पा.कृ.: ब्रह्माण्डाचे ऑम्लेट
नका डोळयांसी वटारू | नका काना॑सी टवकारू
शीर्षक योग्यची "पा.कृ."| वाटे जरी अस्थानी
प्रथम ब्रह्माण्ड फेटावे | स्थल-काल कुपीत ठेवावे
चांदण-चुऱ्याचे लवण घालावे |चवी पुरतेच फेटणी
अणु-गर्भाचे सोलीव कांदे | (बारीक चिरायचे वांदे)
फोडुनी तयांची पुष्ट दोंदे |ढकलावे फेटणी
आदि-स्फोटाचा अग्नी पेटवा |आकाश-गंगेचा चढवा तवा
तेजोमेघांचे तेल उडवा |दोन थेंबुटे त्यावरी
फेटण त्यावरी हळू ओता | गुरुत्व-कालथ्याने अरता-परता
ऑम्लेट होईल बोलता बोलता |कल्पांता पर्यंत
या पा.कृ. चे प्रकाश-चित्र | देखू न शकती चर्म-नेत्र
म्हणोनी तिचे रेखा-चित्र | सत्वर टाकावे कुणीतरी
प्रतिक्रिया
मस्त! मस्त!
मस्त! मस्त!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
लई झ्याक, serve कसं करणार या
लई झ्याक, serve कसं करणार या पाककृतीला ते पण कळलं तर...
भांबड आलं
चिवित्र
अहो, पण अणुगर्भाची दोंदे फोडल्यावर ना राहील तवा, ना फेटण!
आख्ख्या विश्वाचेच होईल एक चाटण!
धन्यवाद, पुंबा; टुचेश; तिरशिंगराव
आपल्या प्रतिसादाबद्दल !
मस्त वेगळी कविता.
मस्त वेगळी कविता.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आभार, अजो१२३
आपल्या प्रतिसादाबद्दल!
मस्त आहे कविता!
खूप आवडली. भौतिक आणि साहित्य एकाच माळेत गुंफणं म्हणजे कहरच बाकी!
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
वनफॉरटँन, माझी कॉस्मिक डिश
..आवडली हे वाचून बरे वाटले ! धन्यवाद !
वेगळीच कविता. आवडली.
वेगळीच कविता. आवडली.
रा.घा., आभार!
____/\____