चटपटीत आणि पौष्टिक दही वडा

साहित्य–
३/४ कप उडदाची डाळ
१/४ कप ओल्या खोब-याचे पातळ तुकडे
४-५ मिरं
२ कप पातळ ताक
दीड कप दही
५-६ टे.स्पू. साखर
मिरपूड
लाल तिखट
चाट मसाला
मीठ
तळण्यासाठी तेल

पाककृती:
वडे: उडीद डाळ पाण्यात ४-५ तास भिजत घालावी. नंतर, त्यामधील अगदी थोडेसेच पाणी घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. वाटलेले मिश्रण थोडे दाटसर करावे, नंतर त्यात मीठ, ठेचलेले मिरे आणि खोब-याचे पातळ काप घालावेत. वडे मध्यम आचेवर गोल आकारात तळून घ्यावेत. काहीवेळेस वडे आतून कच्चे राहतात, म्हणून वड्यांचा आकार मोठा ठेवू नये.

ताक: पातळ ताकात थोडी साखर आणि चवीपुरते मीठ घालून, तळलेले वडे त्यामध्ये साधारण अर्धा ते एक तास बुडवून ठेवावेत. तोपर्यंत वरुन घालावयाचे दही तयार करुन घ्यावे.

दही: वाडग्यात थोडे दही घेऊन, ते रवीने घुसळून त्यामध्ये पाणी घालून दह्यास आवश्यक तितका पातळपणा द्यावा. आवडीनुसार साखर व चवीस थोडे मीठ घालून हे मिश्रण थोडावेळ फ्रिजमध्ये गार होण्यास ठेवावे.

नंतर, ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घेऊन, त्यावर दह्यासोबत वरुन चाट मसाला, मिरपूड, व लाल तिखट घालून डिश सर्व्ह करावी.

उडदाच्या डाळीचा गरमागरम आणि कुरकुरीत असा गोड दह्यासोबत खाल्ला जाणारा दही वडा हा एक चविष्ट आणि तितकाच पौष्टिक पदार्थ आहे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फोटु कुठेय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो काढण्याआधीच सगळे दहीवडे फस्त झाले. आमच्याकडे सगळ्यांना कधी एकदा तो वडा तेलातून ताकात पडतोय आणि कधी आम्ही तो खातोय असं झालेलं असतं सगळ्यांना. ताकात भिजवलेले वडे प्लेटमध्ये घेऊन, त्यावर दह्यासोबत वरुन चाट मसाला, मिरपूड, व लाल तिखट घालून डिश सर्व्ह करणे ह्या स्टेप पर्यन्त पोहोचतच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!
पल्लवी

दहीवड्यांत मध्ये भोक का असतं हे आता समजलं.

आमचे परमपूज्य दहीवडे तळले की मिठाच्या पाण्यात बुडवून त्यातलं जास्तीचं तेल काढून टाकायचे. एकदा ते मीठ-तेल-पाणी पातेलं जमिनीवर तसंच राहिलं. दुसऱ्या दिवशी त्यात झुरळांच्या मोठ्या तांड्यानं आत्महत्या केल्याचं दिसलं. मग बराच काळ, झुरळं मारायची या नावाखाली आम्ही दहीवडे करायचो. आता मात्र परिस्थिती बदलली. स्वतः फक्त वडे तळले तरी वजन वाढतं अशी परिस्थिती आहे. म्हणून मी बाहेर जाऊन दहीवडे चापते. उगाच वजन नको वाढायला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मग बराच काळ, झुरळं मारायची या नावाखाली आम्ही दहीवडे करायचो.

मेलो मेलो ROFL ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त Smile प्रतिसाद एकदम धमाल आहे. झुरळांचा तांडा काय अन दहीवडा करायची एक्स्क्युझ काय. मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचे परमपूज्य दहीवडे तळले की मिठाच्या पाण्यात बुडवून त्यातलं जास्तीचं तेल काढून टाकायचे. -यस्स! आणि मला दही आवडत नसल्यामुळे मी अनेकदा नुसतेच मीठपाण्यातून काढलेले दहीवडे खायचे. आजकाल दही आवडतं.

- दहीवड्यात आम्ही डाळ वाटतांनाच आलं घालतो. मात्र मिरे, खोबरं- ही पुणेरी पद्धत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिरे खोबरे ही दक्षिण भारतिय पद्धत असावी असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा कोकणीही असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमच्या ऑस्टिनात गुजराती दुकानांत दहीवड्यांच्या दह्यात चिंच-खजूराची आंबट-गोड चटणी घालून देतात. 'मद्रास पॅॅव्हेलियन'मध्ये आंबट दही असतं आणि त्यात धन्याची पूड, नावापुरतं तिखट आणि मीठ असतात. मला ते मद्रासी दहीवडे फारच आवडतात. 'परमपूज्य की याद आती है' छाप असतात ते.

सोम-शुक्रवार मद्राश्यांकडे दुपारच्या बफेत दहीवडे नसतात, त्यामुळे तिथे जायचं तर मी शनि-रविवारी अधिकचे पैसे देऊन जेवते. जेवण बहुतांशी दहिवड्यांचंच करते. एकदा कधी तरी विकेण्डलाही तिथे दहीवडे नव्हते; मी मुद्दाम तक्रार वगैरे करून आले. त्या माणसांनीही माझी याद ठेवली; पुढच्या वेळेस तिकडे गेल्यावर आवर्जून, "आज आहेत दहीवडे" असं सांगितलं होतं.

१. ५-६ वर्षं राहिल्यावर आमचं म्हणायला हरकत नसावी.
२. ही असली थेरं जेवणाच्या नावानं केली की अर्थातच दुसऱ्या दिवशी वजन जास्त भरतं, पण तिसऱ्या दिवशी पुन्हा नॉर्मल होतं. दही आणि उडीद डाळीत चिकार प्रथिनं असतात, असं मोजून चिकार खायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सध्या वॉलमार्ट मध्ये अ‍ॅनीज योगर्ट मिळतय. निदान आमच्याकडे तरी. ते बरचसं आपल्या सायीच्या दह्यासारखे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्निग्ध पदार्थ पूर्णांशानं असलेलं ग्रीक दही सायीच्या दह्यासारखंच लागतं. त्याचं श्रीखंडही उत्तम होतं.

गेल्या काही आठवड्यांपासून मी 'चोबानी'चं दही आणते. दही ठीकठाक आहे; 'चोबानी' विस्थापितांना नोकऱ्या देतात म्हणून 'फाये'चं दही आणणं बंद केलं.
For Helping Immigrants, Chobani’s Founder Draws Threats

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला ती ग्रीक योगर्टस नाही आवडत. दह्यात पाण्याचा अंश बर्‍यापैकी पाहीजे ब्वॉ. त्या र्अ‍ॅनीच्या दह्यातही सायीचे लपके नसतात्च. दॅट सक्स. मला लपके आवडतात ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोड्या दिवसात बाकीच्या स्टोअर्स मध्ये मिळेल, सध्या खालील वर सरचा

http://www.annies.com/store-locator

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

दहीवडे करताना, मी सुद्धा तळलेले वडे कोमटसर पाण्यात सोडते. ते तळाला गेले की समजायचे पोटात कच्चे राहीले. मग पुढचा वडा जास्तं काळजी पूर्वक तळायचा. कोमट पाण्याने त्यातले तेलही निघून येते . नाहीतर तेल मुरलेले वडे आणि दही, अंम्मळ बोअर लागतात.
आणि त्याच्यावर चिंच आणि खजुर ची चटणी पाहिजेच.

चकलीच्या सोर्‍यासारखा माझ्याकडे सोर्‍या आहे. त्यातून भोक असलेले वडे करता येतात, पण सुरुवातीला अंदाज येई पर्यंत लहान मोठे आकार येतात. एकदा सराव झाला की सारे मापात येतात.

फेटलेल्या दह्यात सुद्धा मी थोडी मिरची, अगदी बारीक वाटून घालते . छान चव येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

ही पाककृती अंडी न घालता करता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0