रनवे

-मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन)

अलीकडेच नाशिक मध्ये खा. शरद पवार यांची एक मनमोकळी मुलाखत विश्वास लॉन्स येथे झाली. दुसऱ्या दिवशी साहेब जळगावला जाणार होते. आम्ही त्यांना निरोप देण्यासाठी ओझर विमानतळावर गेलो होतो. साहेब विमानात बसले आणि थोढ्याच वेळात विमानाने पश्चिम दिशेला टेक-ऑफ घेतला. कोणीतरी पटकन बोलले की अरे साहेबाना तर जळगावला जायचे होते आणि विमान तर मुबईकडे गेले. पायलट विसरले की काय? सर्वांच्याच मनात हा प्रश्न आला होता की विमान मुंबईच्या दिशेने का उडाले असेल?

आम्ही याबाबत माहिती घेतली असता असे लक्षात आले की विमान नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला उडते. प्रत्येक विमानतळावर हवेचा प्रवाह दाखवणारा झेंडा असतो. विमान नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला टेकऑफ आणि लँडिंग करते. भारतात वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. कधी या उलटही वाहत असतो. त्यामुळे येथील रनवे नेहमी पूर्व-पश्चिम असतात. अमेरिकेसह काही देशात चारही दिशांना तोंड करून 'रनवे' असतात. विमान हवेचा अवरोध 45 डिग्री अँगल पर्यंत ऍडजस्ट करू शकतात. त्यामुळे काही रनवे अधिकच्या चिन्हासारखे 'क्रॉस' मध्येही असतात. या रनवे ना 9-27 (पूर्व-पश्चिम) किंवा 18-36 म्हणजे (उत्तर - दक्षिण) असे नंबर दिलेले असतात. आपण विमानात बसलेलो असताना उड्डाणपूर्वी कॅप्टन रनवे नंबरची घोषणा करत असतात. हे समजण्यास अगदी सोपं आहे. हे आकडे म्हणजे डिग्री आहेत. 9 म्हणजे उत्तर दिशेपासून 90 डिग्री. उत्तर दिशेपासून घड्याळाच्या काट्याप्रमाणे मोजलेल्या अँगलला बेअरिंग किंवा अझीमुथ म्हणतात. रनवे 9 म्हणजेच विमान पूर्वेकडे उड्डाण करणार आहे. 27 म्हणजे 270 डिग्री अर्थात पूर्वेकडून पश्चिमेकडे, याचप्रमाणे 18 असेल तर 180 डिग्री म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि 36 म्हणजे 360 डिग्री अर्थात दक्षिणेकडून उत्तर दिशेकडे विमानाचे उड्डाण होते. धावपट्टी किमान 1829 मीटर ते 5500 मीटर म्हणजे साडेपाच किलोमीटर लांबीची असते. मुंबईत 9-27 (3445 मी.) आणि 14-32 (2925 मी.)असे दोन रनवे असून ते एकमेकांना छेदणारे आहेत. भारतात दिल्लीचा रनवे सर्वात लांब (4430 मी.) आहे तर जगात क्वामडो (चीन) चा रनवे सर्वात लांब (5500 मी.)आहे. भारतापेक्षा मोठे रनवे इराक, इराण, कोंगो, आफ्रिका, झिम्बाब्वे, नमिबिया, कतार, दुबई, ब्राझील, रशिया, इथिओपिया इत्यादी देशात आहेत. प्रवासी विमानाचा उड्डाणसमयी वेग सुमारे 300 किमी प्रतितास असतो तर हवेत तोच वेग 1000 किमी प्रतितास असतो. त्यामुळे स्थूल मानाने किती हजार किमी अंतर आहे तेव्हडे तास विमान प्रवास करते. रनवेच्या शेवटी पांढऱ्या अक्षरात त्या धावपट्टीचा क्रमांक लिहिलेला असतो. काही ठिकाणी हवा एवढी जोरात वाहत असते की विमान रनवेच्या जवळ येई पर्यंत हवेच्या अनुरोधाने चक्क तिरके खाली आणले जाते आणि अगदी चाक स्पर्श करण्यापूर्वी विमानाची दिशा रनवे प्रमाणे बदलली जाते.

हवेचा प्रवाह विमानाच्या सोयीनुसार असेल तर विमान कोणत्याही दिशेने लँड करता येते. अशा वेळी विमानाचे पार्किंग हँगर जवळ पडेल, प्रवसी गेट जवळ पडेल, इतर विमानांचे टेक ऑफ किंवा लँडिंग मागोमाग त्वरित करता येतील असे विचार करून नियंत्रण केले जाते. आजच्या काळात विमानप्रवासा इतका आरामदायी प्रवास दुसरा नसेल. हवेत उडणाऱ्या या राजमहालामागे किती विज्ञान असते हे बघून आपण थक्क होतो. ज्या संशोधकांनी विमानाचा शोध लावून त्यात आतापर्यंतची प्रगती केली आहे, त्यांना सलाम करावासा वाटतो.

-मंगेश पंचाक्षरी,नासिक.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

>>हवेत उडणाऱ्या या राजमहालामागे किती विज्ञान असते हे बघून आपण थक्क होतो. <<

आणि शिवाय आपण शेकहँड तीन पायावंर बसून करावे की चारपायांवर बसून करावे असल्या येडझव्या चर्चा करत बसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

का हो, हे लिखाण विना परवानगी छापलं तर चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

वेड लागलेय?

(ऱ्हेटॉरिकल प्रश्न.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं स्वगत आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही त्यांना निरोप देण्यासाठी ओझर विमानतळावर गेलो होतो.

गरज काय पडली होती? उगाच पुढेपुढे करायला जायचे ते?

की तुम्ही त्यांच्या पक्षाच्या स्थानिक कार्यकारिणीतले? (जाहिरात? नेम्सड्रॉपिंग?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतापेक्षा मोठे रनवे इराक, इराण, कोंगो, आफ्रिका, झिम्बाब्वे, नमिबिया, कतार, दुबई, ब्राझील, रशिया, इथिओपिया इत्यादी देशात आहेत.

चालायचेच! भारताचा नंबर शेवटचाच राहायचा!

बादवे, (अवांतर):

इराक, इराण, कोंगो, आफ्रिका, झिम्बाब्वे, नमिबिया, कतार, दुबई, ब्राझील, रशिया, इथिओपिया...

यावरून हे आठवले:

"सुव्वर के बच्चे जहन्नुम में जाएं!"

(हॅव फन! एंजॉय!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही याबाबत माहिती घेतली असता असे लक्षात आले की विमान नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला उडते. प्रत्येक विमानतळावर हवेचा प्रवाह दाखवणारा झेंडा असतो. विमान नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला टेकऑफ आणि लँडिंग करते

ही तुमच्या नाशकाची खासियत असली तर माहिती नाही. पण मी जे बघितले आहे त्यानुसार विमानं रनवेच्या एकाच बाजुने दिशेनी टेकऑफ करतात ( वारा कुठल्याही दिशेने वाहत असु दे किंवा डेस्टिनेशन कुठल्याही दिशेला असु द्या ).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-१

Take off & landing, both are done into the wind (major component of wind coming from front).

सीझननुसार टेकॉफची दिशा बदलते. दर उड्डाणाला किंवा दरदिवशी बदलत नाही पण वारा बराच काळ मुख्यतः कोणत्या दिशेत वाहतोय ते पाहून दिशा ठरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वी याचं स्पष्टीकरण अन्यत्र लिहीलेलं चोप्यपस्ते:

रनवेच्या भोवती विमान ज्या मार्गाने उडतं त्याला सर्किट पॅटर्न म्हणतात. सर्किट पॅटर्न हा सर्व एअरपोर्टसमधे जवळजवळ सारखाच असतो. एखाद्या एअरपोर्टच्या रनवेची दिशा ठरवताना त्या जागी वारा कसा वाहतो याचं अनेक वर्षांचं रेकॉर्ड पाहतात. विमानाचा टेकऑफ आणि लँडिंग, दोन्हीही वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं.
कारण.. ?
वर म्हटल्याप्रमाणे विमानाचे सर्व स्पीड हे हवेशी रिलेटिव्ह असतात. टेक ऑफसाठी आवश्यक स्पीडसुद्धा..
रनवेची लांबी अर्थातच मर्यादित असते.
त्यामुळे वारा समोरुन येत असला तर ट्रू एअरस्पीडच्या मानाने ग्राउंड स्पीड कमी राहतो आणि रनवेवरची कमी लांबी खर्च होऊन लवकर टेकऑफ होतो. एरवी विमान रनवेच्या दुसर्‍या टोकाशी जाऊन कदाचित ठोकरग्रस्त झालं असतं.
लँडिंगही याच, पक्षी वार्‍याच्या विरुद्ध दिशेत केलं जातं, कारण समोरुन येणार्‍या वार्‍याने लँडिंग झाल्यावर ग्राउंड स्पीड कमी होतो आणि विमान कमी अंतरात थांबतं..
रनवे जरी वार्‍याच्या हिस्टॉरिक दिशेवरुन बांधत असले, तरी वार्‍याची दिशा बदलत राहतेच. विशेषतः हवामान खूप बदललं की वार्‍याची दिशा उलटही होते. अशावेळी रनवे तर हलवता येत नाही.. मग टेकॉफ आणि लँडिंगची दिशा उलटी केली जाते.
मुंबईवासी विमानप्रवाशांनी किंवा नागरिकांनी खूपदा पाहिलं असेल की बर्‍याचवेळा घाटकोपरकडून लँडिंग करणारी आणि टेकॉफनंतर जुहू चौपाटीवर वर चढताना दिसणारी विमानं अचानक दिशा बदलून चौपाटीच्या दिशेने उलट लँडिंग करायला खाली येऊ लागतात. आणि टेकॉफनंतर ती जुहू ऐवजी घाटकोपर कुर्ल्यावर दिसतात. यालाच रनवे बदलला असं म्हणतात. मुंबई कंट्रोल टॉवर सर्व विमानांना "रनवे इन यूज" अशा नावाखाली नेहमीच याक्षणी कोणत्या बाजूने रनवे वापरात आहे हे सांगत असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूपच छान माहिती सर, धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढे 'गवि' यांनी उत्तम स्पष्टीकरण दिलं आहे ते वाचा, समर्थ म्हणत असत'अभ्यासून प्रकटावे' . उगाच नाशकात वगैरे अशी अज्ञानी वाक्य वापरून हसू करून घेत जाऊ नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

08/2017 - 13:21.
पुढे 'गवि' यांनी उत्तम स्पष्टीकरण दिलं आहे ते वाचा, समर्थ म्हणत असत'अभ्यासून प्रकटावे' . उगाच नाशकात वगैरे अशी अज्ञानी वाक्य वापरून हसू करून घेत जाऊ नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.