लाल डब्बा का जळतो?

अखंड महाराष्ट्रातील गोरगरिबांना रात्रंदिवस सेवा देणारी एसटी प्रत्येक संप, बंद, दंगल काळात का जाळतात येडे लोक? बस सरकारी* मालमत्ता आहे म्हणून!
बंगळूर मध्ये असताना pf वर कसलातरी आंदोलन चालू होता तेव्हा एका दिवसात १५२ BMTC बस ची तोडफोड झाली. आता त्या बस मधून कोणी मंत्री संत्री तर प्रवास करत नव्हता ती कामगार लोकांनाच सेवा देत होती.
या वर उपाय म्हणून बंगळूर नगर परिवहन ने जळालेल्या बस प्रत्येक डेपोत ठेवल्या, आणि भावनिक आवाहन केलं लोकांना. कि मला का जाळलं नालायकानो तुम्ही.
परवा आपल्या गरीब** शेतकऱ्यांनी पण काहीतरी राडा केलाच असेल एसटी सोबत!!
कन्नड महाराष्ट्र ची फोडतील मराठी कानडी ची फोडतील,

*सरकार म्हणजे ब्रिटिश सरकार आपले नाही आपण गुलाम आहोत आपण.
**गरीब पण फिरण्यासाठी स्कॉर्पिओ(हुंड्याच्या पैशातून घेतलेली) वापरणारे.

field_vote: 
0
No votes yet

अगदी मूर्खपणा.
माथेरानला (नेरळ - माथेरान,२५रु )मिनिबस सुरू केली तीन वर्षांपुर्वी ती टॅक्सीवाल्यांनी नवीकोरी जाळली होती.
आता पुन्हा चालू आहे.
मिनिरेल्वे मार्च २०१६ पासून बंदच आहे. टॅक्सी तिकिट रु ९०!
वरच्या गाववाल्यांना बसचाच आसरा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण ब‌स जाळ‌ली की कोण घ‌ंटा विचाराय‌ला येणार नाही हे माहित अस‌त‌ं ना... म्ह‌णून ते. गाडी व‌गैरे जाळ‌ली आणि तो कोणी म‌ंत्रीसंत्रीचा नात‌ल‌ग निघाला म्ह‌ण‌जे ढूंढ ढूंढ के मारेगा हेही माहित अस‌त‌ं. म्ह‌णून बाईक्सप‌ण जाळ‌तात लोक. बाईकावाले लोक हाताव‌र पोट अस‌णारे अस‌तात ज‌न‌र‌ली. ते काहीही क‌रू श‌क‌त नाहीत हेही माहित अस‌त‌ं. आम‌च्या इक‌डे त‌र ज्याच्यात्याच्याव‌रून आर्मीव‌र सेंटी होणारे लोक्स अम‌र ज‌वान ज्योती शिल्पाची तोड‌फोड काही शांत‌ताप्रिय लोकांनी केली त‌री म्ह‌णावे तित‌के भ‌ड‌क‌ले नाहीत. त्या संघ‌ट‌नेने त्या शांप्रि लोक्स‌शी आम‌चा काही संबंध नाही अस‌ं जाहीर केलं त‌र बाकी लोक्सनी 'सोयिस्क‌र राज‌कार‌णा'चे आरोप केले नाहीत. प‌ब्लिक दोन आठ‌व‌ड्यात विस‌र‌लं. फार शांत‌ता माज‌लेली म‌ग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

मला पण हा प्रश्न पडायचा अधून मधून. अंदोलन चिघळलं, दंगल झाली, निदर्शनं हिंसक वळणावर आली की परीवहन मंडळाची बस पहिल्यांदा टारगेट केली जाते. मध्ये एकदा अशाच घटनेत खाजगी वाहनांवर पण दगडफेक झाल्याचं वाचण्यात आलं होतं त्यावरची मित्रांबरोबरची चर्चाही केली होती की बस व्यतिरीक्त दुसरं टारगेट पण असू शकतं.
तेलंगणा जेंव्हा वेगळं करण्यासाठी आंदोलनं चालू होती तेंव्हा बर्याच मित्रांची टरकायची सार्वजनिक प्रवासाची वाहने वापरताना

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं