आर्य हे दक्षिण भारतीय होते

(आपल्या स्वार्थासाठी नव्याने इतिहास लिहिणाऱ्या आजच्या महान इतिहासकारांपासून प्रेरणा घेऊन लिहिलेला तर्क पूर्ण लेख)

आर्य शब्दाचा संस्कृत अर्थ आहे उत्तम आणि सुसंस्कृत व्यक्ती अर्थात आचार आणि विचाराने चांगला व्यक्ती. आर्य नावाची कुठली जाती होती आणि ती परदेशातून भारतात आली या भाकड कथेवर मी कधीच विश्वास ठेवला नाही. तरीही जे माझे मित्र आर्य आणि संस्कृत बोलणारे ब्राम्हण विदेशातून भारतात आले होते, त्यांच्या साठी हा लेख. आर्य हे दक्षिण भारतीय होते आणि त्यांची भाषा संस्कृत होती हे मी लेखात तार्किक रित्या सिद्ध करणार आहे.

पुरातन इतिहासाचे लिखित प्रमाण कमीच आहे. पण त्या काळातील माणूस आज हि जिवंत आहे. आजच्या माणसांचे अध्ययन करून संस्कृत भाषी आर्य कुठले हे ठरवणे सहज शक्य आहे.

इतिहासाचा सारांश: हिस्ट्री चेनेल वर माणसांचा प्रवास हा कार्यक्रम २-३ वेळा तरी पहिला असेल. हा कार्यक्रम माणसांच्या DNA अध्ययनावर आधारित होता. आजपासून पन्नास हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून माणूस आंध्रप्रदेशच्या व दक्षिण भारताच्या किनार्यावर पोहचला. पन्नास हजारवर्षांपूर्वी आजपेक्षा समुद्राची पातळी २०० फूटहून अधिक खोल असल्यामुळे हा प्रवास सहज शक्य होता. आफ्रिकेतून आलेल्या टोळ्यांची जनसंख्या वाढली, काही दंडकारण्यात इत्यादी जंगलात स्थिरावले व वनवासी संस्कृती विकसित झाली. काही कावेरी, कृष्णा आणि गोदावरीच्या किनार्यांवर स्थिरावले. तिथे सभ्यता आणि संस्कृत भाषेचा जन्म झाला. मानवीय आचरणाचे नियम आखल्या गेले. त्या नियमांचे पालन करणारे स्वत:ला आर्य म्हणवू लागले. पालन न करणार्यांसाठी अनार्य शब्द वापरला जाऊ लागला. जनसंख्या वाढली, काही प्रवास करत प.समुद्र तटावर पोहचले व सरस्वती नदीच्या किर्नार्यावर प्रवास करीत सप्तसिंधू प्रदेशात पोहचले. जगातील सर्वात उपजाऊ अश्या सप्तसिंधू प्रदेशात सभ्यता स्थिरावली. नगर आणि ग्राम विकसित झाले, वैदिक साहित्य निर्मिती हि सुरु झाली. संस्कृत भाषा अधिक विकसित झाली. बदलत्या वातावरणात वावरू लागल्यामुळे मूळ संस्कृत शब्दांचे उच्चारण करणे त्यांना जड जाऊ लागले. काही संस्कृत शब्द लुप्त हि झाले. माणूस शेती करू लागला. भूमी आणि गौ धनासाठी युद्ध होऊ लागले. ऋग्वेदातील ऋचा या घटनांच्या साक्षी आहेत. बहुतेक १२-१३ हजार वर्षांपूर्वी एक मोठे दशराज्ञ युद्ध झाले. तृत्सु वंशातील राजा सुदास याने १० आर्य वंशातील राजांना पराजित केले. हजारो सैनिक मरण पावले. ऋग्वेदात राजा सुदासचे पुरोहित वशिष्ठ ऋषीला राक्षस म्हणून हि संबोधले आहे कारण या विनाशासाठी ते हि दोषी होतेच. याचा अर्थ सभ्य आणि सुसंकृत लोक म्हणजे आर्य आणि असंस्कृत हिंसाचारी म्हणजे राक्षस किंवा अनार्य. पुढे आर्य सभ्यता गंगा -यमुनेच्या खोर्यात पोहचली. काही "केस्पिअन सागर पार करून मध्य आशियात, युरोपात आणि काही पुढे सैबेरिया पार करून अमेरिकेत पोहचले"(असे हिस्ट्री चेनेल वाले म्हणतात). इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो. माझा एक सहयोगी गंगाराम काही वर्षांपूर्वी प्रधानमंत्री सौबत मक्सिको येथे गेला होता. मी परतल्यावर विचारले मेक्सिको कसा वाटला. तो म्हणाला 'पटाईतजी वहां ऐसा लगा जैसे भारत में है, कोई बिहारी लग रहा था कोई पंजाबी'. निश्चित ही भारत का कोई रिश्ता मेक्सिको से अवश्य है".असो.

आता माणसाचे अध्ययन करून आर्य दक्षिण भारतीय होते हे सिद्ध करायचे आहे. माणूस म्हणजे मीच. मी ब्राम्हण कुळातील आहे अर्थातच भाकड इतिहासकारांच्या मते आर्य. माझे अध्ययन करून संस्कृत भाषिक आर्य मूळचे कुठले हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे.

बालपणी संध्याकाळी वडील घर परतल्यावर, देवा समोर दिवा लावल्यावर, रामरक्षा इत्यादी स्त्रोते आम्ही म्हणायचो. शाळेत गेल्यावर कळले या भाषेला संस्कृत असे म्हणतात. आम्ही जुन्या दिल्लीत राहायचो. पहाडगंज येथील नूतन मराठी मराठी शाळेत शिक्षण सुरु झाले. शाळा मराठी असली तरी ५ टक्क्याहून कमी मराठी मुले असतील. ५ टक्के आरामबाग येथील सरकारी कर्मचार्यांची मुले त्यात अधिकांश दाक्षिणात्य. शाळेत शिकणारी बहुसंख्यक मुले पाकिस्तान मधून आलेल्या शरणार्थी लोकांची. त्यात हि सर्वातजास्त मुलतानी टांडा येथील. (मुलतान म्हणजे आर्यांचे मूलस्थान असे काहींचे मत आहे). उंच पुरे घार्या डोळ्यांच्या मुलतानी मुलांमुळे नूतन मराठी शाळा कैक वर्ष बास्केटबॉल विजेता राहिली होती. त्या काळी ११वी बोर्ड होता. आठवीत संस्कृत भाषेत ९० टक्के मार्क मिळाले तरी ९वीत प्रवेश घेताना मी हिंदी हा विषय घेतला. संस्कृत शिकविणार्या शास्त्री सरांना हे कळले त्यांनी प्रेमाने मला जवळ बोलविले. (शास्त्री सर हे बनारसचे होत. चांगले संस्कृत शिकवायचे. संस्कृत घेणाऱ्या अधिकांश मुलांना ७५ टक्केहून जास्त मार्क मिळायचे.). मला समजावीत म्हणाले अरे गाढवा, संस्कृत हि भाषा तुम्हा मद्रासी-मराठी मुलांसाठीच आहे. संस्कृत घेशील तर तुला सहज ८०-८५ टक्के मार्क्स मिळतील. संस्कृतच्या भरोश्यावर प्रथम श्रेणीत हि पास होशील. हिंदीत तर बोर्डात प्रथम येणार्यालाही ७५ टक्के मार्क्स मिळत नाही. ज्यांना संस्कृत कळणे आणि बोलणे शक्य नाही अश्या पंजाबी, सिंधी आणि मुलतानी मुलांसाठी हिंदी भाषा आहे. हे वेगळे मी निश्चय बदलला नाही. हिंदीत ५४ टक्के मार्क्स मिळाले आणि ९ मार्कांनी प्रथमश्रेणी चुकली. माझ्या भावाने संस्कृत घेतली. त्याचे ८० टक्क्याहून जास्त मार्क्स आले व प्रथम श्रेणी हि. असो. पण एक मात्र खर देशातील उत्तर पश्चिमेच्या भागातील लोकांना संस्कृत बोलणे जड जाते. काही दिवसांपूर्वी आस्था टीवी वर संस्कृत मधील एक कार्यक्रम पहिला. दक्षिण भारतीय विद्वान सहज आणि समजणारी संस्कृत बोलत होते, पण एका उत्तर भारतीय हरियाणवी अतिप्रसिद्ध संस्कृत विद्वानाचे उच्चारण स्पष्ट नव्हते. दिल्लीतही दक्षिण भारतीय आणि मराठी ब्राह्मणांची डिमांड पूजापाठ साठी जास्त आहे. त्यांना दक्षिणाही जास्त मिळते. कारण एकच संस्कृत भाषेतील स्पष्ट उच्चारण. संस्कृत भाषेचे अधिकांश विद्वान् विन्ध्याचल पार अर्थात दक्षिणात्य आहेत. आता विचार करा मध्य आशिया किंवा युरोपात संस्कृत भाषा विकसित होणे संभव आहे का?

काही म्हणतात, आर्य गोर्या रंगाचे व उंच पुरे होते. रंगाचा आणि उंचीचा संबंध जातींनुसार नव्हे तर वातावरणाशी आहे. माझे वडील दिल्लीत स्थायी झाले. दिल्लीत लालनपालन झाल्यामुळे माझ्या चुलत भावांपेक्षा आम्हा दिल्लीकर भावंडांची उंची जास्त आहे व रंग ही उजळ. पुढील पिढी अर्थात माझे पुतणे, भाचा आणि माझा मुलगा यांची उंची आमच्या पिढी पेक्षा जास्त आहे. हि काही माझ्या घरची परिस्थिती नाही. आता मी जनकपुरी जवळ बिंदापूर या शहरी गावात राहतो. जनकपुरीत बरेच मराठी ३०-४० वर्षांपासून राहतात. एखाद अपवाद सोडता सर्वांच्याच घरी आजची पिढी पूर्वीपेक्षा जास्त उंच आहे. दोन-तीन पिढीत एवढा फरक पडतो. शेकडो पिढ्यात रंग आणि उंची यात किती फरक पडेल. निश्चितच दक्षिणेतून उत्तरेकडे गेलेल्या आर्यांचे रंग आणि रूप बदलले. तरीही मूळ रंगाची आठवण नेहमीच स्मृतीत राहिली. आपल्या सर्व देवता काळ्या रंगाच्या आहेत. क्षीर सागर मध्ये निवास करणारे आर्य देवता विष्णू, काळ्या रंगाचे, राम आणि कृष्ण काळ्या रंगाचे, परशुराम हि काळेच होते. नीलकंठ शंकर हि काळेच. रावण मात्र गोरा आणि सुंदर होता. कालिका देवी काळीच होती. सीता ते शकुंतला सर्वच सुंदर कन्या सावळ्या होत्या. जिच्यामुळे महाभारत घडले ती अग्नीवर्णी द्रौपदी सावळी होती. संस्कृत साहित्यात विदर्भ कन्या सुंदर (सावळ्या) असतात. आमची सौ. हि वैदर्भी आहे. अर्थात सुंदर आहे. देवी -देवतांच्या मूर्त्या काळ्या दगडातच तैयार करण्याची परंपरा आज हि आहे. मुगल देशात आल्यानंतरच संगमरमरच्या पांढर्या मूर्त्या बनू लागल्या.

सारस्वत ब्राह्मण केरळ, कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान ते पंजाब पर्यंत पसरलेले आहे. ते आर्यांचा दक्षिण ते उत्तर भारताच्या प्रवासाचे जिवंत साक्षीदार आहेत. सारस्वत ब्राह्मण गंगा-यमुनेच्या मैदानापासून ते बंगाल पर्यंत हि पसरले आहेत. अर्थात संपूर्ण भारतात मानवी प्रवासाचे (आर्यांच्या प्रवासाचे) जिवंत प्रमाण हि आहेत. या शिवाय मी आणि सर्व दक्षिण भारतीय हि आर्य दक्षिण भारतीय असण्याचे जिवंत पुरावे आहोत.

निष्कर्ष एकच जर स्वत: आर्य म्हणवणारी कुठली जाती असेल तर निश्चित ती दक्षिण भारतीयच आहे. संस्कृत भाषी आर्य हे दक्षिण भारतीय होते हेच सत्य. बाकी सर्व भाकड कथा.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या डिएनएचे परीक्षण खरे मानणारे लोक असतील , ब्राम्हण,आर्य,द्रविड वगैरे चर्चा भरकटणार नसेल तर काही लिहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का हो असे बिचकताय , लिहा की !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाईत काका , पुनरागमनाचे स्वागत . मी तद्न्य नसल्याने आपला विरोध किंवा सहमती दर्शवू शकत नाही . परंतु आपल्या या लेखात काही तर्काला न पटणाऱ्या गोष्टी पटत नाहीत . "उदा . उत्तर भारतात गेलेले वातावरणामुळे गोरे व उंच झाले . तात्पर्य रंग व उंची वातावरण संबंध आहे , जाती किंवा रेस शी नाही " आफ्रिकेत ५ -6 पिढ्या राहिलेले भारतीय अजूनही मूळच्या सारखेच दिसतात . तसेच साऊथ आफ्रिकेतल्या 200 वर्षे तिथे राहिलेले युरोपीय लोक ही अजून गोरेच दिसतात . वातावरणाने उंची व वर्णात फरक पडण्यासाठी बऱ्याच सहस्रकांचा काळ लागत असावा . बाकी संस्कृत आज कुठे जास्त फ्लूएंटली बोलली जाते याचा काही जपणूक केलेल्या परंपरा कारणीभूत असू शकतील का ? तुम्ही म्हणता तसं असेलही कदाचित , पण हे पुरावे तर्काला पटत नाहीत . धन्यवाद .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाईत काका कधी खरं लिहितात आणि कधी तिरकस लिहून लोकांना गंडवतात हे मला कधी कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर्य,द्रविड,ब्राम्हण,मराठा तसेच भारतीय जाती उपजातींचे डीएनए जगातल्या कोणत्या भागातील वंशातील लोकांशी जुळतात हा रोखठोक प्रश्न राहिला पाहिजे प्रतिसादांत.
२)नॅशनल जिओग्रफिकही यावर काम करते आहे आणि त्यांनी आवाहन केलेले आठवते. आपण पुढे होऊन आपले डीएनए देत असाल तर संशोधनास हातभार लागेल.
३) यावर कुठेतरी चर्चाही झाली की याचा गैरवापर होईल का?
४)यांतून आणि संभाव्य जातीपातींचे एकमेकांवर दोषारोप न होता चर्चा पुढे जायला हवी.
५)आणखी बरेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या ओळीतच मी स्पष्ट लिहिले आहे, आजच्या महान इतिहासकारांची प्रेरणा घेऊन हा लेख लिहिला आहे. बाकी सर्व जमातीतील लोक देशात सर्वत्र सापडतात. दक्षिण आफ्रिकेत मी हि २ दिवस राहिलो आहे. जोहान्सबर्ग आणि प्रिटोरिया जवळपास दिल्ली सारखेच आहे. भारतात आंतरजातीय विवाह वैदिक काळापासूनच होत होते. महाभारतात तर जवळपास सर्वच लग्न आंतरजातीय आणि अंतरप्रांतीय होती. द. आफ्रिकेत हि मिश्र विवाह करणार्यांच्या रंगात फरक जाणवतो.गोर्यांचा रंग आता युरोपिअन लोकांसारखा नक्कीच नाही. पुढील ५००-६०० वर्षांत फरक स्पष्ट जाणवेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प‌टाईत‌काका, हा लेख‌ तुम्ही ग‌ंभीर‌ विष‌य‌ म्ह‌णून‌ लिहिला आहे का वाव‌दूक‌ अशा त‌थाक‌थित‌ इतिहास‌लेख‌कूंची थ‌ट्टा म्ह्णून‌ लिहिला आहे? आपल्या स्वार्थासाठी नव्याने इतिहास लिहिणाऱ्या आजच्या महान इतिहासकारांपासून प्रेरणा घेऊन लिहिलेला तर्क पूर्ण लेख ह्या तुम‌च्या उल्लेखाने ही श‌ंका निर्माण‌ होत‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख‌ तुम्ही ग‌ंभीर‌ विष‌य‌ म्ह‌णून‌ लिहिला आहे का

प‌ण, गंभीर‌ वाटावं असं प‌टाईत‌ काकांनी आज‌व‌र‌ काही लिह‌लेलं आहे का? माझ्या वाचनातून सुट‌लंही असेल, म्ह‌णून विचार‌तोय.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

दिल्लीत लालनपालन झाल्यामुळे माझ्या चुलत भावांपेक्षा आम्हा दिल्लीकर भावंडांची उंची जास्त आहे व रंग ही उजळ.

पृथ्वीचा आकार ध्रुवांपाशी चपटा आणि विषुववृत्ताशी फुगीर असल्यामुळे जसंजसं विषुववृत्तापासून लांब जावं तशी लोकांची उंची वाढत जाते. ... अं काय? गुरुत्वाकर्षणाचा नियम वापरायचा तर परिस्थिती उलट असायला पाहिजे का? मग तसंच असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सूर्याच्या जितके जास्त जवळ जावे, तितकी खरे तर उष्णता वाढत जायला हवी. पण मुंबईत घामाच्या धारा लागतात, तर मुंबईपेक्षा सूर्याला ५ मैलांनी अधिक जवळ असलेले मौण्ट एव्हरेष्ट बर्फाच्छादित असते. तसेच आहे हे!

(आता, रात्रीत ताप उतरला म्हणून एखादे आख्खे गावच्या गाव तर मौ.ए.वर जाऊन आपापल्या आइसब्यागा रिकाम्या निश्चितच करत नसावे, चिराबाजारातल्या क्रूसासारखे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घाम येतो कारण उष्णता आणि हवेतील आर्द्रता, ही दोन्ही कारणं असतात. त्यामुळे ज्या माणसांशी बोलताना घाम फुटतो, अशा माणसांना हॉट म्हणण्यापेक्षा हॉट अँड (वॉटर) हेवी म्हटलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जसंजसं विषुववृत्तापासून लांब जावं तशी लोकांची उंची वाढत जाते.

ह्याब‌द्द‌ल‌ माहिती नाही, प‌ण ज‌स‌ज‌सं उत्त‌रेक‌डे जावं (भार‌तात‌), त‌स‌त‌से खाद्य‌प‌दार्थ‌ घ‌ट्ट आणि बुद्धी विर‌ळ‌ होत‌ जाते, असा एक प्र‌वाद‌ ऐक‌ला होता बुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाईत काका, लेट द स्ट‌डिज कंप्लीट. इत‌की काय घाई?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दिल्लीतही दक्षिण भारतीय आणि मराठी ब्राह्मणांची डिमांड पूजापाठ साठी जास्त आहे. त्यांना दक्षिणाही जास्त मिळते. कारण एकच संस्कृत भाषेतील स्पष्ट उच्चारण.

बाकी काही असो, प‌ण उत्त‌रेत‌ल्यांचे संस्कृत उच्चार अतिश‌य चुकीचे अस‌तात‌ ते ऐक‌ताना लै डोक्यात जात‌ं. **व‌र लाथा घात‌ल्या पाहिजेत‌ स‌ग‌ळ्यांच्या. बंगाली पंडितांचा याबाब‌तीत‌ व‌र‌चा नंब‌र लागेल एक‌द‌म‌. म‌द्रासी आणि म‌राठी लोकांनाच संस्कृताचे शुद्ध उच्चार ज‌म‌तात हे बाकी ख‌रंच आहे. उत्त‌रेत‌ल्यांचा न‌क्की प्रॉब्लेम काय आहे देव जाणे. इत‌की क‌शी जीभ ज‌ड अस‌ते ***ची? कोणे एके काळी हा प्र‌देश म्ह‌ण‌जे संस्कृत आणि संस्कृतीचे आद्य‌स्थान होता हे आज‌च्या उत्त‌र भार‌तीयांक‌डे पाहून आजिबात वाट‌तच‌ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तेलगु बरे।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदरणीय रामचंद्र गुहा, आदरणीय इतिहासकार संजय सोनवणी अणि परम आदरणीय इतिहासाचार्य श्रीमंत कोकटे यांची प्रेरणा घेउन लिहिलेला लेख आहे. जर हे लोक इतिहासकार आहे तर ऐसी वर लिहिणार प्रत्येक सदस्य यांच्यापेक्षा जास्त तर्कपूर्ण रितीने आपली बाजू मांडू शकतो. निदान त्यांचे काही व्यक्तिगत किंवा राजनितिक स्वार्थतर नसणार. बहुतेक तेलगु आणि संस्कृत भाषेचा विकास एकाच जागी झाला असावा. संस्कृत शब्द तेलगु भाषेत सहज खपून जातात. (माझ्या तेलगु मित्राचे हे म्हणणे आहे). याचाच अर्थ भारताचा पूर्वी तटावर सभ्यता आधी विकसित झाली असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर्य द्रविड सर्व थोतांड आहे. फूट पाडण्यासाठी केलेलं कारस्थान. पहिला माणूस समुद्रातुन दक्षिणेस आला असावा आफ्रिकामधून. नंतर बाय रोड उत्तरेत आला अरब अफगाणिस्तानातून एकमेकांशी लग्न केली!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या मते आर्य हे मधल्या आळीत होते.. तिथूनच ते आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खोट आहे सगळं. माणसाची निर्मिती आफ्रिकेत झाली, याला पुरावा काय? दंडकारण्यातच पहिला माणूस निर्माण झाला. तेथून तो पृथ्वीवर सर्वत्र पसरला. हेच सत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकच माणूस (दंडकारण्यातून किंवा कोठूनही) पृथ्वीभर पसरला? कित्ती मोठ्ठा असेल तो, नि पसरल्यावर कित्ती पातळ झाला असेल!

आय मीन, इज़ण्ट इट अ बिट ऑफ अ स्ट्रेच?

आमची थियरी थोडी वेगळी आहे. नाही म्हणजे, तो माणूस दंडकारण्यातच निर्माण झाला, पण बिगबँगपूर्वी. आणि बिगबँगमुळे (ज्याचा आवाज 'ॐ' असा झाला, हे आतापावेतो सगळ्यांनाच ज्ञात आहे) ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन पृथ्वीभर विखुरला. (होय, बिगबँगपूर्वी जे पिंडाएवढे मैक्रोकॉज़्म होते, दंडकारण्य त्यातसुद्धा होते. त्यात (आजच्या निकषांवर) बोन्सायवाली झाडे होती. दंडकारण्य तेवढे जुने आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पृथ्वीवर पसरल्यानंतर तो पहिला माणूस पातळ झाला. एवीतेवी पातळ समोर आहेच तर नेसायला काय हरकत आहे, असा विचार करून पृथ्वीवरची पहिली स्त्री ते पातळ नेसली. अशा प्रकारे पहिल्या पातळाचा शोध लागला. साड्या, लुगडी, शालू वगैरे पातळाचे प्रकार मात्र नंतर मागाहून केव्हा तरी निर्माण झाले. मानवाच्या प्रारंभ काळी तमाम महिला वर्गास लज्जारक्षणार्थ पातळाचाच काय तो आधार होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पृथ्वीवरची पहिली स्त्री ते पातळ नेसली.

तुम्ही सांग‌लीकोल्हापूर‌ साईड‌चे काय‌?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जा !! माणूस पृथ्वीवर निर्मीलाच नाही!! आपण सारे दूर आक्षगंगेतल्या एलियन चे वंशज आहोत!! हेच सत्य आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर्य तेलगूच होते ह्याचा सज्जड पुरावा -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

(येशूच्या ethnicityबद्दल विविध तर्ककुतर्क. वानगीदाखल, मूळ इंग्रजीतून.)

Proof that Jesus was a Mexican:
1. His name was Jesus.
2. He was a bilingual.
3. He was always in trouble with the authorities.

Proof that Jesus was Jewish:
1. He went into his father's business.
2. He thought that his mother was a virgin.
3. His mother thought that her son was God.

(आणखीही बरेच आहेत चलनात. मला तूर्तास इतकेच माहीत आहेत/आठवतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे प‌हा:
http://www.beliefnet.com/faiths/2000/06/was-jesus-a-black-jewish-mexican...

+
ही जिरं-मोह‌रीची देशी फोड‌णी:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहाडगंज येथील नूतन मराठी मराठी शाळेत शिक्षण सुरु झाले. शाळा मराठी असली तरी ५ टक्क्याहून कमी मराठी मुले असतील. ५ टक्के आरामबाग येथील सरकारी कर्मचार्यांची मुले त्यात अधिकांश दाक्षिणात्य. शाळेत शिकणारी बहुसंख्यक मुले पाकिस्तान मधून आलेल्या शरणार्थी लोकांची. त्यात हि सर्वातजास्त मुलतानी टांडा येथील.

हे फारच रोचक आहे. ह्या मुलतानी मुलांचं शिक्षण दिल्लीसारख्या ठिकाणी मराठी माध्यमात झालं का? आजही दिल्लीत मराठी माध्यमाच्या शाळा आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

विचारले मेक्सिको कसा वाटला. तो म्हणाला 'पटाईतजी वहां ऐसा लगा जैसे भारत में है, कोई बिहारी लग रहा था कोई पंजाबी'. निश्चित ही भारत का कोई रिश्ता मेक्सिको से अवश्य है"

>>> मी फार पूर्वी वाचले होते, की मॅक्सिको म्हणजे पूर्वीचा 'मक्षिका' देश. भारतातून काही गुलाम तिथे नेले होते. आणि म्हणून तेथील लोकांची नांवे हीच त्यांची आडनावे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिल्लीत चौगुले पब्लिक शाळेत (करोल्बाग) १२ वी पर्यंत मराठी हा विषय आहे. शिकणारे ९५ टक्के गैर मराठी. शिवाय नूतन मराठी शाळेत हि ८ पर्यंत मराठी आहे. मराठी लोक दिल्लीत सर्व जागी विखुरलेले असल्यामुळे कुठल्या एक ठिकाणी जास्त संख्येत नाही. तरी हि अधिकांश २-३ पिढी जुन्या लोकांनी आपली संस्कृती जपून ठेवली आहे. नवीन येनार्यान्बाबत हे सांगता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0