ग‌ म‌ भ‌ न‌

सकालधरन॓ माय लय आटवत हुती
उनात बसून बिडी वडताना तिची कूस याद आली
बिडीच्या धुरानं बी आसल, डोल्यात पानी पानी आलं
आन येकदम म्होरं हुबी दिसली गोरी-चिट्टी मास्तरीन
सूध भाशेत म्हनली ,” बारा वर्षांचा ना रे तू?
आजपास्न॓ बाराखड़ी शिकायला रोज दुपारी भंगार-डेपोच्या समोर येत जा. आणि बर॓ का,
रोज तास झाल्यावर दूध-पाव मिळेल”

मी सिकाया गेलो. काल्याकूट पाटीवर सफेत सफेत आक्षरा फटाफट लिवाया सिकलो.
मास्तरीन बोल्ली,” मुला, हुशार आहेस रे तू”
लय बेश वाटलं
मास्तरीन झकास, दूद पाव फसकलास

भंगारपाली बेगी-बेगी करूनशान म्हैनाभर साळ॓त गेलो
येक डाव मास्तरीन बोल्ली, “ आज परीक्षा घेते, आहेस तयार?”
आपुन बोल्लो हाय तय्यार
ती म्हटली, “ ग कशातला?” आपुन बोल्लो “गटारीचा”
ती म्हटली, “ म कशातला?” आपुन बोल्लो “मटक्याचा”
ती म्हटली, “ भ कशातला?” आपुन बोल्लो “भ॓गारचा”
ती म्हटली, “ न कशातला?” आपुन बोल्लो “नालीचा”
ती म्हटली, “ क कशातला?” आपुन बोल्लो “कचऱ्याचा”
ती म्हटली, “ घ कशातला?” आपुन बोल्लो “घंटा-गाड़ीचा ”
दुदासारक॓ सफेत हासून बोल्ली,” अरे बाळा, ग- गणपतीतला, म-मक्यातला, भ-भटजीतला, न- नळातला, क-कमळातला, घ-घरातला”
आपुन मिष्टेक कबूल केली.
मॉप आक्षार॑ सिकलो फुडे ,
काना : काटीवानी, येलांटी : भंगार डिपोच्या गोल छपरावानी, आक्षरावरला टिम्ब : कपालीच्या टिकलीवानी
सवालाची खून म॑जी परश्न चिन्न : भंगार सावडायच्या आकड्यावानी.... आस॓ बर॓च काय काय.....

बापाला आक्षर सिकतो बोल्लो. त्यो मावा थुकून म्हनला " आरं पोरा, आक्षरानं नादावू नग॓स.
म्या बी मॉप आक्षर॓ सिकलो तुज्यावानी. पन आपल्या-तुपल्या भंगार जिंदगीला आक्षरा काय कामाची?
आपल्या जिनगीला रग्गड पुरतोय
तुज्या साळ॓च्या पाटीचा कालाकूट रंग
अक्षराच्या लायनी॓मदली बेवारस खाली जागा
भेटंल त्या छपराची येलांटी
भाडुत्री बाईच्या कपालीच्या टिकलीचं टिम्ब
अन रोजच्या रोटीचा सवाल -....... कचरा सावडायच्या आकड्यावानी आतडं पोखरनारा"

तवाधरन॓ सा॓गतो, पाटी-खडू कड॓ नजर बी मारावीशी वाटत नाय...........

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

तुम‌ची क‌विता, अतिश‌य भाव‌ते. आज तुम‌च्या न वाच‌लेल्या स‌ग‌ळ्या क‌विता वाचणार आहे मी.
'विद्रोही' लिहीणं, विद्रोही म्ह‌ण‌व‌णाऱ्या ब‌ऱ्याच प्राण्यांना ज‌म‌त नाही. शिव्यांची टाक‌साळ आणि भाषेची हेळ‌सांड क‌रुन लिहीलेलं स‌ग‌ळंच विद्रोही न‌स‌त‌ं, हे त्यांना सांगाव‌ंसं वाट‌तं.
बाराख‌डीतून व‌र्गसंघ‌र्ष दाख‌व‌णं ही म‌राठी साहित्यात वाप‌र‌ली गेलेली क्लिशेड क‌ल्प‌ना आहे. त‌रीही, इथे तुम्ही एक पाय‌री पुढे जाऊन

काना : काटीवानी, येलांटी : भंगार डिपोच्या गोल छपरावानी, परश्न चिन्न : भंगार सावडायच्या आकड्यावानी

क‌ल्पनाश‌क्तीची क‌माल केलेली आहे.
आणि शेव‌टी,

तुज्या साळ॓च्या पाटीचा कालाकूट रंग

इथून क‌विता विद्रोह आणि नेणीव, ह्यांचा सुव‌र्ण‌म‌ध्य गाठ‌ते. ज‌ब‌र‌द‌स्त. ढ‌साळांनंत‌र असं वाच‌ल्याचं लक्षात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

आपले अभ्यासू प्रतिसाद वाट (दाखवतात+पाहायला लावतात)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमकं सावडलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती म्हटली, “ ग कशातला?” आपुन बोल्लो “गटारीचा”
ती म्हटली, “ म कशातला?” आपुन बोल्लो “मटक्याचा”
ती म्हटली, “ भ कशातला?” आपुन बोल्लो “भ॓गारचा”
ती म्हटली, “ न कशातला?” आपुन बोल्लो “नालीचा”
ती म्हटली, “ क कशातला?” आपुन बोल्लो “कचऱ्याचा”
ती म्हटली, “ घ कशातला?” आपुन बोल्लो “घंटा-गाड़ीचा ”

मॉप आक्षार॑ सिकलो फुडे ,
काना : काटीवानी, येलांटी : भंगार डिपोच्या गोल छपरावानी, आक्षरावरला टिम्ब : कपालीच्या टिकलीवानी
सवालाची खून म॑जी परश्न चिन्न : भंगार सावडायच्या आकड्यावानी.... आस॓ बर॓च काय काय.....

हे विशेष आव‌ड‌ले.

दाह‌क आणि ज‌ळ‌ज‌ळीत क‌विता प‌ण एकद‌म वास्त‌विक. याव‌रून कार्ल सॅंड‌ब‌र्गची क‌विता आठ‌व‌ली.
Carl Sandburg (1878–1967). Chicago Poems. 1916.

Muckers

Twenty men stand watching the muckers.
Stabbing the sides of the ditch
Where clay gleams yellow,
Driving the blades of their shovels
Deeper and deeper for the new gas mains
Wiping sweat off their faces
With red bandanas
The muckers work on .. pausing .. to pull
Their boots out of suckholes where they slosh.

Of the twenty looking on
Ten murmer, “O, its a hell of a job,”
Ten others, “Jesus, I wish I had the job.”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता भिडली. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0