रद्दी बाळगण्यावर निर्बंध

सर्व गृहिणी आणि काही मदतशील गृहस्थांच्या, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीवर धडक कारवाई करून सरकारने, नवीन वर्षापासून १० दिवसांपेक्षा जुनी रद्दी बाळगण्या‌वर कायदेशीर बंदी केली आहे. विशेषतः शहरी भागांत जाणवणारी जागेची टंचाई, जागांचे आभाळाला भिडणारे भाव आणि त्यातून बिल्डरांची मनमानी याला आळा घालण्यासाठी आणि सामान्यांच्या घरातली साठवणुकीची जागा रिकामी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यमान मुख्यमंत्री रात्री झोपत नसल्याने, गृहिणी आणि मदतशील गृहस्थांना भेडसवणाऱ्या घरातल्या प्रश्नांची तीव्रता त्यांच्यापर्यंत पोहोचल्याची चर्चा सध्या मंत्रालयात आहे.

या कायद्याची धडक अंमलबजावणी होईल आणि नोटाबंदीमुळे बँक कर्मचाऱ्यांना जसे ग्लॅमर मिळाले तसे ग्लॅमर रद्दी व्यवसाय आणि व्यावसायिकांनाही मिळावे, अशीही उपयोजना सदर कायद्यान्वये केलेली आहे. गुमास्ता कायदा आणि अपरात्री मोठा-आवाजबंदी कायद्याला रद्दी व्यवसायाचा अपवाद करून, रद्दी व्यावसायिकांना आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे चोवीस तास व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या संदर्भात आमच्या एका वार्ताहराने, त्यांच्या प्रभागातले रद्दी व्यावसायिक, 'जय जिनेस रद्दीवाला' यांच्याशी चर्चा केली असता, जिनेसभाई यांनी या कायद्याचं स्वागत केले. "आमचे बायडीला आता खूप आनंद होईल. बँकवाल्या लोकानच्या बातम्या पेपरात बघून तिला प्रॉब्लेम वाटत होता. आपला हसबंड पेपरात कधीही दिसणार नाही, अशी काळजी तिला वाटत होती. पण आता या लॉमुळे रद्दीवाल्यांनाही अचानक हार्ट अटेक येऊन पेपरात येण्याची संधी मिळेल", असे जिनेसभाई यांचे म्हणणे आहे. "सायब, घरी जादा जागा होणार असेल तर आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत; खूप कामाने आमचा जीव गेला तरी चालेल, बायकोच्या आनंदासाठी कायपन करू", अशीच भावना सगळ्या रद्दीवाल्यांमध्ये आहे, असे ते म्हणाले. सरकारने फक्त रद्दीबद्दल कायदा करून थांबू नये आणि भंगारासंदर्भातही असाच कायदा करावा अशी मागणी अखिल वाकडेवाडी रद्दीवाला महासंघातर्फे करण्यात येणार आहे.

दरम्यान, जुन्या बातम्या, लिंका, गूगल सर्चची कॅशे, चित्रपटांच्या डीव्हीडी, पुस्तके, 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय' हा अग्रलेख छापलेल्या 'केसरी'च्या ऐतिहासिक प्रती यांच्यावर या नव्या कायद्याचा कितपत परिणाम होईल, याबद्दल कायदेतज्ज्ञांमध्ये व्हॉट्सअॅपवर चर्चा सुरू आहे.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

आमच्या इथे एकाने दहा वर्षांची रद्दी साठवली आहे. टाइम्सच्या या रद्दीत अमुल्य असे शब्दभांडार लपलेले आहे असा त्यांचा दावा आहे. पुरात्त्व खात्याने हस्तक्षेप करून त्यांना संरक्षण द्यावे अशी त्यांनी कळकळीची मागणी केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोपा उपाय आहे. बाळगू नका रिसायकल करा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

मला वाटतं हा सरकारचा खूपच धोरणी निर्णय आहे. 'स्वच्छ भारत' अभियानाला यामुळे चालना मिळेल. घरात रद्दी पडलेली किती बेंगरूळ दिसते! मग तो गलिच्छ गठ्ठा लपवण्यासाठी लोक तो पलंगाखाली, दोन कपाटांच्या कोपऱ्यात वगैरे आडनिड्या जागी ठेवतात. न रहेगी रद्दी न रहेगा पसारा, हे प्रधानमंत्र्यांचे बोल खरे ठरतील आणि सर्व भारत रद्दीलेस होईल तो सुदिन.

रद्दीलेसपणा ही पहिली पायरी आहे. लवकरच सरकार ही मर्यादा कडक करून १० दिवसांवरून १ दिवसावर आणणार आहे. जेणेकरून लोक या त्रासाला वैतागून मुळात पेपरलेस होतील. पेपर घेऊनही तसा फायदा काय होतो? लोक मरताहेत, भरडले जाताहेत, हालअपेष्टा सोसताहेत, पुरेसे कपडे घालून बाहेर न गेल्यामुळे मुलींवर बलात्कार होताहेत, हिंदू धर्माची गरज असूनही सर्वांना दहा-दहा पोरं नाहीत - अशा नकारात्मक बातम्याच त्यातून वाचायला मिळतात. हा नकारात्मक डोस मिळायचा थांबला की लोकांना 'अच्छे दिन' आलेले आहेत हे निश्चितच कळून येईल.

या कठोर पण भक्कम निर्णयाबद्दल सरकारचं अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या विरोधी बाजूच्या मतांवर सतत संशय घ्यायचे ठरले आहेना ?!

शिवाय, भविष्यात चांगले परिणाम निघाले तरी "नसलेल्या राईचा पर्वत करून त्यांना खोटे पाडता येईलच", तेव्हा आता आपल्याशी सहमत नसलेल्या सर्वांना आपले सर्व शब्दसामर्थ्य वापरून खोटारडे, मूर्ख आणखी अपयशी असल्याचे आत्ताच जाहीर करून त्यांना बदनाम करणे भागच आहे ! ROFL ROFL ROFL

रद्दीबंदीच्या सर्जिकल ष्ट्राईक्समुळे अनेकांचे डोळे पांढरे होणार निश्चित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा निर्णय झाल्यापासून सगळीकडे नुसते कौतुक सुरु आहे सरकारचे. पेपरात, चर्चात, टीव्हीवर सगळी सगळी कडे. वीट आलाय ते ऐकून ऐकून.
अरे कुणाच्या लक्षात येतेय का? यामुळे रद्दीच्या साठ्यावर विसंबून असणाऱ्या सर्वसामान्यांचा 'पुन्हा पाण्याकडे' असा उलट प्रवास सुरु होईल यामुळे. पण त्याचा कोण विचार करतोय .. (स्वगत: ... ब्लडी जिंगोज!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरारा ...

रद्दी काढून टाकल्यामुळे 'स्वच्छ भारत'ची ही बाजू माझ्या लक्षातच आली नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्व गृहिणी आणि काही मदतशील गृहस्थांच्या, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीवर धडक कारवाई करून सरकारने, नवीन वर्षापासून १० दिवसांपेक्षा जुनी रद्दी बाळगण्या‌वर कायदेशीर बंदी केली आहे. विशेषतः शहरी भागांत जाणवणारी जागेची टंचाई, जागांचे आभाळाला भिडणारे भाव आणि त्यातून बिल्डरांची मनमानी याला आळा घालण्यासाठी आणि सामान्यांच्या घरातली साठवणुकीची जागा रिकामी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे

Biggrin

'जोनाथन स्विफ्ट'च्या, सुमारे तीनशे वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या, 'गलिव्हर्स ट्रॅव्हल्स'मधला हा भाग आठवला:

We next went to the school of languages, where three professors sat in consultation upon improving that of their own country.

The first project was, to shorten discourse, by cutting polysyllables into one, and leaving out verbs and participles, because, in reality, all things imaginable are but norms.

The other project was, a scheme for entirely abolishing all words whatsoever; and this was urged as a great advantage in point of health, as well as brevity. For it is plain, that every word we speak is, in some degree, a diminution of our lungs by corrosion, and, consequently, contributes to the shortening of our lives. An expedient was therefore offered, “that since words are only names for things, it would be more convenient for all men to carry about them such things as were necessary to express a particular business they are to discourse on.” And this invention would certainly have taken place, to the great ease as well as health of the subject, if the women, in conjunction with the vulgar and illiterate, had not threatened to raise a rebellion unless they might be allowed the liberty to speak with their tongues, after the manner of their forefathers; such constant irreconcilable enemies to science are the common people. However, many of the most learned and wise adhere to the new scheme of expressing themselves by things; which has only this inconvenience attending it, that if a man’s business be very great, and of various kinds, he must be obliged, in proportion, to carry a greater bundle of things upon his back, unless he can afford one or two strong servants to attend him. I have often beheld two of those sages almost sinking under the weight of their packs, like pedlars among us, who, when they met in the street, would lay down their loads, open their sacks, and hold conversation for an hour together; then put up their implements, help each other to resume their burdens, and take their leave.

But for short conversations, a man may carry implements in his pockets, and under his arms, enough to supply him; and in his house, he cannot be at a loss. Therefore the room where company meet who practise this art, is full of all things, ready at hand, requisite to furnish matter for this kind of artificial converse.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

gharaateel raddi samplyaane chakalyaa taLUn jhaalyaavar tyaache tel kase kaaDhaayache, he kaLat navhate. Pan ekaa tailbuddhee bhaktaane peparaaivajee Tissuu paper kinvaa senetaary TOvels vaparaayalaa suchavale aahe.

pratikriyaa maaraatheet vaachaavi.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0