सध्या काय वाचताय? - भाग २५

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.

=========

बुकगंगाचा एक सुखद अनुभव

बुकगंगा डॉट कॉमवर अनेक पुस्तकं ईबुक स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यातली दोन काही कामासाठी घेतली होती, पण माझ्याकडे असलेल्या "किंडल फायर" टॅबवर त्यांचा ईरीडर काही चालेना. त्यामुळे लॅपटॉपवर वाचायची कसरत करायला लागली.

याबद्दल बुकगंगाला लिहिलं. मराठी पुस्तकविक्रेत्यांचे इतके सुखद अनुभव गाठीशी आहेत की काही उपयोग होईल असं वाटलं नव्हतं. पण त्यांनी महिन्याभरात चक्क ईरीडर ॲप किंडल फायरवर चालेल असं बनवून दिलं आहे! वर ते इन्स्टॉल कसं करायचं याची तपशीलवार कृतीही दिली आहे!

या सौजन्याची आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कृतीची मला बिलकुल अपेक्षा नव्हती.

field_vote: 
0
No votes yet

काय अनुभव आहे आबा! डोळे पाणावले खरेच. क्या बात, क्या बात. मराठी पाऊल खरेच एकदम दौडते आहे पुढे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुन्हा एकदा वाचतोय , फारुख धोंडी च Poona Company . १९५० च्या दशकातलं कॅम्प मधील पुणं . ( बा द वे फारुख धोंडी पुण्यात जन्मला (असावा ) बिशप्स मध्ये शिकला . सायेब गेल्यानंतर लगेचच्या काळातलं पारशी नेबरहूड मधलं पुणं . पुस्तक छान आहेच .
अवांतर १. तिथेच म्हणजे फारुख च्या गल्लीत कॉलेज मधला अगदी जवळचा मित्र राहायचा . त्याच्या घरी येणे जाणे असल्यामुळे या पुस्तकातील सगळे लँड मार्क्स अति ओळखीचे आहेत . त्यामुळे आवडतं का काय माहित नाही .
२.फारुख धोंडी हा एक लेखक आहे बहुधा आबांच्या विलायतेत राहणारा .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या आवडत्या कवियत्रीचे शॅरन ओल्डस ( sharon olds) यांचे "Odes" हे पुस्तक वाचले. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती केलेल्या या bawdy कविता क्वचित खळखळुन हसवुन गेल्या तर क्वचित निराशा करुन गेल्या. उदाहरणार्थ - Ode to clitoris, Ode of Withered Cleavage ठीक ठाक वाटल्या, जरा ओढुन ताणुन केल्यासारख्या वाटल्या.
या उलट ode to tampon खूप आवडली.

“Inside-out clothing;
queen’s robe;
white-jacketed worker who clears the table
prepared for the feast which goes uneaten;
hospital orderly, straitjacket/
which takes, into its folded wings,
the spirit of the uncapturable one;
soldier’s coat;
dry dock for the boat not taken;
seeker of the red light of stars
which have ceased to be before we see them;”

ode to penis, ode to balls या विनोदी वाटल्या,

१ - माहीत आहे कवियत्री हा सेक्सिस्ट शब्द आहे. Call me old-fashioned.
२ - मराठी शब्द?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खारीच्या वाटा | ल. म. कडू | राजहंस

अमुकाय नम: | (कारण मला समजा पुस्तकाच्या दुकानात एकटं सोडून दिलं तर हे पुस्तक कधीच उचललं नसतं.)

एका निसर्गरम्य खेड्यात राहणाऱ्या लंपनवयीन मुलाला एक जखमी खार मिळते. आईच्या आणि मित्राच्या मदतीने तो ती खार पाळतो. त्या मुलाचं, मित्राचं आणि खारीचं भावविश्व दाखवणारी कादंबरी आहे.

या कादंबरीने अक्षरश: जिवंत अनुभव दिला. ते गाव, त्यातले लोक यांबरोबरच प्राणी आणि झाडं यांचंही अतिशय रसरशीत चित्रण आलं आहे. इतकं रसरशीत की 'बायोडायव्हर्सिटी' हा विषय शिकवणाऱ्या एका मैत्रिणीला हे पुस्तक वाचण्यासाठी खास शिफारस केली आहे.

ल. म. कडूंनी यातली चित्रंही स्वत: काढली आहेत. तीही अतिशय रेखीव आहेत. पण फक्त रेखीवच आहेत. रंगीत असती तर बरं झालं असतं.

राजहंस प्रकाशनाने कादंबरीचा क्लायमॅक्स काय आहे हे बावळटासारखं मलपृष्ठावर छापलं आहे. राजहंससारख्या मातबर प्रकाशनाकडून इतका निर्बुद्धपणा अपेक्षित नव्हता. असो. कोणी विकत घेतली तर एका पर्मनंट मार्करने मलपृष्ठ काळंकुट्ट रंगवून मगच पुस्तक हाती धरावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आयला जबरदस्त! पाहिलेच पाहिजे.

मराठीत अशी लंपन-क्लास पुस्तके अजून झाली पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लंपनचा विषय काढलाय तर वाचायची इच्छा झाली.
लंपूच्या मी अखंड प्रेमात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

मुलाचं भावविश्व आणि गावाकडचे चित्रण खरोखरीच अतिशय मनोरंजक आहे. पण ते अधिक मनोरंजक झाले आहे ते खारीच्या ठायी दाखवलेल्या अविश्वसनीय बुद्धीमत्ते मुळे. ती अशक्य वाटते. आणि त्यामुळेच सगळी गोष्टच FICTION आहे कि काय अशी शंका वाटू लागते. पण तरीही तपशील इतका झकास आहे की खूप मजा आली वाचताना हे मान्यच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचली ही कादंबरी. छान आहे. सुचवणीबद्दल धन्यवाद आदूबाळ. कादंबरीचा शेवट मनाला चटका लावून गेला. अवांतर शंका : पुण्याजवळचं नक्की कुठलं खेडं असावं हे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्याजवळचं नक्की कुठलं खेडं असावं हे ?

हा प्रश्न माझ्याही डोक्यात आला होता. मला वरकोकणाच्या बाजूचा देशावरचा भाग / मावळपट्टा वाटतोय.

मला मावळपट्टा वाटण्याचं कारण:

- माती लाल आहे
- नगद पिकं म्हणावी तर हिरडा आणि बांबू आहेत
- जवळची मोठी बाजारपेठ पुणे आहे आणि तिथे गच्च भरलेली बैलगाडी पोचायला दोन दिवस लागतात
- पुण्याचा टचपॉईंट पर्वती आहे. म्हणजे गाव पुण्याच्या पश्चिमेला असावं
- बाकी काही मावळ/वरकोकणस्पेशल शब्द आहेत (उदा० दांड)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

या मुलाखतीतून शोधलं.

The premise for the story came from Mr Kadu’s life. It was while he was pursuing his primary schooling in Panshet that a dam came up in the vicinity. The government provided land to the residents for resettlement. He moved to Pune where he finished his schooling and pursued his love for art by graduating through Abhinav Kalamandir, Pune.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

हायला स्पॉट ऑन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नील लोमस आणि आदूबाळ धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाचत नैये सध्या, पण विषय अतिरोचक आहे म्हणून लिंक डकवून ठेवतो.

धरमपाल नामक विचारवंतांनी काही अतिशय फंडामेंटल आणि रोचक विषयांवर काम केलेलं आहे. ब्रिटिश सत्तेच्या अनुषंगाने ज्या चर्चेच्या फैरी झडत असतात त्यांमधील काही सदाबहार विषय म्ह.

१. ब्रिटिशपूर्व काळातील भारतातील शिक्षणव्यवस्था
२. ब्रिटिशपूर्व काळातील भारतातील सायन्स व टेक्नोलॉजी

नेमक्या याच दोन विषयांवर यांनी पुस्तके लिहिलेली आहेत आणि जेव्हा जेव्हा सीरियस डिबेट्स सुरू होतात विशेषत: शिक्षणाबद्दल तेव्हा यांचा हवाला दिला जातो म्हणून ही पुस्तके वाचली पाहिजेत.

टेक्नॉलॉजीवाल्या पुस्तकाची लिंक.

https://archive.org/stream/DharampalCollectedWritingsIn5Volumes/1Dharamp...

शिक्षणव्यवस्थावाल्या पुस्तकाची लिंक.

https://archive.org/stream/DharampalCollectedWritingsIn5Volumes/3Dharamp...

एंजॉय.

मनोबा ऐकतोयस ना रे? की याचाही रेडिमेड सारांश हवा तुला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"राजीव साने यांची सुलटतपासणी" हे पुस्तक वाचतोय. अगदी गप्पा या स्वरुपात पुस्तक आहे. अजय ब्रह्मनाळकर व संजीवनी चाफेकर यांनी संकलन केले आहे. आपली मते तपासत राहणे व त्यात काही बदल करावासा वाटला तर तो खुल्या मनाने स्वीकारणे. हा भाग त्यात मनोरंजक वाटतो. तसेही राजीव साने हे एक अजब रसायन आहे.
http://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Rajiv%20Sane%...
आदूबाळासाहेबांना विशेष आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हि सगळी मुलाखत u-tube वर उपलब्ध होती. आता पुस्तक खपावे म्हणून माजागावकरांनी काढून टाकली असेल तर ठाऊक नाही.
साने यांच्या मांडणी मधील धक्कातंत्र अतिशय परिणाम कारक असते
पण ज्यांनी ती मुलाकःत पहिली असेल त्यांना पुस्तकात कदाचित पुरेसे धक्के बसणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'निवडक बाबुराव अर्नाळकर' नावाचे जाडजूड पुस्तक सध्या वाचतो आहे, थोडेसे पुढे मागे चाळून झाले आहे...हजाराच्या वर रह्स्यकथांची पुस्तके लिहिणारे अर्नाळकरांच्या कार्यावर आहे हे पुस्तक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

आयला भारीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाजी महाराजांची खरी जन्मतारीख कुठली?

याबद्दल खल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६८ साली एक समिती बोलावली होती. त्या समितीचा अहवाल आता नेटवर उपलब्ध झालेला आहे.

https://drive.google.com/file/d/0BwUeZjjmtW1FcUN2YkhtTzQxNFE/view

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निकोलस तालेब हा माझा आवडता लेखक आहे. त्याने हरदीप सिंगचे पुस्तक वाचा म्हणून सुचवले होते. हरदीप सिंगांना मंत्रीपद मिळालं आणि बरेच दिवस ते चर्चेत येत असल्याने त्यांचे Perilous Interventions: The Security Council and the Politics of Chaos हे पुस्तक मी मागवले आहे. मोदींनी हरदीप सिंगांना मंत्री केलं हे देर आए दुरुस्त आहे या प्रकारतलं आहे की मोदींच्या गुणग्राहकतेचं कौतुक करावं (?)या द्वंद्वात मी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

निकोलस तालेब हा माझा आवडता लेखक आहे.

ब्लॅक स्वॉन वाचलंत काय ओ ? त्यात आमच्या हायेक सायबांबद्दल......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तालेब ट्रंप समर्थक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

असणारच. ट्रंप हा व्हाईट वाईट स्वॉन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण रे गब्बु हे हायेक, क्वांट ट्रेडिंग वाले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(१) फ्रेडेरिक हायेक
(२) सलमा हायेक

गरजूंनी आपल्या आवडीनुसार निवड करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यवनी नवनीतकोमलांगी

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'न्यू यॉर्कर'मधलं, दोन आठवड्यांपूर्वीचं फिक्शन - An Evening Out वाचून झाल्यावर पुन्हा लेखकाच्या आवाजातलं वाचनही ऐकलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा | जयंत पवार | लोकवाङ्मयगृह

खरं सांगतो, हा कथासंग्रह वाचून मी साष्टांग नमस्कार घातला. जयंत पवारांचं 'अधांतर' हे नाटक याआधी पाहिलं होतं (त्याबद्दल ऐसीवर लिहिलंही आहे). तेव्हाच त्यांचं लेखन आवडतं आहे हे लक्षात आलं होतं. पण चांगला नाटककार चांगला कथालेखक असतोच असं नाही, आणि व्हा० व्ह. त्यांच्या 'फीनिक्सच्या राखेतून उठला मोर' या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचंही ऐकलं होतं.

या कथासंग्रहात पाच कथा आहेत. चढत्या भांजणीने त्या आवडत गेल्या. 'बाबलच्या आयुष्यातलं धादांत सत्य' ही पहिलीच कथा पाचांपैकी सर्वात कमजोर वाटावी अशी. दुसरी कथा 'सर निघाले सप्तपाताळाकडे' ही आशय आणि शैली यांमध्ये जमली आहे, पण त्या कथेत काहीच 'घडत' नाही असं वाटलं.

सर्वात जमलेली कथा म्हणजे 'वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा!' पार नतमस्तक व्हावं अशी कथा आहे. बदलतं गिरणगाव, त्यात राहणारी वरकरणी एकसारखी दिसणारी माणसं, तिथले गुत्ते, बदलतं अर्थकारण आणि राजकारण यांच्याशी संबंध आला आहे, त्यामुळे कथा विशेषच आवडून गेली. दीपक टॉकीज, धनमिल भागांत आजही एक तुटलेपण जाणवतं. एका बाजूला फीनिक्सचा चकचकाट, दुसऱ्या बाजूला प्रभादेवी, दादरचा अटळ मध्यमवर्गीयपणा यामधला हा भाग भडक रंगांनी रंगवलेला वाटतो. पवारांनी बरोब्बर ते धरलं आहे. स्पॉयलरभयास्तव जास्त लिहीत नाही.

'तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य' ही कथा एका अर्नाळकर/ गुरुनाथ नाईक टाईप रहस्यकथाकाराबद्दल आहे. त्याची पात्रं, त्या पात्रांमागच्या प्रेरणा, रहस्यकथाकाराचं वैयक्तिक आयुष्य आणि त्याने लिहिण्यासाठी निवडलेला प्लॉट हे सगळं एकमेकांत झकासपैकी अडकलं आहे. शेवटची कथा 'तुझीच सेवा करू काय जाणे' हीदेखील गिरणगावकरांच्या संक्रमणाचा काळावर आहे. गिरणगावातलं धार्मिकतेचं प्रस्थ आणि त्याचे आयुष्यावर होणारे परिणाम असा साधारणपणे कथेचा धागा आहे.

कथासंग्रहाला असलेली प्रस्तावनादेखील अत्यंत मार्मिक आहे. वास्तववादाच्या मर्यादा यावर सतीश तांब्यांनी लिहिलेलं फेसबुकी वाचलं होतं. फिक्शनचं महत्त्व हा मुद्दा 'सेपियन्स'मध्येही आला आहे. आणि कथेच्या 'माणूसकेंद्री' असण्याबद्दल अमिताव घोषने लिहिलेलं आहे. या तिन्ही मुद्द्यांना प्रस्तावना एकत्र गुंफते.

सगळ्या कथांकडे एकत्र बघता आवडलेल्या गोष्टी:
- अद्भुतरम्यता** आणि वास्तववादापासून जाणिवपूर्वक घेतलेली फारकत
- 'चौथी भिंत' फोडून लेखकाने थेट वाचकाशी बोलणं. तेही "वाचकहोऽ.." वगैरे प्रिटेन्शियसनेसपणा न करता.
- कथांना दिलेली उपशीर्षके (पंकज भोसलेही हे करतात. लय डेरिंग लागतं हे करायला.)

सर्वात डोक्यात गेलेली गोष्ट म्हणजे शुद्धलेखनाच्या चुका. बाकी कोणाकडून झाल्या तर एकवेळ ठीक आहे, पण 'भूपेश गुप्ता भवन' आणि खटाववाडीतून या चुका अपेक्षित नाहीत. त्यातून लोकवाङ्मयगृहाने आपल्या 'सुबक आणि निर्दोष निर्मितीमूल्यां'बद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेतलेली नुकतीच कुठेतरी वाचली, और अब यह. असो.

_____________
**माल्कीनबै ह्यो शब्द गंडलाय. उकार 'भ'ला पाहिजे तो 'द'खाली दिसतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

इथे बहुतेकांनी नरहर कुरुंदकर वाचले असतीलच. कालच्या (१७-०९ - २०१७) लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत त्यांचा ' व्यक्तिपूजा : एक चिकित्सा' या शीर्षकाचा लेख पुन: प्रसिद्ध केला गेला आहे. पुन:प्रत्ययाच्या आनंदासाठी (पुन्हा) एकदा वाचायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॅन ब्राऊनच्या ओरिजिनची कोणी वाट पाहत आहे काय? ३ तारखेला येत आहे. प्री बुकिंग चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

त्याचं लॉष्ट सिंबॉल (मराठीतून*) वाचलं. त्यानंतर डॅन ब्राऊनला चेतन भगतसोबत बसवला आहे.
त्याच्या आजवरच्या कार्किर्दीत "डा विंची कोड" झेपलं- बाकी सगळी रिसायक्ल्ड वाटली. नवीनही त्याच माळेतलं असणारे.

सुरूवातीची "डिजिटल फोर्ट्रेस /डिसेप्शन पॉईंट" वेगळी होती खरी.

*भाषांतर करणाऱ्याला परत काम मिळता कामा नये. अगदीच वाईट (चिराबाजारात बर्फ़ लेवल [पहा: पु.ल. खुर्च्या])

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टीना फेचं 'बॉसीपँट्स' वाचलं.

मी आपण होऊन उचललं नसतं, पण ॥नंदन प्रसन्न॥ पुस्तकाचं कव्हरही विनोदी आहे.

बॉसीपँट्स

स्वतःला फार थोर न समजणाऱ्या, पण विनोदाची चांगली जाण असलेल्या, यशस्वी टीना फेच्या गंमती वाचायला मजा आली. काही गोष्टी लक्षात राहिल्या. एक भाग असा की 'काही काळापूर्वी माझा बांधा शेलाटा होता तेव्हा ...'; त्यात ती लिहिते, "माझा बांधा आकर्षक आहे म्हणूनच मला भाव देणाऱ्या लोकांच्या नानाची टांग." त्याच्या पुढचाच भाग असा की 'काही काळापूर्वी मी जाडजूड झाले होते तेव्हा ...'; त्यात ती म्हणते, "माझा बांधा अनाकर्षक झाल्यामुळे मला भाव न देणाऱ्या मित्रांच्या नानाची टांग."

टीना फे 'सॅटर्डे नाईट लाईव्ह'साठी लेखन करत असे. त्यात तिनं आणि एका मैत्रिणीनं मिळून सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल एक स्किट लिहिलं. ते पुरुष निर्मात्यानं नाकारलं. यात सरळच स्त्रीद्वेष शोधणं सोपं आहे; पण या इसमाचा बाकी अनुभव असा नव्हता. मग त्या दोघींनी स्किटचा मुद्दा लावून धरला, तेव्हा असं लक्षात आलं की हा पुरुष असल्यामुळे त्यातले विनोद त्याला समजलेलेच नव्हते. ते सगळे समजावून सांगितल्यावर स्कीट पास झालं, टीव्हीवर ते लोकप्रियही झालं. त्याच्या शेवटी ती लिहिते, "म्हणजे कॉलेजात असताना माझ्या पॅड्समुळे मला जी असुरक्षितता वाटायची, विशेषतः मुलगे काय म्हणतील अशा छापाची, ती सगळी उगाच होती तर. त्या पोरांना घंटा काही समजलं नव्हतं काय सुरू आहे ते!"

पुस्तकातले शेवटचे तीन परिच्छेद मुळातूनच -

They were going to be fine, but they couldn't possibly believe it.

That must have been what I looked like to my doctor friend. That must be what I look like to anyone with a real problem - active-duty soldier, homeless person, Chilean miner, etc. A little tiny person with nothing to worry about running in circles, worried out of her mind.

Either way, everything will be fine. But if you have an opinion, please feel free to offer it to me through the gap in the door of a public restroom. Everyone else does.

ही बाई किती आत्मविश्वासानं जगाला फाट्यावर मारते, ते संपूर्ण पुस्तकभर दिसत राहतं. जग फार काही महान नाही पण मी त्याचा त्रास करून घेत नाही, हे ती ज्या विनोदी शैलीत सांगते, तो प्रकार लोभस वाटला.

आबाकडे अमुकदादा आहेत, तर माझ्याकडे नंदन आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नन्दन भौ इथे आहेत होय मुक्कामाला. त्यांना नमस्कार सांगा आमचा भेटले तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रणाम, टण्याशेठ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही टण्या का? ह्या माहितीसाठी धन्यवाद, नंदन.
टण्याशेठ, तुमचा मायबोलीवरचा 'विहीर'बद्दलचा लेख खूप आवडला होता. तसेच पुस्तकविश्ववरचे प्रतिसादही! इथेही भारी काहीतरी वाचायला मिळेल तुमच्याकडून अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मिहीर. पण मी प्रवीण दवण्यांवरुन स्फुर्ती घेवून स्वत:चे नाव टवणे केले आहे. तेव्हा आता मी काही लिहिले तर दवणीय असेल. ते पाहून तुम्ही मला इथून हाकलून लावाल.

नंदन, मिस्ड युअर रिव्युज ऑन आदर साइट. इथे वाचायला मिळतील ही आशा.

१९८४ पुन्हा एकदा य व्यादा वाचली. ऑरवेल वॉज जिनिअस.
इन्कार्सरेशन नेशन वाचतो आहे. फार काही हाताशी लागत नाहिये. सामाजिक समस्यांवरील नॉन फिक्शनचा विशेषत: अमेरिकन पुस्तकांचा एक ढाचा बनलेला आहे. ते पुस्तक तसेच पुढे सरकते. उदा. पुस्तकाची सुरुवात त्या लेखक/लेखिकेच्या फिल्ड वर्कच्या काळाच्या कुठल्यातरी मध्यातल्या एखाद्या किस्स्याने करायची. तो किस्सा मग पुस्तकात पुढे कुठेतरी पुन्हा येतो. मग थोडे धक्कातंत्र, थोडी एम्पथी, थोडी कंपॅशन, शेवटी रिपोर्टाज असल्याने कश्याचेच सोल्युशन नाही. बिहाइंड ब्युटिफूल फॉरेवर्स वाचताना हाच अनुभव आला. कदाचित मी फक्त नॉन फिक्शनच गेली ४-५ वर्षे वाचत असल्याने मला अजीर्ण झाले असेल. आता पुन्हा कादंब्र्यांकडे वळावे झाले.

वडिलांनी भारतातून येताना श्री व्यं केतकरांच्या कादंबऱ्यांचा संच आणलेला आहे. ते त्याचे सारखे कौतुक करत आहेत. २०च्या दशकात अमेरिकेत राहून एन/आर/आयच्या आयुष्यावर बेतलेल्या कादंब्र्या म्हणजे काहितरी वेगळे दिसत आहे. वाचून इथे लिहिनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा नॉनफिक्शनचा साचा बाकी मस्त वर्णिलात बरे! मलाही अगदी असेच वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तीनेक आठवड्यापूर्वी २००५ साली बनलेला प्राईड अँड प्रिजुडाईस पहिला. त्यानंतर दररोज कमीतकमी एकदातरी हा चित्रपट पहातेच आहे. कधीकधी पूर्ण बऱ्याचदा डार्सी जेव्हा जेव्हा आहे ते सीन....

यातला डार्सी कधीच अकडु वाटला नाही. खरंतर vulnerableच वाटला... socially awkward...

'अर्रे आपल्याला हे पुस्तक कळालच नाहीय का' अशी शंका येऊन परत पुस्तक वाचायला घेतलं. पण परत तेच मत होतंय. मला हे पुस्तक अजिबातच आवडत नाही. त्यातली लिझ्झी, डार्सी कोणीच आवडत नाही! सगळे केवळ भोचक, गॉसिपमंगर, इतरांच्या personal matter मधे लुडबुड करणारे, सांसबहु सिरीयल मधले लोक वाटत राहतात!

ही नक्की sarcastic social commentary आहे का? की ते गंभीरपणे matter of fact लिहिलेल आहे?? त्याकाळचे समीक्षक, वाचक यांचं काय मत होत या पुस्तकाबद्दल?? आताच्या डेलीसोपबद्दल दिडदोनशे वर्षानंतरच्या माणसांचे चुकीचे interpretation असू शकते तसेच काहीतरी या पुस्तकाबद्दल झाले नाहीय ना??

bbc सिरीज पाहूनदेखील माझे हेच confusion झालेलं. त्यावर ऐसीवर चर्चादेखील होती. शोधायचा प्रयत्न केला पण सापडली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सध्या वाचत नाही पण अवचितपणे सापडलेली काही मौक्तिके लोकांसोबत शेअर करावीत म्हणून पुन्हा इथे देतो.

https://archive.org/details/Mansa_Tattva_Viveka_of_Visvanatha_Nyayapanch...

या ग्रंथाचे नाव आहे "मांसतत्त्वविवेक". साधारण १६५० च्या आसपास संकलित केलेला ग्रंथ आहे. संकलनकाराचे नाव आहे विश्वनाथ न्यायपंचानन. हे साहेब मूळचे बंगालातले. त्यांचा हा ग्रंथ काशीतील एकाच हस्तलिखितावरून १९२७ साली जगन्नाथशास्त्री होशिंग यांनी प्रकाशित केलेला आहे.

छोटासाच तीसचाळीस पानी ग्रंथ- खरेतर बुकलेट आहे. नॉनव्हेज खावे की न खावे यावरून धर्मनिष्ठांची कायम शिरा ताणून भांडणे चाललेली असतात. त्यांनी हा ग्रंथ एकदा वाचावा फक्त. यात मनुस्मृती, देवलस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती, महाभारत, मिताक्षरा, भविष्यपुराण, इ. ग्रंथांचा सर्व्हे करून त्यांमधील नॉनव्हेजविषयक प्रो आणि अँटी अशी दोन्ही प्रकारची मते नोंदवली आहेत.

असा काही ग्रंथ अस्तित्वात आहे हे मला बंगालमध्ये गेल्यावर कळले. गौतम दासगुप्ता नामक एक व्युत्पन्न गृहस्थ परिचयाचे झाले होते त्यांनी जाता जाता एक स्टोरी सांगितली की बंगालमधील ब्राह्मणांना मांसखाऊ म्हणून अन्यदेशीचे ब्राह्मण हिणवीत तेव्हा ते दिल पे घेऊन एकाने सरळ तो ग्रंथच रचला. ही स्टोरी ऐकल्याला आता साताठ वर्षे झाली पण नेटवर कधी सर्च घेतला नव्हता. अलीकडे अतिशय रँडमली याची आठवण झाली तेव्हा गूगल केले तर काय आश्चर्य! सरळ ग्रंथच सापडला. अच्छे दिन ते यापेक्षा काय वेगळे असतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंदिरा संतांच हे पुस्तक आधीही वाचलेलं. सहज साधी मांडणी आणि आपल्या आसपासच्या गोष्टी इतक्या सुंदर असू शकतात हे अनुभवणं झालंच होतं.
पुन्हा वाचता वाचता लंपूच्या आसपासच्या कितीतरी गोष्टि सापडत गेल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

हे पुस्तक खूप दिवस पडून होतं. परवा वाचून काढलं. मी या आधी "गंध" पाहिला होता, आणि खूप वर्षांपूर्वी कुंडलकरांचं नाटक पाहिलं होतं, आता नाव आठवत नाही. एका मैत्रिणीने लेखकाचं नाव ऐकताच नाक मुरडलं, तो आता खूप बोअर करतो म्हणून. पण मला ही " कोबाल्ट ब्लू " कादंबरी आवडली. जेरी पिंटोने इंग्रजी अनुवाद केलाय तो कुणी वाचलाय का?

(खूप दिवसांनी नेटवर, ऐसीवर.... सगळ्यांना हाय-हेल्लो-काय-चाल्लय,इ!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>> जेरी पिंटोने इंग्रजी अनुवाद केलाय तो कुणी वाचलाय का?
--- नाही, पण जेरी पिंटोवरुन हा लेख इथे सुचवावासा वाटला आजच्या 'मुंबई मिरर'मधला:
https://mumbaimirror.indiatimes.com/others/sunday-read/kundan-shah-the-m...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(खूप दिवसांनी नेटवर, ऐसीवर.... सगळ्यांना हाय-हेल्लो-काय-चाल्लय,इ!)

खरडफळ्यावर या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

" कोबाल्ट ब्लू " कादंबरी आवडली. जेरी पिंटोने इंग्रजी अनुवाद केलाय तो कुणी वाचलाय का?

कोबाल्ट ब्लू माझ्या मते त्याचं सर्वात चांगलं लिखाण आहे. लेखकराव होण्याआधीचं म्हणून कदाचित, किंवा संपादकांकडून चांगलं घडवलं गेलेलं म्हणून, किंवा मुळातच अनुभवाचा आणि त्याला कादंबरीत उतरवण्याचा काढा जमला आहे म्हणून. जेरी पिंटोचा अनुवाद उत्तम अनुवाद आहे. अमराठी लोकांना शिफारस करण्याजोगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अरेरे! त्यांचा इतक्यातच लेखकराव झाला आहे का?
एरवी फक्त इंटीरियर मोनोलॉगवर "तेव्हा आपण अमुक अमुक केलं होतं" छाप लिखाण प्रचंड कंटाळवाणी ठरू शकतं, पण इथे मला क्वचितच पाल्हाळ जाणवला; कथानक चांगल्या लयीने उलगडत गेलं. "दृश्य" (?) वर्णतात्मक शैली आवडली. दोन्ही भागात निराळ्या दृष्टीकोनातून (आणि काहीशा निराळ्या भाषाशैलीतून) सर्व पात्रांची निराळी घडवण छान जमली आहे. इन्फॅक्ट, दृष्टीकोन (आणि त्याच्या मर्यादा) ही कादंबरीतला महत्त्वाचा धागा जाणवला, पण एकूण बिल्डुंग्सरोमन फॉर्मला नव्याने घडवण्यात कादंबरी परिणामकारक वाटली.

जेरी पिंटोचा अनुवाद उत्तम अनुवाद आहे. अमराठी लोकांना शिफारस करण्याजोगा.

योगायोगाने कालच माझ्या मित्राचा मुलगा एक इंग्रजी पुस्तक वाचत होता. त्याला विषय विचारता म्हणाला "It's, like, about these three people, two of whom, like, are gay, and it's all about, like, the complications and stuff.." मी लगेच त्याला शिफारस केली: "hmmm, you know, there's this book I just read that you might like..." Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचना, नेटविरक्तीच्या काळात जी पुस्तकं वाचलीत त्यांविषयी अजून सांगाजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

सांगणेबल, सुचवणेबल असं फारसं नाही वाचलं!
पण त्यातल्या त्यात - पार्थ चॅटर्जींचं जुनं पुस्तक - "अ प्रिन्स्ली इम्पोस्टर? द कुमार ऑफ भवाल" हे १९२०-३० सालच्या प्रसिद्ध तोतया केसबद्दलचे पुस्तक पुन्हा वाचले (मी बहुदा याचा उल्लेख एका जुन्या धाग्यात केला असावा) त्याची आता संक्षिप्त आवृत्ती निघाली आहे, जी अतिशय चांगली जमली आहे. ढाकाच्या भवला जमीनदाराचा मुलगा १९१० साली दार्जीलिंग्ला हवापालटासाठी गेला असताना मरण पावला, पण १९२१ साली एका साधूने तोच भवालचा राजा असल्याचा दावा केला. प्रकरण कोर्टात जाऊन थेट ४०च्या दशकात प्रिवी काउन्सिल पर्यंत गेले. वाचले नसले तर जरूर वाचा.
ते आवडले तर फ्रान्स मधली १६व्या शतकापासून गाजत आलेल्या मार्तं गेर तोतया प्रकरणावरचे नॅटली डेविसचे पुस्तकही मस्त आहे - पीडीएफ सहज मिळेल. त्यावर जेरार देपार्दिय चा सिनेमाही यूट्यूबदवर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या सुचवणीवरून संक्षिप्त आवृत्ती - Dead man wandering - नुकतीच वाचली. क्या बात! अतिशय सुरेख जमलेलं पुस्तक आहे. प्रदीर्घ खटला, कायदेशीर खाचाखोचा, न्यायदानावर पडणारे सामाजिक प्रभाव, 'आयडेंटिटी' या विषयावरचं चिंतन, रिसर्चची मेहनत - सगळं अप्रतिम आहे.

अनेक आभार!

अवांतर: ही आवृत्ती ज्या Hedgehog and fox मालिकेचा भाग आहे त्या मालिकेतली बाकी पुस्तकंही रोचक वाटताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त्या मालिकेत वेलचेरु नारायण राव, सुमित गुहा, सुमित सरकार, महेश रंगराजन यांची चांगली आहेत. पण भवाल राज्याच्या कथानकासारखी नाहीत, जास्त ॲकॅडेमिक ढाच्यातली आहेत.
ख्रिस्चन नोवेत्जकेचे The Quotidian Revolution हे ही सुचवेन. Permanent Black नेच छापलंय, पण या मालिकेत नाही. लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी चा अत्यंत रोचक अभ्यास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! तुमचंच पुस्तक मागवून ठेवलंय, ते सध्या लैनीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अरे देवा! Smile (जरा बिचकतच) प्रतिक्रियेच्या अपेक्षेत....

Dead Man Wandering वाचल्यावर आपण सदाशिवराव भाऊ, आणि पाणिपतहून जिवंत परत आल्याचा दावा करणाऱ्या तोतयावर कोणी असेच अभ्यासपूर्ण, पण पेजटर्नर पुस्तक लिहावे असे वाटले. मला वाटतं केळकरांनी "तोतयाचे बंड" म्हणून नाटक लिहीले होते, त्यानंतर त्याबद्दल काही वाचले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त सदाशिवरावभाऊच नव्हे, अजूनही तोतये होते. या एकूणच तोतयांवर एक पुस्तक झाले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा, लिंक पार व्हाया हावडाब्रिज ते व्रिजिनल डॉन, सेल्फडॉन, डॉन्टू आली पैजे.
मेकिंग ऑफ तोतया ही कन्सेप्टच लै टेम्प्टिंग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाऊंव्यतिरिक्त मला फक्त जनकोजीचा तोतया माहीत आहे. आणखीही होते का?

(संपादक: नव्या रिव्ह्यूचा नवा धागा करेन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हो, अजूनही काही तोतये होते असे ओझरते आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Serious men | Manu Joseph

ज्याच्या नवीन लेखनाबद्दल एक्साईट व्हावं असा लेखक मिळाला की फार भारी वाटतं. याआधी मनू जोसेफची 'Illicit happiness of other people' वाचली होती, आणि आवडली होती. का कोण जाणे ही पहिली वाचायची राहून गेली होती.

एका शैक्षणिक संस्थेतलं राजकारण हा मुख्य गाभा आहे. (ही शै० संस्था उघडउघड टीआयएफआरवर बेतली आहे.) त्यातल्या डायरेक्टरचा - प्रसिद्ध फिजिस्टिस्टचा - उदयास्तोदय मांडणारी कादंबरी आहे. दुसरा गाभा म्हणजे त्या शास्त्रज्ञ डायरेक्टरच्या पीएच्या आयुष्यात घडणाऱ्या (किंवा पीए बुद्ध्याच घडवत असलेल्या) उलथापालथी.

अनेक कादंबऱ्या शब्दांचे अजस्र बुडबुडे फुगवतात, पण इवलुसं काहीतरी सांगतात. पण मनू दोन्ही कादंबऱ्यात खूप काही सांगतो. शैक्षणिक संस्थातला जातिवाद, त्यावर आपल्या पद्धतीने धूर्तपणे उपाय शोधणारे सेक्रेटरीसारखे लोक, बीडीडी चाळींतलं गुरावानी जगणं, 'चाईल्ड प्रॉडीजी'बद्दल भारतीयांच्या मनात असलेला हळवा कोपरा, बाप-लळा, प्रांतिक स्टीरियोटाईप्स, अशा अनेक थीम्स मनूच्या कादंबरीत येऊन जातात.

सशक्त कादंबरी वाचण्याची इच्छा असेल तर जरूर वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जरुर वाचेन. भारतीय इंग्रजी लेखकांबाबत मला आढ्यतेच्या काड्यांचे ॲक्युपंचर झालेले आहे. नुसतंच मेक बिलिव्ह प्रकारचं. त्यातनं बाहेर पडायला मदत होईलशी वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

या भावनेशी सहमत आहे. बाकीच्या सोनेरी कचऱ्यातून किरण नगरकर, हनिफ मोहम्मद, अमिताव घोष अशी काही मोजकी रत्नं मिळाली ती जपून ठेवली आहेत. आता त्यात जोसेफ आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आबा ,
या लिस्टीत आपले पुणेकर फारुख धोंडी च नाव टाका की . त्यांचं 'पूना कंपनी ' चांगलं आहे कि . ( हा मधल्या काळात जरा त्यांनी सलमान रश्दी ची भक्ती जास्त केली असावी जरा पण तरीपण .. )
आणि रोहिंग्टन मिस्त्री नाय आवडला ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धोंडोपंतांचं नाय वाचलं. वाचतो आता.

मिस्त्री नाही आवडला Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मिस्त्री नाही आवडला Sad

इसपे मिलाओ हात! पण मला घोषही फार बोर करतात हल्ली. जुन्या लेखकांमध्ये वॉट अबाउट उपमन्यु चॅटर्जी? थरूर यांचं द ग्रेट इंडियन नॉवेल? ॲलन सीली? मी अजून मिनिस्ट्री ऑफ हॅपिनेस उचलायचं धाडस केलेलं नाही.
मनूंच्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. ते वाचून आमच्या संस्थेतले राजकारण थोडे सुसह्य वाटते का पाहायला हवे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला इंग्लिश ऑगस्ट आवडलं होतं. (हे काही मित्रांना सांगितल्यावर त्यांनी वेड्यात काढलं.) मिनिस्ट्री ऑफ हॅपिनेसचं धाडस मलाही झालं नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>एका शैक्षणिक संस्थेतलं राजकारण हा मुख्य गाभा आहे. (ही शै० संस्था उघडउघड टीआयएफआरवर बेतली आहे.) त्यातल्या डायरेक्टरचा - प्रसिद्ध फिजिस्टिस्टचा - उदयास्तोदय मांडणारी कादंबरी आहे. दुसरा गाभा म्हणजे त्या शास्त्रज्ञ डायरेक्टरच्या पीएच्या आयुष्यात घडणाऱ्या (किंवा पीए बुद्ध्याच घडवत असलेल्या) उलथापालथी.<<

तुमच्या सायबांच्या देशातल्या किंग्सली एमिसचं काही वाचलं आहे का? विशेषतः 'लकी जिम'? त्याचप्रमाणे डेव्हिड लाॅजचं 'चेंजिंग प्लेसेस'ही वाचून पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

एका शैक्षणिक संस्थेतलं राजकारण हा मुख्य गाभा आहे

हे असंच थोडसं रागां सारख्या दिसणार्या चेतन भगतांच्या रिव्हॉल्यूशन २०२० मध्ये पण है

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

अभ्यासाला लावलेल्या कविता हा गायत्री नातू ह्या लय आवडत्या जालीय लेखिकेचा लेख खूप दिवसांनी वाचला. ह्याच लेखासाठी ह्या अंकाला हात घातला. बाकी सगळे एका चु नॉस्टॅलजियात रमलेत. कधी हे नॉस्टॅलजियाचं ग्रहण संपणार देव जाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

The Arabian Seas- Barendse

Indian travellers and settlers in Britain- Michael H Fisher

Battle for Sanskrit - Rajiv Malhotra

Europe's India - Sanjay Subrahmanyam

Mughals, Portuguese and changing imageries of Indian ocean- Pius Malekandathil

Malik Ambar- life and works- Tamaskar

लौकरात लौकर एकपुस्तकव्रती झाले पाहिजे अशा लेव्हलची पुस्तके आहेत साला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Battle for Sanskrit - Rajiv Malhotra

ह्याबद्दल काय मत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संमिश्र मत आहे. बुलशिट बरेच आहे पण प्रस्थापित विचारवंतांना आवडणार नाही अशी तथ्येही आहेत. त्याने ते सर्वांना कळेल अशा भाषेत मांडलेय हा विशेष प्लस पॉईंट. एकूणच ज्यांना पाश्चिमात्य विचारपद्धती ही एकमेव ग्राह्य अभ्यासचौकट वाटते त्यांना हे पुस्तक न आवडणे अगदी समजू शकतो. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची स्तुत्य धडपड आहे पण साला प्रवाह इतका पॉवरफुल आहे की अशा लोकांना क्रॅकपॉट ठरवले जाते.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे पुस्तक पाहिलंयत का? मी अलिकडेच वाचले. पोलॉकच्या चौकटीतलेच आहे, पण काही विरुद्ध मते मांडणारे. प्राकृत भाषेच्या चर्चेच्या निमित्ताने सातवाहनांची, शिलालेखांची, वगैरे बरीच रोचक चर्चा आहे. तुम्हाला आवडेल, कदाचित. फुकट ईप्रत प्रकाशकाकडेच उपलब्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा! नावावरनंच रोचक प्रकार वाटतोय. नक्की वाचेन. धन्यवाद!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शीर्षक पोलॉकच्या Language of the Gods चीच आठवण करून देणार आहे, पण एका जुन्या साधनामध्ये प्राकृतचे "नाग बाणी", अर्थात पाताळातली भाषा, म्हणून वर्णन आहे, ते कसे व का याची पुस्तकात विस्तृत चर्चा आहे.
मागे सुनितिकुमार चटर्जींचं पुस्तक वाचल्याचं बोलला होतात, त्यावरून आठवलं. चटर्जी, ग्रियर्सन, वगैरे जुन्या भाषाशास्त्रज्ञांच्या विचारचौकटींचे देखील मार्मिक विश्लेषण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चॅटर्जीपेक्षा ज्यूल्स ब्लॉखचा उल्लेख केला होता बहुधा.

पुस्तक चाळले, नाग बाणी, मिर्झा खान वगैरेपर्यंत पोचलो. पाहू कधी होतंय वाचून. रोचक आणि आवश्यक तर आहेच म्हणा विषय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हायला , बॅट्या दिवाळीपूर्व फराळ जोरात आहे की !!! ( हि पुस्तकं पैदा कुठनं केलीस ? )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहा, ही सगळी पुस्तके ॲमेझॉनवरनं पैदा केली, एक एका परिचिताकडनं घेतलं. एक पुस्तक वाचावे आणि त्यात दुसऱ्याचे रेफरन्सेस सापडावेत असं झालंय अनेकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऑडिओ बूक प्रथमच ट्राय करतोय. ऑडिबल.कॉम नामक सायटीची ट्रायल मेंबरशिप घेतली आहे. एका डॉलरला. त्यात पहिलं पुस्तक फुकट मिळालं आहे. ग्रेट एक्स्पेक्टेशन्स नामक चाल्स डिकन्सचं पुस्तक ऐकतो आहे. आतापर्यंत तरी हा प्रकार महा-उपयोगी वाटला आहे. बस प्रवासात वाचणे म्हणजे डोक्याचा आणि डोळ्यांचा भुगा होतो. अशावेळी पुस्तक ऐकणे भारी वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ट्राय आउट करेन नक्कीच. मला आजवर कधी वाटलं नै यात कै दम असेल म्हणून, पण पाहतो आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मीही अलिकडेच डिकन्सचे एक पुस्तक ऐकले - अ टेल ऑफ टू सिटीज. ("इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स.." Smile ऑफिसहून संध्याकाळी घरी चालत जाताना आयपॉडवर ऐकले. मजा आली, पण ऑडियोबुक्सचा आनंद वाचकाच्या आवाज आणि वाचनशैलीवर अवलंबून असतो, त्यामुळे थोडंफार रॅन्डम अनुभव असतो - बाकीची काही पुस्तकं (librivox.org वर खूप पुस्तकं फुकट उपलब्ध आहेत) मध्येच सोडून दिली.

आणि का कोण जाणे, पण मला ललितपेक्षा नॉन-फिक्शन ऐकणं सोपं जातं हेही लक्षात आलं. काही कामासंदर्भात अनेक ॲकॅडेमिक-छाप पॉडकास्ट ऐकायचे होते, चालत चालत ऐकताना, किंवा विणकाम करत असताना, त्यांच्यात जसं मन एकाग्र होत होतं तसं कादंबरी ऐकताना झालं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझाही अनुभव अगदी असाच आहे. मी रोजचे ३-४ तास ड्राइव्हमध्ये घालवतो. त्यात मी नॉन फिक्श्न पुस्तके मोप ऐकतो. मात्र फिक्शन नाही म्हणजे नाहीच ऐकू शकत. खूप प्रयत्न केला पण फिक्शन ऐकणे लगेच बोअर होते व तुकडेच्या तुकडे मिस होतात डोक्यात दुसराच विचार सुरु होऊन. गेल्या चार दिवसात १९८४ नेट लावून ऐकले. मात्र ते पुस्तकच मला इतके पाठ आहे की ते अध्येमध्ये मिस झाले तरी फरक पडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीही अलिकडेच डिकन्सचे एक पुस्तक ऐकले - अ टेल ऑफ टू सिटीज. ("इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स.." Smile ऑफिसहून संध्याकाळी घरी चालत जाताना आयपॉडवर ऐकले. मजा आली, पण ऑडियोबुक्सचा आनंद वाचकाच्या आवाज आणि वाचनशैलीवर अवलंबून असतो, त्यामुळे थोडंफार रॅन्डम अनुभव असतो - बाकीची काही पुस्तकं (librivox.org वर खूप पुस्तकं फुकट उपलब्ध आहेत) मध्येच सोडून दिली.

आणि का कोण जाणे, पण मला ललितपेक्षा नॉन-फिक्शन ऐकणं सोपं जातं हेही लक्षात आलं. काही कामासंदर्भात अनेक ॲकॅडेमिक-छाप पॉडकास्ट ऐकायचे होते, चालत चालत ऐकताना, किंवा विणकाम करत असताना, त्यांच्यात जसं मन एकाग्र होत होतं तसं कादंबरी ऐकताना झालं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅटमॅन, द डार्क नाईट रायझेस हा नोलनचा सिनेमा टेल ऑफ टू सिटीज वरुन प्रेरीत आहे हे कळल्यापासून हे पुस्तक वाचायच्या यादीत आहे. ऑडिओ आहे हे तर अजूनच उत्तम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आयला असंय होय? वाचना पडता तब फिर!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्रूस वेनच्या फ्युनरलला अल्फ्रेड एका पुस्तकातल्या काही ओळी वाचतो. त्या ओळी टेल ऑफ टू सिटीजच्या शेवटच्या ओळी आहेत. वर रोचना यांनी टाकलेल्या, "बेष्ट ऑफ द टाईम्स... वर्स्ट ऑफ द टाईम्स" या त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या ओळी आहेत ज्या बऱ्याच प्रसिद्ध आहेत. सिनेमात त्या पुस्तकाच्या शेवटच्या ओळी म्हणतो अल्फ्रेड.

“I see a beautiful city and a brilliant people rising from this abyss. I see the lives for which I lay down my life, peaceful, useful, prosperous and happy. I see that I hold a sanctuary in their hearts, and in the hearts of their descendants, generations hence. It is a far, far better thing that I do, than I have ever done; it is a far, far better rest that I go to, than I have ever known.”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्त मस्त मस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लिबरिव्हॉक्सवर ऑस्कर वाईल्डचं 'Importance of being Ernest' नक्की ऐका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगदी आत्ताच प्रकाशित झालेलं " माझा धनगरवाडा " लेखक धनंजय धरगुडे . आत्ताच चालू केलंय .. पहिली काही पाने वाचून झाल्यावर असं वाटतंय : साध्या पण ओघवत्या भाषेत लिहिलेलं ... वाचून झाल्यावर परत अपडेट टाकीन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथासन्ग्रह आहे. चान्गला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Bombay fever | Sidin Vadukut | Simon and Schuster

चेतन भगतच्या रूपाने डोंगराच्या बर्फाळ माथ्यावरून एक खडा गडगडत निघाला. लौकरच त्याचा कोसळता हिमनग झाला. आयायटी/आयायेममधून शिक्षण घेतलेला, मल्टिनॅशनल बँकेत किंवा कन्सल्टिंग फर्ममध्ये काम करणारा लेखक. फावल्या वेळात आपल्या मर्यादित अनुभवविश्वावर आणि कॅटने सुजवलेल्या व्होकॅबच्या जोरावर फकशिटमॅनयुक्त कादंबऱ्या पाडणारा. इंग्रजी वाचनात बहुश्रुत होऊ पाहणाऱ्या तरुण पिढीच्या नाभीतला स्फटिक. जॉनरा - चिक्लिट. मिळणार - फर्ग्युसन कॉलेज रस्ता किंवा चर्चगेट स्टेशन.

याच भगत घराण्यातला एक कलाकार सिदिन वादुकूट. याची 'डॉर्क' कादंबरीत्रयी तशी बऱ्यापैकी हिट झाली होती. मल्टिनॅशनल कंपनीत एक अत्यंत गर्विष्ठ रेम्या कसा टिकतो आणि फोफावतो याची कथा. (थ्री इडियटस चतुर रामलिंगमच्या भूमिकेतून कल्पून पहा.) बरी होती ती पुस्तकं, अगदी कोकाटे नव्हता झाला.

हा मनुक्ष तसा विस्मृतीत गेला होता. पण नुकतीच त्याची 'बॉम्बे फीवर' नावाची नवी कादंबरी हाती लागली. चिक्लिटकर्त्याने आपली गल्ली सोडून मेडिकल थ्रिलर लिहावी याचं कौतुक वाटल्याने वाचली.

नॉट ब्याड अॅटॉल. मुंबईत अचानक एक जीवघेणा जिवाणू उद्भवतो आणि हाहाकार होतो. काही डॉक्टर, सरकारी अधिकारी आणि राजकारणी मिळून त्याच्याशी यशस्वी लढा देतात असं कथानक आहे. रिसर्चबिसर्च एकदम कडक केला आहे.

पात्रनिर्मिती मात्र नीटशी जमली नाहीये. अर्थात थ्रिलरमध्ये प्लॉट की पात्र हा कायमच संघर्ष असतो. पण प्लॉटही म्हणावा तर एकरेषीय आहे. वर लिहिलेल्या कथानकाच्या दोन वाक्यांना 'का कोणी कसं कधी' हे प्रश्न विचारले की झाला प्लॉट. दुबळी पात्रं, सपाट प्लॉट पण तगडा रिसर्च असं करून थ्रिलरची लाज बऱ्यापैकी राखली गेली आहे. मुख्य म्हणजे चिक्लिटलेखकाने आपल्यावरचा तो छाप पुसून नवं काही करावं हे अभिनंदनीय आहे.

भारतीय वातावरणातली चांगली मेडिकल थ्रिलर वाचायची असल्यास अमिताव घोषच्या 'कलकत्ता क्रोमोसोम'ला अजूनही पर्याय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

चेतन भगतच्या रूपाने डोंगराच्या बर्फाळ माथ्यावरून एक खडा गडगडत निघाला. लौकरच त्याचा कोसळता हिमनग झाला. आयायटी/आयायेममधून शिक्षण घेतलेला, मल्टिनॅशनल बँकेत किंवा कन्सल्टिंग फर्ममध्ये काम करणारा लेखक. फावल्या वेळात आपल्या मर्यादित अनुभवविश्वावर आणि कॅटने सुजवलेल्या व्होकॅबच्या जोरावर फकशिटमॅनयुक्त कादंबऱ्या पाडणारा. इंग्रजी वाचनात बहुश्रुत होऊ पाहणाऱ्या तरुण पिढीच्या नाभीतला स्फटिक. जॉनरा - चिक्लिट. मिळणार - फर्ग्युसन कॉलेज रस्ता किंवा चर्चगेट स्टेशन.

आयोव! आबा खुंदल खुंदल के भगा भगा के मारे इस्माईलभाईकू ROFL ROFL ROFL क्याटने सुजवलेली व्होक्याब हे तर अतिअतिअतिपरफेक्ट निरीक्षण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'माहिष्मती' बोले तो? भरपूर म्हशी असलेली/ले?

आणि बादवे, हे नक्की कोण कोणास म्हणाले? याचा आगापिच्छा/संदर्भ काय? (कुतूहल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती हे एका जुन्या खऱ्याखुऱ्या साम्राज्याच्या राजधानीचे नाव होते, सध्या एमपीमधील महेश्वर.

अर्थ तोच आहे बहुधा.

बाहुबली नामक एक पिच्चर अलीकडे खूप यशस्वी झाला. प्राचीन भारतातील जनरल वातावरण आहे. त्यातले हे काईंड ऑफ "राष्ट्रगीत" आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहितीबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

আমার জীবন, রসগুলো। আমি মিষ্টি খাব। - সুকুমার বন্দ্যোপাধ্যায়।

लोल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ते रसगुल्ला टाईप करताना चुकलंय की रसगुलो असंच म्हणायचंय? एक्या अर्थे ते बरोबर आहे असे खपवताही येईल, अज्जीच मोडीत निघणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...अॉटोसजेष्टने जे दिले, ते निमूटपणे घेतले. अधिक चिकित्सा/दुरुस्ती करण्याचा कंटाळा केला.

सवडीने दुरुस्त करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

এখন ভাল?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हँ ॲखोन भालो आछे. धॉन्नोबाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फारच भारी वर्णन केले आहे चेतन भगत शैली लिखाणाचे. अर्थात या लिखाणाचा एक वाचकवर्ग असतो जसा वैचारिक लेखनाचा असतो, साहित्यातील निरनिराळ्या पायऱयांवरील लिखाणाचा असतो. कुणाला कमी जास्त लेखून काही फायदा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, कमी लेखत नाहीये. काही चिकलिट मलाही आवडतं. (उदा० फाईव्ह पॉईंट समवन, वादुकूटचं डॉर्क.) पण या चिकलिटाचा लौकरच एक ठसा/छाप झाला आणि त्यातून बदाबद जिलब्या पडायला लागल्या. लेखकांचं, वाचकांचं आणि पुस्तकांचं फार पटकन टाईपकास्टिंग झालं.

अर्थात हेही कमी लेखणं नाही. गुरुचरित्र, मेक्सिकोपर्व, मिल्स अँड बून्स आणि मायक्रोवेव्हमधले चायनीज पदार्थ या सगळ्या पुस्तकांना स्वत:चा एकनिष्ठ वाचकवर्ग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

५.समवन मलाही आवडलेलं. तसं लिखाण तेव्हा नवीन होतं म्हणून मस्त वाटायचं. नंतर मग ते तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कॅटच्या सुया टोचून बनवलेली वोक्याबची बावडी मिरवणारे तद्दन भंगार लोक्स माजले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थ्री इडियट्स बघितल्यानंतर मग ५.समवन वाचले, नि आमीर खानने अक्षरशः कचऱ्यातून कलानिर्मिती केल्याचा आविष्कार की साक्षात्कार की काय म्हणतात तो झाला. तत्पूर्वी चेतन भगतचे फक्त टू स्टेट्स वाचले होते, त्यामुळे तो पूर्वग्रह जमेस होताच.

(आमीर खानला तो परीस की काय म्हणतात तो कुठेशीक सापडला, विचारले पाहिजे. जमल्यास (नि परवडल्यास) पुढेमागे मीही भाड्याने घेईन म्हणतो.)

चेतन भगतच्या कानफटाखाली आवाज काढण्याची इच्छा केवळ या कारणाकरिता होत नाही, की नंतर डेटॉल नि साबणाने हात स्वच्छ धुण्याचे कष्ट घ्यावे लागतील, याची पूर्व- (नि पूर्ण) कल्पना आहे, म्हणून. (इन्सिडेंटली, श्री. प्रवीण दवणे यांजबद्दल नेमकी हीच धारणा होते. आणखीही आहेत, परंतु त्यांजबद्दल तूर्तास सोडून देऊ.)

परंतु, एकविसाव्या शतकातला इंग्रजी भाषेतला (अभावितपणे का होईना, परंतु) सर्वात विनोदी लेखक म्हणून त्यास मानलेच पाहिजे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबा, तुम्ही वन नैट अॅट कॉल सेंटर वाचाच. विशेषतः शेवट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

चिकफ्लिक तसं चिकलिट होय! मला उगम समजेना थोडा वेळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, न्याशनल डिजिटल लैब्ररी नव्या रूपात मोठ्या झोकात सुरू झालेली आहे. अकाउंट वगैरे काढायचे फ्रीमध्ये इतकाच काय तो जुन्यापेक्षा फरक. सर्व मिळून येक कोटीपेक्षा जास्त पुस्तके. एंजॉय!

https://ndl.iitkgp.ac.in/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंग्रजी आणि हिंदीसोबतच स्थानिक भाषा (आय.आय.टी. खरगपूर) बंगालीचाही समावेश असणे हेही स्तुत्य आणि अनुकरणीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत! आता ते पाहून वाटतं की अन्य लिप्याही द्यायला हव्यात, आफ्टरॉल "न्याशनल लायब्ररी" आहे.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१११

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

या धाग्यावर नवा अभिप्राय देण्याऐवजी नवा धागा चालू करावा ही पुढच्या प्रतिसादकाला विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0