निबंध : माझ्या आवडत्या स्त्रीया.

मला भारतीय टिव्ही पहायला आवडत नाही. टिव्ही सिरीयलमधल्या अभिनेत्री आकर्षक वाटत नाहीत. त्यांचे सिरीयलच्या पुनुरुज्जीवनवादी पोषाखांऐवजी परिवर्तनवादी पोषाखांमध्ये इतरत्र फोटो येत असतात ते आवडतात पण त्या अभिनेत्री मुळ सिरीयलीत कशा दिसतात हे माहित नसल्याने खुप जास्त आवडत नाहीत. मला भारतीय सिनेमाही तितकासा आवडत नाहीय आणि अनुराग कश्यपच्या सिनेमातल्या हिरोईन्स आवडण्यासारख्या असल्या तरी त्यांनी जीव एक करुन केलेल्या भुमिकांमुळे त्यांची प्रतिमा अशी काही बनते की त्यांचे आकर्षण वाटत नाही (अभिनयासाठी खुप आदर मात्र वाटतो). मी इंग्रजी सिनेमा आणि सिरीयली बघतो पण त्यात असलेल्या अभिनेत्री ह्या मला अभिनेत्री वाटतच नाही खर्‍याखुर्‍याच कुणितरी स्त्रीया असतील असे वाटते आणि त्या प्रगतिशील देशातल्या असल्याने माझ्यातल्या देशी न्युनगंडामुळे त्यांना आवडण्यासाठी लागणारे धैर्य माझ्याकडे नाहीय.

मी अधनंमधनं स्वयंपाक करतो. निरनिराळे देशी विदेशी पदार्थ बनवितो. महाराष्ट्रीयन पदार्थही बनवितो, आणीक पारंपारीक पदार्थ बनवितो. तर हे पारंपारीक पदार्थ (उदा. पाकातले चिरोटे) कसे बनवितात ह्याबद्दल मी युट्युब चॅनेलवर जाउन विडीओ शोधुन पहातो. ह्यातले बरेचसे विडीओज हे अमेरीकेत गेलेल्या नवविवाहीत आणि मध्यमविवाहीत मराठी स्त्रीयांनी बनविलेले असतात. मी असे ऐकले आहे की ह्या स्त्रीया सुशिक्षीत इंजिनीअर वैगेरे असतात पण H4 विजावर अमेरीकेत गेल्याने तिथे काम करु शकत नाहीत आणि त्यामुळे स्वयंपाक करण्यात आपले आयुष्य वाया गेले आहे असे वाटु नये म्हणुन रेसिपींचा युट्युब चॅनल खोलतात. मला त्यांचे मराठीच्या लयीत बोललेले इंग्लिश खुप आवडते शिवाय त्या जे पदार्थ बनवितात तेही खुप आवडते. त्या अमेरीकेत असल्या कारणाने त्यांचे पोषाख शक्यतो परिवर्तवनवादी असतात पण खुप लहान वैगेरे नसतात. मला ह्या स्त्रीयांबद्दल प्रचंड आकर्षण वाटते. एखादी उच्चशिक्षीत इंग्रजी बोलणारी मराठी स्त्री पाकातले चिरोटे बनवितांना पहाणे हे प्रचंड आकर्षक आहेय. खासकरुन त्या स्त्रीयांना स्वतःच्या केसांबद्दल, शरीराबद्दल, कपड्यांबद्दल विश्वास असेल तर. अशा केसकपडेशरीरविश्वास असलेल्या स्त्रीयांनी बनवुन दाखविलेल्या रेसीपींचे व्हीडीओ मी तासनतास बघत असतो आणि तरीही माझी बायको माझ्यावर कसलाही संशय घेत नाही. आपल्या देशाची संस्कृती साता समुद्रापार जाउन जपणार्‍या ह्या स्त्रीयांचा भारतात आल्यावर यथोचित सत्कार व्हावा म्हणुन सरकारने काहीतरी केले पाहिजे असे वाटते.

निबंध लिहण्यासाठी ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थळावर स्वतंत्र कॅटेगरी असावी असेही वाटते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लोल!

हुतोय राडा आता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आवडला निबंध Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बनसोडे सर जेव्हा म. गांधींएवढे मोठे होतील तेव्हा असं जरूर म्हणू शकतील की 'माझी आवडनिवड हीच माझी राजकीय भूमिका आहे.' त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडीबद्दल आणखी काही प्रश्न विचारले जाणं ही गोष्ट मराठी साहित्य आणि मराठी आंतरजालाच्या भरभराटीसाठी आवश्यक वाटते. हे काही प्रश्न :

१. मराठी रियालिटी शोच्या अँकर्सबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या प्रश्नाबद्दल टाळ्या झाल्याच पाहिजेत.
२. तुम्ही पाकातले चिरोटे करून खायला घालता म्हणून तुमची बायको तुमच्यावर संशय घेत नाही, याबद्दल तुम्हाला १००% खात्री आहे का? (किंवा तुमच्या बायकोचं ऐसीवर खातं आहे काय?)
३. मी इंजिनियर नसलेली, अमेरिकेत राहणारी, H4 बेरोजगार आहे. माझं आयुष्य वाया जात नाही असं मला वाटत नाही, मला पाकातले चिरोटे आणि इतर पारंपरिक पदार्थ बनवता येत नाहीत. मला यूट्यूब व्हिडीओ बनवण्याचा खूप कंटाळा येतो. म्हणून मी मांजराचे फोटो फेसबुकवर लावते. माझ्यासाठी काही विशेष सल्ला द्याल का?

आणखी एक आगाऊ प्रश्न :
४. 'बालगंधर्व' सिनेमातल्या सुबोध भावेबद्दल तुमचं काय मत?
५. त्या चित्रपटातल्या जरदौसी काम केलेल्या साड्या किंवा विद्या बालन, शिल्पा शेट्टी यांच्या साड्यांना तुम्ही काय लेबल लावता, पुनरुज्जीवनवादी का परिवर्तनवादी?

कृपया या प्रश्नांची लंबीचवडी उत्तरं देणे.

---

निबंधलेखकाचा सल्ला मान्य करून, सदर धागा ललित-निबंध असा प्रकार तयार करून तिथे हलवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला पाकातले चिरोटे आणि इतर पारंपरिक पदार्थ बनवता येत नाहीत

पण नारळाच्या शाईनमारू वड्या बनवता येतात ना? ते तू कुठला पोषाख घालून (नेसून) करतेस? पुनरुज्जीवनवादी का परिवर्तनवादी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

प्रश्नांवरती खुपच विचार करावा लागतोय. एकेक प्रश्न एकेवेळी घेउन त्यावर एक तास, एक दिवस, एक महिना, असा कालावधी विचार करण्यासाठी जाउ शकतो त्यामुळे सावकाश घ्या.

तर पहिला प्रश्न असा की 'बालगंधर्व' सिनेमातल्या सुबोध भावेबद्दल तुमचं काय मत?

मी सुबोध भावे ह्यांचा कुठलाही सिनेमा पाहिलेला नाहीय, टिव्ही तर असाही पहातच नाही ह्याशिवाय ते आणखी कुठे कुठे दिसत असतील तेही पाहिलेले नाही. सुबोध भावेंना पहाण्याचा आणि माझा संबध फक्त गुगल इमेजेसपुरता. म्हणजे मराठीत संकेतस्थळे तशी कमी आहेत आणि जी आहेत त्यातली अर्धीअधिक चित्रपटाला वाहिलेली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एकुण शंभर ते दिडशे चित्रपट बनलेले असावेत असा माझा अंदाज आहे, जितके चित्रपट बनलेले आहेत तितकेच चित्रपटांची संकेतस्थळे बनलेली आहेत. म्हणजे हा इतका मुठभर कंटेंट आहे की मराठीसंदर्भात गुगल इमेजेसमध्ये काहीही शोधा त्यात सुबोध भावेंचा फोटो दिसण्याची शक्यता दहा मध्ये एक असते. (पंतप्रधानांच्या बाबतीत ती दहा मध्ये पाच आहे. Moraraji Desai शोधा पंतप्रधानांचा फोटो पाचव्या रांगेत, indian poison शोधा पंतप्रधानांचा फोटो पंचवीसाव्या रांगेत) तर मराठी गुगल इमेज सर्च करतांना सुबोध भावे हे असा अधुनमधुन इच्छित फोटोच्या आसपास दिसुन येतात. अर्थात त्यांचा फोटो पहाणे मुळ उद्देश नसल्याने सेकंडरी सेन्सेसलाच तो माहित आहे. म्हणजे जेंव्हा जेंव्हा मॉलमध्ये अंतर्वस्त्रांचा सेल चालु असतो आणि समोरच्या त्या चौकोनी हौदात (हौदच म्हणतात ना?) सर्व प्रकारच्या, सर्व साईजच्या, सर्व डिजाईनची अंतर्वस्त्रे ठेवलेली असतात पण त्यातली अतीमोठी अतीलहान अंतर्वस्त्रे सोडुन आपण आपसुकच नेमक्या आपल्या साईजची अंतर्वस्त्रे निवडीत असतो आणि इतर गोष्टींकडे आपले दुय्यम लक्ष असते हा तसाच प्रकार आहे. हेच उदाहरण फोर्टात मिलणार्‍या टिशर्टच्या सेलबद्दलही देता आले असते पण ते तितकेसे परिणामकारक झाले नसते.

तर सुबोध भावे असे माझ्या दॄष्टीने (literally) दुय्यम आहेत. पण त्यांच्याबद्दल काय वाटते हे सांगायचेच असेल तर मला जे काही आठवतेय त्यावरुन सांगतो. मला सुबोध भावे अजिबातच आवडत नाही हे नक्की आहे. म्हणजे दिवाळीचे उरलेले शंकरपाळे खुप दिवस तसेच राहिले आणि थंडी वाढल्यावर ते उगीच कधीतरी खाउन पाहिले तर टाळुला तुप चिकटल्यावर कसे वाटते तसे मला सुबोध भाव्यांबद्दल वाटते. माझ्या मानसिकतेवरती ह्याचा इतका परिणाम झाला आहे की नुसत्याच सुबोध नावाच्या लोकांबद्दल किंवा नुसत्याच भावे आडणावांच्या लोकांबद्दलही मला तुपकट भावना येतात.

आता त्यांच्या फोटोबद्दल. त्यांचा चेहरा गोल आहे तो पाहिल्यानंतर सातवीत जेंव्हा कंपासमधले कर्कटक वापरुन वर्तुळ काढता येते हे मी पहिल्यांदा पाहिले तेंव्हा माझ्या मेंदुवर झालेल्या कायमस्वरुपी बदलांचे केंद्र उद्दीपीत होते. ह्यानंतर त्यांच्या तुळतुळीत दाढीबद्दल. मी त्यांचे फोटो फक्त थंबनेल साईजमध्ये पाहिलेले आहेत पण क्लिक करुन मोठे करुन पाहिले तर त्यांना ब्लॅकहेडस असाण्याची शक्यता वाटते. ह्याशिवाय ते कधीकधी Man Child आहेत असेही वाटते.

मी लहान असतांना एकदा एका कळकट्ट हॉटेलात चार लोकांना एक एक प्लेट बुंदीचे लाडु खातांना पाहिले होते, लाडु संपल्यानंतर लगेचच त्यांनी त्यावर चहा पिला होता. कुणी असे गोड लाडु खाउन त्यावर गोड चहा पिण्याची हिंमत कशी करु शकतो? म्हणजे मळमळायला होईल ना? पण त्यांना तसे काही झाले नाही आणि चहा संपल्यावर ते शुर शिपाई निघुन गेले. सुबोध भाव्यांना सहन करु शकणारे लोक हे त्या शुर शिपायांसारखेच आहेत. दुर्दैवाने माझ्यात इतके शौर्य नसल्याने मी आयुष्यात कधी सुबोध भावेंना स्क्रीनवर व्हीडीओ स्वरुपात किंवा झुम केलेल्या फोटोत पाहु शकणार नाही. एकाच आयुष्यात सगळ्यांनाच काही सगळे शक्य नसते त्यामुळे माझ्या दौबार्यलाबद्दल मी कमीपणा वाटुन घेण्याचे कमी केले आहेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहुल बनसोडे : मानुस भारीये हा !!!

>>>थंडी वाढल्यावर ते उगीच कधीतरी खाउन पाहिले तर टाळुला तुप चिकटल्यावर कसे वाटते तसे मला सुबोध भाव्यांबद्दल वाटते. माझ्या मानसिकतेवरती ह्याचा इतका परिणाम झाला आहे की नुसत्याच सुबोध नावाच्या लोकांबद्दल किंवा नुसत्याच भावे आडणावांच्या लोकांबद्दलही मला तुपकट भावना येतात.<<<

>>>चहा संपल्यावर ते शुर शिपाई निघुन गेले. सुबोध भाव्यांना सहन करु शकणारे लोक हे त्या शुर शिपायांसारखेच आहेत. दुर्दैवाने माझ्यात इतके शौर्य नसल्याने मी आयुष्यात कधी सुबोध भावेंना स्क्रीनवर <<<<

अगागायाया !!!

ते पुलित्झर , का बुकर का काय ते, ते तत्काळ देणे !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जीवन मोहीतेंना काँपिटीशन आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय नाय. हे जीमोपेक्षा भारीयेत.
जीमो रेल्वे स्टेशनमधले टचस्क्रीन किऑस्क आहेत हे मात्र फुल्ल अँड्रॉइड आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बनसोडे फार फार डिप आहे.
बनसोडे जिनीयस आहे.
बनसोडेंनी बोचकारल्यावर ( शब्दशः न घेणे) समोरची व्यक्ती अगदी आतपर्यंत हर्ट होते.
पण आपण नेमके कुठे हर्ट झालोय आपल्याला का इतकं झोंबतय आपली नेमकी कुठली नाडी सोडली गेलीय
आपल्या नेमक्या कुठल्या वर्मावर आघात झालाय
आणि कसा नेमका
तेच कळत नाही
हे म्हणजे
सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था होते.
इथे काही प्रतिसादकांची तशी अवस्था झालेली आहे.
त्यानंतर स्वाभाविक आणि अपेक्षीत भांबावलेल्या गांगरलेल्या प्रतिक्रीया आलेल्या आहेत.
हे सर्व करु शकणारे बनसोडे असामान्य आहेत.
म्हणुन जीवन मोहीतेशी केलेली तुलना
अत्यंत चुकीची व बनसोडे यांचा अपमान करणारी आहे असेही मी नमुद करु इच्छितो.
अर्थात बनसोडे नेणीवेच्या पातळीवरुन नकळत असे लिहीत आहेत की काळजीपुर्वक विचारपुर्वक एक एक लेबल चुकवत आहेत की निव्वळ निरागस गमतीदार माणुस आहे.
काह्ही कळ्ळायला तुर्तास मार्ग नाही.
सुबोध भावेंवरील त्यांचा प्रतिसाद प्रतिभाशाली आहे. हे मी अत्यंत गंभीरतेने म्हणत आहे यात काडीचाही उपहास नाही.
बनसोडे मराठीला लाभलेले Milan Kundera आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुबोध भावे बद्दल च्या मतांशी अतिसहमत. मध्यंतरी तो एका शिरीअली मधे आईच्या साड्यांची जॅकीटे घालुन असायचा. अगदीच कसाबसा माणुस आहे.

पण ...

सुबोध नावाच्या लोकांबद्दल किंवा नुसत्याच भावे आडणावांच्या लोकांबद्दलही मला तुपकट भावना येतात.

सुबोध नावाच्या लोकांबद्दल लूज कॉमेंट चालवून घेतल्या जाणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी जगातल्या सर्व सुबोध नावांच्या माणसांची आणि ह्याच नावाच्या चुकुन काही स्त्रीया असतील तर त्यांचीही विनाशर्त माफी मागतो. मी माझ्या मानसिकतेबद्दल बोललो. एखाद्या नावाबद्दलच पुर्वग्रह डोक्यातुन काढायचा असल्यास त्यासाठी लागणारे समुपदेशन किंवा टॅब्लेटस घ्यायचीही माझी तयारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रॉईड आणि यच्चयावत तत्सम बायकी स्टिरीओटाईप्सचा बदला घेण्यासाठी मुलींचं नाव सुबोध ठेवलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुबोध नावाच्या लोकांबद्दल लूज कॉमेंट चालवून घेतल्या जाणार नाहीत.

का ओ ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं अनुभवकथन इतकं जबर्‍या आहे कि खळखळून हसायला होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खालील संज्ञांचे अर्थ सांगा :
पुनुरुज्जीवनवादी पोषाख
परिवर्तनवादी पोषाख
शक्यतो परिवर्तवनवादी पोषाख
जीव एक करुन केलेल्या भुमिका
खर्‍याखुर्‍याच कुणितरी स्त्रीया
मध्यमविवाहीत
स्वतःच्या केसांबद्दल, शरीराबद्दल, कपड्यांबद्दल विश्वास असणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लोल. मी नक्कीच तुमच्यापेक्षा कमी स्पीडने वाचत असेन. तरीही मध्यमविवाहित वैगेरे वाचायला हुकलोच. तुमच्याकडून साहित्याचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

राहुल निबंध फारच आवडला आणि तो मनापासून लिहिलेला वाटतोय. शिवाय त्यात तुमचं वयही दिसतय. तरुण आहात. लेखनशैली आणि विचारावरून जाणवतं. ( आव आणलेले चाळीस प्लस लेखक लगेच कंटाळवाणे होतात.)तरुण लेखक संस्थळांवर फारच कमी दिसतात.आलेच तर दोनतीन अपॅाइंटमंटनंतर गाशा गुंडाळतात.
तुम्ही कार्यक्रम आवडीने बघता तरी बायको आक्षेप घेत नाही यात दोघांनाही क्रेडिट आहेच.स्त्रियांना हवं ते मिळत असेल तर त्या उगाच ढवळाढवळ करत नाहीत ,राग काढत नाहीत ( आदळआपट)असा माझाही अनुभव आहे.
पाककृती व्हिडिओ आणि कार्यक्रमाबद्दल संपूर्ण सहमत आहे.चांगली पाककृती करून दाखवते म्हणून उगाचच कुणा अम्मावरांना कार्यक्रमांत आणतात त्याचा फार राग येतो. नवीन तरुणी,नुकत्याच स्वयंपाक शिकलेल्यांत जी पदार्थ दाखवताना बिघडेल काय ही हुरहुर असते ती नैसर्गिक असते. बिघडतानाही दाखवतात.मुळात क्यामेरा दाखवण्यासाठी असतो तर चवीवरती वेळ का घालवतात हे समजत नाही. इकडेही दिवाळीच्यावेळी शिरेलमालिकेतल्या अभिनेत्री गप्पा मारत करंज्या वगैरे करताना दाखवतात तो कार्यक्रम रंजक होतो.

वेगळा निबंध विभाग तत्परतेने सुरू करण्यात अदितीची गुणग्राहकता दिसली.आणखी असेच मनापासूनचे निबंध येण्याची वाट पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्यातल्या देशी न्युनगंडामुळे त्यांना आवडण्यासाठी लागणारे धैर्य माझ्याकडे नाहीय

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहुल, तुम्ही जे लिहीले आहे ते मस्त लिहीले आहे. दुसरा पॅरा खास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा केसकपडेशरीरविश्वास असलेल्या स्त्रीयांनी बनवुन दाखविलेल्या रेसीपींचे व्हीडीओ मी तासनतास बघत असतो

असतं एकेकाचं फेटीश!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

१. नेणीवेच्या पातळीवरील अतीसुक्ष्म जातीय प्रेरणेतुन लेख व तसेच प्रतिसाद। २ .अती काळजीपुर्वक लेबलांच्या पकडीत येणार नाही असा काढलेला जिनीयस काळा चिमटा ३ एक निरागस विनोदी लेख। काही असो लेखक जिनियस च आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी.
आयडी नाव, विषय, लिखाण सारे काही उच्चप्रतीच्या जिनीयसपणाचे काम आहे.
.मला फार आवडते असे टोटल परफेक्षन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निबंध लिहण्यासाठी ऐसी अक्षरे ह्या संकेतस्थळावर स्वतंत्र कॅटेगरी असावी असेही वाटते.

अहो तुमच्यासाठी खास कॅटॅगरी हवी.. तिथे बाकी कुण्णा sss कुण्णाचे लेखन नको Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निबंधाचे रसग्रहण होण्याची वाट पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निबंध आवडला. आवडला एवढ्यासाठी की, त्यातले बारकावे कळायला अनेकदा वाचावा लागेल. तसेच त्यांत आलेले स्वयंभू शब्द कुठल्या अर्थाने वापरले आहेत त्याचा खास अभ्यास करावा लागेल.
'केसकपडेशरीरविश्वास' या विशेषणामागे काय लपले आहे ? म्हणजे पाककृती करताना त्यांत केस पडू नयेत याचा विश्वास की त्यांत परिधान केलेले कपडे बुडणार नाहीत याचा आत्मविश्वास ? की पाकातले चिरोटे खाऊनही कमनीय शरीर राखल्याचा आत्मविश्वास ? छे बुवा, तुम्ही पारच गोंधळात टाकलंत. यापुढे पाककृतींचे कार्यक्रम पहायला(की न्याहाळायला ?) मला अष्टावधानी रहावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले शरीर, केस आणि कपडे हे टीव्हीवर दिसण्याच्या लायकीचे आहेत (खिल्ली उडवण्यासारखे नाहीत) हा आत्मविश्वास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

राहुल - तुम्ही अलरेडी जर हे करत नसाल तर. तुम्ही सीएन्बीची टीव्ही-१८, इटी-नाऊ हे चॅनेल पण बघा. त्यावरच्या अँकर स्त्रीया पण तुम्हाला आवडतील.
बायकोला वाटेल तुम्ही स्टॉक मार्केट मधे खुप पैसे मिळवाल, म्हणुन तिला काही ऑब्जेक्शन नसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या स्त्रीया एच४ वर आलेल्या असतात का??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही त्या भारतातच रहातात आणि भारतातल्या चॅनेल्स वर काम करतात.

राहुल ची आवड बघता त्या पण आवडतील त्याला असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. हे खरे आहे. मला निहारीका कोतवाल प्रचंड आवडते. शिरीन भान पण आवडते. (कन्फेशन : सेंथील चेंगलवरायन पण आवडतो.). आगोदर निधी राजदान पण आवडायची म्हणजे अजुनही आवडते पण टिव्हीवर जे अपोकोलिप्टीक असते ते पहाण्याच्या धैर्य नसल्याने मी ह्या लोकांनाही टिव्हीवर पाहु शकत नाही. सगळ्यांना २००१-२००२ मध्ये शेवटचे पाहिले होते. हे लोक आहेत का अजुन टिव्हीवर? कसे दिसतात? म्हणजे पंधराएक वर्षाने म्हातारे झाले असतील तरी पण भारीच दिसत असावेत असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिरीन भान मलाही आवडते ब्वॉ. मला वाटतं मागं या बायकांबद्दल कुठंतरी विस्ताराने चर्चा झाली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला शिरीन फरहाद ऐकुनच माहीत आहे
या शिरीन च्या सौंदर्याच भान यावं यासाठी काही मदत मिळेल काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मला भारतीय टिव्ही पहायला आवडत नाही. <<

>> त्यांचे सिरीयलच्या पुनुरुज्जीवनवादी पोषाखांऐवजी परिवर्तनवादी पोषाखांमध्ये इतरत्र फोटो येत असतात ते आवडतात पण त्या अभिनेत्री मुळ सिरीयलीत कशा दिसतात हे माहित नसल्याने खुप जास्त आवडत नाहीत. <<

निष्कर्ष : धागालेखक पाश्चात्यांचा अंधभक्त आणि देशी परंपरांचा अंधविरोधक आहे. (देशी परंपरांचा डोळस विरोधक कुणी असूच शकत नाही म्हणा, पण ते राहू द्या)

>> मी अधनंमधनं स्वयंपाक करतो. <<

निष्कर्ष : धागालेखक स्त्रियांकडे आकर्षित होणारा पुरुष असला तरीही स्वयंघोषित एमसीपी नाही.

>> त्या अमेरीकेत असल्या कारणाने त्यांचे पोषाख शक्यतो परिवर्तवनवादी असतात पण खुप लहान वैगेरे नसतात. मला ह्या स्त्रीयांबद्दल प्रचंड आकर्षण वाटते. एखादी उच्चशिक्षीत इंग्रजी बोलणारी मराठी स्त्री पाकातले चिरोटे बनवितांना पहाणे हे प्रचंड आकर्षक आहेय. <<

निष्कर्ष : धागालेखकाचा पुरोगामीपणा बेगडी आहे कारण त्याला वाटतं की बायकांनी परिवर्तनवादी कपडे घालावेत पण दुसऱ्या देशात (पक्षी : 'शिवाजी जन्मावा, पण...' न्याय) आणि तेही खूप लहान नकोतच (पक्षी : 'वंदे मातरम म्हणा पण तोंडातल्या तोंडात आणि मोरीतच' न्याय).

निष्कर्ष : धागालेखक सिक्युलर फुर्रोगामी मोदीद्वेष्टा आहे.

ऐसीकरहो! असले लेखक तुमच्या माथी मारून तुम्हाला फीलगुड फीलगुड म्हणायला भाग पाडण्यात संस्थळचालकांचा कावा दिसतोय का? ठोकळेबाजीचा विरोध असो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थेट परिवर्तनवादी किंवा थेट पुनुरुज्जीवनवादी किंवा मग थेट सेंट्रीस्ट असायलाच हवे का? प्रत्येकाच्या काही ना काही गोष्टी चांगल्याच असतात. म्हणुन आपण परिवर्तनवादी, पुनुरुज्जीवनवादी, सेंट्रीस्ट सगळ्यांकडुन जे जे आवडेल ते ते घ्यावं आणि आपली स्वतःची अशी राजकीय भेळ बनवावी असे मला वाटते. म्हणजे पुनुरुज्जीवनवाद्यांना उकडीचे मोदक आवडतात, परिवर्तनवाद्यांना चिकन मोमोज आवडतात, सेंट्रीस्ट लोकांना व्हेज मोमोज आवडतात आपण प्रत्येकाचा एक मोमो घेउन... (भाषेत काहीतरी चुकते आहे. प्रत्येकाचा एक मोमो घेउनचा अर्थ दुसरा काही लागत नाहीये ना? अर्थात हे काही मायबोली नाही की एखाद्या अतिस्वस्त विनोदाचे दिर्घकालीन मॉर्गेज घेतील पण तरीही अर्थ नेमका लागायला हवा).

आपण प्रत्येकाचे एक एक असे तीन मोमोज घ्यावे. पुनुरुज्जीवनवादी मोदकाला मोमो म्हणण्यावर आक्षेप घेतील तर आपण त्यांना फक्त मो असे म्हणावे आणि ते दोनदा म्हणावे. (म्हणजे ते जुन्या मराठी सिनेमातल्या मधु आपट्यांच्या विनोदाप्रमाणे वाटु द्यावे). मी मोमोबद्दल सांगत असतांना तुमच्या कल्पनेत सारखी सारखी त्यासोबत दिली जाणारी आर्टीफीशीयल रंगाची चटणीच येत असणार. प्रत्येकाच्या विचारपद्धतीत एक विनाकामाचा आणि अडगळीचा मोठा एरीया असतो. त्यातच ही चटणी आहे आणि मेंदुच्या त्याच विनाकामाच्या एरीयात चिंतातुर जंतू आपले शब्द पोहचवु पहात आहे त्यामुळे हा ट्रोलींग करण्याचा प्रयत्न व्यर्थ गेला आहे असे मी तरी समजतो.

वाचणार्‍यांनी कृपया ती चटणी आणि तिचा आंबटपणा इमॅजीन करणे बंद करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निबंध हा वांग्मयप्रकार हाताळणं हे वांग्याची भाजी करण्याइतकंच कठीण काम असतं. ती सर्वांना आवडायची तर - पुरेशी मसालेदार हवी, पण अति नको; लिबलिबित असावी पण गिळगिळीत नको; आणखीही इतर काही बरंच असावं, पण दुसरंच इतर काही नको - अशा प्रकारची अनेक बंधनं वागवावी लागतात. पण या कलाप्रकाराचं, किंवा माध्यमाचं तेच बलस्थान आहे. अशा बंधनांनी बांधलेला लेखक या काचिदाश्चर्यशृंखलेने बद्धः असल्यामुळेच प्रधावंती (नीट वाचा, प्रधांमंत्री नाही. ते बद्ध वगैरे काही नाहीत) होतो. उदाहरणार्थ, बाईंनी वर्गात 'कशावरही' निबंध लिहायला सांगितल्यावर मुलांची पंगुवत अवस्था होते. मात्र 'मला आवडलेला सूर्यास्त' असा विषय दिला की त्यांच्या लेखण्या प्रधावंती होतात.

तेव्हा निबंधांविषयी लिहायचं तर ही समीक्षाचौकट ध्यानात ठेवावी लागते. राहुल बनसोडेंनी पहिली बाजी मारली आहे ती कोणता ना कोणता विषय निवडूनच. त्यांनी त्यांना आवडणाऱ्या स्त्रियांविषयी लिहिलेलं आहे. या आवडत्या स्त्रिया कशा आहेत? तर एच४ वर आलेल्या मध्यमविवाहित. तरुणी हा शब्द त्यांनी जाणीवपूर्वक वापरलेला नाही हे कोणाही सुज्ञ वाचकाला समजावंच. त्या स्त्रियांची कर्तबगारी पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आणि अन्याय्य व्यवस्थेमुळे दबलेली असते. त्यांचा कोंडमारा झालेला असतो. आणि मग त्या आपलं स्वत्व सिद्ध करण्यासाठी सामाजिक होकाराचा (ज्याला खरंतर व्हॅलिडेशन असा सोपा शब्द आहे) शोध, यूट्यूबवर चिरोटे दाखवण्याच्या भावनेने आपण कोण हे दाखवत, घेत असतात. त्यांचे चिरोटे पाहून राहुल बनसोडेंसारखे तरुण (त्यांनी हाही शब्द वापरलेला नाही, पण सूचित केलेलं आहे. आपल्या हातून निसटत चाललेल्या तारुण्याला जपण्यासाठी त्यांनाही असं व्हॅलिडेशन घेण्याची गरज पडत असावी.) त्यांच्या प्रेमात पडतात. खरंतर आकर्षणात पडतात असं म्हणायला हवं.

ही आकर्षणात पडण्याची देखील मानवाची, विशेषतः तारुण्य हरवत चाललेल्या पुरुषांची एक मानसिक गरज असते. या आकर्षणाला गणपत वाण्याच्या आकर्षणाची जातकुळी आहे. गणपत वाण्याला जसं 'या जागेवर बांधिन माडी' असं स्वप्न असतं तसं या मध्यमविवाहित तरुणांना त्या स्त्रियांकडे बघून 'हिला माडीवर घेऊन जाईन' असं स्वप्न पाहायला आवडतं. पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काही करण्यापेक्षा ती स्वप्नं पाहाण्यातच आनंद घेणं महत्त्वाचं ठरतं. हे या निबंधातून अधोरेखित केलेलं आहे.

दबलेल्या, पारंपारिक वातावरणातल्या, पण तरीही जनतेसमोर येऊन स्वतःला दाखवणाऱ्या स्त्रियांविषयीचं त्यांचं फेटिशही मर्यादित आहे. पारंपारिक कपडे न घालता परिवर्तनवादी कपडे असावेत ही त्यांची इच्छाही तशीच. मात्र तेही स्वतः परंपरेने दबलेले असल्यामुळे, स्वातंत्र्य हवं, मोकळेपणा हवा, परिवर्तन हवं, पण ते एका मर्यादेतच. फारसे तोकडे कपडे नकोत असं ते सुचवतात. त्यामुळे त्यांच्या सरड्याला कुंपणच मानवतं असं दिसतं.

तर एकंदरीत अशा मध्यमविवाहित स्त्रिया निव्वळ आवडण्यातून त्यांचा मध्यमपुरोगामीपणा दिसून येतो. या बाबतीत आमचे सहसमीक्षक चिंजं यांच्याशी आम्ही नाईलाजाने सहमत होत आहोत. 'अधिक विश्लेषण, व कठीण शब्द' वापरून आमचा निष्कर्ष आलेला आहे, एवढ्याच समाधानापोटी आम्ही ही नामुष्कीची गोष्ट स्वीकारत आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला आलं एकदाचं रसग्रहण.

परखड विचार आपण फक्त राजकीय लेखनाता ऐकण्याची सवय केलेले लोक पण आता अंतर्वस्त्रे,दुर्बोध नटांपर्यंत पोहोचलेल्याची जाणीव झाली. आमच्या इथल्या भावेंबद्दल फारच गर्व होता आमच्या शहराला पण त्याचे मिशेलिन स्टार्स फारच तुपकट झालेत काय?
परिवर्तन शब्द वाचल्यावर पुन्हा खाली बसत होतो. या बसला हाफ तिकिट मिळणार नाही, लाल डब्याची वाट पाहू म्हणून. कपड्यांच्या फ्याशनमध्येही आलेला दिसतोय.
व्हेज मोमो (कडबू) खातो हे आता उजळ माथ्याने सांगत फिरता येईल काही सोवळ्या संस्थळांवर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"छुपे/छुपा" हा शब्द जोपर्यंत येत नाही तोपर्यंत धागा व त्यावरील सर्व प्रतिसाद फाऊल धरण्यात येतील. बेगडी हा शब्द आलेला आहे त्यामुळे नेसेसरी कंडिशन्स ची पूर्तता झालेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे मला म्हणायचय ते असं की
छुपा असु शकत नाही का
सर्व च मामला सर्व च बाबतीत खुल्लमखुल्ला आहे असे नसते.
कधी कधी स्व-नकळतही हा प्रकार होत असतो.
बशीर बद्र पाकीस्तानी मुशायर्‍यात लोग टुट जाते है एक घर बनाने मे नेच सुरुवात करतो, नेमांडेंचा रत्नागिरीकर, श्री.पु. भागवतांचा चितपावनाच्या घरचं तुम्हाला चालेल का... सारखा प्रश्न विंदांचा विलास सारंगाना आलेला अनुभव, सिनीयर सरदेसाईची जाधवांविषयी कॉमेंट, पाटलांनी जोखलेली कार्नाडांची नेणीव
म्हणजे असे असु शकते इतकेच म्हणायचे आहे ते मुख्य म्हणजे स्व नकळतही असु शकते .
फार खोलवर जातीयतेची धार्मिकतेची मुळे पोहोचलेली असतात सुशिक्षीत सुसंकृत व्यक्तींच्या नेणीवेत रुतलेला भाग किलकिल्या पडद्या आडुन तुकड्या तुकड्या त जेव्हा दिसतो तेव्हा
हादरवुन टाकणारा अस्वस्थ करणारा अनुभव असतो.
छुपा होता असतो असेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा निबंध टिकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>>हा निबंध टिकला.<<<<

गाथाच ती , टिकणारच !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कट्टाही इंद्रायणीकाठीच आहे.यांना आमंत्रण गेले का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहुलबोवा ओळखीचे नाहीत . तुमच्या ओळखीचे असल्यास बोलवा . सत्संग होईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या आवडत्या स्त्रिया आमच्या डोक्यात जातात :राग:

बादवे या बायकापण "माझी चवथी शिकलेली आज्जी चिरोटे फार चान बनवायची. अख्ख्या पंचक्रोशीत फेमस होते तिच्या हातचे चिरोटे. अजुनही लोक त्याची आठवण काढतात." असले डायलॉग मारतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही तुमची राजकीय भूमिका आहे, का फक्त व्यक्तिगत मत, का कसं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.