सुरवंट‌

मालाडला रहात असतानाची गोष्ट आहे ही. सकाळी लवकर, बहिणी शाळेला गेल्या होत्या. शाळेत जायला, मी अजून लहान होतो.नाना ऑफिसला गेले होते. सकाळपासून, तीनचाकी सायकल, बाहेरच्या गॅलरीत चालवून मला कंटाळा आला होता. मग घरांत येऊन खेळण्यांची पिशवी जमिनीवर रिकामी केली. जड खेळणी तिथेच पसरली आणि गोट्या, बॉल वगैरे मंडळी, सैरावैरा चारी दिशांना पळाली. लाकडी घसरगुंडीवरुन 'टकाक्क- टकाक्क करत खाली येणारा एक मिष्किल डोळ्याचा लाकडी मुलगा होता. ते माझं आवडतं खेळणं होतं तेंव्हा. त्याच्याशी थोडा वेळ खेळलो. मग भोवरा फिरवायचा प्रयत्न केला. पण ती दोरी बांधता बांधता, सैल होऊन सुटून यायची आणि मग भोवरा काही फिरायचा नाही. सर्व धड आणि मोडकी खेळणी हाताळून झाली. तेवढ्यांत आई, खालच्या विहीरीवर धुणं धुवून आली. आल्या आल्या तिला माझा पसारा दिसला. पण ती काही बोलली नाही. तिचं सगळं काम आटोपलं की, ती पलंगावर उताणं निजून पुस्तक वाचत लोळायची. न्हायली असेल तर, लांबलचक केस पलंगाच्या खाली सोडून द्यायची. ते खालच्या जमिनीवर टेकायचे. मीही बराच वेळ स्वतःशीच रमत असल्यामुळे , तिच्या मागे भुणभुण नाही करायचो. पुस्तक वाचताना तिची अगदी तंद्री लागे. मी एका लाकडी मोटारीला हातात धरुन, आधी जमिनीवर, मग वाटेत येणार्‍या सर्व उंच-सखल भागावर चालवायला सुरवात केली. तोंडाने मोटारीचा आवाज काढण्यात मी गुंग होतो.

अचानक, आईच्या हातातले पुस्तक खाली पडले. ती ताडकन पलंगावर उठून बसली. झोकांड्या खात, स्वयंपाकघरातल्या मोरीकडे गेली. मी बावरुन जागच्या जागी उभा राहिलो. आई परत आली तेंव्हा तिचा सगळा चेहेरा पाण्याने भिजला होता, एका डोळ्यावर तिने पदर धरला होता आणि एकाच डोळ्याने ती माझ्याकडे बघत होती. माझा तोंडाचा आ वासलेलाच होता. तिने मला मोठ्या आवाजात सांगितले, " माझ्या डोळ्यांत, वरुन गुल्हा(सुरवंट) पडला. मी डोळा धुतलाय, पण असह्य आग होतीये." मी छताकडे पाहिले. आमच्या चाळीचे छप्पर कौलारु होते. त्यातूनच तो पडला असावा. आधी , झाल्या प्रकाराचे मला आकलनच झाले नाही. पण आपल्या आईला काहीतरी मोठ्ठा बाऊ झालाय, एवढे कळले. कारण बारीकसारीक लागणे, आपटणे वा विळीने कापणे, या गोष्टींनी ती कधी इतकी विचलित झालेली मी पाहिली नव्हती. तिने पुन्हा एकदा डोळा धुतला आणि आरशांत पाहिले. तिचा डोळा नुसताच लाल झाला नव्हता तर प्रचंड सुजून खोबणीच्या अर्धा बाहेर आल्यासारखा दिसत होता. हे दृश्य बघितल्यावर, आता तीही घाबरली होती. शेजारपाजारची फारशी काही मदत होण्याची शक्यता नव्हती. त्याकाळी, पटकन रिक्शा-टॅक्सीत बसून डॉक्टरकडे जाणे शक्यच नव्हते, कारण रिक्शा तर नव्हत्याच. फोन तर पंचक्रोशीत, एखाद्याकडे असायचा. आईने मला म्हटले, " तू घाबरु नकोस, माझा डोळा बरा होणार आहे. तू एकटा जाऊन, मी सांगते ते औषध आणशील का ? 'अल्जेरॉल' नांव लक्षांत राहील का तुझ्या ?" मी होकारार्थी मान हलवली. आमच्या वाडीतून बाहेर पडल्यावर, गल्लीत डाव्या बाजूला चालत गेले की घोडबंदर रोड लागायचा. तिथे उजवीकडे वळून चार दुकाने ओलांडली की केमिस्टचे दुकान होते. आईचा हात धरुन, कैक वेळेस, मी रस्त्याने त्या दुकानात गेलो होतो. मी लगेच, आईने दिलेली नोट हातात घट्ट धरुन निघालो. जिना उतरताना पुन्हा आईचा आवाज ऐकू आला," रस्त्याने सावकाश जा रे, धांवायचं नाही अजिबात!" मी मोहिमेवर निघालो होतो. दुकानात पोचताक्षणी मी ती चुरगाळलेली नोट समोर धरली आणि अल्जेरॉल, अल्जेरॉल असे म्हणालो. काऊंटरवरचा माणूस आश्चर्याने पहात राहिला. पण तो आम्हाला चांगला ओळखत होता. " केम, मम्मी नथी आवी साथे?" असे म्हणत त्याने ती बाटली मला दिली आणि उरलेले पैसे माझ्या सदर्‍याच्या खिशांत कोंबले. मुख्य रस्त्यावरुन मी पुन्हा गल्लीच्या तोंडाशी सावकाश चालत आलो. आता मात्र मला राहवले नाही आणि मी घराच्या दिशेने धूम ठोकली. जिन्याच्या पायर्‍या एक एक करत चढलो. माझ्या पावलांची चाहूल लागल्यामुळे, आई दरवाजाशी उभी होती. माझ्या हातातली बाटली घेऊन, तिने एका डोळ्याने ते पारखून घेतले. लगेच डोळ्यांतही घातले. तोपर्यंत बहिणी शाळेतून आल्या होत्या. आम्ही नेहेमीच्याच वेळेस जेवलो. संध्याकाळपर्यंत , आईने दोन तीनदा ते औषध डोळ्यांत घातले असावे. कारण डोळा प्रचंड लाल दिसत असला तरी उघडता येत होता आणि खोबणीत परत गेला होता.

नशिबाने, त्याच दिवशी नाना लवकर घरी आले. सारा प्रकार कळताच, ते आईला आमच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यांनी आणखी काही औषधे दिली. आठेक दिवसांत आईचा डोळा बरा झाला. पुढे, नातेवाईक जमले की, हा प्रसंग ती अगदी रंगवून सांगे. त्याची अशी बरीच आवर्तने अगदी मोठा होईपर्यंत ऐकल्याने , ती गोष्ट, मीही, तितक्याच बारीक तपशीलाने, आज‌ सांगू शकलो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भारी अनुभव आहे तिमा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबऱ्या अनुभव‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तिरशिंग राव जबर्या अनुभव आहे . तुमच्या आईला औषधाचं नाव माहिती होतं , हे भारीच आहे . कारण सुरवंट - त्याच्या अंगावरच्या केसांची काहीच लोकांना तीव्र ऍलर्जी येऊ शकते . अशा वेळी माहिती नसल्यास अनर्थ घडू शकतो .
अवांतर : स्वानुभव : मला स्वतःला एकदा कॉलेज च्या दिवसांमध्ये वाड्यात राहत असताना ( तेच ते कौलारू वगैरे) सुरवंटाची ऍनाफिलॅक्टिक रिअक्शन आली होती . बघता बघता सूज वाढत गेली . सुदैवानी आमचे घरमालक डॉक्टर होते . त्यांच्या घरी केव्हाही मुक्तद्वार होते. सकाळी ६ वाजताच त्यांना उठवले ... त्यांनी हसत हसत ... काही विशेष नाही रे , हे घे औषध म्हणून गोळ्या दिल्या . त्या वर्षी मी कॉलेजात इम्युनॉलॉजी शिकत होतो . ते एकीकडे मला गमतीत सगळी सिम्टम्स समजावून सांगत होते . सूज इतकी वाढली होती कि गोळ्या घशातच अडकल्या . माझी वाईट फाटली . एव्हाना गम्मत बघायला वाड्यातील पोरं टोरं दवाखान्यात गोल उभी राहून ... गेला बहुतेक हा असा चेहरा करून उभी होती . डॉक्टर तरीही हसतच होते . मग त्यांनी इंट्रा व्हिनस ऍड्रेनॅलीन दिले . ऍनाफिलॅक्टिक रिअक्शन उतरतानाही डॉक्टर मला .. आता बघ हे होईल अशी सिम्प्टम्स समजून देत होते . आणि अर्ध्या तासात मी चालत घरात गेलो . डॉक्टरांनी उर्वरित आयुष्यात घेण्याच्या काळज्या व बरोबर बाळगण्याची औषधें दिली . अशी औषधे मी कायम जवळ बाळगतो . अशा रिऍक्शन्स मध्ये फिजिकली काहीही भयानक होत असले तरी आपला मेंदू नॉर्मल असतो त्यामुळे आपण हा सगळं 'अनुभव ' अत्यंत जागेपणी अनुभवत असतो.
अति अवांतर : आमचे हे डॉक्टर अनुभवी , ज्ञानी आणि लय भारी होते . ते माझ्या वडिलांच्या वयाचे . पण त्यांचा आणि माझा संगीत आणि वाचन या बाबतीत माझ्या लहानपणा पासून मोठ्ठा शेक हॅन्ड होता . काय वाट्टेल ते म्हणजे शाळकरी वयातच सेरेंगीटी शाल नॉट डाय , किंवा bafut beagles ( Gerald Durrel ) सारखी त्या वेळी सदाशिव पेठेत फारशी प्रचलित नसणारी पुस्तक , माझ्या हातावर ठेऊन ..हे वाच .. चांगलं आहे म्हणून वाचायला लावायचे , किंवा नवीन काय ऐकतोयस , मला दे ..वगैरे तर असो अवांतर अतीच झालं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझाहि पाय पडलेला सुरवंटावर‌. २ तास खाज गेलि नाहि. लाल झाला.
___________
असे मस्त मस्त ललित कोण टाकत आठवतय का? सध्या दिसत नाहित Sad
पटाईत‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरवंट भयंकरच आहे. लेखन भयंकर सुंदर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आणि गोट्या, बॉल वगैरे मंडळी, सैरावैरा चारी दिशांना पळाली< <
ROFL

मस्त आवडले वर्णन‌. तुमछ्या आई फारछ तीक्ष्ण बुद्दीछ्या होत्या/आहेत‌‌

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

क्या हालत बना रक्खी है! कुछ लेते क्यूँ नहीं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

spreekt jij duits ook?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(पण मला वाटले की Gesundheit हे 'कॉमन नॉलेज' सदरात मोडते म्हणून? बोले ते, त्याकरिता खास जर्मन बोलता येण्याची अट नाही. आम्ही इंग्रजीत - आणि पाहिजे तर मराठीतसुद्धा - Gesundheit म्हणतो. आणि दुसऱ्याला ते त्यात्या भाषेत समजण्याची अपेक्षा करतो. तुमचे वरील डच मला आत्ता समजले, तसे.)

(बादवे आमच्या जर्मन (अ)'ज्ञाना'ची पातळी:

Est-ten-ten rule:

Ich bhunke.
Du bhunkst.
Er/sie/es bhunkt.
Wir bhunken.
Ihr bhunkt.
sie/Sie bhunken.

Der hund bhunkt und bhunkt und bhunkt.

Ich bin brahmin. Ich bhunke.

(आता पुरे.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेसुंडहाईट हे एनारायांसाठी कॉमन नॉलेजमध्ये मोडत असेलही. कल्पना नाही. इंग्रज कैतरी ब्लेस यू म्हणतात हे माहितीये.

बाकी आमचे तळजर्मन अर्थात डच पाहिले तर:

इक भुंक‌, वेइ भुंकन‌, (ik bhunk, wij bhunken)
येइ भुंक्ट‌, युली भुंकन‌, (jij bhunkt, jullie bhunken)
हेइ/झेइ/हेट भुंक्ट‌, झेइ भुंकन‌. (hij/zij/het bhunkt, zij bhunken)

- Met vriendelijke groeten,

(Gothamse) Vleermuisman.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमछ्या आई फारछ तीक्ष्ण बुद्दीछ्या होत्या/आहेत‌‌

हे वाछुन मै हू ना मधला सतीश शहा आठवला. ऋने हे लिहिताना देखील थुंकी उडाली असेल्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फारच मस्त वाटलं लेख वाचून्, छानच्!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुभव प्रचंड आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0