चले जाव चळवळ आणि गांधीवधानंतरची दंगल

१९४२ची चले जाव चळवळ जी ब्रिटीश सरकार विरुद्ध असहकाराचे धोरण म्हणून सुरु झाली त्याला ह्या वर्षी(गेली आठवड्यात) ७५ वर्षे झाली. ह्याला छोडो भारत असेही नाव आहे. महाराष्ट्रात क्रांतीसिंह नाना पाटील यांनी खरे तर चले जाव चळवळीच्याही आधी प्रतीसरकार स्थापन केले. अनेक जण या चळवळीत सहभागी झाले आणि भूमिगत होऊन काम केले. त्यावेळच्या, काळाच्या परिस्थितीचे दस्ताऐवजीकरण मराठी तरी विशेष झालेले माझ्या ऐकिवात नाही. त्याच प्रमाणे गांधीवधानंतर जी दंगल, जाळपोळीची, हत्याकांड अशी परिस्थिती उद्भवली तीचे देखील अभावानेच दस्ताऐवजीकरण झालेले दिसते. मात्र फाळणीचे अनेक तऱ्हेने(चित्रपट, साहित्य इत्यादी) झाले आहे.परवाच ऐकले की फाळणीवर एक नवीन हिंदी सिनेमा येत आहे.

चले जाव चळवळीच्या पंचाहत्तरीनिमित देशभर बरेच कार्यक्रम झाले, पंतप्रधान मोदी यांनी देखील आपल्या वेगळ्या शैलीत हा दिवस कसा साजरा करता येईल याबद्दल सूचना केल्या आहेत, तेही योग्यच आहे म्हणा. योगायोगाने मी नुकतेच व्यंकटेश माडगुळकर यांचे कोवळे दिवस हे चले जाव चळवळीचे अनुभव कथन करणारे पुस्तक वाचले. तसेच त्यांचेच वावटळ हे देखील गांधीवधानंतरच्या परिस्थितीचे दाहक अनुभव सांगणारे पुस्तक पाठोपाठ वाचले. दोन्ही पुस्तके वैयक्तिक अनुभव कथन करणारी असल्यामुळे खूप परिणामकारिक झाली आहेत. दोन्हीही छोटी पुस्तके आहेत, पण खिळून ठेवणारी आहेत. दोन-तीन बैठकीत वाचल्याशिवाय चैन पडत नाही अशी ती आहेत.

तसे पहिले तर दोन्ही पुस्तके व्यंकटेश माडगुळकर यांच्या आयुष्यातील विशिष्ट कालखंडातील घटना सांगते, त्यामुळे आत्मचरित्रात्मक, आत्मनिवेदनात्मक अशी ती आहेत. त्यांनी चले जाव चळवळीमध्ये भाग घेतला तेव्हा ते १९-२० वर्षांचे होते, म्हणून पुस्तकाचे नाव कोवळे दिवस. आपल्याला माहिती आहेच लेखक माणदेशातले. पुस्तकातील अनुभव हा सर्व त्याच परिसरातील-सातारा, सांगली, कोल्हापूर, मिरज भागातील. काही भाग संस्थानिकांच्या ताब्यात, तर काही ब्रिटिशांच्या. पहिल्या काही पानातील अनुभवकथन जबरदस्त आहे. पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागे लागलेला असतो, तो चुकवत, कोल्हापूर भागातील त्यांची लपाछपी त्यांनी चित्रित केली आहे. क्रांतीकारकांची मानसिकता कशी असावी लागते याचेही ते विविध दाखले देऊन विवेचन करतात. स्वातंत्र्य लढ्यात पडण्याआधी, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न फसला होता. खादी भांडार आणि भूमिगत कार्यकर्त्यांच्या संपर्काने ते लढ्यात ओढले गेले, जवळ अडीच वर्षे त्यात होते, सामान्य लोकांकडून सोनेनाणे चोरून स्वातंत्र्य लढ्याला अर्पण केले. कसे तरी ते पोलिसांपासून निसटले, आपल्या गावी आले. नंतर प्रतीसरकारचे लोण गावी पोहचले त्याबद्दल लिहितात. प्रतीसरकारला पत्रीसरकार असे म्हणत असत हे समजते. निवेदनाच्या ओघात त्या कोवळ्या वयात झालेल्या आकर्षणाचे अनुभव मोकळेपणाने सांगतात. त्याचे वर्णन वावटळ या पुस्तकात येते. तसेच चित्रकारीतील उमेदवारीबद्दलही ते लिहितात. आणि शेवटी ते त्या कोवळ्या दिवसांच्या कोवळ्या आठवणींचे स्मरणरंजन काव्यात्मरीत्या करून थांबतात.

लगेच काही वर्षानंतर त्यांनी गांधीवधाच्या नंतरच्या परिस्थितीचा अनुभव अचानक एका प्रवासात असताना घेतला. त्याचे साद्यंत वर्णन वावटळ या कादंबरीत येते. गांधीवधाच्या दिवशी लेखक पुण्यात असतात, त्यांचे शिक्षण सुरु असते. पुण्यात लगेच कर्फ्यू लागलेला असतो. सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण असते. त्यामुळे लेखक, आणि त्यांचे गावाकडचे दोन मित्र गावी जाण्यास निघतात. त्यानंतरची कादंबरी म्हणजे वाटेत आलेले दाहक, आणि द्वेषाच्या वातावरणाचे अनुभव कथन आहे. ह्या घटनेनंतर समाजमनाचे झालेल्या संक्रमणाचे चित्रण म्हणजे हे पुस्तक. सगळेच लोक एकमेकांवर अविश्साने पाहत असतात. मजल-दरमजल करत जात असता, मिळेल त्या वाहनाने, कधी चालत घरची वाट त्यांनी धरलेली असते. बेफान झालेले लोक, कशाचाही विधीनिषेध न बाळगणारे लोक हे सर्व पाहून त्यांचे मन उद्विग्न होते. तिन्ही मित्रांचे अनुभव थोड्याफार फरकाने सारखेच. ह्या प्रवासात त्यांनी एका वावटळीचाच अनुभव घेतला असे म्हणता येईल. ह्यातील काही घटनांचे संदर्भ दोन्ही माडगुळकर बंधूंच्या इतर पुस्तकातूनही आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास करुणाष्टक मध्ये ते येते, ज्यात आईच्या करारी स्वभावाचे दर्शन दंगलीच्या वेळेस निर्माण झालेल्या परिस्थितीस तोंड देत असता घडते.

ह्या दोन्ही ऐतिहासिक घटनांचे समाजावर झालेले परिणाम खोल आहेत. देशातील इतर भागात, इतर भाषेतून याचे चित्रण झाले असणार. ते जर मराठी अथवा हिंदी/इंग्रजीमध्ये असेल तर नक्कीच वाचायला आवडेल.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भारतात हिंदू मुस्लिम द्वेषाचा इतिहास नाही (नव्हता) असं म्हणता येईल. १० लाख लोक मेले त्यातले किमान अर्धे हिंदू मानले तरी याचा कोणताही पडसाद दक्षिण भारतात उमटला नाही. हे दोन धर्म इतके भिन्न भांडखोर असून. तेच एक माणूस त्याच्याच धर्माच्या तेही (सर्वात) प्रभावशील जातीच्या माणसाने मारला तर त्यांना सर्वत्र जगणे हराम करून सोडले. म्हणजे दंगेखोर सोडून दोन्ही धर्माचे बाकी देशवासी प्रेमशील होते. त्यांना त्या लाखोंच्या आकड्याशी काही मतलब नव्हता. त्यांना ध्रर्मनिरपेक्ष भारत देखिल याच पार्श्वभूमीवर देखिल मान्य होता. मंजे किती ते ऐक्य! घासकडवींचे मते स्थिती पुढे सुधारतच आली आहे. मग थत्तेंना का वाटते कि आज अचानक ३१% बिजेपीच्या मतदारांना आणि ७% त्यांच्या सहयोग्यांना मोदींनी मुसलमानांना "धडा" शिकवावा असे वाटते? नक्की कोणाची संगत असे विचार स्फुरवते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गांधीहत्योत्तर दंगल ही महाराष्ट्रातच झाली, सबब त्या घटनांचे वर्णन अन्य भाषेत असणे दुरापास्त आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे हो का, ही माहिती मला नवीनच आहे. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

गांधीहत्योत्तर दंगल ही महाराष्ट्रातच झाली

यावरून अवांतर शंका:

ब्राह्मणांना (एकूण लोकसंख्येतील त्यांच्या गुणोत्तरावरून) 'साडेतीन टक्के' म्हणून जे संबोधतात, ते स्टॅटिस्टिक महाराष्ट्रापुरतेच मर्यादित आहे, की आलम हिंदुस्थानास (फाळणीपूर्व किंवा फाळण्योत्तर) लागू आहे?

(नाही म्हणजे, इतरत्र ब्राह्मणांची कदाचित मेजॉरिटी असावी असा कोणताही तर्क अथवा आशा यामागे नाही; ती मायनॉरिटीच असणार आहे - आणि पेटी मायनॉरिटी असणार आहे - याची कल्पना आहे. फक्त, 'साडेतीन टक्के' हा स्पेसिफिक आकडा नक्की कोठून आला, त्याच्या बेसिसची भौगोलिक व्याप्ती काय, आणि (कदाचित) हा आकडा नक्की कधीचा, एवढ्याच मर्यादित व्याप्तीचा हा सवाल आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकेठिकाणी वाचल्याचं आठवतंय- नक्की माहित नाही, पण ढसाळ, लक्ष्मण माने किंवा दया पवार 'फक्त साडेतीन टक्के असलेल्या ब्राह्मणां'बद्दल काहीतरी बोलले होते आणि तिथून तो शब्द चिकटला. मला खरंच माहित नाही.
फ्रेड हॉईल आणि बिग बँगची आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

पण ढसाळ, लक्ष्मण माने किंवा दया पवार 'फक्त साडेतीन टक्के असलेल्या ब्राह्मणां'बद्दल काहीतरी बोलले होते आणि तिथून तो शब्द चिकटला.

माझ्या कल्पनेप्रमाणे 'साडेतीन टक्क्यां'चा (बोले तो, त्या संज्ञेचा) उद्गम इतकाही अलिकडचा नसावा; त्याहून बराच जुना असावा. परंतु तपशिलांबद्दल खात्री नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उप्र आणि उत्तराखंड मधे १०% पेxआ जास्त ब्राह्मण आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

थोडक्यात, 'साडेतीन टक्के' या संज्ञेस (ज्या ज्या म्हणून समाजांत 'ब्राह्मण' हा एक समाजघटक आहे अशा सर्व समाजांच्या विश्वात) युनिवर्सल करन्सी नाही तर! किंबहुना, पैकी एका अतिशय मर्यादित आणि भौगोलिकदृष्ट्या संकुचित परिघाबाहेर ही संज्ञा नि:संदर्भ तथा अर्थहीन आहे तर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषणात तरी बहुधा थोरल्या पवारकडून प्रथम वापरला गेला असावासे वाटते. हे स्टॅटिस्टिक अन्य प्रदेशांत तितकेच नसावे. यूपी वगैरे भागात जरा जास्त असावे. तरी संपूर्ण भारतभर सर्व प्रकारचे ब्राह्मण मिळून १० कोटीपेक्षा जास्त असतील याबद्दल बराच डाउट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भाषणात तरी बहुधा थोरल्या पवारकडून प्रथम वापरला गेला असावासे वाटते.

थोरल्या पवारांनी आपल्या भाषणातून ही संज्ञा regurgitate केली असू शकेलही, परंतु ती मूळची त्यांची खाशी नसावी. किंबहुना, ती बऱ्याच अगोदर, स्वातंत्र्यपूर्व काळात उगम पावली असावी, अशी आम्हांस शंका आहे. (परंतु तपशिलाअभावी खात्री नाही, म्हणून तसा ठाम दावा करू इच्छीत नाही. कदाचित श्री. अरविंद कोल्हटकर किंवा अन्य कोणी जाणकार अधिक माहिती पुरवू शकतील असे वाटते. चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज एकून हिंदू समाजामध्ये मध्ये काय टक्केवारीने असेल ह्याबाबात काही तर्क मी काढू शकतो. सातारा, पुणे आणि कोल्हपूर जिल्ह्यांची १८८० च्या पुढेमागे प्रसिद्ध झालेली डिस्ट्रिक्ट गझेटीअर्स उपलब्ध आहेत. (तशी सर्वच जिल्ह्यांची आहेत पण वानगीपुरते मी हे तीन जिल्हे पाहिले.) त्यात खानेसुमारीच्या तपशीलांमध्ये पुरुष/स्त्रिया, धर्म, जात/पंथ, वयोमान असे सर्व तपशील आहेत. त्यातून एकूण हिंदु समाजाची संख्या आणि त्यामध्ये देशस्थ ब्राह्मण, चित्पावन आणि कऱ्हाडे हे वेगळे काढून त्यांच्या संख्येची हिंदु समाजाशी तुलना केल्यावर खालील आकडे मिळाले:

सातारा:- देशस्थ (३४,०५१), चित्पावन (८,३५९), कऱ्हाडे (२,३२७) एकूण ब्राह्मण (४४,८८७), एकूण हिंदु (१०,२४,५३७) ब्राह्मण टक्केवारी ४.३७%

पुणे:- देशस्थ (३२,७५९), चित्पावन (११,५८४), कऱ्हाडे (१,५७६) एकूण ब्राह्मण (४७,९०९), एकूण हिंदु (१०,२४,५३७) ब्राह्मण टक्केवारी ५.५९%

कोल्हापूर:- देशस्थ (१८,११६), चित्पावन (४,१०६), कऱ्हाडे (३,६६९) एकूण ब्राह्मण (२५,८९१), एकूण हिंदु (७,१९,१६४) ब्राह्मण टक्केवारी ३.६०%

ह्यामध्ये काही गोष्टी जशा असायला हव्यात तशाच आहेत. पेशव्यांच्या पुण्यामध्ये ब्राह्मण टक्केवारी सर्वाधिक आहे तर कोल्हापुरात ती सर्वात कमी आहे. एकूण आजच्या सर्व महाराष्ट्राचा विचार केल्यास ब्राह्मण टक्केवारी ४% च्या आसपास निघेल असे वाटते. आकडे १८८० च्या काळातील आहेत हे म्हटलेच आहे पण त्यामध्ये आजपर्यंत काही लक्षणीय बदल झाला असेल असे वाटण्याचे कारण दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक माहितीबद्दल आभार.

परंतु (ब्राह्मणांना उद्देशून) 'साडेतीन टक्के' या विशिष्ट संज्ञेचा उद्गम हा कसा/कधीचा/कोणत्या भौगोलिक परिघावर आधारित, याबद्दल काही क्लू मिळू शकेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साडेतीन टक्के हा वाक्प्रचार मी पहिल्यांदा ब्रिगेडी साहित्यात वाचला. भांडारकर झाल्यावर किंवा जालावर ब्रिगेडी ब्लॉग/सायटी हे प्रकार सापडल्यावर पहिल्यांदा ऐकला हा वाक्प्रचार. सो अराउंड २००८.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

साडेतीनटक्के हा शब्दप्रयोग मी १९९० ते ९१ मधे ऐकला. बामनी कावा हा शब्दप्रयोग सुद्धा.

स्थळ - गारगोटी, जिल्हा कोल्हापूर.

त्या काळी मी अभाविप मधे होतो. नोंदणीकृत कार्यकर्ता नव्हतो पण त्यांच्या फळी मधे होतो. त्यांची मतं पूर्णपणे पटली नव्हती पण तरीही होतो. अभाविप ने युथ फेस्टिवल चा खर्च भागवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने १ रुपया द्यावा असे काहीसे अभियान चालवले होते. ते एनेसयुआय ला आवडले नव्हते. व त्यावरून त्यांचं व् अभाविप चं वितुष्ट होतं. व अभाविप च्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. अभाविपने आपल्या कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी एका गुंडाची मदत मागितली होती. तो गुंड मात्र ब्राह्मण नव्हता. व त्याच वेळी अभाविप वर टिका करण्यासाठी एनेसयुआय+एसेफाय च्या लोकांनी एक सभा घेतली होती. सभेला सुमारे ५०० विद्यार्थी श्रोते असावेत असा माझा अंदाज. सभेला कॉमर्स, आर्टस व इंजि. चे विद्यार्थी होते. छात्रभारतीचे लोक सुद्धा होते. त्यात एका दलित विद्यार्थ्याने भाषण करताना ... रामजन्मभूमी वि. बाबरी मस्जिद बद्दलची रथयात्रा हा कसा बामणी कावा आहे त्याबद्दल आपली मतं मांडली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी आमचे एक इंजिनियर सर होते. ते स्वत: मराठा होते. पण त्यांनी त्यांच्या भाषणात सभेच्या मुख्य विषयाच्या काहीशी विरोधी मांडणी केली. तेव्हा माझ्या शेजारच्या मुलाने साडेतीनटक्क्यांची चाटतोय असं विधान केलं. पुटपुटत.

--

२००२ मधे मटा मधे "या साडेतिनटक्क्यांना हवंय तरी काय ?" अशा मथळ्याचं एक वाचकाचं पत्र छापून आलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हापूर जिल्हा ना, मग चालायचेच. कुठल्याही गोष्टीबद्दल बामनांना श्या घातल्या की संपले असा एकूण खाक्या असतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अध्यक्ष महोदयांनी त्यांच्या मुद्द्याला सपोर्ट म्हणून ब्राह्मण असलेल्या मिलिटरी जनरल्स ची नावे समोर ठेवली. वैद्य, सुंदरजी वगैरे. आता वैद्य हे कायस्थ होते की कायसं मी ऐकून होतो. खखोमाना. पण बहुतांश विद्यार्थ्यांना ते भाषण फारसं रुचलं नसावं. कारण त्या "बामनी कावा" बद्दल बोलणाऱ्या विद्यार्थ्याला खूप टाळ्या मिळाल्या. भाषणादरम्यान सुद्धा. परंतू अध्यक्षमहोदयांना भाषणाच्या शेवटी सुद्धा कडकडाट मिळाला नाही. टाळ्या पडल्या पण त्या कडकडाट या सदरात न मोडणाऱ्या होत्या. त्या विद्यार्थ्याचं बामनी कावा बद्दलचं म्हणणं हे होतं की "त्यांच्या शेतात तो जागा द्यायला तयार आहे, मंदिर बांधायला. पण बामणं तिथे बांधणार नाहीत.बामणांना तीच मशीदीचीच जागा का पायजे ?". व हा बामनी कावा. तरी नशीब अडवाणी ब्राह्मण आहेत असं तो म्हणाला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता वैद्य हे कायस्थ होते की कायसं मी ऐकून होतो.

मराठीभाषकांत 'वैद्य' हे आडनाव ब्राह्मण (विशेषेकरून चित्पावन) आणि कायस्थ (सीकेपी) या दोन्ही समाजात आढळते.

जनरल वैद्य बहुधा कायस्थ असावेत. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर : वैद्यांबद्दल व इन जनरल बामणांबद्दल शिखांची सुद्धा एक भूमिका असते. एका बामणाने म्हणे गुरु गोबिंदसिंगांशी (की रणजितसिंगाशी) दगा केला होता. त्यामुळे बामणांशी सावधानतेने वागावे असं शिखांना वाटतं असं एका शिख मैत्रीणीने सांगितले होते. व अरूण वैद्यांनी म्हणे इंदिराबाईंना "अमृतसरमधे कारवाई करू नका" असा सल्ला दिला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बामणी काव्याबद्दल ओरडणाऱ्या तथाकथित बहुजनांनी आपल्याच जातभाईंशी कसे वर्तन केलेय हे तपासून पाहण्याची गरज आहे.

बायदवे मंदिर वहीच का बनायेंगे असा प्रश्न तोंड वर करून विचारणाऱ्याला हे विचारायला पाहिजे होते की छत्रपतींची रायगडावरील समाधी जीर्णोद्धार करून पुन्हा बांधली, ती जर दुसरीकडे कुठे बांधली असती तर चाललं असतं का? जाणत्या राजाची बहुतेक प्रजा अतिशय अडाणी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बायदवे मंदिर वहीच का बनायेंगे असा प्रश्न

याला आम्ही "होस्टिलिटी टू स्पेसिफिसीटी" म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाणत्या राजाची बहुतेक प्रजा अतिशय अडाणी आहे.

अडाणी फार माईल्ड शब्द झाला. असो. प्रक्षोभक लेखन वगैरे...
तो एक ब्राह्मण आणि कृष्णाजी भास्कर ह्या एकमेव शिदोरीवर जगणारे लोक आहेत ते. व्हायचंच.
स्वाक्षरी बदलतो आज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

पेशवाईतले साडेतीन शहाणे सुप्रसिध्द आहेत. काही लोक महादजी शिंद्यांना त्यात गणतात. पण पुष्कळसे लोक सखारामबापू , देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना हेच साडे तीन मानतात. हरिपंत फडक्यांचे नाव देखील आढळते . तर ही पेशवाईतली औटकी. त्यावरून पुढे साडेतीन टक्क्यांचे शहाणपण प्रसिद्धीस आले असावे हे बिरुद अलीकडचे नाही. जुने आहे .
बामनी कावा हा वाक्प्रचार प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखनात वाचला आहे. पण त्यांच्याही आधीपासून तो प्रचारात असावा. ' बामनी कावा' या नावाचे एक नाटुकले किंवा पुस्तक होते असावे. ब्राह्मणेतर चळवळीच्या आरंभापासून तो वापरात असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साडेतीन शहाणे तसे साडेतीन रावही असल्याचे वाचले होते. पाहिले/विचारले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साडेतीन शहाणे तसे साडेतीन रावही असल्याचे वाचले होते. पाहिले/विचारले पाहिजे.

हे पहा, बॅटमन, .... तुम्हाला जे काय बोलायचेय ते स्पष्ट बोला.

कोणाला विचारले पाहिजे ?
कोणाबद्दल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खी खी खी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साडेतीन शहाण्यांचा नि साडेतीन टक्क्यांचा संबंध समजला नाही. पेशवाईची लोकसंख्या शंभर खचितच नसावी. (किंवा जरी असली, तरी बाकीचे साडेशहाण्णव जण ठार वेडे होते काय?)

..........
यांची फोड दोन शहाणे अधिक एक दीडशहाणा१अ अशी असेल, असे उगाचच समजत होतो. ती तीन शहाणे अधिक एकजण अर्धाच शहाणा१ब, १क अशी निघाली. असो चालायचेच.

१अ हे 'टू क्लेव्हर बाय हाफ'चे मराठीकरण असावे काय?

१ब 'अर्धा कप भरलेला' = ऑप्टीमिस्टिक अप्रोच?

१क की हे सरळसरळ 'हाफविट'चे मराठीकरण असावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुजरातेत मला वाटते १४% आहेत. उप्र मध्येतर फुगवून फुगवून २३% पर्यंत ताणतात. कालपरवापर्यंत ' अब्राह्मण' समजल्या गेलेल्यांना ब्राह्मण म्हणून पावन करून घेण्याचे एकजुटीचे काम सुरू आहे . आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही . पण हे केवळ संख्याबळ वाढवण्यापुरते असावे. ठरवून केलेल्या बेटीव्यवहारात ते परावर्तित होत आहे असे वाटत नाही. काही वर्षांपूर्वी पुण्यात भरलेल्या ब्राह्मण महासंमेलनात सुरेश कलमाडी यांना मानाचे स्थान होते. त्या आधी थोड्या काळापूर्वीच खानावळवाला. होटेलवाला म्हणून त्यांची टिंगल होत असे. सध्या दैवज्ञ, सारस्वत यांना ब्राह्मणांच्या whats ap ग्रूप्समध्ये सामील करून घेतले जात आहे. असो. जातनिर्मूलनाच्या अथवा विषमतानिर्मूलनाच्या शुद्ध हेतूने हे होत असेल तर चांगलेच आहे . ब्राह्मणांचा आवाज बुलंद करण्यासाठी होत असेल तर नव्याने महत्त्व पावत असलेले हे नवे समूह वापरून घेतले जातील आणि परिघावरच राहातील. मनाने एकरूपता येणार नाही . अर्थात महाराष्ट्रातल्या ' ९६ कुळी' ब्राह्मण समाजातही फारशी एकात्मता आहे असे नाहीच .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे निरिक्षण योग्य आहे असे युपीमधील मित्राकडून कळले..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ठरवून केलेल्या बेटीव्यवहारात ते परावर्तित होत आहे असे वाटत नाही. काही वर्षांपूर्वी पुण्यात भरलेल्या ब्राह्मण महासंमेलनात सुरेश कलमाडी यांना मानाचे स्थान होते. त्या आधी थोड्या काळापूर्वीच खानावळवाला. होटेलवाला म्हणून त्यांची टिंगल होत असे. सध्या दैवज्ञ, सारस्वत यांना ब्राह्मणांच्या whats ap ग्रूप्समध्ये सामील करून घेतले जात आहे. असो. जातनिर्मूलनाच्या अथवा विषमतानिर्मूलनाच्या शुद्ध हेतूने हे होत असेल तर चांगलेच आहे . ब्राह्मणांचा आवाज बुलंद करण्यासाठी होत असेल तर नव्याने महत्त्व पावत असलेले हे नवे समूह वापरून घेतले जातील आणि परिघावरच राहातील. मनाने एकरूपता येणार नाही . अर्थात महाराष्ट्रातल्या ' ९६ कुळी' ब्राह्मण समाजातही फारशी एकात्मता आहे असे नाहीच .

(१) फेसबुक व ट्विटर, लिन्क्ड-इन, पिंटरेस्ट, फ्लिकर, टंब्लर, फ्रेंडस्टर् यांमधे एकात्मता नाही. खूप विषमता आहे. फेसबुक, ट्विटर् खूप जास्त लोकप्रिय आहेत्. बाकीचे तितके नाहीत.
(२) कोकाकोला, श्वेप्स व पेप्सी मधे एकात्मता नाही.
(३) टोयोटा, फोर्ड, क्राय्सलर, कॅडिलॅक, ह्युंदाई, जीएम, मर्सिडिझ, बीएमड्ब्ल्यु यांच्या ब्रँडव्हॅल्यु मधे जबरदस्त विषमता आहे आणि एकात्मता तर अजिबात नाही. पोर्शे, मर्सिडिझ, बीएमड्ब्ल्यु, फरारी ह्या उच्च प्रतीच्या. ह्युंदाई, डॉज् ह्या अतिशय कमी रेटींग असलेल्या. डॉज ची स्थापना 1900 साली झाली होती. त्यांना ११७ वर्षे होती मर्सिडिझ इतक्या किंवा फेरारी इतक्या उच्च प्रतिच्या गाड्या बनवण्याची. पण त्यांचे ते उद्दिष्टच नाही. आता आपण त्यांच्यावर ते उद्दीष्ट लादावे का ? की काही नाही -एकात्मता आणण्यासाठी व विषमतानिर्मूलनासाठी तुम्ही उच्च प्रतीच्या गाड्या बनवल्याच पाहिजेत म्हणून ?????? का मर्सीडिझ वर जबरदस्ती करावी - की समतावादासाठी तुम्ही निकृष्ट गाड्या बनवाच .... म्हणून्.

फरक फक्त हा आहे की फेसबुक, ट्विटर, कोकाकोला, टोयोटा हे लोक आपसात मारामाऱ्या करीत नाहीत. बाकी ब्राह्मण काय मराठा काय अन बाकीचे काय - हे ब्रँड आहेत. ते ब्रँड आहेत हे लोकांना मान्य करायचे नसू शकते. पण ते आहेत. प्रत्येक ब्रँड ची प्रत्येक वस्तू पर्फेक्टली ब्रँड ला अनुसरून असतेच असे नाही. काही नग खराब लागतात सुद्धा. पण म्हणून तो ब्रँड च रद्द/खालसा करा असं कोणी म्हणत नाही.

माझा मूळ मुद्दा हा च आहे की एकात्मता, विषमतानिर्मूलन, समता ही जरा जास्तच ओव्हररेटेड आहे. I am willing to bet ... that ... बहुतेकांना ती एकात्मता का काय ती नको आहे. प्रत्येकाला त्यांची अस्मिता, ओळख प्रिय आहे. व तीसुद्धा शक्यतो होता होईल तितकी प्युअर असावी आणि मुख्य म्हंजे युनिक असावी असे प्रत्येकाला बहुतेकांना वाटते.

---

उदाहरणे व तुलना यात असलेला फरक ध्यानात घेतला की ....मान्य करताना होणारी घालमेल थांबवता येऊ शकते.
..
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरीखुरी समता कधीच प्रस्थापित होऊ शकत नाही हे मान्यच पण तसे व्हायला म्हणजे केळे आणि आंब्याचा स्वाद सम व्हायला नकोच आहे .तर केळे जितके आपल्या कॅटेगरीत उत्तम असेल तितकाच आंबाही त्याच्या प्रकारात उत्तम निघायला हवा. तश्या सोयीसुविधा असायला हव्यात. ते जाऊ दे. समता शब्द नको तर नको . आपण सध्याचे चलनी नाणे ' समरसता' हा शब्द वापरू . म्हणजे सर्वांचा 'रस' अर्थात इंटरेस्ट एकच असायला हवा . ध्येय, प्रेयस , श्रेयस सगळे एक असायला हवे. ही सध्याची विचारसरणी आहे. अशी समरसता हवी असेल तर तडजोडीने ध्येये, उद्दिष्टे ठरवावी लागतात . एका गटाची ध्येये, इंटरेस्ट्स बाकीच्यांवर लादली जाऊ नयेत. अशी लादलेली एकजूट काय कामाची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरीखुरी समता कधीच प्रस्थापित होऊ शकत नाही हे मान्यच

साधु साधु !!!

भारतीय स्वातंत्र्य (Freedom) चिरायू होवो असं म्हणावं.
भारतीय समानता/समता चिरायू होवो असं कोणीच म्हणत नाहिये व म्हणणं हे इष्ट सुद्धा नाही. कारण - Freedom includes freedom to be unequal.

--

पण तसे व्हायला म्हणजे केळे आणि आंब्याचा स्वाद सम व्हायला नकोच आहे .तर केळे जितके आपल्या कॅटेगरीत उत्तम असेल तितकाच आंबाही त्याच्या प्रकारात उत्तम निघायला हवा. तश्या सोयीसुविधा असायला हव्यात. ते जाऊ दे. समता शब्द नको तर नको .

चमन मे इख्तलाते हुए रंग-ओ-बू से बात बनती है
हम ही हम है तो क्या हम है ... तुम ही तुम हो तो क्या तुम हो !!!

--

आपण सध्याचे चलनी नाणे ' समरसता' हा शब्द वापरू . म्हणजे सर्वांचा 'रस' अर्थात इंटरेस्ट एकच असायला हवा . ध्येय, प्रेयस , श्रेयस सगळे एक असायला हवे. ही सध्याची विचारसरणी आहे. अशी समरसता हवी असेल तर तडजोडीने ध्येये, उद्दिष्टे ठरवावी लागतात .

सर्वांचा बहुतेकांचा इंट्रेष्ट एकच असतो. त्याला स्वार्थ म्हणा नैतर स्वहितसंबंध म्हणा नैतर स्वकल्याण म्हणा. काही लोकांचा परार्थवादी असतो व काहीचा हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याचा.

--

एका गटाची ध्येये, इंटरेस्ट्स बाकीच्यांवर लादली जाऊ नयेत. अशी लादलेली एकजूट काय कामाची?

बास बास बास. पार्टी कधी करायची ते बोला !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर सहमत हुआ?!
ऐसे हादसे होते रहते हैं ऐसीपर कभी कभी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हादसे

एकलव्य हा उत्तम धनुर्धर आहे हे द्रोणाचार्यांनी अमान्य करण्यात काय हशील आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोवळे दिवस खरंच दर्जेदार पुस्तक आहे. अगदी त्रयस्थपणे, पण मध्येच स्वानुभव-आणि मनातले विचार/भावना मस्त गुंफून मांडलेल्या आहेत. कोवळे दिवस हे मी एकाच बैठकीत संपवलं. उठूच नाही दिलं त्या पुस्तकाने. शेवटचं असं पुस्तक मी गारंबीचा बापू वाचलं होतं; साधारण एखाद वर्षापूर्वी. म्हणून कोवळे दिवस लक्षात राहिलं. अशा पुस्तकांच्या यादीत साधूंचं ग्लानिर्भवती भारत आहे सध्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

मूळ लेखकाने काहीही लिहिले असले तरी , 'गांधीवध' या शब्दालाच आक्षेप आहे. ती एक हत्याच होती. त्याचे कुठल्याही प्रकारे ग्लोरिफिकेशन होऊ शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गांधीवध??
या भटाबामणांनी १९४८ ला ढुंगणावर काठ्या खाऊनही यांची खोड गेलेली नाही हे लेखाच्या शिषर्कावरुन कळतच आहे.
गावोगाव गरीबांना छळणार्या खोत सावकारी करणार्या भटाबामणांना पिडीत लोकांनी दिलेला तो " प्रसाद" होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

गांधीवध??
या भटाबामणांनी १९४८ ला ढुंगणावर काठ्या खाऊनही यांची खोड गेलेली नाही हे लेखाच्या शिषर्कावरुन कळतच आहे.
गावोगाव गरीबांना छळणार्या खोत सावकारी करणार्या भटाबामणांना पिडीत लोकांनी दिलेला तो " प्रसाद" होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा प्रतिसाद १००% सत्य असला वा मानला तरी (मंजे जुना हिशेब चुकता करायला लोकांनी भटांविरुद्ध एक निमित्त वापरलं ते योग्य आहे, इ) हा संदर्भ सोडून त्या घटनेचं (वधाचं) भारतीय इतिहासातलं (चांगल्या अर्थाने) महत्त्व नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गांधीहत्येमागोमाग दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून ब्राह्मण घरांची जळिते झाली. आमचेहि साताऱ्यातील राहते घर त्यामध्ये जाळले गेले. त्या प्रसंगाची माझी आठवण मी 'उपक्रम'मध्ये एका मोठ्या लेखाचा भाग म्हणून मी लिहिली होती आणि येथील अनेक वाचकांना ती परिचित असेल. ह्या धाग्याशी निगडीत असल्याने द्विरुक्तीचा दोष मान्य करून तो भाग पुढे पुन: दाखवीत आहे.

आमचे शंभर वर्षांचे जुने घर साता‍र्‍याच्या शुक्रवार पेठेत होते. हा भाग जवळजवळ पूर्णपणे ब्राह्मणेतर जातीतील घरांचा होता. आम्ही आणि अजून तीनच ब्राह्मण घरे पेठेत होती. आमचे पेठेत सर्वांशी उत्तम घरोब्याचे संबंध होते. आमचे सर्व खेळगडी आसपासच्या घरातील होते. माझ्या आजोबांना एक जुने वृद्ध गृहस्थ म्हणून पेठेत मान होता, आमचे शेजारी अनेक बाबीत त्यांना सल्ला विचारीत असत आणि आसपासची त्यांच्या वयाची जुनी मंडळी पुष्कळ वेळा शिळोप्य़ाच्या गप्पा करण्यासाठी आमच्या ओसरीवर बसत असत. आमचा हिंदुमहासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे राजकारण ह्यांच्याशी काही संबंध नव्हता. माझे आजोबा हे महादेव गोविंद रानडे ह्यांचे समजूतदार आणि समावेशक विचार मानणारे होते.
३० जानेवारी ह्या दिवशी महात्मा गांधींवर नथुरामने गोळया झाडल्या आणि एकदोन दिवसातच महाराष्ट्रात ऐतिहासिक काळापासून खदखदत असलेला ब्राह्मण-अब्राह्मण वाद अनपेक्षित रीत्या वर उफाळून आला. ह्या हत्येबाबत सर्व ब्राह्मण समाजाला उत्तरदायी मानून त्यांची घरे जाळण्यासाठी ही उत्तम सबब आहे आहे काही समाजकंटकांनी ठरविले.
घटनेनंतर एकदोन दिवसातच ब्राह्मणांची घरे जाळण्याची लाट महाराष्ट्रात - विशेषत: दक्षिणेकडील जिल्ह्यात - सुरू झाली. आमचे घरहि त्या लाटेत सापडले. ३० जानेवारीनंतर एकदोन दिवसात दुपारी एकच्या सुमारास माझ्या आ़ईने जेवणाची पाने घेतली होती. माझ्या आजोबांचे धाकटे भाऊ चिंतामणराव कोल्हटकर त्या समयी आमचे घरी आले होते. तेव्हा ते पुण्यास राहात असत. माझे वडील व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी गेले होते. जेवायला बसणार एव्हढयात ४०-५० जणांचा एक जथा आमच्या घरात शिरला आणि घरातील सर्वांनी बाहेर पडावे कारण घर जाळण्यात येणार आहे असे त्यांनी आजोबांना सांगितले. विरोध करण्याता काहीच अर्थ नव्हता. कोणास मारहाण, दुखापत वा शारीरिक इजा होऊ नये होऊ नये म्हणून आजोबांनी सर्वांना बाहेर काढले आणि आमच्या घरासमोरच्या पवारांच्या घराच्या पायरीवर ते स्वतः जाऊन बसले. मी थोडा मागे रेंगाळलो होतो. झुंडीपैकी एका माणसाने खर्‍या मायेच्या शब्दात 'बाळ, बाहेर जा, नाहीतर तुला लागेल' असे मला सांगितले असे स्पष्ट आठवते. त्यावेळेस तो त्याच्याबरोबरच्या अन्य गुंडांबरोबर आमच्या फर्निचरची मोडतोड करण्याच्या कार्यात मग्न होता.
आमच्या घराच्याच निम्म्या भागात आमचा जुना छापखान्याचा चालू व्यवसाय होता. तेथे भरपूर कागद आणि कटिंग मशीनचे कचरण पडलेले होते. जमावाने त्याचे बोळे केले आणि त्यांवर रॉकेल टाकून ते बोळे घराच्या लाकडी आढयात टाकले. त्यामुळे घराचा लाकडी सांगाडा पेटू लागला. छपाईची यन्त्रे तोडणे वा त्यांची नासधूस करणे, छापखान्यातील टाईप जमिनीवर ओतून टाकून त्याची पै करणे, असेहि विध्वंसक प्रकार जमावाने सुरू केले. (एकमेकात मिसळलेल्या आणि त्यामुळे निरुपयोगी ठरलेल्या टाइपाला पै म्हणत असत.)
२०-२५ मिनिटे हा धुमाकूळ चालू असता अचानक पोलिस आल्याची आवई उठली. ती वस्तुत: खोटी होती. आमच्या शेजार्‍यांपैकी कोणीतरी ती वावडी उडवली होती पण तिला घाबरून जमाव जसा आला तसाच दोन मिनिटात तेथून नाहीसा झाला.
आमचे शेजारी त्वरित जमा झाले आणि साखळी करून त्यांनी जवळच्या ओढयातून पाणी आणून लागलेली आग हळूहळू विझवली. मुख्य प्रसंग संपला. आम्हाला कसलीच शारीरिक इजा झाली नाही पण आर्थिक नुकसान खूप झाले. एक-दोन दिवसांनंतर तेव्हाचे एक मंत्री गणपतराव तपासे आमच्याकडे पाहणीसाठी आले होते. सरकारातून यथाकाल कही रक्कम मदत म्हणून आणि काही कर्ज म्हणून मिळाली. वडील हप्त्याहप्त्याने कर्ज फेडीत असतांनाच द्वैभाषिक आले आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. माझ्या तेव्हाच्या आठवणीनुसार नव्या सरकारने जे अगदी पहिलेपहिले काही निर्णय घेतले त्यांमध्ये जळित कर्जाची बाकी माफ करण्याचा निर्णय होता. यशवंतरावांचे बेरजेचे राजकारण असे होते.
आमच्या घरापैकी छापखान्याची बाजू पुष्कळच जळली होती आणि ती बरीचशी नव्याने बांधावी लागली. निम्मी घराची बाजू त्यामानाने ठीक होती. तरीहि ह्या प्रसंगाची आठवण म्हणून आगीची धग लागलेल्या तुळया अखेरपर्यंत तेथे होत्या.
ह्या गंभीर प्रसंगाला असलेली एक विनोदी झालरहि आठवते. युद्धानंतरचे ते दिवस रेशनिंगचे होते आणि आम्हाला रेशनमध्ये 'मिलो' -ज्याला लोक विनोदाने 'मेलो मेलो' म्हणत - नावाचा तांबडा जोंधळा मिळत असे आणि त्याच्या बेचव भाकर्‍या हे आमचे मुख्य खाणे असे. ते मला बिलकुल आवडत नसे. मला आवडायच्या त्या गव्हाच्या पोळया, ज्या आमच्या वाटयाला कधीमधीच यायच्या.
घर जळल्यानंतर आम्हां मुलांना काही दिवस दुसरीकडे ठेवण्याचे ठरले. आमच्याच पेठेत आगटे नावाचे कुटुंब होते. त्यांच्याकडे जमावाची दृष्टि वळली नव्हती. जळिताच्या दिवशी त्यांच्याकडे आमची पाठवणी करण्याचे ठरले. ह्या बातमीमुळे मला मनातून बर्‍यापैकी आनंद झाला कारण आगटयांकडे नेहमी पोळया असतात अशी माझी बालबुद्धीची समज होती आणि त्यामुळे आज आपण जेवायला पोळया खाणार ही समजूत माझ्या उल्हसित मनोवृत्तीचे कारण होती. ह्यातली irony मला तेव्हाच जाणवली असली पाहिजे कारण तीमुळेच माझा हा बालिश आनंद माझ्या स्मृतीत टिकून राहिला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसतं एक बाजू मांडून काय होणार आहे?
गांधीहत्येनंतर ब्राह्मणांनी साखर वाटली होती हे का नाही सांगत.म्हणून रट्टे खाल्ले ढुंगणावर,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

नुसतं एक बाजू मांडून काय होणार आहे?
गांधीहत्येनंतर ब्राह्मणांनी साखर वाटली होती हे का नाही सांगत.म्हणून रट्टे खाल्ले ढुंगणावर,

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

हि स्टोरी मी पण ऐकली आहे . साखर नाही पेढे . पण ती फक्त एकाच कुटुंबाच्या बाबतीत ऐकलीय . सगळ्या ब्राह्मणांना का गोवताय यांच्यात ?हे सरसकटीकरण कशाला ? आणि हे सगळं का साखर /पेढे मुळे झालं का , उत्स्फूर्त म्हणून ? जसे सगळे मराठा हे उदयन राजे नसतात तसेच सर्व ब्राह्मण पण 'तसे' नसतात .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्या ब्राह्मणांना का गोवताय यांच्यात ?

अहो बापट सर, असा का आरोप करताय? ब्राह्मणाने चे अनेकवचन ब्राह्मणांनी अस्सेच होते, मग ते दोघे का असेनात. त्याने कोणती संख्या कळते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तसे लिंगायतांच्या पण ढुंगणावर रट्टे दिले पाहिजेत. बाबरी मस्जिद पडली म्हणून बुंदीचे लाडू खाऊ घालते. आणि बामनांचे लेकरं खर्ची घालून (मंजे स्वत:चे वाचवून) फुकटात पडली म्हणून अजून एक एक खाऊ घातला. मी स्वत: असे दोन लाडू खाल्लेत.
=========================
तशी भारतात रट्टेबल ढूंगणांची लांबलचक यादी बनवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भांडारकर तो झाकी है, शनिवारवाडा बाकी है वगैरे स्लोगनी मारून भांडारकरच्या विध्वंसानंतर मिश्यांना पीळ देणारी स्युडोबहुजनवादी प्रजा सगळ्यात डेंजरस आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं