छंद/करीअर आणि नोकरी

कोणीतरी हॉबी, करीअर आणि जॉब यांचा तौलनिक तक्ता किंवा मांडणी द्या.
मला वाटतं हॉबी(छंद) - जी मनास आनंद देते व वेळेचा सदुपयोग करते. मग पैसा मिळो ना मिळो आपण आपली प्रचंड गुंतवणुक तीत करतो. आपल्याला छंदाविना करमत नाही. रिकाम्या वेळात, आपली पावले आपोआप तिकडे वळतात. छंदात समाधान मिळते.
करीअर - आपल्या उपजिवीकेचे साधन तर असतेच पण त्यात आपली गुंतवणुक जॉबपेक्षा अधिक असते. आपण करीअरचा आपण होऊन पुढाकार घेऊन पाठपुरावा करतो. करीअरमध्ये आयुष्याला purpose मिळतो, दिशा लाभते.
जॉब(नोकरी) - केवळ उपजिवीकेचे साधन.नोकरीत पैसे मिळतात.

तुमचे तीन्ही एकच आहे का? भिन्न आहे का? व तीन्ही कोणते कोणते आहेत. कशात जास्त आनंद मिळतो. कशात जास्त वेळ द्यावा "लागतो"? कशात वेळ अधिक द्यावासा वाटतो म्हणजे खरं तर अपुर पडतो? speaking abt me - poetry reading & Astrology - hobbies
career & job one & the same. IT sector.
अजुन एक - जेव्हा तुम्ही अगदी सुरुवात केलीत ती आवडत्याच क्षेत्रात केलीत की नंतर तिकडे वळलात? की कधी ते क्षेत्र मिळालेच नाही?
थोडेसे इन्टरॅक्टिव्ह होऊन मते मांडू यात. या विषयात वेगवेगळे विचार, स्वप्ने, ऐकायला खरच मजा येइल.
कोणी करीअर अचानक किंवा भरपूर विचार करुन बदललं का? नाना अंगांनी खरं तर चर्चा होऊ शकते. जर कोणी इन्टरेस्ट घेतला तर.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नोकरी/व्यवसाय हे पैसा देण्याचे साधन आणि छंद/आवडी ते मनसोक्त उधळण्याचे!
दोन्ही एकच असले तर बहुतांश वेळा एकतर आनंद मिळतो किंवा पैसा! त्यामुळे मी ते दोन्ही वेगळे ठेऊन दोन्ही मिळवतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरे आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋ. छंद नाही म्हणता येणार पण गाडी हायर करुन मस्त लांब लांब अनोळखी टिकाणांना भेटी द्यायला फार आवडतं. हायर कारण स्वतःच्या गाडीवरती माइल्स चढवायचे नको वाटतात.
नवरा तर म्हणतो रिटायर झाल्यावर एक ट्रेलर घेऊन अमेरीकाभर फिरायचं. ते आमच्या मनातले शेखचिल्ली मांडे आहेत झालं. बट हु नोज, खरेही होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छंद आणि करियर याच्यात निवड करण्याचं दुर्घट काम कधी करावं लागलं नाही. कारण असलेला छंद (वाट्टेल ते वाचणे आणि चिऊकाऊच्या गोष्टी लिहिणे) करून उपजीविका करणं लय अवघड असावं हे आयुष्यात लवकर लक्षात आलं. बाकी काही कला अंगात नसल्याने आपोआप करियरकडे लक्ष दिलं.

"इस दोस्ती को रिश्तेदारी में बदल देते हय" हे जितकं अर्बन लीजंड आहे तितकंच "छंदाचं व्यवसायात रूपांतर केलं" हे आहे. म्हणजे करणं शक्य नाही असं नाही, पण करू नये शक्यतो. छंद आपण आपल्या आनंदासाठी करतो. त्यात 'समोरच्यामुळे' तडजोड करायला लागण्यासारखं क्लेशकारक दुसरं काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पण आबा तुम्ही इतकं सुंदर लिहीता की तुम्हाला असे वाटत नाही एक दुय्यम(बॅक अप) उपजीवीकेचे साधन म्हणून लेखन या छंदाकडे पहावं. म्हणजे रवी उंचवट्यावरची जोड रवी रेषा. एक मुख्य तर दुसरी पूरक, जस्ट टू फॉल बॅक ऑन. यु शुड लुक इन्टू इट. तुम्ही खरच खास लिहीता.
______
अमेरीकेत तर जोडधंदा हा असतोच असे ऐकले आहे. मलाही खूपदा काहीतरी जोड/पूरक करायची फार हुक्की येते पण काही लिमिटेशन्स आहेतच. पण निदान एखादा किऑस्क विकत घ्यावासा वाटतो ब्वॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्याट्स द पॉईंट. मी पाहिजे ते / मनाला येईल ते / तसं लिहू शकतो कारण माझी उपजीविका त्यावर अवलंबून नाहीये. उद्या उपजीविका अवलंबून असली तर बंधनं येतील. वेगवेगळ्या प्रकारची.

एक गंमत म्हणून सांगतो. 'जलपर्णी' वाचून मिपावरच्या एका बाईंनी असली कथा लिहावीशी वाटली म्हणून खेद प्रदर्शित केला. त्या बाईंनी माझ्या त्याआधीच्या कथांवर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता मी व्यावसायिक लेखक असतो तर 'एलियनेटिंग माय रीडर्स' असं कृत्य झाल्यामुळे अस्वस्थ झालो असतो. पण हौशी लेखक असल्याने या प्रतिक्रियेला फाट्यावर मारू शकलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी खरे आहे. म्हणुनच रवी जोड रेषा. मूळ रेषा नाही. मी तुमच्या जागी असते म्हणजे इतकी प्रतिभा असलेली तर धडपड करुन स्वतःचे पुस्तक नक्की काढले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'जलपर्णी' वाचून मिपावरच्या एका बाईंनी असली कथा लिहावीशी वाटली म्हणून खेद प्रदर्शित केला.

का बुवा? त्या कथेत नक्की काय वाईट होते?

(आणि असली कथा नाही लिहायची तर मग काय नकली कथा लिहायची? द्याट वुड नॉट ह्याव बीन राईट - ऑर फेअर!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आबा! हाथ मिलाओ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला या विषयावरती ऐसीकरांचे विचार ऐकायला फार आवडतील याचे मुख्य कारण म्हणजे, व्यवसाय्/नोकरी/छंद यातून मनुष्य खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती घडतो. म्हणतात ना जर एखाद्या व्यक्तीस जाणून घ्यायचे असेल तर ती रिकाम्या वेळात काय करते हे जाणून घ्या. व्यावसायीकता हा तर व्यक्तीमत्वाचा अविभाज्य भाग बनुन जातो. सेकंड नेचर, खोल हाडात भिनलेले. अ‍ॅस्ट्रॉलॉजी आणि कवितांखालोखाल माझ्या आवडीचा विषय.
____
अनंत वेळा (N number of time) मी विचार करते माझी मुलगी कशी बनेल? पत्नी आदि रुपार्त नाही तर कोणत्या व्यवसायात ती जाईल, तिचे व्यक्तीमत्व त्यातून कसे बहरेल? ती कशी झेप घेइल, कितपत झेप घेइल? What kind of lady will she turn out to be? तिच्या व्यवसायात तिला किती समाधान मिळेल? व्यवसायाचे रुप काय असेल. I never get enough of it. खूप पॅशनेट वाटतो हा विषय.
_____
मला स्वतःला समाजसेवेत जायचं होतं तेही लहान मुलांकरता काही करुन मला समाधान मिळालं असतं. पण गेले आय टीत. इथेही मी बर्‍यापैकी low rung वर आहे. पण निदान चालून जातय. मात्र मुलीला पंख फुटतायत, ती एका वर्षात उडेल, नंतर मी करीअर बदलण्याची थोडीफार रिस्क घेईन. अशी स्वप्ने तरी पहाते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉलेजात असताना टूव्हीलर दुरुस्तीचा छंद होता, गाड्या मॉडीफाय करायची कामे करायचो, छोटी मॉडेल्स बनवायचो. नंतर कामेही जास्त मिळू लागली पण इंटरेस्ट कमी होत गेला.

चित्रं काढायचा पहिल्यापासून छंद होता. तो नंतर व्यवसाय झाला. पण व्यवसायातली चित्रे हा फार वेगळा प्रकार आहे. त्याने आनंद मिळतोच असे नसते प्रत्येक कामात. बर्‍याचदा पाट्या टाकाव्या लागतात. तडजोडी तर कित्येक. पैसा मिळवण्यासाठीच हे सगळे.

मग छंद शिल्लक राहिला नाही म्हणून चार पाच वर्षापासून उगीच मिळेल ते वाचायला सुरुवात केली. तीन वर्षापासून लिहायला सुरुवात केली. आता लेखनाचाही छंद स्क्रीप्ट रायटिंग व्यवसाय म्हणून उरावर बसतो की काय असे झालेय.

जे जे छंद म्हणून जोपासले त्या त्या गोष्टीत पैसा मिळत गेला. छंद म्हणून आता काय करु हा सध्या प्रश्नच आहे. बघू......

पुरेसा(?) पैसा एवढा टास्क कंप्लीट झाला की हेच परत करायचे. पैसा फॅक्टर टाळून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्या प्लीज तुमचा मिपावरचा धागा टाका ना. मी ही शोधते. माझ्याकडून तो दुवा गहाळ झाला आहे. अतिशय सुरेख लेख आहे तो "करीअर" या विषयावरचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हि माझी कथा करीअर बिरिअर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. कमालीची जिद्दीची व इन्स्पायरींग आहे. मी पूर्वी वाचली होती. मला फार आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्नच नाही. अफाट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अभ्याशेठ , लिंक वाचली ... आपल्याबद्द्दल आदर वाढला..... तसेच समोर आल्या कस्टमर/आलेले काम या बद्दल आपण वेळोवेळी जी संवेदनशीलता दाखवता त्याचे कारण हि समजले . हि फार म्हणजे फार महत्वाची असते .. ( माझ्या ऑफिस मध्ये काही वेळा उच्चं शिक्षित आणि बाणेदार स्टाफ ला हेच सांगावे लागते ... कि कस्टमर आहे म्हणून धंदा आहे म्हणूनच काम आणि पगार आहेत. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा टेडेक्स टॉक पहा. मी तो ३-४दा पाहूनही मला त्याला काय म्हणायचंय कळलेलं नाही. हा धागा पाहून मला तो व्हिडीओ आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

https://www.youtube.com/watch?v=EeSfpZEn0ww
थोडा बाळबोध आहे. आयुष्यात वेगवेगळे उद्योगधंदे (व/किंवा नौकरी) करा; काही गोष्टी पोटापाण्यासाठी करा, काही आवडीखातर करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बय्राच गोष्टींचे छंद होते पण ते करिअर ,व्यवसाय,करण्याचे मनात आले नाही. धरसोड फार असल्याने काही ही केले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छंद फंद खूप केले कॉलेजात असल्यापासून .. काही तात्पुरते काही कायमचे . १. शिक्षणाशी न संबंधित .. कॉलेजात असताना गोखले इन्स्टिट्यूट मध्ये एक अमेरिकन स्कॉलर दांडेकरांकडे रिसर्च करत होता रोजगार हमी योजनेवर. त्याचा दुभाषा म्हणून खेडोपाडी त्याच्याबरोबर फिरलो , मुलाखती खालपासून वरपर्यंत सगळ्यांच्या . ( मजुरापासून चीफ इंजिनेर पर्यंत )प्रश्नावल्या तयार करून सगळीकडून भरून घेणे ..भाषांतरं केली ढिगांनी खंक खेडेगांव , लाल डबे आणि एकीकडे न्यू यॉर्क वाला गोरा. या मुळे सदाशिव पेठेच्या बाहेर पडलो सगळ्या अर्थानी . (त्या वेळेच्या मानाने मस्त पैसेही सुटले बिडीकाडी ला , पण अणभव फार म्हणजे फार भारी होता . ) त्यामुळे आज मनरेगा ( जी रोहयो वर आधारित आहे ) वर थोर्थोर नेते जी अस्ताव्यस्त विधाने करतात ती बघून त्यांच्या डांबिसपणाची ... असो. वेगळा विषय...
२. ऐशीच्या दशकात भटे पुण्यातच रॉक जोरात होत . ( तसं कॅम्पात होताच पूर्वीपासून , पण भटे पुण्यात ८० चे दशक ) त्यात मज्जा केली , काही शोज केले , नंतर काही ऑर्गनाईझ केले ... लय धमाल ... नंतर मात्र फक्त ऐकणेव्यसन चालू ठेवले अत्यंत आनंददायी सगळे
३. सत्तरीच्या शेवटी पासून ऐशीच्या शेवट शेवट पर्यावरण चळवळीत गेलो ... भरपूर पक्षीनिरीक्षण , कॅम्पस , ट्रेक्स , चळवळी , संस्था , स्वतःच्या संस्था चालू करणे , बंद पडणे , आधीचे बाळबोध जंगलातील लाकडांचे ट्रक पकडणे ते त्यात स्केल चा अंदाज घेऊन दूरगामी परिणामवाले शोधायचं प्रयत्न , जाण , निराशा , लय लय कुटाणा ... वेगळा विषय .. अजूनही चालू असतो फक्त वैचारिक पातळीवर च . महत्वाचे ... एक वेगळे भान देणारे ...
४. लॅब मधील प्रयोगांचे तात्काळ स्केल अप करून कमर्शिअल पातळी वर आणण्याचे प्रयत्न , पार काहीही जलपर्णीवर मश्रुम वाढवणे वगैरे . काही यशस्वी , बरेचसे अयशस्वी ...
अजून काय काय ... असोच
लिहिण्याचा कंटाळा आला .. तुम्हाला वाचायचा कंटाळा यायच्या आधी थांबवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

A.1.Bapat _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कंटाळा कसला अण्णा सविस्तर लिहा. रोचक वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिहिण्याचा कंटाळा आला ..

हे एक वेळ समजू शकतो, पण...

तुम्हाला वाचायचा कंटाळा यायच्या आधी थांबवतो.

हात् साला! मग कसली तुम्ही भटे? आणि त्यातही सदाशिव पेठेतली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे रॉकचे अनुभव वाचून म्युझियम अवर्स नावाचा चित्रपट आठवला.

आणखी आणि तपशिलात लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगायो. फार सक्रीय माणूस दिसता. दंडवत!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बापटाण्णा कलंदर हैत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अण्णाजी _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नोकरी वा व्यवसाय आवडीच्या गोष्टीत करायला मिळणं, हे सुद्धा पूर्वी काही भाग्यवंतांच्या वाट्याला यायचं. आता त्या मानाने परिस्थिती बदलली असावी.

शाळेत असल्यापासून भाषा अत्यंत आवडीच्या. पण कॉलेजात जाताना सर्वांप्रमाणे सायन्सचा फॉर्म भरला. पहिल्या वर्षी, भाषांचे तास शेवटी असायचे आणि बहुतेक मुले त्याला थांबत नसत. पण शाळेच्या शिस्तीचा परिणाम जायला वेळ लागला, आणि जरी परीक्षेत मार्क्स धरत नसले तरी, भाषेची आवड म्हणूनही सगळे तास हजर रहायचो. एफ्.वाय्.च्या टर्मिनलला मराठीचा पेपर, निबंधासहित पूर्ण लिहून काढला. उत्तरपत्रिका वाटताना, मराठीच्या प्रोफेसरांनी वर्गात माझा निबंध वाचून दाखवला आणि मला पुढे बोलावून्,"अरे,तू का सायन्सला गेलास?" असे भर वर्गात विचारले. त्यावर मीही अत्यंत नाटकीपणे,"सर, पोटासाठी" , असे उत्तर दिले.
पुढेही काही दिशा ठरली नव्हती. इंटर सायन्सला(बी ग्रुप) निव्वळ कमी मार्क्स मिळाल्यामुळे मेडिकलला जाऊ शकलो नाही. मग प्रवाहपतितासारखे बी.एस्सी. केले. त्यात, केमिकल इंडस्ट्रीमधे शिफ्ट कराव्या लागतात म्हणून पार शेवटापर्यंत प्रवास केला. पीएच्.डी. चा फायदा इतकाच, की त्यामुळे रिसर्चची आवड लागली आणि पुढे त्यातच काम करायला मिळाले.
पण खरा छंद गाण्याचा होता. गाणे ऐकायला खूप आवडले तरी त्यासाठी कष्ट घ्यायची तयारी नव्हती. त्यामुळे गाणे शिकलो नाही, वडील उत्तम पेटीवादक होते. त्यांची फार इच्छा होती की मी पण साथ करावी शास्त्रीय संगीताची. पण मी ते जाणीवपूर्वक टाळले. एकतर हात फिरता रहायला मेहनत करावी लागते. त्यापेक्षा, लाईट म्युझिक बरे. निव्वळ छंद म्हणून आपल्याच आवडीची गाणी मनसोक्त वाजवायची. साथ करावी लागली, तरी ती तासंतास नव्हे, शिवाय आधी प्रॅक्टिस करुन स्टेजवर वाजवणे सोपे. आता हा छंद फक्त मनसोक्त ऐकण्यावरच आला आहे. जोडीला वाचन आहेच.
तसा, ट्रेकिंगचा छंदही बर्‍यापैकी जोपासता आला. सह्याद्री भरपूर फिरल्यावर, हिमालयातही दोन ट्रेकिंग अ‍ॅडव्हेंचर्स करायला मिळाली.
सध्या, तब्येत चांगली ठेवून खाण्याचा छंद जोपासतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

really interesting. Liked the reply.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापट,कधितरी मोकळे करा. ऐकू.
या धाग्याबद्दल शुचिला धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'च्रटजी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित अवांतर -
समजा कोणाच्या मुलाने/ मुलीने (वय १७-१८) म्हटले , कि मला लेखक व्हायचे आहे इंजिनीअर/ डॉकटर नाही .. तर पालकांची रिऍक्षन काय असायला हवी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आईबाप डाॅक्टर विंजेनर असतील तर हाणतील.
आईबाप डाॅक्टर विंजेनर नसतील तर बेक्कार हाणतील.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा.. पण मी काय असायला हवी असे विचारले आहे, काय असेल असे नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी लेखनात अजिबात पैसे नाहीत. पेपरवाले लोक शब्दाला एक रुपया अशा भावानं मानधन देतात; तेही दिलं तर. ('मी मराठी लाईव्ह' नामक पेपरानं माझे १५-१८हजार रुपये बुडवलेही आहेत. आता तो पेपरच बुडला.) कॉपीरायटिंग, जाहिराती, मराठी मालिका वगैरे लिहून पोटापाण्याचे पैसे सहज सुटत असावेत. (पण त्याला लेखन म्हणायचं का, असा प्रश्न विचारू नये.) एरवी, मराठी लेखकांमध्ये माहितीत दोनच लोक जे लेखन करून संसार चालवू शकले/चालवत आहेत - पु.ल. देशपांडे आणि कविता महाजन. पैकी पुलंची नाटकं, एकपात्री, रेकॉर्डींग्ज यांचेही चिकार पैसे येत असणार. त्याशिवाय मुक्तांगण, आयुकासारख्या संस्थांना घसघशीत देणगी देणं त्यांना शक्य झालं नसतं.

इंग्लिश भाषेत लिहून जरा जास्त पैसे मिळू शकतील, असा अंदाज आहे.

दुसरं, लिहायचं तर अनुभव घ्यायला हवेत. चांगलं लिहायचं असेल तर. ते अनुभव घेण्यासाठी दुसरे काही उद्योग करावे लागतातच. त्यासाठी इतर काही शिक्षण असेल तर फायदाच होईल.

तेव्हा पालकांनी अशा पोरांना रीतसर शिक्षण घ्यायला सांगावं. चांगल्या आणि प्रस्थापित माध्यमात नोकरी करण्याचा सल्ला द्यावा. हे सगळं करून काही हौस उरली तर पोर लेखन करू शकेल. जमल्यास, पालकांनी अशा (अवलक्षणी!) पोरासाठी डबोलंही ठेवावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

After the game, the King & the pawn go in the same box.

And the pawns have a better chance, to go near the Queen.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

haha

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरशिंगराव छान!

मला रिपेरिंगचा नाद होता तो घड्याळ रिपेरिंगमध्ये जिरवला. ९० नंतर चावीची घड्याळेच बाद झाली. सेलवरची आली. भटकणे ,बागकाम अजूनही चालू. इलेक्ट्रानिक्समध्ये शिकलेले लोक त्याचा वापर हौस म्हणून करत नाहीत याचे फार वाइट वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिथे जाउ तिथे छंद जोपासू असा काहीसा स्वभाव असल्याने नोकरीतही मी छंद जोपासते. तसे अनेक छंद आहेत्. जसे की बागकाम्, लिखाण्, वाचन्, क्रोशे, फोटोग्राफी, कुकिंग्, निसर्ग भटकंती, समाजकार्य‌. नोकरी ही आर्थिक गरजेसाठीच मानली तरी नोकरीमधे काम करता करता जरा वेळ मिळाला की वाचन्, लेखन हा छंद जोपासता येतो. नोकरीवर येता जाता आसपासचा रोज नविन बदल घडत असणारा निसर्ग अनुभवताना निसर्ग भटकंतीचा आनंद घेता येतो . तसेच येथील महिला संघाची मेंबर असल्याने समाजकार्यातही हिरीरीने भाग घ्यायला मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम‌. प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहान असताना विजेशी खेळायला आवडायचं( बाप ओलराउंडेर iti असल्याने) पहिल्यांदा शॉक दुसरीत असताना लागला fuse पण मीच बदलला (घडयाळाच्या आतली तार वापरून)
पुढे वाचनाचा(इतिहास) माझ्याकडे ओसामा ला मारले त्या दिवशीचे वर्तमान पत्र होत. विचार केला मोठा इतिहासकार होईन घंटा.
मग पोटासाठी अभियंतायांत्रिकी प्रोजेक्ट महिंद्रा composite मध्ये केला म्हणे पुढे जॉब सुद्धा रिसर्च करू scientist होऊ.
लागला जॉब production करतोय रात्र पाळी बघू धीरूभाई बनता आलं तर.
बंगलोर ला असताना कन्नड शिकणे सुरु केलं बोलू कानडी पोरगी पटवायची(मराठी भांडखोर असतात).आता कन्नड तोडकिमोडकी पण शेजारी कानडी मुलगी नाही. पडलो आफ्रिका मध्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा Smile विनोदी आहात तुम्ही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे धागे वरती काढुन मला एंबॅरॅस करु नका Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0