ये, दिक्कालबंध तोडून ये,

ये,
दिक्कालबंध तोडून ये,
आजच्या कविते
ओसंडत, फुफा॑डत, अनावर ये
भारून टाक अवघ्या अस्तित्वाचे अवकाश
कडाड कोसळ या अस्थिमज्जेच्या पिंजऱ्यावर
एक एक अणू व्यापून टाक जाणिवेचा-तुझे देणे चुकेपर्यंत
घे आधार तोकड्या अक्षरा॑चा - या कागदावर उमटण्याआधी

दे
उसंत
फक्त
कालच्या
कवितेच्या
कलेवरावर
कफन घालण्याची !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ओके देन...
और एक मेरी ओर से. झेलो (नविन धाग्यावर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

...आव‌ड‌ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क‌विता काय, स‌र्व‌च‌ क्षेत्रांत‌ एक‌च‌ व‌च‌न‌ लागू होते,
ते म्ह‌ण‌जे,
एक‌च‌ अनंत‌....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशाच आशयाची आहे. वरची कविता वाचली की ही कविता हटकून आठवली. शिर्षक आहे मौन.

शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

दोन्ही कविता आवडल्या। तसेच श्री अस्वल ह्यांचा प्रतिसाद पण भावला। एकूण काय, तर लिहीत राहणे महत्वाचे।

अवांतर: मूळ विषय सोडून, काही मान्यवर सदस्यांनी आपापसातच केलेली शेरेबाजी, ऐसीच्या प्रतिषठेला बाधा आणते असे वाटले।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

क‌वितेची आकृती वेग‌ळीच‌ आहे.

एक‌ सुच‌व‌णी अशी, की ओळ‌ क्र‌मांक २ व‌ ३ यांच्या क्र‌मात‌ आद‌लाब‌द‌ल‌ केला त‌र‌ वाढ‌त्या मात्रांचा पॅट‌र्न‌ ल‌व‌क‌र‌ स्थापित‌ होईल‌, आणि त्यामुळे अपेक्षित‌ ल‌य‌ही साधेल‌.

ये,
आजच्या कविते
दिक्कालबंध तोडून ये,
ओसंडत, फुफांडत, अनावर ये
...

दुस‌ऱ्या क‌ड‌व्याची आकृती आधी म‌ला प‌ट‌ली न‌व्ह‌ती, प‌ण‌ न‌ंत‌र‌ पुन्हा वाच‌ता प‌ट‌ली.
"दे" सुरुवात‌ ठीक‌च‌, प‌ण‌ म‌ग‌ लव‌क‌र‌ प‌हिल्या दोन‌ ओळींत‌च‌ "क‌" अनुप्रास‌ साध‌ता आला नाही, याचे श‌ल्य‌ क‌दाचित‌ क‌वीलाही वाट‌त‌ असेल‌.

--
"दिक्काल‌ब‌ंध‌" श‌ब्द‌ आणि क‌ल्प‌ना म‌ला या स‌ंद‌र्भात‌ प‌ट‌लेली नाही, हे प्रांज‌ळ‌प‌णे क‌बूल‌ क‌र‌तो. प‌हिल्या क‌ड‌व्यात‌ "आज‌ची" आणि दुस‌ऱ्या क‌ड‌व्यात‌ "काल‌ची" यांची येथे ट‌क्क‌र‌ आहे. "आज‌"चा दिव‌स‌ त‌र‌ येथेच‌ आहे. आज‌च्या क‌वितेला कुठ‌ल्या दिक् चे ब‌ंध‌न‌ तोडाय‌चे आहे, आणि कुठ‌ल्या काळाचे? फार‌त‌र‌ तुम्ही प‌हिल्या क‌ड‌व्यात‌ उद्याच्या क‌वितेला त्व‌रा क‌रून‌ आज‌च‌ ये, असे बोलाव‌ले अस‌ते, त‌र‌ (दिक्)काल‌ब‌ंध‌ तोडणे अर्थ‌पूर्ण‌ ठ‌र‌ले अस‌ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म‌ला वाट‌तं, त्यांची अशी क‌ल्प‌ना आहे की आज‌ची क‌विता कुठेत‌री अज्ञात जागी आहे, आणि तिथून तिने दिक्कालांचं बंध‌न तोडून यावं. त‌र त्या जागेतून येण्यात दिशेचं, आणि 'आज‌च' येण्यात कालाचं, अशी बंध‌नं तिने तोडावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

त‌से काही स‌ंद‌र्भ‌ लाव‌ता येतील‌ ख‌रे. प‌ण‌ म‌ला सुरुवातीला एव‌ढे स‌ग‌ळे अध्याहृत‌ ठेवणे आणि त्या अध्याहृताचा पुढे क‌वितेत‌ काही स‌ंद‌र्भ‌ही नाही, हे त‌ंत्र‌ प‌ट‌ले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-दिक्काल‌ हा श‌ब्द दिशा + काल‌ अशा अर्थाने नाही त‌र तो स्थ‌ल‌ + काल‌ या अर्थाने वाप‌र‌लाय‌. आजची क‌विता ही केव‌ळ‌ अत्र‌ / अधुना ( here & now) च्या ब‌न्ध‌नात का अड‌कून प‌डावी? आज‌च्या इथ‌ल्या व‌र्त‌मानात‌ गुन्तून न‌ प‌ड‌ता तिने सुदूर भ‌विष्यात‌ल्या व दूर‌स्थ स्थ‌ळातील (उदा.प‌र‌ग्र‌हाव‌र‌च्या) मान‌वाचे जीव‌न‌ -आजच का क‌वेत‌ घेऊ न‌ये? अशा अर्थाने दिक्काल‌ब‌न्ध‌ तोडण्याचे आवाह‌न आज‌च्या क‌वितेला केल‌य.
दुस‌ऱ्या, अथ‌वा कोण‌त्याच क‌ड‌व्यात अनुप्रास अथ‌वा कोण‌ताही काव्याल‌न्कार वाप‌र‌ण्याचा माझा प्र‌यत्न / अट्टाहास न‌व्ह‌ता, त्यामुळे त्याच्या अभावाचे श‌ल्य‌ नाही.
-आप‌ल्या प्र‌तिसादाब‌द्द‌ल ध‌न्य‌वाद‌!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने