नावांची गम्मत

मराठीच्या गमतीजमती
नावांची गंमत-
कार्य उरकलं . घरात सर्व वयांचे पाहुणे. गप्पांचा अड्डा जमलाच.
'झालं का गं पटवर्धनांकडचं बारसं' ?
'हो, यश नाव ठेवलं'.
'छान आहे. छोटंसं. आडनाव मोठं असल्यामुळे छोटं छान वाटतं'.
'अहो, खरं तर वहिनीला यशोधन ठेवायचं होतं.किंवा हर्षवर्धन. पण सगळे तिला चिडवायला लागले, 'यशोधन पटवर्धन; यमक छान, धन-धन'. आणि म्हणे, हर्षवर्धन ठेवलं तर नाव कुठलं नि आडनाव कुठलं तेच कळणार नाही'. शेवटी म्हणाली, ' ठेवा यश. मी मात्र त्याला यशोधन म्हणून हाक मारणार'.
'अगंबाई, हे उलटंच झालं. मोठं नाव ठेवून छोट्यानं हाक मारतात'.
'पण आता सगळयांना छोटी नावं आवडतात. म्हणून देशपांडे आजी नाही का; नातवांची नावं नील, यश. तर ह्या म्हणणार, नीलकंठराव, यशवंतराव.'
'जे नाही ते हवं वाटतं झालं'.
तसं नाही, जुन्या पिढीला जरा घसघशीत नावं आवडतात.
आमची बोलणी संपेतो मुलांचा इकडे दुसराच उद्योग सुरू झाला . हर्षवर्धन पटवर्धन सारखी नावं शोधायचा. ह्या मंथनातून खरंच तशी बरीच नावं सापडली.
रोहित पुरोहित.
'ए, म्हणजे, पुरोहितांकडे रोहित नाव आवडलं तरी ठेवता येणार नाही'.
'असंच नाही काही. ज्याची त्याची आवड आहे. माझ्या भाच्याचा खरंच एक मित्र आहे------
सागर क्षीरसागर' . मग डोकी भराभरा चालू लागली.
विश्वास विश्वासराव, परिक्षित दीक्षित, ममता/मंदा ममदापूरकर, नूपुर पूरकर, जाई जाईल, चंद्रा चंद्रात्रे, सोना सोनावणे, राणी उमराणी, दुर्वेश दुर्वे, अर्जुन अर्जुनवाडकर, श्रीधर देवधर, सोनी सोहनी
अमृता अमृते, पारस परसनीस -- इ. इ.
आमच्या दोन मैत्रिणींची नावं होती श्री आणि विद्या. त्या योगायोगानी जावा झाल्या. याहीपुढचा योगायोग म्हणजे त्यांच्या नवर्यांची नावं होती (अनुक्रमे) श्रीधर आणि विद्याधर. त्यांना वेगळं चिडवावंही लागलं नाही. नावं सांगताना त्या स्वत:च हसत सुटल्या. आम्ही तर काय!
मग द्विरुक्ती असलेली नावं सुचायला लागली. चित्रा चित्रे, राजा राजे, सुभाष दुभाषी, शेखर शिखरे.
मग आणखी गमतीदार म्हणजे नाव /आडनावाचा अर्थ एकच असलेली----- सत्यम खरे, माधुरी गोडे, ईश्वरी देव, अबोली गुपचुप, नयना/नेत्रा डोळे, शंकर भोळे, घन:श्याम ऊर्फ घना ढगे.
आमचा एक विद्यार्थी होता--रोहित चकोर (दोन्ही पक्षी)
तेवढ्यात एकजण म्हणाला, 'ए, राहुल द्रवीडनी मुलाचं नाव आर्य ठेवलं तर। आर्य द्रवीड. मंजे विरुद्ध अर्थाचे शब्दच की'. लगेच तशी नावं भराभरा येऊ लागली.
मानव दानवे, स्वामिनी दास, धवल/श्वेता/शुभ्रा काळे, प्रकाश अंधारे, मधुरा कडू, कोमल गुंड, जुई दांडगट, सरला वाकडे, गुरू विद्यार्थी, जागृती झोपे, शांता जमदग्नी.
विरोधी आडनावांची मैत्री अगर लग्न झालं तर कशा जोड्या जुळतील? काळे-गोरे, उभे-उकिडवे, कडू-गोडे, मोगल-मराठे,
सारख्यांच्या जोड्या म्हणजे अळवणी-गुळवणी, शिंदे-फरांदे, फडणीस-चिटणीस, फाटक-मोडक आणि लगेच क वर जोर देऊन म्हणून झालंच. (फाटकं-मोडकं), ओगले-गोखले लेले-नेने.
नावांमुळे घडलेले काही मजेदार प्रसंग आठवले.---
* एकदा दोन स्त्रिया माझ्यासमोरच एकमेकींना भेटल्या. एक म्हणाली, 'तुम्हाला कुठेतरी पाहिलंय'. "आडनाव काय तुमचं "?
"मी अळवणी. तुम्ही"?
"अगंबाई! मी गुळवणी".
मग सभोवार खसखस पिकली.
* आमच्या शाळेत मेथी या आडनावाचा एक मुलगा होता. मेठी असेल कदाचित. पण त्याला सगळे मेथीच म्हणायचे. एकदा त्याचे आई वडील भेटायला आले होते. स्टाफरूम मधे मला निरोप मिळाला, "मेथीचे पालक" आले आहेत!
* मी कॉलेजमधे असतानाची गोष्ट.कॉलेज नुकतंच सुरू झालं होतं. सर अजून ओळखी वगैरे करून घेत होते. एका मुलीला त्यांनी आडनाव विचारलं. "वाघ". ती उत्त्तरली. सर जरा नाटकी होते; त्यांनी जरा घाबरल्याचा अभिनय केला. तशी आणखी एक मुलगी उठून म्हणाली, "सर, बिवेअर! मी पण वाघ आहे". त्यावर सगळे हसू लागले; "अरे बापरे"! असं ते म्हणतच होते, तेवढ्यात एका मुलाने हात वर केला. तो म्हणाला, "घाबरू नका सर , मी आहे ना"!
"आपण कोण"? असं विचारताच तो म्हणाला, "मी वाघमारे"!
आजोबा झोपायला जाताजाता हसत हसत सांगून गेले, नाव ठेवा, पण नावं ठेवू नका बरं!
आमच्यातल्या शिक्षिकांना लगेच स्फुरण चढलं. नावे ठेवणे, नाव घेणे, नाव होणे, नावलौकिक होणे किंवा मिळवणे, नामानिराळे होणे असे वाक्‌प्रचार पुढे आले. त्यातल्या नाव घेणे चे परत दोन अर्थ निघाले. नवर्याचे किंवा बायकोचे नाव घेणे. आणि लिहिण्यासाठी वगैरे स्वत:लाच एखादे टोपणनाव घेणे.
अशी घेतलेली सुप्रसिद्ध नावे म्हणजे केशवसुत, केशवकुमार (आचार्य अत्रे ), गोविंदाग्रज (गडकरी), कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर), विभावरी शिरूरकर इ. यावरून आठवलं, श्री.बा. जोशी यांच्या गंगाजळी या पुस्तकात द्विरेफ या टोपणनावाचा उल्लेख आहे. श्री.रामचंद्र करंडे यांनी हे टोपणनाव घेतलं होतं कारण त्याचा अर्थ भुंगा असा असला तरी शब्दश: अर्थ दोन रफार असा आहे. आणि रामचंद्र या नावात दोन र आहेत. चर्चा फार जुन्या काळात जातेय असं पाहून तरूण मंडळी पुढे सरसावली. इंटरनेटवर लिहिताना तर काय भन्नाट नावं घेतात अरे! पिवळा डांबिस, धमाल मुलगा, प्रयको, माहितगार, इनिगोय, चमको, टारझन अशी असतात.
हो अगं, माझी एक मैत्रिण विक्षिप्त या नावानी लिहिते.
आणखी माहितीयैत ? मस्त कलंदर, गगनविहारी, चिंतातुर, तिरशिंगराव.
या तिरशिंगराव वरून आठवलं. दहावी अकरावीत असताना आम्ही सुटीत मामांकडे गेलो होतो. माझा मामेभाऊ आणि त्याची बहीण एकदा खूप कडाकडा भांडले. तो तिला 'यल्लम्मा कैकाडीण' म्हणाला. आणि बाहेर निघून गेला. तर हिनी काय करावं? तो परत यायच्वा आधी त्याच्या खोलीच्या दारावर खडूनं "तिरशिंगराव माणूसघाणे" असं लिहिलं. आमची हसून हसून पुरेवाट झाली. तो बराच उशीरा आल्यामुळे, (मोठी माणसं घरात आली होती म्हणून) परत युद्धाचा प्रसंग टळला. पण त्याच्या नाका कानातून येणारे अदृश्य फूत्कार आम्हाला कळत होते. आश्चर्य म्हणजे दुसर्या दिवशी सकाळी दोघे अगदी नॉर्मल. टॉम अँड जेरीच.
'ए, आई पण मला सारखी नावं ठेवत असते हं. गाढवा, घोड्या--- '
'मग तू वागतोसच तसा. आणि तू माझ्या मैत्रिणींना नावं ठेवतोस ते'?
'आता म्हणू का, त्या आहेतच तशा' !
अशी ठेवलेली नावं पण करमणूक करतात. विशेषत: विद्यार्थ्यांनी शिक्षकांना ठेवलेली. याबाबतीत शाळेतली मुलंही काही कमी नसतात. एक बाई सिल्व्हर प्लस वरून यायच्या म्हणून त्या सिल्व्हर प्लस. तर कोणी नीरस, कोणी बोक्या. चिटी चिटी बँग बँग, टॅक्सी, गंगुबाई, कोंबडी, केके, काका, सेव्हन अप्स!
काही नावे आणि आडनावे इतकी लांबलचक असतात की फॉर्म बिर्म भरताना अगदी पंचाईतच होते.
मच्छिंद्रनाथ, राजशेखर, चंद्रशेखर, रवींद्रनाथ, रजनीकांत, शरद्‌चंद्र, रामचंद्र, अवनींद्रनाथ, अशा नावांना अर्जुनवाडकर, महाबळेश्वरकर, तुळशीबागवाले, धर्माधिकारी, चट्टोपाध्याय, बंदोपाध्याय अशी आडनावं मिळाली, आणि ती इंग्रजीतून लिहायची वेळ आली, तर----- तर कशाला, आम्हा शिक्षकांवर ती बरेच वेळा यायची.
शाळेच्या कॅटलॉगमधे जून महिन्यात संपूर्ण नाव लिहावं लागायचं. तेही इंग्रजीत.(शाळा इं. माध्यमाची )
म्हणताना ही नावं अगदी राजेशाही वाटली, तरी या राजे महाराजांना कॅटलॉगमधे बसवायचं म्हणजे नावासाठी ठेवलेली जागा केव्हाच पार होत असे. आणि पुढे एक ते दहा तारखेपर्यंत हे ऐसपैस पसरायचे.
शाळा बारा तेरा तारखेला चालू होत असल्यामुळे हे खपून जाई. उदाहरण म्हणजे, हनियामबल्ली नंदकिशोर लिंगराजप्पा! किंवा, महाबळेश्वरकर मच्छिंद्रनाथ चंद्रशेखर! पहा स्पेलिंग करून.
पण स्पेलिंग करण्याच्या भानगडीत न पडता मंडळींना एकदम विरोधी झटका आला. चिनी, कोरियन नावं कशी सुटसुटीत। त्यांच्या नाक डोळ्यांसारखीच छोटुकली. ली वांग, सू की, टी वॉ, ना यॉंग, शिन टी वगैरे. जी झँग आणि ना ली ह्या चीनच्या टेनिसपटु (उपान्त्य फेरीत पोचल्या आहेत.)
आता सगळे झोपाळले होते. एकेकानी काढता पाय घ्यायला सुरुवात केली.
शेक्सपिअरनी म्हटलंय, नावात काय आहे? पण नावात बरंच काही आहे की नाही? अगदी काही नसलं, तरी केवढी गंमत आहे!
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुम्ही तिमांची बहीण आहात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बरोब्बर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ख‌ल्लास म‌जा आण‌लीत्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिष्ट‌र‌ ज‌य‌सूर्या अटाप‌ट्टू श्रीपाल‌व‌र्ध‌न‌ राज‌शेख‌र श्रीनिवास‌न‌ तिर्चिप‌ल्ली एक्केप‌रंपील‌ पेरुंबुदूर चिन्नास्वामी मुत्तुस्वामी वेणुगोपाल‌ ऐय‌र‌

यांच्या आठ‌वणीने ग‌ल‌ब‌लून आले. लेख आव‌ड‌ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तरी बरं आपण तमिळ नाही. पहिलं स्वत:चं,वडिलांचं,गावाचं,गल्लीचं,अय्यर/अय्यंगार, बोली वेगळं. ही सर्व पुन्हा लांबलचक. इंग्रजी कामाला आली. आद्याक्षरावर भागवतात.
हा लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा नावाचा एक‌ लेख‌ ५ व‌र्षांमागे मी 'ऐसी'म‌ध्ये लिहिला होता. ह्या निमित्ताने त्यालाहि व‌र‌ काढ‌तो.
http://www.aisiakshare.com/node/766

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान! अभ्यासपूर्ण लेख! आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पणशीकरांकडे जर श्रीपाद जन्माला आला तर त्याला कशी हाक मारायची? श्री पाद पण शी कर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

हा हा हा! गुड वन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या एका वाघमारे नामक सिनियर मित्राला बरेच लोक टरकून असत. एकदा दुसरा मित्र म्हणाला, "तो वाघमारे असेल. तुम्ही वाघ थोडीच आहात!" आम्ही सगळ्यांनी 'म्याव' केलं.

तेव्हापासून वाघमारेंचा दरारा संपलाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्तम डोइफोडे होता आमच्या शाळेत.

नणंदा अशा राग काढतात. सगळ्या होऊ घातलेल्या आत्यांना भाच्यांना सुयोग्य नावे कशी ठेवावीत क्लासला पाठवायला हवे. सिझेअरिअन असेल तर त्यांच्यासाठी अडिच तासांचा क्रॅश कोर्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0