बाजार शरण ‘गुरु’ चरित्र

तथाकथित आध्यात्मिक सुख समाधानासाठी भारतातील अशिक्षित जनसामान्य (आणि शिकले सवरलेलेसुद्धा!) कुठल्याही ‘गुरू’ला डोक्यावर चढवून घेतील याची प्रचिती भावदीप कांग या पत्रकर्तीने लिहिलेल्या Gurus हे इंग्रजी पुस्तक वाचताना नक्कीच येईल. यातील महर्षी महेश योगीपासून भय्यू महाराज पर्यंतच्या गुरुजनांच्या एकेका कारनाम्यावर ओझरती नजर टाकली तरी आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन शास्त्र, मानसशास्त्र यांचा पुरेपूर वापर करत अध्यात्म हे एक प्रॉडक्ट म्हणून विकत आहेत व आपली तुंबडी भरून घेत आहेत, हे लक्षात येईल. जाहिरातींचा प्रचंड मारा करत सप्लाय-डिमांडच्या चक्रात भक्तगणांना अडकवून स्वतःचे ऐषारामी व पंचतारांकित जीवन हे गुरुजन जगत आहेत.

भावदीप कांग ही फ्री लान्स पत्रकार असून गेली 27 वर्षे ती वेगवेगळ्या पत्रिकेसाठी लिहित आहे. तिच्या या पुस्तकात महर्षी महेश योगी, धीरेंद्र ब्रह्मचारी, चंद्रास्वामी, माता अमृतानंदमयी, श्रीश्री रवीशंकर, मुरारी बापू, जग्गी वासुदेव, बाबा रामदेव व भय्यू महाराज यांच्या कर्तृम कर्तृत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न तिने केला आहे. एखादं अपवाद वगळता यातील बहुतेक गुरु, योग व ध्यान (आणि आयुर्वेद) यांच्या व्यापारीकरणातून त्या पदापर्यंत पोचलेले आहेत. हिमालयात तपस्या करून सिद्धी प्राप्त करून घेतलेले आहेत, असे ते दावे करतात. तेथे त्यांना साक्षात्कार झाला. जगातील दुष्ट शक्तींचा नाश करत या जगात कायमचे सुख शांती नांदण्याचा वसा त्यांनी घेतला आहे, असे ते छातीठोकपणे सांगत असतात.

माहिती तंत्रज्ञान व खासगीकरण-जागतिकीकरण-उदारीकरणामुळे व्यवहारातील आपल्या सर्व व्याख्या बदलत आहेत. ‘गूगल अंकल’च फक्त आपल्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो हा समज दृढ होत चालला आहे. परंतु गूगलपूर्व व गूगलोत्तरच्या संक्रमण कालखंडात भारतातील गुरू मंडळींनी परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतला व जगभरातील लोकांना उल्लू बनवण्यात यशस्वी झाले. त्यामुळे लेखिकेने प्रसिद्धीच्या झोतात असलेले, वा त्यांच्याबद्दल गैरसमज असलेले वा भन्नाट व्यक्तिमत्व असलेले अशा गुरूंची निवड या पुस्तकासाठी केली आहे. यातील प्रत्येक गुरु या ना त्या त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आहेत. परमेश्वराच्या अवताराचे कार्य पुढे नेत आहेत, भरपूर बोलघेवडे आहेत, भक्तांच्या हाकेला ओ देणारे आहेत, त्याच्या शारीरिक व/वा मानसिक आजारांचे निदान करून आजारावर फुंकर घालणारे आहेत. परंतु हे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे करत आहेत, हे विशेष.

मुळात त्यांच्या प्रसिद्धीला माहिती तंत्रज्ञानाने व इलेक्ट्रॉनिक माध्यमाने फार मोठा हातभार लावला आहे, हे विसरू शकत नाही. या गोष्टींचा पुरेपूर फायदा या सर्वानी करून घेतला आहे. याच्या आधारे त्यांना संपत्ती मिळाली, सत्तेत अप्रत्यक्षरित्या सहभागी होता आले, सत्ताधाऱ्यांशी जवळीक करता आली, आणि राष्ट्रीय व/वा स्थानिक राजकारण/अर्थकारण यावर कायमचा ठसा उमटवण्यात यशस्वी झाले. या जाहिरातबाजीमुळे गुरुंचे डीपर्सनलायझेशन होत होत ब्रँडिग वाढत गेले. त्याचाही त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला. त्यांचे प्रॉडक्ट्स चेल्यांच्या (ग्राहकांच्या) मागणीनुसार ठरू लागले. प्रवचन, सत्संग, ध्यान, योगसाधना, आयुर्वेद, कौटुंबिक सल्ला, कुटुंबातील हेवेदावे सोडवणे, जात-जमातीतील भांडण तंटा सोडवणे या स्वरूपात ग्राहकांच्या मागणीप्रमाणे प्रॉडक्ट्स बदलत गेले. टीव्ही चॅनेलवरील या ज्ञानाचे रतीब रोज 24 तास व वर्षातील बाराही महिने अव्याहतपणे चाललेले बघताना वीक्षक थक्क होऊन जातो. 70च्या शतकात टेप्स व डीव्हिडी, व्हिसीडी मधून हे ज्ञान पाझरत होते. परंतु या चॅनेल्सनी यांना कालबाह्य ठरवले. इंटरनेट, यूट्यूब वा मोबाइलनी सर्व गुरुंना अभय देत अत्युच्च शिखरावर पोचविले. सामाजिक माध्यमातून यांच्या भक्तगणांनी स्वतःच्या गुरुंची आरती ओवाळली व इतर गुरुंची हेटाळणी केली.

भावदीप कांग यानी या पुस्तकासाठी गुरुंना निवडताना उद्यमशीलतेला प्राधान्य दिल्यासारखे वाटते. त्यामुळे त्या अर्थाने ब्रह्मकुमारी वा आर्यसमाज यासारख्या धार्मिक पीठ वा डेरा यांच्या प्रमुखांची निवड केली नाही. त्याचप्रमाणे येथील गुरु हिंदू धर्माचा आधार घेत आध्यात्मिकतेचा गाजावाजा करणारे आहेत. मुळात यात कुठल्याही प्रकारची शोध पत्रकारिता वा प्रचारती/प्रसारकीचा थाट नाही. यातील गुरुंच्या बद्दल वाचताना हे फार मोठे तत्वज्ञ होते किंवा आहेत, धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केलेले आहेत किंवा आध्यात्मिकतेबद्दल चिंतन केलेले आहेत, असे काही वाटत नाही. लेखिकेने त्यांच्या कर्तृत्वामागील मानसिकतेचेही विश्लेषण केले नाही किंवा यांच्यामुळे सामाजिक स्थित्यंतर झालेले आहेत असा दावाही करत नाही. टीव्हीच्या पडद्यावर हे गुरुजन कसे दिसतात व मनमानी विधान करतात यावरून त्यांचे व्यक्तिमत्व उभे करण्यात ती यशस्वी झालेली आहे. या गुरुंच्या आयुष्यातील घटना व घटनाक्रम उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे मांडून यांच्याबद्दलच्या आपल्या ज्ञानात भर घातली आहे.

1970च्या सुमारास पॉप कलाकारांचा आवडता गुरु, महर्षी महेश योगी हे नाव जगभर (म्हणजे अमेरिकेत!) प्रसिद्धीच्या झोतात होते, हे अनेकांना आठवत असेल. इंग्रजी भाषेच्या शब्दकोशाला ‘मंत्र’ हा शब्द बहाल करणाऱ्या या योगींच्या शिष्यवर्गात शर्ले मॅक्लेन, बर्ट रेनॉल्ड्स, क्लायंट ईस्टवुडसारखे मातब्बर नट-नट्या होत्या. बीटल्सचा चमू याच्या प्रेमात पडला होता. बघता बघता तो प्रसिद्धीच्या शिखरावर चढला. ठिकठिकाणी योगाश्रम उभे केले. गुरुत्वाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ‘ध्यानातून अधांतरित अवस्था’ (Levitation through meditation) या स्वर्गसुखाचे आमिष दाखवत हजारोनी शिष्यसमुदाय जमवला. त्याचे ‘प्रत्ययातीत चिंतन’ (Transcendental Meditation – TM) जगातील कुठल्याही समस्येचा अक्सीर इलाज आहे असा तो दावा करू लागला. या त्याच्या प्रलोभनाला बळी पडून यासाठी शिष्य रांगेत उभे असत. कुठलाही उपास-तपास नाही, शारीरिक यातना नाहीत, त्यागाची भानगड नाही, चंगळवादी जीवनशैली बदलण्याची घाई नाही, या प्रकारच्या सुलभीकरण केलेल्या अध्यात्माला अमेरिकन जनता भुलली नसल्यास नवल म्हणावे लागेल.

मध्यप्रदेश येथील महेश वर्माने महेश योगी असे नामांतर करून आयुष्यात अनेक गोष्टी केल्या; हिमालयात जाऊन ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली, जोशीमठाच्या गुहेत साधना केली, काही काळ शंकराचार्यांचा सेक्रेटरी म्हणून काम केले, उत्तरकाशी मठाचा ताबा घेतला, दक्षिणेतील रामेश्वरम व तिरुवनंतपुरम येथे जाहीर प्रवचन केली, ओंकारातून मुक्तीचा प्रचार केला, मुक्तीसाठी घरदार सोडण्याची गरज नाही – घरी बसूनसुद्धा मुक्ती मिळते असा विश्वास दिला. मुंबई, कोलकत्ता अशा 25 ठिकाणी ध्यानमंदिरांची स्थापना केली, TM सिद्धीसाठी 25000 शिक्षकांना प्रशिक्षित केले, डिस्नेलँड येथे साधना करून दाखवली, हसणारा गुरु (Giggling Guru) म्हणून प्रसिद्धी मिळवली, हेन्री नायबर्ग या श्रीमंत उद्योजकाच्या रोल्स रॉयसमधून युरोपचा दौरा करून तरुण-तरुणींना प्रभावित केले, पाच लाख चेल्यांना योग उड्डाण (Yogic flying) करायचे शिकवले, दोन लाख विद्यार्थ्यांना वैदिक शिक्षण दिले, कॅनडा, ब्रिटन व अमेरिकेमध्ये आयुर्वेद उपचार केंद्रांची साखळी उभी केली, राम राज्याचे स्वप्न दाखवले, ध्यानकेंद्राच्या प्रमुखाना ‘राम राजे’ करून टाकले, जगभरातील आश्रमातील दैनंदिन व्यवहारासाठी राम-मुद्रा नावाचे चलन अंमलात आणले, महर्षी इंटरनॅशनल विद्यापीठाची स्थापना केली....असे अनेक उपक्रम राबवत हा योगी महर्षीपदापर्यंत पोचला. Spiritual Regeneration Movement (SRM) foundationच्या माध्यमातून भरपूर संपत्ती गोळा केली. 12000 एकर जागेवर ताबा मिळवला. त्याची किंमतच 60 हजार कोटी होती!

इंदिरा गांधी परिवाराचा गुरु म्हणून धीरेंद्र ब्रह्मचारी हे नाव सुपरिचित आहे. यानी अध्यात्माच्या काळ्या व्यवहारातून अफाट संपत्ती मिळवली. सत्तेचे सूत्र हलवले. या पूर्वीच्या एकाही गुरुने राजकीय सत्तेचा विचार केला नव्हता. परंतु धीरेंद्र ब्रह्मचारी यानी जागतिक सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधून नाव कमविले. यावरून खरोखरच त्यांनी इतिहासाला कलाटणी दिली असेल का? हा प्रश्न विचारावासा वाटतो. याच्या असण्या-नसण्यामुळे काही फरक पडला असता का? या प्रश्नाचे उत्तर भविष्यकाळ देईल. एक मात्र खरे की गुरुजनांनी राजकीय नेत्यांच्या जवळ पास वावरण्याचा पायंडा ब्रह्मचारीनेच पाडला.

1975च्या सुमारास लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांतीचा नारा देशभर गाजत होता. त्याच सुमारास नेमीचंद उर्फ चंद्रास्वामी या तरुण साधूने जेपीना आकर्षित केले. परंतु पुढील 20 वर्षात या साधूने केलेल्या जागतिक पराक्रमांचा हिशोब मांडल्यास गुरु या पदास काळिमा आणणारा तो ठरेल. अनेक देशातील राजकीय नेत्यांशी गट्टी जमवण्यास तरबेज असलेल्या या चंद्रास्वामीवर शस्त्रास्त्रांची तस्करी करत असल्याचा आरोप होता. एका देशाच्या प्रधानमंत्र्याच्या खुनाचाही आरोप त्याच्यावर होता. त्याच्या वाढदिवसाच्या समारंभाला झाडून सर्व सत्ताधारी हजेरी लावत होते. परंतु 1996च्या सुमारास त्याच्या प्रसिद्धीला ओहोटी लागली. व जनसामान्यांच्या उपेक्षेला सामोरे जावे लागले. आता तो तिहार जेलमध्ये सडत आहे.

दैवी आलिंगनातून (Divine hug) करोडोंनी माया जमविलेल्या माता अमृतानंदमयीचे नाव सुपरिचित आहे. तिच्या भक्तगणांना एकदा-दोनदा नव्हे तर हजारदा आलिंगन घेतले तरी समाधान वाटत नसेल. माय चाइल्ड, माय चाइल्ड हे शब्द पुटपुटल्यावर oxytocinचा क्षण आल्यासारखा भासत असेल. साडेतीन कोटी जणांना जादूची झप्पी देणाऱ्या या गुरुमातेचे नाव जागतिक रेकॉर्ड्सच्या यादीत नक्कीच नोंदलेले असेल. स्वतःच्या संपत्तीतील काही वाटा तिने ठिकठिकाणी अत्युच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. एक मात्र खरे की तिच्या शिक्षणसंस्थेतून बाहेर पडणाऱ्या उच्चशिक्षित पदवीधरांनासुद्धा या मातेजवळ दैवी शक्ती आहे याची खात्री पटलेली असते. त्यामुळेच ही सुधामणी बघता बघता अध्यात्माच्या अत्युच्च शिखरावर पोचली. ती स्वतःला अवतारी स्त्री समजत नसली तरी तिच्याजवळ अतींद्रिय शक्ती आहे याबद्दल तिच्या भक्तांना तिळमात्र शंका नाही. ती केवळ आध्यात्मिक गुरुमाता नसून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, दारिद्र्य याविषयीसुद्धा प्रवचन देत असते. जगाच्या सर्व समस्यावर आयुर्वेदामधून उत्तर मिळेल याबद्दल तिची खात्री आहे.

महर्षी महेश योगीच्या पठडीत तयार झालेल्यापैकी रामदेवबाबा व श्रीश्री रवी शंकर यांनी आपल्या देशाची virtual वाटणी केल्यासारखे उत्तरेकडील राज्यात रामदेव बाबा व दक्षिणेकडील राज्यात श्रीश्री रवी शंकर आध्यात्मिक राज्य करत आहेत. महेश योगीच्या सर्व व्यापारीतंत्रांचा वापर करत हे दोघेही आपले प्रॉडक्ट्स चेल्यांच्या माथी मारत आहेत. त्यामुळेच कदाचित श्रीश्री रवी शंकरचे आर्ट ऑफ लव्हिंग (AOL)नसून आर्ट ऑफ सेलिंग लव्ह म्हणून टीका केली जात आहे.

दहा दिवसाच्या मौनव्रताच्या काळात सुदर्शन क्रिया करत असताना रवी शंकरला दैवी साक्षात्कार झाला व त्यातून प्रेरणा घेत त्यानी ठिकठिकाणी वेदविज्ञान विद्यापीठाच्या शाखा उभारल्या. विद्यापीठाच्या ट्रस्टमध्ये माजी न्यायमूर्ती अय्यर, भगवती, बेंगळूरूचे मेयर अशी मातब्बर मंडळी असल्यामुळे याला बस्तान बसविण्यात कुठलीही अडचण आली नसावी. कर्नाटक शासनाने नाम मात्र किमतीत बेंगळूरू येथे रवी शंकर यांना जागा दिली व 200 विद्यार्थ्यांची वेदविद्येची सोय केली. महर्षी महेश योगीनेसुद्धा हेच तंत्र वापरून दिल्ली येथील जागा बळकावली होती. सुदर्शन क्रिया योग यातून AOL च्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली व बघता बघता रवी शंकरला जागतिक प्रसिद्धी मिळाली. ज्या प्रकारे AOLचे मार्केटिंग रवी शंकर करत आहे त्याला तोड नाही. मागणी तसा पुरवठा या बाजारीकरणाच्या संदेशाप्रमाणे आपल्या प्रत्येक शिष्याला समाधान करण्यात रवी शंकर यशस्वी होत आहे. किंबहुना शिष्यांचे ब्रेनवाशिंग करण्याची हतोटी त्याला सापडली आहे. रवी शंकर याच्या मते त्याच्या आध्यात्मिक व्यवसायात इतर स्वामी, गुरु, आचार्य, बाबा, बुवा यांच्या दुकानामुळे याच्या उद्योगाला कुठलेही अडचण येत नाही. कारण यासाठीच्या जागतिक बाजारपेठेत अशा लाखो गुरुंना समावून घेण्याची क्षमता आहे. या समाजाला अशा बाबा-बुवांची अत्यंत गरज आहे, असे त्याचे प्रांजळ मत आहे. राजकीय दृष्ट्या नरेंद्र मोदी व सत्ताधारी भाजप यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्याचे काही बिघडत नाही, असेही त्याचे मत आहे.

AOLच्या कोर्सचे इतके का वेड आहे? कदाचित AOL हे स्मार्ट म्हणवून घेणाऱ्यांसाठी असावी. ज्यांना रिकामा वेळ आहे वा शारीरिकरित्या आपण अस्वस्थ आहोत असे ज्यांना वाटते, वा आपण एखाद्या भव्य दिव्य गोष्टीशी जोडलेलो आहोत अशी ज्यांची भावना आहे तेच AOLचा पाठपुरावा करतात असे लेखिकेला वाटते. हरमिंदर साहिब वा अजमेरचा शरीफ दर्गा वा शिरडी साईबाबाला हजारो संख्येने जाणारे, त्यासाठी शारीरिक वेदना सहन करणारे AOLच्या भानगडीत पडणार नाहीत. कारण अशा ठिकाणी जाणाऱ्या सश्रद्धांच्या मनात हरमिंदर साहिब वा अजमेरचा शरीफ वा शिरडी साईबाबा दुःखाचा पर्वतसुद्धा हलवू शकतात हा विश्वास असतो. तो विश्वास AOLच्या भक्तगणात नसावा असे वाटते.

लेखिकेच्या मते रामदेव बाबा हा virtual गुरु आहे. कारण त्याचा वावर प्रत्यक्षापेक्षा टीव्हीच्या पडद्यावरच जास्त असतो. हसताना, खिदळताना वा योगाच्या प्रात्यक्षिके करत असताना त्याचे दर्शन होत असते. गेल्या वीस वर्षात या योगी पुरुषावर इतकी टीका झाली तरी दाढीच्या आत लपलेल्या त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुतीत थोडासाही बदल झालेला नसावा. गंमत म्हणजे त्याच्या भोवती इतके गूढ वलय आहे की तो कुणाच्याही आवाक्यात येत नाही. कदाचित रामदेव बाबा, योगगुरुच्या प्रतिमेबरोबरच सत्ताकांक्षाची प्रतिमासुद्धा जपत असावा. परंतु 2014च्या निवडणुकीत त्याच्या राजकीय आकांक्षेला खीळ बसली. त्याच्या मते तो फक्त आपली छाप पाडण्यासाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरला होता म्हणे. अण्णा हजारेंच्या जनलोकपाल बिलसाठी पाठिंबा देण्याचे निमित्त साधून राजकारणात बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात तो अयशस्वी ठरला. यापूर्वीसुद्धा 2011च्या दिल्ली येथील जाहीर सभेतून पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याला स्त्रीवेषातून पळ काढावा लागला. योगविश्वाचा अधिपती व सर्व इंद्रियावर ताबा असलेल्या या गुरुला असे काही तरी करावे असे सुचलेच कसे? एक मात्र खरे की भाजपने याच्या ब्रँडचा आधार घेत सत्ता हाशील केली. परंतु शेवटी त्या पक्षानेसुद्धा त्याला झिडकारले. भाजपबरोबरच्या गाढ मैत्रीमुळे रामदेवबाबाच्या मागे लागलेला CBI व ED संचालनालयांचा ससेमिरा मात्र सुटला. आता रामदेव बाबा म्हणजे (पातंजलीची म्हणजे आद्य योगगुरु ही ओळख पुसून काढून) पातंजली ब्रँड साबण, मध, आटा यासारख्या गृहोपयोगी वस्तू वा वाण सामान अशी स्थिती आहे.

हे पुस्तक वाचत असताना या गुरुमालिकेत न शोभणारे गुरु म्हणजे मोरारी बापू, सद्गुरू जग्गी, व भय्यू महाराज असे म्हणता येईल. मोरारी बापूच्या ‘रामकथा’ने उत्तर भारताला भुरळ घातली. व मोरारी बापू गुरु पदापर्यंत पोचले. परंतु त्यांच्याबद्दल वाचताना हे सर्व अर्थाने एक निरुपद्रवी गुरू आहेत असे वाटते. अण्णा हजारे यांच्या प्रेमात पडलेले जग्गी वासुदेव हे मूळचे कर्नाटकातले. इतर गुरुप्रमाणे यांच्याबद्दलही अनेक दंतकथा आहेत. योगाचे क्लासेस घेत घेत शक्ती चलन क्रिया, भाव स्पंदन यारखे उपक्रम राबवत त्यानी ईश आश्रमाची स्थापना केली.भव्य ध्यानगंगा मंदिर बांधले. शिष्यांची संख्या व त्यांच्या सेलिब्रिटी स्टेटस् वरून गुरूंचे मूल्यमापन करत असल्यास जग्गी वासुदेवाचा प्रथम क्रमांक लागेल. लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडून अनेकांनी त्याचे शिष्यत्व पत्करले आहे. जग्गीच्या मते विनाशापासून या जगाला तोच फक्त वाचवू शकतो. महत्वाच्या पदावर असलेल्या 2000 विचारवंतांची (game changers) यादी त्याच्याकडे असून त्यांना दिलेल्या एका आठवड्याच्या प्रशिक्षणातून असाध्य ते साध्य करण्याची किमया त्याच्याकडे आहे, म्हणे.
रामदेवबाबाच्या उद्योजकत्वावर जग्गीचे प्रेम आहे. रामदेवबाबाइतके जग्गीला टीव्हीवर दिसण्याइतके वेड नसले तरी फुटबॉल, क्रिकेट खेळाडूंच्या शिबिरात, कार्पोरेट्सच्या अधिवेशनात त्याची हजेरी असते. तो फक्त आरामखुर्चीत बसून सत्संग करणारा गुरू नाही; तर धाडसी खेळ, वेगवान गाड्या व इतर खेळामध्ये प्रत्यक्ष भाग घेणारा सन्यासी आहे.

इंदौरच्या मध्यवर्ती ठिकाणी एका लहानशा जागेत राहणाऱ्या भय्यू महाराजांची छबी एखाद्या मध्यमवयीन सिनेनटासारखी आहे. पांढरे शुभ्र (खादी) कुर्ता, पायजमा व त्यांना मॅचिंग दिसणारे दंतपंक्ती, चेहऱ्यावर सुहास्य, यांच्या जोरावर त्यानी अनेक राजकीय नेत्यांना आपलेसे करून घेतले आहे. बाळासाहेब ठाकरेपासून प्रतिभा पाटील, नितिन गडकरी वा गल्ली बोळातील कुठलाही होतकरू राजकीय कार्यकर्ता त्याच्यापर्यंत सहज पोचू शकतात. सामान्यपणे ते कुठल्याही देवळात जात नाहीत. धर्मामधून समाजसुधारणा हवी व कर्मकांडातून स्वतःचेच कल्याण करून घेणाऱ्या वृत्तीला आळा बसावा असे त्यांना वाटते. त्यांच्या आश्रमात नाथ संप्रदायातील कालिका माता, सूर्य भगवान आणि दत्तात्रेय यांचे फोटो आहेत. इतर गुरु आपण किती मानववादी आहोत याचे शेखी मिरवत असतात. भय्यू महाराज मात्र स्वतःला देशभक्त म्हणवून घेण्यात धन्य मानतात. एका हातात स्वस्तिक चिन्ह, एका हातात नांगर, एका हातात गंगाजल व एका हातात भगवद्गीता आणि केसात मोरपीस असलेल्या भारत मातेचे चित्र त्यांच्या घरी बघायला मिळते. देशभक्तीपर गाण्याचे त्याना वेड होते. शहीद भगतसिंग वा शिवाजी महाराजासारखे होण्याचे त्यांचे बालपणीचे स्वप्न होते.

लेखिकेच्या मते भय्यू महाराजानी आपली गुरु प्रतिमा फार काळजीपूर्वक उभी केलेली आहे. जे भक्तगणांना आवडते तेच देण्यात त्यांचा हातखंडा आहे. आध्यात्मिक समन्वयक, शेती तज्ञ, शिक्षण तज्ञ, समाज सुधारक, आणि धूर्त राजकारणी याचे एक चांगले मिश्रण यांच्या व्यक्तिमत्वात आहे.

पुस्तक वाचून संपवत असताना भावदीप कांग यानी हेच गुरू का निवडले याबद्दल आश्चर्य वाटू लागते. कारण आपल्या देशात बाबा बुवांचे अमाप पीक आहे. इतिहासात डोकावल्यास रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, जिद्दू कृष्णमूर्ती, सच्चिदानंद, योगी भजनसिंग, योगानंद, भगवान रजनीश, आसाराम बापू, निर्मल बाबा, माता निर्मलादेवी, सारखे अतिरथी महारथी तिला सापडले असते. त्या तुलनेने भावदीप कांग यानी निवडलेले गुरू किस झाड की पत्ती वाटतील. कदाचित या ‘गुरू’ परंपरेत लिंग पिसाटपणा, स्त्रियाबद्दल टोकाची भूमिका, आणि भ्रष्ट मार्गानेच प्रसिद्धीस आलेल्यांची संख्या जास्त असल्यामुळे भावदीप कांग यांचे लक्ष तिकडे गेले नसेल. परंतु हे गुरु चरित्र वाचताना वाचकांना अस्वस्थ न करता मनोरंजनासाठी लिहिलेले आहे की काय असे वाटू लागेल.

एक मजेशीर पुस्तक म्हणून वाचत असतानाच या समाजाच्या आजच्या स्थितीला कारणीभूत ठरलेल्यांच्याबद्दल आपली भूमिका काय असावी याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे असे राहून राहून वाटते.

गुरुज
(स्टोरीज ऑफ लीडिंग बाबाज)
वेस्टलँड प्रकाशन
किंमतः 295 रु, पाः 266

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

धन्यवाद . पूर्ण लेख वाचायच्या आधीच प्रतिसाद देतोय. हा विषय फार आवडीचा असल्याने. पुस्तक घेतोय . लगेच.
लोकांच्या गरजांचा अभ्यास हि मंडळी फार सखोलतेने करतात व त्या गरजा भागवतात . यांचे मार्ग ( मेथड्स या अर्थाने ) फार महान असतात . या पुस्तकात उल्लेख नसलेल्या गुरु लोकांबद्दल हि लिहायला पाहिजे कोणीतरी .
जास्त नंतर लिहीन. धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यातील महर्षी महेश योगीपासून भय्यू महाराज पर्यंतच्या गुरुजनांच्या एकेका कारनाम्यावर ओझरती नजर टाकली तरी आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन शास्त्र, मानसशास्त्र यांचा पुरेपूर वापर करत अध्यात्म हे एक प्रॉडक्ट म्हणून विकत आहेत व आपली तुंबडी भरून घेत आहेत, हे लक्षात येईल. जाहिरातींचा प्रचंड मारा करत सप्लाय-डिमांडच्या चक्रात भक्तगणांना अडकवून स्वतःचे ऐषारामी व पंचतारांकित जीवन हे गुरुजन जगत आहेत.

माग‌णी आहे म्ह‌णून‌ पुर‌व‌ठा आहे. सुधार‌कांनीही प्र‌बोध‌नाचे प्रॉड‌क्ट‌ काढावे. त्यालाही एक‌ व‌र्ग‌ आहेच‌.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

सुधार‌कांनीही प्र‌बोध‌नाचे प्रॉड‌क्ट‌ काढावे

अहो विक‌त कोण घेणार्? पूर्वी स‌र‌कारी ख‌र्चाव‌र फुरोगामी लोकांचे जोरात चालाय‌चे, आता काय्?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुताई ,
... अहो विक‌त कोण घेणार्? पूर्वी स‌र‌कारी ख‌र्चाव‌र फुरोगामी लोकांचे जोरात चालाय‌चे,...
विकत कोण घेणार हे ठीक . पण सरकारी खर्चाने काय चालायचे ? ( म्हणजे गुरु लोकं जे करतात त्याच्याशी पॅरलल ? )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण सरकारी खर्चाने काय चालायचे ?

अनेक क‌मिट्या, म‌हामंड‌ळे व‌गैरे व‌र नोक‌री , जागा, प‌गार, गाड्या इत्यादी. प‌र‌देश प्र‌वास, त्यांचे ट्र‌स्ट अस‌तील त‌र स‌र‌कारी जागा इ. इ. इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>अनेक क‌मिट्या, म‌हामंड‌ळे व‌गैरे व‌र नोक‌री , जागा, प‌गार, गाड्या इत्यादी. प‌र‌देश प्र‌वास, त्यांचे ट्र‌स्ट अस‌तील त‌र स‌र‌कारी जागा इ. इ. इ.<<

हो ना. आणि आता ब्र‌ज‌ बिहारी कुमार‌सार‌ख्या लोकांचं दुकान चाल‌त‌ंय‌.

---
False opinions are like false money, struck first of all by guilty men and thereafter circulated by honest people who perpetuate the crime without knowing what they are doing. - Joseph de Maistre

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

व्य‌व‌स्था ब‌द‌ल ह्यालाच म्ह‌णाय‌चे चिंज्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>व्य‌व‌स्था ब‌द‌ल ह्यालाच म्ह‌णाय‌चे<<

आभाळात‌ला बाप आभाळात‌ आहे आणि कुणाच्या त‌री गोट्या क‌पाळात आहेत. एकंद‌रीत ज‌गाचा र‌हाट‌ व्य‌व‌स्थित चालू आहे असं माझं ठाम‌ म‌त‌ झालेलं आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सुधारकांनी प्रबोधनाचे प्रॉडक्ट काढावे असे तुम्ही का म्हणताय ते कळले नाही .
सुधारकांकडे ( म्हणजे जे कोण असतील त्यांच्याकडे ) हि पब्लिक भूक भागवायचं प्रॉडक्ट नाहीये .
हा सुधारक विरुद्ध गुरु किंवा ह्यांची प्रॉडक्ट विरुद्ध त्यांची प्रॉडक्ट असा सामना नसावा .
गुरु व त्यांची प्रॉडक्टस हि स्वयंभू असतात . अत्यंत इनोवेटिव्ह असतात .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

र‌.धों नी नाही का काढ‌ल‌? जेव्हा लोकांच्या ह‌ळू ह‌ळू ल‌क्ष्हात‌ आल‌ की अरे हे आप‌ले प्र‌श्न‌ सोड‌वाय‌ला उप‌योगी प‌ड‌त‌ तेव्हा त्याला पाठिंबा मिळालाच‌ की! साय‌कियाट्रिस्ट‌ हे म‌नाचे डॉक्ट‌र‌ म्ह‌णून‌ आता निम‌श‌ह‌री भागात‌ मान्य‌ता पावू लाग‌ले आहेत‌. सुधार‌की विचार‌ हे आप‌ल्या फाय‌द्याचे आहेत‌ असे क‌न्विन्स‌ क‌र‌णारी य‌ंत्र‌णा लोकांम‌धे रुज‌व‌ण्यात‌ य‌श‌ आले त‌र‌ लोक‌ तिक‌डेही व‌ळ‌तील‌.प‌ण‌ ह्ळु ह‌ळू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

र .धों . ना त्यांच्या हयातीत पाठिंबा मिळाला होता ? हे ऐकलं नव्हतं . जरा सांगाल याविषयी अधिक ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स‌माज‌स्वास्थ्य‌ पाहिले असेल‌च‌. स‌माजात‌ल्या एका घ‌ट‌काला त्याची उप‌युक्त‌ता न‌क्कीच‌ वाटली होती. स‌ग‌ळा स‌माज‌ पाठीशी होता असे मी म्ह‌ट‌लेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अहो प‌ण क‌लीयुगात् क‌ल्की ज‌न्माला येणारे ना. न‌ जाणो अम‌का क‌ली असाय‌चा किंवा त‌म‌का क‌ल्की असाय‌चा आणि न‌ जाणो आप‌ली मोक्षाची ब‌स‌ चुकाय‌ची.या विचाराने बाप‌डे लोक‌ गुरुच्या मागे लाग‌त‌ असावेत‌.
हे वाक्य‌ ज‌री उप‌रोधाने लिहीलेले अस‌ले त‌री जही मेन्टॅलिटी असू श‌क‌ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

४ पेक्षा जास्त माणसं रोज भेटुन समविचारी असल्याचा आनंद करत असतील तर त्याचा अर्थ ; त्यांच्यापैकी कुणीही विचारच करत नाहीये!

इस्राय‌ल क‌र्झ‌न‌र यांचं काही आठ‌व‌लं.

प‌ण शुद्धीव‌र आलो की लिहीन. मेरा न ऐत‌बार क‌रो ... मै न‌शे में हूं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुकताच भय्यु महाराजांचा द्वितीय विवाह डॅा. आयुषी शर्मा सोबत झाला. अमळ थकलेले वाटले. निव्रुत्ती अगोदरच जाहीर केलेली आहे हे विशेष.
हे देखणे गुरु म्हणून ओळखले जातात मात्र सर्वात सुंदर तरुण आध्यात्मिक गुरू बंगाल मधील अनुकुल ठाकुरांचे वंशज आहेत असे मर्यादीत अनुभवावरून मत आहे.
देखणी आध्यात्मिक स्त्री गुरू फारश्या बघण्यात नाहीत पुन्हा अनुभवातील मर्यादा आहे हे मान्य करतो.
तरी त्यातल्या त्यात ऐकत राहावे व मनाला सुदींग वाटते अशी म्हणजे ब्हमाकुमारी शिवानी
त्यांचा जागा रे ब्र. कुमारी संगे हा हिंदी तला कार्यक्रम सांत्वनदायी आवाजात ऐकणे एक आनंद आहे.
जय गुरुदेव.

http://www.patrika.com/news/indore/exclusive-photo-of-bhaiyyu-maharaj-se...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यांचा वावर सर्व ठिकाणी असल्याने एजंट म्हणून पुढे आले. तरी पाण्यात मासा किती आणि केव्हा पाणी पितो हे सांगणे कठिणच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

India's Obsession with Rape Accused Babas

वर उल्लेख केलेल्या लेखकांनी हा लेख आज लिहिला आहे (बाबा रामरहीमवर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तथाकथित आध्यात्मिक सुख समाधानासाठी भारतातील अशिक्षित जनसामान्य (आणि शिकले सवरलेलेसुद्धा!) कुठल्याही ‘गुरू’ला डोक्यावर चढवून घेतील

डोक्यावर ?? ओके. ठिकाय मग !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख छान आहे...पुस्तकात इंटरेस्ट निर्माण झाला आहे. या विषयावरील आपल्या मनातल्या असलेल्या बऱ्याच गोष्टी, जाणवणाऱ्या गोष्टी आहेत ह्या पुस्तकात असे दिसते आहे...अर्थात काही अपवादात्मक संस्था चांगले काम करीत असे म्हणायला वाव आहे असे वाटते, जसे की मी काही वर्षांपूर्वी चिन्मय मिशनच्या केरळ मधील Chinamay International Foundation संस्थेत गेलो होतो, आणि Indology विषयात करत असलेले काम मला आवडले होते. त्याबद्दल माझ्या ब्लॉगवर लिहिले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

इथं कुणाला ओशो कुणालाच का आठवलेले दिसत नाहीयेत. का माझ्या वाचनात गफलत होतेय???
Edit: आलं आलं, भगवान रजनिश, स्वारी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं