Cool देवी

©मंगेश पंचाक्षरी, नासिक.[फेसबुक पेज]

गुगल, जी पी एस यासारखी साधने वापरून जगात कुठेही काहीही शोधून काढणाऱ्या पुरुषाना त्यांची बायको 'तिखटमीठाचा' डबा आणा हो आतून" असं जेव्हा सांगते तेव्हा मात्र तो नेहमीच कावरा बावरा होतो. तिखटमीठाचा डबा आणि पोळ्यांचा डबा सारखाच दिसत असल्याने तो हमखास चुकीचा डबा आणतो. एकदा अंगाला 'हळद' लागली की पुरुषांना तेल- मसाल्याचे भाव समजायला सुरुवात होते. पण स्वयंपाकघर ही मात्र खास बायकांची मक्तेदारी. तिथे त्यांचं राज्य असतं. अर्थात यास काही अपवाद ही असतीलच म्हणा. पण एकूणच डाळी, पीठ, साखर, पोहे ,रवा यांचे डबे तिला बरोबर सापडत असतात. एकदा मला सौ ने मिठाचा डबा आणायला सांगितला आणि मला तो काही केल्या सापडेना. "तुम्ही एवढे इंजिनिअर आणि साधा मिठाचा डबा सापडत नाही?" तिने माझ्या शिक्षणाचा उध्दार केला. बायकांनी डिवचले की पुरुषांना अजिबात सहन होत नाही. रात्रभर त्या अपमानाने माझा डोळ्याला डोळा लागला नाही. मी उगाचच त्या (न) खाल्लेल्या मिठाला जागलो. एरवी बायको ने माहेरहून फोनवर अर्धी 'वाटी' भात लावा असं सांगितल्यावर किचन ट्रॉलीमध्ये दाटी'वाटी'ने ठेवलेल्या वाटीतील नेमकी कोणती 'वाटी' वापरायची हे मला कधीच समजत नाही, हा भाग वेगळा.

"कुकरच्या तीन शिट्या झाल्या की कुकर बंद करा!" हे काम सुद्धा पुरुषांना असेच टेन्शन देणारे असते. मॅच बघताना किती बॉल, किती रन शिल्लक आहेत हे अचूक सांगणाऱ्या महाभागांना कुकरच्या नक्की तीन शिट्या झाल्या की चार याबाबत मी कधीही 'कॉन्फिडेंट' पाहिलं नाहीये. खरं तर हल्ली बायका ऑफिस मध्ये ही काम करतात आणि किचनही समर्थ पणे सांभाळतात. याबद्दल त्यांचं कौतुक करावे तितके थोडेच आहे. आलं- गेलं, मुलांचं शिक्षण, घर सफाई, कपडे लत्ते असं चौफेर काम सांभाळून वर त्या उत्साहाने किटी पार्टी, सणवार सांभाळत असतात. (भारतीय) पुरुष त्या मानाने बरेच नशीबवान म्हंटले पाहिजेत. कामावरून घरी (डायरेक्ट आले) तर त्यांना कांदे -पोहे, भजी असं काहीबाही तयार हवं असतं आणि मग चहा आणि नंतर रात्रीचं चमचमीत जेवण. काही महाभाग संध्याकाळी ७ ते ११मित्रांसोबत बाहेर च जेवायला असतात. असे लोक मग मुकाट्याने 'दाल-खीचडा' खाऊन येतात आणि शांतपणे झोपून जातात. संध्याकाळी घरी जेवायला असतील तर मात्र त्यांचे नखरे असतात. नुसता पापड तळलेला नसेल तरी त्यांचा 'तिळपापड' होतो. दिवसभर ऑफिस मध्ये घडलेल्या गोष्टींच्या 'वडाचं तेल' ते घरात 'वांग्यावर' काढत असतात. बायका मात्र हे सर्व तणाव झेलूनही कुटुंबाचा गाडा शांतपणे ओढत असतात. न कंटाळता नवनवीन पदार्थ करून नवऱ्याला खाऊ घालत असतात. सकाळी अंघोळीला गेल्यावर टॉवेल विसरणं, आंघोळ झाल्यावर टॉवेल तसाच टाकणे , टूथ ब्रश, दाढीचे ब्लेड जागेवर न ठेवणं अशा बेशिस्त नवऱ्याना कपडे तयार ठेवणं, डबा करून देणे, पाकीट- रुमाल- गाडीची किल्ली शोधून देणं यासारखी असंख्य कामं बायका सकाळी करून देत असतात. हे सुख फ़क्त भारतातच आहे. नेमकं उपासाच्या दिवशी खिचडी करताना लाईट नसल्याने मिक्सर काम करत नाही, अशा वेळी दाण्याचा कूट कसा करायचा असा (कूट) प्रश्न बायकाच सोडवू शकतात. कधी घरी पाहुणे येतात त्याच वेळी नेमके सिलेंडर संपल्याने ती 'गॅस' वर असते तर कधी अचानक नळाला पाणी न आल्याने तिच्या तोंडचं 'पाणी' पळते... भांडेवालीने घोळ घातल्यावर आपलेच चमचे, वाट्या, डिश ओळखणे, नवऱ्याला छत्री न विसरता परत आणायला भाग पाडणे, वेळच्या वेळी औषध घेण्याची नवऱ्याला आठवण करणं, पापड- कुरडया- लोणची घालणं, कपड्यांची इस्त्री, मुलांचा होमवर्क आणि प्रोजेक्ट करणं, त्याच वेळी सासू, सासरे, मुलं यांचे ही ताल सांभाळणं आणि इतकं सर्व करूनही सासूबाई ना काय वाटेल म्हणून पूजेला बसताना पंजाबी ड्रेस न घालता साडी नेसणं अशी कितीतरी व्यवधानं बायका सांभाळत असतात. एवढं सर्व सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. त्या वेळी नवरे मंडळी टीव्ही वर बातम्या बघणं, फेसबुक, व्हाट्स अँप वर बिनकामच्या पोस्ट करणं, अमेरिकेकतील निवडणूक या विषयावर मित्रांशी फोनवर बोलणं यात गुंग असतात. क्वचित त्याही चिडतात, नाही असं नाही. तेव्हा मात्र पुरुषांचे चेहरे बघण्यासारखे असतात. अशावेळी तूरडाळ महाग झाल्याबद्दल सरकारचा निषेध करणाऱ्या पुरुषांची घरी बायको पुढे मात्र 'डाळ शिजत नाही'. शेपू ची भाजी आवडत नाही असं आई ला ठणकावून सांगणारे महाभाग, तीच भाजी बायको ने केल्यावर मात्र तिच्यापुढे 'शेपू'ट घालतात. बायकोच्या हातची खीर ही ज्यांना आयुष्यभर गोड लागत नाही त्यांना डायबेटीस झाल्यावर 'कारलं' गोड मानून घ्यावं लागतं. हळूहळू बायको च्या हातचं जेवण हा च त्याच्यासाठी ब्रँड बनून जातो.

बायकांचं योग्य कौतुक केल्यानं ज्या पुरुषांना मिरची झोंबतेय त्यांनी किचन मध्ये जाऊन स्वतः चार मिरच्या तळून दाखवाव्यात. एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडू शकणाऱ्या शास्त्रज्ञाच्या या देशात दूध उतू न जाऊ देणारी, तीन शिट्या झाल्या की कुकर बंद करणारी, झटपट पोळ्या करणारी,फोडणी हातावर न उडू देणारी, आज कोणती भाजी करावी हा यक्षप्रश्न सोडवणारी,कामवाली आली नाही तर पर्यायी दुसरी (तरुण आणि सुंदर नसणारी) कामवाली अरेंज करणारी, पंखे पुसणारी यंत्रणा आणि ऍप्स का तयार होऊ शकत नाहीत?

गॅस, मिक्सर, ओव्हन, फ्रीज, ब्लेंडर, जूसर, डिश वॉशर, फिल्टर अशा वस्तूंचा वापर लीलया आत्मसात करणारी अष्टावधानी स्त्री ही मला तर जणू आजच्या युगातील 'अष्टभुजा' देवीच भासते. देवघरातल्या 'कुळ देवी' ची रोज पूजा करणाऱ्यांनी सर्व आघाड्यांवर लढताना डोकं 'शांत' ठेवणाऱ्या या 'कुल देवी' च्या ही खुशीचा विचार नक्कीच करायला हवा, नाही का?

- ©मंगेश पंचाक्षरी, नासिक.
Email:- mangeshp11@gmail.com

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्तच. पुरुषांना खरंच या सगळ्याची काआआआही कदर नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फेमिनीझम चे वारे जोरात वाहतायेत... थंडी वाजाया लागली.
लेख अगदिच दवणीय + बाबा जोक्स आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

असहमत. लेख उत्तम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लेखातुन जे चित्र निर्माण होतय ते किळसवाणे आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला नै वाटत . अत्यंत सुंदर चित्र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्वत:ला राबायला लागत नसेल असे कुठलेही चित्र अत्यंत सुंदरच असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे पांढरपेश्यांचे ठिक आहे. पण कामगार, शेतकरी यांचे म्हणाल तर उलटे आहे. बायकांना सोप्पी कामं असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पांढरपेशे सोडून अन्य वर्गात बायका घरी न बसता बाहेरचीही कामे करतात. ती सोप्पी असतात का? विशेषत: घरकाम ॲड केल्यावर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अयाया.... पार दोन टोकं... टोकाचा फेमिनीझम आणि टोकाचा एमसीपी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

जगात माझ्याइतका कट्टर स्त्रीवादी नसेल. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बरोबर. तुमच्यापेक्षा जास्त कट्टर स्त्रीवादी असतील. पण तुमच्याइतके नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरोब्बर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चित्र कुठाय हो... लेख आहे तो.. चश्म्याचा नंबर बदला.... लेख पण नीट वाचला जाइल म्हणते मी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

मोबाईल चं सर्किट आणि बॅटरी चांगली आहे तरी 'जळाल्याचा' वास येतोय. पण ठीक आहे. आम्ही मोबाईल बऱ्याच वर्षांपासून ठीक करत आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निषेध!

या लेखास 'दवणीय' म्हटल्याबद्दल प्रो. दवण्यांनी तुमच्यावर अब्रूनुकसानीचा दावा का ठोकू नये, याची कारणे दाखवा. अन्यथा (प्रो. दवण्यांची) जाहीर माफी मागा.

- (दवणे'ज़ अॅडव्होकेट) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या दिवशी मला दुध तापवताना तिथे थांबायची ऑर्डर येते, दुध ऊतू गेलंच म्हणून समजा. नै गेलं तर मी मुद्दाम घालवतो, कसे, दोन शब्द ऐकून घेतले तरी चालेल, पण पुन्हा पाच-दहा दिवस तरी ते काम फिरुन येत नाही. लै बोर काम गड्या. पार्कींग मधून गाडिच्या चावीसाठी ओरडणं तर माझ्या आवडीचं काम. मला मोजे का सापडत नसावेत ही एक गूढच आहे, तिला पटकण सापडतात. ती गावाला गेली की कपड्याचा हँगर दया मागायला चालू करतो अन् एकच जीन्स मग आठवडाभर घालायला चालते (जीन्सचा शोध लावणारा खरंच महानै). (इंजिनीरिंग ला असतानाचे जीन्सचे रेकॉर्डस् तर वेगळेच). बाहेर फिरायला गेल्यावर/महिनाअखेर नंतर किती पैसे खर्च झाले हा हिशोब नेहमीच पांगलेला असतो, बायकोवर हे काम सोडलं की शनिवार-रविवार केलेला ओव्हरटाईम(?) पण बाहेर निघतो तेंव्हा कौशल्याने विषय बदलावा लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

बायकांचं योग्य कौतुक केल्यानं ज्या पुरुषांना मिरची झोंबतेय त्यांनी किचन मध्ये जाऊन स्वतः चार मिरच्या तळून दाखवाव्यात.

स्वयंपाकघरात कधीही पाऊल न ठेवलेल्यांसाठी हा निकष बरा आहे पण तितकाच बाळबोध आहे. असा निकष देणाऱ्याने बहुधा स्वत:ही कधी स्वयंपाक केला नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख आवडला. तो अत्यंत उच्च लेव्हलचा वाटला. शाब्दिक कोट्या करण्याची एकही संधी दवडलेली नाही. खास करुन , 'शेपू आणि शेपूट' ची कोटी आमच्या अंत:करणाला भिडली. पु.ले.शु. असेच खुसखुशीत लेख रोज वाचायला मिळाले तर किती बरं होईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाब्दिक कोट्या करण्याची एकही संधी दवडलेली नाही म्हणजे नंदनला फाईट आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

आमच्याकडे संधी दडवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दुरून कोपरापासून दंडवत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

दडवून काय करतात संधीचे? संधी चीज? की नंतर भाजून दम संधी बिर्यानी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संधी कि संघी??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तुमचं म्हणजे प्रेम ऊतू चाललंय हा बाकी... कित्ती कित्ती म्हणजे बाजू घ्यावी ती...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

मला लेख आवडलाय तितकी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0