NRI PIO आणि इतरांनो , एक शंकाय .....

भारतातल्या किंवा महाराष्ट्रिय घरांबद्दल थोडाबहुत तरी अंदाज करता येतो. पण बाहेरच्या देशात राहणार्‍या आणि इथली मुळं असलेल्या मंडळींचा नाष्टा काय असतो ? म्हंजे.... जे काही महिन्यांपुरतेच ऑनसाइट गेलेले आहेत, त्यांनी सोबत थोडाबहुत कच्चा शिधा नेलेला पाहण्यात आहे. ( म्हंजे जाड पोहे, पातळ पोहे , चिवडा वगैरे) पण जे त्याहून अधिक काळासाठी गेलेत, किंवा ऑल्मोस्ट स्थायिकच झालेत, त्यांची आहारपद्धती काय आहे ? तुम्ही त्या देशात अगदि नवीन असतानाच्या काळात आहार काय असे ? विद्यार्थी म्हणून गेले असतील तर टिपिकल हॉस्टेल लाइफ असावी , असा अंदाज, तिथे उपलब्ध पर्याय मुदलातच कमी. पण त्यानंतर तुमचा आहार काय काय राहिला आहे ? स्थिर स्थावर झाल्यावर त्यात काही बदल झालेत का ?
इथे माझ्या आसपास नाश्त्यासाठी पोहे , उपमा , इडली, मेदुवडा , डोसा , उत्तप्पा , नाचणी लापशी , सिरिल्स , ओट , दूध , उकडलेली अंडी , आम्लेट क्वचित वडापाव मिसळ पराठे सॅण्डविच असे पदार्थ सर्वसाधारणपणे दिसतात लोकांच्या खाण्यात. तिकडे काय काय असतं ? "हल्ली सगळीकडे सगळं मिळतं, आणि आपापल्या देशांच्या अन्नाबद्दल तितकीशी दुर्मिळता राहिली नाही, अप्राप्यता राहिलेली नाही " , हे खरच. मोठमोठ्या सुपर मार्केट , मॉल्स वगैरेमध्ये देशोदेशीचे प्रमुख घटक पदार्थ मिळणं सामान्य बाब झालिये, हेही खरं. ( म्हंजे युरोप अमेरिका अरब देशांत वगैरे भारतीय मसाले , हळद, भाजहळद, बासहळद,, फ्रोझन चपाती वगैरे मिळताना दिसतात ) पण हे मोठ्या शहरांचं झालं. प्रगत देशांतही मेट्रो शहरे आणि लहान गावे ह्यात फरक असेलच की. तिथे लहान गावांतही भारतीय जिन्नस मिळतात का ? आणि मुख्य म्हंजे हे मिळत असले, तरी तुमच्या सध्या खाण्या पिण्याच्या सवयी काय आहेत ? जिन्नस बाजारात उपलब्ध आहेत, हे ठिकच्चे, पण तुमच्या त्या कितपत वापरात आहेत? तुमच्या सवयी बदलल्यात का ?

अजून एक म्हणजे तुमचं मुख्य खाणं काये ? लंच व डिनर साधारणपणे काय असतो ? पोळी भाजी भात ळी वरण कोशिम्बिर असं खाता की त्याची जागा इतर पदार्थांनी घेतलिये ? की कधी कधी खाण्यात पोळी भाजी भात वरण कोशिम्बिर असते आणि एरव्ही इतर काही ? ह्या इतर काही मध्ये काय काय येतं ?

सण समारंभास काय तुम्ही लोक काय करता ? म्हणजे भारतीय सण समारंभास हौस म्हणून ,सहज बदल म्हणून क्वचित एखादेवेळेस इथले पदार्थ केले जात असतील असं वाटतं. ( म्हंजे गुढी पाडव्यास वाटलेली डाळ, दसरा दिवाळी गणपतीला श्रीखंड पुरणपोळी वगैरे )
पण तुमच्या आसपासच्या स्थानिकांचे सण - उत्सव असतात गुड फ्रायडे नाताळ वगैरे, तेव्हा स्थानिकांच्या खान पान पद्धतीसारखं तुम्ही काही बनवता का?
ते कसं शिकलात बनवायला ? ( "बनवणे" ह्या शब्दाबद्दल पुरंदरे ताईंची क्षमा मागतो. )

तुम्ही काही नवीन पदार्थ तिथे गेल्यानंतरच खाल्लेत पहिल्यांदा असं झालय का ? कोणत्या आहेत त्या डिशेस ?

तुम्ही शाळेत‌ अस‌तानाच्या दिव‌सात‌ तुम‌चा जो नाश्ता असे त्याम‌ध्ये आणि आज जो नाश्ता आहे, त्यात‌ काही फ‌र‌क‌ प‌ड‌ला आहे का ? काय‌ / कित‌प‌त‌ प‌ड‌ला आहे ?

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मनोबा , तुला उत्तरे PIO देऊ शकतील . पण इथे तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर ...
..... लहान गावे ह्यात फरक असेलच की. तिथे लहान गावांतही भारतीय जिन्नस मिळतात का ....
सगळीकडे भारतीय गोष्टी मिळतात . उदाहरण : आमचे ईस्ट लान्सींग ( लोकसंख्या विद्यार्थी गण धरून फक्त ४५००० , विद्यार्थी सुट्टीला गेले कि फक्त १२००० ) इथे ते तुझे पोहे , हळद , मसाले पासून पार पार्ले जी , ते आमची कुठेही शाखा नाही वाल्या चितळ्यांच्या बाकरवड्या सुद्धा मिळतात . या स्टोरला लागून भारतीय रेस्टोरंट पण आहे जिथे सदासर्वकाळ भारतीय खाद्यपदार्थ मिळतात .
अवांतर : कुठे चालला आहेस , म्हणून हि तयारी ?
तुला यात फार इंटरेस्ट नसेल पण तरी आफ्रिकेतील सांगतो .
इस्ट आफ्रिकेतील PIO भारतीयच जेवतात . बिझनेस मीटिंग ला गेलं तरी ऑफिस मध्ये सुद्धा प्रेमाने थांबवून घेऊन गुजराथी स्टाईल जेऊ घालतात . ( हे करणारे कूक आफ्रिकन असतात तरीही ) मी माझ्या एका ( मराठी ओरिजिन च्या ) कस्टमर च्या घरी आफ्रिकन कूक नि बनवलेलं पिठलं खाल्लं आहे . मस्त एकदम ओरिजिनल .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठे चालला आहेस , म्हणून हि तयारी ?

म‌नोबा स‌र्व्हे घेतोय, त्याचा काहीत‌री बिझ‌नेस प्लॅन आहे भार‌तीय खाद्य‌प‌दार्थाच्या बाब‌त्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा आई गा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

that's an interesting piece of info.

अवांतर : कुठे चालला आहेस , म्हणून हि तयारी ?

chhe ho. not going anywhere. this is just out of curiosity. Just curious to know what people eat; what are changes in their food habits if any. etc.

तुला यात फार इंटरेस्ट नसेल पण तरी आफ्रिकेतील सांगतो .
इस्ट आफ्रिकेतील PIO भारतीयच जेवतात . बिझनेस मीटिंग ला गेलं तरी ऑफिस मध्ये सुद्धा प्रेमाने थांबवून घेऊन गुजराथी स्टाईल जेऊ घालतात . ( हे करणारे कूक आफ्रिकन असतात तरीही ) मी माझ्या एका ( मराठी ओरिजिन च्या ) कस्टमर च्या घरी आफ्रिकन कूक नि बनवलेलं पिठलं खाल्लं आहे . मस्त एकदम ओरिजिनल .

Interesting!
interest naahi kasa ? interest aahech ho. saanga ajun saanga je kai thaauk asel te.
aavdel vaachaayla. diaspora kase develop hoat gele tyaacha andaaj yeto tyaa nimittaane.

sorry for this font. I'm not able to type in Marathi at the moment.
I will edit this reply soon to make it a "Marathi reply".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इस्ट आफ्रिकेत 'चौपाटी' नावाची चेन आहे . तिथे सर्व दाक्षिणात्य पदार्थ खायला मिळतात . मिठाई , छप्पन भोग, सीग्री वगैरे चेनी पण आहेत . दारेसलामात मराठा क्लब आहे तिथे पार कांदा /बटाटा भजी , बटाटे वडा पण मिळतो . नैरोबी मध्ये मराठा लेन वर महाराष्ट्र मंडळ आहे . त्यात अधून मधून स्थानिक मराठी लोकं भैरव ते भैरवी ( !)सारखे प्रोग्रॅम पण लोकं करतात , त्याबरोबर मराठी खाणे पण असते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दारेस‌लामात‌ (म्ह‌ण‌जे टांझानिया काय‌ हो?) म‌राठा क्ल‌ब‌? एक‌च नंब‌र‌, ज‌ब्ब‌र‌द‌स्त‌!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय टांझानिया च मुंबई वगैरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परंतु इकडे मराठी पेक्षा गुजराती(कमी तिखट) सहजासहजी मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अण्णा त‌ळ्याकाठि व‌स‌लेल्याआम‌च्या निस‌र्ग‌सुंद‌र‌ खेडेगावात, भार‌तिय‌ ग्रोस‌री मिळ‌त‌ नाही. त्याक‌र‌ता २०० मैल‌ ड्राइव्ह‌ क‌रावे लाग‌ते. त्यामुळे व‌र्षाची/ ६ म‌हीन्यांची बेग‌मी क‌र‌तो आम्ही.
प‌ण होल‌ फुड कोऑप‌ म‌ध्ये मात्र केश‌र‌, पीठ, डाळी मिळ‌तात्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय सांगता मामी ? तुमच्या तीन तळ्याकाठच्या मॅडिसन मध्ये मिळतं कि सगळं . ( बीअर बरोबर )डोसा खाल्लाय मी तिथं .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌नोबा माझा नाश्ता ओट‌मील‌ +२ कॉफी अस‌तो.
लोक‌ मात्र‌ ओट‌मील‌, सिरीअल्. एग‍सॉसेज‌ wrap , फ्लेव्ह‌र्ड योग‌र्ट, फ‌ळे कापून घातलेले योग‌र्ट, पॅन‌केक, स्क्रॅंब‌ल‌ड एग्स, असे खाताना दिस‌तात्. बेक‌न‌ त‌र‌ नाश्त्यात स‌र्रास अस‌ते. बेक‌न‌ अॅडीक्टिव्ह‌ आहे असे वाट‌ते. म्ह‌ण‌जे ग‌ंम‌त‌ रे! हे लोक‌ बेक‌न‌च्या मागे वेडे अस‌तात‌.
.
ल‌ंच‌ ला स‌ब‌वे किंवा एमिज सुप्. (Amy's Organic soups)
अन्य‌ लोक‌ ल‌ंच‌ला, पास्ता, चाय‌नीज, सॉसेज‌/अंड‌ं/भाज्या घालुन‌ केलेले प‌दार्थ‌ खाताना दिस‌तात्. ब‌र्ग‌र‌ राहिल‌च की.हां चिक‌न‌ potpie व‌गैरेही खातात ब‌रेच‌दा.
.
.
डिन‌र‌ला भाजी पोळी किंवा भात‍ मास‌ळी.
.
मात्र‌ २ जेव‌णांच्या म‌ध्ये स‌त‌त हाद‌ड‌ते त्यात, योग‌र्ट, फ‌ळे अस‌तात्.
.
अर्र्र्र्र्र्र आता सांग‌तेच कुकीज‌, बार्स व‌ चिप्स‌ही अस‌तात Sad
ल‌प‌वातय‌चे होते प‌ण अर्ध‌स‌त्य‌ हे पाप‌ अस‌ल्याने Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌नोबाला उत्त‌म‌ इन्ट‌रॅक्टीव्ह‌ धाग्यांच‌ं इंगित‌ क‌ळ‌ल‌य. म‌स्त धागा रे म‌नोबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाश्त्यास‌ंब‌ंधी

थोड‌क्यात: गेल्या प‌ंच‌वीस‌ तीस‌ व‌र्षांत‌ काहीही फ‌र‌क‌ प‌ड‌लेला नाही.

त‌प‌शिलात: माझ्या ज‌न्माच्या आधीपासून‌ आई-बाबा दोघेही नोक‌री क‌र‌त‌ अस‌त‌. दोघांच्याही खास‌गी कॉर्पोरेट‌ नोक‌ऱ्या. न‌ऊ वाज‌ता ह‌ज‌र‌ होणं क्र‌म‌प्राप्त‌ असे. म्ह‌ण‌जे, साडेआठ‌ वाज‌ता घ‌राबाहेर‌ प‌डाय‌ला लाग‌त‌ असे**. ल‌हान‌प‌णापासून‌ साडेआठ‍-ते-साडेस‌हा या वेळात‌ म‌ला आज्जीआजोबांनी सांभाळ‌लं.

त‌र‌ आई स‌काळी उठून‌, स्व‌य‌ंपाक‌ क‌रून‌, ड‌बेडुबे भ‌रून‌ नोक‌रीस‌ जात‌ असे. आता एव‌ढी व‌ड‌व‌ड‌ का क‌रावी, त‌र‌ त्याची दोन‌ कार‌णं होती. आस‌पास‌च्या बाय‌कांत‌ नोक‌ऱ्या क‌राय‌चं प्र‌माण‌ अतिश‌य‌ क‌मी होतं. त्या दिव‌स‌भ‌र‌ पोर‌ं हाकाय‌ला मोक‌ळ्या अस‌त‌. आप‌ण आप‌ल्या मुलाला पुरेसा वेळ देऊ श‌क‌त‌ नाही याब‌द्द‌ल‌ आईच्या म‌नात‌ ज‌रा अप‌राधी कोप‌रा होता. त्या बाय‌काही आप‌ला मोक‌ळा वेळ फ्लॉन्ट‌ क‌रून‌ आईव‌र‌ म‌नोवैग्यानिक‌ द‌बाव‌ टाक‌त‌ अस‌त‌! दुस‌र‌ं कार‌ण म्ह‌ण‌जे आज्जी. हे एक‌ पेश‌ल‌ गुंतागुंतीचं कॅरेक्ट‌र‌ आहे, ब‌ट स‌फाईस‌ टु से, तिच्या अप्र‌त्य‌क्ष‌ द‌बावामुळे आई स‌काळी एव‌ढी धाव‌प‌ळ क‌र‌त‌ असावी.

उण्यापुऱ्या अडीच‌ तासांत‌ स्व‌त:चे प्रात‌र्विधी, हापीस‌ची त‌यारी, एका नाठाळ पोराला हाक‌णे, पाच‌ ज‌णांचा स्व‌य‌ंपाक‌ + पोळ्या, तीन‌ ड‌बे भ‌र‌णे हे स‌ग‌ळं आई क‌र‌त‌ असे. (अर्थात‌ बाबा आणि आजीची म‌द‌त‌ असे, प‌ण पेटीत‌ंबोऱ्याव‌र‌ ब‌स‌लेले लोक‌ मुख्य‌ गाय‌क‌ न‌स‌तात‌.) एव‌ढ्या स‌ग‌ळ्या प्र‌कारात‌ नाश्त्यासाठी - म्ह‌ण‌जे वेग‌वेग‌ळ्या प्र‌कारांचा विचार‌ क‌र‌णे, ते त‌ळ‌णे/भाज‌णे/शिज‌व‌णे/उक‌ड‌णे## यासाठी वेळ‌च‌ राहात‌ न‌से.

याला उपाय‌ म्ह‌णून‌ आईने 'मुगाच्या डाळीची खिच‌डी' हा प‌र्याय‌ शोध‌ला. खिच‌डीचे गुण‌ध‌र्म‌ म्ह‌ण‌जे पौष्टिक‌, ब‌ऱ्यापैकी पोट‌भ‌रीची, स्केलेब‌ल‌ (च‌ट‌क‌न‌ वाढ‌व‌ता येते), malleable (मुळ्यापासून‌ कोबीप‌र्य‌ंत‌ काहीही त्यात‌ ढ‌क‌ल‌ता येतं), क‌राय‌ला सोपी, बिघ‌ड‌वाय‌ला अव‌घ‌ड‌, एक‌वाढी (म्ह‌ण‌जे थालिपीठ‌ व‌गैरे गोष्टी सार‌ख्यासार‌ख्या वाढाव्या लाग‌तात‌) आणि स‌ग‌ळ्यात‌ म‌ह‌त्त्वाच‌ं म्ह‌ण‌जे एक‌दा टाक‌ली की माग‌च्या शेग‌डीव‌र‌ गुमान‌ शिज‌ते.

अशी ब‌हुगुणी खिच‌डी आम्ही गेली अनेक‌ व‌र्षं खातो आहे. खिच‌डीव्य‌तिरिक्त‌ दुस‌रा कोण‌ताही नाश्ता क‌राय‌चा विचार‌ म‌नालाही शिव‌त‌ नाही. अग‌दी शिक्ष‌णासाठी मी एक‌टा होतो तेव्हाही 'म‌ंदिर‌ वहीं ब‌नायेंगे'च्या निष्ठेने खिच‌डी खात‌ असे. मुगाची डाळ, तांदूळ, तेल‌, मोह‌री या गोष्टी ज‌गाच्या पाठीव‌र‌ कुठेही मिळ‌तील‌ ही खात्री अस‌ल्याने हा नाश्ता अम‌र‌ राहील‌.

_________
**एकेकाळी साडेआठ‌ वाज‌ता घ‌रातून‌ निघून‌ही न‌वाला हापिसात पोच‌ता येई पुण्यात‌! गेले ते दिन‌ गेले!
##"ब‌न‌व‌णे" हा श‌ब्द‌ टाळ‌ला आहे हे ध्यानात‌ घ्याव‌ं प‌ण एका क्रियाप‌दाच्या जागी चार‌ वाप‌रावी लाग‌त‌ अस‌तील‌ त‌र‌ कोण‌त‌ं क्रियाप‌द‌ जिंकेल‌ हे उघ‌ड‌ आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

याला उपाय‌ म्ह‌णून‌ आईने 'मुगाच्या डाळीची खिच‌डी' हा प‌र्याय‌ शोध‌ला. खिच‌डीचे गुण‌ध‌र्म‌ म्ह‌ण‌जे पौष्टिक‌, ब‌ऱ्यापैकी पोट‌भ‌रीची, स्केलेब‌ल‌ (च‌ट‌क‌न‌ वाढ‌व‌ता येते), malleable (मुळ्यापासून‌ कोबीप‌र्य‌ंत‌ काहीही त्यात‌ ढ‌क‌ल‌ता येतं), क‌राय‌ला सोपी, बिघ‌ड‌वाय‌ला अव‌घ‌ड‌, एक‌वाढी (म्ह‌ण‌जे थालिपीठ‌ व‌गैरे गोष्टी सार‌ख्यासार‌ख्या वाढाव्या लाग‌तात‌) आणि स‌ग‌ळ्यात‌ म‌ह‌त्त्वाच‌ं म्ह‌ण‌जे एक‌दा टाक‌ली की माग‌च्या शेग‌डीव‌र‌ गुमान‌ शिज‌ते.

एक नंब‌र‌ आबा.. का कोणास ठाऊक, खिच‌डी नाश्त्याचा प‌दार्थ म्ह‌णून‌ अतिश‌य अंड‌र‌रेटेड‌ आहे. पोह्या- उप‌म्याचे जे स्तोम माज‌लेय ते मोडून काढाय‌ला खिच‌डीचे रिव्हाय‌व्ह‌ल क‌रावेच लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

खिच‌डीच्याच जातीत‌ला अजूनेक ज‌ब‌ऱ्या प‌दार्थ म्ह‌. बिशिबेळे राईस‌. अफाट‌ टेस्टी आणि तित‌काच हेल्दी आणि सॉल्लिड‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बिशीबाळे भात वेड्यासार‌खा म‌स्त लाग‌तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स‌वाल‌च‌ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओह्ह्ह, भारीच.
हेच सेम टू सेम माझ्या घरात. आजी आजोबा नाहि लाभले जास्त काळ पण घराला व्यवस्थित दारेखिडक्या लावून कुलपे लावून किल्ली तुळशीच्या कुंडीखाली ठेवायची लहानपणापासून शिकवले. सोबतच गॅसच्या टाक्या बदलणे, दूध घेऊन ते तापवून ठेवणे (मला एकाग्रचित्ताने दूध तापताना पाहायची सवय होती, कधी उतू जाउ देत नसे) लहानसहान खरेद्या करणे आदि गोष्टी लहानपनापासून शिकवल्या. नंतर बाहेर शिकल्याने मी ह्या स्वयंपाक, घर आवरणे, उपाशी न राहणे आदि गोष्टी जास्त शिकलो. घरी राहून भाऊ एतोबा झाला.
पटकन होणारी दाळखिचडी (नुसती खिचडी म्हनजे साबुदाण्याची) हेही फेवरीट पण आईचा कानडी स्वभाव उतू जायचा. सोबत पापड भाजून देईल, आमसुलाचे नाहीतर टोमॅटोचे सार करेल, वरुन ओले खोबरे किसून घालेल. मग वेळ व्हायचा. पण तिचि शाळा उशीरा असल्याने चालून जायचे. शाळेत जाताना चपाती भाजी खाऊनच जात असे. किचनकट्ट्यापासला रिकामा गॅस सिलेंडर हि माझी जेवायची जागा. त्यावर बसून हातावरच घेऊन खायचो/जेवायचो. गरम चपाती हाच नाष्टा. सोबत काहीही चालायचे. तूपसाखर, चटणी, सॉस, लोणचे. भाजी तयार असेल तर तेपण. तिचि अजून एक सवय म्हनजे ती शाळेतून येताना काहीनाकाहीतरी घेऊन यायची. फळे बाबांनी आणायची अन स्नॅक्स आईने अशीच वाटणी होती. कधी कचोरी, कधी समोसा. घरात एका डब्यात शेव फरसाण हमेशा असायचेच. बाबांना चुरमुरेच शेंगा प्रिय असायचे. कच्च्या भाज्या खायची त्यांची सवय मात्र मला लागली नाही. बाहेर जाऊन काही खाऊ वाटायचेच नाही. शाळेतून येताना घरी काहीतरी खायला असणार याचि खात्री असायचि. डबे धुंडाळण्याला आई कधीच ओरडायची नाही. रविवारी इडली आप्पे दोसे असायचे. रात्रीच्या जेवणात धपाटे, थालिपीठ असायचे. ब्रेड मॅगी अशा पदार्थांना आधि विरोध असायचा, कालपरत्वे तो कमी होत गेला. मॅगीचे तर मी प्रचंड संखेने व्हेरिएंटस केले असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्यादादा, तुम‌चे बाल‌प‌णचे खाद्य‌जीव‌न हा म‌नोबाला प‌ड‌लेला प्र‌श्न नाहीये. त्याला हे विचाराय‌चे आहे " बाहेरच्या देशात राहणार्‍या आणि इथली मुळं असलेल्या मंडळींचा नाष्टा काय असतो ". त्याला अनुस‌रुन उत्त‌र द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌नोबाला क‌धी क‌शाला अनुस‌रुन प्र‌श्न प‌ड‌तात का? आणि प‌ड‌लेच त‌री त्याला अनुस‌रुन स‌ग‌ळ्यानी उत्त‌रे द्याय‌ला म‌नोबा काय एक्झामिन‌र आहे काय्?
अस‌ले अनु वाद, अनु स‌रुन, अनु अगर‌वाल, असे अनु श‌ब्दच आप‌ल्याला आव‌ड‌त नाहित.
वाचाय‌चे असेल त‌र वाचेल म‌नोबा. म‌ला टाय‌पाय‌ची हौस आली, मी भाग‌व‌ली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे अनु श‌ब्दच आप‌ल्याला आव‌ड‌त नाहित.

अनुत्त‌र‌ केलेत‌ तुम्ही अभ्या Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्या र‌साळ् व‌र्ण‌न‌ केलेले आहे अग‌दी चित्र‌द‌र्शी विशेष‌त: तू दुध‌ ताप‌ताना, अनिमिष नेत्रानी प‌हात ताट‌कळाय‌चास ते. सेम‌ माझेही.
म‌ला सायिचि ख‌र‌पूड ख‌र‌व‌डुन खाय‌ला फार आव‌डाय‌चि. त्या ख‌र‌व‌डित साख‌र‌ घालुन केलेली बेरीही. लोणी घ‌र‌चे, तूप‌ घ‌र‌चे, आई खुप फ‌राळ क‌रुन ठेवायची. तिचा हात‌ स‌ढ‌ळ‌ होता. केले की अग‌दी मुब‌ल‌क‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब‌घ ब‌घ्. सांग त्या अनुस‌रुन‌ला. Wink
कुणाला त‌री आव‌ड‌ले ना लिहिलेले. बास्स्.
असे ना त‌से अनुस‌रुन माहिती गोळा क‌रुन म‌नोबा कुठ‌ली पीहेच‌डी काढ‌णारे कुणास ठौक्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाला त‌री आव‌ड‌ले ना लिहिलेले. >>> मलाही आवडले. छान लिहिलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभ्या एक नंब‌र लिव‌लाय‌स‌. एक‌द‌म‌ अनुस्वार‌च झालास‌ की. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनुस्वार हा इतका निरुपद्रवी शब्दसुद्धा इतका भयंकर अश्लिल वाटू शकतो.... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अखेरीस कुणाच्या तरी लक्षात आले म्हणायचे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कर्नाटकात खिचडीसोबतच गॉज्ज (चिंचेचं सार) करतात. लै भारी लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिनधास्त‌ लिखो जो प‌र्य‌ंत मालकांचे काही म्ह‌ंणणे नाही . आणि खवचट रावांना दणकुन डायलओग मारा मेरे मन को भाया मै कुत्ता काट के खाया साल हि काय शाळा आहे का दिलेल्या विश‌यावरच निबंध लिहा मान्य‌ अति अवांतर न‌को पण कोणि काहि जीवा जवळची बाब शेअर क‌रतोय त‌र इत्क्या खडुसपणाने नेहमीच बोचकारण्या चि स‌वय फार वाइत आहे ग्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे ऐकिवात आणि ब‌घिवात आहे की :
निर्वासी भार‌तीयांची प‌हिली पिढी भार‌तीय‌ जेव‌णालाच चिक‌टून अस‌ते. मुले मात्र‌ मोठी झाल्याव‌र क‌ंटाळ‌तात. शिवाय जिथे मुलांच्या व‌डिलांचे आई व‌डील काय‌म‌चे किंवा ब‌राच काळ तिक‌डे अस‌तात त्या घ‌रात 'भार‌तीय‌ स‌ंस्कृती ज‌प‌ण्याचे' द‌ड‌प‌ण अधिक अस‌ते. आणि म‌ग मुले मुद्दाम‌हून विरोध क‌र‌तात. क‌धी क‌धी या ब‌ंड‌खोरीला आईचीच फूस अस‌ते. कार‌ण आईलाही 'रांधा वाढा उष्टी काढा'च्या सुधारित आणि सौम्य‌ (त‌रीही पुरेशा ताप‌दाय‌क) स‌सुराल आवृत्तीतून सुटाय‌चे अस‌ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निर्वासी भार‌तीयांची प‌हिली पिढी

'निर्वासी'??????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब‌रेच‌दा (ओट्स‌ किंवा त‌त्स‌म‌ बेच‌व‌ प‌ण १.५ मिनिटात‌ त‌यार‌ आणी खाऊनही होणारा) चिख‌ल‌ खातो.
शिवाय‌ अंडी हा एक अति-उत्त‌म उपाय‌ मिळाला आहे. आम‌लेट‌, हाफ‌ फ्राय‌, उक‌ड‌लेले, सॅंड‌विच‌म‌धे, इ.इ प्र‌कार‌ प‌ट‌क‌न‌ होतात आणि पोट‌ही भ‌र‌त‌ं. अंड्यांचा मी ऋणी आहे.
ऐश‌ क‌रावीशी वाट‌ली त‌र‌ सोम‍-शुक्रात‌ पोहे,उप‌मा ब‌न‌व‌तो. एक‌दा जोशात‌ येऊन‌ स‌क्काळी इडल्या हाण‌ल्या होत्या.
प्रोबॅब‌लिटीच्या उत‌र‌त्या क्र‌माने लिहिल‌ंय‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रोबॅब‌लिटीच्या उत‌र‌त्या क्र‌माने लिहिल‌ंय‌.

Biggrin Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार वर्शापासुन नियमित ब्रेक्फास्ट स‌ध्या २ व‌र्शापासुन प्रोटिन बार दुपारी वा अवेळि भुक लागल्यास कचरा न‌को खायला लागावा म्ह‌नुन खातो फार उत्ततम प‌र्याय अति उत्तम स‌ह‌ज उप‌ल‌ब्ध‌ दर्जेदार जिम व‌र्कआउट ला बेस्ट व आवश्याक पावडर सारखि लिक्विड भानग‌ड नाहि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहेरी आई नोकरी करणारी असल्यामुळे कधी कोणी कोणासाठी नाश्ता केला नाही. वडिलांची आई लहानपणी वारल्यामुळे त्यांचे असले लाड कधीच झालेले नव्हतेच. अमेरिकेत आल्यावर सिरीयल आवडू लागले, पण नवऱ्याच्या हेल्दी हट्टापायी कधी साखरमिश्रित खात नाही. ओट्स अथवा अंडे साधारण रोज असते, उपमा पोहे प्यानकेक फक्त शनी रवी होतात, ते हि मी नाईलाजाने बनवते. ब्रेकफास्ट इज ओव्हररेटेड असं आपलं वाटतं कारण अनेक वर्ष सिरीयल खायलाही नसेल तर एक केळ बरोबर ठेवत असे- कार चालवतांनाही खाता येतं Smile

मात्र बाकी स्वयंपाकातही पुष्कळ बदल केलेयत कारण भांडी घासणे- वेळ- पौष्टिकता यांचा मेळ घालता यावा म्हणून. उदा. नवरा 'स्लो कुकर' मध्ये चिकन करतो: ह्याला 'वन पॉट मील' अशी संज्ञा आहे.

मी मेक्सिकन बरिटो/केसीडिया करतांना सगळ्या भाज्या घालते, थाई करी सुद्धा घरी करते- त्यात वाटेल त्या भाज्या घालता येतात, शिवाय टोफू प्रोटीन म्हणून, सोबत नुसता भात लावला की काम भागतं. सहसा दोन किंवा तीनच पदार्थ जेवणात करते. कोशिंबिरी नसतात, सरळ कापून काकडीपासून सेलरी पर्यंत खायला छानच लागतात.

खिचडीवरून आठवले! कोबी-भोपळी मिरची-गाजर घालून लसूण फोडणीची 'चायनीज' खिचडी आमच्याकडे हिट आहे! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाश्ता करायचाच कशाला म्हणतो मी? अतिआहारानेच अनेक आजार-व्याधी मनुष्य जोडून घेतो. त्यामुळे आम्ही नाश्ता वगैरे काही करत नाही. फक्त सकाळचा एक कप चहा. (कोणी अगदी आग्रहाने करून खायला दिलाच.. तरच खातो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आभार‌ मंडळी प‌ण ...
स‌ध्या ज‌रा कामं आहेत‌ हाताशी ; त‌प‌शीलवार‌ स‌र्वांच्याच प्र‌तिसादास उत्त‌र‌ देणं लाग‌लिच श‌क्य होणार नै. ज‌रा वेळ लागेल्.
प‌ण प्र‌तिसादांब‌द्द‌ल म‌न‌: पूर्व‌क् आभार‌.
अभ्या, प्र‌तिसाद‌ म‌स्त अहेत रे. इंट्रेस्टींग्. NRI साठीच धागाय‌ असं काही नाही. धाग्याचं शीर्ष्ह‌क त‌सं सुच‌व‌त असेल त‌र‌ सोरी.
अबाप‌ट आदुबाळ शुचि राही मार‌वा बॅट्या अस्व‌ल नाय‌ल्या Fulnamshiromani तुम‌चे प्र‌तिसाद‌ त‌प‌शीलवार‌ वाच‌ण्यासार‌खे आहेत.
म‌स्त क‌लेक्श‌न होउ श‌क‌तं ह्या माहितीचं.

दाल खिच‌डी हा साधा सोपा प्र‌कार‌ म‌लाही आव‌ड‌तो. अंग‌व‌ळ‌णी प‌ड‌लाय्.
बॅच‌ल‌र‌ अस‌ताना काहीकाळ नाय‌ल्या सार‌खी नाश्त्याविहीन जिंद‌गीची स‌व‌य होती.
बाकी अनु रावांना फुल्ल लाय‌स‌न आहेच ट‌प‌ली माराय‌च‌ं. त्या कै ऐक‌त‌ नैत्.
शुचि फार‌च‌ कौतुक क‌र‌ते. Smile

प‌ण मंड‌ळी फ‌क्त नाश्त्या ब‌द्द‌ल क‌शाला. एकूणात‌च‌ इत‌र‌ही खान पान स‌व‌यींत काही मोठा ब‌द‌ल झालाय का तेही सांगा की.
माझं स्व‌त्:चं सांग‌तो. माझ्या रात्रीच्या खाण्यात पूर्वी भाजी भाक‌री /पोळी डाळ कोशिंबिर भात‌ अस‌ं स‌ग‌ळं असे.
आताशा भात‌ घेत‌ला त‌र‌ पोळी खाव‌व‌त नाही, पोळी घेत‌ली त‌र‌ भात खावासा वाट‌त नाही. हा काय प्र‌कारे ठौक नै.
प‌ण खाय‌चा मूड होत नै. कोशिम्बिर पूर्वीपेक्ष्हा खुप‌च क‌मी खातोय्.
स‌ध्या ज‌रा अड‌क‌लेलो आहे ; फुर‌स‌तीत प‌र‌तून अधिक टंकेन म्ह‌ण‌तो. तोव‌र तुम्हीही सांग‌त र‌हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोबा चांगला प्लश्न फेकला आहेस। प्रतिसाद सगळे वाचतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओट्स किंवा ऑम्लेट हा वीकडेजचा नाष्टा. क्वचित फळे/ग्रॅनोला/नट्स वगैरे टाकून गोड केलेले दही किंवा एखादा प्रोटीन बार किंवा ब्रेडला पीनट-बटर/जॅम खातो. वीकेंडला पोहे-उपमा-शेवया वगैरे. या सगळ्यासोबत कॉफी.

वीकडेजला रात्रीच्या जेवणात पोळीभाजी, कधीतरी (बायकोचा) मूड असला तर सोबत भात-वरण. वीकेंडला थोडंसं वेगळं म्हणून इडल्या, डोसे, बिर्याणी, पावभाजी, टाको, पिझ्झा, बर्गर, बरिटो वगैरे स्ट्रीटफूडटाईप प्रकार करतो.

दुपारच्या जेवणात सूप किंवा सॅलड, प्रोटीन बार, केळं किंवा दुसरं एखादं हात घाणेरडे न करणारं संत्र्यासारखं फळ वगैरे खातो. घरून डबा नेला तर पोळीचा रोल किंवा पुलाव वगैरे.
---
सण समारंभाला ठरलेल्या प्रोटोकॉलप्रमाणे पदार्थ असतात. उदा. होळीला पुरणपोळी, गणपतीत मोदक, गुढीपाडव्याला चक्का आणून घरी श्रीखंड केलं होतं, कुठल्यातरी विशिष्ट गुरुवारी पिठलं भाकरीही असते Wink नाताळमध्ये केक (त्यातही ख्रिस्तजन्म सोमवारी-गुरुवारी-शनिवारी आला की एगलेस केक) Wink मागच्या ईदला बिर्याणी आणि शीरखूर्माही केला होता. :p, थँक्सगिविंगला बाहेर टर्की खातो (एवढी घरी करुन कोण खाणार).

---
शाळेत असताना चहा-पोळी हा नाष्टा असे. सकाळच्या डब्यासाठी आई/आजी पोळ्या करत असत. त्यात आणखी दोनचार अधिक पोळ्या केल्या की नाष्ट्याची सोय होत असे. शनिवारी-रविवारी पोहे-उपमा वगैरे वेगळे पदार्थ. कॉलेजला जायला लागल्यावर नाष्ट्याचे विविध पर्याय उपलब्ध झाले. त्यातल्या त्यात स्वस्त पर्याय पाहून नाष्टा करत होतो (चहा-क्रीमरोल, इडली वगैरे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी लहान असतानाही घरी सणाशिवाय कोशिंबीर बनली नाही. भात असेल तर पोळी नाही आणि पोळी असेल तर भात नाही; असली फ्याडं सणासुदीलाच. काय करणार! आई जिवंत असेस्तोवर माझे वडील स्वयंपाकात इकडची काडी तिकडे करायचे नाहीत! मग काय, आम्ही असेच वाढलो आणि असलेच बनलो.

मी सोम-शुक्रवार रोज सकाळी ओट्स खाते. ओट्स दुधात भिजवून त्यात चव, पोत आणि पोषणाचा विचार करून मनुका आणि पीकान/बदाम/आक्रोडाचे तुकडे घालते. दुपारी गाजर/काकडी/बीटाचे तुकडे, भाजी, पाव, दही जेवते. सोम-शुक्रवारपैकी दोन दिवस उसळ आणि तीन दिवस भाजी. रात्री टाको, पास्ता, लेट्यूसचं सॅलड + चीज, खिचडी/वरणभात, पाणीपुरी असा सोम-शुक्रवारचा ठरलेला बेत असतो. कधी भाताच्या ऐवजी डोसे/उत्तपे. शनिवार-रविवारी सकाळी बरा अर्धा पोहे आणि साबुदाण्याची खिचडी बनवतो. इतर दिवसभरात भूक, मूड असेल त्यानुसार काहीबाही चरतो.

तोंडात टाकायला हल्ली पीकानचे कोको-पूड लावलेले दाणे चरते. कधी काजू, बदाम. फळंही ठरलेली. संध्याकाळच्या वेळेस घरी असेन तेव्हा चीज. सोम-शुक्र रोज एक केळं होतंच. शिवाय आठवड्यातून माणशी दोन सफरचंदं आणि एक आव्होकाडो.

अन्न आणि स्वयंपाक या दोन गोष्टी माझ्या दृष्टीनं जिवंत राहण्यासाठी कराव्या लागतात; तेवढीच त्याची मिजास. लठ्ठ पगार देणारी मद्दड नोकरी करावी लागते, तसंच. त्याचा फार विचार करण्यात किंवा त्यासाठी फार कष्ट करून मी जीवाला तोशीस देत नाही. बरं काही खाण्याची इच्छा झाली की बाहेर खावं. अगदीच डोक्याला छळायचं असेल तर करावे लागणारे कष्ट आणि अन्नातून मिळणारं पोषण, वाटल्यास त्याची किंमत यांचं त्रैराशिक मांडावं. आणि कष्ट, पैसे, कमी करणं आणि पोषण पुरेसं मिळवण्यासाठी समीकरणं सोडवावीत.

आम्ही शनि-रविपैकी एक दिवस 'टॉर्चीज टाको'मधून टाको आणून जेवतो. तेही कोणते टाको ते आमचं ठरलेलं आहे. (मी किमान आठवडाभर तेच टाको खाऊन आनंदात राहू शकते.) येत्या शनिवारी 'फ्रेश हाईम' नावाच्या अतिशय चविष्ट आणि मसाल्यांबद्दल बिलकुल फेटिश नसलेल्या कोरियन ठिकाणी जेवायला जाणार आहोत.

मात्र कॉफी हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल. जेवण चाल-छे असलं तरी चालेल, पण कॉफी चांगलीच असली पाहिजे. स्मूथ, मागाहून गोडूस चव सोडणारी आणि नुस्ता वास आला तरी प्रफुल्लित करणारी हवी. अगदी कॉफीचा डबा उघडल्यावरही असं वाटलं तर ती चांगली कॉफी! अन्न-पाणी या मूलभूत गरजा. कॉफीला पोषणमूल्य नसतं, त्यामुळे कॉफीच खरी संस्कृतीरक्षक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी लहान असतानाही घरी सणाशिवाय कोशिंबीर बनली नाही.

स‌णासुदीला कोशिंबीर!!!

आज पु.ल. ह‌यात अस‌ते, त‌र म‌टार‌ उस‌ळ-शिक्र‌ण या सुप्र‌सिद्ध‌ जोड‌गोळीब‌रोब‌र कोशिंबीरही सामील होऊन चांग‌ला तिय्या ज‌मला अस‌ता.

('कार‌ण शेव‌टी आम्ही...' असो. पुन्हा पु.लं.च.)

----------

(अतिअवांत‌र: हे 'सूद' किंवा 'सुदी' जे काय असेल ते नेम‌के काय असावे?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या मी एक कोर्स करत्ये. तिथे मी रोज जेवणाचा डबा घेऊन जाते. बहुतेक वर्गमित्र (मला सगळे वर्गमित्रच आहेत) वर्गात बसून, एकीकडे अभ्यास करतच जेवतात. किंवा अभ्यास किती बेक्कार आहे याबद्दल तक्रारखोरी करत जेवतात. बहुतेकसे बाहेरून काय-काय घेऊन येतात. काल एक जण टॉर्चीजमधूनच टाको घेऊन आला होता. मग मी त्या छान-छान टाकोंचा वास घेत कोबीची भाजी खाते. तोंडात कोबीची भाजी सारत कोबीला नावं ठेवते. घरी असताना, एकटी बसून जेवताना असले वास येत नसत आणि कोबीही आवडायचा. फ्लावरपण.

मग मी सरदारजीच्या जोकचा विचार करते.

एका उंच इमारतीवर काम करणारे तीन कामगार स्कॅफोल्डिंगवर उभे राहून बोलत असतात. मद्रासी म्हणतो, "उद्या माझ्या डब्यात इडली-सांबार असेल तर मी इथून जीव देईन."
बंगाली म्हणतो, "उद्या माझ्या डब्यात माछेर झोल असेल तर मीही इथून जीव देईन."
मग सरदारजीही म्हणतो, "उद्या माझ्या डब्यात छोले-भटुरे असतील तर मी इथून जीव देईन."

दुसऱ्या दिवशी ते तिघंही आत्महत्या करतात. त्या तिघांच्या बायका रडत बोलायला लागतात. मद्रासी म्हणते, "मला माहीत असतं तर मी त्याला अळूची फदफदं केलं असतं."
बंगाली म्हणते, "मला माहीत असतं तर मी त्याच्यासाठी तांबडा रस्सा रांधला असता."
सरदारनी म्हणते, "तो स्वतःचं जेवण स्वतःच की हो शिजवायचा!"

आणि कोबीचा घास घशाखाली ढकलते. प्रोग्रॅमिंग बरं का कोबीची भाजी, याचा निर्णय होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...स‌र‌दार‌जींव‌रून प्रेर‌णा कोणी घेत‌ नाही.

असो चालाय‌चेच.

----------

हे वाक्य साधार‌ण‌त: 'थ्री इडिय‌ट्स‌'म‌धल्या सुप्र‌सिद्ध‌ '...होता तो स‌ब के पास है, म‌ग‌र देता कोई न‌हीं है'च्या चालीव‌र‌ वाच‌ता यावे. (एक निव्व‌ळ सुच‌व‌ण. अधिक काही नाही. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात घरी पोहे /उपमा / शिरा / चहा पोळी असा नाश्ता बनत असे. पण शाळा /कॉलेज / क्लास असल्यामुळे दररोज नाश्ता करण्याची सवय फारशी नव्हती. अमेरिकेत आल्यावर पहिले काही महिने भारतीय पद्धतीने दररोज स्वयंपाक करण्याची हौस भागवून घेतली. नंतर अभ्यास + काम सुरु झाल्यावर स्वयंपाक करण्याच्या पद्धतींमध्ये बदल केलेयत. जवळच्या इंडियन store मध्ये सगळे मिळत असून सुद्धा चालत जायचा कंटाळा असल्याने इंडियन store मधून फारशी खरेदी होत नाही.

दररोज तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा असल्याने नाश्ताल्या वेगवेगळे पदार्थ आलटून पालटून करते. सध्या coffee + Flavoured Bagels with cream cheese हा अतिशय आवडता नाश्ता आहे. पण Bagels मध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्याने आठवड्यातून १-२ वेळा हा item असतो. इतर वेळी उकडलेली अंडी , protein bar , banana ब्रेड असे पदार्थ असतात. ओट्स फारसे आवडत नाही पण सध्या वेगळ्या रेसिपीस वापरून ओट्स नाश्त्याला खाण्याचा प्रयत्न चालू आहे. कांदा , टोमॅटो, पालक घालून आम्लेट फक्त विकांताला होते. Weekdays ला ऑफिस असल्यामुळे आम्लेट होत नाही. पोहे /उपमा / शिरा /डोसा / उत्तप्पा चहा हे पदार्थ २-३ महिन्यातून एखादवेळेस होतात.

लंच साठी पटकन होणारे आणि डब्यातून नेता येणारे पदार्थ करते. एक आठवडा चिकन सॅलड आणि दुसरा आठवडा चिकन + मिश्र भाज्या + फ्लॉवर ,ब्रोकोली असा मेनू असतो. कधीतरी कॅफेटेरिया मधून सँडविच, sub हे पदार्थ खाल्ले जातात. दररोज लंच ला अननसाच्या २ चकत्या आणि काकडीची (दाण्याचं कूट घातलेली ) कोशिंबीर असते.

डिनर साठी बऱ्याचदा भाजणीचं/उपासाचं थालीपीठ असते. (आत्ताच भारतातून भाजणी आल्यामुळे). सहसा वीकएंड ला सँडविच चटणी करून ठेवते किंवा wegmans मधून readymade चिकन सॅलड आणते. त्यामुळे डिनर ला वेगवेगळे कॉम्बिनेशन्स वापरून सँडविच करता येते. भात हा प्रकार आवडत नसल्यामुळे वरण भात करत नाही. फ्रोझन पोळ्या आवडत नाही व रोज पोळ्या करणे शक्य नसल्याने पोळ्या कधीतरीच खाल्ल्या जातात.

Snaks साठी सुका मेवा , baby carrots, yogurt, cookies, प्रोटीन बार या गोष्टी खाल्ल्या जातात.

अमेरिकेत आल्यावर Salmon हा मासा पहिल्यांदा खाल्ला आणि अतिशय आवडला. Tuna सँडविच हा असा अजून एक पदार्थ. त्यामुळे बाहेर गेल्यावर Tuna sub / wrap ऑर्डर करते. Burrito/quasadilia हे मेक्सिकन पदार्थ बाहेर गेल्यावर खाल्ले जातात. घरी करत नाही. बर्गर हा प्रकार फारसा आवडता नाही. कॉलेज मध्ये वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये Free Pizza मिळत असल्याने इतर वेळी pizza खात नाही.

सध्या ऑफिस, कॉलेज , थिसीस ,job search अश्या अनेक गोष्टी एकाच वेळी चालू असल्यामुळे फारसे प्रयोग करायला वेळ मिळत नाही. नंतर routine सुरु झाल्यावर नवीन भारतीय + पाशात्य पदार्थ शिकता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्र‌तिसादांम‌धून‌ दिस‌णाऱ्या अनेक‌ प‌दार्थांची नाव‌ंही क‌धी ऐक‌लेली नाहीत‌ आणि ते काय‌ अस‌तात‌ ते ठाऊक‌ नाही.

आम‌ची (मी आणि भाऊ यांची) आई गृहिणी असून‌ही (का ते ठाऊक‌ नाही) क‌धी स‌काळी पोहे उप‌मा यांचा नाश्ता न‌से. ७० च्या द‌श‌कात‌ही आमच्याक‌डे ब्रेड‌, ब‌ट‌र‌, कॉर्न‌फ्लेक्स‌ व‌गैरे असत‌. अनेक‌दा ग्लास‌भ‌र‌ दूध‌ (त‌प‌किरी र‌ंगाच‌ं काय‌त‌री घात‌लेल‌ं- ते बोर्न‌व्हिटा की ओव्ह‌ल्टिन‌ आहे हे फार‌स‌ं म‌ह‌त्त्वाच‌ं नाही) आणि दोन‌ तीन‌ ग्लुकोज‌ बिस्किट‌ं हा नाश्ता असे. (त्यावेळी आम्ही ब‌ऱ्यापैकी लुक‌डे होतो).
स‌काळ‌ची शाळा असेल‌ त‌र‌ जाण्यापूर्वी दूध‌ प्याल्याव‌र‌ म‌ध‌ल्या सुट्टीत‌ पोळीभाजी असे. दुपार‌ची शाळा असेल‌ त‌र‌ आठ‍साडेआठ‌ला दूध‍- बिस्किट‌ खाल्याव‌र‌ अक‌रा वाज‌ता जेव‌ळ‌ मिळे.
म्ह‌ण‌जे नाश्ता हा माफ‌क‌च‌ असे.
शिवाय‌ स‌काळ‌ची शाळा असेल‌ त‌र‌ दुपार‌च्या म‌ध‌ल्या वेळेलाही क्व‌चित‌च‌ काही प‌दार्थ‌ ब‌न‌व‌ला जाई. चिव‌डा लाडू फ‌र‌साण‌ याव‌र‌च‌ काम‌ भाग‌व‌ले जाई.
(द‌व‌ण्यांची* नॉष्टॅल्जियावाली आई भेट‌लीच‌ नाही).
*त‌शा प्र‌कार‌चे लिखाण‌ क‌र‌णारे कोणीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पूर्वी स्व‌य‌ंपाकात य‌ंत्रांचा वाप‌र क‌मी होता, कार्य‌क्ष‌म इंध‌ने, चुली न‌व्ह‌त्या. त्यामुळे स्व‌य‌ंपाक हे भ‌र‌पूर वेळ‌खाऊ काम असे. शिवाय सुके कोर‌डे प‌दार्थ‌सुद्धा बाहेरून विक‌त आण‌ण्याची प‌द्ध‌त न‌व्ह‌ती. पैसेवाल्या घ‌रांतल्या बाय‌कांनासुद्धा तीन्ही त्रिकाळ चारीठाव जेव‌ण ब‌न‌व‌णेरांध‌णे क‌ठिण प‌ड‌त असावे. म‌ग म‌ध्य‌म आणि ग‌रीब व‌र्गाची काय क‌था. 'पूर्वीचे खाणे स‌क‌स-पौष्टिक असे' व‌गैरे क‌ल्प‌ना बाष्क‌ळ आहेत असे माझे म‌त आहे. अन्नाची विविध‌ता, स‌म‌तोल‌प‌णा आणि स‌क‌स‌ता राख‌णे ही अलीक‌ड‌ची जागृती आहे. ज्येनांच्या दृष्टिकोनातून चोच‌ले. कार‌ण कोंक‌णात पेज आणि इत‌र‌त्र‌ भाक‌री-कांदा-ठेचा हीच ठ‌राविक आणि रोज‌ची न्याहारी असे. आता सुप्र‌सिद्ध भा. म‌. व‌.चा उद‌य व‌गैरे झाल्यामुळे कित्येकांक‌डे बाकी स‌र्व‌ सुब‌त्ता आहे, पैसा है, हौस‌ला है, लेकिन व‌क्त न‌ही. त्यामुळे प‌हिले पाढे प‌ंचाव‌न्न‌ झाले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्य आहे. माझ्या 'पूर्वी' चहा पोळी हाच कायम नाष्टा असे. कधीतरी सुके कोरडे पदार्थ (बिस्कीट, बटर, खारी) वगैरे मिळे तेव्हा अत्यंत श्रीमंत झाल्यासारखे वाटे. विशेषतः आमच्या एका श्रीमंत नातेवाईकांकडे कायम मारी बिस्कीटे असत. घरच्या घरी जेव्हा मारी मिळे तेव्हा लय भारी वाटत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ थ‌त्तेचाचा,
म्ह‌णून‌च‌ तुम‌चा कॉंग्रेस‌क‌डे ओढा वाढ‌ला असेल‌.
कार‌ण‌, स‌ग‌ळे भाज‌पेयी ख‌व‌य्ये अस‌तात‌.
स‌ग‌ळे ख‌व‌य्ये भाज‌पेयी अस‌तात‌, असा दावा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या अक्ख्या खान्दानाइतके खादाडी करणारे लोक आज पर्यंत सापडले नाहीयेत मला ...
आमच्या घरी कुठल्याही कार्यक्रमाचे बेत खायला काय करायचं यावर ठरतात.
माझ्या आईला अन्नपूर्णा प्रसन्न आहे त्यामुळे जे करेल ते अतिशय चविष्ट असतंय.

आई नोकरी करत असल्याने रोज वेगळा नाश्ता नसतो , पण रविवारी नक्कीच .. नाश्त्याला पोहे जरी करायचे तरी, मटार पोहे , गाजर पोहे , वांगी पोहे, बटाटे पोहे , गोडे पोहे , दाबके पोहे , दही दूध पोहे , इतके विकल्प असतात असला कारभार ..
मी ऑफिस मध्ये जाताना आधी ओट्स , अंडी , ब्रेड , लसूण चटणी घालून मुरडलेल्या पोळ्या न्यायचे , सध्या एक काका पोहे , उपमा शिरा साबुदाण्याची खिचडी विकतात त्यांच्याकडून पार्सल घेऊन जाते , बाबा पोळी भाजी खातात. भाजी पोळीचा डबा असतोच .

जेवणात सुद्धा अनेक प्रकार असतात. रात्रीच्या जेवणात पोळी भाजी वरण भात असतोच.
भातावर घ्यायला सुद्धा दार दिवशी वेगळ काहीतरी साध वरण , फोडणीचं वरण , आंबट वरण , मुगाचं , मसुराच्या डाळीचं वरण , ताकाची कढी , माशाची हिरवी आमटी , सोलकढी , हिरवं आमटी , कोकमाचे तिवळ , गोळ्याची आमटी , टोमॅटो ची आमटी , मोड आणलेल्या मटकीची आमटी , वालाची , मसुराची ...
साधं अळूचं फदफद तीन प्रकारात होतं.
चटण्या कोशिंबिरी ठेचा खर्डा , बटाट्याचे / सुरणाचे / केळीचे काप, यापैकी काहीतरी असतंच , कमीत कमी चार तरी लोणची असतात. अगदीच काही नसेल तर पापड , सांडगे , कुरडया , मिरगुंडं असतात. हे झाल ऑफिस वाल्या दिवसाचं.
सुट्टीच्या दिवशी , डोसा, इडली , सँडविच , पुलाव , मसालेभात , पाणी पुरी , दही पुरी , chinese असला बेत.

मधल्या वेळेत खायला लाडू (बेसनाचा , शेंगदाण्याचा , राजगिऱ्याचा , रव्या नारळाचा या पैकी एक ), चिवडा ( पोह्याचा , मक्याचा , बटाट्याचा ) , शेव (साधी , लसणाची , भाजणीची , टोमॅटो , cheese ), शंकरपाळे (गोडे , खारे ), चकली (भाजणीची , बटर , मसाला , तुकडा शेझवान ) , खाकरा असतात , आयुष्यात खाऊचे डबे रिकामे पहिले नाहीयेत मी.

काही सणवार असेल तर मग पाहायलाच नको...

एकंदरीत बाकी सगळ्यांचं वाचून आम्ही जरा जास्तच खातो असा संशय यायला लागलाय.... एकंदर वजन पाहता खराही आहे म्हणा ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

२ बाजुंचे लिहीते. - सास‌र‌ व‌ माहेर्

आई शिक्षिका होती प‌ण घ‌रात‌ खाण्याचे अति म्ह‌ण‌जे फार‌च नीट क‌राय्ची. यात‌ कौतुकापेक्षा राग‌ आहे. कार‌ण ती ल‌व‌क‌र‌ ब‌र्न आऊट झाली आणि खाण‌ं माग‌व‌ता आलं अस‌त‌ं प‌ण आई दुस‌री माग‌व‌ता येत‌ नाही. आणी हा फ‌क्त म‌ला आई न‌ मिळ‌त‌ अस‌ण्याचा स्वार्थ‌च नाही त‌र तिच्याक‌र‌ता ते वाईट ठ‌र‌ले असावे असे आता वाट‌ते.
बाबा आईला त‌री प्र‌च‌ंड‌ म‌द‌त‌ क‌र‌त्. खूप प‌ण तिला क‌ष्टांत‌ म‌र्यादा क‌ळ‌ली नाही असो.
______
नाश्त्याल घ‌री च‌पाती व‌ ब‌ट‌र‌ ब‌रोब‌र‌ च‌हा हेच असे. द‌र‌ र‌विवारी मात्र बाहेरुन आण‌लेले पॅटीस्.
जेव‌णात - प्र‌त्येक‌ प्र‌कार्च्या कोशिंबीर , भाज्या, च‌ट‌ण्या अस‌त‌च प‌ण म‌सालेभात‌, इड‌ली, व‌डा असेही प‌दार्थ अस‌त्. सार‌, आम‌टी, पालेभाज्यांची पात‌ळ भाजी, म‌सूराची ल‌सुण्-खोब‌रे वाटून केलेली उस‌ळ, अनेकानेक उस‌ळी अस‌त्.
रात्रीही तेच्.
दिवाळीत‌ फ‌राळाचे अनेकानेक‌ प‌दार्थ खूप‌ प्र‌च‌ंड प्र‌माणात ब‌न‌वुन ठेव‌लेले अस‌त‌च प‌ण दुपारी च‌रण्याक‌र‌ता हे प‌दार्थ बारामाही अस‌त‌.
__________________________________________________________________________________________

सास‌र‌ - आई घ‌री अस‌ल्याने जेव‌ताना अग‌दी पोळ्या ग‌र‌म‌ग‌र‌म‌ वाढाय‌च्या अस‌ले लाड‌ क‌र‌ता येत‌ व‌ त्या क‌र‌त जे की म‌ला अजुनी प‌च‌नी प‌ड‌त‌ नाही. इत‌रांच्या तालाव‌र‌ नाचाय‌चेच क‌शाला,आप‌ण आप‌ल्या वेळेव‌र‌ पोळ्या क‌रुन ठेवा ना.
सास‌री मासे फार‌ खाल्ले जातात्. हा प्र‌च‌ंड आव‌ड‌ता व‌ चांग‌ला मुद्दा आहे.
म‌ग‌ म‌सुराची आम‌टी + भात + माशाचा त‌ळ‌लेला तुक‌डा तोंडी लावाय‌ला
माशाचे काल‌व‌ण + माशाचे त‌ळ‌लेले काप + भात‌
सार‌+भात‌ + मासा त‌ळ‌लेला
पोळी मात्र भाजीब‌रोब‌र‌च्.
ऊठ‌सूठ म्ह‌ण‌जे आठ‌व‌ड्यातुन ३ दा मासे होतात‌च्.
सासुबाई खेक‌डे त‌र काय‌ म‌स्त ब‌न‌वितात्. डेलावेअर‌ला फ‌ड‌फ‌डीत जिव‌ंत‌ खेकड्यांचा टोप‌ मिळे. स‌ह‌ज‌ २०-२५ खेक‌डे येत्. मिपाव‌र‌ कृती टाक‌ली होती. लोकांनी विचार‌ले इत‌के खेक‌डे? पार्टी होती की काय्? ख‌र‌ं त‌र पार्टी न‌व्ह‌ती कार‌ण एकेक‌ट्याला खेक‌डे खूप जातात्/जाऊ श‌क‌तात्. त्यात मादी व‌ न‌र‌ क‌से ओळ‌खाय‌चे याचेही आडाखे आहेत्.
आई ग‌! लाखेची मादी नेम‌की ताटात स‌मोर‌ आली ना त‌र जीव‌न‌च ध‌न्य‌ होते.
_________
त‌र‌ एक‌ंद‌र सास‌र‌ खाण्याच्या बाब्तीत‌ जास्त मान‌व‌ले Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचिमामी, एक‌ नंब‌र‌ प्र‌तिक्रिया. एक थोडं शंकास‌माधान क‌रा फ‌क्त‌. हे लाखेची मादी काय‌ भान‌ग‌ड‌ आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खेक‌ड्याची मादी पोटाखाली अंडी ठेव‌ते. ते असे पुंज‌क्यात अस‌तात्. ब‌हुतेक त्याला लाखेची मादी म्ह‌ण‌त असावेत्.
म‌ला जास्त माहिती नाही प‌ण आहे तेव‌ढ्यात अंदाज केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओहो अच्छा ओक्के.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या खेक‌डे जिव‌ंत‌ अस‌तानाच शिज‌व‌तात ब‌र‌ं का प‌ण म‌ग आधी साफ‌/स्व‌च्छ क‌रावे लाग‌तात तेव्हा खेक‌डे त्रास देतात म‌ग २ प‌द्ध‌ती आहेत्-
- काही लोक (माझ्या न‌ण‌देच्या सास‌र‌चे) तास‌भ‌र‌ फ्रीझ‌र‌म‌ध्ये ठेऊन‌ देतात म‌ग तेव‌ढ्या वेळात‌ गार‌ठुन ते म‌र‌तात्
- प‌ण जास्त खेक‌डे अस‌तात‌ तेव्हा मेले म‌ध‌ले खेक‌डे गार‌ठ‌त‌ नाहीत व‌ फ‌ड‌फ‌ड‌तात म्ह‌णुन म‌ग माझ्या सासूबाईंची प‌द्ध‌त ही आहे की स‌र‌ळ उक‌ळ‌त्या पाण्यात घालुन माराय‌चे व‌ न‌ंत‌र साफ‌ क‌राय‌चे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय‌ गाभोळी. लाल‌ म‌स्त जाड‌जूड लाख‌ निघ‌ते. फार च‌विष्ट लाग‌ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क‌चेरीत जाताना दोघेही रोज पोळी-भाजीचा ड‌बा घेऊन जातो. दोघांच्याही ऑफिसात आठ‌व‌ड्यात‌ले किमान २ दिव‌स पोहे व इड‌ली असा त्यात‌ल्या त्यात ब‌रा नाश्ता अस‌तो. त्या दिव‌शी ऑफिसात‌च नाश्ता क‌र‌तो. इत‌र‌ दिव‌शी घ‌री ओट्स, कॉर्न‌फ्लेक्स, धिर‌डी असे प‌दार्थ नाश्त्याला खातो/सोब‌त नेतो, शिवाय एक ग्लास दूध पितो. ड‌ब्यात‌ल्या भाज्यांम‌ध्ये ढोब‌ळी मिर‌ची, फ्लॉव‌र, कोबी, दोड‌का, भेंडी, ब‌टाटा व‌गैरे अस‌तात. पोळी-भाजीचा कंटाळा आला की नुस‌ती भाज्या घालून केलेली डाळखिच‌डी, किंवा फ्राईड राईस‌ सार‌खा भात ड‌ब्याला नेतो. स‌ंध्याकाळी घ‌री आल्याव‌र क‌धी उप‌मा, तांदळाची उक‌ड, पोहे, शेव‌यांचा उप‌मा, लाह्या पीठ त‌र क‌धी खाक‌रा, चिव‌डा, सुकी भेळ व‌गैरे खातो. सोब‌त फ‌ळेही खातो. रात्रीच्या जेव‌णात पोळी, भाजी, व‌र‌ण, भात, कोशिंबिर, सूप व‌गैरे अस‌ते. रात्रीच्या जेव‌णात पालेभाज्या, उस‌ळी व‌गैरे स‌ग‌ळे प्र‌कार अस‌तात (ड‌ब्याला प्रामुख्याने फ‌ळ‌भाज्या). ब्रेड, बिस्किटे, मॅगी व‌गैरे मैद्यापासून त‌यार केलेले प‌दार्थ श‌क्य‌तो टाळ‌तो. गोड खाय‌ला प्र‌चंड आव‌ड‌त अस‌ल्याने घ‌री काही ना काही गोड अस‌तंच. याशिवाय स‌ण‍-स्पेसिफिक प‌दार्थ, ज‌से की संक्रांतीला गुळाच्या पोळ्या, होळीला पुर‌णाच्या पोळ्या, दिव्याच्या अव‌सेला क‌ण‌केचे दिवे, नाग‌पंच‌मीला दिंड, चैत्रात कैरीची डाळ, दिवाळीत‌ला फ‌राळ व‌गैरे घ‌री होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेगुल‌र स‌काळ‌चा नाश्ता काहित‌री त‌यार‌ किंवा प‌ट‌क‌न‌ ब‌न‌णारा अस‌तो. कॉर्नफ्लेक्स‌, मुस‌ली, आमेल्ट‌, (आद‌ल्यादिव‌शी )उक‌ड‌लेल‌ं अंड‌, एम्टीआर‌चा प‌ट‌क‌न ब‌न‌णारा डोसा, व‌गैरे. नाहित‌र‌ ड‌ब्यासाठी ज्या पोळ्या ब‌न‌तात‌ त्यात‌ एकदोन वाढ‌वाय‌ला सांगून‌ पिन‌ट‍ब‌ट‌र‍-जॅम‍-पोळी असा रोल‌ सुद्धा छान‌ लाग‌तो. त्याशिवाय‌ दूध‌+एखाद‌ं फ‌ळ‌ हे अस‌त‌ंच‌. विकांताचा नाश्ता रुपाली, गुड‌ल‌क‌, वाडेश्व‌र‌, बेडेक‌र, प्र‌भा, श्रीकृष्ण‌ आदींच्या कृपेने होतो. न‌शीब‌ असेल‌ त‌र‌ अधुन‌ म‌धुन‌ भाज‌णीच‌ं थालिपिठ‌ मिळ‌त‌ं. पोहे उपमा स‌काळी खाय‌ला ( आणि तेही घ‌री केलेले ) अजिबात‌ आव‌ड‌त‌ नाहीत‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नाहित‌र‌ ड‌ब्यासाठी ज्या पोळ्या ब‌न‌तात‌ त्यात‌ एकदोन वाढ‌वाय‌ला सांगून‌ पिन‌ट‍ब‌ट‌र‍-जॅम‍-पोळी असा रोल‌ सुद्धा छान‌ लाग‌तो

क‌रेक्ट‌. हे विस‌र‌लोच‌ होतो.
ब्रेड + पीन‌टब‌ट‌र‌/ह‌म‌स‌/गाव‌कामाल्है/ल‌सूण‌ च‌टणी/कुठ‌लाही स्प्रेड हे पोट‌भ‌रीच्या दृष्टीने भारी आहे.
शिवाय‌ च‌पातीत‌ अस‌ल‌ं काही गुंडाळून‌ हापिसात‌ नेल‌ं की अवेळी भुकेला उप‌योगी प‌ड‌त‌ं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोरले मामा हँगओव्हर

माझी आजी अनाथ होती. वेगवेगळ्या भावांकडे आश्रिताच्या स्वरूपात मोठी झाली. भावांनीच तिचं लग्न लावून दिलं. आश्रित असल्यामुळे तिच्याकडून अप्रत्यक्षपणे खूप अपेक्षा ठेवल्या गेल्या. तिने कायम घरात राबावं, भावांचं हवंनको पाहावं, भाचरं सांभाळावी, वगैरे. पुढे लग्न होऊन लौकिकार्थाने 'सनाथ' झाल्यावरही माहेरून असलेल्या या अपेक्षा संपल्या नाहीत, आणि तिने त्या पूर्ण करणंही सोडलं नाही.

तर या भावांत 'थोरले मामा' नामक एक क्यारेक्टर होतं. या थोमांना अशक्य साग्रसंगीत जेवण लागायचं. रोजच्या जेवणात डावी बाजू, उजवी बाजू, चटण्या, कोशिंबिरी, कुरडया, वाफाळतंच वरण, कणीदारच तूप. यापैकी काहीही नीट नसेल तर ताट वगैरे भिरकावून देण्यासारख्या लीळा करत असत. आजी त्यांना बेकार टरकून असे, आणि थोमा जेवायला येणार म्हटल्यावर खास ठेवणीतला स्वयंपाक करत असे. नवऱ्यासाठी आणि पोटच्या पोरांसाठी कधी बाहेर न निघालेले पदार्थ थोमांसाठी निघत असत.

आजोबा (ठार नास्तिक असूनही) त्यांना संतपद प्राप्त झालं होतं. ते अजिबात लोड करून घेत नसत. पण पोरं एवढी सरळ नव्हती. हा दुजाभाव कळायला लागल्यापासून ती टोचून टोचून बोलत असत. आमच्या घरात "टिक्कोजीराव / लॉर्ड फॉकलंड लागून गेलायस का" याला पर्यायी वाक्प्रचार 'थोरले मामा आहेस का?' असा आहे!

मी थोमांना पाहिलं तेव्हा ते जर्जर झालेले, बिछान्याला खिळलेले होते. थोड्या काळात ते गेलेदेखील. त्यांच्या जेवणाच्या आठवणी ही माझ्यासाठी 'अर्बन लिजन्ड' आहे. गेल्या भारतवारीत थोमांचे वंशज भेटले. त्यांच्या जेवणाच्या सवयी आता नॉर्मलाईज झाल्या आहेत. आजीची पोरं ज्या सुरात थोमांबद्दल बोलत असत तोच सूर थोमांच्या सुनांनीही लावला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लहान होते तेव्हा घरी कोकणातून आणलेल्या उकड्या तांदळाची मखमखीत (आजीचा शब्द) पेज त्यात खोबर्‍याचे तुकडे टाकलेले असत, हा बरेचदा ठरलेला नाश्ता. ५ वी नंतर शाळा ११ ची असे तेव्हा सकाळी चहा-चपाती नाहीतर चहा-पाव, १० ला (रेडिओवर भावगीतं लागायच्या वेळेस) चपाती-भाजी खाऊन शाळेत (त्याच) चपाती-भाजीचा डबा घेऊन जायचं. आल्यावर चिवडा /लोणचं-चपाती/किंवा कोणतं असेल ते फळ, (गुरुवारी)ताकातले साबुदाणे . रात्री आमटी-भात. तेव्हा आमच्याकडे रात्री चपात्या करायचा नियम नव्हता. क्वचित भाकरी केली जाई. भात,आमटी,भाजी हे रात्रीचं जेवण. जेवणानंतर फळं खाणं ठरलेलं होतं. भायखळा मार्केटम़ध्ये खरेदी होत असल्याने अगदी पेअर, पीच अशी फळ ही त्यावेळी फारशी न मिळणारी फळं ही असायची. रविवारी, सणावारी चारीठाव जेवण. आजीच्या हातात स्वयंपाक होता तेव्हा पुरणपोळ्या, शिरा, गोड-पोळे, आप्पे असं काहीना काही सुटीच्या दिवशी असायचंच. आधी दर रवीवारी मासे-मटण असे. मला कुर्ल्या आणि तिसर्‍या फार आवडत असल्याने त्या वारंवार आणल्या जात. मासे वैगेरे नंतर आजी-बाबा इत्यादींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हळूहळू कमी झालं. आई शुद्ध शाकाहारी असल्याने तिच्या हातात स्वयंपाकाची सूत्रं आल्यावर (मी कॉलेजला असताना) मासे अगदीच कधीतरी.
नोकरीला लागल्यावर कोणतीही नोकरी असो ७ ते ८ च्या दरम्यान घराबाहेर पडावं लागे तेव्हा चपाती चहा किंवा चहा-पोहे खाऊन बाहेर पडत असे. लग्न झाल्यावरही चपात्या करता करता एखादी चपाती चहात बुडवून ठेवायचे आणि खायचे किंवा शेवटची चपाती भरपूर तूप चोपडून तशीच खायचे. दूध बिलकूल आवडत नाही पण प्रेग्नन्सीमध्ये दूध पिऊन ऑफिसला जायचे, ती सवय बरीच वर्षं टिकली. आता नोकरी सोडली आहे तर काहीतरी करते नाश्त्याला पोहे, उपमा, उन्हाळ्यात नाचणीची आंबिल. डोसे-आंबोळ्या हे आपले शत्रु आहेत कधीही नीट जमलेले नाही त्यामुळे त्या फंदात फारशी पडत नाही. कधीतरी इडल्या. आदल्या दिवशीच्या चपात्यांचा उपमा वा भाकरी गुळ-तुपात घालून. कांदापोहे+दही (नवर्‍याचे) ऑल टाईम फेवरेट (म्हणून नाईलाजाने माझेही). थालीपिठाची भाजणी घरी बनवते त्यामुळे ती बनवली की काही रवीवार तेच. (थालीपिठाचा दुसरा फायदा असा की आदल्या दिवशीच्या वरण भात भाजीपासून काय वाटेल ते त्यात कोंबता येतं.)
तिघंही डबेबाले होतो तेव्हा दुपारच्या वेगळ्या जेवणाचा प्रश्न नव्हता. सुटीच्या दिवशी जेवायला भात-आमटी-चपाती-भाजी-कोशिंबीर असं करायचे आता दोन्ही वेळेस भाकरी-भाजी/कडधान्याची आमटी (दोन्ही वेळेस भाज्या वेगवेगळ्या). दोनचार महिन्यातून एखादे वेळेस मासे-चिकन इत्यादी. बाहेर खाणं अगदीच कमी. कारण तिघांनाही मसालेदार फारसं आवडत नाही त्यामुळे बाहेर पुलाव हा एकच पर्याय उरतो आणि तो अगदीच बेचव असतो. मुलगी बाहेर फक्त डोसा, इडली,पिझ्झा खाते. आम्ही वाढदिवसांनाही बाहेर जेवायला जात नाही. मुलगी आमच्या जेवणाला ’संन्याश्याचं जेवण’ म्हणते ते खरं असावं असं सगळ्यांचं वाचून वाटायला लागलयं. अर्थात तिला तेच आवडतं (सध्या पर्याय नसल्याने असेल). तिच्या वयाचे सगळे ताव मारून वडे-समोसे खाऊ शकतात पण तिला नाही आवडत. त्यामुळे असलं तळकट काही फारसं करत-खात नाही. फळं खातो पण आधी व्यवस्थित कापून, फोडी करून खायची सवय बाबांमुळे लागली होती ती फार वेळखाऊ आणि आपल्यालाच कामाला लावणारी आहे हे माझ्या ल‌क्ष्यात आल्याव‌र् कलिंगड, खरबूज यासारखी फळे मोठ्या तीनचार फोडी करून त्यात चमचा खुपसून गर खायचा ही नवर्‍याची आणि मुलीची पद्धत मी अमलात आणली. आता आई फार आळशी होतेय हे लक्षात आल्याने मुलीने ती पद्धत बाद केला आणि "मला फळ आजोबांसारखं व्यवस्थित तुकडे करून दे" असं म्हणायला लागली त्यामुळे कधीकधी तसं नक्षीकाम करावं लागतं. (नाहीतर फळं पडून राहतात आणि कचरापेटीची धन होण्याचा संभव असतो.)
बरंच लिहीलं. तरी दोन अत्यंत आवडते नाश्त्याचे प्रकार राहिले. एक गुळ पोहे आणि दुसरा शेवयांची खीर. घरी एकटी असेन तर मला हे जेवण म्हणूनसुद्धा चालतं. वरण-भात-तूप-लिंबू-लोणचं हे दुपारी जेवायला फार फार आवडतं त्यामुळे एकटी असेन तर ते कधीकधी. नास्त्याचा एक सोप्पा आणि झटपट प्रकार म्हणजे सातूचं पीठ. गहू, हरभरे, मूग, सोयाबिन आणि जिरं ठराविक प्रमाणात घेऊन वेगवेगळं भाजून दळून आणते. हे पीठ आयत्यावेळी पाण्यात मिसळून, मीठ घालून पिता येतं किंवा ताकात साखर, मीठ आणि सातूचं पीठ घालून मस्त आणि पोटभरीचं होतं. सक्काळी जिमला जाऊन मग ऑफिसला जायचे तेव्हा हा नाश्ता करून जायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌नोबाने विषय काढ‌लाचे त‌र‌ सांग‌तो (लिस्ट‌ क‌राय‌ला प‌ण म‌जा येतेय). भार‌ताबाहेर‌ प‌ड‌ल्यापासुन निर‌निराळे सिरिय‌ल्स हा खात्रीचा फॉल‌बॅक ऑप्श‌न झालेला आहे. म्ह‌ण‌जे घ‌रात आणि हापिसात एक ड‌बा अस‌तोय‌ आणि जेव्हा इत‌र काही न‌सेल तेव्हा नाश्त्याला वाड‌गाभ‌र दूध आणि सिरिय‌ल्स हे पोट‌भ‌र होतात. या व्य‌तिरिक्त अंडी आणि त्याचे प्र‌योग नित्य‌नेमाने अस‌तात‌. यात उक‌ड‌लेली, हाफ फ्राय प‌ल्टी (हे मुंबईत शिक‌लो), स्क्रॅम्ब‌ल्ड अंडी आणि ब्राऊन टोस्ट‌ ब‌ऱ्याच‌दा होतात. यात नुक‌ताच‌ एक‌ 'शुक्शुका' नावाचा प्र‌कार अॅड‌ झालाय प‌ण तो ब‌हुतेक विकांताचा प्र‌कार आहे स‌ध्यात‌री. याव्य‌तिरिक्त‌ ल‌ग्नानंत‌र बाय‌को क‌र‌ते ते प्र‌योग देखील होतात नाश्त्याव‌र प‌ण स‌ध्या तिक‌डुन च‌पाती आणि त्याच्या रोल्स‌चे प्र‌कार याव‌र सेट‌ल‌मेंट झालेली आहे. Wink
म‌ग श‌निवारी र‌विवारी वेळ असेल त‌सं अस‌तेय सौदेन्डीय‌न व‌गैरे क‌धी क‌धी, प‌ण विकेंड‌ला स‌ग‌ळ्यात आवडीचा नाश्ता क‌म ब्रंच‌ म्ह‌ण‌जे म‌स्त‌पैकी स‌काळ‌च्या उन्हात मोठ्ठा इंग्लिश‌ ब्रेक‌फास्ट‌ हाद‌ड‌णे, ते प‌ण दोन टोस्ट‌ एक्स्ट्रा. Smile

प‌ण भार‌तात अस‌लो की आईच्या हात‌चे उपीट आणि पोहे आणि व‌रुन ओल‌ं खोब‌रं .. अहाहा.. Lol
भार‌तात नाश्त्याला इत‌के प‌र्याय मिळ‌तेत की एक असा आठ‌व‌त नाही. ल‌हान‌प‌णी मोड‌ आलेल्या क‌ड‌धान्यांची प‌र‌त‌लेली आणि फ‌क्त च‌वीला तिख‌ट-मिठ‌ घात‌लेली व‌ड‌लांची रेसिपी मात्र‌ प‌क्की आठ‌व‌तेय. शाळा संप‌ल्याव‌र स‌काळ‌चा निवांत वेळ‌ मिळ‌णे बंद‌ झालं आणि हा नाश्ता प‌ण बंद‌ झाला. तुझ्या धाग्यामुळे आठ‌व‌ला इत‌कंच.

( दोन तास लाग‌ले इत‌का प्र‌तिसाद लिहाय‌ला या न‌व्या ग‌म‌भ‌नने (बाकी ऑप्श‌न त‌र अजून त्रांग‌डे!). आधीच्या एडिट‌र‌ची आता कुठे स‌व‌य होत होती तोव‌र हे न‌वीन‌च.! च‌ चा छ होतोय आणि ईकाराचा 'रेए' असं काय‌तरी होतंय.. :/ )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

एका पोलिश माण‌साला अमेरिकेत गेल्यागेल्या आलेला अनुभ‌व त्यानं असा मांड‌लेला नुक‌ताच‌ वाच‌ला -

I came to the United States as a six year old kid from Eastern Europe. One of my earliest memories of that time was the Safeway supermarket, an astonishing display of American abundance.
It was hard to understand how there could be so much wealth in the world.
There was an entire aisle devoted to breakfast cereals, a food that didn't exist in Poland. It was like walking through a canyon where the walls were cartoon characters telling me to eat sugar.

याचा प‌रिणाम अमेरिक‌नांचा ल‌ठ्ठ‌प‌णा वाढ‌ण्यात झालेला असावा असा क‌यास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ब‌ऱ्याच‌शा .. म्ह‌ण‌जे ज‌व‌ळ‌पास‌ स‌ग‌ळ्या सिरिअल्स‌ म‌धे साख‌र‌ भ‌र‌पूर‌ अस‌ते. ल‌हान‌ मुलांच्या "कार्टून‌ज‌डीत‌" सिरिअल्स‌म‌धेसुद्धा.
तेव्हा साख‌र‌ टाळून‌ सिरिअल्स‌ खाण‌ं थोड‌ं मेहेन‌तीच‌ं काम‌ आहे- rolled oats, steel cut oats (old fashioned) म‌धे न‌स‌व्यात‌ तित‌क्याशा श‌र्क‌रा.
प‌ण‌ एखादी गोष्ट‌ घेताना त्यात‌ ब‌हुतेक‌ वेळा साख‌र‌ बाय डीफॉल्ट‌ अस्ते- साख‌र‌ न‌स‌लेली व‌राय‌टी शोधावी लाग‌ते. उ.दा. ब्रेड‌स, almond milk व‌गैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहान मुलांच्या कार्टूनजडीत सिरीयलमध्ये सर्वाधिक साखर असते; दोन-चार खोके वाचून हे बघितलं. तेव्हापासून बोरिंग पॅकेज असलेले ओट्स खात्ये. कार्टूनं असलेली दुधं म्हणजे साखर आणि स्ट्रॉबेरी किंवा चॉकलेटच्या वासानं यकृतात ढवळून येईल असली दुधं. बाय द वे, जुन्या धाटणीचे ओट्स म्हणजे स्टील कट नव्हे. स्टील कट म्हणजे भरड ओट्स. जुन्या धाटणीचे म्हणजे पोह्यांसारखे दिसणारे पण खाण्याआधी भिजवून किंवा शिजवून घ्यावे लागतात ते. चटकन शिजणारे ओटचे पोहे म्हणजे (आधुनिक) रोल्ड ओट्स.

जंतू, पोलिश माणसाचा अनुभव अगदी पटण्यासारखा आहे. पण ही अशीच सुबत्ता पश्चिम युरोपातही दिसते. सुबत्तेसोबत येणारं स्थौल्यही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आई नोक‌रि क‌र‌णारी आणि त्यातुन‌ही आस‌न‌गाव‌, भिव‌ंडी आणि नोक‌रीच्या शेव‌ट‌ची १०-१२ व‌र्ष‌ बांद्रा अश्या ठिकाणी होती. स‌काळ‌चा नाष्टा आद‌ल्या रात्रीची उर‌लेली च‌पाती भाजी किंवा आम‌टी.
इथे अमेरिकेत‌ आल्याव‌र‌ कुठ‌लाही ब्रेक‌फास्ट‌ बार‌, श‌नि-र‌वी पोहे, उप‌मा ब‌रा प‌ड‌तो. एक‌दा का भांड‌भ‌र‌ क‌रुन ठेव‌ला कि आठ‌व‌ड्यातील‌ २-३ दिव‌सांची बेग‌मि स‌ह‌ज‌ होते.
--म‌युरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुर्वी एक raagi malt नावाचं पीठ मिळायचं. ते नक्की कोण खात असेल हा प्रश्न वाटायचा इतकं गोड असायचं. होतं म्हणतो कारण एकदाच आणलेलं. कोइमतुरवरून येत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिक‌न ड‌ब्याब‌द्द‌ल 'स‌काळ‌'व‌र‌ वाचाय‌ला मिळालं --
http://www.esakal.com/pailateer/pallavi-mahajan-write-tiffin-article-tan...
.
.

हानपणापासून आपण ऐकत आलो आहे, तो म्हणजे प्रत्येक स्त्रीला पडलेला रोजचा प्रश्न, उद्या डब्याला काय करू? वयाच्या तीन ते चारपासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत सगळ्यांना कधीतरी डबा न्यावाच लागतो.

अमेरिकेतही जरी राहावं लागलं, तरी डबा हा कामाला अथवा शाळेत न्यावा लागतो. अमेरिकेत साधारण २०-३५ वयोगटातील भारतीय व्यक्ती कामानिमित्त आलेल्या असतात. काही इकडेच स्थायिक होतात, तर काही थोड्या वर्षांसाठी इकडे राहतात. काही शिक्षणासाठी आलेले असतात, तर काही नोकरीनिमित्त. सगळ्याच स्त्रियांना इकडे काम करता येत नाही. काहींना मुलांमुळे तर बऱ्याच आयटी क्षेत्रातील लोकांच्या पत्नी या व्हिसाच्या मर्यादेमुळे काम करत नाहीत. त्यामुळे बऱ्याच स्त्रिया या घरी असतात. ज्या स्त्रिया घरी असतात त्यांना रोज डबा देणं शक्‍य होतं. इकडे आलेल्या भारतीयांमध्ये बरेच दक्षिण भारतीय लोक आढळतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या खाण्याच्या सवयींप्रमाणे डबा घेऊन जातात. इकडे विशेष म्हणजे भारताप्रमाणे घरकामाला मदत करायला कोणी बाई मिळणं अवघड असतं. त्यामुळे सगळं काम स्वतःच करावं लागतं. चिरलेल्या अथवा साफ केलेल्या भाज्या अथवा फ्रोझन भाज्या इकडे मिळतात. पीठसुद्धा तयार मिळतं, त्यामुळे अशी कामं वाचतात. डब्यात पोळीभाजी अथवा भात अथवा डोसा-इडली, सॅंडविच असे पदार्थ आपल्या संस्कृतीप्रमाणे भारतीयांच्या डब्यात दिसतात. जे नवरा-बायको दोघंही काम करतात त्यांना रात्रीचा डबा बनवून ठेवावा लागतो; अथवा बरेच काम करणारे लोक कामाच्या ठिकाणी कॅंटीनमध्ये खातात. अगदीच जिकडे खूप सारे भारतीय लोक आहेत, अशा ठिकाणी बऱ्याच गुजराती बायका घरी स्वयंपाकासाठी मिळतात. अलीकडेच माझ्या ओळखीच्या एका जोडप्याला कामानिमित्त रोज एक तास प्रवास करावा लागतो, या कारणामुळे स्वयंपाकासाठी त्यांनी एका गुजराती बाईची मदत घेतली आहे.

जे लोक अविवाहित म्हणून एकटे अथवा मित्रांसोबत राहतात, ते आळीपाळीने रोज रात्री जेवण बनवतात आणि ते रात्रीचं उरलेलं जेवण घेऊन येतात अथवा कामाच्या ठिकाणीच खातात. कामाच्या ठिकाणी भारतीय जेवण सहसाा मिळत नाही आणि शक्‍यतो सगळ्याच भागात पोळ्यांसाठी इकडे बाई मिळत नसल्यामुळे किंवा असेल तर सगळ्यांनाच परवडत नसते, त्यामुळे बऱ्याच वेळा लोक फ्रोझन पोळ्यांचा पर्याय निवडताना दिसतात किंवा त्याच्या बदली सहज मिळणारा ब्रेड अथवा टॉर्टिलाचा पर्याय प्रचलित आहे. फ्रोझन पदार्थ इकडे जास्त उपलब्ध असल्यामुळे त्याचा बराच वापर होताना दिसतो. काही भारतीय अविवाहित व्यक्ती या स्थायिक भारतीयांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहतात. त्यांना घराच्या भाड्यात एकवेळेसच जेवणपण मिळण्याची सोय असते.

जे लोक अमेरिकेत लहान गावात राहतात, त्यांना दुपारी रोज घरी जाणे शक्‍य असते, ते दुपारी जेवणाच्या वेळेस घरी जाऊन येतात. बऱ्याचदा लोक सॅलडला पसंती देतात. हलका फुलका आणि सहज प्रत्येक कामाच्या ठिकाणी उपलब्ध असलेला पौष्टिक आणि शाकाहारी सॅलडचा म्हणून पर्याय असतो. इकडे स्थायिक आणि नोकरीनिमित्त व्यस्त असलेले बरेच भारतीय आठवड्याचं जेवण एकदम बनवून फ्रोझन करतात आणि तेच डब्याला नेतात.

अनेकदा अमेरिकेत बरेच भारतीय असल्यामुळे ज्या स्त्रिया घरी आहेत आणि ज्यांना पाककलेची आवड आहे अथवा कुटुंबाला हातभार म्हणून अशा स्त्रिया भारतीयांना डबे पुरवतात. हा त्यांच्या घरगुती व्यवसायाचा एक मार्ग आहे. जसा भारतात डबा मिळतो, तसाच डबा इकडे मिळतो. या सर्वांसाठी थोडी शोधाशोध करावी लागते आणि डॉलर्स मोजावे लागतात एवढेच. काही स्त्रिया तर घरपोच डबे पुरवतात. इकडे गुजराती डबा, पंजाबी डबा आणि दक्षिण भारतीय डबे, मराठी जेवण व यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी डब्यांचे पर्याय पण उपलब्ध आहेत. ज्या लोकांना वेळ नाही किंवा स्वयंपाकाची आवड नाही, अशा लोकांसाठी हा डब्याचा पर्याय अगदी पूरक आहे. कारण, बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी मिळणारे पदार्थ हे एक आठवडा ठीक वाटतात; पण आपल्या लोकांना आपलं साधं जेवण हे कधीही आवडीचं असतं.

बऱ्याचदा ज्यांची मुलं जरा मोठी आहेत, अशा लोकांच्या डब्याला मुलांना जे डब्यात दिलं जाते तेच आणावं लागतं. भारतीय मुलांना इकडे विशेषतः सॅंडविच, पराठा, पास्ता, जॅम रोल, भात, नूडल्स असे पदार्थ दिले जातात. स्नॅक्‍सच्या वेळेस खाण्यासाठी एखादं फळ, बिस्किट्‌स, ड्रायफ्रूट्‌स इत्यादी पदार्थ असतात.
अमेरिकेत बहुतेक इतर देशांतील स्थलांतरित लोक आढळतात. मेक्‍सिको, चीन इत्यादी लोक आपल्या सवयीप्रमाणे डबा घेऊन येतात. मेक्‍सिकन लोकांच्या जेवणामध्ये भाताचा समावेश असतोच, त्यामुळे भारतीयांनाही हे जेवण रुचकर लागतं. बऱ्याचदा अमेरिकन लोक आपल्यासारखं जेवण आणत नाहीत. ते लोक न्याहारी व्यवस्थित प्रमाणात करतात. त्यामुळे जेवणासाठी एखादं फळ अथवा सॅलड हेच खातात. डबा सगळेच आणत नाहीत. अमेरिकेत काही लोक पौष्टिक खाण्याकडे भर देतात, तर काही लोक हे इतर काहीही खाणे पसंत करतात आणि बऱ्याचदा त्यांचं जेवण हे आधीच रात्री बनवलेलं असतं आणि बरेच अमेरिकन लोक हे दुपारी बर्गर, पिझ्झा, पास्ता, नूडल्स यामध्येही मांसाहारी जेवणाला पसंती देतात. कामाच्या आजूबाजूला बरेच खाण्याचे पर्याय असतात. त्यामुळे लोक बाहेर जाऊन खातात. इकडे लोक बऱ्याच जास्त प्रमाणात कॉफी पिताना दिसतात.

आणि एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये काही काही समारंभ असेल, तर पिझ्झा हा पर्याय सगळ्यात सोप्पा आणि आपण भारतीयांनीही त्याला अतिशय जवळच केलेलं असल्यामुळे सगळ्यांसाठी सोयीस्कर म्हणून दुपारच्या जेवणासाठी मागवला जातो.
थोडक्‍यात जसे भारतातही घरातील दोघेही कामावर जाणारे असतील, तर बाईची मदत घेऊन दुपारचा डबा बनवला जातो किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याइकडे बरेच पर्याय उपलब्ध असतात. घरी स्वतः बनवलेल्या डब्याचं प्रमाण भारतात जसं कमी झालंय तसं इकडे पण दिसत आहे. शेवटी भारतात काय अथवा परदेशात धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपण सोपे मार्ग शोधू पाहत आहोत. त्यामुळे यापुढे डबा संस्कृतीही संपुष्टात येईल काय? हाच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

- See more at: http://www.esakal.com/pailateer/pallavi-mahajan-write-tiffin-article-tan...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख आणि प्रतिसाद वाचून भूक लागली ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घरी जेवणाच्या वेळा जरा वेगळ्या आहेत .

सकाळी १०.४५ आणि संध्याकाळी ६ वाजता . त्यामुळे सकाळी फक्त चहा आणि biscuits
शाळेत आणी कॉलेज मध्ये असताना compulsory २ वेळा दूध प्यायला लागायचं.
डब्याचे काही फार लाड नव्हते . पोळी आणि कुठलीही कोरडी भाजी .
घरी भाजी ,पोळी ,कोशिंबीर ,भात ,वरण असा रोजचा सकाळचा मेनू .( २ दिवस पालेभाजी , २ दिवस फळभाजी , २ दिवस कडधान्ये , रविवारी नॉनव्हेज )
संध्याकाळी हमखास मुगाच्या डाळीची खिचडी , पिठलं किंवा कुठल्याही (मूग , मसूर)डाळीची भाजी

आता PG मध्ये - दिवसातून एक तरी फळ खातेच आणि एक वेळ wheat फ्लेक्स , आणी एक वेळ नीट जेवण . क्रम आळशीपणा, उपलब्ध वेळ यावर बदलतो

बहुतेक वेळा शॉर्टकट मारण्यावर भर असतो . one dish meal.
थालीपीठ , उकड, शेवयाची खीर, डाळतांदूळाची खिचडी वाटेल त्या भाज्या घालून ..गोड किंवा तिखट दलिया , पोहे , उपमा , डोसे , इडली ,बिशी बेळी rice , ठेपले , पराठे ,धिरडी ,maggy , ब्रेड आणि ऑम्लेट , ऑम्लेट डोसा, मोड आलेली कडधान्ये तेलावर परतून तिखट मीठ घालून,

अगदीच सुग्रणपणाचा झटका आला तर आणी रिकामा वेळ हाताशी असेल तर पुरणपोळी,पास्ता वगैरे करते .

singapore ला असताना पण कमी अधिक प्रमाणात हेच खाण्याचे पदार्थ होते . घराजवळ शेनशियॉंग मध्ये सगळी पिठं, कडधान्ये , भाज्या मिळायच्या . त्यामुळे खाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आला .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0