सिर्फ नामही काफी है!

गेल्या अडीच वर्षात मराठी आंजावर स्वतःचे एक खास स्थान किंवा ब्रँडनेम बनवणार्या आयडी कोणकोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा धागा.

* मोदीभक्त किंवा मोदीद्वेष्टे 'एवढीच' ओळख असलेल्यांना यातून वगळले आहे.

* फार जुनी, सध्या फारशी अॅक्टीव नसलेली नावं नकोत. कारण आताच्या नवीन लोकांना ती माहीत नसणार.

* गेल्या अडीच वर्षात मआंजावर खळबळ माजवणारे आयडी हवेत. You can love them, you can hate them, but you can't ignore them. वाचकांच्या किंवा त्यांच्याशी संवाद साधणार्यांच्या भावना को हिलाके रख देनेवाले आयडी!
बर्याचजणांना ते इरीटेट करतात. पण त्यांचा स्वतःचा फ्यान फॉलोवींग/कल्टदेखील असतो. आपापले शांतपणे येऊन, अभ्यासू धागे/प्रतिसाद टाकून गपचूप राहणारे आयडी हे नाहीत...

* ऐसी, माबो, मिपा या तीन साइट्सच्या माझ्या अल्प अभ्यासावरुन मी काही नावं दिली आहेत.

* त्याखेरीज इतर नावंदेखील सुचवू शकता. एकापेक्षा अधिक लोकांनी सुचवल्यास त्या आयडीला नामांकन देण्यात येइल.

* सुरवातीला रेडीओ बटन दिल्याने एकच पर्याय निवडता येत होता. पण आता तुमचे टॉप ३ पर्याय निवडू शकता.

तर मग करा चालू नॉमिनेशन्स, प्रचार आणि मतदानची रणधुमाळी!

प्रतिक्रिया

आमच्या लाडक्या मनोबाचे नाव का नाही ह्या लिस्ट मधे?

एकाच वेळी बर्याच लोकांना तितरबितर करायची क्षमता मनोबात थोडी कमी आहे या बाकी नावांपेक्षा Wink

मला तरी चांगलाच तीतरबितर करतो मनोबा.

ही तिन संस्थळे गृहीत धरायची तर फक्त बॅटमॅन हे नाव प्रथम आहे. त्यानंतर संदीप डांगे.

फक्त ऐसीचा विचार केला तर खळबळजनक फक्त अनु राव.

actions not reactions..!...!

मनोबा च नाव पाहिजेच , त्याशिवाय पोल अधुरा हय

टिच्चुन भांडण्याने ब्रँडनेम बनते व्हय?
बर्र....... तसे असले तर आमचा जिगर बॅटोभा भांडतो कच्चून पण वेळेअभावी कन्सीस्टन्सी नसते.
बाकी सगळं सोडून भांडणासाठी भांडणारा आयडी म्हणले तर डांगे आणी संजय क्षीरसागरच.

टिक द बॉक्स पोल पायजे. रेडियो बटण नाही.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आणि आबा पायजेच, नैतर जंतू कावेल.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मनोबा लैच पॉप्युलर दिस्तोय. दिला बघा त्याचा पर्याय.

आणि एकच पर्यायाऐवजी तीन पर्याय निवडणे अलाऊ केलेय.

ज्यांनी आधीच मतदान केलं नाहीय त्यांनी लाभ घ्यावा.

टिच्चुन भांडण्याने ब्रँडनेम बनते व्हय?
बर्र....... >> ब्रँडनेम वेगवेगळ्या कारणाने बनू शकते. हा पोल केवळ टिच्चून भांडणार्यांचाच आहे असेदेखील नाही. ऋन्म्या कुठे भांडतो?

बाकी अनबायस्ड मतासांठी फोलो करण्यासारखा अजुन एक आयडी म्हणजे अनुप ढेरे.

actions not reactions..!...!

ऋऽऽन्मेष म्हणजेच ऋ/ऋषिकेश का?

नाय. ऋ वेगळा आणि ऋन्म्या वेगळा. माबोवर याच पोलमधे क्लिअरकट विनर आहे तो. लय दंगा करणारं पोरगंय Biggrin ह्ये बघा शँपल http://www.maayboli.com/node/61113 आणि www.maayboli.com/node/61093 प्रतिसाद वाचा.

यात अदितीचे नाव का नाही?
___
यात तुझं (अस्मि/टिंकू) नाव का नाही?

बाई पाहिजेच. नसेल तर प्रसिद्धी कशी मिळणार?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अनु राव बाई नाहीत?

माहीत नाही. आयडी आहेत.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यांचे नांव अल्लाबक्ष नूरबक्ष राव असेही असू शकेल.

अदिती पायजेच. शॉल्लेट ब्रँडनेम आहे तिचे.

एक शेरनी सौ लंगूर ... चिकमंगलूर भाई चिकमंगलूर
अदिती नही है ये आंधी है ... दूसरी इंदिरा गांधी है

काय स्कोरे सध्या?

मी मत दिलं तेव्हा:

बॅट्या ६
अनुराव ५
संक्षी, राकु प्रत्येकी ३
बाकी इतर

यात संक्षी, राकु यांचं यश वाखाणण्यासारखं आहे. संक्षी ऐसीवर कधीच आले नाहीत. मिपावरही बरेच दिवस नव्हते. राकु जाऊनही आता सहाएक महिने झाले असतील. तरी हे पहिल्या पाचात आहेत!

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

संक्षी ऐसीवर कधीच आले नाहीत.

काय सांगता!

मला वाटलेले की "गेशिप" ही संज्ञा मराठी भाषेस संक्षींनी बहाल केलेली म्हणून?

(की Am I thinking of someone else?)

मला वाटलेले की "गेशिप" ही संज्ञा मराठी भाषेस संक्षींनी बहाल केलेली म्हणून?

हैला! असं असेल तर माझ्यासाठी ही नवी माहिती आहे.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ओह!

(अ) "..ए, मला गेशिप देतो / देती का?"
(ब) क आणि ड गेशिपमध्ये राहतात.
(क) तुझ्या माझ्या गेशिपला आनि काय हवं...

वगैरे सुचलं.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आद्य संक्षी पकाऊतम मोडमध्ये सर्वप्रथम 'मनोगता'वर होते.

मिपा/ऐसीवरल्या संक्षींमध्ये तो दम नाही.

(गरजूंनी 'मनोगता'वरल्या संक्षींच्या लिंका स्वत: शोधून वाचाव्यात. तूर्तास मजकडे तेवढा पेशन्स नाही.)

ही घ्या, गेशिप.

किंवा तो आख्खा धागाच बघाना!

आता कोण माईचा/ची लाल म्हणण्याचे धाडस करतो/ते, की संक्षी 'ऐसी'वर नव्हते म्हणून?

फक्त मायबोलीवर असणाऱ्या दोघांना एकही मत नाही हे बघून वाईट वाटलं. इथले कोणीच नाही का तिकडे जात, शाम?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जामोप्या म्हणजेच लिंबुटिंबु का? मला माहीत नाहीये जस्ट विचारते आहे.

मी मायबोलीवर कधीच जात नाही त्यामुळे थ

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अदितीला नामांकन दिले आहे.

===
आदूबाळ, अनुप ढेरे, अस्मि/टिंकू/अॅमी ही लोकं या पोलच्या टर्म्स अँड कंडीशन्समधे बसत नाहीत. यांच्याशी बोलताना तुम्हाला केस उपटावेसे वाटतात का? (स्वतःच्याच डोक्यावरचे)... किंवा ही लोकं तुमच्या जालिय शत्रुंशी वाद घालू लागली तर 'बर्री जिरली परस्पर! अस्संच्च पायजे!' म्हणत खु खु हसू येतं का तुम्हाला?

===
जामोप्या माबो, मिपा दोन्हीकडे आहेत.

अग्गोबै limbutimbu मंजे जामोप्या नाय गो. दोघे अगदी विरोधी पक्षातले आहेत.

===
मला ऋन्म्या, जामोप्या, अनु राव आणि राकुदेखील आवडतात.

राकुंनी रोज एक धागा काढण्याऐवजी आठवड्याला एकच धागा आणि रोज तोच अपडेट करायचा असे केले असते तर बरं झालं असतं.

===
माबोवर सध्याचा स्कोअर:

ऋन्मेऽऽष: ४५+
बेफ़िकीर: १८+
कशासाठी आहे हा पोल? त्याचा उपयोग काय? असा पोल घेउन काय साध्य होणार आहे?: १४+

अ‍ॅमी, श्रीगुरुजी मोदी भक्त आहेत ना....

---------

मनोबा - हे बघ तुझे वर्णन

यांच्याशी बोलताना तुम्हाला केस उपटावेसे वाटतात का? (स्वतःच्याच डोक्यावरचे)... किंवा ही लोकं तुमच्या जालिय शत्रुंशी वाद घालू लागली तर 'बर्री जिरली परस्पर! अस्संच्च पायजे!' म्हणत खु खु हसू येतं का तुम्हाला?

>> कशासाठी आहे हा पोल? त्याचा उपयोग काय? असा पोल घेउन काय साध्य होणार आहे?: १४+ <<

हा पर्याय ऐसीवर का नाही? मला हा हवा!

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अदितीला नामांकन दिले आहे.

पण... पण... पण... अदितीशी बोलताना मला माझ्या किंवा अन्य कोणाच्याही अंगाच्या कोठल्याच भागावरचे केस उपटावेसे वाटत नाहीत, त्याचे काय?

फाऊल आहे हे नामांकन!

नही...

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरोखर अफलातून आणि अगदी निर्विष लिहितो हा पोरगा. कधी कुणाला टोमणे नाहीत, कधी लाथाळ्या नाहीत. शिवाय कितीही उचकवा, शिव्या द्या, सर्व काही विनोदाने परतवून लावतो. भले लिखाणातून विद्वत्ता ओसंडून वाहात नसेल, अजिबात दिसतही नसेल पण बेरकीपणा, हजरजबाबीपणा आणि खिलाडूवृत्ती मात्र ओसंडते. कचकचून भांडणे नाहीच, पण मुद्दा सोडत नाही.
सो, ऋन्मेsssssषच.

त्याला ऐसीवरती बोलवा की. माझ्यासारख्या ऐसी व्यतीरीक्त कुठेही न वावरणारीला फायदा होइल.

त्याला इथल्या सभासदत्वाची गळ घालण्यापेक्षा तिथे सभासद नसतानाही फेरफटका मारता येतोच.

राकुनंतर आता कुणालाही आमंत्रण देण्याची रिस्क घेणार नाहीत इथले संपादक बहूतेक. खखोदेजा!

-अनामिक

खरोखर अफलातून आणि अगदी निर्विष लिहितो हा पोरगा. कधी कुणाला टोमणे नाहीत, कधी लाथाळ्या नाहीत. शिवाय कितीही उचकवा, शिव्या द्या, सर्व काही विनोदाने परतवून लावतो. भले लिखाणातून विद्वत्ता ओसंडून वाहात नसेल, अजिबात दिसतही नसेल पण बेरकीपणा, हजरजबाबीपणा आणि खिलाडूवृत्ती मात्र ओसंडते. कचकचून भांडणे नाहीच, पण मुद्दा सोडत नाही.

म्हणजे ऑर्कुटचा स्वयंघोषित सुपरस्टार तुमचा अभिषेक टाईप.
डोक्यात जाणारा मानभावीपणा प्लस दवणीयतेचा अतिरेक.

काहीतरी गैरसमज होतोय. मायबोलीवरचा ऋन्मेष अजिबात दवणीय नाहीय. हा तर कधी कधी ढढ्ढमसुद्धा वाटतो. कधीकधी मूर्खपणाचा बुरखा पांघरतो. (किंवा खरंच तसा असतो.) सर्वसामान्य मुद्द्यांवर लिहितो. राजकारणाच्या त्रांगड्यात शिरतच नाही. कुणी कितीही खुसपटे काढली तरी ढिम्म हलत नाही. पक्का निगरगट्ट. पण कुणाच्याही अंगावर धावून जात नाही. कुणी फिरकी घेतली तरी उसळत नाही. काहीही फालतू मुद्द्यांवर धागे काढतो आणि ते सर्वच्या सर्व प्रतिसादखेचक ठरतात. प्रतिसाद वाचनीय असतात. आणि त्यावरची त्याची उत्तरेसुद्धा. वाचनीय जरूर, पण दवणीय? अजिबात नाही.

ओह्ह्, ओकेओके.
मायबोलीवर आयडी आहे पण तिकडे जास्त लॉगिन करत नाही.
दोनचार प्रतिसाद वाचून मला तसे वाटले.
मिपावर स्वतःच्या मुलीची फेस्बुकस्टेटसमाला वाचून त्याचे साम्य वाटले बाकी काही नाही.

काय पण वाईट्ट आठवण काढलीत हो.

काय पण आयडी तर 'तुमचा आभिषेक'... 'तुमचा':( ... बळंच!

परीकथा 2.5 वगैरे वाचून मला डेसिमल सिस्टीम चुकीची कळली आहे अशी शंका यायला लागली होती.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

क्लासिक oligopoly

बॅट 11, अनुराव 9 = 20 मतं
पुढचे सहा आयडी लागलेत बाकीची वीस मतं मिळवायला.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आमचे मत अनुराव यान्ला. Wink

मायबोलीचा एवढा अभ्यास नाही पण चिनूक्स हे नाव नसलेले पाहून महदाश्चर्य वाटले.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या कौलातून लोकांचं उपद्रवमूल्य मोजण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं माझं आकलन आहे. त्यात चिनूक्स नसणं योग्यच वाटतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अॅमी, श्रीगुरुजी मोदी भक्त आहेत ना.... >> हो. पण ते इतर विषयांवरदेखील लिहतात असे वाटते.

===
राही, दोन्ही प्रतिसादांना मार्मिक!

===
डोक्यात जाणारा मानभावीपणा प्लस दवणीयतेचा अतिरेक >> लॉल. तुमचा अभिषेक कधीच वाचला नाही. पण हे वरचे वर्णन चपखल होइल असा एक आयडी इथे ऐसीवरच आहे. गंमत म्हणजे तो आयडी + त्याचा फ्यानक्लब स्वतःला पुरोगामी विचारवंत वगैरे म्हणत फिरत असतात. मज्जाचय सगळी ROFL
नशिब आमचं की तो बर्यापैकी रेअरली लिहतो.

===
हा पर्याय ऐसीवर का नाही? मला हा हवा! >> एकापेक्षा अधिकजणांनी मागणी केली तर हा पर्यायदेखील उपलब्ध करुन दिला जाईल.

===
फाऊल आहे हे नामांकन! >>मुळ धाग्यातील तिसर्या * मधे अदिती फिट बसतेय.

===
या कौलातून लोकांचं उपद्रवमूल्य मोजण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं माझं आकलन आहे. >> उपद्रवमूल्य + फ्यान फॉलोविंग असे त्रांगडं असलेल्या आयडी.

===
माबोवर विजेता घोषित केला आहे

द वन अँड ओन्ली ऋन्मेऽऽष!! ५६ मतं.

===
इथे ऐसीचे ट्रंप आणि हिलरीमधे जोरदार चुरस दिसतेय त्यामुळे सोमवारपर्यंत मुदत देत आहे.

गेल्या अडीच वर्षात मआंजावर खळबळ माजवणारे आयडी हवेत. You can love them, you can hate them, but you can't ignore them. वाचकांच्या किंवा त्यांच्याशी संवाद साधणार्यांच्या भावना को हिलाके रख देनेवाले आयडी!
बर्याचजणांना ते इरीटेट करतात. पण त्यांचा स्वतःचा फ्यान फॉलोवींग/कल्टदेखील असतो. आपापले शांतपणे येऊन, अभ्यासू धागे/प्रतिसाद टाकून गपचूप राहणारे आयडी हे नाहीत...

लहान आहे मी अजुन पण पुढच्या वर्षात करतो हे... मग मला घ्याल न पोलमधे तुमच्या?

लंगडा आला रे

अवांतर: "लंगडा आला रे" पेक्षा "लंगडा त्यागी बाहुबली" ही सही जास्त शोभून दिसेल.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तेवढे मसल नाहि आलेले मला अजुन

लंगडा आला रे

लहान आहे मी अजुन पण पुढच्या वर्षात करतो हे... मग मला घ्याल न पोलमधे तुमच्या? >> हो नक्की! शुभेच्छा Smile

बादवे तुमच्या आयडीवरून 'अँजेलीनाचीडावीतंगडी' आठवली.

वाल्गुदांना मत दिले आहे.
त्यांना एक निरोप : नुसतेच "शिवाजी" नाव उद्धट दिसते म्हणून महाराष्ट्र सरकारने छ.शि.ट. चे छ.शि.म.ट. करण्याचे ठरविले आहे. सेम फॉर इवाईनतळ.

तर मित्रों,

झालं काय की एका धाग्यावर ऋन्म्याला नेहमीप्रमाणेच 'जिल्ब्या पाडतो' वगैरे हिणवलं गेलं. मग त्याच्या 'खर्या मैत्रिणीं'चा काऊंट चालू झाला. ८ की ९ पर्यंत पोचला.
त्यातच नुकतेच गुडरीड्स चॉइस अवॉर्डस् पण झाले होते.
माबोवर जसे ऋन्म्याला धाग्यावेताळ म्हणणारे आहेत तसेच मिपावर डांगे, संक्षी किंवा ऐसीवर अनु, गब्बरला ट्रोल म्हणणारे आहेत.
मग म्हणलं कौलच काढुयात एक ज्यात या ट्रोलांचा फ्यानक्लबदेखील आहे हे कळेल.

===
तर मतदान करणार्या सगळ्यांचे आभार. इथले आणि माबोचे आकडे बघून अजूनेक गोष्ट लक्षात आली की मिपा, ऐसीचा वाचकवर्ग कॉमन असेल पण ते माबोवर शक्यतो जात नाहीत. आणि माबोवर असणारे फार थोडे मिपावर जातात पण ऐसीवर अगदीच ना के बराबर...

एनीवे... तर मिपा आणि ऐसीचा एकत्रीत विचार करता बॅटमॅन आणि फक्त ऐसीचा विचार केल्यास अनुराव हे ब्रँडनेम आहेत असे याठिकाणी यानिमित्ताने घोषीत करण्यात येत आहे होऽऽ

ह्यापी ट्रोलींग गाईज! किपीटप!!

मिपा, ऐसीचा वाचकवर्ग कॉमन असेल पण ते माबोवर शक्यतो जात नाहीत. आणि माबोवर असणारे फार थोडे मिपावर जातात पण ऐसीवर अगदीच ना के बराबर...

हीच ती वेळ आंतरसंस्थळीय स्पर्धा भरवायची.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वेगवेगळ्या वजनांच्या पैलवानांच्या काय एकत्र कुस्तीस्पर्धा होतात का आबा?

क्लास वगैरे कंसेप्ट काय मान्य नाहीत का तुम्हाला?

फक्त कल्पना करा की चिंजं माबोवरच्या ऋंमेश शी चर्चा करतायत. कसे वाटेल?

पॉईंट आहे.

ऋन्मेषशी मी चर्चा करतो. चिंजं - वरदा - संक्षी, रुची - दिनेश - दिपककुवेत, उसंत सखू - रसप - फारएण्ड वगैरे स्पर्धा भरवता येतील.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त्यापेक्षा आबा तुम्ही मिपावर दोन डॉक्टर आहेत, त्यांना ऐसी वर घेऊन या.

एक अर्थातच डॉ खरे असणार. दुसरे कोण?

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

प्रा. डॉ?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दुसरे म्हात्रे डॉक्टर आहेत ना. सर्व जग हिंडले आहेत ते.

मी ही आता एक डूआयडी घेवून धुमाकूळ घालावा या विचारात आहे!
चला एखादा डुआयडी सुचवा बरं चटकन!

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

वाघ.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मॅनईटर ऑफ आंजा

आबा आणि अभ्या, दोघेही वेडे आहेत. अभ्याच्या विनोदाला किंचित ठिगळ - आयडीईटर ऑफ आंजा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हीच ती वेळ आंतरसंस्थळीय स्पर्धा भरवायची. >> नको प्लीज. जे आहे ते ठीक आहे. इथे येऊन 'सिरीयात कत्तली होत असताना शेपुची भाजी ओरपणारे षंढ' असे सर्टफुकट मिळवायचे आणि मग तिकडे जाऊन ऋन्म्याचे धागे वाचायचे. मग तो कोण तो अमेरीकेतला पोस्टमन(?) ज्याची १६०+(?) पोरं आहेत त्याचं रेकॉर्ड आपण मोडणारच असा विश्वास वाटायला लागतो.

===
वेगवेगळ्या वजनांच्या पैलवानांच्या काय एकत्र कुस्तीस्पर्धा होतात का आबा? क्लास वगैरे कंसेप्ट काय मान्य नाहीत का तुम्हाला? >> हेच लॉजीक वापरून आरक्षण दिले जाते. पुण्यातल्या ब्राह्मण आयटीवाल्याचा मुलगा, मुंबईतल्या दलित सफाई कामगाराचा मुलगा आणि मराठवाड्यातल्या कुणबी अल्पभूधारक शेतकर्याचा मुलगा एकाच स्पर्धेत कसे तोलता येतील?

किंवा दुसरे लॉजीक जे उजव्यांना पटेल: सध्या सरकारी कॉलेजात ५००० जागा आहेत, खाजगी कॉलेजात १.४५ लाख. खाजगी कॉलेज जैन आणि मराठ्यांनी उभारली आहेत. म्हणजे देणारा सरकार/जैन/मराठा आहे. बाकीचे सगळेच (ब्राह्मणांसहीत) आपापली भगुनी, पातेली, वाडगी घेऊन दात्यासमोर लाइनीत थांबली आहेत. त्या रांगा जातीनुसार वेगवेगळ्या असणार हे दात्याने ठरवले आहे. स्वतःदेखील रांगेतच असताना इतरांना भिकारी म्हणू नये (तसे म्हणणारे काही प्रतिसाद मिपावर आलेले).