एक fantasy होती यार…

पुर्वलक्षीप्रभावानं (prejudice) जे लेखन येतं त्यावर लिहीणार्‍याला बर्‍यापैकी ऊत्तरे देणं भाग पडतं. पण लिहीता वेळेसची तिव्रता अशी काही असते की, मी तर म्हणतो की भाड मे गयी दुनिया...पण कधीकधी तिव्रता ओसरल्यावर थोडी mystake झाल्याची जाणिव होते, अन् one stroke मध्ये आठवलेलं आणि लिहीलेलं edit करायला मात्र जिवावर येतं. तसंच ह्याचंही आहे. पुर्वप्रकाशित आहे माझ्या blog वर.

एक fantasy होती यार…

मुलांना पोरीमागे फिरताना पाहून गम्मत वाटायची, आम्ही ७ वीत असताना आमच्या शाळेच्या १० वीच्या मुलाने एका मुलीच्या पायी धोत्र्याच्या बिया खाल्ल्या होत्या… आम्ही कितीतरी दिवस याची चर्चा करायचो, एवढ करायची काय गरज म्हनुन…पण मला कधी अश्या प्रकारात इंटरेस्ट नव्हता तेंव्हा. पुढ कॉलेज मध्येहि वर्गात एकच मुलगी, ती हि कधी आवडायची नाही,

पुढ डिग्री ला मात्र मात्र हळूहळू सगळाच बदलत गेल यार...

मित्राच्या जश्या मैत्रिणी होत्या, आपल्यालाही एखादी मैत्रीण असावी अस हळूहळू वाटू लागल (निसर्ग नियम लागू झालाच).

अशी जीला पाहिलं कि माझी बोलती बंदच होऊन जावी,

तिच्यासाठी मी रात्रंदिवस झुराव,

मित्रांनी ती आली कि माझ नाव मोठ्याने घेऊन ओरडाव, मीही लाजून लाल होऊन त्यांना गप्प बसा बे म्हणून request करावी,

तिनेही ऐकून दुर्लक्ष कराव पण तिच्यासोबतच्या तिच्या मैत्रिणींनी मुद्दाम तिला जाणीव करून द्यावी, तीही मग खाली बघून जवळून जावी आणि पुढ गेल्यावर मग मुद्दाम तिनेही माघे वळून पहाव,

बरोबरच्या मित्रांनी मग पलटली बे म्हणून एकच कल्ला करावा आणि चाय सिगरेट तो बनती है बॉस म्हणून अंगाला झोंबाव,

अशेच काही दिवस गेल्यावर मित्रांनीच मग तिला बोल रे म्हणून रेटा लावावा,

तू नाही तर मी बोलतो म्हणून त्यांच्यातच मग चढाओढ लागावी,

तिच्यासाठी मी छान दिसावं म्हणून मी काधीनाही ते fair & lovely वापरायला चालू कराव, मित्रांनीहि मग ह्म्म्म… म्हणून टर उडवावी,

एक दिवस तिनेही मुद्दाम कमी गर्दीच्या ठिकाणी उभा रहाव आणि मित्रांनी मला फट्टू जा ना बोल म्हणून तिच्याकडे ढकलून काढता पाय घ्यावा,

तिनेही परीच्या अंदाजातच मग style मारावी,

तिच्याशी पहिला शब्द काय बोलावा म्हणून मीही विचारातच नकळत तिच्यासमोर जाव,

तू मला आवडतेस म्हणून मी सांगाव आणि तिनेही मला चांगलेच lecture द्याव,

आपण इथे शिकायला आलोय असले काम करायला नाही म्हणून नाक उडवत निघून जाव,

मित्रांच्या सांगण्यामुळ आपण तोंडावर पडलो म्हणून त्यांना पकडू पकडू फटके द्यावेत,

त्या रात्री मग एक पॉकेट सिगरेट घेऊन ओढताना डोळ्यात धूर जाऊन पाणी आल्यासही मित्रांनी रडू नको रे म्हणून आणखीनच खेचावी आणि तू नाही तो दुसरी सही अस बोंबलून उगीचच सांत्वन कराव,

दुसर्यादिवशी तिच्या मैत्रिणीनी माझ्याकडे बघून मुद्दाम जोरजोरात हसावं,

तीही या वेळेस न पलटताच पुढे जावी, माझ्या जीवाला आणखी आग लागावी,

एखादा आठवडा मज्जा बघून पुढे मुद्दाम सगळ्या नोटस माझ्याकडेच आहेत असा बहाणा करून तू एकटा गाठून मला नोटस मागाव्यात,

मग मीही उद्या देतो म्हणून निघून जाव,

तुला द्यायच्या नोटस मध्ये शेवटच्या पेज वर मुद्दाम काय लिहाव याचा दोन-तीन तास विचार करून एखाद sad song पूर्ण लिहून काढावं तू वाचण्यासाठीच फक्त,

तुही फक्त शेवटचंच पेज वाचून झालं म्हणून नोटस return कराव्यात,

दिलेल्या नोटस मध्ये तू काही लिहून दिलंस काय ते पाहण्यासाठी त्या नोटस मी दहादा उलटून पालटून पहाव्यात, काहीच लिहील नाही म्हणून खट्टू व्हावं पण तू मागितल्यास हे काय कमी झालं म्हणून खुश पण व्हावं,

पुढ नोटस चा सिलसिला continue राहावा, त्या बहाण्यान आपण कॅन्टीन मध्ये एकदा भेटावं, आपल्या मित्र मैत्रिणींनीही मुद्दत आजूबाजूच्या टेबलवर गर्दी करावी आणि मोठ्यानाच कश्याला disturb म्हणून तिथंच बसून राहावं, आपलं बिल देताना मी देतो… मी देते… म्हणून तिथंच चालू व्हाव, कॅन्टीन वाल्याच्या तोंडाकडे बघितल्यावर मात्र मग मी गुपचूप बिल देताना मित्रांनी मागून आमचं पण दिलं तरी चालेल म्हणून आरोळी ठोकावी,

आता दोघानाही कॉलेज बंक करू वाटू नये, कॉलेजला येउन उगीचच बाहेर घुटमळाव,

पहिल्या पावसात फिरायची दोघानाही ओढ असावी, पहिल्या पावसात मी तुला चल फिरायला जाऊ म्हणावं, तुही उगीचच आढेवेढे तयार व्हावं, मीही एखाद्या मित्राची bike मागून घ्यावी, त्यानेही आल्यावर पार्टी दे म्हणून मोठ्ठा उपकार केल्यासारखं मुद्रा करून चावी हातात द्यावी, कुठतरी दूर जाऊन आम्ही चिंब भिजून मग चार दिवस तुझ्यामुळ सर्दीचा त्रास झाला म्हणून भांडाव,

दोघांनीही प्रत्येकच गोष्ट मग शेयर करावी,अगदी प्रत्येक…

रुसन फुगण काढव मी तीच आणि तिने माझ,

आता कॅन्टीन मध्ये चहाच्या बिलासाठी एकमेकांकडे बोट दाखवावीत, पुढ मग असेच भरपूर दिवस जावेत,

कॉलेज च्या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सेमेस्टरच्या शेवटच्या महिन्यात दोघांनी आपल्या favorite डोंगरावर जावं, पहिल्यांदाच मी तुझा आणि तू माझा हात हातात घेऊन काहीच न बोलता शांत बसून रहव… तू आधी बोलणार का मी याची वाट बघत…दोघांच्या चेहऱ्यावरची उदासी स्पष्टपणे दिसून यावी, पुढ काय करायचं??? दोघांचाही एकदाच प्रश्न यावा… मी तुझ्या आणि तू माझ्या उत्तराची वाट पहात आणखी काही क्षण शांतता असावी, थोड्यावेळाने काहीच न बोलता दोघांनीही घरची वाट धरावी,

चार दिवसांनी पुन्हा त्याच डोंगरावर तीच स्थिती असावी, न राहावून मीच सुरवात करावी काहीतरी बोल यार, तुझा अबोला सोड न आतातरी, मग दोघांच्याही डोळ्यात नकळतच पाणी यावं माझं तुला दिसू नये तुझं मला दिसू नये म्हणून चेहरा फिरूउन किती छान हवा आहे न म्हणून दोघांनीही विषय बदलावा, sendoff च्या आधीच्या दिवशी मात्र पहिल्यांदाच एकमेकांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडून घ्यावं, पण मनात तोच प्रश्न, पुढ काय???

पुढचं आपल्या हातात काहीच नाही हे माहित असूनही आपल्यात इतकी भावनिक जवळीक का व्हावी???

mobile च संपलेलं recharge,

आलेले messages लपवताना झालेली तारांबळ,

पेट्रोल संपल म्हणून मागितलेले पैसे,

डब्बा बनवताना/खाताना झालेली गम्मत, असले प्रकार सासरी खाऊ घातल्यास अमुक तमुक होईल म्हणून माझ चिडवण, मी माझ पाहून घेईल तुला काय करायचं म्हणून तुझं लटकच रागात येन,

छोट्या/मोठ्या भाऊ बहिणीची तक्रार, वाढदिवसाला गिफ्ट काय पाहिजे/द्यायचं यावर मंथन, गिफ्ट साठी जुगाड केलेले, दिलेला पाहिलं गिफ्ट ज्याला कुणालाही अजून हात लाऊ दिला नाही,

कॉलेज मधल्या शिक्षकांना ठेवलेली टोपन नावे,

त्याचं तिच्यावर आहे यावर झालेली बेट,

मित्र मैत्रिणीच्या गमती,

पाहिलेल्या picture च यथासांग वर्णन,

सुट्यांमध्ये केलेली धमाल आणि तुझी आठवण आली होती अस एकमेकांना म्हणन,

सिगरेट जास्त ओढत जा न मग खोकला राहील, तुझी भणभण engineering सोडून डॉक्टर हो न मग माझा उलटा सल्ला,

साध्यासुध्या कारणाने झालेली आपल्यातली कुरबुर, कोण आधी सॉरी म्हणतंय याची वाट बघणं, पण मनामध्ये स्वतः जाऊन बोलाव ही तीव्र इच्छा,

उगीचच एखादी मुलगी दिसल्यावर काय item आहे यार म्हणून तुला चिडवण आणि आरश्यात तोंड बघितलास का कधी म्हणून तुझ jealous कम रागातल उत्तर,

एखादा ठरलेला प्लान फिस्कटन, प्लान नसताना अचानक ठरण,

हसल्यावर छान दिसत ते भयंकर दिसत इथपर्यंत चा प्रवास,

तिला/त्याला बोलत जाऊ नकोस सांगण,

exam संपेपर्यंत फोन messages एकदम बंद म्हणन आणि त्याच दिवशी संध्याकाळीनोटस साठी हटकून फोन लावण ………….

या आणि अशा कित्येक गोष्टी का शेयर केल्या??? असा प्रश्न पडावा…

आपल्या नात्याला destination नसताना का आपण एक झालो??? असा प्रश्न पडावा…

खरंच तू...माझी...एक fantasy होती यार……….

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आव‌ड‌लं ! इक‌डे लिहित र‌हा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, नक्कीच आवडेल मलाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

मित्रांनी ती आली कि माझ नाव मोठ्याने घेऊन ओरडाव, मीही लाजून लाल होऊन त्यांना गप्प बसा बे म्हणून request करावी

"मीही लाजून लाल होऊन " ?
Biggrin .. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदैव शोधात..

ती एक (मला) शब्दात न सांगता येण्याजोगी स्थिती है, नेमका शब्द सुचेना म्हणून जवळ जाणारा शब्द तोच घावला अन् लिवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

मुलं होत नाहीत का लाजून लाल ? Wink
- (कोणाला लाजवायचा अनुभव न आलेली) शुचि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

बरय!
(खुन्नस बाकी काही नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण नै ब्वा खुन्नसबिन्नस धरत. बरं ते जाऊद्या बाबा, व्यनी पाहिला का तुम्ही तुमचा, चार दिस आधी धाडलाय, अजून प्रतिक्रिया नै आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

आव‌ड‌ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलंय, आवडलं. आखिर तक पढते पढते मेरा दिल बैठता हुआ महसुस हुआ।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद शुची तै आणि सचिन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

वा वा म‌स्त लिहिलं आहे. एक‌द‌म स‌मृद्ध कॉलेज लाइफ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>पुर्वलक्षीप्रभावानं (prejudice) जे लेखन येतं त्यावर लिहीणार्‍याला बर्‍यापैकी ऊत्तरे देणं भाग पडतं.<<

पूर्व‌ल‌क्ष्यी प्र‌भाव‌ = Retrospective Effect. prejudice ह्या अर्थाने त्याचा वाप‌र‌ केला जात अस‌ल्याची म‌ला क‌ल्प‌ना नाही. त‌रीही, वाक्याचा अर्थ‌ क‌ळ‌ला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी prejudice हा शब्द इथे पूर्वग्रह (आधीच्या काही आठवणी) या अर्थाने वापरलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

prejudice = पूर्वग्रह हे ब‌रोब‌र‌ आहे, प‌ण "पूर्व‌ल‌क्ष्यी प्र‌भाव‌" म्ह‌ण‌जे रेट्रोस्पेक्टिव्ह‌ इफेक्ट‌ असं त्यांना म्ह‌णाय‌च‌ं आहे. पूर्व‌ल‌क्ष्यी प्र‌भावाच‌ं फ्याम‌स‌ उदाह‌र‌ण म्ह‌ण‌जे काय‌दे पूर्व‌ल‌क्ष्यी प्र‌भावाने ब‌द‌ल‌णे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आदूबाळ म्हणतात ते बरोबर आहे.

>>मी prejudice हा शब्द इथे पूर्वग्रह (आधीच्या काही आठवणी) या अर्थाने वापरलाय.<<

Sorry for being a pedant, पण 'पूर्वग्रह' म्हणजे 'आधीच्या काही आठवणी' (पूर्वस्मृती) नव्हेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पूर्व‌ग्र‌ह या श‌ब्दाची अर्थ‌च्छ‌टा त‌शी अस‌ली त‌री "पूर्वीच्या आठ‌व‌णी" अस‌ल्याशिवाय‌ पूर्व‌ग्र‌ह त‌यार होत‌ नाहीच, स‌ब‌ब अंम‌ळ ताण‌ल्यास तेही चालून जावे. फ‌क्त क‌रंट यूसेज नाय एव‌ढेच काय‌ ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"पुर्वलक्षीप्रभावानं (prejudice) जे लेखन येतं त्यावर लिहीणार्‍याला बर्‍यापैकी ऊत्तरे देणं भाग पडतं." ह्या वाक्याचा अर्थ‌ काय‌ ते प्र‌माण म‌राठीत कुणी सांगेल‌ का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अहो चिंजं, ती "mystake" आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुतै, Mystake (mystake च्या spelling मध्येच चूक म्हणजे चुकीची तिव्रताच जाणवून देण्यासाठी आहे) अन् tongue of sleep हे माझे copyrighted शब्द आहेत. (सैराट संचार निगम लिमीटेड, दै. आनंदीआनंद, दै. सर्वानंद, दै. परमानंद अन् बरेच आहेत जे की अतिशयोक्ती अलंकारासाठी मी वापरतो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

खालचं वाचलं नै वाटत. एखादी (प्रेम/आठवण) कविता जरी एखाद्याने लिहली की लगेच त्याला ऊत्तर द्यावं लागतं कोण, कुणावर, काय हे, कधीपासून, छुपा रुस्तम ई.ई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

>>एखादी (प्रेम/आठवण) कविता जरी एखाद्याने लिहली की लगेच त्याला ऊत्तर द्यावं लागतं कोण, कुणावर, काय हे, कधीपासून, छुपा रुस्तम ई.ई.<<

थोड‌क्यात‌, तुम्हाला 'आधीच्या काही आठवणी'च‌ म्ह‌णाय‌च‌ं आहे. पूर्व‌ग्र‌ह‌, पूर्व‌ल्क्ष्यी प्र‌भाव‌, prejudice व‌गैरे श‌ब्द‌ त्याऐव‌जी (चुकीच्या अर्थानं) वाप‌र‌ल्यामुळे स‌म‌जुतीचा गोंध‌ळ झाला. एक फुक‌ट‌चा स‌ल्ला : संस्कृत‌व‌र अव‌लंबून अस‌णारे (त‌द्भ‌व‌ / त‌त्स‌म‌ व‌गैरे) श‌ब्द‌ टाळ‌लेत, त‌र‌ ब‌र‌ं होईल. अर्थ‌ नीट‌ स‌म‌जण्यासाठी म‌द‌त‌ होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कायद्याचं ठीक आहे, पण मग read without prejudice किंवा listen without prejudice (जॉर्ज मायकल चं पुस्तक आणि अल्बम) हे कायद्याच्या बाबतीत नाहीये, मी फक्त context बदलला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

पूर्व‌ग्र‌हाविना?

'पूर्व‌ल‌क्ष्यी' म‌ध्ये कोण‌तेत‌री 'ल‌क्ष्य‌' अस‌णं अभिप्रेत‌ अस‌त‌ं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पुर्वलक्षीप्रभावानं (prejudice) जे लेखन येतं त्यावर लिहीणार्‍याला बर्‍यापैकी ऊत्तरे देणं भाग पडतं.

म्हणून तर हे लिहून सारवासारव केलीय. तसहि prejudice ला baised पण म्हणता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

टुच्चेश, मुद्दा इत‌काच आहे की पुर्वलक्षीप्रभाव म्ह‌ण‌जे prejudice नाही. अर्थ ज‌व‌ळ‌पास प‌ण सार‌खा नाही. त्यामुळे उगाच का ताणुन ध‌र‌ता आहात्. तुम‌च्या लेखात‌ला पुर्वलक्षीप्रभाव हा श‌ब्द ब‌द‌लुन पूर्व‌ग्र‌ह ज‌रा म्ह‌ण‌जे झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मी ताणत नव्हतो, माझ्या शंका दूर करायलो होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं