माझी एक गोची होते

वृत्तबद्ध लिहिताना
माझी एक गोची होते
यमक बिमक जुळवताना
अलगद काही निसटून जाते

माझी कविता "जुळत" नाही
हवी तशी "वळत" नाही
(जुळली/वळली चुकून तर..)
कमावलेली कृत्रिमता
हट्टीपणे हटत नाही

कवितेचे झटपट वर्ग
कुठे कोणी घेतं का?
अभिजात वगैरे लिहिण्यासाठी
प्रतिभा विकत मिळते का?

(एक कोडं सुटत नाही ...)
शब्द इतके रुक्ष तरी
भावना इतक्या तरल क़शा?
काळजात रुतलेली कविता आठवून
डोळ्यांच्या कडा ओलावतात कशा?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शब्द इतके रुक्ष तरी
भावना इतक्या तरल क़शा?
काळजात रुतलेली कविता आठवून
डोळ्यांच्या कडा ओलावतात कशा?

सुंदर!!
कविता फक्त शब्दातच लिहीली पाहीजे असे कुठे आहे? So many ways to write a poem.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच आहे, नेमकं टिपलंय हो उदय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप आवडली कविता. अगदी सगळ्या कवींच्या मनात कधी ना कधी येणारं, म्हणूनच खूप भिडणारं असं तुम्ही लिहीलं आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

व्यसनेषु सख्यम?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्द इतके रुक्ष तरी
भावना इतक्या तरल क़शा?
काळजात रुतलेली कविता आठवून
डोळ्यांच्या कडा ओलावतात कशा?
मस्त कविता. आपण काही काव्यशास्त्र वैगरेह शिकलेलो नाही. मीटर इत्यादीची पर्वा करायची गरज नाही. फक्त वाचणार्याला कविता आवडली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0