T minus ४ महिने

आमचा चिरंजीव उणे ४ महिन्याचा असताना (म्हणजेच गर्भात असताना लिहिलेला लेख इथे पोस्ट करत आहे. केवळ करमणूक म्हणून घ्यावा. धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश्य नाही).
======

नमस्कार !
आजपासून देवाने मला ऐकण्याची शक्ती दिली. खरंतर देवाने वैगेरे काही दिली नाही, पण तसं म्हटल्याशिवाय तुम्ही लोकं पुढं वाचणार नाही.

बहुतेक Take off ची वेळ जवळ येतेय. तुमच्यात Take off कशाला म्हणतात माहित नाही पण आमच्यात तर यालाच Take off म्हणतात.

काय विचारताय....?
मला ऐकू आलेला पहिला शब्द? तुम्हाला पहिल्या शब्दाचे एवढं काय वेड असतं बुवा? मला वाटतं आम्ही जो पहिला शब्द उच्चारतो तो उच्चारण्याआधी आम्ही बरंच काही बोललेलो असतो पण *तुम्हाला* ते कळत नाही आणि शी झाल्यावरंच तुम्ही पळत येता....अहो हसताय काय....आम्ही उच्चारलेला पहिला शब्द दुसरा तिसरा कुठला नसून 'शी' किवा फारतर 'सू' हाच असतो. पण तुम्ही ते ऐकतंच नाही आणि मग ते प्रकरण तुम्हाला निस्तरावं लागतं.....

असो! back to मी *ऐकलेला* पहिला शब्द. मी ऐकायला लागलो तेव्हा आई बाबा काहीसं बोलत होते.
आई : म s s s...........जा...वयतंय (आईला म्हणायचं होतं "मला पोटात जाणवतंय"). आयुष्यात ऐकलेला पहिला आवाज आईचा होता...तो क्षण मी आजतायागत विसरलेलो नाही....कारण तो क्षण आजच घडला होता....
तरीही अजून मी एकही शब्द स्पष्टपणे ऐकलो नव्हतो. पुढे बाबांचा आवाज ऐकू आला...)
बाबा : कार्टं पोटात मस्ती करायलंय वाटतं (मी ऐकलेला पहिला शब्द "कार्टं". मला त्याचा अर्थ निटसा कळला नाही पण तुमच्या जगात बाळाला प्रेमाने कार्टं म्हणत असावेत वाटतं. मला ते ऐकून इतका आनंद झाला म्हणून सांगू. लगेच status update करून टाकलं "baba called me कार्टं."

लगेच प्राचीच्या बाळाने 'like' ही केले. आश्चर्य करू नका. तुमच्यात जसे facebook असतं तसं आमच्यात ही "गर्भBook" असतं. इथं जरी तंगड्या पसरायला space नसली तरी आम्हाला feelings share करायला वेगळीच "space" आहे.

आता डोळा लागलाच होता तोच एक भयानक असं रडणं कानावर पडलं. सुरवातीला काय चाललंय काय कळेनाच. कोणीतरी बुवा मोठमोठ्याने किंकाळत होता. बाबा जोरजोरात हसत होते. आई म्हणाली तेव्हा कळलं कि तो बुवा माझ्यावर संस्कार व्हावेत म्हणून काहीतरी मंत्र म्हणत होता (त्याला किंकाळणं म्हनावं कि मंत्र ह्या संभ्रमात) आणि बाबा त्याची मस्करी करत होते. बघू काय घडतात बालाजीचे ह्या बाळाजीवर संस्कार. त्यांचे ते मंत्र संपताच सुदेश भोसले ह्यांचे प्रवचन सुरु झाले. हे कळेल असे इंग्रजीत होते. नंतर समजले कि तो आवाज सुदेश भोसलेचा नसून अमिताभ नावाच्या टोनग्याने त्याची नक्कल केली होती म्हणे. बरी केली होती!

बरं आता आईची झोपायची वेळ झालीय. मीसुद्धा एखादी डुलकी काढतो. सकाळ पासून एवढं सगळं ऐकून कानाचे भजं झालंय त्याला जरा आराम मिळू दे...

काही नविन समजलं तर कळंवतोच...

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

कल्पनाशक्ती अफाट. हे बाळ स्टँडअप करायला लावणार हे नक्की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

और मंगताय. चाहे तो यही धागा "संपादीत" करो.
हे तर फारच गुंडाळलत की ओ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज बाबा आईला म्हणत होते, अजून चालेल की, का उगाच नाही म्हणतीयेस. त्यावर आईचं, 'नको ना, नको ना', असं ऐकू आलं. काही कळलं नाही, पण 'गबु' वर पोस्ट केलं. तर चार पाच 'गडबडा लोळण्याच्या स्माईली ऐकू आल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवरा ROFL
ग. बु. म्हणजे काय?
_____
ओहोहो गर्भ बुक ... कळ्ळं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ कल्पना रोचक आहे; पण विस्तार फार आवडला नाही. (इथे गर्भावरून कोटी करण्याचा मोह आवरला आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.