मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो...

मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो
मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!

मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या
मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!

रोज ढळतो अन् उगवतो..मी न झालो सूर्यही
मंदिरा-गाभारची मी,नित्य समई जाहलो!

चंद्रभागा अमृताची वाहते येथे सदा...
मी विठू-नामात न्हाती,टाळ-चिपळी जाहलो!

लाभली आहे दिशाही या प्रवासाला अता
मी जसा या पालखीचा एक भोई जाहलो!

—सत्यजित

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी न लेखक जाहलो वा मी न समिक्षक जाहलो
मी टुच्चाच कवी पण या कवितेचा रसिक जाहलो !
वाचून हि कविता, हिच्या भक्तीरसात नाहलो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्चान, चान्
अरे chhaan कसं लिहायचं गमभनमध्ये? Sad येत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅपिटल सी = छ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0