सध्या काय वाचताय?

बर्‍याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता थोडे फार त्याबद्दल सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. पण अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसर्‍यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जीवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणार्‍यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहावेत ही आशा आहे. मी सुरुवात करते:

समाज प्रबोधन पत्रिकेचा नवीन अंक काही दिवसांपूर्वीच आला. रवींद्रनाथ ठाकूरांच्या १५० व्या जयंती निमित्त त्यांच्यावर विशेषांक आहे. सगळे लेख अजून वाचले नाहीत, पण काही लेख उलीखनीय आहेत - माया पंडित व अशोक चौसाळकर यांचे ठाकूरांच्या कादंबरींवर (घरे बाइरे आणि गोरा) लेख, आणि अवनिश पाटील यांचा ठाकूरांच्या इतिहासमिमांसेवरचा. नरेंद्र जाधव ("रवींद्रनाथांची विचारधारा") आणि विलास गिते ("रवींद्रसंगीत") यांचे सो-सो वाटले. ठाकूरांचे काही लेख अनुवादितही केले आहेत.

एकूण स.प्र.प. चे अलिकडचे अंक छान दिसताहेत - फाँट, लेआऊट, कागद वगैरे चांगले सुधारले आहेत.

परवा "फ्लोरिस्टन बंगला" नावाची नरसिंह मळगी यांची कानडी कादंबारी (उमा कुलकर्णी यांनी मराठीत अनुवादित केलेली) हातात आली. "सत्य घटनेवर आधारित, सदेह नायक-विदेही स्त्री यांच्यातील अभूतपूर्व प्रेमप्रकरण, रोमांचकथा" असे मागे वर्णन आहे, पण कुलकर्णींचे मनोगत वाचून त्या कादंबरीबद्दल फारशा उत्साही वाटल्या नाहीत. पहिली दोन पाने वाचली, बघू पुढे काय होते...

अवांतर: पुढच्या वर्षी एखाद्या दिवाळी अंकात उमा कुलकर्णींची त्यांच्या अनुवाद शैलीबद्दल, निरनिराळ्या कन्नड लेखकांच्या कादंबर्‍यांवर काम करताना आलेले अनुभव, कन्नड-मराठी भाषा-संबंध वगैरेंवर विस्तृत मुलाखत वाचायची खूप इच्छा आहे..

तर मग, तुम्ही सध्या काय काय वाचताय?

हा धागा जिवंत ठेऊन बर्‍याच उत्तमोत्तम पुस्तकांचा परिओचय करून दिल्याबद्दल सर्व सहभागी सदस्यांचे आभार. वाचनाच्या सोयीसाठी या धाग्याचा दुसरा भाग सुरू केला आहे. यापुढील चर्चा त्या धाग्यावर करावी ही विनंती

field_vote: 
4.142855
Your rating: None Average: 4.1 (7 votes)

हा जुना धागा आता वर आणण्याचे कारण असे की oudl.osmania.ac.in हे संस्थळ गेले काही दिवस उघडतच नाही. मराठी जुन्या पुस्तकांचा तेथे बर्‍यापैकी संग्रह आहे हे वर आले आहेच.

ह्याबाबत कोणास काही माहिती आहे काय? त्या विद्यापीठाशी संबंधित कोणी सदस्य येथे असतील तर ते अधिक चौकशी करू शकतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज सहज (सवयीने) काहि संदर्भ तपासायला बघितले तर हे स्थळ उघडते आहे. (गेल्यावेळी नव्हते उघडले)
म्हटलं अरविंदरावांना व्यनी टाकण्यापेक्षा इथेच प्रतिसादात लिहितो म्हणजे इतरांनाही कळेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सध्या 'लोकमान्य ते महात्मा' याचा दुसरा खंड खाण्याच्या मागे आहे.

लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी वगळता दुसर्‍या, तिसर्‍या फळीतले नेते, त्या दोघांची राजकीय, धार्मिक, सामाजिक मतं, त्यांचा वारसा पुढे चालवणारे लोकं, त्या काळातली नाटकं, कादंबर्‍या, सामान्य लोकांची मतं, असे अनेक पैलू त्यात आहेत. एवढ्या सखोल आणि समग्रपणे मराठीतून इतर कोणताच विषय आलेला असेल असं मला वाटत नाही.
मुख्य म्हणजे डॉ मोरेंचे स्वतःचे काहीही अजेंडे त्यात नाहीत. अभिनिवेशविरहित लिखाण. जातीपाती, भाषिक, धार्मिक तेढ वगैरे अनेक कंगोरे यात येतील, पण असं काहीही नाही. संपूर्णतः अभिनिवेशरहित लिखाण. नरसोपंत केळकरांवर टीका करतानाही फक्त चुका वाटतात तेवढ्या दाखवल्या, टीका अशी नाहीच. (पुस्तक वाचताना डॉ मोरेंचं चित्र डोळ्यासमोर आलं म्हणजे शब्दशः तुकारामांचे वंशज असंच, बौद्धिक, वैचारिक वंशज आणि प्रेमळपणाच्याही बाबतीत.)

मी माझं घर विकत घेईन तेव्हा पहिली गोष्ट विकत काय घेणार तर हे दोन खंड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझे वाचन ----

‘उपजत ऊर्मींना वाट करून देणे हा मानसिक समाधानाचा फार मोठा स्त्रोत असतो. परंतु तो स्त्रीला उपलब्ध होणार की नाही, हे तिचे कुटुंबीय किती उदारमतवादी आहेत किंवा ती किती लढाऊ वृत्तीची आहे, यावर अवलंबून असते.’
‘इंग्रजीमध्ये विनोदाने म्हटले जाते की, Behind every successful woman, there is a man who tried to stop her.’

"स्वत्व, स्वस्थ आणि स्त्रीचे मानसिक आरोग्य" - करुणा गोखले
--- मिळून सार्‍याजणी - वर्षारंभ विशेषांक - ऑगस्ट २०१२

प्रत्येक स्त्रीने आणि पुरूषाने वाचायला हवा असा हा लेख! वाचा-विचार करा-कृतीशील व्हा... हे मनावर ठसवणारा!

आणखी बरेच काही वाचनीय... खालील लिंकवर जरूर वाचा....

http://www.miloonsaryajani.com/node/804

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही धागा आहे.
मी सध्या केच २२ वाचतेय.
गेल्या आठवड्यात द अलकेमिस्ट वाचलं, पण काही झेपलं नाही, लेखकाला नक्की काय सांगायचय तेच कळलं नाही.
मराठी ४ ५ च पुस्तकंच वाचलीयत. त्यामानाने इंग्लिश वाचन बर आहे.
माझे आवडते लेखक/पुस्तक यांची नावं वर कोणी ना कोणी लिहिलीयत.
टॉलस्टॉय चं एना करनीन आवडल. पण त्यातली लेवीन ची फिलॉसॉफिकल स्ट्रगल नंतर नंतर बोअर झाली आणि तो ज्या कंक्लुजनला पोहोचतो ते तर अजीबात नाही पटलं.
मला टॉलस्टॉय पेक्षा दास्तोयेवस्की चा द ईडीयट फार फारच आवडला.
मार्गारेट मिशेल चं गॉन विथ द विंड आणि स्कारलेट माझी फेवरेट आहे. उगाचच या पुस्तकाला लव स्टोरी म्हणतात.
बाकी हेरी पॉटर, ट्वायलाईट, हंगर गेम्स सिरिज पण छान आहेत वन डे पण आवडलं आणि अगाथा ख्रिस्ती, वुडहाउस, रेमंड शँडलर भारीच.
www.munseys.com वर कॉपीराईट मधे नसलेली बरीच पुस्तकं मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेकांच्या शिफारसी नंतर दुर्गाबाईंचं "पैस" विकत घेतलं आहे.
सध्या "संपूर्ण शेरलॉक होम्स" सोबत पैसही वाचतो आहे. पहिला लेख वाचुन झाला. अर्थातच आवडला! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ,
दोन्ही पुस्तके छान आहेत.
'पैस' तर मस्तच आहे. शेरलॉक होम्स तुला अनेक महिने पुरेल. अधून मधून बाकीची पुस्तके पण वाचता येतात हा त्याचा फायदा Wink

अवांतरः एवढ्यातच मायकल क्रायटन चे 'प्रे-सावज' वाचून संपवले. प्रमोद जोगळेकरांनी छान अनुवाद केला आहे. आता अ‍ॅलिस्टर मॅक्लिनचे 'फियर इज द की' वाचायला घेतले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधीच्या प्रतिसादात ऑस्कर वाईल्ड च द पिक्चर ऑफ डोरीअन ग्रे आणि जेम्स हेडली चेस, एड लेसी, फ्रेडरिक ब्राउन लिहायच राहुन गेलं.
ख्रिस्टी ची बहुतेक सगळी पुस्तक इंग्लिश पीडिएफ इथे मिळतील
http://f.luo.ma/dl/ac

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्मिताजी,

दुव्याबद्दल शतशः धन्यवाद.
अत्यंत उपयुक्त असा हा दुवा आहे,
मी अनेक पुस्तके उतरवून घेतली आहेत व अजूनही घेतो आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या बरीच पुस्तके अर्धवट, पॅरलल मोडमध्ये वाचणे सुरू आहे. ( एक ना धड, भाराभर चिंध्या म्हणतात ते हेच. असो.)

१. लँग्वेज ऑफ द गॉड्स इन द वर्ल्ड ऑफ मेन- लेखक आहे शेल्डन पोलॉक. विषय आहे भारतीय उपखंडात संस्कृतचे सांस्कृतिक स्थान कसे उंचावत गेले, व्हर्नाक्युलर साहित्याचा उदय कसा झाला, वगैरे वगैरे. प्रचंड डीटेल्स ने भरलेले पुस्तक आहे. सर्व भारतीय तसेच प्रमुख युरोपीय भाषांतील व्हर्नाक्युलरायझेशन मध्ये समान धागे काय आहेत, याची जी चिकित्सा केली आहे, ती केवळ अप्रतिम आहे.

२. गाथासप्तशती-भाषांतरकार आणि विवेचक आहेत स.आ. जोगळेकर. हाल सातवाहनाच्या गाथासप्तशतिचे आणि त्याद्वारे प्राचीन महाराष्ट्राचे सर्व आंगांनी अतिशय विस्तृत विवेचन.

३. भारत संस्कृती-लेखक आहेत प्रख्यात बंगाली भाषाशास्त्रज्ञ सुनीतिकुमार चॅटर्जी. बंगालीत असल्याने वाचायला वेळ लागतो. पण छान आहे. आर्य , द्रविड, या विषयांवर, काही आदिवासी भाषांवरचे लेख उत्तम. सध्या हे थोडेसेच झालेय वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शेल्डन पॉलोक चं पुस्तक वाचून झाल्यावर प्रतिक्रिया वाचायला आवडतील. मी पुस्तकाचा फक्त तिसरा भाग अद्याप नीट वाचलाय; पहिले दोन भाग नीट वाचले नाहीत.

माझे अलिकडचे वाचन दोन टोकांचे आहे - एक तर सेमेस्टर च्या वर्गांसाठी गेल्या दोन महिन्यात वाचलेले - वि. हेगेल: लेक्चर्स ऑन द फिलॉसॉफी ऑफ हिस्टरी, कार्ल मार्क्स, द जर्मन आइडियॉलॉजी, आणि या आठवड्यात मिशेल फूको, द आर्कियॉलॉजी ऑफ नॉलेज.

या सगळ्याला तोड म्हणून ऋजुता दिवेकरची दोन पुस्तकं वाचून काढली - डोंट लूज यॉर माइंड, लूज यॉर वेट! आणि विमेन अँड द वेट लॉस तमाशा!

मध्यंतरी (वर्गासाठीच) एक मस्त पुस्तक वाचले - नॅटली झेमन डेविस चं द रिटर्न ऑफ मार्टिन गेर. मध्ययुगीन फ्रांस मधल्या एका प्रसिद्ध तोतया ची कहाणी. यावर बरेच लिखाण झाले आहे, आणि एक प्रसिद्ध फ्रेंच सिनेमाही निघाला होता. १०० पानांच्या आसपासच आहे, पण तत्कालीन फ्रेंच समाजाचे, न्यायपद्धतीचे, लग्नसंबंधांचे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सुरेख चित्र डोळ्यासमोर ठेवते. अतिशय वाचनीय पुस्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>या सगळ्याला तोड म्हणून ऋजुता दिवेकरची दोन पुस्तकं वाचून काढली - डोंट लूज यॉर माइंड, लूज यॉर वेट! आणि विमेन अँड द वेट लॉस तमाशा! <<

हा हा हा. अहो मार्क्स, फूको आणि हेगेल तिथे कबरीत थडथडू लागतील हे कॉम्बिनेशन पाहून.

द रिटर्न ऑफ मार्टिन गेर - चित्रपट पाहिला आहे. जेरार दपार्दिअ ह्या सुप्रसिध्द नटानं मुख्य भूमिका बजावली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हेगेल नंतर ऋजुता म्हणजे दुपारी लग्नाच्या जेवणानंतर रात्री ताक प्यायल्या सारखं. हेगेल किती ही विद्वान असला तरी त्याची लिखाण शैली मात्र भयानक जड! त्या मानाने जर्मन आइडिऑलॉजी एखाद्या रहस्यकथे सारखे पेजटर्नर वाटले.

ऋजुताच्या पुस्तकात भन्नाट काही लेखन आहे - अतिरेकी विधानं, नको तिथे भलतीच उदाहरणं, आणि काय काय. संपादकांन थोडे ताब्यात आणायला हरकत नव्हती, पण खपते म्हटल्यावर रँडम हाउस ने देखील फार लक्ष दिले नाही वाटतं. वाचकाला मूर्ख ठरवून त्याला कर्कश्श लिखाणात शहाणपण शिकवण्याची शैली आजकाल सेल्फ-हेल्प पुस्तकांमध्ये जोरात आहे. पहिल्या पुस्तकापेक्षा दुसर्‍यात हे आवर्जून दिसते. दुसर्‍यात फारच तोचतोचपणा आहे.

पण आहाराचे सँपल प्लॅन चांगले आहेत - आमच्या सारख्यांना (म्हणजे सारखे चरायला आवडणार्‍या मंडळींना) २-२ तासांनी नेमके काय, कधी व किती खावे याबद्दल काही चांगल्या सूचना आहेत. मला अजिबात आवडणार नाही असं वाटलं होतं, पण पहिलं पुस्तक मी बर्‍यापैकी सहज वाचून संपवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंटरेस्टिंग!! ती हेगेल अन मार्क्सच्या पुस्तकांची नावे पहाताच कळायचे बंद जाहले Wink बाकी ऋजुता दिवेकरी उतारादेखील खासच. मी अशावेळेस पुलं वाचतो नैतर सरळ गोविंदा-कादर खान प्रभृती लोकांचे सिनेमे पाहतो किंवा मिथुनाचार्यांचा गुंडा किंवा दे दणादण कैतरी पाहतो. मस्त श्रमपरिहार होतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आता भाग दोन करा. इतक्या लांब धाग्यावर काही कळेनासं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

गोदी मीडिया वाचत आणि बघत आहे.
इतकी मूर्ख जमात जगात असेल ह्या वर माझा विश्वास नव्हता.कारण अगदी खेडवळ व्यक्ती ज्याला लिहिता वाचता पण येत नाही.
त्यांचे विचार आणि विचार करण्याची पद्धत खूप उच्च होती आणि आहे.
कोणत्याही विषयात ही अडाणी लोक पण उत्तम मत मांडतात..
पण गोदी मीडिया चे न्यूज चॅनल आणि न्यूज paper बघून आणि वाचून असे वाटते ह्या जगात शिक्षण घेतलेली लोक पण महामूर्ख असू शकतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोदी मीडिया वाचत आणि बघत आहे.
इतकी मूर्ख जमात जगात असेल ह्या वर माझा विश्वास नव्हता.कारण अगदी खेडवळ व्यक्ती ज्याला लिहिता वाचता पण येत नाही.
त्यांचे विचार आणि विचार करण्याची पद्धत खूप उच्च होती आणि आहे.
कोणत्याही विषयात ही अडाणी लोक पण उत्तम मत मांडतात..
पण गोदी मीडिया चे न्यूज चॅनल आणि न्यूज paper बघून आणि वाचून असे वाटते ह्या जगात शिक्षण घेतलेली लोक पण महामूर्ख असू शकतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने