नक्षलवादी-माओवादींना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणावे का?

सध्या नक्षलवाद- माओवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यासंदर्भात माध्यमांमध्ये येणार्‍या बातम्यात/ विवेचनात एक विशेष जाणवतो. तो म्हणजे इतर दहशतवादाबद्दल उल्लेख असेल तर थेटपणे इस्लामी दहशतवाद, तमीळ दहशतवाद, गोरक्षकांचा दहशतवाद, नव-नाझीवाद, फॅसिस्ट इ. असा उल्लेख केला जातो. परंतु नक्षलवाद्यांबाबत तसे करणे जाणीवपूर्वक म्हणा वा आजवरच्या माध्यमांवरच्या डाव्या-पुरोगामी वर्चस्वामुळे लागलेल्या सवयीचा भाग म्हणून म्हणा, टाळले जाते. सरकारी पातळीवर मात्र गेल्या काही काळापासून 'कडवे डावे' असा उल्लेख करणे सुरू झाले आहे हेही नमूद करण्यासारखे.

विकीपिडीयावरील ०१/०६/२०१७ च्या माहितीनुसार भारतातील सुमारे ४१ नक्षलवादी टोळ्यांपैकी ३८ टोळ्यांच्या नावात थेटपणे 'कम्युनिस्ट' हा शब्द आहे. २६ टोळ्यांच्या नावात 'मार्क्स' शब्द आहे. २५ टोळ्यांच्या नावात 'लेनिन' हा शब्द आहे. इ. ( हे वर्गीकरण 'म्युच्युअली एक्स्लुसिव्ह' नाही)

म्हणजेच नक्षलवाद्यांच्या बहुतांश संघटनांच्या नावात कम्युनिस्ट, लेनिनिस्ट , माओइस्ट, मार्क्सिस्ट असे सरळसरळ कम्युनिस्ट विचारसारणी दर्शवणारे संदर्भ आहेत. असे असताना देखील त्यांचा उल्लेख 'कम्युनिस्ट दहशतवादी' असा करण्यास माध्यमे का कचरतात , ते कळत नाही.

गेला काही काळ प्रचलित झालेला माओवाद हा शब्दसुद्धा त्यामानाने मवाळच. आजच्या सर्वसामान्य वाचकाला नक्षलबारी किंवा माओ यांच्याबद्दल कितपत माहिती असते?

कम्युनिस्ट दहशतवादी असा थेट उल्लेख होत नसल्याने नक्षलवाद- माओवाद्यांची डावी विचारसारणी ही मुळात किती हिंसाचारी,घातक व अराजकतावादी आहे ही बाब लपून राहते व डाव्या विचारवंत - पत्रकारांनी जाणीवपूर्वक जोपासलेली डाव्या विचारांची 'होलिअर दॅन काऊ' प्रतिमा उजळच राहते. किंबहुना राजकीय व बुद्धीवादी कम्युनिस्टांना वेळ आली की नक्षलवादी-माओवाद्यांचा हिंसाचार 'डिसओन' करता यावा व डाव्या विचारांची प्रतिमा तशीच शुद्ध, पवित्र राहावी असा डाव्यांचा व नक्षलवादाच्या पाठीराख्यांचा प्रोपगंडा आहे अशी शंका घेण्यास वाव आहे.

इतर वेळी गांधींची कॉन्ग्रेस खरी की नेहरूंची की इंदिरा गांधींची खरी, सावरकरांचं हिंदुत्व खरं की संघांचं खरं अशा गोष्टींवर वाद घालणारे आपले बुद्धीमंत आणि पत्रकार येचुरींचा कम्युनिझम खरा की नक्षलवाद्यांचा खरा, दुसर्‍या महायुद्धात आधी हिटलरच्या बाजूने असणार्‍या व नंतर विरुद्ध गेलेल्या रशियाचा कुठला कम्युनिझम खरा असे थेट प्रश्न राजकीय व बुद्धीजीवी कम्युनिस्टांना विचारताना दिसत नाहीत. याला कर्मदरिद्रिपणा म्हणावं की डाव्या विचारमशागतीचं यश म्हणावं? नक्षलवाद (आणि आजकाल शहरी नक्षलवाद) यांच्या यशामागे (वाचा: हिंसाचारामागे) नक्षलवादाच्या 'अ‍ॅकेडमिक बॅकबोन'वर वैचारिक कुठाराघात करून तो कमजोर पाडण्यात दुसर्‍या बाजूचे अपयश हे महत्वाचे कारण आहे. आज डावे बुद्धीजीवी लोक आपल्या पाठींब्यासाठी उभे आहेत हे पाहून दलित विद्यार्थी संघटना, मुस्लिम मूलतत्त्ववादी, कश्मिरी फुटीरतावदी आदी लोक आनंदी दिसत आहेत, पण हे लोक उद्या पस्तावणार हे नक्की. असो.

तर मूळ मुद्दा हा की नक्षलवादी-माओवादींना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणावे का?

अवांतर: गमतीचा भाग म्हणजे स्वत:ला 'साम्यवादी' म्हणवून घेणार्‍या नक्षल्यांचा धंदा चालतो तो भांडवलदार उद्योगपती आणि ठेकेदारांकडून वसूल केलेल्या खंडणीरूपी भांडवलावरच. उद्योजक काय आणि नक्षली काय, दोन्हीही भांडवलदारच. एकाचं भांडवल श्रम व बुद्धी तर दुसर्‍याचं माणसाचं दु:ख.

field_vote: 
0
No votes yet

भांडवलदार उद्योगपती आणि ठेकेदारांकडून वसूल केलेल्या खंडणीरूपी भांडवलावरच. उद्योजक काय आणि नक्षली काय,

त्याला स‌ंप‌त्तीचे वित‌र‌ण म्ह‌ण‌तात्. हा प्र‌कार क‌म्युनिस्ट च‌ आहे. फ‌क्त ते संप‌त्तीचे वित‌र‌ण फार‌च थोड्या लोकांच्यात होते ही बाब दुर्ल‌क्षीत क‌रावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द‌ह‌श‌त‌वादी कोण नाहीत ?
आप‌ल्या माग‌ण्या मान्य व्हाव्या म्ह‌णून ज‌न‌तेला वेठीस‌ ध‌र‌णारे कोण्?
र‌स्त्यांत भ‌ले मोठे मोर्चे काढून, श‌क्तिप्र‌द‌र्श‌न‌ क‌र‌णारे, ट्रॅफिक‌ची ऐसी तैसी क‌र‌णारे कोण ?
जाहीर‌ स‌भांम‌धे, 'आम‌च्या स्टाईल‌ने उत्त‌र दिले जाईल‌, म्ह‌ण‌णारे कोण ?
सीबीआय, इन्क‌म‌ टॅक्स इत्यादि क‌राल दाढांच्या म‌धे फ‌क्त, आप‌ल्याला न‌कोशा अस‌णाऱ्या लोकांना ढ‌क‌ल‌णारे कोण ?

सामान्य माणूस‌ सोडून, या देशांत वाव‌र‌णारे स‌र्व‌च‌ इत‌र‌ कोण ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

धागा लेखकाला खूप मर्यादित चर्चा अपेक्षित असली तरी हा हि खरेच महत्वाचा मुद्दा आहे.
मात्र स्वत: चे आणि दुसऱ्याचे प्रत्यक्ष रक्त सांडल्या शिवाय CV वर "दहशतवादी" लिहिण्याला समाज मान्यता नाही.
नक्षलवादी-माओवादींना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणायला काही हरकत दिसत नाही, आणि इन्क‌म‌ टॅक्स खात्याला 'टॅक्स-दहशतवादी" म्हणायला सुद्धा (आठवा त्यांच्या बटबटीत धमक्यांच्या जाहिराती) .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाघ‌मारे साय‌बांशी स‌ह‌म‌त.

----------

इतर वेळी गांधींची कॉन्ग्रेस खरी की नेहरूंची की इंदिरा गांधींची खरी, सावरकरांचं हिंदुत्व खरं की संघांचं खरं अशा गोष्टींवर वाद घालणारे आपले बुद्धीमंत आणि पत्रकार येचुरींचा कम्युनिझम खरा की नक्षलवाद्यांचा खरा, दुसर्‍या महायुद्धात आधी हिटलरच्या बाजूने असणार्‍या व नंतर विरुद्ध गेलेल्या रशियाचा कुठला कम्युनिझम खरा असे थेट प्रश्न राजकीय व बुद्धीजीवी कम्युनिस्टांना विचारताना दिसत नाहीत. याला कर्मदरिद्रिपणा म्हणावं की डाव्या विचारमशागतीचं यश म्हणावं?

(१) ये भी तो हो स‌क‌ता है के .... र‌शिया आप‌ले मित्र राष्ट्र अस‌ल्यामुळे क‌म्युनिस्टांची पापं उजाग‌र क‌र‌णं अनिष्ट मान‌लं जातं.

(२) दुस‌रं म्ह‌ंजे ब‌हुतांश ज‌न‌ता ग‌रीब, मज‌दूर, बेचारी अस‌ल्यामुळे त्यांना क‌म्युनिस्टांच्या विरुद्ध अस‌लेलं काहीही क‌ंटेंट वाचाव‌ंसं/ऐकावंसंच वाट‌त न‌सेल्. आणि ट्यार्पी न‌सेल त‌र प्रोग्राम चाल‌णार क‌सा ? म‌ग प्रोग्राम चाल‌णार न‌सेल त‌र क‌ंटेंट पुर‌व‌णार कोण ? वृत्त‌प‌त्रे म्ह‌णा किंवा टीव्ही च्यानल्स म्ह‌णा - ती वाच‌कांना न‌कोसं अस‌लेलं क‌ंटेंट पुर‌व‌ण्याच्या बिझ‌नेस म‌धे क‌शाला प‌ड‌तील ?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

नाही ग‌ब्ब‌र‌भौ २ रे कार्ण‌ चुकीचे आहे.
म‌ला वाट‌तं, स्वातंत्र्यानंत‌र‌च्या प‌हिल्या व दुस‌ऱ्या पिढीत स‌माज‌वाद, साम्य‌वाद पोप्युल‌र होता नेह‌रू आदी प्र‌भुतींमुळे. त्या पिढीतील ब‌हुतेक विचार‌वंत‌, इतिहास‌कार, प‌त्र‌कार, सामाजिक कार्य‌क‌र्ते, एकुण‌च स‌माज‌म‌नाव‌र जी जी मंड‌ळी प्र‌भाव पाडू श‌क‌तील अशी होती ती याच विचार‌धारांतून आलेली होती. इत‌र विचार‌धारांतील माण‌सांना तिथे स्थान मिळाले नाही किंब‌हुना, या क्षेत्रांत ग‌ब्ब‌र झालेल्या लोकांनी आपाप‌ले कंपू त‌यार केले आणि नंत‌र जिक‌डे तिक‌डे स‌र‌कारी मेवा खाय‌ला मिळू लाग‌ल्यामुळे कंपु वाढ‌त‌च गेला. आता ही एकांगी विचार क‌र‌णारी मंड‌ळी स‌ग‌ळी वैचारिक प्र‌भाव‌क्षेत्रे आप‌ल्या क‌ब्जात घेऊन ब‌स‌ल्याने लोकांनी काय ऐकाय‌चं हे ठ‌र‌व‌णे लोकांच्या हातात मुळी ठेव‌लेच गेले नाही. जे जे विचार‌स‌र‌णीच्या सोयीचे ते ते प‌स‌र‌व‌ले गेले माध्य‌मांच्या माध्य‌मातून‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

स्वातंत्र्यानंत‌र‌च्या प‌हिल्या व दुस‌ऱ्या पिढीत स‌माज‌वाद, साम्य‌वाद पोप्युल‌र होता नेह‌रू आदी प्र‌भुतींमुळे. त्या पिढीतील ब‌हुतेक विचार‌वंत‌, इतिहास‌कार, प‌त्र‌कार, सामाजिक कार्य‌क‌र्ते, एकुण‌च स‌माज‌म‌नाव‌र जी जी मंड‌ळी प्र‌भाव पाडू श‌क‌तील अशी होती ती याच विचार‌धारांतून आलेली होती. इत‌र विचार‌धारांतील माण‌सांना तिथे स्थान मिळाले नाही किंब‌हुना, या क्षेत्रांत ग‌ब्ब‌र झालेल्या लोकांनी आपाप‌ले कंपू त‌यार केले आणि नंत‌र जिक‌डे तिक‌डे स‌र‌कारी मेवा खाय‌ला मिळू लाग‌ल्यामुळे कंपु वाढ‌त‌च गेला. आता ही एकांगी विचार क‌र‌णारी मंड‌ळी स‌ग‌ळी वैचारिक प्र‌भाव‌क्षेत्रे आप‌ल्या क‌ब्जात घेऊन ब‌स‌ल्याने लोकांनी काय ऐकाय‌चं हे ठ‌र‌व‌णे लोकांच्या हातात मुळी ठेव‌लेच गेले नाही. जे जे विचार‌स‌र‌णीच्या सोयीचे ते ते प‌स‌र‌व‌ले गेले माध्य‌मांच्या माध्य‌मातून‌.

आचार्य पोफ‌ळे गुरुजी स्टाईल प्र‌कार असावा. (आचार्य विनोबा भावे व साने गुरुजी यांचे कॉंबिनेश‌न्).

साने गुरुजींनी लिहिलेले "भार‌तीय स‌ंस्कृती" हे पुस्त‌क उत्त‌म न‌मूना आहे. त्यात त्यांनी "क‌म्युनिझ‌म साम्य‌वाद् हा आच‌र‌णात आण‌लेला वेदांत आहे" व‌गैरे म‌स्त म‌स्त विधाने केलेली आहेत.
या लोकांचे स्वातंत्र्योत्त‌र कालात प्राब‌ल्य होते. आख्खी पिढी (पिढ्या ?) या भ‌ंप‌क विचारांनी प्रेरित झाल्या होत्या. आज त्याच स‌ंस्कार‌वादी पिढ्या (स‌ग‌ळे स‌ंस्कार क‌रून झाल्यान‌ंत‌र्) आज‌काल‌च्या त‌रूण् पिढीला शिव्या दे.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समाजवाद जगभर पापिळवार होता. त्याच्याशी नेहरू आणि साने गुरुजींचा संबंध नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नक्षलवादी-माओवादींना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणावे का?

हो, नक्कीच म्हणावे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उल्लेखाच्या अभावाचे कारण कचरणे आहे ह्या निष्कर्षापर्यंत लेखक कसा आला हे जाणून घ्यायला आवडेल. नक्षलवादाच्या व्याख्येतच माओवादी कम्युनिस्ट येतात. तस्माता एफ सी कॉलेज रोड न म्हणता आम्ही एफ सी रोड म्हणालो तर आम्ही कॉलेज म्हणायला कचरतो असे आहे का?

समांतर उदाहरण: तालीबानी असा वाकप्रचार वापरला जातो. तालीबानी लोक हे 'इस्लामीस्ट' दहशतवादी आहेत हे आपल्याला माहीत आहे. तर तालीबानी मुस्लिम दहशतवादी न म्हणता तालीबानी म्हणणारे मुस्लिम म्हणायला कचरतात असा अर्थ घेणं जरा हास्यास्पद होईल असं तुम्हाला वाटत नाही का?

तर वेळी गांधींची कॉन्ग्रेस खरी की नेहरूंची की इंदिरा गांधींची खरी, सावरकरांचं हिंदुत्व खरं की संघांचं खरं अशा गोष्टींवर वाद घालणारे आपले बुद्धीमंत आणि पत्रकार येचुरींचा कम्युनिझम खरा की नक्षलवाद्यांचा खरा, दुसर्‍या महायुद्धात आधी हिटलरच्या बाजूने असणार्‍या व नंतर विरुद्ध गेलेल्या रशियाचा कुठला कम्युनिझम खरा असे थेट प्रश्न राजकीय व बुद्धीजीवी कम्युनिस्टांना विचारताना दिसत नाहीत.

विचारताना दिसत नाहीत म्हणजे त्यांना फरक मान्य नाही असा निष्कर्ष तुम्ही काढल्याच दिसत आहे. मुळात, हिटलरच्या बाजूने रशिया होता यात तुम्ही जे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे ते साधारण त्याच प्रकारचं आहे. जर्मनी आणि रशियाने नो अग्रेशन करार केला होता. जर्मनी आणि रशियाने कोणता भाग घ्यायच्या यावर त्यांनी वाटाघाटी केल्या होत्या आणि त्यावर त्यांचे मदभेदही होते. (त्यावरून हीटलरने स्टॅलीनविषयी) काढलेले उद्गार प्रसिद्ध आहेतच.) पुढे ह्या मतभेदांवरूनच किंवा ज्या कारणाने मतभेद निर्माण झाले होते त्यामुळेच म्हणा, जर्मनीने रशियावर हल्ला केला. वगैरे.

पण, त्याशिवाय, सोव्हीएत रशियाचा साम्राज्यवाद म्हणजेच कम्युनिझम असा ही निष्कर्ष जो तुम्ही काढला आहे ते ही सिम्प्लीफिकेशनच आहे.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तर वेळी गांधींची कॉन्ग्रेस खरी की नेहरूंची की इंदिरा गांधींची खरी, सावरकरांचं हिंदुत्व खरं की संघांचं खरं अशा गोष्टींवर वाद घालणारे आपले बुद्धीमंत आणि पत्रकार येचुरींचा कम्युनिझम खरा की नक्षलवाद्यांचा खरा, दुसर्‍या महायुद्धात आधी हिटलरच्या बाजूने असणार्‍या व नंतर विरुद्ध गेलेल्या रशियाचा कुठला कम्युनिझम खरा असे थेट प्रश्न राजकीय व बुद्धीजीवी कम्युनिस्टांना विचारताना दिसत नाहीत.

(सांस्कृतिक) हिंदूंना (हिंदुत्ववादी नाही बरं) असा प्रश्न का बरं पडावा? शैव हिंदू आणि वैष्णवही हिंदूच. फारतर 'मला येचुरींचं म्हणणं अधिक जवळचं वाटतं' किंवा 'स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं स्वरूप बदललं' अशा छापाची मतं मांडावीत.

आम्ही लिनक्स वापरणारे अशी मारामारी नाही करत. मिंट, कुबुंटू, फेडोरा सगळे स्वाद आपलेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपला आक्षेप नक्की कशाला आहे
१. नक्षलवाद्यांना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणायला की
२. तसं म्हटल्याने द्विरुक्ती होऊन उर्जेचा अपव्यय होतो याला

एफ सी कॉलेज रोड न म्हणता आम्ही एफ सी रोड म्हणालो तर आम्ही कॉलेज म्हणायला कचरतो असे आहे का?

हा युक्तिवाद मान्य केला तर जसं 'पिवळं पीतांबर' वा नुसतंच 'पीतांबर' म्हटल्याने काही विशेष फरक पडत नाही, म्हणजेच दोन्हीतून अर्थ पोचतो; त्याचप्रमाणे 'कम्युनिस्ट दहशतवादी' असा मुद्दाम उल्लेख केल्यानेही काही विशेष फरक पडणार नाही असं वाटतं.

विचारताना दिसत नाहीत म्हणजे त्यांना फरक मान्य नाही असा निष्कर्ष तुम्ही काढल्याच दिसत आहे

असं नव्हे. विचारताना दिसत नाहीत याची इतर अनेक कारणे असू शकतात
१. अज्ञान अर्थात माहीतच नसणे
२. असा प्रश्न विचारावा असं न सुचणं (या परिस्थितीचीही पुन्हा अनेक कारणे संभवतात)
३. वैचारिक बांधिलकीमुळे जाणूनबुजून असे प्रश्न न विचारणं
४. व्यावसायिक दबाव
५. जीवाची भीती इत्यादी

उदा. अलीकडील काळातील मुलाखतींमध्ये शरद पवारांना ,"काहो, तुम्ही या विदेशी मुळाच्या मुद्द्यावर कॉंग्रेस फोडली होती, आता त्याची काय परिस्थिती आहे?" असा प्रश्न जाहीररित्या कोणी विचारताना दिसत नाही. याचीही अनेक कारणे संभवतात. (हे उदाहरण अन्य कुठल्याही नेत्याला लागू करता येईल.) असो.

सोव्हीएत रशियाचा साम्राज्यवाद म्हणजेच कम्युनिझम असा ही निष्कर्ष जो तुम्ही काढला आहे ते ही सिम्प्लीफिकेशनच आहे.

बरं मग कम्युनिझमची सिप्लिफाईड व्याख्या काय? अधिक त्याचं सध्या अस्तित्वात असलेलं किंवा होऊन गेलेलं एखादं वास्तवातील उदाहरण काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

माझा आक्षेप आहे असे का वाटले माहीत नाही.

तुम्ही असा कयास केलेला दिसतो की वर्तमानपत्रे नक्षलवाद्यांना 'कम्युनिस्ट' म्हणत नाहीत याला कारण ते (कशालातरी) कचरतात. असे तुम्हाला का वाटले असावे या अनुशंगाने तुम्हाला प्रश्न केलेले आहेत. (तुमच्या कयासाची मजबूत करण्यास तुम्ही (प्रमुख) वर्तमानपत्रांतील उदाहरणं दिलीत, जिथे मुद्दाम नक्षलवादी कम्युनिस्ट नाहीत वगैरे प्रोपागॅँडा चालवलेला आहे तर तुमच्या दाव्यात काहीतरी तथ्य आहे आणि मग त्यावर चर्चा करता येईल. तुर्तास, माझ्या वाचनानूसार मला असा कोणताही प्रोपागॅँडा आढळलेला नाही. तस्मात, कम्युनिस्ट शब्दाच्या पुनरुक्ती-अभावाची संभाव्य कारणं दिली, इतकंच.)

त्याचप्रमाणे 'कम्युनिस्ट दहशतवादी' असा मुद्दाम उल्लेख केल्यानेही काही विशेष फरक पडणार नाही असं वाटतं.

या बरोबरच तालिबानचं उदाहरण दिलं होतं.

असं नव्हे. विचारताना दिसत नाहीत याची इतर अनेक कारणे असू शकतात
१. अज्ञान अर्थात माहीतच नसणे
२. असा प्रश्न विचारावा असं न सुचणं (या परिस्थितीचीही पुन्हा अनेक कारणे संभवतात)
३. वैचारिक बांधिलकीमुळे जाणूनबुजून असे प्रश्न न विचारणं
४. व्यावसायिक दबाव
५. जीवाची भीती इत्यादी

कारणे 1 ते 4 (एक, किंवा अनेक) सरसकट सर्व माध्यमांना लागू होतात असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असल्यास त्याच्या पुष्टीखातर तुम्ही काहीतरी दिल्याशिवाय ही चर्चा मला काय वाटतं अन तुला काय वाटतं यावरच अडकून राहीलं. माझे भारतीय माध्यमांचे ज्ञान तुमच्यापेक्षा कमी असण्याची दाट शक्यता आहे, पण त्या तोकड्या ज्ञानानुसार, ही कारणं असण्याची ठळक शक्यता मला तरी कधी जाणवलेली नाही.

वेळेअभावी, रशियाबद्दल चर्चा पुन्हा केव्हातरी. तशीही ती या चर्चेत थोडीशी अवांतरच आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तर मूळ मुद्दा हा की नक्षलवादी-माओवादींना 'कम्युनिस्ट दहशतवादी' म्हणावे का?

अर्थात!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+ १

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेख‌काने एक चिंत‌नीय मुद्दा मांड‌ला आहे. डावे जास्त ब‌द‌नाम होऊ न‌येत अशि खिच‌डि प‌क‌व‌लेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लेखकाच्या मुद्दा बिनतोड आहे. नक्षलवादी चळवळ ही डाव्यांची चळवळ आहे. चारू मुजुमदार आणि केनु सन्याल हे प्रमुख नक्षलवादी कामुनिस्त होते. असो.
कॉंग्रेस चा विशेषत: पंडित नेहरूंचा डाव्या विचारसरणीला सुप्त असा पाठींबा होता.( ते रशियाच्या प्रगतीने प्रभावित होते ). इंदिरा गांधीना डाव्यांच्या पाठिंब्याची कारणपरत्वे गरज भासत होती आणि म्हणूनच 'कामुनिस्ट दशहतवादी' असा शब्द प्रयोग रूढ झाला नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात दहशतवादी हा शब्दच इंदिरागांधींच्या अस्तानंतर उदयास आला. इंग्रजीत टेररिझम असा शब्द होताच. तो सावरकर, भगतसिंग, अरविंद घोष आदि लोकांसाठी इंग्रज वापरत होते. पैकी भगतसिंग हा कम्युनिस्ट होता. त्याला टेररिस्ट म्हणत होते पण कम्युनिस्ट टेररिस्ट म्हटल्याचे ऐकलेले नाही.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुळात दहशतवादी हा शब्दच इंदिरागांधींच्या अस्तानंतर उदयास आला बरोबर आहे. त्यापूर्वी त्यांना आतंकवादी म्हणण्यात येत असे. हा शब्द खलिस्तानी लोकांशी सदैव वापरला जाई.
इंग्रजीत टेररिझम असा शब्द होताच. तो सावरकर, भगतसिंग, अरविंद घोष आदि लोकांसाठी इंग्रज वापरत होते. ते इंग्रज होते. आपण त्यांना देशभक्त म्हणूया का ?

कॉंग्रेस चा 'सत्ता प्राप्ती साठी ' कम्युनीस्ट , मुस्लीम लीग ह्यासारख्या परस्पर विरोधी पक्षांचा पाठींबा चालत असे आणि कॉंग्रेस नेहमीच ' काणाडोळा' करत होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> ते इंग्रज होते. आपण त्यांना देशभक्त म्हणूया का ?

कुणाला देश‌भ‌क्त‌ म्ह‌णूया?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.