बंडू

(रोवन अॅटकिनसनच्या नाट्यावर आधारित).
एक ऑफिस डेस्क मांडलेला आहे. त्यावर पुस्तकं, पाण्याचा ग्लास, तत्सम वस्तू पडल्या आहेत. बागवे नावाचा एक मध्यमवयीन माणूस डेस्कच्या समोरच्या खुर्चीवर बसलेला आहे. प्रिन्सिपलची खुर्ची रिकामी आहे. एक मध्यमवयीन शिष्ट दिसणारा प्रिन्सिपल ताठ मानेने चालत चालत येतो. त्याच्या हातात काही पुस्तकं आहेत.
(प्रिन्सिपल नाकातून पुणेरी शुद्ध मराठी बोलणारा आहे).

प्रिन्सिपल: बरे झाले तुम्ही आलात मिस्टर बागवे. मला ठाऊक आहे कि आपण फार बिझी असता पण हा मुद्दाच असा होता कि दूरध्वनीवरून बोलता आला नसता.
बागवे: काही काळजी करू नका सर, बंडूचा काही त्रास होत असेल तर मला वेळीच दखल घेतलेली बरी.
प्रिन्सिपल: खरे सांगायचे तर बंडू हल्ली डोक्याला तापच झालाय.
बागवे: अरेरे!
प्रिन्सिपल: त्याचे शाळेत अजिबात लक्ष नाही. खेळात तो मुळीच रस घेत नाही. आणि गेला आठवडाभर तर त्याने गृहपाठ देखील केलेला नाही.
बागवे: अरे बापरे!
प्रिन्सिपल: (प्रिन्सिपल एकदम थंड आवाजात एकाच सुरात म्हणतात) स्पष्टच सांगायचे तर, जर तो मृत नसता तर मी त्याला शाळेतून काढून टाकले असते
बागवे: माफ करा, काय म्हटलं?
प्रिन्सिपल: हो आपण जे ऐकलेत तेच म्हटले, काढून टाकले असते.
बागवे: (सुरुवातीला काही न कळल्यामुळे माथ्यावर आठ्या येतात. मग एक सेकंदानंतर dialogue) बंडू मेलाय?
प्रिन्सिपल: होय तर. तो पडलाय तिकडे वर एकदम ताठ होऊन माजोरड्यासारखा, त्याच्या सध्याच्या वृत्तीला शोभेल असा. हा हा हा हा. तुम्हाला सांगतो, ह्या मुलग्याला स्वच्छता काय आहे ते अजिबात कळत नाही. कालपर्यंत तो चिखलात लोळत होता आणि आज त्याच कपड्यात तिकडे मारून पडला आहे. (एक सेकंद pause) आणि घाण वास सुद्धा मारतोय.
बागवे: पण तो मेला कसा?
प्रिन्सिपल: ते इथे महत्वाचे आहे का मिस्टर बागवे?
बागवे: का? हो. म्हणजे अर्थात.
प्रिन्सिपल: त्याचा संबंध कॅंटीनशी आहे. आम्हाला काही दिवसापासून शंका होती कि कॅंटीनमधून मुले चीक्क्या पळवताहेत. म्हणून आम्ही सापळा रचला. त्यात तुमचा बंडू सापडला. मी त्याला माझा समक्ष शिपायाकडून काठीने बडवायची शिक्षा दिली, ज्यात तो मेला. (इथे पुढचं वाक्य जास्त pause न घेता लगेच सुरु करायचंय). तुम्हाला हे ऐकून फार आनंद होईल मिस्टर बागवे कि त्या टोळीच्या म्होरक्याला आम्ही आता पकडले आहे. तुम्हाला सांगतो ह्या कॅंटीन...
बागवे: (प्रिन्सिपल ला मध्येच कापत) माफ करा.
प्रिन्सिपल: (बागवे बोलत असताना सुरु ठेवायचं. हा शब्द ऐकू नाही गेला तरी चालेल) मध्ये...
बागवे: माफ करा...पण तुम्ही शिपायाला माझ्या मुलाला काठीने बडवायची शिक्षा दिलीत?
प्रिन्सिपल: मग मी आत्ता काही वेगळे म्हटले का? हे बघा मिस्टर बागवे, मी बोलत असताना मला मध्ये मध्ये असे थांबवलेले आवडत नाही.
बागवे: पण...पण नक्की काय झालं?
प्रिन्सिपल: मुले बेधडक कॅंटीन मध्ये शिरून हव्या तश्या चीक्क्या पळवत होती.
बागवे: नाही म्हणजे, काठीने बडवत असताना काय झालं?
प्रिन्सिपल: ओ ते...एक क्षण तो असा वाकलेला आणि दुसऱ्या क्षणी असा तो जमिनीवर पडलेला.
बागवे: मरून?
प्रिन्सिपल: अं...मेल्यासारखा. मिस्टर बागवे, मला तुमचे हे तुमच्या मुलाच्या मृत्यूला घेऊन एवढे प्रश्न विचारणे जरा विचित्रच वाटतेय. मी इथे तुम्हाला त्याच्या वृत्तीबद्दल सांगतोय. आणि खरे सांगायचे तर त्याची ही वृत्ती त्याने कोठून घेतलीय हे मला आता दिसते आहे.
बागवे: तुमचं डोकं फिरलंय का?
प्रिन्सिपल: नुसते माझे? इथे तुमच्या मुलाने सगळ्या स्टाफची डोकी फिरवलीयत. तुम्हाला माहितीय तुमच्या (तुमच्या वर stress) मुलाच्या अंतयात्रेसाठी मला काल शाळा बंद ठेवावी लागली होती. तुम्हाला काय त्याचे म्हणा.
बागवे: अरे हा काय वेडेपणा चाललाय?
प्रिन्सिपल: हो हा वेडेपणाच चाललाय. किंबहुना, हा वेडेपणा असता जर हे खरे असते (आणि ख ख करून हळूच तोंडातल्या तोंडात हसायला लागतो).
बागवे: काय?
प्रिन्सिपल: मी मस्करी केली होतो मिस्टर बागवे. माफ करा, पण ही माझी विचित्र शैक्षणिक विनोद बुद्धी आहे. मी तुमची थोडीशी थट्टा केली.
बागवे: ओह...बापरे, तुम्ही तर माझा जीवच काढलात.
प्रिन्सिपल: हो ना, त्या गाढवाच्या अंतयात्रेसाठी मी शाळा कधी बंद ठेवीन का? (आणि चालत बाहेर जातो).

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

इथल्या मराठी मंडळात मी हा स्कीट बसवलेला. पण त्याच्या विडीयो नाहीय. आहे तीनच मिनिटाचा अगदी छोटासा पण शेवटचा पंच भारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

ह्म्म्म. विचित्रच आहे स्किट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्किट बदला. कोणत्या काळाला धरून कोणत्या दे शातलं आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलाच्या शिक्षणाला घेऊन

हिंदी व्याकरण स्पॉटेड.
बाकी स्किट निरर्थक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

हे काय आहे टिकलुजी. काही कळले नाही. तुमच्या मराठी मंडळात लोकांना कळला का?

बादवे, तुमची खास दखल घेऊन लोकसत्ताच्या कुबेर नी खास अग्रलेख लिहीला होता २-३ दिवसापूर्वी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज मरून पडलाय.......
काल त्याच्या अंतयात्रेसाठी शाळा बंद ठेवावी लागली होती

?
हे काय गौडबंगाल?

स्किट नाही आवडलं.

मी असं थेट सांगणं टाळते कारण न आवडल्यास प्रतिक्रिया न देणे हा मार्ग असतोच. पण हे तुम्हाला सादर करण्याएवढं भन्नाट विनोदी वाटत असावं. पण ते तसं नाहीय हे प्रामाणिकपणे सांगावसं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्किट नाही आवडलं.

पण हे तुम्हाला सादर करण्याएवढं भन्नाट विनोदी वाटत असावं. पण ते तसं नाहीय हे प्रामाणिकपणे सांगावसं वाटलं.

मराठीतून सादर केल्यास आवडण्यासारखे वाटत नाही खरे, विनोदी तर नाहीच नाही, हे पटते. चमत्कारिक वाटते.

(मूळचा उसनेस्को - संदर्भ: 'खुरच्याऽऽऽऽऽऽऽऽऽऽ' - तितकाही वाईट नसावा कदाचित.)

--------

(डिस्क्लेमरः याचे मूळ - ज्या कोणत्या भाषेत असेल ते - किंवा (इंग्रजीत नसल्यास) त्या मुळाचे इंग्रजी भाषांतर मी वाचलेले नाही. किंबहुना, हा नक्की काय प्रकार आहे, किंवा हे नेमके कशाचे भाषांतर असू शकेल, याची मला यत्किंचितही कल्पना नाही. पण मुळातून वाचल्यास - आणि कदाचित काही वेगळ्या सांस्कृतिक संदर्भांमध्ये/पूर्वपीठिकेमध्ये कदाचित हे तितकेही वाईट नसू शकेल, किंबहुना हिलेरियसही असू शकेल, याची कल्पना करणे असंभव नाही. काही गोष्टींचे भाषांतर करण्याचा आगाऊपणा करायचा नसतो, एवढेच म्हणू शकतो. पूर्वपीठिका समजावून सांगावी लागल्यास जोकची मजा जाते. ऐकणार्‍यालाही, अन् सांगणार्‍यालाही.)

(बाकी, हे कशाचे रूपक - असल्यास - आहे, यामागील संदर्भ काय, वगैरेंची कल्पना नसल्याकारणाने काऽऽऽही कळले नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर हे उसनेस्को वगैरे फ्रेंच नाटककार युजीन आयनेस्को नामक प्राण्याच्या नावाचा अपभ्रंश आहे.

'खुरच्या' ची मूळ प्रेरणा इथे पहा. त्याच नावाचे नाटक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा डार्क कॉमेडी किंवा ब्लॅक कॉमेडीचा प्रकार आहे. पटकन पचत नाही. एखाद्या सिरीयस विषयावर विनोद करणे - अपंगत्व, इ.

पण तरीही प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. इथे बरा झाला, पण इथे मिळून पन्नास टकळी येतात (तेवढीच आहेत), त्यामुळे बऱ्याच वेळेला कळत नाही काय चांगलं काय वाईट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

आताच "बंडू" स्किटला वाइट्ट प्रतिसाद दिलाय. स्किट बदला ,प्रतिसाद काढतो.

काढला/सौम्य केलाय भडक प्रतिसाद.विनोदी स्किटपेक्षा गंभीर स्किट लिहून पाहा.

लेखनाची श्टाइल माझी बरोबर नाही एवढेच. मनोबाची गुळगुळीत ( read refined,polished) पातळी गाठायला वेळ लागेल.
स्किटच्या विषयाच्या विरुद्ध विदा आहे.
एका मुलाच्या मृत्युविषयी मुख्याध्यापक मुलाच्या बापाला जे बोलतोय ते पटणारे नाहीये विनोद म्हणूनही.

पु.लंचे एक वाक्य आहे. त्यात मी थोडा माझा विचार जोडून इथे लिहितो -
"विनोद करणे हे बोलिंग करण्यासारखे असते. बॉलरला माहित असते कि त्याला काही प्रत्येक बॉलवर विकेट मिळणार नाही. पण म्हणून तो बॉलींग करायचे सोडतो का? नाही, कारण कुठल्या बॉलवर विकेट मिळेल आणि कुठल्या बॉलवर चौकार पडेल हे त्यालाही माहित नसते".

मला माहित असते कि हे लोकांना आवडणार नाही तर मी टाकलेच नसते. पण आता इथून पुढच्या गोष्टी करताना कुठेतरी feedback back of the mind असेल.

पण हा स्कीट बदलत नाही. कारण एकतर हा पर्फोर्म करून झालाय आणि सध्या दुसरे पन्नास प्रोजेक्ट्स सुरुयत. वाईट तर वाईट. उलट ह्या वाईट स्कीटमुळे बाकीच्यांच्या चांगल्या लेखांना जास्त भाव मिळेल ना...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

प्रतिसाद जरा वेगळ्या पद्धतीने-
तुमचे प्रयोग वाचन,अभिनय इत्यादी लेखन मराठीमंडळासाठी अमेरिकेत सादर करण्यासाठी तुम्हीच लिहित आहात असं धरून-
कोणत्या देशाचा संदर्भ घेणार/घेतला हे नक्की होत नाही अथवा झालं नाही. भारताचे म्हटलात तर इकडे परिस्थीती अशी असेल- विद्यार्थी मेल्याने/सौम्य करून शिक्षेने आजारी पडलाय. पालक वर मंत्री/पोलिसात जाऊन मोठा त्रास होऊ नये यासाठी मुख्याध्यापक पालकाची मनधरणी करतोय वगैये आणि ते कसं विनोदी होतय असे उलट स्किट लिहावे लागेल. अमेरिकेच्या शाळेतला संदर्भ धरून काही वेगळा प्रकार होऊ शकतो. तो मला माहित नाही. मग ते मराठीतच कशाला?तिकडच्या मुलांना समजेल असे इंग्रजीत हवे.
तुमचे अभिनयकौशल्य चांगले आहे पण स्किट मार खातय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0