स्मृतिगंध-एक ह्रदयस्पर्शी प्रेमकथा

का गं अशी अचानक सोडून गेलीस मला?..असं मध्येच मला एकट्याला सोडून जाण्यासाठी का आपण एकत्र आलो होतो?..आज आठवतंय सगळं अगदी पहील्यांदा तुला कॉलेजमध्ये पाहून माझं मन तुझ्यावर 'लट्टू' झालतं त्या क्षणापासून ते आजवर घडलं आणि घडवलं गेलेलं जसंच्या तसं आणि माझ्याही नकळत माझ्या डोळ्यांतून आसवं वाहू लागतात..कसा गं आवर घालू या भावनांच्या कल्लोळाला?..कुठं गं शोधू सखे तुला?..तुझ्या आठवणींत रमणं हा तर आता एक छंदच होवून बसलाय...

Engineering च्या पाचव्या semester ला होतो मी आणि तू तिसर्या तेव्हा thermodynamics वरील paper प्रेझेंटेशन देताना तुला सर्वप्रथम पाहीलं होतं..ज्या विषयावर आमची बत्ती गुल व्हायची त्या विषयावरील तुझा सहज मुक्त असा वावर बघून जितका तुझा हेवा वाटला नसेल त्याहून हजार पटीनं जास्त तुझं मनाला भुरळ घालणारं सौंदर्य बघून आनंद झालता..काहीतरी सुचक असं ते पुढील काळाचं प्रतीक होतं..काहीतरी जिवनात सापडल्याची ती खुण होती..तोपर्यंत फक्त ऐकून होतो, 'Love at First Sight' काय असतं ते..पण तुझा मुक्त वावर पाहीला आणि माझं ह्रदय तुलाच देऊन बसलो..पहील्या नजरेतलं प्रेम अनुभवलं आणि मग तुझ्यासाठी झुरणं सुरू झालं..त्यावेळेस जगाला नसली जाणिव तरी मला नक्की होती की 'तुझ्या रुपानं असलेला हा अनमोल हिरा माझ्याच कोंदणात बसविण्यासाठी आहे.' असं वाटू लागलं, ' जसं देवानं तुला फक्त माझ्याचसाठी बनवलेलं आहे' आणि मग तुलाच मिळविण्याचा खटाटोप सुरू झाला पण इतकं का सहज होतं ते?..तुझ्यात अन् माझ्यात जमिन-आस्मानाचा फरक होता..पुन्हा तुझ्यावर नजरा लावून बसलेले खुप सारे होते..तुझं अंतरंग नव्हतं गं माहीत तेव्हा..खरंतर कुठल्याही मुलीच्या अंतरंगात काय चाललंय हे ओळखणं सोप्पं नसतं..त्यामुळं मी एकही चुक न करता तुला तुझ्याच मनानं माझ्या जिवनात कायमचं आणण्यासाठी अगदी सावकाश- संथगतीनं आणि सावध पावलं टाकून तुझा विश्वास जिंकण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करण्याचं ठरवलं.
मी एकएक पाऊल टाकलं आणि तुझ्या विश्वासाला पात्र ठरत गेलो..आजही किती लख्खपणे आठवतं तुझं मला होकार देणं.. अनेकांना कात्रजचा घाट दाखवून वाटाण्याच्या अक्षता लावणारी तू, नक्की माझ्या प्रेमात कशी पडलीस गं..माझी कुठली गोष्ट तुला भावली हे मला कधीच कळालं नाही..तुला असं काही विचारल्यावर तु उत्स्फूर्तपणे बोलायचीस, 'मला तुझ्या साधेपणातलं सौंदर्य आणि तुझ्या ठायी असलेला प्रामाणिकपणा भावला'. मलाही हे बोलणं पटायचं मात्र याशिवायही अजून काही होतं जे मला आजवर कधी उमगलं नाही आणि तुलाही तू माझ्याजवळ होती तोपर्यंत कधी ते उमगलं नसावं..

चोरी छुपाये सुरू झालेला आपल्या प्रेमाचा प्रवास नवनवीन वळणं घेऊ लागला..आपण दोघं मनानं जवळ येत गेलो..खुप जवळ आलो मात्र आपण आपल्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाही. त्या न ओलांडण्याईतकं नितीधैर्य आणि संयम आपल्या दोघांच्या ठायी होता..मला वाटतं हे जन्मजात लाभलेलं असावं ज्यामुळं आजच्या ह्या उच्छृंखल जगातही आपल्या दोघांच्या मनाला वासना कधीच स्पर्श करू शकल्या नाहीत..आपल्या दोघांच्यामध्ये जे काही होतं ते शुद्ध प्रेम होतं. अतिशय परिपक्वपणे रूजलेलं हे प्रेमाचं रोपटं सर्वांगानं पुढे बहरणार होतं..पुढं झालंही तसंच! तुझं कॉलेज संपेपर्यंत आपल्यातलं नातं खुपच गहिरं होत गेलं.. एकदूजे केलिए बनलेले आपण नंतर मात्र एका निर्णायक टप्प्यावरती काहीसे जरावेळ गोंधळलो, भांबावलो. प्रेमाच्या ह्या सुंदर मार्गावरती बागडताना आपण समाजरचनेचा कधी विचारही केला नव्हता..किंवा बदलू पहात असलेल्या समाजरचनेमुळं आपण सगळं काही गृहीत धरलं असावं म्हणून जेव्हा आपल्या घरच्यांकडून दोन्ही बाजूच्या जातींचा मुद्दा आपल्यासमोर आक्रमक रितीनं मांडला गेला तेव्हाच आपल्याला समोर काय वाढून ठेवलं होतं त्याची थोडीफार कल्पना येऊन आपण अंतर्मुख झालो होतो..सह्याद्रीच्या कुशीत आपल्या एकांतप्रिय ठिकाणी बसून दोघं विचार करत असताना तु खुपच हळवी होऊन पहील्यांदाच माझ्या मिठीत शिरून धाय मोकलून रडली होतीस..त्यावेळी तुझ्या व्याकुळलेल्या डोळ्यांत बघताना मी घर की प्रेम याचा निर्णायक असा निर्णय घेऊन टाकला..तो भावनेच्या भरात घेतलेला तकलादू निर्णय कधीच नव्हता तर त्याला परिपक्व आणि परिपूर्ण अशा खोलवर केलेल्या विचारांची जोड होती आणि म्हणूनच त्यावेळेस दोघांनी एकमेकांशी घेतलेले कसमेंवादे जेव्हा प्रत्यक्षात निभावण्याची वेळ आली तेव्हा आपण डगमगलो नाही. पुढं आपण जातीची बंधनं झुगारून आणि सकल समाजाची धारणा करणार्या,universal religion अर्थात् मानवता ह्या दृष्टिकोणाने पछाडलेलो दोघं घरच्यांचा विरोध सौम्य करून प्रेमविवाह करते झालो तेव्हा आपण स्वत:चं एक नविन जग बनविण्याचं स्वप्नं पाहीलं होतं.

किती उमेदीनं लग्नं करून तुला मी ह्या घरात लक्ष्मीच्या पावलानं आणलं होतं. परक्या जातीतली मुलगी आपल्या घराच्या परंपरा सांभाळेल का, अशा नाना तर्हेच्या शंकांना तु तुझ्या शालीन आणि कुलीन अशा वागण्यानं न बोलता उत्तरं देऊन अगदी सहजपणे सगळ्यांना आपलंसं केलंस. माझ्या कुटूंबात तुझं एकरूप होणं हे तुझ्या ठायी असलेल्या संस्कारांचं प्रतीक होतं. लग्नानंतर तुझं एकेक नवं रुप मी नव्यानं पहात गेलो. एका घरंदाज स्रीजवळ असणारे सारे सारे गुण तुझ्या ठिकाणी मुळत:च वसलेले होते. कोमल ह्रदयाची तू, दुसर्यांचं दु:ख पाहून व्यथित होणारी तू.., अशा तुला जेव्हा मी corporate field मध्ये माझ्या बरोबरीनं वावरताना आणि एकेक धाडसी व्यावसायिक निर्णय घेताना पहायचो तेव्हा, 'आपली निवड किती सार्थ होती' याचा मला अभिमान वाटायचा..कुठलाही निर्णय घेण्याची आणि तो पुर्णत्वाला नेण्याची तुझी क्षमता ही विलक्षण वादातीत होती..माझ्याही पेक्षा खोलवर विचार करणारी तू..तूझा विचारांचा पल्ला खूप दुरचा होता..
जेव्हा मी तुला माझ्या मनीचं 'ते' गुज सांगितलं तेव्हा माझं करीअर वगैरे काहीही कारण पुढं न करता आनंदानं तू मातृत्वाला तयार झालीस आणि मग एक पत्नी म्हणून तुझा मला किती गर्व वाटला. एका सुंदर अशा चिमुकलीची जगातील सगळ्यात अनमोल अशी भेट तू मला दिलीस आणि मी धन्य झालो..त्या दिवशी माझ्या डोळ्यांतून वाहणार्या आनंदासवांना मी मनमोकळेपणानं अबोल वाहू दिलं..त्या चिमुकलीचे पापे घेताना मी कितीतरी वेळ हरवून गेलो होतो..जितका तुझ्यात रंगलो नसेल त्याहून जास्त मला भविष्यकाळात रंगवणारी आता माझ्या जिवनात अवतरली होती ती फक्त तुझ्याचमुळं..मला बाप बनवण्याचं सुख तू दिलंस..तुझी माझ्याजवळ असलेली सगळ्यात सुंदर आठवण म्हणजे आपली दोघांची चिमुकली ईशू..हळूहळू आपलं फुलपाखरू शरीर, मन आणि बुद्धीनं वाढत होतं..कधीकाळी तुझ्यात रममाण होणारा मी, आता तुला विसरून ईशूत रममाण होऊ लागलो आणि मग तु लटक्या रागानं माझ्याजवळ तक्रार करायला लागली की, 'तुझं माझ्यावरचं प्रेम कमी होऊ लागलंय' अशी..आणि मग कधी मला गम्मत म्हणून आम्हा दोघांना सोडून जाण्याची धमकी द्यायचीस!..तुला तसं वागताना पाहून मला खुद्कन हसू यायचं..पण त्यावेळी कल्पनासुद्धा नव्हती पुढं तसंच काहीसं घडून येईल याची..नियतीच्या मनांत काही वेगळंच योजलेलं होतं..अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्या आपल्या पिल्लाला माझ्या एकट्याजवळ सोडून तू अनंताच्या प्रवासाला निघून गेलीस..असं पुढं घडणार हे जर मला आधीच कळालं असतं तर मी तुला त्या दिवशी एकटीला जाऊच दिलं नसतं गं.. छोट्याशा प्रवासाला निघालेली तू दूरवर निघून गेलीस..पुन्हा कधीही न परतून येण्यासाठी..का गं अशी खोटं बोल्लीस माझ्याशी..एवढा का राग आला माझा..मला बाबा म्हणून हाक मारणारी आपली ईशू जेव्हा मला विचारते, 'ममा कुठं गेली?' तेव्हा मनात निर्माण होणारा भावकल्लोळ मला नाही गं आवरता येत..तुझ्यामाझ्या काळजाच्या त्या तुकड्याशी अशा वेळी खोटं बोलताना मन तिळतिळ तुटतं गं..नजर चोरून तिच्याकडं बघावं लागतं..तु गेलीस आणि आपण बघीतलेल्या सुंदर अशा अनेक स्वप्नांचा चुराडा झाला..

आपल्या ईशूत मला तुझं प्रतिबिंब दिसतं..ती आहे पण अगदी तुझ्याचसारखी गोबर्या गालांची..तिचं बघणं, बोबडं बोलण, हसणं ह्या सगळ्यांत मला तुझंच अस्तित्व जाणवतं..तु आम्हाला सोडून गेलीस, आपलं पिल्लू, त्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर टाकून गेलीस..मी तुला दोष नाही देत गं..तो मला आधिकार ही नाही..परमेश्वराला तुझी काही गरज असेल, त्याला कुठलं दुसरं जगाचं काम तुझ्यावर सोपवायचं असेल म्हणून त्यानं तुला बोलावणं धाडलं असावं..दुसरी कुठलीही गोष्ट असती तर मी परमेश्वरावरही हरकत घेतली असती..पण मला तसं करता येत नाही..तु माझ्यावर विश्वास दाखवून तुझ्या शरीराचा तुकडा माझ्या हाती सोपवलास...मला त्याला वाढवायचंय..खुप मोठ्ठं करायचंय..सर्वार्थानं अगदी परिपूर्ण बनवायचंय..आई आणि बाप अशा दुहेरी भूमिका मला पार पाडायच्या आहेत..मी नक्कीच त्या पार पाडेल..तू नकोस गं काळजी करू..आपल्या ईशूचा सांभाळ मी एकटा करेल यात तुलाही काही शंका नसेल.. पण माझं एक काम मात्र माझ्यासाठी करशील ना; 'इथल्या सगळ्या जबाबदार्या संपल्यानंतर मी ज्यावेळी कधी तुला कायमचा भेटायला म्हणून येईल त्यावेळी मला ओळखशील ना गं..की कॉलेजमध्ये तुझ्याशी पहील्यांदा बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा, एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकून मला ignore करून निघून गेली होती तसं करशील?'

―तुझाच, प्रेमवेडा ₹!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान! पण हे लई भारी-"अनेकांना कात्रजचा घाट दाखवून वाटाण्याच्या अक्षता लावणारी तू,"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

ऱ्या लिहीण्यासाठी युनिकोड म‌ध्ये र ला नुक्ता देउन, म‌ग त्याचा पाय मोडून त्याला य लावावा. ऐसीव‌र Rya.
बाकी लेख अग‌दीच सुमार. कार‌ण, आधीच शीर्ष‌कात, सेल्फब्रांडेड हृद‌य‌स्प‌र्शी वाचून फार अपेक्षा नव्ह‌तीच. एकाच वाक्यात प्र‌त्येक श‌ब्दाला काय‌त‌री विशेष‌ण लाव‌णं म्ह‌ण‌जे अग‌दीच ट्रेड‌मार्क आहे सुमार लेख‌नाचा. ब‌रं, प‌रिपक्व आणि प‌रिपूर्ण आदी श‌ब्द वाप‌र‌ताना क‌स्मेवादे आणि एकदुजेकेलिए म‌ध्येच डोकावून जातात. बाकी एक‌ंद‌र गुण‌व‌त्ता पाह‌ता ऱ्ह‌स्वदीर्घ स‌म‌झे.
हे झालं लेख‌नाब‌द्द‌ल. आता म‌सुद्याब‌द्द‌ल. ज‌व‌ळ‌पास प्र‌त्येक म‌राठी टुकार मालिका लेख‌क/लेखिकेचं स्व‌प्न असावं अशी काहीत‌री गोष्ट आहे. टिप्पीक‌ल ल‌ग्नाला जातीबितीव‌रून विरोध, म‌ग नायिकेचं घ‌री अग‌दी

परक्या जातीतली मुलगी आपल्या घराच्या परंपरा सांभाळेल का, अशा नाना तर्हेच्या शंकांना तु तुझ्या शालीन आणि कुलीन अशा वागण्यानं न बोलता उत्तरं देऊन

आणि व‌र‌च्याच लाय‌नीत‌ला

universal religion अर्थात् मानवता ह्या दृष्टिकोणाने पछाडलेलो दोघं

ह्यात‌ला विरोधाभास व‌गैरे न‌ज‌रेआड क‌रून‌ही, ही हृद‌य‌स्प‌र्शी गोष्ट, आता काय भ‌वित‌व्य‌ आहे म‌राठी लेख‌नाचं ह्या विचारामुळे हृद‌य, प्लीहा, मोठे आत‌डे इत्यादी गोष्टींना स्प‌र्श क‌रुन जाते.
स‌ग‌ळ्यात शेव‌टी, ह्या अतिअतिआद‌र्श नायिकेचा मृत्यू वाप‌रुन सिंप‌थी लाईक्स मिळ‌वाय‌चा टुकार प्र‌य‌त्न. म्ह‌ण‌जे बाकीचे ग‌ण‌ंगही द‌नाद‌न प्र‌शंसा कर‌तील‌, किंब‌हुना, टीका त‌री क‌र‌णार नाहीत असा काय‌तरी गेम टाक‌लाय. असो.
अधिक माहितीसाठी: पर्सनली घेऊ नका.

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

काय हो, तुम‌चा आय‌डी मी हॅक केलाय‌ की काय्?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम‌च्याव‌र त‌र माझा सेलेब्रिटी क्र‌श आहे.

संपाद‌न: च्यामारी, मार्मिक श्रेणी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

वरील लेख बरा आहे पण प्रतिसादामध्ये पर्सनली घेऊ नका मध्ये तीनडॉटी लेखक हा लेख फारच एकांगी वाटतोय. तुमचाच ब्लॉग आहे ना तो( संदर्भ ). काही अंशी सहमत आहे. तीनडॉटी मधनं कुणीच पुढं जात नाही असं तुमच्या ज्ञानार्जनानंतरचं/वित्तरंजनानंतरच conclusion आहे का? कि फक्त एंटरटेनमेंट पर्यंतच त्यांची झेप असते? ते पण सांगा.
तीनडॉटी लेख लिहिलेल्या ब्लॉगवर उण्यापुऱ्या तिनच पोस्ट टाकून का ठेवल्यात हो? तुम्ही तीनलेखी लेखक आहात काय? असल्यास त्यांच्या बद्दल पण सांगा. नसल्यास... म‌रूं दे तिच्याsय‌ला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

तीनडॉटी लेखक हा लेख फारच एकांगी वाटतोय

एखादा अनेकांगी लेख ज‌र वाच‌ण्यात आला असेल, खासक‌रुन ह्याच संद‌र्भात; त‌र दुवा अव‌श्य‌ ड‌क‌वावा.

ज्ञानार्जनानंतरचं/वित्तरंजनानंतरच

वित्त‌ कितीही क‌माव‌लं त‌री त्याने रंज‌न होऊ श‌क‌त नाही अशी टिपीक‌ल शिक‌व‌णी ल‌हानप‌णापासून मिळ‌णाऱ्या म‌म‌व व‌र्गाचा मी प्र‌तिनिधी आहे. त्यामुळे आरोप अमान्य‌. बाकी हो, तेच माझं अनुमान आहे.

कि फक्त एंटरटेनमेंट पर्यंतच त्यांची झेप असते?

ते लोक ध‌ड एंट‌रटेन‌ही क‌रु श‌क‌त नाहीत, फ‌क्त भाषेचे ट‌व‌के उड‌व‌तात हे माझं म‌त आहे. त्यामुळे ह्याव‌र फार उत्त‌र नाही.

तीनडॉटी मधनं कुणीच पुढं जात नाही

असं थोडीच्चे? पुलंनी त्यांच्या विनोदी साहित्यातून डोकं काढून व्यआणिव, ग‌ण‌गोत इत्यादी लिहीलं. नंत‌र मु. शांतिनिकेत‌न आणि पुर‌चुंडीचं काय झालं? {उप‌रोध} आपल्या जॉन्रम‌धून बाहेर प‌डाय‌चं की नाही हे ज्याचं त्याने ठ‌र‌वावं. {/उप‌रोध} क्वालिटेटिव्ह‌ली विचार‌त असाल, त‌र माझं उत्त‌र नाही असं आहे. भ‌रपूर, अफाट वाच‌न केल्याशिवाय कोणीही तीनड्वाटी म‌धून बाहेर प‌डू श‌क‌त नाही.

तुम्ही तीनलेखी लेखक आहात काय?

अग‌दी! वेळ मिळ‌त न‌स‌ल्याकार‌णाने लेख‌न होत नाही. मराठी ब्लॉग्जपैकी ९०% असेच आहेत. एक‌मेव कारण म्ह‌ण‌जे, म‌राठीत, विचारांच्या ग‌तीने टंक‌ता येत नाही. ऐसीव‌रचं म‌राठी टंक‌न ब‌रंच चांग‌ल‌ं अस‌लं त‌री वेळ‌खाऊ आहेच. तो ब्लॉग ब‌ंद क‌रून इथेच फुल्ल्टाईम नोक‌री देता का असं मॉंडळाला विचार‌णार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

वित्त‌ कितीही क‌माव‌लं त‌री त्याने रंज‌न होऊ श‌क‌त नाही

तिथं वित्तार्जन लिहायच होतं. मिस्टेक. तुम्ही म्हणता तसं म‌राठीत, विचारांच्या ग‌तीने टंक‌ता येत नाही

फ‌क्त भाषेचे ट‌व‌के उड‌व‌तात

वरुन मीच विनोदी का. लई हासलो टवक्याला. मराठी भाषाही मग म्हणत असेल, टवका टवका मै गीरु...

मराठी ब्लॉग्जपैकी ९०% असेच आहेत

एकदम खरं. मी हेज्यावर खूप आधीच परीक्षण लिहील, पण अर्धच असल्यामुळं draft मध्ये पडूनय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

वनफॉरटॅन,आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद!
प्रत्येकजण जन्मत: च प्रतिभा घेऊन येत नसतो.. आपण बोलता तसं सुमार लिहीलेलं असेलही परंतू एक (सुमार) नवलेखक म्हणून आपण मार्गदर्शन पर काहीतरी सांगावं, सुचवावं ज्याने करून आमच्यासारखे नवे लिहीणारे आपल्यात असलेनसलेली प्रतिभा रूजवून, तिचं संवर्धन घडवून आणू शकतील.
बाकी आपला ब्लॉग मी पाहीला.. आपण नविन लेखन करणाऱ्यांना मार्गदर्शनपर काही लिहावं अशी आशा बाळगतो..
पुनः एकदा धन्यवाद.. लोभ असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

₹!हुल

बाकी मीही न आव‌ड‌लेल्या धाग्यांक‌डे दुर्ल‌क्ष क‌र‌तो. प‌ण ह्या धाग्यात म‌ला आज‌काल‌च्या लेख‌कांत‌ला एक स‌मान दुवा आढ‌ळ‌ला म्ह‌णून दिली प्र‌तिक्रिया. मार्ग‌द‌र्श‌न एखाद्या नाम‌व‌ंत(!) लेख‌काने क‌रावं, पुस्त‌की किड्याने न‌व्हे हे माझं म‌त आहे. एक वाच‌क ह्या दृष्टीने ख‌ट‌क‌णाऱ्या गोष्टी त‌री किमान टाळ‌ता आल्या, त‌र चांग‌ल‌ं लेख‌न वाचाय‌ला मिळेल, ह्या अपेक्षेने ती प्र‌तिक्रिया होती.
एक साधं सांगाय‌चं झालं त‌र अग‌दी सिद्ध‌ह‌स्त लेख‌क व्हाय‌च्या उर्मीने लिहू न‌का, फ‌क्त आणि फ‌क्त तुम्हाला वाट‌तंय म्ह‌णून लिहा. म‌ग ते क‌संही असो. तुम‌च्या लेख/क‌थेत‌ली स‌ग‌ळीच पात्रं अग‌दी आद‌र्श अस‌ली पाहिजेत असं काही नाही. शिवाय, भाषाही अल‌ंकारिक न‌सली त‌रीही उत्त‌म‌च. म‌ग एकाच वाक्यात‌ली विशेषण द्विरुक्ती, ज‌शी-

सावकाश- संथगतीनं आणि सावध पावलं

किंवा

कात्रजचा घाट दाखवून वाटाण्याच्या अक्षता लावणारी तू

दोन्ही म्ह‌णींच्या भावार्थात ज‌ब‌री फ‌र‌क आहे. ब‌रेच श‌ब्द अर्थ माहित न‌स‌ताना वाप‌र‌ले गेले आहेत ते, हे टाळ‌ता येईल‌. असो. फार प्र‌व‌च‌न झोड‌त नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

धन्स..
या म्हणी वापरताना मी माझ्या परीने योग्य विचार केलेला. असो.
मला माहीतीय जास्तच आदर्शवादी लेखन झालंय पण मी लिहीताना जास्त भावनाप्रधान लिहीण्याचा प्रयत्न केला.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

₹!हुल

@ वनफॉरटॅन, आपण केलेलं मार्गदर्शन आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ राहुल, आपली संयत विनवणी आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@स‌चिन, आप‌ल्याला दोन्ही बाजु आव‌ड‌ल्या हे म‌ला आव‌ड‌ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ अनु राव, धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला काही त‌री आव‌ड‌लं हे म‌ला आव‌ड‌ल‌ं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सचिनजी धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

₹!हुल

ppkya, टूच्चेश प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

₹!हुल

प्रेमवेडा

हा श‌ब्द वाचून हे गाणं आठ‌व‌लं. - न‌को भ‌व्य‌ वाडा न‌को गाडी घोडा ... अनाडी असे मी तुझा प्रेम‌वेडा
.
कै बाळासाहेबांचे ब‌ंधू श्रीकांत‌ ठाक‌रे (राज ठाक‌रेंचे पिताश्री) यांनी याचं स‌ंगीत दिलेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"वीणा"चा पुरुष अवतार?

की मलाच तसं वाटतंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्र‌टूल्याची ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो हो. फक्त प्रटुल्याचीच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बरसिंग, धन्यवाद!
@गवी, काही साम्य असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा.. हा माझा आयडी अगदी खर्राखुर्रा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

₹!हुल