण त्यातही अविवाहीतांच्या "ऑब्जेक्ट " मध्ये विवाहीत परस्त्री असेल तर पुन्हा चारीत्र्याचा प्रश्न उभा राहतोच.
हे स्त्री संदर्भाला उलट करुन लावले तरी चालेल.
आपल्या संस्कृतीचाही थोडा दोष आहेच सानेगुरुजींनी म्हटलेलच आहे की

मोठ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा समाईक व्यवसाय व त्या भोवती दृढ झालेली एकत्र कुटुंबपद्धती, ही देखील पतिपत्नीतील दुरावा वाढवणारी होती. सर्व स्त्रिया एकत्र व सर्व पुरुष एकत्र, पण या दोन गटात, एक अभेद्य सीमा(सेग्रिगेशन)! असे का आवश्यक झाले यावर डॉ एम. एस. गोरे यांचे एक उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यात त्यांनी “वीकनिंग ऑफ कॉन्जुगल बाँड्स फॉर स्ट्रेंगदनिंग फ्रॅटर्नल बाँड्स” असा सिद्धांत मांडला आहे. त्याचा अर्थ असा, की जर एकत्र कुटुंब टिकवायचे असेल तर, ‘जाऊ-बंदकीतून भाऊ-बंदकी नको’, यासाठी नवराबायकोत मैत्री न होऊ देणे आवश्यक ठरले. त्यांच्यावर संवादबंदी व सहवासबंदी घातली गेली. अगदी विभक्त कुटुंब संस्थेतही ‘एक-व्रति-त्व’ ही देखील कोंडमारा करणारीच गोष्ट आहे, हे उगाचच अमान्य करण्यात अर्थ नाही..

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते चारित्र्य वगैरे झेपले नाही. माझा रोख शारिरीक नुकसान या द्रूष्टीने आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मानसिक पातळीवर चारीत्र्यहीनतेला ते पोषक होते. म्हणजे हस्तमैथुनामुळे समाजाची चारीत्र्यसंपन्नते कडुन चारीत्र्य लुज होण्याकडे फर्म वाटचाल सुरु होते.

ज्जे बात.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL हसत सुटले होते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवळावरचा कळस चढवायलाही सन्यासी/ब्रम्हचारीच लागतो.कारण काय तर त्या माणसाचा वंश नष्ट होतो म्हणे.मामाने एक छोटेसे देऊळ बांधायला घेतले होते वाड्यात.सर्व बांधकाम करून गवंडी बोलले "कळसाच्या लोखंडी शिगा बाहेर काढून ठेवल्यात.कोणी सन्यासी आणा कळस ठेवायला.नंतरचं काम आमचं.आम्ही कळस ठेवत नाही.वंशाचा नायनाट करतो."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे ब्रम्हचर्य हा पुरुषांकर्ता मर्यादित असा विषय म्हणून चर्चिला गेलाय. हा, आता लंगोट या विषयावरून सुरु झाला म्हणून तो पुरुष ब्रम्हचार्याशी घोटाळत राहिला हेही नैसर्गिक . (But आफ्टर ऑल व्हॉट इज लंगोट , जस्ट या पीस ऑफ क्लॉथ .. त्या सुप्रसिध्ध वाक्याच्या धर्तीवर ) हस्त मैथुन/स्वमैथुन ,वीर्य ,वीर , योगिक पोश्चर्स वगैरे वर घोळून घोळून चर्चा झाली. पण स्त्रीब्रह्मचर्य ( जास्त सुयोग्य शब्द न सुचल्यामुळे हेच म्हणतो),व संबंधित विषयी चर्चा न झाल्यामुळे चर्चा अर्धीच राहिली म्हणतो. काय म्हणता आचरट काका ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषांचे ब्रह्मचर्य याबद्दल दोन संकल्पना आहेत.
ज्याला इंग्रजीत सेलिबसी म्हणतात तसे म्हणजेच कधीच स्त्री संग (आणि अर्थातच पुरुषसंग/ प्राणीसंग) केला नाही / करणार नाही असे व्रत.
यात हस्तमैथुन/केवळ विचारांमुळे येणारे ताठरत्त्व आणि वीर्यपतन होणारच नाही असे नाही.
तरीही धार्मिक कारणासाठी ब्रह्मचर्य असेल तर हस्तमैथुनही यात निषिद्ध असते.

योगी पुरुष आणि इंद्रियदमन करणारे लिंगाचे उत्थान आणि वीर्यपतन अनावधानाने, विचारांनी, स्वप्नातही होऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात.
दिगंबर साधूंचे उदाहरण तर प्रसिद्धच आहे.
कमालीचा इंद्रीयसंयम असल्याने त्यांचे लिंगौत्थानही होत नाही.

मात्र प्रत्यक्षात लिंगोत्थान आणि वीर्यपतन या इतक्या इनवॉलंटरी क्रीया आहेत की बहुसंख्यांचे त्यावर नियंत्रण नसते.
त्यामुळे समाजात जेव्हा एखादा ब्रह्मचारी आहे असे म्हणतात तेव्हा त्याने स्त्रीसंग केलेला नाही इतकेच गृहीत धरले जाते.
तर जे स्वतःहून /शक्ती वाचवण्यासाठी/ उपासना म्हणून ब्रह्मचर्य व्रत घेतात ते हस्तमैथुनही करत नाहीत.
पूर्ण इंद्रीयदमन आणि इनवॉलंटरी वीर्यपतन टाळणे बहुसंख्याना शक्य आहे असे वाटत नाही.

आता स्त्रियांच्या बाबतीत वीर्यपतन होणे असा एखादा ठराविक इवेंट नसल्याने स्त्रियांना त्यामानाने ब्रह्मचर्य पाळणे शक्य होते.
ठराविक हार्मोन्सनी ठराविक शारिरीक बदल्/प्रणयोत्सुकता इत्यादी सहज शक्य असले तरी अननुभवी स्त्रियांना स्वतृप्ती करायची स्वतःहून इच्छा होणे किंवा जाणीव होणे निदान भारताततरी कॉमन नाही.
तसेच पुरुषांना जसे लहानपणापासून इनवॉलंटरी लिंगोत्थान होत असते आणि पौगंडावस्थेपासून वीर्यपतन होत असते तसे स्त्रियांना होत नाही. (मासिक पाळी या गोष्टीचा त्या अर्थाने शारिरीक सुखाशी संबंध नाही) . साहजिकच स्त्रियांना वीर्यनाश म्हणजे मृत्यू हा कन्सेप्ट लागू होत नाही.
मग स्त्रीयांकरिया योनीपटलभंग म्हणजे शारिरीक शूचितेचा नाश अशी संकल्पना आहे. मात्र योनीपटलभंग न होताही स्त्रियांना अत्युच्च कामसुख स्वतःच किंवा दुसर्‍याकडून मिळवता येऊ शकते. मग स्त्रियांच्या बाबतीतही ब्रह्मचर्य म्हणजे पुरुषाशी संग न करणे इतकाच अर्थ होतो.

पूर्वी संसारात असलेल्या /नातेसंबंधात असलेल्या स्त्रीपुरुषांनी नंतर मग ब्रह्मचर्य स्विकारले तर पुरुषांच्या बाबतीत जसे काटेकोरपणे याने पूर्ण इंद्रियदमन केलेय का हे बाह्यलक्षणांवरून ओळखणे आणि मॉनिटर करणे शक्य आहे तसे स्त्रिच्या बाबतीत पहाणे म्हणूनच 'नॉट अ‍ॅप्लिकेबल ' होते.
म्हणजे एखादा नॉट सो डिटर्माईन्ड ब्रह्मचारी केवळ फँटसाईज करत असेल तरी त्याच्याकडे कडक लक्ष ठेऊन असणारा गुरु/सहकारी त्याच्यातील शारीरीक बदल टिपू शकतो हेच एखादी नॉट सो डिटर्माईन्ड स्त्री ब्रह्मचारिणी करत असेल तर इतरांना कळून येणे अवघड आहे.

बर्‍याच स्त्रियांना 'स्वतृप्ती' या प्रकाराबद्दल काहिही अनुभव्/माहिती नसते.
असल्यास सामाजिक/ लोकलाजेस्तव त्यांनी ते कधी केलेले नसतेकिंवा क्वचितच केलेले असते.

याबाबतीत बरेच सर्वे झालेले आहेत. जालावर सापडतील.
एक डॉक्टर म्हणूनही मी सांगू शकते की (भारताततरी) स्त्रियांना स्वतृप्ती फारच क्वचित माहिती असते.

नात्यात परिचितांत एकट्या राहिलेल्या स्त्रिया/विधवा/परित्यक्ता कोणत्याही (स्वतः किंवा दुसर्‍याकडून) शारिरीक आनंद न मिळवता पूर्ण ब्रह्मचारिणी राहिलेल्या पाहिल्या आहेत.

(अण्णाबापटांना आता चर्चा दोन्ही बाजूंनी झाल्याची तृप्ती मिळावी काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1.तुमचा संपूर्ण प्रतिसाद हा (नेहमीप्रमाणे) measured आणि शास्त्रीय आहे.प्रतिसाद आवडला . धन्यवाद . 2. तुमच्या शेवटच्या कमेंट मुळे मात्र असा ( माझा तरी ) गैरसमज होतोय ,कि मी मूळ माझी कमेंट हि उथळ हेतूने (संभावित भाषेच्या बुरख्याखाली दडवून) केली आहे. ते तसे नाही.माझा हेतू ब्रह्मचर्य ( पुरुष किंवा स्त्री ),त्याला धार्मिक गोष्टीत असलेले स्थान ( किंवा vice versa)इत्यादी होता . असो.इतर कोणी लिहिलं त्याबाबत hopefully

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धार्मिक गोष्टीत असलेले स्थान माझ्या प्रतिसादात आलेलेच आहे.

जरा गंमतीत तसे शेवटचे वाक्य लिहिले हो. रागावू नका.

मलाही स्त्री - पुरुष अशा दोघांच्याही ब्रह्मचर्यविषयक संकल्पनांविषयी चर्चा व्हावीशी वाटतच होती.
म्हणूनच तर एवढं टाईपलं.

तरीपण आगाऊपणा वाटत असेल तर क्षमस्व!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(अण्णाबापटांना आता चर्चा दोन्ही बाजूंनी झाल्याची तृप्ती मिळावी काय?)

अण्णाबापटांना अपेक्षित असणारी तृप्ती माझ्या आयुष्यात तरी मिळेल असं वाटत नाही. ह्याचं कारण सातीने आधीच लिहिलेलं आहे -

बर्‍याच स्त्रियांना 'स्वतृप्ती' या प्रकाराबद्दल काहिही अनुभव/माहिती नसते.
असल्यास सामाजिक/ लोकलाजेस्तव त्यांनी ते कधी केलेले नसतेकिंवा क्वचितच केलेले असते.

याबाबतीत बरेच सर्वे झालेले आहेत. जालावर सापडतील.
एक डॉक्टर म्हणूनही मी सांगू शकते की (भारताततरी) स्त्रियांना स्वतृप्ती फारच क्वचित माहिती असते.

नात्यात परिचितांत एकट्या राहिलेल्या स्त्रिया/विधवा/परित्यक्ता कोणत्याही (स्वतः किंवा दुसर्‍याकडून) शारिरीक आनंद न मिळवता पूर्ण ब्रह्मचारिणी राहिलेल्या पाहिल्या आहेत.

ही अभिमानाने मिरवण्याची गोष्ट अर्थातच नाही; पण वास्तव हे असं असण्याबद्दल मला अजिबातच शंका नाही. (आता 'स्वप्नातल्या कळ्यांनो' हे गाणं अगदीच सनातन आणि पुरुषप्रधान वाटायला लागलं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>(अण्णाबापटांना आता चर्चा दोन्ही बाजूंनी झाल्याची तृप्ती मिळावी काय?)>>
अशा खरडींना फार ओडिटरच्या शेय्रागत प्रतिखरड न लिहिता तसाच काही पासिंग शॅाट (टेनिस) मारला असतात अण्णा तर मजा आली असती.
अण्णा तुमची खरड कालच पाहिली होती पण म्हटलं उद्या लिहू.मला शक्यतोवर माझे अनुभव लिहायचे आहेत.बर्म्हचर्य म्हणजे मला काय समजलं आणि ते कितपत झेपलं.स्त्रियांच्या बद्दलचा हा मुद्दा घेतला तर फक्त ऐकीव अथवा वाचनातून मिळालेले मुद्दे मांडता येतील.ते मांडीनच नंतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आचरट बाबा , टेनिस चा पासिंग शॉट हे पटले.( त्या गब्बर ला हि उगाचच जास्त लिहिले मी )पुढच्या वेळी प्रयत्न ...अजून काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रम्हचर्य हा विषय मला वाटतं धर्माचरण /पालनकर्ते यांनीच उचलून धरला आहे/होता. पुरुष जर याचे पालन करतील तर ते अधिक चांगल्या रीतीने लक्ष घालतील,मोक्ष मिळेल. स्त्रीला निसर्गाने संतती निर्माण, संगोपन करण्यासाठी शरीर निर्माण केलं आहे त्यांचा वापर करणेच तिचं बलस्थान आहे. न करून कौमार्य राखणे (celibacy) निरर्थक ठरते. ती माता होण्याची प्रवृत्ती इतकी प्रखर असते की हजार ब्रम्हचर्यांची शक्ती निष्प्रभ होईल. बुद्धाकडे नंतर बायको आणि आई भिक्षुकीची दीक्षा घ्यायला आल्या तेव्हा गौतम तयार होईना. स्त्रियाच भिक्षुकी झाल्यावर सर्व समाजव्यवस्थाच कोलमडेल अशी भीती वाटलेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्हे. भिख्खूसंघात बायका आल्या तर पुरुष भिख्खूंचे चित्त विचलित होऊन भिख्खूसंघाची वाट लागेल असे वरिजिनल मत असल्यामुळे नो एण्ट्री होती. पण नंतर पब्लिक डिमांड लै वाढल्यामुळे लेडीज़ बायकांचा शेप्रेट भिख्खुणीसंघ करण्यात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>सर्वच धर्मांमध्ये ब्रह्मचर्य या गोष्टीला उगाचच एका उंच उदात्त पातळीवर नेऊन ठेवलेले दिसते . (मग ते तथाकथित योगी वगैरे असोत किंवा ख्रिश्चनिटी मधील धर्मगुरू आणि नन्स असोत) .<<

अगदी असेच काही नाही. विविधतेने नटलेल्या देशात " संभोगातून समाधीकडे" जाण्याचा विकल्प सुद्धा उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

" संभोगातून समाधीकडे"

तुम्हाला जर रजनिशांच्या वाक्या बद्दल बोलायचे अस्ल तर ते संभिगातुन नसुन संभोगापासुन ( दुर ) समाधीकडे असे आहे. (अशी माझी समजुत आहे )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजूत चूक आहे.
कुणा महाराजांना गांजाची चिलीम समाधी सुख देईल. तसेच results ओशोना अपेक्षित असावेत. मला समाधी कश्याला म्हणतात याची कल्पना नसल्याने अधिक तुलना जमायची नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

NOT THROUGH SEX TO ENLIGHTMENT

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

संभोगातुन समाधीकडे या विकल्पाविषयी आपले काय मत आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाधी म्हणजे प्राण/मन यापासून शरीराची फारकत करणे असावे. शरीराच्या पंचेद्रियांचाच विसर पडण्याची क्रिया असावी. त्यातून अत्यानंद मिळतो असं म्हणतात परंतू फारच थोडे हे साध्य करू शकतात. समाधीअवस्थेत दीर्घकाळ शरीर गेल्यास हळूहळू झिजून नष्ट होईल आणि जिवंत समाधी होत असेल. ज्ञानेश्वरांनी घेतलेली. थोडया काळासाठी महाराज,योगी,संत या अवस्थेत जायचे असं सांगतात.
ओशोंनी असा विचार मांडला असेल की संभोगातून दीर्घकाळ नाही परंतू अल्पकालिक समाधीसदृष्य अत्यानंद मिळवता येईल, शरीरांचाच विसर पाडता येईल,जे एकाला शक्य नाही ते दोन शरीरे एकत्र येऊन साध्य करता येईल. - संभोगातून समाधीकडे. पाश्चात्य संस्कृती नागरिकांना याचं आकर्षण वाटले नाही तर नवलच. तसं पाहिलं तर साडेचार हजार वर्षांपुर्वीच्या पिरॅमिडात ममिबरोबर ठेवण्यात आलेल्या चांगल्या वस्तुंत तरुण मुलींचेही सांगाडे आहेत. कामेच्छा आणि संभोग मुडदे को भी खडा कर देगा हाच विश्वास असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थांबा माझ्याकडचं "Intimate Kisses" पुस्तक काढते व मस्त कविता देते. मला शॅरन ओल्डस ची एक कविता भयानक आवडते तीच देते.
_____

I cannot forget the woman in the mirror

Backwards and upside down in the twilight, that
woman on all fours, her head
dangeling and suffused, her lean
haunches, the area of darkness,the flanks
and ass narrow and pale as deer's and those
breasts hanging down toward the center of the earth
like plummets, when I
swayed from side to side they swayed, it was
so dark, I couldn't tell if they were gold or
plum or rose,I cannot get over her
moving toward him upside down in a mirror, like a
fly on the ceiling, her head hanging down and her
tongue long and black as anteater's
going towards his body she was so clearly an
animal , she was an Iroquise scout creeping
naked and noiseless, and when I looked at her
she looked at me so directly, her eyes so
dark, her stare said to me I
belong here, this is mine, I am living out my
true life on this earth

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत असं contemporary साहित्य लेखन होतं का अजून पौराणिक रासक्रीडेतला अध्यात्मिक अर्थामध्येच अडकून पडलेत? अप्पा जोगळेकरांस माहित असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुसु टाकत असतात contemporary कविता.
मी एक टाकली होती - वयात येण्याची घाई झालेल्या मुलीबद्दल आहे ती कविता. सापडली तर देते.
.....सापडत नाही.
_____
बर्‍याच बर्‍याच वर्षांपूर्वी कविता महाजन यांचा ब्लॉग सापडल्यानंतर त्यांच्या कविता वाचनात आल्या होत्या. अप्रतिम होत्या. शोधून देते.
https://kavitamahajan.wordpress.com/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF...
खूप वेगवेगळे विषय आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुमारे ३ अठवडे इकडे फिरकता आलं नाही.

त्यामुळे इतका इंटरेस्टिंग विषय असून, "गाढवही गेले अन ब्रह्मचर्यही गेले" अशी कंडीशन झालीये. काही गोष्टी सुचताहेत पण आता जौदेत. गेलं ते ब्रह्मचर्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नाय नाय - लिहा तुम्ही. आमचा गाढवपणा अमर्याद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आमचा गाढवपणा स्लो आहे. बराचवेळ रस्त्यात एकेठिकाणी उभे राहतो स्थितप्रज्ञासारखे. नंतर उधळतो शेपटीला डबा/फटाक्याची माळ लावल्यागत.खुप विचार करतो आणि साली कोया फोडी एकाच चवीने खातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर आहे पण आजच बातमी वाचली.

चीन ने गाढवांची मोठ्या प्रमाणावर आयात केल्यामुळे आफ्रीकेत गाढवे दुर्मीळ होतायत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0