..पर अंधेरे से डरता हु मै मां..!

मेरी मां.. (येथे ऐका)

"आई नको ना गं मला इथे एकट्याला ठेऊन जाऊस! मी तसं कधी बोलून दाखवत नाही पण मी अंधाराला खूप घाबरतो गं आई. इथे खूप अंधार आहे.
हो, आहे मी थोडासा खोडकर, पण तू मला खूप आवडतेस आणि मला तुझी खूप काळजीही वाटते. आता हे कसं तुला समजावून सांगू..? पण तुला तर हे सगळं माहित्ये ना आई? मग मला इथे एकट्याला का ठेऊन जातेस? आता खरंच मी चांगला वागेन. मस्ती, द्वाडपणा करणार नाही. प्रॉमिस..! पण मला इथे नाही रहायचं..!"

tjp

"इथे सगळी खूप अनोळखी मुलं आहेत. मला भिती वाटते इथली.. मला इथे ठेऊन जाऊ नकोस. ही गर्दी आहे ना, ती मला काहितरी करेल मग मी परत घरी कसा येऊ शकेन..? मला तुझ्यापासून इतका दूर करू नकोस की माझी आठवणही तुला येणार नाही.. खरंच मी इतका वाईट आहे का गं आई..? सांगा ना..!"

"आई, मला माहित्ये मी तुझा खूप लाडका आहे. बाबा जेव्हा जेव्हा मला जोरांने ओरडतात ना, तेव्हा तू येऊन माझी बाजू घेशील, मला सांभाळशील याची खात्री असते मला! तू जवळ असलीस ना आई, की खूप सुरक्षित वाटतं मला! पण मी बाबांना हे काही सांगू शकत नाही. तुला हे सगळं माहित्ये ना आई..? मला भिती वाटते त्यांची. खरंच भिती वाटते.."

tjp

चवथी-पाचवी पर्यंत आईच्या पदराखाली लाडाकोडात वाढलेला ईशान अवस्थी. एक खोडकर मुलगा. अक्षरं/आकडे समजण्याची आकलनशक्ती क्षीण असलेला, ती समजून घेतांना गडबड होणारा आणि त्यामुळेच 'लेटर्स आर डान्सिंग' असं म्हणणारा ईशान.. तो सुधारावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला आता शाळेतून काढून लांब बोर्डिंग शाळेत ठेवला आहे. तिथे सगळं नवीन. मुलं/सवंगडी नवीन. जाड चश्मावाले अन् मिश्यावाले कडक मास्तर. तिथे आता लाड करणारी आई नाही..!

हे गाणं म्हणजे त्या लहानग्याचं मनोगत..! आईवेडं पोर आहे ते. गाण्याचं चित्रिकरण केवळ अप्रतिम...रडवेलं झालेलं ते पोरगं, आता एकटं, एकाकी. आत्तापर्यंत अगदी सकाळी उठवण्यापासून ते पायात मोजे-बुट चढवणारी आई होती. आता हे लाड नाहीत. कडक मास्तरांच्या निगराणीखाली सगळं आपलं आपण करायचं! आत्तापर्यंत कौतुकानं गरम गरम भरवायला आई होती, आता मेसच्या शिस्तीत आपलं आपण जेवायचं! Smile

पोरगं खरंच बावरलं आहे, घाबरलं आहे. शेवटी नळ सोडून आपला रडवेला चेहेरा घुतं आणि चुपचाप झोपतं आणि आईविना पहिला दिवस संपतो..! Smile

'तारे जमी पर'. एक सुरेख, देखणा, अप्रतिम चित्रपट आणि त्यातलं शंकर महादेवन ने गायलेलं हे अप्रतिम गाणं. जियो..!

पण खरंच मंडळी, हे गाणं ऐकताना/पाहताना पोटात कुठेतरी खूप तुटतं..पडद्यावर हे गाण पाहताना कुठेतरी आपल्या आईची आठवण होते आणि पडद्यावरचं चित्र क्षणभर धुसर होतं.. परमेश्वराने आई अन् तिचं लेकरू हे नक्की कसलं नातं निर्माण करून ठेवलं आहे हे खरंच समजत नाही...!

-- तात्या अभ्यंकर.

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (6 votes)

प्रतिक्रिया

"शंकर महादेवन ने गायलेलं हे अप्रतिम गाणं." खरंय.
"लिटल चॅम्प्स" च्या एका भागात हे गाणं शंकर महादेवननेच (परीक्षक म्हणून आलेला असताना) म्हटलं होतं, त्यावेळी ते मला चित्रपटातल्या मूळ गाण्यापेक्षासुध्दा सरस वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार छान व्यक्त केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलं संगीत, चांगलं गायन व त्यापेक्ष अधिक चांगले शब्द यांनी नटलेले हे गाणं अनेकांचं आवडतं आहे.. माझंही
अध्या गाण्यांमागे भावनाच इतक्या तीव्य असतात की सुरावट जादू करत असली तरी त्या सुरावटीचे डायसेक्शन या लेखात केलेले नाही हे अधिक आवडले..

काहि गाणी सुरांपेक्षा त्यात व्यक्त झालेल्या भावनेने श्रेष्ठ होतात हे खरच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषि,

सुरावट जादू करत असली तरी त्या सुरावटीचे डायसेक्शन या लेखात केलेले नाही हे अधिक आवडले..

ते मी इथे मुद्दामून टाळलं आहे. अर्थात, स्वरांचं तू म्हणतोस त्या प्रमाणे डायसेक्शन करून ते ते स्वर उलगडून पाहायलाही मला आवडतं.. Smile असो.

शेरलॉकचे, तुझे व दत्ताचे आभार..

तात्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डायसेक्शन करणं हे चुकीचं आहे असं मला अजिबात म्हणायचं नव्हतं. किंबहुना अश्या डायसेक्शनमुळे काहि गान्यांकडे बघायचा दृष्टीकोन बदलला आहे. मात्र ते येथे केले नाहि या शैलीच्या निवडीचे कौतुक म्हणून या शब्दाची योजना होती.

गैरसमज नकोत म्हणून खुलासा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओक्के सर.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आई" हा शब्द कोणत्याही कारणास्तव अगदी सहज जरी उच्चारला तरी ऐकणार्‍याच्या नजरेसमोर काहीतरी मंगल येते. मग अशा विषयावरील गाणे अगदी धनगरी घोंगड्यासम जाडेभरडे असले तरी त्याला मायेची उब असतेच. हिंदी चित्रपटगीतांचा ("आई" या विषयावरील) इतिहास बराच दीर्घ असला तरी मला वाटते श्री.विसोबा खेचर यांच्या धागाविषयातील हे एकमेव गाणे असेल की जे सांगते तर एका ८ वर्षाच्या मुलाची भावना, पण ते रेकॉर्ड केले गेले आहे ते एका पूर्ण वाढ झालेल्या पुरुष आवाजात. गाण्याला राष्ट्रपती पारितोषिक मिळाल्यावर त्या संदर्भात झालेल्या मुलाखतीत श्री.शंकर महादेवन यानाच 'स्टार न्यूज' वर मुलाखत दरम्यान प्रश्न विचारला असता त्यानी उत्तर दिले होते 'होय, खुद्द मलाही सुरुवातीला हे गाणे आठ वर्षाच्या मुलाच्या तोंडी शोभून दिसावे यासाठी पार्श्वगायिकेच्या आवाजात रेकॉर्ड करावेसे वाटत होते, पण पुढे अशा संदर्भातील चर्चेत आमीर खान, लॉय आणि मी या मतावर एकत्र आलो की, 'आई' हा घटक लहानापासून थोरापर्यंत सर्वाच्याच हृदयी समान पातळीवर असतो. शिवाय ईशान हे गाणे पडद्यावर म्हणत आहे असेही आम्हाला दाखवायचे जर नसेल, तर मग पुरुष आवाजातच 'आई' विषयीच्या भावना प्रेक्षकांसमोर पोहोचत्या कराव्यात असे ठरले."

वरील धाग्यातील गाणे हे मुलाने आईच्या प्रेमासाठी म्हटलेले, पण आईने मुलासाठी म्हटलेले "मोलकरीण" मधील पी.सावळाराम लिखित

"देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे जीवन देई मम बाळाला...."

हे आशाताईंचे गाणे ऐकताना डोळ्यात पाणी न तरळणारा माणूस विरळा.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाण सुरेख आहेच पण लेखहि आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तात्यासाहेब, डोळ्यात पाणी आणलं तुम्ही!! हे गाणे मला खुप आवडते.
अजुन एक गाणे आहे "रंग दे बसंती" मधलं "लुकाछुपी". ते आईने आपल्या मुलाची वाट पाहत असतानाचे आहे (पण इथे मुलगा वारलेला असतो). लताजी व रहमानचे ड्युएट गा़णं आहे.

इथे पाहू शकता.
http://www.youtube.com/watch?v=k5qhBM3KJY8&feature=related

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तात्या, लेख लई आवडला. जीयो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांच्या भावनिक जनुकांच शोषण करणारं गाणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंच, डोळ्यांत पाणी आनणारं गीत.
अजून एक असंच गीत म्हणजे - शामची आई चित्रपटातलं..
आई म्हनोनी कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी

तात्यांचा लेख पण एकदम भावस्पर्शी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0