खेळ खेळूया सारे आपण

माझ्या एका (बिहारी) मित्राबरोबर गप्पा मारत असताना विषय निघाला, लहानपणी आम्ही कोणते खेळ खेळत असू. बरेच खेळ कॉमन निघाले. मग आम्ही अजून एका बंगाली मित्राला विचारलं, तर तो म्हणे क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेटे असे खेळच खेळत असे. शहरी बाबू म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, आणि मी व बिहारी मित्र परत खेळांची यादी करण्यात गुंतलो.

१) पकडापकडी - बऱ्यापैकी लहान असताना खेळला जाणारा बेसिक खेळ.
२) विषामृत
३) दगड की माती - ज्या भिडूवर राज्य असेल त्या/तिच्या तळव्यावर एक उलट एक सुलट अशा थापट्या मारत गाणं म्हणायचो, 'कोरा कागद निळी शाई, आम्ही कुणाला भित नाही, कच्चं दूध पित नाही, वर बघून सांगावे दगड की माती'. या गाण्याला नियमांची शेपटंही जोडली जायची - 'एक पाय आउट, दोन पाय नटाउट, रेडी दिल्याशिवाय यायचं नाही'. मगरमच्छ अशा काहीतरी नावाचा याचा आणखी एक प्रकार होता. बिहारी मित्राच्या मते दगड माती म्हणजे त्यांचं डेंगा पानी असावं.
४) सोनसाखळी, जोडीची सोनसाखळी - आम्ही खूपदा खेळायचो. बिहारी नाव चैन चोर.
५) लपाछपी - लपाछपी तसा लहान मुलांचा खेळ, जरा शिंगं फुटल्यावर लपाछपीचं धप्पा व्हर्जन, आणि शिंगं किंचित मोठी झाल्यानंतर लपाछपी ३.० अर्थात डबा ऐसपैस खेळत असू.
६) डबा ऐसपैस - 'ऐसपैस' हा 'आय स्पाय'चा अपभ्रंश आहे, हा शोध मला अगदी अलीकडे लागला. आता या स्पायगिरीत डब्बा कसा आला देव जाणे. हा खेळ लय म्हणजे लयच वेळा खेळायचो आम्ही लहान असताना. दुसऱ्याच पोरीची बांगडी घालून किंवा ओढणी घेऊन राज्य असणाऱ्या भिडूच्या मनात संदेह निर्माण करणं, चुकीच्या भिडूच्या नावाने डबा उडवल्यास 'अंडं फुटलं' म्हणून आरडाओरडा करत बाहेर येणं, आणि राज्यधारी भिडू डब्ब्यापासून हलत नसल्यास 'भीईडू फीईरत नाआआही'चा गजर करणं असा आमचा खेळ कमी आणि आरडाओरडा फार. भिडूला गडी असाही प्रतिशब्द असे.
७) टिपी टिपी टिप टॉप, व्हॉट कलर डु यू वाँट - राज्यधारक भिडूने रंग सांगितला की त्या रंगाच्या वस्तूंना स्पर्श करायला धावायचं. स्पर्श करायच्या आत रा.धा.भि.ने आउट करायचं.
८) रेड लेटर - आंग्लभाषाद्न्यान ही पात्रता आवश्यक असणारा हा खेळ आमच्या खेळगड्यांत कसा काय पसरला हे एक आश्चर्यच म्हणायचं. रा.धा.भि.ने सांगितलेलं अक्षर आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये असेल तर तितक्या उड्या मारत रा.धा.भि.च्या दिशेनं जायचं आणि जवळ पोचलं की क्रीजला स्पर्श करून उलट पळत सुटायचं. समोरच्या क्रीजमध्ये पोचायच्या आत आउट केलं पाहिजे रा.धा.भि.ने.
९) राम लक्शुमण सीता सोन्याचा गोळा - याला काही हायफाय खेळगडी लंडन लंडन इस्टॉप/ स्टॅच्यू असंही म्हणत असत. इस्टॉप केल्यावर कोणी हलायचं नाही, बोलायचं/हसायचं नाही वगैरे. रामादि मंडळींचा सोन्याच्या गोळ्याशी आणि स्टॅच्यू होण्याशी काय संबंध आहे एकटा रामच जाणे.
१०) झिम्म्याचे प्रकार - अनंत गाणी होती झिम्मा खेळताना म्हणायची. तीही सगळी विचित्र आणि मिश्रभाषी. एक गाणं - 'आ मीना, सुपरसीना, बिग बॉय, लेझी गर्ल' - हे काय आहे तरी काय? अजून एक काहीतरी होतं - सुरुवात आठवत नाही - 'सोने के बॉटल मे ॲपल का ज्यूस, राजा का बेटा बडा कंजूस, राणी की बेटी कमल का फूल'. कोणी रचली असतील अशी निरर्थक गाणी?
११) संत्रं लिंबू - हातांच्या कमानीखालून गात गात जायचं - 'संत्रं लिंबू पैशापैशाला, शाळेतल्या मुली आल्या कशाला, खाऊनपिऊन खोकला झाला, डॉक्टर आले इंजक्शन द्यायला'. या गाण्याचं एक हिंदी रूपांतरही आम्ही गात असू, मात्र त्यात डॉक्टरांना धर्म प्रदान करण्यात आलेला दिसतो - 'खट्टा मीठा खाना नही, डॉक्टर के पास जाना नही, डॉक्टर है ख्रिश्चन, वो मारेगा इं-जे-क्श-न'.
१२) ब्याटबॉल उर्फ क्रिकेट - ताई आणि ताईच्या मैत्रिणी या मुली असल्यामुळे त्या बायकी खेळ खेळतात, आपण त्यांच्यात खेळायला जाणे आपल्याला शोभत नाही हा आत्मशोध लागल्यावर माझ्या धाकट्या भावाने ज्या खेळाचरणी आपली निष्ठा वाहिली, तो मुलग्यांचा खेळ म्हणजे क्रिकेट. मैत्रिणी नसल्यास व भावाबरोबर खेळण्याचा प्रसंग उद्भवल्यास खेळण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. शाळेत असेपर्यंत माझा भाऊ आणि त्याचे मित्र क्रिकेट सोडून काही खेळले नसावेत. (नंतर त्यांची निष्ठा डळमळीत झाली. फुटबॉलने त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला.) पूर्ण दोन टीम व्हाव्यात एवढे खेळाडू नसायचे, त्यामुळे पाठीवर नंबर पाडून खेळायचो. माझा भाऊ तर् टीव्हीवर मॅच बघताना बॅट्समनने फटका मारल्यावर स्वत: कपाटापासून टेबलापर्यंत पळून घरगुती रन्स काढून भारतीय संघाच्या रनांमध्ये भर घालण्याचा प्रयत्न करत असे. चेंडू भलतीकडे जातो त्याला वाईट बॉल म्हणतात अशी आमची अनेक दिवस श्रद्धा होती.
१३) कबड्डी - खूप खेळलो शाळेत. पिटीच्या तासाला क्वचितच कवायत केली असेल. बहुतेक वेळ कबड्डीच खेळत असायचो. कधी कधी खोखो.
१४) उभा/ बैठा खोखो - मुलंमुली एकत्र खेळायचो शाळेत. मुलं मुद्दाम पाठीवर धपाधपा खो द्यायची.
१५) ब्याडमिंटन - बागेत गेल्यावर खेळायचा खेळ. प्लॅस्टिकचं फूल इकडून तिकडे टोलवणे इतपतच आमची धाव होती.
१६) थाळीफेक - खरी थाळीफेक नाही, हलकी प्लॅस्टिकची थाळी असते ना हवेत उडवायची. बागेत खेळायचा अजून एक खेळ.
१७) ॲडवेंचर ॲडवेंचर - हा बहुधा माझ्या कझिनाने शोधून काढलेला प्रकार होता. कुठूनही उड्या मारायच्या, खांबावरून चढायचं, जोरजोरात उगीचच इकडून तिकडे पळायचं. बाकीची धाकटी भावंडं त्याच्या मागे मागे.
१८) लंगडी
१९) विटीदांडू उर्फ गिल्लीदंडा - फक्त पुस्तकांतूनच ओळख झाली. यात वापरले जाणारे शब्द, अंक तेलगू का कन्नड आहेत म्हणे.
२०) गोट्या उर्फ कंचे - कधीच खेळले नाही
२१) लगोरी उर्फ पिट्टो (हिंदी) - एखाद-दुसऱ्यांदा खेळले असेन फारतर. आजोळी गेल्यावर. मित्राने सांगितलेले नाव -
२२) आट्यापाट्या - असा असतो म्हणे एक खेळ. कधीतरी खेळल्ये, पण काही आठवत नाही.
२३) ठिकऱ्या - यालाच काचापाणी म्हणतात का? जमिनीवर चौकोन चौकोन आखून चौकोनाच्या रेषांना स्पर्श न होऊ देता लंगडी घालत घालत जमिनीवर फेकलेली ठिकरी उचलून आणायची. टिपिकल मुलींचा खेळ. बंगाली नाव - कितकित
२४) कोकोनट कोकोनट - बिट्टीचं बी किंवा अकाली बालमृत्यू होऊन खाली पडलेला लिंबाएवढा कोकोनट रा.धा.भि.ने मागच्या बाजूला फेकायचा एवढंच आठवतंय. काय खेळ होता हा बरं हा? डोकं खाजवावं लागेल अजून.
२५) आबाधुबी उर्फ बॉम्बॅस्टिक (मित्राचा शब्द)
२६) पतंग - कधी नाही उडवला.

चकण्याच्या पद्धती आणि गाणी: चकण्याच्या अर्थात सुटण्याच्या अर्थात राज्य कोणावर ते ठरवण्याच्या अनेक पद्धती होत्या. आमची आवडती पद्धत म्हणजे 'जास्तीची मेजॉर्टी/ कमीची कमेटी'. उलटसुलट हातांची मेजॉर्टी. मेजोरिटी हा इंग्रजी शब्द आहे व त्याला काही अर्थ आहे हे ठाऊक नव्हतं. दुसरी पद्धत म्हणजे गाणं संपताना शेवटचं बोट ज्या/जिच्यावर येईल त्या/तिच्यावर राज्य. आवडती गाणी:
१) आदा पादा कोण पादा
२) अँड डँड डँड डो, इल्ल पिल्ल पिल्ल पो, ऐसा कैसा होने दो, अँड डँड डँड डो
काय तरी गाणं आहे हे! काहीतरी इंग्रजी असावं असा संशय पहिल्या वाक्याला येतो न येतो तोच दुसरं वाक्य येतं ते द्राविडी वाटू लागतं. एवढ्यात धाडकन हिंदीसदृश वाक्य आपला पोपट करायला येतं.

विशिष्ट शब्द
'गडी' आणि 'भिडू' हे शब्द वरती आलेच आहेत. त्याव्यतिरिक्त पिदवणे, लिंबूटिंबू/ कच्चा लिंबू असे बरेच शब्द आठवतात. टाइम्प्लीज, चिटींग हे शब्द अर्थ न कळताच वापरायचो.

सध्यातरी एवढंच आठवतंय.

तुम्ही लहानपणी कोणकोणते खेळ खेळायचात?

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

ॲडमिट किडा हा एक खेळ राहिला. नेहमीप्रमाणे चकायचे, ज्याच्यावर राज्य येईल तो एकीकडे, बाकीचे दुसरीकडे. मग खालील जाबसाल झडायचे.

"ॲडमिट कीऽडा!"
"किसका घर?"
"मेरा!"
"कौनसा?"
"वो!" म्हणून कुठलीतरी एक जागा दाखवायची.

मग बाकी कंपूचे टास्क हे की त्या जागेला टच करायचे. आणि टच करेपर्यंत राज्य असलेल्याने आपल्याला पुन्हा टच केले तर बाद, कुणाला तो टच करू शकला नाही तर पुन्हा रिपीट, वगैरे. आणि अगोदरच्या जागेपासून गन्तव्य स्थानापर्यंत जाण्याची एक महत्त्वाची अट म्हणजे लोखंडी वस्तूंना टच करतच जायचं. लोखंड टच असताना जर राज्यवाला आपल्याला स्पर्शला तर कै फरक नै पडत. लोखंड टच नसताना टच झाला तर मात्र बाद वगैरे. चड्डीची बकले, हातातली कडी, कानातल्या डुलांचा मेटल वगैरे अर्थातच बाय डिफॉल्ट एक्स्क्लूडेड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ॲडमिट कीडा? आम्ही नाही खेळलेलो कधी
यावरून खांब खांब खांबोळी आठवला. आजोळी अंगणात मांडव असायचा, त्यामुळे तिथे गेलं की हमखास खेळायचो. शिरा पुरी, पुढच्या घरी असं म्हणत म्हणत राज्यधारी भिडू फिरत असे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खांबोळी आणि शिरापुरी वगैरे खेळ मला किशोर मासिकात वाचून फक्त माहिती. बाकी प्रत्यक्ष नाही खेळलो कधी. विटीदांडू, भोवरा, गोट्या हे खेळलो पण तितके नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्तं लेख!
यातले काही खेळायचो. विषामृत, दगड माती, डबडाईसपाईस, लपाछपी वगैरे. शाळेत कंदीमंदी खोखो/कबड्डी खेळायचो. नंतर अनेक वर्ष बॅडमिंटन. खेळायला सर्वात आवडणारा खेळ हा.
अप्पारप्पी नामक खेळ खेळल्याचं आठवतय. एक बॉल घेउन नजीकच्या पोराला तो मारणे/त्याने चुकवणे एवढाच खेळ.
==
बघायला क्रिकेट, फुटबॉल आणि टेनिस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आप्पारप्पी, आबाधुबीला आमच्याकडे शेकाशेकी असंही एक नाव होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जिथेजिथे सस्पेन्स आहे किंवा रिझल्ट अनप्रेडिक्टेबल आहे अशा जवळजवळ प्रत्येक गोष्टीतून लहानपणी खेळ निघालेला असायचा.

"बसच्या तिकीट क्रमांकाची बेरीज एकवीस की कायतरी आली तर एस्टी कायसंसं बक्षीस देते यावर विश्वास ठेवून भिकाऱ्यागत केरकचऱ्यातून तिकिटं शोधा आणि स्वत:चीही जपून ठेवून बेरजा मारत बसा"... इतका इनोसन्स आजुबाजूला होता.

अनसर्टनिटीच्या तत्वावर करवंद चावून तो कोंबडा निघतो की कोंबडी यावर खेळ (यातही लालबुंद रंगीत गर म्हणजे कोंबडा, फिकट गुलाबी पांढरट गर म्हणजे कोंबडी. सगळं जग असलंच..)

कोंकणात पावसाळ्यात भिंतीवर उगवणाऱ्या मॉस (चूभूदेघे) च्या मायक्रोस्कोपिक बारीक तुऱ्यांची डोकी एकमेकांत अडकवून दोन जणांनी दोन बाजूंनी तंतू ओढणं. ज्याचं डोकं तुटेल तो हरला.

दगडी / टणटणी या कातळावर उगवणाऱ्या बारक्या फुलातला पाकळ्या / केसर वगैरेंचा गुच्च नखांनी समूळ उचकटून त्याच्या बुडख्याला काळपट रंग आहे की शुभ्रच आहे यावर खेळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी प्रचंड बागडायचे लहानपणी.. माझ्या भावाला घरातून काढायला लागायचं खेळायला आणि मला आजुबाजूच्या घरात शोधून घरी आणावं लागायचं.

लंगडी, लपाछपी, ठिक्करपाणी, पकडापकडी, विषामृत, लगोरी, साखळी, कांदा फोडी, आबाधुबी, डबैसपैस हे बाहेरचे खेळ.
यात आम्ही डोंगर का पाणी खेळायचो, ज्याच्यावर राज्य असेल तो डोंगर किंवा पाणी म्हणणार ती सेफ जागा, डोंगर म्हणली तर उन्चवटे शोधायचे, पाणी असेल तर सपाट जागी आपण सुरक्षित. मग ज्याना नाही मिळणार त्याना पकडायचं, सगळे सेफ असले तर राज्य असणारा सेफ जागा बदलू शकतो.
सुई दोरा, यात ज्याच्यावर राज्य असेल तो कुणाचं तरी नाव मोठ्याने ओरडणार आणि त्याच्या मागे धावणार, त्या दोघांमधून , तिसरा गेला कि त्याच्या मागे राज्य असलेल्याने पळायचं
कलर कलर व्हिच कलर, राज्य असलेल्याने कोणताही रंग सांगायचा, मग त्या रंगाचं जे सापडेल ते जमा करायचं.
लाईन पार, राज्य असलेली एक लाईन पलिकडे पाठ करुन उभी राहायची, थोड्या अंतरावर बाकी सगळे, मग तिने कोणताही अंक सांगायचा, तेवढी पावलं बाकिच्यांनी पुढे जायचं, लोक जवळ आले असं वाटलं की राज्य असलेला मागे वळून जवळ आलेल्यांपैकी ज्याला पकडेल तो औट.
एक चिमुकली शाळा होती आणि त्याच्या बाहेर मोकळी जागा, त्यात बऱीच झाडं होती, त्यातल्या वडाच्या झाडाच्या पारंब्याना जो जास्त वेळ लटकेल तो सगळ्यात शक्तिमान. बंगल्यांच्या कंपाउंडवरुन उड्या मारुन मित्रांच्या घरी जायचा रस्ता काढणं हे अजून एक ॲडव्हेंचर, त्यात एका पोराचा उंचावरुन पडून हात मोडला तेव्हा बंद झालं. माझ्या मैत्रिणीच्या घरी हिरव्या चाफ्याचं झाड होतं आणि तिच्या आज्जीने झाडात जायचं नाही, साप असतात असं बजावलं होतं, आम्ही मुद्दाम साप पकडायला झाडिमध्ये काड्या घेउन जायचो पण साप काही मिळायचा नाही.
दोघांकडे झोपाळे होते, मग त्यावरुन मोठ्ठा झोका घेउन खाली उड्या मारायच्या, ज्याची उडी सगळ्यात लांब तो जिंकला असले प्रकार चालायचे.
सुट्टीत तर नुसता हैदोस हुल्ला चालायचा, घरात, पत्ते, घर घर, डॉक़टर डॉक्टर,भातुकली, बाहुलीचं लग्न हे असायचं. संध्याकाळी सायकल घेऊन सगळीकडे चकरा मारत बसायचो, कधि कधि सायकल रेस लागयची.

मी लहानपणी, बोरीवलीला रहायचे, तिथे सगळे बंगले होते, आणि ते होते पण एक चढण चढल्यावर. अजिबात वर्द्ळ नसायची रस्त्यावर, आमचे खेळ रस्त्यावरच चालायचे, मी, माझ्या मैत्रिणी, मित्र , त्यांचे धाकटे भावंड सगळे मिळून धुडगूस घालायचो. काळोखाला सुरुवात झाली की प्रत्येकाच्या घरुन कोणीतरी यायचं, आणि बाकिच्याना घरी पिटाळायचं, त्यावेळी तिथे वाघांची भिती असायची. एकुणच लै मज्जा असायची...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

घोडीघोडी आणि आबाधुबी ह फक्त मुलांचे खेळ होते ते भरपूर खेळलो शाळेत.
क्रिकेट हाएक दळभद्री खेळ हे स्पष्ट मत. फुटबॅाल फार नाही खेळलो पण दादर,परळ अथवा क्रॅास मैदानात शेट्टी हॅाटेलवाल्यांकडची मुले या पावसाळ्यात चिखलात खेळताना पाहायला फार मजा येत असे. कॅरम ,पत्ते मे महिन्याच्या सुटीत थोडेफार खेळलो तरी कंटाळवाणे वाटायचे. बुद्धीबळच्या वरच्या पायरीवर गेलो नाही परंतू आवडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही गावाकडल्या देवळात हा खेळ खेळायचो.
पाच जण लागायचे, त्यापैकी चार जण देवळातले (किंवा एखाध्या मोठ्या खोलीतले) चार कोपरे पकडायचे, ज्याच्यावर राज्य आहे तो त्यांच्या मधे फिरत रहायचा. कोपरा पकडलेली चारही जणे आपापल्या जागा (कोपरे) बदलायचे, तसे करतांना जर पाचव्या खेळाडुने एखादा कोपरा पकडला तर राहिलेल्या खेळाडुवर राज्य यायचे. खुप मजा यायची, जेव्हा राज्य असलेला खेळाडु एका हाताने टाळी मागत फिरायचा आणी आम्ही त्याला जोरदार टाळी देउन कोपरा बदलायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

९) राम लक्शुमण सीता सोन्याचा गोळा

हे 'डोंगराला आग लागली पळा पळा पळा' होतं. खेळ बाकी तोच.

२०) गोट्या उर्फ कंचे

शाळेतली मवाली पोरं अड्डू नामक एक प्रकार खेळायची. दोन ठेवायच्या, आणि एकीने मारायचं. त्यातल्या कोणाला लागेल ह्यावर बेटींग. नंतर आम्ही गोरेगाव पूर्वेच्या घरात गेलो तेव्हा क्रिकेट खेळून कंटाळलो की गोट्या खेळायचो. दोन फरशांमध्ये झालेल्या खड्ड्यात गोल्फ टाईप.

२४) कोकोनट कोकोनट

राज्य असलेल्या प्राण्याने एका वर्तुळात उभं राहून एक काडी/काहीही फेकण्यायोग्य वस्तू मागे फेकायची. त्यासाठी शब्द होते "कोकोनट कोकोनट?" मग मागचे प्राणी "येस कोकोनट" करून रेकले, की मगच ती मागे फेकायची. ती कोणी झेलली तर त्या झेलणाऱ्यावर राज्य, नाहीतर मग इतर प्राणी काय वाट्टेल तो आकडा ओरडायचे. तेव्हढ्या उड्या मारून त्या वर्तुळापासून त्या वस्तूपर्यंत जायचं. नाही जमलं तर परत राज्य. सगळ्यांनी कोणाला बकरा बनवल्यास तो प्राणी जाम वैतागायचा.
बाकी सगळे खेळ खेळलोय. क्रिकेट जरा त्यातल्या त्यात जास्त. नीट कधी जमलाच नाही. शाळेत मोडकी लाकडं आणि अगदी जिवाची बाजी लावून आणलेला चेंडू वगैरे जमलं तरच खेळता यायचं. तरीही शाळेत बाटलीत वाळू भरून त्याने फुटबॉल खेळायचो, कारण टणटणीत फूटबॉल जन्मात मिळायचा नाही. मी आणि माझा एक मित्र फार रानटीपणे ती बाटली हाणत असल्याने आम्ही बऱ्याच मुलांचं रक्त सांडवलंय.
कपड्याचा बॉल- बॉल शाळेत आणणं (जप्ती, १० रबरी आणि सॉफ्टेनिस २५ रुपये) किंमत परवडणारं नसल्याने, किंवा शाळा जप्त करत असल्याने बॉल शाळेत आणता यायचे नाहीत. मग रुमाल कलात्मकपणे बॉलच्या आकारात गुंडाळून त्याने आबाधुबी, कॅच कॅच हे अतिबावळट खेळ आम्ही फुटबॉलपेक्षा जास्त उत्साहाने खेळायचो.
शाळेचे संघ होतेच कबड्डी, लंगडी, खोखो, व्हॉलीबॉलचे. सगळ्यांनाच त्यात थोडं थोडं खेळावं लागायचंच. त्यातल्या त्यात कबड्डी चांगली जमायची. एका चढाईत पूर्ण लोन मारलेला आठवतोय.
कॅरम एकेकाळी चांगला जमायचा. आता अजिबात बसत नाहीत. पत्ते व्यवस्थित खेळता येतात. वेगवेगळ्या प्रकारे पिसणे, खोटेच पिसणे, जादू इत्यादी जमतात. रमी, मेंढीकोट, सात-आठ, ५-३-२ इ. आजीबरोबर खेळल्याने मस्त येतात. पोकर जाम आवडतो.
बुद्धीबळ मात्र मी डॉमिनेट करतो. शाळेत सलग तीन वर्षं, ज्यु.कॉ. मध्ये २ वर्षं, सि.कॉ. मध्ये एक वर्ष चॅम्पिअन. नंतर ज्यु कॉ मध्ये फक्त बुद्धिबळ खेळायला जाय्चो. ह्यापायी २ वर्षांत मोजून १० हून कमी लेक्चरं अटेंड केली असतील. नंतर ह्यातली गोडी काहीतरीच वाढली आणि पुस्तकंच्या पुस्तकं वाचली. कमीत कमी ५०-६० ओपनिंग्ज अजूनही लक्षात आहेत.
ऑफ्स बॅट्स, पुस्तकातलं क्रिकेट, बॅटलशिप हे महा पाणचट खेळही राहिले. तेही खूप खेळलोय.
कॅच कॅच चा उपप्रकार बीच का बंदर, नंतर डॉग अँड द बोन (मध्ये ठेवलेला रुमाल कोणी पहिले उचलून पळायचं) हेही राहिले. हे खेळ फार मजेशीर आहेत. हे आम्ही टी.वाय.लाही खेळलो.
श्रीमंत पोरं 'उनो' खेळायची/खेळतात. हे पत्त्यांचं फार शेंबडं व्हर्शन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

क्रिकेट

माझं बालपण एक पुणे 30 वाडा आणि एक उपनगरी इमारत यात गेलं. क्रिकेट या खेळाने 80% तरी आठवणी व्यापल्या आहेत.

वाड्यात क्रिकेट खेळायची जागा एल आकाराची होती. डावखुऱ्याच्या स्क्वेअरलेग ते मिडविकेट एवढा पट्टा मोकळा होता (उजवखुऱ्याचा पॉईंट ते कव्हर.) क्रिकेट हा फक्त पुरुषी खेळ आहे हे ज्ञान बऱ्याच काळानंतर झालं, कारण वाड्यातल्या मैत्रिणीही क्रिकेट खेळण्यात अत्यंत तरबेज होत्या. वाड्याच्या खिडक्यांच्या काचा आमच्या आधीच्या पिढीने आधीच यमसदनी धाडल्या असल्याने ते लोड नव्हतं. फक्त कधीकधी बॉल लोकांच्या घरात जाणे वगैरे होई, पण बॉल जप्त करणे, चिरून दोन तुकडे करणे इतकं खडूस कोणीच नव्हतं. एका मोकळ्या खोलीत 'मालकाचा मुलगा' ICWA चे क्लासेस घेत असे. एका विशिष्ट कोनात मारलेला स्क्वेअरकट त्या क्लासात जाई, पण तोही आदल्या पिढीतला क्रिकेटपटू असल्याने एवढं टेनशन नसायचं. (पुणे 30 = खडूस, तुसडे या लोकप्रिय समजाला छेद देणारं आहे खरं.)

पुढे इमारतीत गेलो, तेव्हा आसपास बरीच मोकळी शेताडी होती. तिथे कसलीच भीती नव्हती. इथेही, आम्हां पोरांपेक्षा उत्तम खेळणारी एक मुलगीच होती. अक्षरशः तडाखेबंद बॅटिंग होती तिची. पुढे ती माझ्याच कॉलेजच्या संघाकडून खेळली, महाराष्ट्राच्या महिला संघाकडूनही खेळली.

(क्रमशः)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पुणे तिसात क्रिकेट ला प्राधान्य तर असेच . वाड्यात वय तीन चार ते वय साठ सर्व सामील व्हायचे . त्यातले एक दोघे क्लब क्रिकेट खेळणारे होते एक जण महाराष्ट्रकडून विजय मर्चंट खेळला, पण वाड्यातील खाचखळगे युक्त पिच वर खेळल्यावर अश्विन जडेजा काय विशेष वाटत नाहीत . आमच्याकडे विशिष्ट आकारामुळे स्ट्रेट ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह, हुक पूल ( फक्त मिड विकेट ला ) परवानगी . स्वीप ब्यान . बॉल एकाच्या स्वयंपाक घरात जाई म्हणून . वाडा मालक डॉक्टर . तेही कधी कधी सामील व्हायचे . प्रेक्षक वर्ग , कॉमेंटेटर वय उणे तीन किंवा अधिक सत्तर . कॉमेंटेटर बॉक्स जिन्यात . एखादी काच फुटल्यानंतरच मग कबड्डी , गोट्या वगैरे अ विध्वंसक देशी खेळ प्रेम . तात्पुरते . इतर खेळांपेक्षा क्रिकेट ला उच्च दर्जा .बाकी पत्ते, डबा ऐस पैस वगैरे उन्हाळी खेळ .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चकायला आम्ही १० , २० , ३० तर वापरायचोच... अजून अँडा डँडा डँडा डो असयचं,
इंकी पिंकी पाँकी, इनी मिनी मायना मो, इन पिन सेप्टी पिन आणि उssssमा जोssssशी पण असायचं.

कट्टी केली की, कट्टी तर कट्टी, तू खा मट्टी, मी खाणार च्याकलेट हे अजून वर चिडवायला मजा यायची.
आओ मिना सारखं अजून होतं

त्यातलं पहिलं
१० २० ३० ४० ५० ६० ७० अस्सि नब्बे सौ,
सौ से निकला धागा
चोर निकलके भागा,
चोर गया पानी मे,
पकडा उसके नानी ने,
नानी गयी लंडन,
वहासे लायी कंगन,
कंगन गये टूट,
नानी गयी रुठ,
नानी को मनाएंगे,
रसमलाई खाएंगे,
रसमलाई कच्ची
हमने लाई मच्छी,
मच्छि मे काटे,
काटे लगे जोर से,
हमने लिये समोसे,
समोसे बडे अच्छे,
नानीजी नमस्ते..

दुसरं

छाया माया,
पड माझ्या पाया,
पायात आली सुपारी,
तुझं लग्न दुपारी,
दुपारी आले पाहुणे,
ते तुझे मेहुणे,
मेव्हण्यांनी
आणला खाऊ,
तो तुझा भाऊ,
भावानी आणली बोरं,
ती तुझी पोरं,
पोरांनी आणली जाई,
ती तुझी आई,
आईने आणलं मस्सू
ती तुझी सासु,
सासूने आणलं काळं कुत्रं
ते तुझं मंगळसुत्र...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

महाराष्ट्र सारस्वतात या खेळांबद्दल एक आनुषंगिक निरीक्षण आलेले आहे जे मराठी भाषेच्या जडणघडणीवर आणि एकूणच महाराष्ट्रातील भाषिक सिनारिओच्या इतिहासावर थोडासाच परंतु प्रखर प्रकाश टाकणारे आहे. विटीदांडू इ. खेळांमध्ये आकडे मोजणे हा प्रकार असतो. गली किंवा गधीपासून विटी किती लांब आहे ते मोजताना आकडे एक दोन तीन चार असे न मोजता "वकट, लेंड, मूड, नाल" असे मोजतात असे सारस्वतात दिले आहे. सारस्वतकार भावे हे मूळचे ठाण्याचे. भौगोलिकदृष्ट्या ठाणे कोकणात. तेव्हा कोकणात हे कदाचित प्रचलित असेलही. याला अजूनेक प्रत्यंतर म्हणजे यदाकदाचित नामक महाभारतावर आधारित विनोदी नाटकात दुर्योधनही सेम टु सेम तसेच आकडे मोजतो. आता यदाकदाचितचा सांस्कृतिक तोंडवळा मालवणी, म्हणजे कोकण प्रदेशातलाच आहे. कोकणात बालपण गेलेल्या किंवा तिथे येऊन जाऊन आलेल्या कुणी सांगावं की असे आकडे कधी ऐकण्यात आलेत का. शक्यतोवर ब्राह्मणेतर जातींमधला डेटा अपेक्षित आहे.

तर हे महत्त्वाचं का आहे? कारण ते "वकट लेंड मूड नाल" हे तेलुगु आकडे आहेत. कुठल्याही भाषेतले कुठले शब्द बदलतात आणि कुठले आहे तस्से राहतात यांबद्दल काही सिद्धांत प्रचलित आहेत. त्यानुसार आकडे बदलणं जवळपास अशक्य असतं. त्यातही एक ते ३-४ हे आकडे काही केल्या बदलत नाहीत. इनफॅक्ट ब्राहुई भाषा द्राविडी आहे हेही सुरुवातीला माहिती नव्हते कारण तिच्यात भरभरून उर्दू, बलोची शब्द आहेत. हे त्यांना कसे कळाले त्याचे एक कारण म्हणजे तिथले आकडे. दोन, तीन, इ. साठी अनुक्रमे इरा, मुसि, इ. शब्द आहेत. ते इरंटु, मुन्रु, इ. शी साधर्म्य असणारे आहेत.

कोणे एके काळी महाराष्ट्रातली बहुसंख्य जनता द्राविडी भाषा बोलत असली पाहिजे या कयासाला यामुळे थोडी पुष्टी मिळते. हा काळ कधीचा असेल ते माहिती नाही. किमान गेली बाराशे वर्षे तरी मराठी व मराठीसदृश भाषा महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक्स बोलत आहेत हे ऐतिहासिक पुराव्यांवरून सिद्धच आहे. त्याअगोदर म्हणजे नक्की किती अगोदर? काय माहिती...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही म्हणता ते आकडे एक दोन तीन मोजताना - इंग्रजीत/रोमन कार्डिनल/आर्डिनल नंबर्स प्रमाणे असा भेद असावा कारण खळगीपासून गोटी/ढप/डफ /मोठी गोटी हे अंतर पावलांनी पहिलं,दुसरं,तिसरं~~प्रमाणे असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या केसमध्ये कार्डिनल वापरच होतो/व्हायचा.

तुम्ही तसे आकडे ऐकलेत का कधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक कानडी मित्र( नरसण्णा) काह म्हणायचा.
मराठीतले सातारा सांगली भागातले
१ एकलम खाजा,
२ दुब्बी राजा
३ किराण भोजा,
४ चारी चौकटे,
५ पंचा पांडव ,
६ सैया दांडव,



१३ बाळू मराठा,
१४ चौदा हात लंगोटा.

हे गाणं मिपावर कधीतरी आलेलं आहेच.
ते आता मजेशिर वाटतं मारियोच्या आणि asphalt काळात.
( बालपण गावाकडे गेलेले,सुटीत तिकडे गेलेले नशिबवान. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सगळं त्या लंपनच्या पुस्तकात पण आहे,

पंचा पांडू,
सह्य दांडू,
सप्त पोतडे,
अष्ट जिंकिले,
नउ नउ किल्ले,
दश्शा पेडा
अकल कराठा,
बाळू मराठा,
तिरंगी सोटा
चौदा लंगोटा,
पंधराशी परिवळ,
सोळी घरिवल,
सतरा सिते
अठरम गरुडे
एकोणीस च्यकच्यक
विसा पकपक
एकवीस कात्री
बाविस रात्रि
तेविस त्रिकमफुल
चोविस चोर
पंचविस मोर

जितके मोर जास्त तितका अभ्यास कमी पण मार्क जास्त...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

रोचक माहिती.

महाराष्ट्रात परंपरेने दोनाचा पाढा हा 'बे'चा पाढा म्हणूनच शिकवला/वापरला जातो. पाढा हा मुख्यत्वे आकडेमोड (आर्थिक व्यवहार) करण्यासाठी वापरले जातात. ज्याअर्थी आकडेमोडीसाठी 'बे' हा गुजराती शब्द इथे पूर्वापार वापरला जातोय, त्याअर्थी व्यापार-उदीम हा पूर्वीपासूनच गुजराथ्यांच्या हाती होता, असे समजावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडी गल्लत होतेय असं वाटतं. गुज्जू लोकांचा व्यापार उदीम हडप्पा काळापासून महशूर आहे आणि त्याबद्दल कोणी शंका कधी घेतही नाही.

बे या आकड्याचा त्याच्याशी संबंध नाही. कुठल्यातरी भाषाशास्त्रीय पुस्तकात वाचल्याप्रमाणे द्वि चे बे होणे हा प्राकृतातला एक प्राचीन फिनॉमेनन आहे, तो सध्या फक्त मराठी व गुजरातीने रिटेन केलेला आहे. मूळ गुजरातीतच आहे असे नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गोट्यातले राजाराणी आणि सोरट फार खेळलो. बरोबरचाच कच्छी मुलगा अक्कू पुढे मोठेपणी बेटिंग/मटकाचा बुकी झाला.
पावसाळ्यात ज्या वाडीत/बागेत चिखल असेल तिथे छत्रीच्या तारा रोपून खेळ असे. पाऊस संपल्यावर दगड/फरशिच्या कपच्या फेकायचो. एकाने फेकल्यावर दुसय्राने त्याच्या वितीच्या अंतरावर कपची फेकली की त्यास एक गोटी मिळायची. हाच खेळ एकदा डिस्कवरीवर युअरोप परिसरात कुठेतरी ज्येष्ठ नागरिक खेळताना दाखवला होता. फरक इतकाच की ते चिझच्या डिस्क वापरत होते व बक्षिस म्हणून चिझच द्यायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

भोवऱ्याने खेळत त्यात भोवरा कसा टाकावा याच्या दोन स्टायली. गिच्चा/गुच्चा आणि साधा अशा दोन. साधा म्हणजे अंडरार्म सरपटी बॉलच्या ॲक्शनने भोवरा फेकायचा. गिच्चा/गुच्चा म्हणजे विशिष्ट अँगलने, जरा उंचीवरून टाकायचा. तो कै मला कधी जमला नाही. पण भोवरा फिरवताना मजा यायची खरीच. साधी स्टाईल असली तरीही.

गोट्यांमध्ये सिमेंट गोटीला वष्टर म्हणायचे आमच्याकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भोवरे आणि बेब्लेड ह्या दोन्हीही पिढ्यां(की संस्कृत्यां?)मधला मी आहे. माझ्याकडे एक झक्कास फ्रिक्शनवाला भोवरा होता. तो त्या हॉट एअर बलून सारखा, पण भरीवच होता, आणि त्याच्या टोकाभोवती एक रबरी आवरण होतं. तो भोवरा जमिनीवर तिरका धरुन ती छोटी रबरी टोपी घासायची. मग ती आणि ते टोक भन्नाट वेग पकडायचे. मग तो सरळ जमिनीवर ठेवला की चांगला ७-८ मिनिटं फिरायचा. मी बराच लहान असताना त्यावर बराच रिसर्च करुन ते टोक असं घासलं होतं की भोवरा फिरायचा थांबला तरी पडायचा नाही.
नंतर शाळेत दोरीच्या भोवऱ्यांनी खेळलो. तिथे माझ्या मित्रांनी खूप गोष्टी शिकवल्या. फेकल्यावर तसाच लगेच हवेत उडवून हातावर कसा घ्यायचा, फिरत असताना दोरी त्याच्याभोवती परत टाकून कसा हवेत उडवायचा, हातावरून डोक्यावर, परत हातावर इत्यादी किडे. पण ते तेव्हढंच. नंतर भोवरा फार खेळलो नाही. बेब्लेड हा प्रकार जरा एक वर्षं खेळलो. हा बराच लेम आहे भोवऱ्याच्या मानाने, आणि बराच खर्चिकही. भोवरा १० च्या आत मिळतो. दोरीसकट. त्या दोरीला स्टॉपर म्हणून असणारी, काचेच्या कोल्डड्रिंक्सच्या बाटल्यांची, ओपनर ने टक्क करून जी उघडतात ती झाकणं रस्त्यावर हजारो पडलेली मिळतात.
असो. एज ओल्ड जनरेशन गॅप डीबेट सुरु होण्याआधी थांबलेलं बरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

टेबलटेनिसच्या रॅकेट आणि बॉलने घरातल्या एखाद्या रूममध्ये स्क्वॅश खेळणे हाही एक खूप जबरा छंद होता लहानपणी. लय मजा यायची. खोलीतल्या खोलीतच पण काय धावाधाव होत असे! अफाट प्रकार होता एकूण.

स्टार स्पोर्ट्सवर तेव्हा अनेक खेळ पाहून माहिती होते. पूल, स्नूकर आणि बिलियर्ड्स हे तीनही सारखे वाटणारे खेळ वेगळे असतात हे तिथेच बघून कळाले. बाकी पूल खेळायचा चान्स आता भारतातही आहे पण कधी योग नै आला. आइंडहोवेनमध्ये मात्र एका पबात खेळलो. काही येत नव्हतं, तो क्यूबॉलही पॉकेटमध्ये गेला. आसपासचे लोक जरा कुजबुजू लागले, पण त्यांना फाट्यावर मारून तसेच दोनपाच बॉल मारून खेळलो आणि एक इच्छा पूर्ण केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पायमोज्यात क्रिकेटचा बॉल टाकुन तो पायमोजा आम्ही दोरीने छताला असलेल्या हुकात अडकावयाचो.
नंतर मग बॅट घेउन तो बॉल फटकावयाचा, हुकला की आउट. एका वेळी किमान १००-२०० रन्स तरी फटकावयाचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फायटिंग चेस हाही एक गेम होता. बुद्धिबळाच्या सर्व पिसेस मांडायच्या नेहमीप्रमाणे आणि त्यानंतर त्याचा कॅरम करायचा. आपल्या सोंगट्या म्हणजे स्ट्रायकर. ज्याच्या सर्व पिसेस अगोदर पडतील तो हरला. तिघा भावंडांमध्ये वर्ल्ड चँपियनशिपा लावल्या जात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खालील बुद्धिबळांच्या उपप्रकारांत जरा डोकं लागतं.
सप्लाय हा चेसचा भन्नाट उपप्रकार मी एफवायला शिकलो. ४ लोक २-२च्या टीम्स करून बसतात. मध्ये २ पट. फार काही नाही, सगळ्यांनी सरळ बुद्धिबळ खेळायचं. 'कॅच'इतकाच, की एखादी सोंगटी ठार झाली की ती आपल्या टीममधल्या खेळाडूला द्यायची. (ह्यासाठी समान टीममधल्या दोन खेळाडूंनी वेगळे रंग घेतले पाहिजेत) मग त्याचा डाव असल्यास काहीतरी हलवण्याच्या ऐवजी तो ती सोंगटी, त्याला हवी तिथे ठेवू शकतो. हा खेळ पटकन संपत नाही.
चेसहार्ट्स- फक्त ८ प्यादी बदाम(हार्ट)शेपमध्ये पटावर ठेवायची. (a7,a6,b8,b7,b6,c8,c7,c6 काळी आणि विरुद्ध कोपऱ्यात तशीच पांढरी). मग त्या गोट्यांच्या खेळासारखं(एका प्याद्यावरुन उडी तरी मारा किंवा एक घर चाला) खेळायचं. चेकर्ससारखं समोरच्याच्या प्याद्यावरून उडी मारल्यास ते गारद. पहिले सगळी ज्याची संपतात तो हरला. एका चालीत मारता येत असल्यास उड्या कितीही मारू शकतो, पण एक घर चाल मात्र एकच करायची असते.
पॉनगेम- फक्त प्यादी (बाकी काहीच नाही) त्यांच्या नेहमीच्या सुरुवातीच्या ठिकाणी ठेवून सरळ खेळायचं. ह्यात पहिले पॉन प्रमोशन जो करेल तो जिंकतो. हा प्रकार अडाणी बुद्धिबळ शिक्षक प्याद्यांचे डावपेच शिकवायला वापरतात.
अँटी चेस- शीर्षक self explanatory आहे. नेहमीप्रमाणे डाव मांडून स्वत:च्या सोंगट्यांनी स्वत:विरुद्धच खेळायचं. स्वत:च्या सगळ्या सोंगट्या गारद झाल्यास विजयी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

शिवाजी म्हणतो अमुकतमुक करा. उदा. डावा हात वर करा इत्यादी. आणि सर्वांनी तसे करायचे.

मधेच सुचना देणारी व्यक्ती शिवाजीऐवजी दुसरे नाव (उदा. तानाजी) घ्यायची, तेव्हा मात्र सांगितलेली कृती करायची नाही. केलीत तर आऊट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रसिद्ध शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांच्या मराठी शिवचरित्राच्या प्रस्तावनेत (भाग १) या खेळाचा उल्लेख आहे. त्यांच्या चरित्रात शिवाजी असा एकेरी उल्लेख का आहे हे सांगताना त्यांनी हे उदाहरण दिलेले आहे. ते म्हणतात की एकेरी उल्लेख म्हणजे अनादर नव्हे, उदा. माझ्या लहानपणी "शिवाजी म्हणतो" असा खेळ असे. तेव्हा खेळात फक्त "शिवाजी म्हणतो" असे म्हटलेल्या आज्ञाच पाळायच्या हा नियम म्हणजे समाजमनातील शिवाजीबद्दलच्या आदराचे प्रतीक आहे. वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मधेच सुचना देणारी व्यक्ती शिवाजीऐवजी दुसरे नाव (उदा. तानाजी) घ्यायची, तेव्हा मात्र सांगितलेली कृती करायची नाही. केलीत तर आऊट!

हा तुमच्याकडील पाठभेद असावा. मूळ नियमांप्रमाणे, आऊट होण्याकरिता (१) 'शिवाजी म्हणतो'ने सुरू होणाऱ्या आज्ञा पाळणे, आणि (२) 'शिवाजी म्हणतो' ने सुरू होणाऱ्या आज्ञा (जसे, नुसतेच 'उड्या मारा', विदाउट द 'शिवाजी म्हणतो' प्रीफिक्स) पाळणे, एवढे दोनच निकष आहेत.

अर्थात, तुमच्या पाठभेदातून कोणत्याही मूळ नियमाचे उल्लंघन होत नाही म्हणा, परंतु डझण्ट धिस डीव्हियण्ट मोडस ऑपरण्डी मेक द होल थिङ्ग अ बिट रादर टू ऑबव्हियस? काइण्ड ऑफ अ डेड गिव्हअवे?

बाकी, 'सायमन सेज़' (पाठभेद: 'सिंपल सायमन सेज़') नावाच्या एका इंग्रजी खेळाची ही मराठी आवृत्ती आहे. तेथेदेखील 'सायमन'चा उल्लेख एकेरीच आहे. ('मिष्टर सायमन' किंवा 'सर सायमन' नव्हे, माइंड यू!) आता, हा एकेरी उल्लेख आणि त्याचबरोबर केवळ त्या कोण्या सायमनानेच (नावानिशी) सोडलेले हुकूम पाळायचे, हे त्या सायमनाप्रति आदराचे द्योतक आहे किंवा कसे, हे एक तो सायमनच जाणे. (व्यक्तिश:, मला हा सरकारी/ब्युरॉक्रटिक कार्यपद्धतीचा मासला वाटतो. "साह्यबाच्या सहीनिशी आर्डरीचा कागद घेऊन या; त्याबिगर फाईल हालायाची नाही!" इंग्रजी (मॅकॉलीय) शिक्षणपद्धती ही हिंदुस्थानी कारकून बनवणारी पद्धती होती म्हणतात, त्याचा हा मराठीकृत इंग्रजी खेळ म्हणजे उत्तम नमुना आहे. आणि असल्या या कारकुनी इंग्रजी खेळाचे मराठीकरण करताना त्यात फुका शिवाजीस खेचून खरे तर त्या (एकेरी किंवा बहुवचनी) शिवाजीची पातळी आपणच खाली आणलेली आहे. पण लक्षात कोण घेतो? असो चालायचेच!)

(गरजूंनी Simon Says असे गुगलून/विकून पाहावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या 'सायमन सेज़'च्या विकीदुव्यावर तळाशी कोठेतरी अगदी या नाही, तरी अशासारख्या/काहीश्या समांतर अशा दुसऱ्या एका खेळाचासुद्धा उल्लेख आहे.

In a Swedish version, Gör si, gör så ("Do this, do thus"), the leader says either "do this" or "do thus" while performing an action. For failing to follow the correct command, "do this", or following the wrong command, "do thus", a child must sit down until a new leader is chosen.

In the late 1930s in New Zealand, non commissioned officers were leading troops in a brain stimulation game as part of training classed as informal activities called, 'do this, do that.'

या खेळाची मराठी आवृत्ती('असे-तसे')सुद्धा लहानपणी खेळल्याचे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी स्त्रीवादी होण्याची सुरुवात लहान वयातच झाली.

आमच्या इमारतीचं अंगण तसं बऱ्यापैकी मोठं. म्हणजे भलते अर्थ काढू नका. गल्लीतल्या इतर इमारतींसमोर ४ बाय ७० फूट जागा असेल तर आमच्याकडे २० बाय ७० असेल. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींमधली मुलंही आमच्याइथेच खेळायला येत असत. या सगळ्यांत आमच्या वयाची मुलगी मी एकटीच होते. दोन-तीन वर्षांनी लहान किंवा मोठे मुलगे खेळायला आले तरी त्या मुली आमच्यात खेळायला येत नसत. अर्थातच बहुतेकसे खेळ मुलांचेच असायचे - क्रिकेट, गोट्या/गोटे, जरा मोठं झाल्यावर सायकलवरून पाडापाडी - शिवाय जोडीला लपाछपी, डब्बाऐसपैस, बॅडमिंटन वगैरे लिंगविहीन खेळ.

क्रिकेटनं मला स्त्रीवादाची जाणीव करून दिली. म्हटलं क्रिकेट तरी ते चार्वी म्हणते त्याप्रमाणे बॅट-बॉल असायचं, अर्थातच. त्यामुळे 'कटकी रन' असे नियम असायचे. मी माझ्या मुलगी असण्याला साजेसे फ्रॉक घालायचे आणि खेळायला जायचे. शिवाय माझ्या व्यक्तिमत्त्वाला अनुसरत, बॅट आणि बॉलची भेट क्वचितच घडण्यासारखी बॅटिंग करत असे. पण मोठ्या घेराचे झगे मला कायमच त्रिफळाचीत होण्यापासून वाचवत. शिवाय बॅटला बॉल न लागल्यामुळे 'कट' होत नसे, त्यामुळे रनाऊटही करता येत नसे. मग 'एलबीडब्ल्यू'चा नियम काढण्यात आला; पण त्यातही फ्रॉकचा घेर बसत नाही.

मग सरळच फ्रॉकला बॉल लागलेला चालणार नाही; किंवा पाच वेळेलाच चालेल, वगैरे नियम बनवायला सुरुवात झाली. मग मीही आरडाओरडा केला; 'माझ्या एकटीसाठी तुम्ही नियम बनवू शकत नाही'; 'तुमच्या चड्डीला बॉल लागला तर तेही मोजलं पाहिजे'; वगैरे वगैरे.

यथावकाश बॅटबॉलचा खेळ बंद झाला; त्यात माझा किती हात (किंवा फ्रॉक) होता याचा ऊहापोह मी केला नाही. विषामृत, दगड-का-माती, लगोरी, डब्बाऐसपैस, गोट्या असे मलाही आवडणारे खेळ सुरू झाले. खिडक्या फुटतात म्हणून बॅट-बॉलला विरोध करणारे इमारतवासीही खूश झाले. आणि सर्वजण आनंदानं नांदू लागले.

अजूनही आम्ही इमारतीत भेटलो की सायकलवरून पाडापाडी आणि पावसातल्या लगोरीच्या आठवणी काढायचं सोडून होळीच्या वेळेस कशी बोंब मारायचो; गोट्या खेळताना मक्याला कसा पिदवला होता; कानू नावाचा वॉचमन कसा विचित्र होता; इमारतीतल्या आणखी काही 'गमतीशीर' लोकांमुळे आमचं बालपण कसं समृद्ध झालं, अशा गप्पा मारतो. फ्रॉकवाल्या मुलीसोबत खेळल्यामुळे माझ्या बरोबरच्या कोणत्याही मुलावर कसलेही विचित्र परिणाम झाल्याचं दिसत नाही. एकीकडे आवारातल्या कैरीचं पन्हं आणि ते नसेल तर लिंबूसरबत पिताना आम्ही आपुलकीनं एकमेकांच्या कुटुंबं आणि करियरबद्दलही गप्पा मारतो.

१. या शब्दप्रयोगाचा शब्दार्थ समजायला बरीच वर्षं लागली. पण डोक्यातल्या न्यूरल नेटवर्कला त्याचा अन्वयार्थ लगेच लागला होता.
२. ते कैरीचं झाड आहे, आंब्याचं नाही; असं इमारतीतल्या एका काकांना सांगायची मानसिक तयारी मी केली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये एका जागी बालबालिकांचे क्रीडाप्रकार दाखविले आहेत. ते असे:

फुले तोडणे आणि वेचणे, माळा करणे, घर बांधणे, दुहितृका (लाकडाच्या अथवा दोरीच्या बाहुल्या बनविणे), लुटुपुटीचा स्वैपाक, आकर्षक्रीडा-पट्टिकाक्रीडा (सोंगट्या आणि फाशांनी पटावर खेळणे), मुष्टिद्यूत(?), मध्यमाङ्गुलिग्रहण (लपविलेले मधले बोट पकडणे), षट्पाषाणक (सहा खड्यांनी सागरगोट्या खेळणे), सुनिमीलितक (आंधळी कोशिंबीर), आरब्धका(?), अनिलताडितका (भिंगोर्‍या), गोधूमपुञ्जिका (धान्याच्या राशीमध्ये नाणे लपविणे, अङ्गुलिताडितका (डोळे मिटलेल्या एकाच्या कपाळावर दुसर्‍याने टिचकी मारून पळायचे आणि डोळे उघडल्यावर त्याला ओळखायचे), मण्डूकिका (बेडकाप्रमाणे उड्या मारायची शर्यत), एकपादिका (लंगडी घालत शर्यत), लवणवीथिका (आट्यापाट्या?).

माझ्या स्वत:च्या लहानपणातील नेहमीचे लपंडाव, विटीदांडू असे खेळ होतेच पण विशेष आठवणारे खेळ म्हणजे धनुष्यबाण, भिंगऱ्या आणि आमच्या छापखान्यातील कोटेशनांचे बंगले करणे. आमच्या घरी संपूर्ण महाभारताच्या भाषान्तराचे एक सचित्र पुस्तक होते आणि त्यामध्ये अर्जुन-कर्ण, भीम-दुर्योधन अशा single combats ची, तसेच अन्य देवादिकांची, रंगीत आणि आकर्षक चित्रे होती. ती बघून मीहि 'धनुष्य' ह्या शस्त्राच्या प्रेमात पडलो होतो. आमच्या घरी परसाला बांबूचे कुंपण होते. त्यातून योग्य बांबू काढून त्याला दोरी बांधून धनुष्य तयार होई. गोठ्यामध्ये म्हशी होत्या त्यांच्या कडब्यामध्ये तुऱ्यासारख्या गुळगुळीत बाजूच्या काड्या असत. ते माझे बाण. बाणांना वजन आणण्यासाठी जवळच्याच कोटेश्वर मंदिरातील पणत्यांमधला साठलेला चिकट गाळ काढून त्याची गोळी करून ती बाणाच्या टोकावर लावून द्यायची. हे धनुष्यबाण घेऊन आसपासच्या झाडाझुडुपांमधून धनुर्धारी रामाप्रमाणे शरसंधान करीत फिरणे हा एक खेळ. पत्र्याच्या चकत्या मिळवून त्यांच्या मधोमध दोन छिद्रे पाडून त्यातून दोरा ओवायचा आणि तो दोन हातांच्या बोटांमध्ये धरून ताणून फिरवायचा. त्याला चांगला पीळ पडला आणि तो उलटा ओढला की चकती वेगाने फिरे. ती दगडावर घासून ठिणग्या पाडणे हा अन्य एक खेळ. 'कोटेशनचे बंगले' ह्याचे वर्णन काही दिवसांपूर्वीच 'आमचा छापखाना' येथे मी केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाचे शीर्षक वाचून आल्यामुळे निराशा झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

ह्याला आम्ही आखबंदटपली हे नाव दिलं होतं; आणि टिचकीच्या बरेच पुढचे प्रकार व्हायचे कोणी डोळे गच्च धरून ठेवले की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

आम्हि कुणीही यावे टीचकी मारुन जावे असं म्हणायचो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

लहानपणी महाभारत वगैरे बघून धनुष्य, गदा, इ. चे वेड फार होते. मला आणि चुलतभावाला दोघांनाही गदा घेऊन दिल्या होत्या प्लास्टिकच्या. माझ्या गदेच्या दांडूचा कलर पिवळा अन गोलाचा रंग लाल, तर भावाच्या गदेच्या गोलाचा रंग लाल आणि दांडूचा कलर सिल्व्हर होता हे आठवते.

शिवाय प्रत्येकी एक धनुष्य आणि एक मोठा लाकडी बाण खास बुरुडाकडून बनवून दिलेला होता. धनुष्य मोठे होते. चांगले तीनचार फुटी असेल. बाणही मोठा होता. तो अस्त्र म्हणून राखीव ठेवत असू. नेहमीचे बाण म्हणजे केरसुणीच्या काड्या. एकलव्याप्रमाणे घरातील जांभळाच्या झाडाच्या खोडावर आमची प्रॅक्टिस चालत असे. कितीतरी वर्षे त्यामुळे खोडाला पडलेली भोके शिल्लक होती. आत्ताआत्ता मुजली असावीत थोडीशी. अंगणात आम्ही दोघेही एकमेकांवर शरसंधान करीत असू. एकदा भावाने ब्रह्मास्त्र म्हणून छत्रीची काडीच धनुष्यातून सोडली ती माझ्या छातीला लागली. दुखल्यामुळे आरडाओरडा सुरू झाला, घरच्यांनी दैवी हस्तक्षेप करून अस्त्रे तर काढून घेतलीच, शिवाय शरसंधान केल्यास शंभर शकले होतील असा शापही दिला. त्याचे प्रत्यंतरही दिलेल्या मारामुळे आलेच. तरीही ते फॅसिनेशन उणावले नाही. आर्चरी शिकायची इच्छा अजूनही आहे.

या अस्त्रांचे वेड इतके होते की घरी असलेल्या रामायणमहाभारताचे खंड जमेल तितके वाचून त्यातल्या अस्त्रांची एक लिस्टच काढली होती. रादर दोन लिस्टी होत्या- एक रामायणवाली अन दुसरी महाभारतवाली. तेव्हा लक्षात आले की दोन्ही ठिकाणी बरीच अस्त्रे वेगवेगळी आहेत, उदा. रौद्रास्त्र, तामसास्त्र ही अस्त्रे फक्त रामायणात आहेत तर वैष्णवास्त्र आणि नारायणास्त्र फक्त महाभारतात आहेत. ऐंद्रास्त्र कॉमन असावे बहुधा. आग्नेयास्त्र-वारुणास्त्र तर अस्त्रांमधली एकदम बेसिक असावीत. बुद्धिबळात प्यादे पुढे सरकवल्यासारखी. सुरुवातच तिथून होते. मग पुढे वायव्यास्त्र, मग ऐंद्रास्त्र, पाशुपतास्त्र, इ. चढत्या भाजणीने अस्त्रे सोडून अखेरीस ब्रह्मास्त्र. मग मध्येच ऋषिरूपी रेफरी येऊन म्याच थांबवणार की पुन्हा सुरू....क्षुर, क्षुरप्र, नाराच, जीद्म...बाणांची नावे पाहून त्यांचे स्वरूप कसे असेल याची कल्पना करण्यात वेळ कसा जायचा ते कधी समजायचे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धागा मस्त आहे. सर्व प्रतिसाद सुद्धा अत्यंत मनोरंजक.

काही प्रश्न :
पत्त्यांमधे "कॅन्व्हिस्टा" , "कनिष्ठा" , "कॅनिस्टा" अशा नावांनी एक खेळ होता. तो काय असतो? मी एका ट्रिपला गेलो होतो तेव्हा त्या ग्रुपबरोबर खेळलो होतो. त्यानंतर कधी खेळता आला नाही. कुणाला माहिती असल्यास जरूर सांगा.
कुणाला काँट्रॅक्ट ब्रिज येत असला तर मराठीमधे मला नियम वाचायला आवडतील. हेच "टेक्सस होल्ड 'एम पोकर" बद्दलही Smile (हे खेळ लहानपणींचे नव्हेत हे मान्य आहे.)

इथे कुणी बुक क्रिकेटचा उल्लेख केलाय का? वहीतल्या एका पानावर खेळाडूंची नावं. पुस्तक एका साईडला घ्यायचं. पुस्तकाचं रँडम पान उघडून शेवटचा आकडा येईल तो "स्कोअर". शून्य आलं तर आऊट.

बुद्धीबळाचा उल्लेख आलाय का ते माहिती नाही. आणि तो तसा सार्वत्रिकच खेळ आहे. पण "अँटी चेस" नावाचा एक प्रकार मी लहानपणीं पाहिला. स्वत:च्या सोंगट्या खायला द्यायच्या. यात राजासुद्धा मरतो. ज्याच्या सोंगट्या आधी खलास तो जिंकला. Smile

सापशिडी, लिडो किंवा ल्युडो , नवा व्यापार कॅरम पत्ते हे तसं कॉमन आहे. पण याखेरीज राजधानीची सफर असा एक खेळ पाहिला होता. लिडो सारखे खेळाडू फासे टाकून एकेक घर जातात. फरक असा की समोर असतो भारताचा नकाशा. आणि राज्यांच्या राजधान्यांवर जो खेळाडू पोचेल त्याने ती जिंकली. कुणी उत्तरविजय करायचा, कुणी कुठे जायचा. मला आठवतंय की यामुळे मला अनेक राज्यांच्या माहिती नसलेल्या राजधान्या अगदी दीर्घकाळ स्मरणात राहिल्या.

एकदा लहानपणीं एका दूरच्या नातेवाईकांकडे दोन दिवसांपुरते गेलो होतो. अजून जेमतेम साताठ वर्षांचा असेन नसेन. तिथे शेजाऱ्यांकडे "डॉक्टर डॉक्टर" हा खेळ मुलंमुली खेळत होती. Smile हा खेळ मला परत खेळायला मिळाला नाही याची मला खंत वाटते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कॅनास्टा हे त्या खेळाचं नाव आहे. हे 'गणिती गप्पा' ह्या पुस्तकात पहिल्यांदा वाचलं होतं. आपल्या गुलामचोर सारखा आहे थोडासा.
ब्रिज फार पोचलेला खेळ आहे. रविवारच्या टाईम्स मध्ये ग्रँ. प्रवीण ठिपसे बुद्धिबळावर लिहायचे त्याच्या बाजूला ब्रिजवरही एक सदर असायचं. बुद्धिबळाइतका काथ्याकूट होणारा खेळ म्हणजे ग्रेट असणार काहीतरी.

इथे कुणी बुक क्रिकेटचा उल्लेख केलाय का?

मी! मी त्याचबरोबर बॅटलशिप आणि ऑफ्स बॅट्स ह्या खेळांचा उल्लेख केलाय. त्यात एक ते 'नाव गाव फूल फळ' राहिलं. फुल्लीगोळा, हाऊस (ठिपके काढून घरे बनवणे) हेही अश्या खेळांत येतात. नागाफूफ फार बिनडोक नसला तरी बोरिंग खेळ होता.

राजधानीची सफर असा एक खेळ

हा मी आणि ताई खूप खेळायचो. त्याचं नाव नवा व्यापारच होतं, पण विकत घ्यायची शहरं सगळी भारतीय होती. घरं, कारखाने, गाड्या घेऊ शकायचो.
मुळात एकट्यानेच खेळायचे प्रकार दुर्लक्षित राहिलेयत.
मेकॅनो हा अजून एक प्रकार दुर्लक्षित राहिलाय. हा म्हणजे गाडीप्रिय पुरुषांसाठी अगदी वरदान होता. मी तासंतास तो खेळू शकायचो. त्या बावळट 'पेशन्स' (सॉलिटेअर) पेक्षा मेकॅनोने ट्रक, गाडी, ट्रॅक्टर, बुल्डोझर बनवणं मला प्रचंड आवडायचं. अजूनही आवडतं. रिमोट कंट्रोल गाड्या हे अजून एक. मला तो प्रकार अजूनही आवडतो. पब्लिकने अतिबालिश ठरवलेल्या माझ्या एका मैत्रिणीने आत्ताच स्वत:साठी रेडिओ क्वाडकॉप्टर विकत घेतलं, तेव्हा फक्त मला तिचा मत्सर वगैरे वाटला. ती व्हिडीओही पाठवते तो प्रकार उडवतानाचा. ती दूश्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

तुमचा वरचा प्रतिसाद परत वाचला. त्यात आलंय बरंच. पण कॅनविस्टा बद्दल नाही आलेलं. जरा सांगा की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

माझा भाऊ आणि मी पोकॅमोन चे पत्ते यायचे ते वेड्यासारखे खेळायचो. काही अर्थ नव्हता त्या खेळात पण अति खेळलोय.
दुसरा पत्त्यांचा गेम म्हणजे लॅडिस, मी आणि माझी मावस बहीण धाकट्यांना गंडवायचो...
एकदम लहान होता माझा भाऊ तेव्हा बंगल्याच्या लोखंडी गेटवर उभा राहायचा आणि मी गेटला धक्का द्यायचे, मग ते मस्त एक चक्कर मारायचं.
दुसरा म्हणजे गाडीवर चढून बसायचं दोघांनी. तो लहान असताना आम्ही बाहेर गेलो फिरायला की तो आपला एक एक हात दोघांच्या हातात देउन मधून चालायचा आणि कंटाळा आला की पायच वर उचलून घ्यायचा, मी टिंगतो मी टिंगतो करत हे त्याने घरी वस्तुंसोबत पण सुरू केलेलं, दोन खुर्च्यांच्या हातावर भार देउन पाय वर उचलून सायकल चालवायची ॲक्शन चालायची, एकदा ढुंगण शेकल्यावर हा प्र्कार बंद झालेला.
घरी फुल्ली गोळा, टिंबांचा खेळ पण आम्ही खेळत बसायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

रिंगण गाडा आवडायचा. एकट्याचा विरंगुळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेनापेनी नामक खेळ खेळायचो शाळेत. बाकावर कॅरमप्रमाणे दोन पेन घेउन दुसऱ्याचं पेन खाली पाडणे हा खेळ. साध्या पेनांपासुन सुरु होत लोक त्या पेनांमध्ये बऱ्याच सुधारणा करायचे. रिफिल काढुन आत बॉल बेरिंग भरणे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>19. विटीदांडू उर्फ गिल्लीदंडा - फक्त पुस्तकांतूनच ओळख झाली. यात वापरले जाणारे शब्द, अंक तेलगू का कन्नड आहेत म्हणे.<<

माझ्या माहितीप्रमाणे या खेळात विट्टीला मारल्यानंतर विट्टी गलच्या जवळपास पडल्यास गलपासून दांडूने पाव, चिठ्टी, मुष्ठी, घोडा, पूक, डोळा जिल असे मोजले जायचे. पाव असल्यास पाय उचलून पायावर विट्टी ठेवून मारले जायचे. .... घोडा आल्यास बोटांचा आकार घोड्यासारखा करून त्यावर विट्टी ठेवून मारले जायचे. ... डोळा आल्यास डोळ्यावर विट्टी ठेवून विट्टी खाली पाडली जायची व दांडूने मारले जायचे.
हे सर्व शब्द मराठीच वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ मुंबैतच खेळला जाऊ शकणारा खेळ आहे.
तळमजल्यावरच्या कुणा एका काकूंच्या खिडकीला लोखंडी गज लावले होते.
त्याला धरून उभं रहायचं पाय जेमतेम जमिनीवर. आणि मग खच्चून ओरडायचं "गाडीला गर्दी".
इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'Train'ing for essential life skills?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

इंग्रजी इनोद आवडला.
आणखी एक -मुंबै(पुण्या?)तल्या स्पेशल क्रिकेटवर लिहा जरा. दुसऱ्या मजल्यावरच्या बोळात एक जण बॅटिंग, एक जण बॉलिंग आणि जेमतेम उभा राहून एक जण फिल्डींग.
आणि नाकासमोर दोन्ही बाजूला १० अंश सोडले तर बाकी कुठेही आऊट. (बरेचदा वाटतं म्हणूनच तेंडल्याचा स्ट्रेट ड्राईव्ह इतका कातिल झाला असेल का?)
शिवाय कुठल्याही मूल्यवान गोष्टीला लागलं तर आऊट. एक टप्पी आऊट, भिंतीला लागला तरी टप्प्पा पण सायकलच्या चाकाला लागला तर नाही.
इ.इ काँप्लेक्स नियम पाळून खेळलेलं क्रिकेट तुम्ही खेळलाच असाल ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां मंग!

मला तेंडल्या आणि रॉबिन सिंग एकत्र होता आलं असतं, पण हर हर...

वाड्यातलं क्रिकेट बरंच फ्रीस्टाईल होतं. किंबहुना 'तो आज सकाळी पडला आणि खूप रक्त आलं होतं' किंवा 'आज तिला उपास आहे'** वगैरे क्रिकेटबाह्य कारणांमुळेही आउटचा डिसीजन फिरवला जाई. किंवा 'सोनूला डाव्या हाताने बॉलिंग करायची' असे नियम बनवले जात.

बॅट्समन एकमेकांना 'कॉल' देतात आणि रन्स काढतात हा प्रकार एका मित्राला खूप आवडायचा. पण आमच्या लांबुळक्या स्टेडियममध्ये एक तर फिल्डिंग तरी करता येई, नाहीतर रन्सतरी पळता येत. मग, त्याला हुक्की आली, की कोणीतरी त्याचा पार्टनर म्हणून नॉनस्ट्रायकर एन्डला उभं राही. फील्डर भिंतीला चिकटून सपाट उभे रहात. एक सोपा बॉल टाकला जाई, आणि तो जवळपास मारून मित्र कॉल देई. मग तो दमेपर्यंत रन्स पळल्या जात. अर्थात या डमी रन्स असत, त्याचा हिशोब वेगळा असे.

भिंतीवरच 'विटकर' किंवा लैच श्रीमंती वर आली असेल तर खडूने स्टंप आखले जात. (किंबहुना ते कोणा मूळपुरुषाने आगोदरच आखले होते, आम्ही फक्त ठळक करायचो.) त्यामुळे विकेटकीपर ही संकल्पना अस्तित्त्वात नव्हती. पण मियाँदादला माकडउड्या मारून दाखवणारा किरण मोरे, मध्येच 'आई गं' म्हणणारा मोंगिया, धीरगंभीर इयन हिली, चिंगमचाव्या अॅलेक स्टुअर्ट हे आम्हाला लय आवडत. (जिमी अॅडम्स वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध होता. ते खाली लिहिलं आहे.) मग या नसलेल्या विकेटकीपरला पर्याय म्हणून स्टम्पच्या वरती सहा इंच एक निळा आयत आखला होता.## हा आमचा 'डीम्ड कीपर'. याला बॉल लागला की आउट.

एका विंडीज दौऱ्यात त्यांचा कीपर जिमी अॅडम्स फ्रंट फूट मोठ्ठा पुढे टाकून स्पिनरचा बॉल पायावर घेत असे. बहुदा तेव्हा फ्रंट फूट एलबी देत नसावेत. यामुळे त्याला 'पॅडम्स' असं नाव ठेवलं होतं. हीच ट्रिक वापरून सोनू नावाची अंमळ कच्ची बॅट्समन बराच वेळ क्रीजवर काढत असे. तेव्हा एलबीडब्ल्यूचा नियम आणला जावा यावर एकमत झालं, पण तो नेमका कसा असावा याबद्दल एकवाक्यता होईना.

_________
**एक कर्मठ कुटुंब मध्वाचार्य की कोणसेसे घरी येणार त्या दिवशी घरातल्या आबालवृद्धांना उपास करायला लावत असे.
##तो निळा असण्याचं कारण म्हणजे एका 'बिऱ्हाडा'ने खिडक्यांना नुकताच निळा ऑइलपेंट लावला होता. हे कार्य करणारा बिऱ्हाडमालक वाडा वंडर्स टीमचा रिटायर्ड मेंबर असल्याने त्याने उरलेला पेंट आम्हाला वापरू दिला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

झकास...

आमचंही पूर्वी लिहीलेलं चोप्य पस्ते करायचा मोह झाला:

जो आपण जिंकला तो (नवसाचा) आणि त्यानंतरचा एक अशा दोन वर्ल्डकपच्या वेळी शाळकरी हापचड्डी पोरं होतो आम्ही.. तिकडे वर्ल्ड कपच्या मॅचेस सुरु झाल्या की आम्ही पोरं अंगणात त्याहून जास्त उत्साहाने फसफसत घामटा गळेपर्यंत क्रिकेट खेळत रहायचो.

टी.व्ही.चा व्हॉल्यूम फुल्ल. आणि मग त्यातून "हॉ" असा आनंदी चीत्कार आला की आम्ही गोटीब्याट टाकून तेवढा काय फोर किंवा सिक्स असेल तो शॉट रीप्ले मधे बघायला आत पळायचो.

मग परत आमचा खेळ सुरु. अगदी बॉल अंधारात दिसेनासा झाला तरी.

रात्रीच्या गिळायची वेळ झाली की घरचे शोधायला यायचे.

कोकणातल्या मातीने तांबडेलाल झालेले आम्ही रात्री आंघोळ करायचो तेव्हा लाल "खून की नदियां" टाईप ओघळ वहायचे मोरीतून.

या अंगणी क्रिकेटचे नियम तर अफलतूनच. त्याची नियमावली म्हणून एक पुस्तक बनवायला लागेल. म्हणजे, लोकल फिल्डच्या भूगोलावर ते नियम अवलंबून असायचे. चौधरीच्या कंपाउंडमधे खेळत असलो तर- कंपाउंडबाहेर गेला की आउट. एक टप्पी आउट. तिथे पलीकडे विहीर होती.. त्यात शॉट गेला की आउट तर आहेच, प्लस मारणार्‍याने बादली सोडून तो पडलेला बॉल नेम धरून बाहेर काढावा किंवा "भरून द्यावा"..अर्थात नवा आणून द्यावा.

ती शेजारच्या निर्जन आवारातली खास कोकणातली भुताळी विहीर होती..बळीबिळी घेणारी..खोल.. काळीशार..
त्यामुळे बहुधा त्यात "बाल्दी" सोडण्याऐवजी तो ब्याट्स्मन पोरगा बी.आर.आय किंवा एम.आर.आय चा नवीन लाल बॉल वाण्याकडून घेऊन यायचा.

आता खूप वर्षं झाली आहेत, पण मला आठवतील त्या गल्ली क्रिकेटच्या व्हर्शन्स आणि नियम मी सांगतो :

क्रिकेटसाठी लागणार्‍या बेसिक जिनसा :

-बॅट -

जालंधरमधे बनवलेली गुळगुळीत एरंडेलासारखा वास येणारी खरीखुरी भारी ब्याट परवडू शकणारा पोरगा माझ्या गल्लीत तरी नव्हता. त्यामुळे कोणतंही फळकूट घेऊन मेकशिफ्ट अरेंजमेंट केली जायची. शिवाय शुभ्र रंगाच्या साध्या स्वस्त बॅट विकणारे काही सज्जन फेरीवाले क्रिकेट सीझनमधे गावाबाहेर उघडं दुकान लावायचे. तिथे जाऊन साग्रसंगीत खरेदी व्हायची.

खेरीज कोकणाची देणगी म्हणून नारळाच्या झावळीच्या मधल्या लाकडाचा कोयत्याने कापलेला तुकडा हाही बॅट म्हणून वापरण्यासारखा एक आयडियल प्रकार होता. झावळीच्या मधल्या कण्याला असलेल्या निमुळत्या शेपमुळे आपोआप हातात धरायला बारीक हँडल आणि खाली फताडा किंचित वक्र फळीसारखा भाग मिळायचा. वेगळ्या तासकामाची गरज नाही.

शाळेत वापरली जाणारी पुठ्ठ्याची कडक पॅड्ससुद्धा बॅट म्हणून वापरली आहेत. बीलिव्ह इट ऑर नॉट. मात्र या प्रकारच्या बॅटचा उपयोग वर्गात किंवा खोलीत इनडोअर क्रिकेट खेळताना जास्त व्हायचा आणि त्यासाठी सरपटी बॉल चालायचा नाही. सर्व खेळ वरच्यावर हवेत चालायचा.

-बॉल -

सीझनचा बॉल गावात मिळायचाच नाही. मिळाला तर परवडायचा नाही. आणि चुकून कोणी दाखवायला आणला तरी आमच्या कोकणातल्या खडबडीत कातळी जमिनीवर तो असा काही वेडावाकडा उडायचा की आम्हाला तो जमायचाच नाही.

मग दुसरा ऑप्शन म्हणजे एमआरआयचा टेनिस बॉल. हा मऊ कव्हरवाला. हाही खूप महाग.

आमच्या उपरिनिर्दिष्ट धेडगुजरी ब्याटांमुळे आमचे बॉल दर दोन दिवसांनी फुटून दोन शकलांत परिवर्तित व्हायचे. (बाय द वे.. यातले एक शकल ..भकल म्हणावे हे जास्त उत्तम.. हे उलटं ताणून त्यात माती भरायची आणि कोणाच्यातरी पायात ठेवून पळायचं. दहाबारा सेकंदात ते फट्ट करुन सरळ व्हायचं आणि माती "टार्गेट"वर उधळली जायची. कुत्रे हे आवडतं टार्गेट असायचं कारण ते सूं सूं करुन त्या शकलाचा वास घ्यायला जायचे आणि तेवढ्यात फट्ट करुन सचैल मृत्तिकामुखप्रक्षालन करुन घ्यायचे..)

विषयांतर झालं.

तर बॉलचा पुढचा ऑप्शन म्हणजे भरीव कॉर्क किंवा बुचाचा चेंडू. शिवाय घरात खोलीच्या आत खेळायला कापडी चिंध्यांचा बॉल. अगदी ऑड म्हणजे गुलमोहोराच्या शेंगा कुटून त्याचा चिकट पल्प लाडूसारखा वळून वाळवला की बॉल व्हायचा. ("प्रोसेस"मधली चू.भू. दे.घे.)

स्टँडर्ड ऑप्शन म्हणजे बीआरआय कंपनीचा लाल नक्षीवाला रबरी बॉल. स्वस्त टिकाऊ. हरवला तरी दिलावर ओरखडा नाही.

-स्टंप-

हे कधी तीन उभ्या काठ्यांच्या स्वरुपात वापरल्याचं आठवत नाही. कोकणातला एक उभा चिरा (जांभा दगड) किंवा भिंतीवरच्या दोन-तीन रेषा, दोन चपला, स्कूटरचं चाक किंवा एकूणच सर्वानुमते मान्य असा एक चौकोनी आकारविशेष हा स्टंप म्हणून ग्राह्य धरला जायचा. या सर्व प्रकारात स्टंपला "उंची" ही डायमेन्शन नसल्याने आउट होऊ घातलेला ब्याट्समन नेहमीच बॉल उंचावरून पास झाल्याचा जोरदार दावा करायचा..

त्यानंतर पंचनामा, प्रत्येक उपस्थित साक्षीदाराने त्या काल्पनिक स्टंपवर हाताने बॉलचा उड्डाणमार्ग दर्शवणे, उच्चारवात ताणाताणी अशा मार्गांनी "आउट" की "नॉटाउट" ते ठरायचं.

भिंतीवरचा एक इमॅजिनरी चौकोन हाच स्टंप असला की मग बॉलचा "छाप" कुठे उमटलाय त्यावर "बोल्ड"आहे की नाही ते ठरायचं. बॉल ओला असला तर भिंतीवर ताजा छाप सहज दिसायचा. पण एरवी मात्र तो छाप आत्ता पडला की आधीपासूनच होता यावर कचकावून खडाजंगी व्हायची.

......

आता या तीन बेसिक जिनसा जमल्या की यायचे ते अत्रंग नियम. त्यातल्या काहींची झलक :

१) करंट आउट - बॉलरच्या साईडला एक छोटा दगडच स्टंप म्हणून ठेवलेला असायचा. बॉलरने त्याला पाय लावला आणि बॉलला स्पर्श केला तरी त्याच्या शरीरातर्फे करंट पास होऊन तो बॉल जणू स्टंपला लागला आहे असं समजून आउट द्यायचं.

२) एक टप्पी / दोन टप्पी कॅच आउट.- थेट कॅच घेतला तर आउटच पण बॉलचा एक टप्पा पडून मग कॅच घेतला तरी आउट.

३) भिंतीवर टप्पा कॅच आउट.- भिंतीवर बॉल आपटला आणि हातात आला तर तो टप्पा न समजता थेट झेल समजणे.

४) लांजेकरांच्या कंपाउंडमधे बॉल गेला की आउट. कारण तिथे वासराएवढा मोठ्ठा कुत्रा होता.

५) दीड ब्याटएवढे "क्रीज"..याची एक रेष ब्याटीनेच मातीत आखली जायची आणि रनाउटच्या मोक्याच्या वेळी ती पुसली गेलेली असायची. की परत ब्याट जमीनीवर धपाधप आडवी घालून ती दीडब्याटीची लाईन काढली जायची आणि लगेच आपण त्या रेषेच्या आत होतो हे सिद्ध करण्याचा कलगीतुरा सुरु.

६) "बॉलरला स्टंप दिसतील अशा बेताने उभा रहा" असं बॅट्समनला सांगणे म्हणजेच "कव्हर मागणे"

७) बॅटिंग "घेतली" तर फिल्डिंग "दिलीच" पाहिजे. बॅटिंग घेऊन पळून जायचं नाही.

८) कॉमन प्लेअर अलाउड आहे. विषमसंख्येच्या मित्रचमूत समसमान टीम पाडताना एका प्लेअरला कॉमन अर्थात दोन्ही बाजूंनी खेळावे लागेल.

९) टॉस म्हणजे चपट्या दगडावर थुंकून तो हवेत उडवणे.

१०) "फास" बॉल अलाउड नाही.

११) बॉल सरपटी टाकला तर रडीचा डाव.

१२) ज्याची बॅट त्याला दोनदा आउट अलाउड.

१३) लेफ्टी खेळणार्‍याला भलती प्रतिष्ठा. मग राईटी असलेली पोरंही बळजबरी डावीकडे तोंड करुन लेफ्टी बनून उभी राहायची.

१४) कितीही रीतसर आउट झाला तरी बॅट्समनने शांतपणे बॅट सोडायची नाही. बचावाचा पूर्ण प्रयत्न करायचा. आपल्या टीममधला एखादा चमचा वकील म्हणून घ्यायचा. तरीही पाड न लागल्यास जाताजाता बॅट फेकून "घे..घे बॅटिंग हवी ना तुला..तुझी लाल.." असं म्हणून कुस्करी करायची.

एक फ्रेंच क्रिकेट म्हणून प्रकार असायचा. त्यात पायाला बॉल लागला की आउट. असा नेम धरुन मारण्याला कोचून मारणे किंवा कोची बॉल म्हणायचे.

कोकणात मासे रापतात.. त्या संदर्भाने असेल, पण कॅच सोडण्याला "रापणे" म्हणायचे आणि सारखा सारखा कॅच सोडला की त्या पोराला "राप्या " म्हणून पर्मनंट नाव पडायचं.

.................

आणिही खूप काही आहे. गल्ली क्रिकेट हा नुसता खेळ नाही. ते बालविश्व आहे.

अजूनही वाटतं की त्याच कंपूसोबत त्याच अंगणात एका फळीने बॉल पिदवून घामाघूम व्हावं. दुपारच्या भाजत्या उन्हात "ड्रिंक ब्रेक" घेऊन मित्राच्या आईने केलेलं कोकम सरबत ढसाढसा प्यावं.

तशीच नेटाने सेन्च्युरी काढावी. समोरचा बॉलर रडायच्या घाईला यावा. रात्र व्हावी .. बॅट, बॉल स्टंप दिसेनासे होईपर्यंत काळोख व्हावा.. आणि आईने शोधायला यावं..घरी येऊन ती गरम पाण्याची आंघोळ (खून भरी..!!) ..आणि बाहेर कुकरची शिटी वाजावी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोकणातला एक उभा चिरा (जांभा दगड) किंवा भिंतीवरच्या दोन-तीन रेषा, दोन चपला, स्कूटरचं चाक किंवा एकूणच सर्वानुमते मान्य असा एक चौकोनी आकारविशेष हा स्टंप म्हणून ग्राह्य धरला जायचा.

कोकणात स्कूटरची चाके चौकोनी असतात काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!
१ ते १४ वाले नियम विशेष भावले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना 'तो आज सकाळी पडला आणि खूप रक्त आलं होतं' किंवा 'आज तिला उपास आहे'**

हे महा लोल होतं.
खरंय. शिवाय काही चिवटा लोक्स असत जे आऊट झाले तरी हलत नसत. मग मागचे पुरावे देऊन आपल्याला केस लढवावी लागे.
"गेल्या वेळी काचेच्या खाली नटाऊट होतं."
"४ वाजल्यानंतर काकू घरात नसतात, तेव्हा तू दरवाजाला आऊट देऊ शकत नाहीस. मला असं एकदा नटाऊट दिलेलं"
"पाहिजे तर पिंट्याला विचार. तो विकेटकीपर होता तेव्हा. मग त्या पिंट्याची साक्ष.
असे सबळ पुरावे दिल्यानंतर हे लोक मग मुश्किलीने बॅट सोडत.
-----------------------

मी खेळलेला अजून एक उप प्रकार म्हणजे गच्ची क्रिकेट. ह्यात बरंच चिकीचिकी खेळावं लागे. स्वीप हा पेटंट फटका, कारण बॉल घरंगळल्यागत मारता येई.
बॉल खाली गेला तर दोन वेळा आऊट + बॉल स्वत: घेऊन यायचा + खालच्यांचा ओरडा खायचा
हा क्लॉज असल्याने लोक फार जपून खेळत. न्यूझिलंडच्या पिचसारखे लो स्कोरिंग गेम्स व्हायचे.
गच्चीच्या खालीच रहाणारे काका/काकू हा सगळ्यात मोठा क्लॉज होता. त्यांना लहान पोरगा असेल तर लाईफ वॉज इझी.
पण मग थोडं वय वाढल्यावर घरच्यांनी बंदी आणली रिस्की म्हणून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच क्रिकेट आवडायचा नाही.
रड्या लोकांचा खेळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आदूबाळ, १२/८- ४:३७ प्रतिसाद
भारी आवडला.
--

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणी या गेम्सचे मोबाइल गेम्स बनवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर उल्लेख केलेले बरेच खेळ खेळलो आहे. त्याशिवाय, पावसाळ्यांत, सगळीकडे भरपूर चिखल झाला की, छत्रीची मोडलेली काडी घेऊन रुतवणी नांवाचा खेळ खेळायचो.ज्याच्यावर राज्य येईल त्याला स्टार्टिंग पॉईंटपासून छत्रीची काडी चिखलात रुतवत लांबपर्यंत न्यायचं. मधे काडी रुतली नाही व आडवी पडली की डाव गेला. मग, त्या पॉईंटपासून त्याने लंगडी घालत मूळ जागी यायचं. डोंबिवलीत चिखल फार असल्याने खूप लांबवर जाईपर्यंत काडी आडवी पडत नसे.
पत्त्यांमधे नॉट ॲट होम ला सर्रास, नाठे ठोम वा उन्मादाने नाठे गाठे गरगठ्ठे ठोम म्हटले जायचे. इंग्लिशचा गंधही नसल्याने असे प्रकार चालायचे आणि ठिकरी खेळताना, ॲम आय डाऊन ला एमेडा असे म्हटले जायचे.
नवा वेपार खेळताना, झवेरी बाजार म्हटले की आम्ही भाऊ खुसपुसून हंसायचो आणि बहिणींना का हंसतो, ते कळायचे नाही. तो खेळ कुणा गुजराथ्यानेच केला असावा, कारण मराठीचा खून पाडलेला असायचा. ' आपले जवल या रंगाचे तीन जागा होईल तर जाग्याचा भाडा डबल, किंवा नळ्ची कंपनीचे मालिक होईल तर शंभर गुणा भाडा जाग्या, असे तारे तोडलेले असायचे. प्रत्येक जागेच्या कार्डावर, बेंक मधील मो.कि. अर्धा, असे लिहिलेले असायचे. त्याचा अर्थ मोठेपणी गुजरातची मराठी +बँकेतली अशी बायको मिळेपर्यंत समजला नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे रुतवणी नाव ऐकलं नव्हतं. पण खेळत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आबा- प्रतिसाद एक नंबर आहे. आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आम्ही तर चक्क वर्गात कंचे खेळायचो. अंधार झाल्यावर कंपनी बागेत दोन टीमा बनवून एका वर्तुळात चेंडू मारणारे (किर्मीच बाल ) आणि आतले बचाव करणारे. शिवाय आईस पाईस आणि पिठ्ठू. हाकी तर सदैव हाताशी .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही तर चक्क वर्गात कंचे खेळायचो.

आम्ही सुरुवातीसुरुवातीला वर्गात - मागच्या बाकावर बसून (उंचीचा फायदा!) - फुल्लीगोळ्यासारखे रनॉफदमिल (यानी कि जे सर्वच शाळकरी मुले खेळतात असे) खेळ पुष्कळ खेळलो. मग पुढेपुढे त्याचा कंटाळा येऊ लागल्यावर तेव्हा एमसीसी संघाचा भारताचा सुवर्णमहोत्सवी दौरा चालू होता (हा सुवर्णमहोत्सव नक्की कसला, ते एमसीसीच जाणे. बहुधा एमसीसीने हिंदुस्थानचा पहिलावहिला दौरा जेव्हा केव्हा केला, त्याचा असावा; चूभूद्याघ्या. एमसीसीचा खचितच नसावा. पण ते एक असो.), त्यावरून प्रेरणा घेऊन, फुल्लीगोळ्याच्याच परंतु 'सुवर्णमहोत्सवी' टूर्नामेंट्स खेळायला सुरुवात केली. (म्हणजे नेहमीचा फुल्लीगोळाच, परंतु त्याला 'सुवर्णमहोत्सवी' म्हटले, की उत्साह वाढतो, असे साधेसोपे गणित होते.) पण लवकरच त्याचाही कंटाळा येऊ लागला, नि तोपर्यंत एमसीसीचा संघदेखील आपला ('सुवर्णमहोत्सवी') दौरा आटोपून मायदेशी रवाना झालेला होता, त्यामुळे त्यानंतर मग ओढूनताणून फुल्लीगोळ्याच्या 'सुवर्णमहोत्सवी' टूर्नामेंट्स खेळण्यातही काही चार्म उरला नव्हता.

अशा प्रकारे बरेच दिवस काटल्यावर मग रुचिपालट म्हणून काही दिवस कागदावर बुद्धिबळाचा पट आखून त्यावर पेन्सिलीने सोंगट्यांची चित्रे काढून बुद्धिबळे खेळण्याचा प्रयोग करून पाहिला. (बुद्धिबळात काही गम्य किंवा विशेष रस होता म्हणून नव्हे. तशातला भाग मुळीच नव्हता. केवळ काहीतरी वेगळे म्हणून. शिवाय, बुद्धिबळे खेळल्याने आपण 'हुशार' वगैरे दिसतो, अशी एक काहीशी खुळचट कल्पनाही सुप्तपणे यामागे कोठेतरी होती. तरी बरे, आमची फक्त मुलांची शाळा होती.) जसजशी मूव्ह करत जावी, तसतसे सोंगटीचे चित्र जुन्या जागेवरून खोडून नव्या जागेवर काढायचे, वगैरे.

लवकरच या प्रकारातील अव्यवहार्यताच नव्हे, तर जवळजवळ-अशक्यता लक्षात आली. पेन्सिलीने काढलेल्या सोंगट्यांच्या आकृती कितीही म्हटले तरी डोळ्यांत भरत नाहीत, त्यामुळे पट डोळ्यांसमोर असूनही पटावरील सोंगट्यांच्या पोझिशन्सचे चित्र मनश्चक्षूंपुढे रजिष्टर होत नाही. त्याकरिता खरा पट नि खऱ्या सोंगट्याच पाहिजेत. शिवाय सारखी सोंगट्यांची चित्रे खोडण्या-काढण्याची कटकट.

मग याच्यावर उपाय म्हणून खराखुरा बुद्धिबळाचा पट वर्गात आणून मागच्या बाकावर खेळायला सुरुवात झाली. बाकावर बसायच्या जागी दोन मुलांच्या मधोमध पट मांडायचा नि खेळायचे. पट बैठकीच्या ठिकाणी असल्याने शिक्षक/शिक्षिकांना दिसण्याची शक्यता सुतराम् नव्हती. त्यामुळे वर्गात पुढे बाई इंग्रजीचा तास घेताहेत नि मागील बाकावर बुद्धिबळांचा खेळ जोरात चालू आहे, हे चित्र सामान्य झाले.

परंतु बुद्धिबळ हा असा खेळ आहे, की जो दोघांत कधीच खेळला जात नाही. दोहों बाजूस प्रत्येकी किमान सात जणांची एकएक टीम लागते, अन्यथा फाऊल धरतात. पैकी दोघेजण प्रत्यक्ष खेळणारे, आणि उरलेले प्रत्येक बाजूस किमान सहा-सहाजण हे फुकटचे सल्ले देणारे बघे.

याची परिणती मग व्हायची तीच झाली. बोले तो, वर्गात आपल्या तासाला मागील बाकावर काही 'एक्स्ट्राकरिक्युलर अॅक्टिविटीज़' चालतात, याची कुणकूण इंग्रजीच्या बाईंना लागली, नि अधिक तपासाअंती आम्ही मुद्देमालासह रंगेहाथ पकडले गेलो. वर 'आज वर्गात बुद्धिबळे खेळताय, उद्या येऊन पत्ते कुटाल!' म्हणून आमचा पट नि सोंगट्या जप्त झाल्या. अर्थात, बाईंच्या आम्ही एरवी गुडबुकांतले असल्याकारणाने दिवसाअखेरीस केवळ ताकिदीसहित पट नि सोंगट्या परत मिळाल्या, नि याहून अधिक काही झाले नाही. मात्र, आमची बुद्धिबळे बंद पडली ती पडलीच, नि भारत किंवा महाराष्ट्र नाही कदाचित, परंतु गेला बाजार पिनकोड ४११०३० तरी एका अतिसामान्य वकूबाच्या बुद्धिबळपटूस मुकला. (असावा. किंवा मुकला तरी की नाही, कोण जाणे! 'अशा जनांस्तव काय कुढावे, मोहि कुणाच्या का गुंतावे', वगैरे वगैरे.)

(तशी वर्गात पत्ते कुटण्याची सूचना/सुचवण - एस्पेशियली कमिंग फ्रॉम अ टीचर - ही अगदीच वाईट नव्हती, परंतु का कोण जाणे, तिचा पाठपुरावा आम्ही केला नाही. अशा प्रकारे गुरुजनांच्या शब्दाचा मान न राखून त्यांच्या केलेल्या अनादराबद्दल आजमितीस राहूनराहून वाईट वाटते, परंतु आता वेळ टळून गेलेली आहे. हा हन्त|)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर गल्लीबोळाच्या क्रिकेटचं विवेचन आलंय त्यात मोडणारा एक प्रकार म्हणजे "टी फाईन" म्हणजे काय तर बॅटला बॉल लागला आणि रन काढली नाही तर आऊट.

शिवाय इथे उल्लेख आलाय की नाही माहिती नाही पण किमान मुंबईच्या कामगार वस्त्यांमधल्या - कॅरमइतक्याच पापिलवार असलेल्या -स्पर्धा म्हणजे बॉक्स क्रिकेट. टेनिस बॉल ने खेळायचे. बॉल बॉक्सबाहेर मारला तर आऊट. शेकडो लोक पहायला यायचे. ड्झनावारी टीम होत्या.

बाय द वे, इथे टीक्कर चा उल्लेख आलेला आहे का? फरशीवर आयताचे ८ चौरसाकार भाग. त्यात चपटा दगड/सोंगटी टाकून खेळणे. आणि मग लंगडी घालून पूर्ण आयतभर फिरणे वगैरे.

लंगडीमधे सिन्गल-सिन्गल प्लेयर आणि पार्टी-लंगडी असे प्रकार.

आणखी नॉन स्टँडर्ड टाईमपास म्हणजे साबणाचे फुगे बनवून ग्यालरीतून खाली सोडणे. यात सर्फचे सप्तरंगी नि मोठे होत म्हणून ते "प्रिमियम क्लास" नि बाकीचे गरीब.

आणखी एक टीपी म्हणजे ग्यालर्रीमधे उन्हात आरसे घेऊन त्यांच्या रिफ्लेक्शनने एकमेकांना "गोळीबार" करणे. आणि गोळीबाराचा विषय आलेलाच आहे म्हणून दिवाळीच्या आसपास केपा आणि रोलनी (गंजक्या) पिस्तुलींबरोबर टिचक्यांव टिचक्यांव करणे.

इतर मिस्लेनियस गोष्टी म्हणजे कागदी पिशव्या फुगवून त्या फोडून त्यांचा आवाज करणे. काडेपेटीच्या मालगाड्या बनवणे. सिग्रेटच्या चांद्या उगाचच गोळा करणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"टी फाईन" म्हणजे काय तर बॅटला बॉल लागला आणि रन काढली नाही तर आऊट.

हेच तर आमचं 'कटकीरन' म्हणजे कट-की-रन.

आम्ही सायकलच्या दुकानासमोरून मातीत पडलेली शिसाळी गोळा करायचो. शिसाळं म्हणजे बॉलबेअरिंगच्या आतले छोटे स्टीलचे चेंडू.

आम्ही एकाच दिवाळीत गोळीबाराचा खेळ खेळलो होतो; इमारतीतले आम्ही तिघेच. समोरच्या लोखंडे बाईंच्या घरात शत्रू आहे आणि आपण त्यांचा खातमा करतो आहोत, अशी खबर आम्हाला तिघांनाच मिळाली. दिवाळीच्या दोन दिवस आधी तिकडे लोखंडे बाईंच्या आवाराकडे पिस्तुलींची तोंडं करून केपा वाजवल्या. मग लपतछपत टाकीवर चढलो; टाकीच्या वर पंपाची खोली होतो. तिघे कसेबसे तिथे मावलो आणि पुन्हा बार काढले.

थोड्या वेळानं शत्रूला आमच्या हल्ल्याची कल्पना आली. लोखंडे बाईंच्या आवारातून टाकीवर दगडफेक सुरू झाली. मग आमची तिघांची भीतीनं गाळण उडाली. शिवाय आमच्याकडचा दारूगोळा आणि दाणापाणी संपत आलेले होते. अंधार पडायला लागला होता. मग आम्ही डंकर्कची यशस्वी माघार, टाकीवरच्या पंपाच्या खोलीतून घेतली. (वेगळा डंकर्क बघायची गरजच नाही; मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे!) अतिशय धैर्यानं, मी सुद्धा, साडेतीन फूट उंच टाकीवरून एका धडाक्यात खाली उडी मारली आणि आमच्या अन्य फौजेच्या ठिकाणी - आपापल्या घरी - पळत परत गेलो.

हा खेळ खेळल्याचंही कधी कोणाला सांगितलं नाही. आता पहिल्यांदाच. (इतर दोघं फार गप्पाडे नाहीत; त्यांच्यातला एक तर पीएचडी झाला पुढे! तर त्यामुळे यापुढे त्या खेळाचा पुरावा शाबूत राहणार नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेंदाडशिपायांचा गोळीबार भारी होता Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आणि दिवे गेले की बॅटरीच्या झोताची पकडापकडी काही काळ चालली. नंतर ठाण्यात पुरेशी वीज पाठवण्याचा छोटा, अंधारा कालखंड आला, त्यात आम्ही मोठे झालो. त्यामुळे नंतरच्या उज्ज्वल काळातल्या नियमित लोडशेडिंगचा फायदा उठवणं शक्य झालं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. आमची लहानपणची उजेडाची मारामारी ही अतिशय लो-टेक (परंतु तितकीच प्रभावी) असे. बोले तो, घरातला एखादा छोटासा आरसा पळवायचा, गॅलरीत जाऊन उन्हात धरायचा, आणि त्यातून परावर्तित होणारे कवडसे येणाऱ्याजाणाऱ्याच्या डोळ्यांवर पाडायचे. (पुण्यात त्या काळी फ्लॅटमध्ये राहात असल्याने हे शक्य नव्हते, परंतु सुट्टीचा आजोळी गिरगावात आलो, की चाळीच्या गॅलरीत हे करायला भरपूर स्कोप होता. शिवाय,साथीला गँगही पुण्याच्या मानाने मोठी (आणि समविचारी, कोऑपरेटिव्ह) होती.)

२. मोठेपणी वसतिगृहावर आल्यावर मात्र या खेळाने थोडे वेगळे रूप धारण केले. तेथेही वीज वारंवार जात असे. शिवाय, कर्कवृत्ताच्या उत्तरेकडे असल्याकारणाने हिवाळ्यात अंधारही बऱ्यापैकी लवकर पडत असे. अशा वेळी, साधारणत: संध्याकाळी मेसमध्ये जेवायला जायचे वेळी वीज गेल्यास, बाहेर बऱ्यापैकी पडलेल्या अंधाराचा फायदा घेऊन आमची आख्खी विंग आपापल्या बॅटऱ्या घेऊन बाहेर येत असे, आणि समोरच्या वसतिगृहाच्या आमच्याकडे तोंड करून असलेल्या विंगेकडे त्यांचे झोत पाडून उच्चरवात तमिळ भाषेतील यच्चयावत शिव्यांची साभिनय आणि हातवाऱ्यांसह उजळणी करत असे. (वसतिगृह हिंदी पट्ट्यातले असले, तरी विद्यार्थिसंख्या ही मोठ्या प्रमाणात - जवळजवळ साठएक टक्के - मद्रास/मदुराई/नेयवेली ओरिजिनची असल्याकारणाने कँपसची व्यवहारभाषा जरी हिंदी वा इंग्रजी असली, तरी डी फॅक्टो मातृभाषा तमिळ होती, असे म्हणावयास प्रत्यवाय नसावा. त्यात समोरच्या विंगेतील तमाम जनता ही तमिळभाषक होती - आणि ही बाब आम्हांस ज्ञात होती. आमच्या विंगेतही काही भिडू होतेच; शिवाय, इतरांनासुद्धा तमिळमधील गेलाबाजार शिव्या अवगत असणे वॉज़ नो बिग डील.) पलिकडच्या विंगेतूनही आमच्या भडिमारास अत्यंत खिलाडू वृत्तीने तितक्याच तोडीचे प्रत्युत्तर मिळत असे. हे सवालजवाब साधारणत: वीज परत येईपर्यंत (किंवा, वीज लवकरच परत न आल्यास, कोणत्याही एका पक्षास कंटाळा येईपर्यंत अथवा भूक लागेपर्यंत) चालत, नि वीज परत आल्यावर 'चांगल्या सामन्या'साठी प्रतिपक्षाचे आभार मानून दोन्ही टिमा आपापल्या मेसकडे चालू पडत.

गेले ते दिवस! आणि राहिल्या केवळ त्या रम्य आठवणी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सागरगोटे-बिट्ट्या-काचपाणी-पत्ते-व्यवहार-कॅरम.
सागरगोटे फार आवडीचे होते.
बिट्ट्यांची तर झाडे खूप होती
____
लंडन-लंडन-लंडन
कटिंग द केक
टिपी टिपी टिप टॉप - व्हॉट कलर डु यु वाँट?
__________
शेक इट शेक इट शेकी शेक इट्
लाइक यु कॅन्
शेक इट लाइअक अ मशिन्
अँड डु द बेस्ट यु कॅन्
_________
टिपरी पाणी -
- लंगडी
- जोडपाय्
-ट्रिंग्ट्रिंग आणि शेवटचा टप्पा क्रँन्च्यु

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाला रुमाल-पाणी माहितीये का? राज्य देणाऱ्याच्या मागे ग्राउंडवर बाकीचे उभे असतात. आणि तो गाठ बांधलेला रुमाल मागे फेकतो, त्याची कॅच पकडायची असते. बाकी नियम आठवत नाहीत. माहित असल्यास सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0