भाषण

- मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन)

"मला भाषण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं बोलून जो माणूस भाषणास सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने भाषण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ भाषण चाललेलं असते. हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मंचाच्या समोरच बसलेल्या लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात. तरीही याचं भाषण संपायचं चिन्ह दिसत नाही. आता संपेल, मग संपेल असं करता करता भाषण लांबतच रहातं. मग पुढच्या रांगेतली पुरुष मंडळी बळेच मोबाईल कानाला लाऊन कोणाचा तरी अर्जंट कॉल आला आहे असं भासवत बाहेर जातात आणि सिगरेट शिलगावतात. इकडे वक्त्याला 'चेव' चढलेला असतो कारण मंचावर बसलेली मान्यवर मंडळी उठू शकत नसतात. त्यांना ते भाषण ऐकणे (?) भाग असतं. अखेर सभागृहातील निम्मी अधिक मंडळी यानिमित्ताने (जायचे असो वा नसो ) स्वच्छता गृहाचा द्दौरा करून येतात. तरीही वक्ता जोशातच असतो. जगाच्या अंतापर्यंत हे असेच चालू रहाणार असं फील येत असताना केव्हातरी ते रटाळ भाषण संपते. लोकं जोरदार टाळ्या वाजवतात. या टाळ्या भाषण एकदाचं संपले म्हणून असतात. पण वक्त्याला वाटते आपले मौलिक विचार ऐकून श्रोते प्रभावित झालेले आहेत. तो पुनः "एक सांगायचं राहिलंच" असं म्हणून कोणाचीतरी चमचेगिरी करणारी वाक्य फेकतो. हेतू हा कि पुनः पुढच्यावेळी त्याने बोलण्याची संधी द्यावी. "हा आता परत कितीवेळ खाणार" या विचाराने लोकांच्या पोटात गोळा येतो. याला नक्की कोणी भाषणाचा आग्रह केला होता याचा शोध सुरु होतो. सगळे पदाधिकारी ' तो मी नव्हेच' हा पवित्रा घेतात. इकडे 'जगावर सूड उगवणारी' चार दोन माणसे प्रत्येक ठिकाणी असतातच. ती 'त्या' वक्त्या(?)ला "भाषण छान झालं" असं सांगून उपस्थितांच्या जखमेवर मीठ चोळतात. महिनाभर अथक परिश्रम करून आणि पैसा खर्च करूनही पडद्यामागेच रहाणाऱ्या आणि प्रयत्नपूर्वक देखणा कार्यक्रम करणाऱ्या आयोजकांच्या मेहनतीवर उपस्थितांच्या चेहऱ्यावरच्या 'कार्यक्रम रटाळ झाला' या अदृश भावनेने पाणी फिरते याच्याशी 'त्या' भाषण (!) करणारास काहीच देणेघेणे नसते.

'वक्ता दशसहस्त्रेषु' म्हणजे काय हे या अर्धवटरावांच्या गावीही नसते. भाषण करताना केव्हा थांबावे हे ज्याला कळते तोच खरा वक्ता असतो!

-मंगेश पंचाक्षरी , नासिक.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लिह्ताना केव्हा थांबावे हे ज्याला कळते तोच खरा लेखक् असतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लंगडा आला रे

रोज एवढे चांगले लेख पचत नाही मंगेशराव. जरा विश्रांती घेउन टाका तुमचे लेख. आम्हाला आस्वाद घेऊ द्या लेखांचे. रोज जेवणात बासुंदी, जिलेबी वगैरे मिळालं तर कसं वाटेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सर्व ऐसीकरांना प्रश्न: असे आल्याआल्या प्रतिसाद वगैरे देऊन वॉर्म अप न करता लेख टाकणारे अन्य कोणी आहेत का? राकु होते, पण ते प्रतिसाद्देखिल द्यायचे असे आठवते. पंचाक्षरी ज्याप्रमाणे दुसऱ्या कुठल्याच पोस्टवर प्रतिसाद न देता, स्वत:चेच लेख टाकत सुटलेत तसे कोणी अन्य?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

होते ना... ते कसली तरी मालिका एका मागून एक टाकलेली ते... जँक फ्लेचर चे जन्मदाते...पाडेकर काका...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

अच्छा पुम्बा, म्हणजे तुमच्या लेखाचे कौतुक करावे म्हणून हे सर्व चालले आहे तर.... ब..रं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही नाही.. पंचाक्षरीसाहेब.. मी लेख वगैरे टाकत नाही हो.. पण बाकीच्यांना प्रतिसाद पण देत जा..
असो, तुम्ही लिहा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

कवी ही अजून एक जमात आहे की दणादण कविता पाडून पसार होणारी. जरा 'नवीन लेखन' धाग्यात स्क्रोल स्क्रोल केलं की बरेच नग दिसतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

अरे आवरा यांना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

पंचाक्षरी काका, बिनधास टाका ओ लेख.. आम्हाला तेवढाच टैमपास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

पंचाक्षरींचे पंचामृत आम्हाला रोजच चाखायला आवडेल. वाचक स्वागत करत आहेत. तुम्ही लिहा हो भरपूर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या ना त्या मार्गाने अभिव्यक्ती वर निर्बंध घालण्याचा यत्न करणाऱ्यांचा निषेध.

मंगेशभाई तुम्ही अवश्य लिहा. किती ही लिहा. व इतरांच्या धाग्यांवर प्रतिसाद दिले नाहीत तरी चालेल. पण लिहा. सिरियसली म्हणतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सर, मी येथे नवीन आहे. पण गेली 21 वर्ष पत्रकारितेत आहे. योग्य लोकांना 'योग्य' प्रतिसाद देईलच. चांगल्या लेखनाला चांगला प्रतिसाद देऊ म्हणतोय. कारण आपल्याला (शक्यतो) सभ्यता सोडता येत नाही. बाकी आम्ही पत्रकार मंडळी 'काही निर्लज्ज राजकारणी' लोकांचे कपडे उतरवतो, तर इथले काही टिनपाट काय विशेष आहेत?

पुनः एकदा आपले आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

बाकी आम्ही पत्रकार काही निर्लज्ज राजकारणी लोकांचे कपडे उतरवतो....

हे वाक्य सेक्सिस्ट आहे असं म्हणायला जागा आहे. जरा जपून. कारण या वाक्यात राजकारणी पुरुष आहेत/असतात असे गृहितक दडलेले आहे असं म्हणायला जागा आहे. बहुतेक राजकारणी जर स्त्रिया असत्या तर तुम्ही हेच वाक्य जाहीररित्या उच्चारायचे धाडस केले असतेत का ?

पळा पळा पळा....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

योग्य लोकांना 'योग्य' प्रतिसाद देईलच

हर हर... पत्रकारितेत असून अशा चुका....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

या ना त्या मार्गाने अभिव्यक्ती वर निर्बंध घालण्याचा यत्न करणाऱ्यांचा निषेध.

First they came for the neo-Nazis, and I did not speak out -
Because I was not a neo-Nazi.

Then they came for the Ku Klux Klan, and I did not speak out—
Because I was not a Klansman.

Then they came for me—
and there was no one left
to speak for me.

(श्री. मार्टिन नीम्योलर यांच्या आत्म्याची क्षमा मागून, प्रस्तुत कवितासदृश र-ट-फावली ACLUला सादर समर्पित.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लवकरच 'ऐसी अक्षरे'चे रूपान्तर 'ऐसी पंचाक्षरे'मध्ये होणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला, अक्षरशः मोबाईल मधून जळाल्याचा वास आला इथपर्यंत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हटकर सरांचा आय.डी. कोणी हॅक केलाय का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हटकर आजोबांनी, गेल्या रवीवारचा कुंडलकरांचा हा लेख वाचला आहे. त्यामुळे हा बदल झालाय्

http://www.loksatta.com/karant-news/sachin-kundalkar-article-on-style-of...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0