मन(mind)म्हणजे काय!!!! मनाची तुमची व्याख्या काय आहे???

मन (mind)म्हणजे काय याचा उहापोह गेली अनेक शतके चालू आहे.सुरवातीला तत्वज्ञानाचा प्रांत असलेला मनाचा अभ्यास आता न्युरोसायन्सच्या प्रगतीमुळे विज्ञानाचाही प्रांत झाला आहे.ज्याला आपण मन किंवा mind म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत जाणीव किंवा consciousness असे म्हण्टले जाते.वेगवेगळ्या धर्मांमध्ये मनाची व्याख्या केली गेली आहे.हिंदू धर्मामध्ये आत्मा ही संकल्पना आहे.प्रत्येक जीवामध्ये अभौतिक (immaterial essence)स्वरुपात आत्मा नावाची गोष्ट असते असे हिंदू धर्म मानतो.बाकीच्या धर्मातही कमीअधिक प्रमाणात अशीच व्याख्या केली गेली आहे.
सतराव्या शतकात फ्रेन्च तत्वज्ञानी रेने देकार्त याने प्रथम याविषयाची सुसंगत मांडणी केली.ज्याला आज mind body problem असे म्हण्टले जाते.देकार्त हा द्वैतवादी होता.म्हणजे मन आणि शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे त्याचे म्हणने होते.विज्ञानाकडे जाणीवेचे (consciousness)कोणतेही स्पष्टिकरण नसल्याने या विषयाला अनेक शतके हात घातला गेला नाही .विसाव्या शतकात वर्तणूकशास्त्राचा(behaviorism) विज्ञानावर पगडा होता.पण यातून मनाचा कोणताच थांग लागत नव्हता.पुढे न्युरोसायन्सचा व आधुनिक इमेजिंग टेक्नॉलॉजीचा जन्म झाल्यानंतर मेंदूचा सखोल अभ्यास झाला.वेगवेगळे विचार ,भावना ,हरकती मेंदूत कुठे उगम पावतात याची सखोल माहीती मिळाली.याला neural correlates of consciousness असे म्हणतात.पण यात एक गंमत आहे.correlation is not explaination ह्या नुसार फक्त कारण शोधुन उपयोग नाही तर मानवी मनाचे पुर्ण विस्तृत असे विवरण दिले गेले पाहीजे.यात न्युरोसायन्स अपयशी ठरले आहे.

Hard problem of consciousness.--
ऑस्ट्रेलीयन फिलॉसॉफर डेव्हीड चामर्स यांनी आधुनीक काळात या विषयात खुप मोठे योगदान दिले आहे.१९९६ साली अमेरिकेत centre for consciousness studies इथे प्रथमच भरलेल्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी hard problem of consciousness ही संकल्पना मांडली.
काय आहे हार्ड प्रॉब्लेम?
एखादा व्यक्ती निरभ्र निळ्या आकाशाकडे पहात आहे.भौतिक अनुषंगाने याचे स्पष्टीकरण करता येईल.ठराविक तरंग लांबीच्या प्रकाशलहरी त्याव्यक्तीच्या दृष्टीपटलावर(retina) आदळतात.त्याच्या दृष्टीपटलाकडून विद्युत संकेत मेंदूकडे पाठवले जातात.त्याच्या मेंदूतील दृष्टीकेंद्रात(visual cortex) चेतापेशींचे संभाषण होते(neuronal activity) व त्याला निळ्या रंगाचे आकलन होते.यात भौतिक(materialist) अनुषंगाने सगळी प्रक्रीया जरी मापली गेली तरी त्यात "निळा रंग'' कुठेच सापडणार नाही.निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही.देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे.तसे अजुनही स्पष्ट करता आलेले नाही.याला इंग्रजीत first person subjective experience असे म्हणतात व या वेगवेगळ्या अनुभुतींना qualia असे संबोधन आहे.हेच स्पर्श,चव,आवाजाची अनुभुती,विविध भावना याबाबतीतही सत्य आहे.मेंदुत घडणार्या या प्रक्रीया आपल्याला रंगाची,आवाजाची ,चवीची ,भावनेची अनुभुती का देतात हा आजच्या न्युरोसायन्स समोरचा एकमेव महत्वाचा असा प्रश्न आहे.यालाच हार्ड प्रॉब्लेम असे म्हणतात.
डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही.
याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level).
इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे.
व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे.
बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल.
१.मनाची तुमची व्याख्या काय आहे?
२.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय?
३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे?
४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

म‌न‌ म्ह‌ण‌जे आम‌च्या लेखी म‌नोबा. विष‌य‌ संप‌ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या...! संक्षि नाय‌त त‌र काय म‌जा नाय या च‌र्चेत‌. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

संक्षी आणि अजो दोघेही पाहिजेत‌ त‌र‌च‌ ख‌री म‌जा. एलिय‌न‌ व्ह‌र्सेस प्रिडेट‌र‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

क्लॅश‌ ऑफ‌ टाय‌ट‌न्स‌ किंवा काळू बाळू यांचा स‌वाल‌ज‌वाब‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तिक‌डे नाय‌ टाक‌ला का धागा? तिक‌डे दोघे आहेत‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

टाक‌लाय‌.. आता ब‌घा म‌जा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

म‌ज्जा येणार निच्छीत‌!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा.. म‌जा येईल‌ ख‌रोख‌र‌..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

१.मनाची तुमची व्याख्या काय आहे?

म‌नोबा

२.आत्मा (soul)ही संकल्पना तुम्हाला योग्य वाटते काय?

बेस्ट संक‌ल्प‌ना आहे.

३.हार्ड प्रॉब्लेमचे तुमचे एक्सप्लेनेश काय आहे?

एक गोष्ट ह्वी तेंव्हा, हवी तित‌की हार्ड न‌ होणे

४.mind body problem सुटेल असे तुम्हाला वाटते काय?

नाही वाट‌त सुटेल असे. फार अव‌घ‌ड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक गोष्ट ह्वी तेंव्हा, हवी तित‌की हार्ड न‌ होणे

अश्लील, अश्लील्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक गोष्ट ह्वी तेंव्हा, हवी तित‌की हार्ड न‌ होणे

ROFL
तुला स‌ग‌ळ‌ं ऐत‌ं ह‌व‌ं का ग‌ं? मेह‌न‌त क‌र‌ Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मामी , हे तुम्हीच लिहिताव ना ? का तुमचा आयडी हॅक झालाय ?बाप रे Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile ROFL माझा दिव‌स‌ सुप‌र्ब‌ चाल‌लाय्. कॉफी विथ मिशिग‌न चेरी ओट‌मील बार खाल्लाय‌. कॉफीमुळे असेल ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्र‌थ‌म‌स्थानात‌ली कॉफी आणि मेषेत‌ले ओट्स‌. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेषेत‌ले ओट‌स ? मेष‌लेस् आप‌लं शेम‌लेस कुठ‌चा! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेम‌लेस कुठ‌चा

मिर‌जेचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी र‌जेचा?

अग‌ं बाई कोण‌ ही र‌जी?
(ग‌ब्ब‌र‌ माईंड‌रीड‌र‌* मोड ऑन्) आता म्ह‌णाल‌च अरे ये र‌जी न‌ही जान‌ती! Wink (ग‌ब्ब‌र‌ माईंड‌रीडार‌ मोड ऑफ्)
.
*ग‌ब्ब‌र‌चे ब‌रेच मोड‌स आहेत पैकी हा वान‌गीदाख‌ल‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संधी साधून‌ श‌ब्द‌संधी फोड‌लीत‌ की ओ मामीसाहेबं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या आज‌ म‌ला कॉफी आणि खूप‌ दिव‌सांनी एक व्य‌नि मिळालाय .... मी आज‌ हार‌ जाऊ श‌क‌त‌ नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात‌ है, स‌हीच‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शांता माझि मी शांते चा त‌र रजा माझी .मी रजे चा आता रजा चा आवाज वगइरे ओके प‌न त्याछी .मुराद कोण कर णार ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१.मनाची तुमची व्याख्या काय आहे?

http://www.aisiakshare.com/user/189

हीच व्याख्या प‌र्फेक्ट् आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे रोच‌क‌ नेह‌मीचं की जंतूवालं? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि तू प्रत्येकवेळी वेगळी कॅसेट लावून का बसतेस? नसेल आपल्याला आवड एखद्या विषयाची तर सोडून द्यावे.
ब्याट्याच्या नादाला कोण लागणार! तो फक्त कंदिल धरायच्या कामाचा आहे हे मी मागेच सांगितले होते.
असो,चांगला विषय मांडायचा प्रयत्न केला तर फालतु कमेंट करत बसले आहेत.मेघना गेल्यापासून इथे जी यडझवेगिरी चालते त्यामुळे संस्थळ बंद पडल्यास आश्चर्य वाटनार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

शुचिमामी बाकी काही असो प‌ण‌ आज तुम‌च्या कॉफीने म‌जा आण‌ली एक‌द‌म‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा Smile अरे क‌स‌ल‌ं काम‌ होत‌ं माहीते आज, कॉफीशिवाय‌ श‌क्य‌च न‌व्ह‌त‌ं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्य‌निम‌धुन ब‌र‌च बोल‌लो व‌ गैर‌स‌म‌ज‌ क्लिअर‌ केले गेले, ख‌र‌ं त‌र राग‌ आणि अविचार पूर्ण निव‌ळ‌ला, या ब‌द्द‌ल अतोनात आन‌ंद‌ आहे.
म‌ला हा लेख‌ आव‌ड‌ला.
लिहीत‌ जा. या साईट‌व‌र‌ही येत‌ जा. यापुढे धाग्याव‌र‌ टाइम‌पास मीही क‌र‌णार नाही.
प्र‌त्येकाला अ सेन्स ऑफ नबिलॉगिंग्" ची ग‌र‌ज अस‌ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी नैये, पण मनाबद्दलच है, बघा लागू पडते का (exact definition नै, मनातला मचळा कळतो पण लगेच)

मन वाभरं वाभरं
देहा हातून फरार
किती बांधू दावणीला
स्थिर नाही घडीभर

देह श्रोत्यात बसला
मन आत बडबडे
ऐकू कुणाचे कळेना
दोघे घालती साकडे

मना हरणाचे पाय
देह हातावर घडी
आज्ञा अन अवज्ञेची
आत चाले रेटारेटी

देह समजूतदार
बंद ठेवी सारी दारं
मन मांजर चोरटी
मनातल्या लोण्यावर

देह शिक्षित शहाणा
मन यड खुळं बेणं
देह हसे दुसऱ्याला
मन हसे स्वतःवर

देह चुलीपाशी रत
मन फिरे रानोमाळ
देही हिशेब नेटका
मनी कवितेची ओळ

देह टापटीप घडी
मन द्रौपदीचं वस्त्र
देहा लाज अतोनात
मन दत्त दिगंबर

देह घर आवरत
मन आवरतं विश्व
देह कार्यशील मग्न
मन आठवांत रत

देह जागच्या जागी
मन दूर दूर झरे
देह दिनचर्या घडी
मन वेल्हाळ पसरेल

देह पाही याची डोळा
मना अलौकिक दृष्टी
देह पाही पान फूल
मनी मंतरली सृष्टी

देह संसार टुकीचा
मन पसारा अमाप
देह कपाटाचे दार
मन चोरखण आत.

देह जाचतो टाचतो
मन मखमल मऊ
देह वचक दरारा
मन म्हणे नको भिऊ

देह जड जड भिंत
मन झिरपती ओल
देह रंग सजावट
मन गहराई खोल.

देह मन देह मन
जरी तळ्यात मळ्यात
देहा मनाचे अद्वैत
भरी घडा काठोकाठ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

वाह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.