बरेली के बाजार मे 2

भाग १

पण दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा घरात छान प्रकाश आला होता आणि वाजले होते फक्त 5. घर फिरून बघितले तर छान संगमरवरी फ्लोरिंग होते. दोन रूम्स बाथरूम्स सह, प्रशस्त किचन आणि मस्त पैकी गच्ची! मुंबईत असे घर स्वप्नात सुद्धा मिळणार नाही. मी लगेच माझ्या काकूंला म्हणाले, मी इथे राहणार आहे. चहाची टपरी समोरच होती तिथून चहा बिस्किटे आणून खाल्ली. 8 वाजता आम्हाला स्टेशनवर न्यायला आले होते त्यांना फोन केला नाश्ता कुठे मिळेल? तर ते म्हणाले हम पहुचा देंगे। सामोसे कचौडी चलेगी ना? आणि मी उत्तर दिले नाही पोहा उपमा मिलता है ना? इथेच माझे चुकले. 10 पर्यंत त्यांचा पत्ता नाही. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. पुन्हा फोन केला तर म्हणाले पोहा उपमा पुछता हु तो बोलते है यह क्या होता है? शेवटी ते आम्हाला एका restaurant मध्ये घेऊन गेले आणि आम्ही सामोसे आणि कचौडीचाच नाश्ता केला. कालची इडली ढोकळा याच ठिकाणाहून आणला होता. बाकी कुठेच हे पदार्थ मिळत नाहीत. मला HR चे खूप कौतुक वाटले.
नंतर आम्ही Sigma MRI and Diagnostic Centre मध्ये डॉक्टर पी के सिंग ना भेटायला गेलो. मी त्यांना पुन्हा सांगितले कि मी 5 वर्षे out of touch आहे. पण ते म्हणाले की एकदा काम सुरु झाले कि तुम्हाला जमेल. घरात सर्वच वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी 20000 ₹ advance दिले.
मग माझ्या बरोबर आलेल्या काका काकूंना बघण्यासाठी जवळ काय आहे असे मी विचारले. कारण माझी ड्युटी 10ते 7 असणार तेव्हा ते काय करणार? त्यावर ते म्हणाले नैनितालच जवळ आहे. तुम्ही तिघेही आधी जाऊन या आणि मगच जॉईन व्हा.
इतका चांगला बॉस आपल्याला मिळाला ह्यावर माझा विश्वासच बसेना.
मग आम्ही काही जरुरी वस्तू घेऊन घरी आलो. घराचे मालक तळ मजल्यावर राहतात. मालकीण रश्मी अगरवाल वकील आहे. तिने घरी बोलवून चहा नाश्ता दिला. मला म्हणाली तुम कुछ भी खाओगी नही तो चलेगा लेकिन पहले inverter लगा लो। ते खरेच होते पण आम्ही नैनिताल ला जाऊन आल्यावर लावायचे ठरवले. त्या दिवशी संध्याकाळी बाहेर चाट वगैरे खाऊन त्यालाच जेवण मानले. नंतर गॅस सिलेंडर मिळेल का याची चौकशी सुरु केली.
दुसऱ्या दिवशी टॅक्सीने नैनिताल ला गेलो. तिथे पाऊस आणि थंडी होती. तिथे सुद्धा पुढे काय होणार याचे टेन्शन होते तरी सर्व काही नीट फिरून पाहिले.
2 तारखेला संध्याकाळी बरेली मध्ये परत आलो. 3 तारखेला जॉईन व्हायचे होते. फक्त एकाच मैत्रिणीला आधी सांगितले होते. तिने UP मध्ये जाऊ नकोस तुला पगारही मिळणार नाही असा सल्ला दिला होता. त्याच्या सगळे काही उलट घडत होते. लॅब पहिल्या दिवशीच पाहिली होती. सुसज्ज होती. 20000 ₹ आधीच मिळाले होते. आता माझीच परीक्षा होती. 5 वर्षांनंतर मला काम कसे जमेल याची. माझे काका काकू म्हणाले तू प्रामाणिकपणे काम कर नक्कीच यशस्वी होशील.

भाग‌ ३
भाग ४

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तो ब्रेक‌फास्ट पुर‌व‌णारा एचाआर चा माणुस्. आधी नैनिताल फिरुन ये सांग‌णारा बॉस म्ह‌ण‌जे ब‌रेलीची माण‌से अग‌दी देव‌ माण‌से दिस‌ताय‌त्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज‌रा वाच‌न‌ सुरु क‌र‌तोय‌ त‌र संप‌ताय‌, अशी वेळ न‌का आणू. मोठे भाग लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0