सुरंगी

होळीचा हंगाम आला की वेध लागतात ते सुरंगीच्या हळदी, सुगंधी वळेसरांचे/गजर्‍यांचे. मार्च- एप्रिल महिन्यांचा कालावधीत सुरंगीचे झाड दोन भरगच्च बहरात बहरते.

१)
Photo:

२)
Photo:

सुरंगीचे शास्त्रीय नाव mammea suriga. सुरंगीच्या बहराची चाहूल लागली की माझे पाय वळतात ते सुरंगीच्या ऐटदार झाडाकडे. हे फुललेले झाड प्रत्यक्ष पाहणे म्हणजे कोवळ्या किरणांतील जणू फुलांची दिवेलागण अनुभवणे.

३)
Photo:

४)
Photo:

ह्याच्या खोड-फांद्यांतून विशिष्टपणे लागणार्‍या कळ्या म्हणजे जणू देठाला लागलेले मोतीच.
५)
Photo:

६)
Photo:

खोडाला लागलेली फुले पाहताना भानच हरखून जावे अशी अजब रचना.
७)
Photo:

८)
Photo:

सुरंगीच्या फुललेल्या फुलांचे पिवळे धमक केशर सुगंधी रोषणाई करून पाकळ्यांच्या ओंजळीतून मंत्रमुग्ध सुगंधाची उधळण करत असतात. झाडाजवळचा कोवळ्या किरणांतील परिसर जणू अत्तरात चिंब झालेला असतो . खाली पडलेल्या सुक्या फुलांचा सडाही धरणी मातेला सुवासिक अभिषेक घालत असतो.

९)
Photo:

फुलांमधील मधूरस टिपण्यासाठी ह्या झाडावर माशांचीही सुरात भुणभूण चालू असते.

१०)
Photo:

११)
Photo:

सुरंगीच्या कळ्या सूर्यप्रकाशात साधारण १०-११ ला पूर्ण उमलतात.
१२)
Photo:

१३)
Photo:

गजरे वळण्यासाठी कळ्याच काढाव्या लागतात म्हणून अगदी पहाटेच ह्या झाडावर चढून फांद्यांना लागलेली एक एक कळी काढावी लागते.

१४)
Photo:

झाड चिवट असल्याने हलक्या पायांनीच कोवळ्या कळ्यांना सांभाळत फुलायला आलेल्या कळ्या काढाव्या लागतात. वर्षातून एकाच हंगामात फुलणारी व एवढ्या मेहनतीने झाडावरून काढून गजरा करूनही ह्या गजर्‍याला मात्र बाजारभाव कमी असतो. बर डिमांड काही कमी नसत. चार दिवस आधीच बुक करून ठेवावे लागतात गजरे.

१५)
Photo:

सुरंगीमध्ये पण दोन प्रकार आहेत. एक कमी वासाची सुरंगी आणि एक वासाची सुरंगी. दोन्हीची झाडे सारखीच असतात फक्त कमी वासाच्या सुरंगीच्या फुलांमध्ये परागकण जास्त असतात तर वासाच्या सुरंगीला कमी असतात. स्त्रियांसाठी गजरा हा ऋदयात घर करणारा असतो. पूर्वापार ह्या गजर्‍यांची प्रेमपूर्वक देवाण घेवाण करून स्त्रिया एकमेकींच्या ऋदयात मैत्रीची सुगंधी गुंफण करीत आहेत. केसाच्या वेणीवर लांबसडक सोडलेल्या किंवा आंबाड्यावर गोलाकार माळलेल्या पिवळ्या धमक गजर्‍याने स्त्रियांच्या सोज्वळ लावण्य अधिक फुलून येते.

१६)
Photo:

होळीची धमाल म्हणून की काय सुरंगीचा गजरा आपल्या पिवळ्या रंगाची उधळण आपल्या परागकणांनी करत असतो. केसात दरवळणार्‍या सुरंगीच्या मनमोहक सुगंधात क्षण अन क्षण प्रसन्न होतो . गजरा काढला तरी दोन तीन दिवस हा सुगंध केसात तसाच टिकून राहतो व त्या सुगंधी क्षणांच्या स्मृती ताज्या करतो.

सुरंगीच्या गजर्‍याला कोंकणांत प्रचलित असणारे वळेसर हे नाव त्या गजर्‍याच्या कलाकृतीला अगदी समर्पक वाटत.
१७)
Photo:

सुरंगीच्या फुलांचे पूर्वी अत्तरही मिळायचे. आता ही वनस्पतीच दुर्मिळ झाली आहे. ह्या वनस्पतीचे जतन होणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या वृक्षारोपण कार्यक्रमात अशा प्रकारच्या दुर्मिळ झाडांचेही वृक्षारोपण झाले तर ह्या झाडांचे महत्त्व, अस्तित्व पुढच्या पिढीला कळू शकेल. सुरंगीचा हा सुगंधी आनंद आताच्या व पुढच्या पिढीलाही मिळण्यासाठी ह्या झाडाची लागवड होवो ही सदिच्छा.

१८)
Photo:

१९)
Photo:

टीप :
कृपया लेख किंवा फोटो काहीही शेयर करताना नावासकट शेयर करा.
मागील वर्षी मी सुरंगीवर लिहीलेले लिखाण व फोटो असेच वॉट्स अ‍ॅपवर शेयर होत होते व फेसबुकवरही इतरांच्या नावाने शेयर होत होते. त्यामुळे मी मागिल वर्षी काढलेले हे फोटो तेव्हा जरा जास्तच मोठ्या वॉटरमार्कमधे टाकले आहेत.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वा !! छान फोटो आणि माहिती !!! मस्त , धन्यवाद ( आता याचा सुगंध कुठे घ्यायला मिळेल ? कुठे मिळतात हि फुलं ? )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही कुठे रहाता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यात , कर्वेनगरात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यात पण आहे हे झाड नक्की कुठे ते विचारून सांगते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डेक्कनवर पॉपुलर बुल डेपो च्या शेजारी दगडी बंगला आहे त्या बंगल्याच्या बाहेर्, फुटपाथला लागून सुरंगीच झाड आहे. (पुण्यातील मैत्रीणीकडून साभार्)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद , बघायला पाहिजे , रानड्यांच्या बंगला बहुतेक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झाडाबाजूला पाटीप‌ण‌ आहे. "सुंर‌ंगी, पुण्यात‌ला दुर्मीळ‌ वृक्ष" अशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुफान मेहनत घेतलीये. फोटो मस्तच‌. फुले एक नंबर‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अप्रतिम फोटो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'माळला सुरंगी गजरा गं त्यावरी' मधली ही फुलं का? आता जागुताईमुळे ही ओळ डोळ्यासमोर आणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओहोहो डोळे निवले. फार सुंदर धागा. धन्यवाद्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरंगी म्हटलं की कोकणातल्या कोळणी आठवतात आणि अर्थात त्यांनी केसांत माळलेली फुलं आणि त्यांचा वास. आभार्!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बॅटमॅन्, आदूबाळ्, आदिती, शुची, चि.तं. धन्यवाद्.

होय गाण्यातली सुरंगी तिच्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चौल , रेवदंडा बाजारात असतात हे गजरे विकायला. पण थोडेच असतात. शिवाय दवणा जुड्या असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द‌व‌णा म्ह‌ण‌जेच् मार‌वा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>द‌व‌णा म्ह‌ण‌जेच् मार‌वा का?<<

नाही :

  1. द‌व‌णा
  2. मर‌वा
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओह ओके ओके. ध‌न्य‌वाद चिंता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोभस वळेसर आणि खोडावर फुललेली नाजूक फुले विलोभनीय आहेत .नागपुरात असतील का शोध घ्यावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दवणा एक्दम सहज मिळतो कोणत्याही झाडवाल्याकडे (हातगाडी वाल्यास सांगितले तर आणून देतो , पण जे रस्त्याच्या शेजारी एक नर्सरी थाटून बसलेले असतात त्यांच्याकडे असतोच ). त्यांच्याकडे डमरा म्हणून ओळखतात हे रोप .
मरव्यासाठी मला खूप शोधावं लागल होतं ... शेवटी गोरेगावातल्या एका आडबाजूच्या झाडवाल्याकडे दोन शेवटची शिल्लक असलेली रोपं मिळाली.
सुरंगीचे गजरे आदिवासी बायका किंवा वसई वाल्यांकडे मिळायची शक्यता असते. झाड मात्र मी आज पर्यंत मुंबईत पाहिलेल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

सुर‌ंगीचं रोप‌ कुठे मिळेल‌?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कोथरुड मध्ये महेश विद्यालयाच्या आसपास एक मदमस्त सुवास दरवळत असतो. मुक्ताई च्या मागून हा गंध येतो. मला खात्री नाही पण हा गंध सुरंगीचा असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

मला शोधता शोधता हे सापडलंय ... विचारून पहा

सुरंगी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

हीच ती सुर‌ंगी. मामिआ सुरिगा. मालाड‌च्या मारवे म‌नोरी भागात अजून‌ही आहेत. सोम‌वार बाजारात एप्रिल‌म‌ध्याप‌र्य‌ंत खूप गज‌रे अस‌तात विकाय‌ला. द‌हिस‌र पूर्वेला शिव‌व‌ल्ल‌भ रोड‌ला एके काळी खूप झाडे होती. ठाण्याला कौपिनेश्व‌राच्या आजूबाजूला ह‌ंगामात मिळ‌तात. ह‌ंगाम जेमतेम द‌हाप‌ंध‌रा दिव‌सांचा अस‌तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0