पा.कृ.: ब्रह्माण्डाचे ऑम्लेट

नका डोळयांसी वटारू | नका काना॑सी टवकारू
शीर्षक योग्यची "पा.कृ."| वाटे जरी अस्थानी

प्रथम ब्रह्माण्ड फेटावे | स्थल-काल कुपीत ठेवावे
चांदण-चुऱ्याचे लवण घालावे |चवी पुरतेच फेटणी

अणु-गर्भाचे सोलीव कांदे | (बारीक चिरायचे वांदे)
फोडुनी तयांची पुष्ट दोंदे |ढकलावे फेटणी

आदि-स्फोटाचा अग्नी पेटवा |आकाश-गंगेचा चढवा तवा
तेजोमेघांचे तेल उडवा |दोन थेंबुटे त्यावरी

फेटण त्यावरी हळू ओता | गुरुत्व-कालथ्याने अरता-परता
ऑम्लेट होईल बोलता बोलता |कल्पांता पर्यंत

या पा.कृ. चे प्रकाश-चित्र | देखू न शकती चर्म-नेत्र
म्हणोनी तिचे रेखा-चित्र | सत्वर टाकावे कुणीतरी

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

म‌स्त‌! म‌स्त‌!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

लई झ्याक, serve कसं करणार या पाककृतीला ते पण कळलं तर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

अहो, प‌ण अणुग‌र्भाची दोंदे फोड‌ल्याव‌र‌ ना राहील‌ त‌वा, ना फेट‌ण‌!
आख्ख्या विश्वाचेच‌ होईल एक चाट‌ण‌!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आप‌ल्या प्र‌तिसादाब‌द्द‌ल !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌स्त वेग‌ळी क‌विता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आप‌ल्या प्र‌तिसादाब‌द्द‌ल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप‌ आव‌डली. भौतिक आणि साहित्य एकाच माळेत गुंफ‌णं म्ह‌ण‌जे क‌ह‌र‌च बाकी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

..आव‌ड‌ली हे वाचून ब‌रे वाट‌ले ! ध‌न्य‌वाद‌ !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळीच कविता. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

____/\____

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0